चर्चा:शुक-रंभा संवाद
विषय जोडा- शुक :
मार्गे मार्गे जायते साधुसड्ग सड्गे सड्गे श्रूयते कृष्णकीर्ति: । कीर्तो कीर्तो नस् तदाकारवृत्ति: वृत्तो वृत्तो सच्चिदानंदभास: ॥२॥ तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रम्हवृन्दं वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद: । वादे वादे जायते तत्त्वबोध: बोधे बोधे भासते चन्द्रचूड: ॥३॥ हे रंभा, मार्गा-मार्गा वर मला साधुंचा सहवास लाभत आहे. प्रत्येक सहवासात भगवान कृष्णाचे गुणगान ऎकावयास मिळत आहे. ते ऎकत असताना आमची चित्तवृत्ति भगवंतात लीन होत आहे आणि ह्या ध्यानात सच्चिदानंदाचा सहवास लाभत आहे.॥२॥ तसेच प्रत्येक तीर्थावर ब्राह्मणांचा समुदाय उपस्थित आहे. हा समुदाय परमतत्त्वाविषयी विचार करित आहे. ह्या चर्चेतून आह्माला तत्त्वाचा बोध होत आहे आणि ह्या बोधामधून भगवान शंकराचा सहवास लाभत आहे.॥३॥
रम्भा : गेहे गेहे जड्गमा हेमवल्ली वल्यां वल्यां पार्वणं चन्द्रबिंबम् । बिम्बे बिम्बे दृश्यते मीनयुग्मं युग्मे युग्मे पञचबाणप्रचार: ॥४॥ घराघरामध्ये जणूकाही सुवर्णवेलीसारख्या चालत्या फिरत्या युवती आहेत. ह्या युवतींचे मुख पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहे. ह्या मुखचंद्रावर नयनरूपी दोन मत्स्य दिसत आहेत आणि ह्या डोळ्यांमध्ये कामदेवाचा संचार चालू आहे. ॥४॥
शुक : स्थाने स्थाने दृश्यते रत्नवेदी वेद्यां वेद्यां सिध्दगन्धर्वगोष्ठी । गोष्ठ्यां गोष्ठ्यां किन्नरद्वन्द्वगीतं गीते गीते गीयते रामचन्द्र: ॥५। प्रत्येक ठिकाणी रत्नजडित यज्ञकुण्ड दिसत आहेत. प्रत्येक यज्ञकुंण्डावर सिद्ध आणि गन्धर्वांची सभा भरली आहे. ह्या सभेत किन्नरगण किन्नरींसमवेत गीत गात आहेत आणि प्रत्येक गीतात भगवान रामचंद्राचे गुणगान करीत आहेत. ॥५॥
रम्भा : पीनस्तनी चन्दनचर्चिताड्गी विलोलनेत्री तरूणी सुशीला । नालिड्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥६॥ भरदार स्तन असलेल्या, शरीरावर चंदनाचा लेप असलेल्या, चंचल नेत्र असलेल्या अशा सुंदर स्त्रिला ज्याने प्रेमयुक्त अलिंगन दिले नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥६॥
शुक : अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा । विशोतिधो येन हदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥७॥ ज्याच्या रूपाचे चिंतन होऊ शकत नाही, जो निरंजन, विश्वाचे रक्षण करणारा आहे; अशा ज्ञानाने परिपूर्ण चित्स्वरूप परब्रम्हाचे ज्याने हदयापासून स्मरण केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥७॥
रम्भा :
कामातुरा पूर्णशशाड्वक्त्रा बिम्बाधरा कोमलनालगौरा ।
नान्दोलिता स्वे हदये भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥८॥
भोगाच्या इच्छेने व्याकुळ, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मुख असणार्या, कोमल ओठ असणार्या आणि कोमल कमळाच्या नाळाप्रमाणे गौर वर्ण असणार्या कामिनीला ज्याने आपल्या बाहुपाशांद्वारे हदयाशी कवटाळले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥८॥
शुक :
चतुर्भुजश्चक्रधरो गदाययुध: पीताम्बर: कौस्तुभमालया लसन् ।
ध्यात धृतो येन न बोधकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥९॥
चक्रगदायुक्त चार हात असणार्या, पीतांबर नेसलेल्या, कौस्तुभमणियुक्त माळेने शोभून दिसणार्या भगवंताचे ज्याने जागृतावस्थेत ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥९॥
रम्भा : विचित्रवेषा नवयौवनाढ्या लवड्गकर्पूर सुवासिदेहा । नालिंगिता येन दृढं भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१०॥ विविध वस्त्र आणि अलंकारांनी युक्त, लवंग-कापूर आदिद्वारे सुगंधित शरीर असलेल्या नवयुवतीला ज्याने घट्ट आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१०॥
शुक :
नारायण: पड्कजलोचन: प्रभु केयूरवान् कुण्डलमण्डितानन: ।
भक्त्या स्तुतो येन समाधितो नो वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥११॥
कमळासारखे नेत्र असलेल्या, केयूरवान, कुंडलांनी सुशोभित मुख असणार्या, जगाचा स्वामी असलेल्या भगवंताची ज्याने विशुद्ध मनाने स्तुती केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥११॥
रम्भा : प्रियम्वदा चम्पकहेमवर्णा हारावलीमण्डितनाभिदेशा । सम्भोगशाली रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१२॥ मधुर बोलणार्या, चम्पक आणि सोन्याप्रमाणे वर्ण असणार्या, हाराचा झुमका जिच्या बेंबीवर लटकत आहे आणि स्वभावतःच भोगाची इच्छा असणार्या स्त्रीचा ज्याने उपभोग घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१२॥
शुक :
श्रीवत्सलक्ष्माड्कितहत्प्रदेश: तार्क्ष्यध्वजा शाडर्गधर: परात्मा ।
न सेवितो येन नृजन्मनाऽपि वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१३॥
ज्याने मनुष्यजन्मात देखील भृगुलतेने विभूषित हदय असलेल्या, ज्याच्या पंजात गरुड आहे अशा आणि शाडर्ग धनुष्य धारण केलेल्या परमात्म्याची सेवा केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१३॥
रम्भा :
चलत्कटी नूपुरमञ्जुघोषा नासाग्रमुक्ता नयनभिरामा ।
न सेविता येन भुजंगवेणी वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१४॥
नाजूक कमर असलेल्या, नुपूरांद्वारे मंजुळ घोष करणार्या, नाकात मोती जडवणार्या, सुंदर नेत्र असणार्या आणि सर्पाप्रमाणे अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१४॥
शुक : विश्वम्भरो ज्ञानमयः परेशो जगन्मयोऽनन्तगुणप्रकाशी । आराधितो नाऽपि धृतो न योगे वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१५॥ विश्व चालवणार्या, ज्ञानपूर्ण, परमात्मा, संसार स्वरूप, अनंत गुणांना प्रकट करणार्या भगवंताची ज्याने आराधना केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१५॥
रम्भा :
ताम्बूलरागैः कुसुमप्रकर्षै सुगन्धितैलेन च वासितायाः ।
न मर्दितो येन कुचौ निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१६॥
सुगंधित पान, उत्तम फूल, सुगंधित तेल आणि अन्य पदार्थांनी सुवासित शरीर असलेल्या कामिनीच्या स्तनाचे ज्याने रात्री मर्दन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१६॥
शुक : ब्रम्हादिदेवोऽखिलविश्वदेवो मोक्षप्रदोऽतीतिगुणःप्रशान्तः । धृतो न योगे न हदि स्वकीये वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१७॥ ब्रह्म इत्यादिंचा देखील देव, संपूर्ण जगाचा स्वामी, मोक्ष देणार्या, निर्गुण, अत्यंत शांत भगवंताचे ज्याने योगाद्वारे ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१७॥
रम्भा :
कस्तूरिकाकुंकुमचन्दनैश्च सुचर्चिता याऽगुरूधूपिकाम्बरा ।
उरस्थले नो लुठिता निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१८॥
कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचा लेप केलेल्या, चंदनगंधित वस्त्र नेसलेली स्त्री, ज्या पुरुषाच्या छातीवर रात्रभर लोळली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१८॥
शुक :
आनन्द रूपो निजबोधरूपो दिव्यस्वरूपो बहुनामरूपः ।
तपः समाधौ कलितो न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥१९॥
आनन्दरूप, ज्ञानरूप, दिव्य शरीर धारण केलेल्या, ज्याची अनेक नावे आणि अनंत रुपे आहेत अशा भगवंताचे ज्याने समाधितही दर्शन घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१९॥
रम्भा :
कठोरपीनस्तनभारनम्रा सुमध्यमा चंचलखंजनाक्षी ।
हेमन्तकाले रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम् ॥२०॥
हेमन्त ऋतूमध्ये कठीण आणि भरदार स्तनांच्या भाराने झुकलेल्या, पातळ कमर असलेल्या, चंचल आणि खञ्जन पक्ष्याप्रमाणे नेत्र असलेल्या स्त्रीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥२०॥
testing blockquote
[संपादन]"Block quote"
Mahitgar 11:32, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
links
[संपादन]Formatting
[संपादन]
- रम्भा :
- 'मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब:।
रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण: ॥१॥'
- मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत. हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे.॥१॥
- Requesting openions if above format is ok for this article or any other suggestion.
- Mahitgar 07:05, 26 नोव्हेंबर 2006 (UTC)
- Could we please avoid text justification? It is known to cause problems (usually justified text gets too fragmented to read) in Firefox.
- Format is quite pleasing, but for me violet is too light to read comfortably on a white background.
- Are you trying to make a template?
- पाटीलकेदार 19:52, 26 नोव्हेंबर 2006 (UTC)
- Kedar, thanks for your suggestion, Basic purpose is to make article reading more easy.If prsentability also improves may be we can bring it to featured article level.So please do suggest/change colors too.
- Mahitgar 06:41, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
- For being featured, it needs an good introductory paragraph for general public (like me) who know nothing about this sa.mvaada. Otherwise, I don't really see how this is encyclopedic content (though the text is of very high quality and I want to keep it). I will play with colors and format and see if something nice-looking turns up.
- पाटीलकेदार 13:38, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)
- About Encyclopedic ,I tried to search google.I found few online paintings and all related to this subject.I belive we can find more encyclopedic content too.May be it will take a little time.
Mahitgar 12:51, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)
Re: फॉरमॅट/मांडणीबद्दल मत
[संपादन]माहितगार, केदार,
या मांडणीत काही अक्षरांना रंगीत फाँट वापरल्याने लेखाच्या 'वाचनीयते'मध्ये फारशी भर पडली नाही असे माझे मत आहे; उलट विकिपीडियासारख्या ज्ञानकोशाच्या सध्या असणार्या मांडणीमध्ये/ उपलब्ध असणार्या 'कायां'च्या (skins) रंगसंगतीमध्ये मधूनमधून विखुरलेले रंगीत लिखाण दृक्सौंदर्यदृष्ट्या लेखाच्या सुवाच्यतेमध्ये अडथळा निर्माण करू शकते. वाचनीयता वाढवायला इतर काही उपाय आजमावून पाहता येतील:
- ठळक(bold), इटालिक यांचा वापर करणे
- निवडक लिखाणासाठी पानावरील/ कायेवरील इतर रंगसंगतीस साजेशी 'सौम्य' रंगाची पार्श्वभूमी वापरणे
- तुम्ही प्रयत्न करून बघितला तशी निवडक लिखाणाभोवती चौकट आखणे.
- योग्य समासीकरण(indentation) वापरणे.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. :-)
--संकल्प द्रविड 12:42, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)
पुनर्लेखन
[संपादन]सदस्य अंधारीकर यांनी सुचविल्यानुसार या पानाचे मोठे पुनर्लेखन केले पाहिजे. येथे लिहिलेला संपूर्ण संवाद येथे न देता तो विकिसोर्स (किंवा विकिबूक्स) वर हलवला पाहिजे व तेथील दुवा येथे दिला पाहिजे. संवादाबद्दलची माहिती, सारांश, इ. येथे ठेवले पाहिजे.
अभय नातू १७:०३, १६ सप्टेंबर २००८ (UTC)