चंदगडी बोली लोकगीते

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

लोकगीत

बंधु मुराळी माझा यला

त्यला वळकील शिवारातु

शेन केराचे माझ्ये हातु

ज्वारी बुडवील रांजणातु

ज्वादी जमखाणा सोपीयातु


काय बंधुला केले ताटु

जिरे साळीचा साळीचा रांधला भातु

वन गाईचं वर तुपू

केगदी लिंबुच लोणचं पाकु

पेाळी पुरणाची नाजु एकु

आणि बंधुला केले ताटु

अनुवाद[संपादन]

मुराळी भाऊ माझा आला

त्याला आळखले मी शेतातून

शेण-कचर्‍याचे माझे हात

ते कसे बुडवू भांड्यात


जमखाना हांतरला सोप्यात

भावासाठी काय केले ताट

जिरे साळीचा शिजविला भात

वरून वन गाईच तुप

कागदी लिंबूचे लोणचे पाक

पुरणाची नाजुक पोळी एक

असे भावासाठी केले ताट