कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक

विकिस्रोत कडून
कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक
डॉ. सुनीलकुमार लवटे







कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक

व्यक्तीलेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे

संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड,सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in

दुसरी आवृत्ती २०१८

© डॉ. सुनीलकुमार लवटे

प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com

मुखपृष्ठ
गौरीश सोनार

अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर

मूल्य रु.२००/




या ग्रंथातील चरित्रनायकांनी
मला समाजसेवेची प्रेरणा दिली...
त्यांच्याच सहवासात माझ्यातील
समाजमन पोसले...
म्हणून हे पुस्तक त्यांनाच अर्पण!
प्राप्त काल हा विशाल भूधर

 'कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' हा मी वेळोवेळी लिहिलेल्या व्यक्तिलेखांचा संग्रह होय. मी १९५९ साली पंढरपूरहून कोल्हापूरला आलो, तेव्हा माझे वय अवघे १० वर्षांचे होते. पंढरपूरच्या वा.बा.नवरंगे बालकाश्रमात माझा जन्म झाला. बालपणही तिथेच गेले. तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेत झाले. ती शाळा तेली गल्लीतील तेली मठात भरत असे. चार नंबर शाळा म्हणून तिची ओळख होती. कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये माझी बदली झाली तरी दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मी पंढरपूरला येत-जात असे. हा क्रम माझे लग्न होईपर्यंत वा नोकरी लागेपर्यंत कायम होता. या उभारीच्या काळातलं पंढरपूरचे समाजजीवन कर्मठ असलं तरी तिथे बबनराव बडवे,बाबूराव जोशी,भाऊसाहेब भादोले, कमळाबाई बडवे , छन्नुसिंग चंदेले इ. तत्कालीन समाजसेवक आमच्या बालकाश्रमातील आम्हा अनाथ, निराधार,परित्यक्त मुले, मुली व महिलांबद्दल सहानुभूती बाळगून असत. ती कोरडी सहानुभूती नसायची. ते वरचेवर यायचे, भेटायचे, शेतावर न्यायचे, प्रेमाने बोलायचे. आम्ही आश्रमातील मुले-मुली शाळेसाठी रस्त्यावरून जात-येत असू तेव्हा परिसरातील मुलं- मुली आम्हास ‘आश्रमातली मुल' म्हणून आमची हेटाळणी करायची. त्या पार्श्वभूमीवर वरील समाजसेवकांबद्दल माझ्या बालमनात आपुलकी असायची व नकळत आपण असं काम करावं, असं वाटून जायचं.
 मी कोल्हापूरला आलो. इथे मी आर्य समाजाच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत शिकू लागलो. इथं शाळेत येता-जाता परिसरातील मुलं रिमांड होमची मुलं म्हणून आम्हाला हेटाळायची. या सर्वांतून आपण समाजातल्या इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, हे आम्हाला समजत गेलं. इथंही डी. टी. मालक, भुजंगराव शेळके, आणि येथील शिक्षकवृंद आमच्याशी अतिरिक्त स्नेहानेच वागत. रिमांड होममध्ये प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, प्राचार्य सी. रा. तावडे, प्रा. एन. जी. शिंदे, प्रा. डी. एम. चव्हाण ही शिक्षक मंडळी; शां. कृ. पंत वालावलकर, नानासाहेब गद्रे ही समाजशील सहाय्यक मंडळी आम्हाला आमची वाटत ती आयुष्यातील अनाथपणाची पोकळी भरून काढण्याच्या त्यांच्या सहजशील प्रेमळ वृत्तीमुळे. त्यातून माझ्यात दोन स्वप्नं साकारली. पूर्वीच्या समाजसेवकाच्या स्वप्नास शिक्षक होण्याची जोड मिळाली. आपणही मोठं होऊन शिक्षक बनून समाजसेवा करावी, असं सुप्तपणे अंकुरत गेलं.
 मी सातवी पास होऊन नव्यानेच स्थापन झालेल्या आंतरभारती विद्यालयात आलो. इथं असाधारण प्रेमळ शिक्षक व संस्थाचालक होते. ते ध्येयवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसेवा दल यावर विश्वास ठेवणारे होते. साधना साप्ताहिक, साने गुरुजी, समाजवादी विचार इ.ची इथं नुसती ओळखच नाही झाली तर संस्कार पेरणीही झाली. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, बाबा आमटे, आचार्य विनोबा भावे, वि. स. खांडेकर, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, प्रा. नरहर कुरूदकर अशा अनेकांचा सहवास इथे लाभला. त्यांची भाषणे, संपर्क, संवाद यातून माझं किशोरपण फुललं. मी भाषणं करू लागलो तो इथेच. पहिली कविता लिहिली ती इथेच.
 पुढे मी गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात गेलो. तिथे प्रशिक्षित पदवीधर, शिक्षक झालो. इथं प्रत्यक्ष सहवास संपर्क लाभला नाही तरी जे. पी. नाईक, डॉ. चित्रा नाईक, आचार्य भागवत प्रभृतींच्या ध्येयवादी कर्तृत्वाचा ठसा मजवर उमटला. मी माझ्या पायावर शिक्षक म्हणून उभारलो अन् मला समाजाचे मातीचे पाय, खायचे दात दिसू लागले. मला माझे हात, पाय, डोकं, हृदय मिळण्याचा हा काळ होता. मी बनून तयार होतो. मला आता ‘कथनी' आणि 'करणी' मधील अंतर उमगलं होतं. त्यामुळे समाजसेवा करण्याची तीव्रता वाढली. प्रारंभी मी शिक्षक संघटना बांधली. गरीब विद्यार्थी वसतिगृहे चालविली. पुढे प्राध्यापक संघटनेचे काम केलं. एम.ए., पीएच. डी. झालो. प्राध्यापक झालो. तशी आपल्याचसारख्या अनाथांचं काम करण्याची उर्मी आली. ते कार्य मी वीस वर्षे केलं.
 सन १९७० ते २००० या काळात मी अनेकांच्या प्रभावाने व अनेकांच्या सहकार्याने विविध संस्था, संघटना, ट्रस्ट इ.मध्ये काम केलं. या काळात मला ज्यांचं सान्निध्य लाभलं अशांविषयी प्रसंगपरत्वे कृतज्ञता, गौरव, श्रद्धांजली, स्नेह म्हणून लिहीत राहिलो. या लेखनामागे ज्यांनी मला काही दिलं, त्यांच्या ऋणांतून उतराईची भावना आहे.
 स्वातंत्र्योत्तर काळात माझा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळ हा सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व अथारनी पुनरुज्जीवन व प्रबोधनाचा काळ होता. या काळात पंडिता रमाबाई, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रभृती समाज सुधारकांनी वंचित समाजासाठी दीपस्तंभासारखे कार्य केले. जातिप्रथा निर्मूलन, विधवा विवाह, बालहत्या प्रतिबंध, कुमारीमाता संरक्षण अन मुलं दत्तक घेणे हीकामे या समाजधुरिणांनी केली म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळातील वंचितांचे समाजजीवन सुसह्य होऊ शकले. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर राजर्षी शाहू महाराज, छ. राजाराम महाराज यांच्या कार्यकालात इथे अनेक सामजिक व शैक्षणिक कार्य करणाच्या संस्था व व्यक्तींना राजाश्रय लाभला. त्यातून शिक्षण संस्था, वसतिगृहे, अनाथाश्रम, रिमांड होम विकसित झाले.
 सन १९३७ साली इथे अनाथ हिंदू महिलाश्रम स्थापन झाला तेव्हा त्या संस्थेच्या विकास काळात ताराबाई महाराणीसाहेब, राजकुमारी पद्माराजे इ.नी देणग्या, जागा इ. देऊन साहाय्य केल्याच्या नोंदी संस्था दप्तरी आढळतात. त्या काळी समाज कार्य हे जाती व धर्माच्या प्रभावाखाली असले तरी काही दूरदर्शी मंडळी समाजास जाती-धर्माच्या बेड्या तोडून पुढे नेण्याचा प्रागतिक प्रयत्न करत होती. त्या वेळी हिंदू महासभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने वैज्ञानिक व पुरोगामी प्रयत्न करी. अशात प्रिन्सिपॉल दाभोळकर, भालजी पेंढारकर, गोविंदराव कोरगावकर प्रभृती मंडळी होती. पुढे प्रभाकरपंत कोरगावकर सक्रिय झाले. या मंडळींनी स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या कार्यकत्यारची पाठराखण केली व समाजकार्यास अभय दिले. यातून इथे वंचितांच्या विकासाचे कार्य सुरू झाले. मी ज्या रिमांड होममध्ये वाढलो ते स्वातंत्र्यानंतर सन १९४९ ला सुरू झाले. त्याच्या स्थापनेतही प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकरांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पत्नी डॉ. अहिल्याबाई दाभोळकर, रमाबाई शिरगावकर, इंदिराबाई देशपांडे या कार्यकर्त्याही कार्यरत होत्या.
 मी सामाजिक कार्याची सुरुवात शिक्षक संघटनेने केली असली तरी समाज उभारणीचे काम माझ्या हातून झाले ते इथल्या रिमांड होमचे रूपांतर बालकल्याण संकुलात करण्याच्या सन १९८० ते २००० या काळात.शां.कृ.पंत वालावलकर, नानासाहेब गद्रे,वि.स.खांडेकर, माईसाहेब बावडेकर,लीलाताई पाटील,कॉ.गोविंद पानसरे,डी.बी.पाटील, प्रा.संभाजी जाधव, प्रा. चंद्रकांत पाटगावकर प्रभृती मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याबरोबर मला सामाजिक, शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली. कामाचे स्वरूप, संस्था उभारणी, संघटना बांधणी असे होते. या सर्वांकडून मला भरपूर शिकायला मिळाले.
 ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक'मधील व्यक्तिचरित्रे संग्रह रूपात आज देण्याचे विशेष प्रयोजन आहे. या संग्रहातील अधिकांश चरित्रे आपापल्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी होत. त्यांनी आपल्या समाजसेवेचे क्षेत्र निश्चित केले होते. त्यातील कोणीही आपण करीत असलेल्या समाजकार्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हता. उलटपक्षी त्यांनी जे काय केले ते निरपेक्षपणाने व पदरमोड करून. उपजीविकेसाठी कुणी नोकरी, व्यवसाय करायचे. कुणी कुणी तर ठरवून पूर्णवेळ समाजसेवक होते. तो काळ स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीचा होता. त्यांच्यापुढे स्वातंत्र्यपर्व काळातील ऋषितुल्य समाजसेवकांचे कार्य होते. त्यांच्यात ध्येयवाद, समर्पण, त्याग, सचोटी होती. त्यांनी केलेले कार्य काळाच्या संदर्भात मोठे असले तरी त्यांना सतत असे वाटत राहायचे की आपापल्या पूर्वसुरी कार्यकर्त्यांच्या मानाने आपण काहीच काम करत नाही. शिवाय त्यांना असे वाटत राहायचे की, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती समाजसेवकांनी स्वातंत्र्याचे जे स्वप्न पाहिले होते, स्वराज्याची त्यांनी जी कल्पना केली होती ती साकार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी केले नाही तर कोण करणार? अशी सेवापरायण व प्रसिद्धीपराङ्मुख अहमहमिका त्यांच्यात होती. स्वातंत्र्योत्तर काळात दलित, वंचित, स्त्रिया, मुले, आदिवासी यांचा विकास झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही अशी त्यांची पक्की धारण होती. त्यांनी ज्या संस्था उभारल्या, स्थापल्या, विकसित केल्या त्यामागे समाजहितापलीकडे ध्येय व उद्दिष्ट नव्हते. विशेषतः सन १९५० ते २००० हा काळ समाजसुधारिणांचाच होता.
 प्रिन्सिपॉल दाभोळकरांचे कार्यक्षेत्र चतुरस्त्र होते. शिक्षण, सेवा, धर्म, कल्याण यापलीकडे माणुसकीचा धर्म त्यांनी रुजवला. शां. कृ. पंत वालावलकर तर खरेच ‘करुणाकल्पतरू' होते. त्यांनी कष्टाने करोडो रुपये मिळवले व महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीने सर्वस्व समाजाला दान केले. असेच कार्य गोविंदराव कोरगावकर, प्रभाकरपंत कोरगावकर यांनीही केले. शिवराम हरी गद्रे म्हणजे अप्रसिद्ध समाज हितैषी. वि. स. खांडेकर साहित्य व चित्रपटासाठी कोल्हापुरात आले पण त्यांनी येथील साहित्य, संस्कृती, शिक्षण समृद्ध केलं. ही सारी मंडळी मूळ कोकणातली. कष्टाळू, काटकसरी असलेले हे समाजसेवी व्यक्तिगत जीवनात साधे पण समाजजीवनात कार्य श्रीमंत! दलितमित्र बापूसाहेब पाटील यांनी आयुष्यभर दलित वस्त्या, झोपडपट्टी संघाचे कार्य करून बहिष्कृत व अत्याचारित वर्गास समाजाच्या मध्य प्रवाहात आणले. त्यांच्या पत्नी प्राचार्या लीलाताई पाटील यांनी शासकीय सेवेत राहूनही रचनात्मक कार्य करता येते हे दाखवून दिले. त्यांचे खरे जीवनकार्य अण्णा हजारेंप्रमाणे निवृत्तीनंतर सुरू झाले. त्यात त्यांनी कळस गाठला. त्यांनी बालशिक्षण, बालहक्क, शिक्षण व शिक्षक गुणवत्ता आपले जीवितकार्य बनविले. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एन. डी पाटील, कुलगुरु रा. कृ. कणबरकर, बाबूराव धारवाडे यांनी पुरोगामी समाज प्रबोधन व समाज संगठन कार्यात जागल्याची (Whistle Blower) भूमिका बजावली. जागतिकीकरणाविरुद्ध, प्रतिगामी शक्तींविरुद्ध ते सतत समाजास जागे करत राहिले. अशा दिग्गजांशिवाय काही पणत्या, काही काजवे, काही कवडसेही तुम्हास या संग्रहात मिळतील. ते छोटे म्हणून त्यांचे काम छोटे असे मला वाटत नाही. त्यांनी आपापल्या परीने कार्य करून समाजाबद्दलची तळमळ स्पष्ट केली.
 सन १९९० च्या दरम्यान भारतात मुक्त व्यापार डंकेल करार, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारत हा त्या वेळी तिस-या जगातील विकसनशील देश मानला जात होता. देशावर मोठे कर्ज होते. साक्षरता, आरोग्य, गरिबी, लोकसंख्या, दारिद्र्य निर्मूलन असे मोठे प्रश्न देशाला भेडसावत होते. या काळात मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय समाजसेवी संघटनांनी वरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लक्षावधी डॉलर्सची मदत भारतास देऊ केली. त्यातून स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) उदयाला आल्या. वंचित विकास, दलितोद्धार, स्त्री सबलीकरण, कुपोषण, अनाथ मुलांचे दत्तकीकरण, अपंग विकास, पर्यावरण संरक्षण, विकास नीती, कुटुंब नियोजन, एड्स नियंत्रण इ. कार्यासाठी रोज नव्या संस्था स्थापन होऊ लागल्या. त्यांचे कार्य तुटलेल्या बेटाप्रमाणे होत राही. त्याच दरम्यान भारतात व्यावसायिक शिक्षणाचे पेव फुटले. एम.बी.ए.,एम.एस.डब्ल्यू., आय.आय.एम्. सदृश्य पदवीधारकांची नवश्रीमंत फौज तयार झाली. त्यातून वेतनाश्रयी समाजसेवकांची पिढी उदयास आली. तंत्रज्ञान, वैश्विकीकरण, वर्ग विकास इ. नव संकल्पनांमुळे त्याग, समर्पण, नैतिकता, सेवा, सचोटी इ. मूल्ये कालबाह्य ठरली. यातून समाज आत्मकेंद्री झाला. मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग बनला. समाजात दोनच वर्ग उरले, गरीब व श्रीमंत. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद मोडीत निघाले. परिणामी ‘मी आणि माझ’, ‘मला काय त्याच’, ‘पावलापुरता प्रकाश' असं नवं जीवन तत्त्वज्ञान उदयास आलं.
 आज समाज स्थिती अशी आहे की, गरीब असंघटित वर्गास कोणी वाली उरला नाही. शासकीय, खासगी सर्व स्तरावर सततच्या वेतनवृद्धीमुळे जीवनमान उंचावले. शिक्षण हे ‘मूल्य' न राहता ‘किंमत' झाले. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेने माणसास यंत्र बनवले. परिणामी समाजसेवेचे पण व्यावसायीकरण झाले. यामुळे सेवा संस्था व कॉर्पोरेट हाउसमधील अंतर संपले. शिक्षणास बाजाराचे स्वरूप आले. माणसाचे मोल ‘मूल्य' न राहाता त्याची किंमत ‘गि-हाईक झाली. राजकीय जीवन भ्रष्टाचाराचे साधन म्हणून विकसित झाल्याने समाजापुढे आदर्श राहिला तो केवळ पैशाचा. अशाही स्थितीत जे काम करत राहिले- त्यांना ‘सेलिब्रेटी’ महत्त्व आले.
 सन २००० नंतरचं समाजजीवन एकविसाव्या शतकाची साक्ष घेत आकारलं. सरकारांनी कल्याणकारी कार्यातून काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याने सर्वाधिक परवड जर कुणाची झाली असेल तर ती वंचित समाजाची. ‘ज्यांना काहीच नाही, त्यांना सर्वकाही' असं स्वातंत्र्याच्या वेळी सांगितलं जायचं. वर्ग विकास (Mass Development) ध्येय असल्याने शासन 'Welfare State' होते. जागतिकीकरणाने विकास व कल्याणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवले गेले. पोलीस, प्रशासनाकडे असलेला नव्या पिढीचा ओढा सेवा धर्माचा नाही, असेलच तर सत्तेचे साधन हाती हवे,अधिकार हवा,प्रतिष्ठा हवी व या साच्यातून स्वविकास एवढेच उद्दिष्ट होऊन गेले. कर्तव्यापेक्षा अधिकार जागृत समाज संघटनांच्या जोरावर कर्तव्यपराङ्मुख झाला. सर्वसामान्य माणसाची किंमत ‘शून्य' करणारी एक नवश्रीमंत संस्कृती उदयास आली.
 अशा पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' हे पुस्तक नकारात्मक जीवन जगणाच्या वर्तमान समाजास पुन्हा एकदा "See the world from other Side' चा संस्कार देईल. 'स्वत... साठी जगलास तर मेला, दुस-यासाठी जगला तर खरा जगला' अशी शिकवण,प्रेरणा देणारी ही चित्रे, चारित्र्ये एकविसाव्या शतकातील नव्या पिढीस ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा' ची प्रेरणा देतील.
 ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' असे पुस्तकाचे शीर्षक असले तरी या काळातील सर्व समाजसेवकांचा यात अंतर्भाव नाही. मी ज्यांच्याबरोबर कार्य केले; जे माझ्या कामाच्या ऊर्जा होत्या अशांचाच यात समावेश आहे. अन्यांचा तो अनादर समजू नये.
 हे पुस्तक अक्षर प्रकाशनचे रवींद्र जोशी, अमेय जोशी व आलोक जोशी यांनी काढायचे ठरवून माझे फार दिवसांचे स्वप्न साकारले. त्यांचे मनःपूर्वक आभार!

- डॉ. सुनीलकुमार लवटे

अनुक्रम

१. सामाजिक जीवनशिल्पी : प्राचार्य शं. गो. दाभोळकर/१३
२. करुणाकल्पतरू : शां. कृ. पंत वालावलकर/१६
३. निष्काम कर्मयोगी : शिवराम हरी गद्रे/२२
४. समाजशील साहित्यिक : वि. स. खांडेकर/४९
५. दलितमित्र : बापूसाहेब पाटील/७४
६. बाल साहित्यिक : रा. वा. शेवडे गुरुजी/८३
७. लिटल माँटेसरी : माईसाहेब बावडेकर/९०
८. मनुष्यपारखी समाजसेवक : के. डी. कामत/९४
९. मितभाषी समाजसेवी : प्रा. डी. एम. चव्हाण/९९
१०. निर्भय सत्याग्रही : प्रा. डॉ. एन. डी. पाटील/१०२
११. जननिष्ठ समाजशिक्षक : कॉ. गोविंदराव पानसरे/१०७
१२. गांधीवादी सर्वोदयी : प्रा. चंद्रकांत पाटगावकर/१११
१३. सृजनानंदी शिक्षिका : प्राचार्य लीला पाटील/११४
१४. पुरोगामी कुलगुरु : रा. कृ. कणबरकर/१२५
१५. प्रयोग परिवारी विज्ञानी : प्रा. श्री. अ. दाभोळकर/१२८
१६. शाहूप्रेमी समाजसेवक : बाबूराव धारवाडे/१३३
१७. प्राध्यापकांचे कवचकुंडल : प्रा. संभाजी जाधव/१३८
१८. शिक्षण संघटक : डी. बी. पाटील/१४३
१९. नीरक्षीर न्यायव्रती : एस. व्ही. नेवगी/१४८
२०. जैनसेवी संघटक : बी. बी. पाटील/१५३
२१. करुणाकल्पतरूची सावली : नलिनी वालावलकर/१५५
२२. सार्वजनिक संस्थांचा आधार : निवासराव पोवार/१५९
२३. अंधश्रद्धा निर्मूलक : के. डी. खुर्द/१६३
२४. ग्राहक हितरक्षक ... प्रा. श्रीश भांडारी/१६८
२५. श्रमिक संघटक ... कॉ. अविनाश पानसरे/१७३
सामाजिक जीवनशिल्पी ... प्राचार्य शं. गो. दाभोळकर

 कोल्हापूरच्या समाजजीवनात पुरोगामी प्रवृत्तीची जी माणसे निर्माण झाली ती छत्रपती शाहू महाराजांच्या डोळस वृत्तीमुळे. समाजजीवनातील विविध कार्यास व्रत म्हणून स्वीकारून त्याचे आजीवन पालन करणारी जी मोजकी मंडळी समोर येतात त्यात डॉ. शं. गो. दाभोळकर; त्यांच्या सुविद्य पत्नी कै. डॉ.अहिल्याबाई दाभोळकर व प्राचायारचे बंधू डॉ. व. गो. दाभोळकर यांचा अंतर्भाव करावाच लागेल. या त्रयींनी समाजसेवेचे व्रत आजीवन तर अंगिकारले होतेच पण आपल्या पश्चातही सामाजिक कार्याचा हा महायज्ञ अखंड चालू राहावा म्हणून या त्रयींनी आपल्या स्थावर/जंगमाचा विश्वस्त निधी करून त्यांनी समाज जीवनात एक अनुकरणीय आदर्श प्रस्थापित केला आहे. कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरवर उभे राहिलेले दाभोळकर मेमोरियल सेंटर व दाभोळकर ट्रस्टच्या सहकार्याने महापालिकेमार्फत अनावरण झालेला प्राचार्य शं. गो. दाभोळकरांचा पुतळा म्हणजे या आदर्शाचे चिरस्मरण आहे.
 दाभोळकर कॉर्नरवर पूर्वी स्मृती जाणवणारा छोटासा टुमदार बंगला होता. तो सन १९१९ मध्ये गोपाळरावांनी बांधला. हा बंगला म्हणजे गोरगरीब विद्यार्थांचे आश्रयस्थान होते. कोकणातील अनेक गरीब मुले वार लावून शिकली ती याच बंगल्यात. गोपाळरावांच्या मृत्यूनंतर (१९२७) त्यांच्या मुलांनी वडिलांचे हे व्रत अंगिकारले.
 शंकरराव दाभोळकर हे ओरिजनल साइडचे कोल्हापुरातील पहिले अॅडव्होकेट. १९२८ च्या सुमारास त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला व अल्पावधीतच ते नामांकित वकील म्हणून प्रसिद्धी पावले. वकिली जोरात असली तरी त्यांचा मूळ पिंड हा शिक्षक व समाजसेवकाचा होता. त्या वेळी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेजमध्ये साईक्स लॉ कॉलेज चालायचे. तेथे १९३२ साली अंशकालीन अधिव्याख्याता म्हणून अध्यापन सुरू केले. सन १९४६ मध्ये त्यांनी या कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. अध्यापनाच्या कामाबरोबरच ते समाजातील विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात रस घेत. अनाथ मुला-मुलींच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष ओलावा होता. कोल्हापुरात अनाथाश्रम नाही, अनाथ मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे या ध्यासाने त्यांनी १९३७ साली अनाथ महिलाश्रमाची स्थापना केली. ते अध्यक्ष झाले व त्यांच्या पत्नी डॉ. अहिल्याबाईनी चिटणीसपदाची धुरा सांभाळली. हे व्रत सतत ३५ वर्षे अव्याहत पाळले हे विशेष. प्राचार्य शं. गो. दाभोळकर नसतील अशी संस्था त्या काळात मिळणेच कठीण. त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अनेक संस्थांत विविध पदांवर कार्य केले. ते कोल्हापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. बार असोसिएशन, स्पोर्टस असोसिएशन, इलाखा पंचायत, शेतकरी संघ यांचे ते अध्यक्ष होते. रोटरी गव्हर्नर म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. याचवेळी त्यांनी युरोपचा दौरा केला. शिवाजी पुणे, धारवाड, मुंबई या विद्यापीठाचे विविध विद्याशाखेचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. कोल्हापूर संस्थानचे कायदे सल्लागार म्हणून वठवलेली त्यांची भूमिका एक ऐतिहासिक स्मरण होय. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या कार्यकारी मंडळावर कार्य केले. कोल्हापूरच्या रेडक्रॉस सोसायटीच्या, रिमांड होमच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महालक्ष्मी बँकेच्या मंडळावर त्यांनी कार्य केले. पॅको इंडस्ट्रीज, उगार शुगर फैक्टरी या संस्थांचे ते कायदेशीर सल्लागार होते. अशी कितीतरी कामे सांगता येतील. त्यांच्या या कामात त्यांचे बंधू डॉक्टर वसंतराव व पत्नी डॉ. अहिल्याबाई यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
 दाभोळकर त्रयींनी आपले सर्व आयुष्य समाजाला वाहिले होते. दुर्दैवाने या परिवाराचा वटवृक्ष फोफावला नाही. अनाथाश्रम, रिमांड होममधील मुलांनाच ते आपली आपत्ये मानीत नि म्हणून सन १९७७ साली जीवनाच्या संध्याछायेची चाहूल लागताच त्यांनी आपल्या सर्वस्वाचा विश्वस्त निधी स्थापन केला. आपल्या कार्याचे चिरंतन स्मारक व्हावे म्हणून धर्मनिरपेक्ष सामाजिक कार्यासाठी त्यांनी विश्वस्त निधी उभारला. सर्व प्रकारच्या निधर्मी शिक्षणाचा प्रसार करणे, अनाथाश्रम,अनाथ महिलाश्रम चालविणे, ज्या ज्या ठिकाणी ते चालू आहेत त्या संस्थांना जरूर ती मदत करणे, लायक व गरजू विद्याथ्र्यांना अर्थसाहाय्य करणे, जातीपातींचा विचार न करता होतकरू विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या विविध सोयी सवलती उपलब्ध करून देणे, गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृहे चालविणे व अशा संस्थांना अर्थसाहाय्य करणे या उद्देशांसाठी विश्वस्त निधीचा विनियोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती. दाभोळकर परिवारास कर्करोगाने ग्रासले नि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. हे शल्य लक्षात घेऊन विद्यमान विश्वस्तांनी दाभोळकर बंगल्यात कर्करोग निदान सुरू केले. त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही हे लक्षात घेऊन जनरल हॉस्पिटलची एक सध्याच्या योजना विश्वस्तांच्या विचाराधीन आहे. आज दाभोळकर कॉर्नरला उभी असलेली रॉयल प्लाझा ही टोलेजंग इमारत म्हणजे आजचे दाभोळकर मेमोरियल होय. करुणाकल्पतरू... शां. कृ. पंत वालावलकर

 श्रीमद् भागवतात जीवन भोगाची कल्पना विशद करताना त्यागास भोगाचे अभिन्न अंग मानण्यात आले आहे. असे असले तरी दैनंदिन जीवनात आपणाजवळ असलेल्या संपत्ती व साधनांचा वापर आपण त्यागाच्या विवेकाने करतोच असे नाही. भगवत गीतेतील त्याग,गांधीजींनी वर्णिलेली विश्वस्त वृत्ती नि तुकारामांनी सांगितलेली साधुदृष्टी या सर्व गोष्टी कितीही आकर्षक, मोहक व आदर्श असल्या तरी या वृत्तींचा अंगीकार संयमीच करू जाणे. कोल्हापूरच्या परिसराबाबत बोलायचे झाले तर थोर धर्मानुरागी समाजसेवक व दानशूर कापड व्यापारी शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर यांनी प्रसिद्धीपराङ्मुख राहून या आदर्शाचा आजीवन पाठपुरावा केला. आजवर शिक्षण, आरोग्य, धार्मिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील कल्याणकारी कार्यासाठी त्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचे दान दिले.
 शां. कृ. पंत वालावलकर यांनी जे कमावले ते विश्वस्त वृत्तीने समाजास दिले. सतत समाजास ओंजळ भरभरून साहाय्य करणाच्या बापूंच्या या मदतीतून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक जीवनात कायाकल्प घडून आला. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल अनेक संस्था, व्यक्ती ऋणी आहेत. पूज्य साने गुरुजींनी वर्णिलेल्या ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या काव्यपंक्ती आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनविणा-या शां. कृ. पंत वालावलकर यांचा हा जीवनपट म्हणजे उक्ती व कृतीचा अपवादाने आढळून येणारा सुरेख संगम होय.
 शां. कृ. पंत वालावलकर यांचा जन्म ४ जानेवारी, १९०८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी मोरेश्वर वालावलकर. ते जप्तीदार म्हणून काम करायचे. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. घरदार, शेती असे उत्पन्न नव्हतेच मुळी. हातावरचे पोट, पदरी सहा मुलांचा संसार. शांतारामपंतांचे प्राथमिक शिक्षण मालवणच्या राष्ट्रीय शाळेत झाले. पुढे टोपीवाला हायस्कूलमध्ये त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. या वेळी कोकणात कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन, केंद्रीय रेल्वेमंत्री स. का. पाटील, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दादासाहेब महाजन यांचा सहवास शांतारामपंतांना लाभला. राष्ट्रीय शाळेतील राष्ट्रवादाचा संस्कार व चळवळीतील या व्यक्तींच्या सहवासामुळे बापूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिकचे शिक्षण अर्धवट सोडले व स्वतःस या राष्ट्रीय कार्यात झोकून दिले. पण जप्तीदार वडिलांच्या नजरेस हे कार्य आल्यावर मतभेद झाले. घामाची भाकर मिळवायच्या ध्यासाने बापूंनी धोक्याच्या वर्षी जोखीम स्वीकारून घर सोडले.
 मुंबईत माटुंग्यास त्याचा एक चुलतभाऊ राहायचा. त्याच्या भरवशावर त्यांनी मुंबईची वाट धरली. त्या वेळी मुंबईत गेनन डंक्ले म्हणून एक प्रख्यात कंपनी होती. ती बांधकामाचे ठेके घ्यायची. बापूंनी ३० रुपयांवर मुकादम म्हणून तेथे काम केले. पहिली घामाची भाकरी, पण ती फार दिवस पुरली नाही. पावसाळा सुरू झाला, बांधकाम थांबले. नोकरी संपुष्टात आली. काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा होता. कुणाच्या घरी फुकट खायचे नाही हा त्यांचा स्वभाव, शिवाय निरुद्योगी राहणे आवडायचे नाही. खिशात जेमतेम पंधरा रुपये होते. त्यांनी व्यापार करायचा निर्णय घेतला. पंधरा रुपयात तराजू, वजने घेतली. भायखळ्याचा पास काढला. भाजी विकायचा धंदा सुरू केला. बापू भाजी विकतात ही गोष्ट स. का. पाटील व प्रख्यात साहित्यिक ज. रा. आजगावकरांना समजली. ते दोघे त्या वेळी ‘रणगर्जना' पत्र चालवायचे. त्यांनी बापूंना आपल्या पत्राचे व्यवस्थापक नेमले. पण व्यापारात रमलेल्या बापूंना नोकरीत रस नव्हता. त्यांनी गेनन इंक्ले कंपनीतील अनुभवावर छोटी-छोटी बांधकामे अंगावर घ्यायला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. पुढे ते पुण्यात आले. तेथील पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे ते अधिकृत ठेकेदार झाले.
 वयाच्या चोविसाव्या वर्षी सन १९३४ साली बापूंचा विवाह मालवणच्या सामंत-नेवाळकर परिवारातील नलिनीताईशी झाला. सौ. नलिनीताईशी झालेला विवाह लक्ष्मीच्या पाऊलखुणा उठवून गेला. बापू घरातील लोकांच्या आग्रहास्तव परत आपल्या मायभूमीत आले. कुडाळला त्यांनी भांड्यांचे व कापडाचे दुकान काढले. व्यापारात आता नलिनीताईंची साथ मिळायला लागली होती. बापूंचं बळ वाढलं. आत्मविश्वास दुणावला. कुडाळच्या छोट्या व्यापारपेठेतून कोल्हापूरसारख्या मोठ्या व्यापार केंद्रांकडे ते आकर्षित झाले.
 १९४१ साली त्यांनी कुडाळचे दुकान बंद करून कोल्हापुरातील भाऊसिंगजी मार्गावर बनाजी मुकुंदशेठ वेल्हाळ यांच्या जागेत दुकान थाटले. या काळात बापूंबरोबर सौ.ताई पण २२-२२ तास राबायच्या. त्या काळात स्त्रीने दुकान चालविणे, दुकानात बसणे हे धाडसाचे काम होते. पण त्यांनी ते आव्हान स्वीकारले व कापड व्यापारी म्हणून दक्षिण महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक पसरला. भाऊसिंगजी मार्गावरील जागा अपुरी पडू लागली म्हणून सन १९४३ साली सध्याच्या लक्ष्मीपुरीतील जागेत त्यांनी दुकान सुरू केले.
 धर्मानुरागी वृत्ती हा बापूंच्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न भाग आहे. ईश्वर भक्तीमुळे मनुष्य सत्शील होतो अशी त्यांची धारणा आहे. आणि म्हणूनच प्रारंभीपासूनच देव-दैवते, व्रत-वैकल्ये इत्यादीत ते रमत आले आहेत. १९५५ साली त्यांच्या धर्मानुरागी वृत्तीची परिसीमा गाठली गेली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तप करून जी मिळत नसते अशी गुरुकृपा त्यांना लाभली होती.
 श्री बालावधूत बालमुकुंद महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला. त्याक्षणीच बापूंनी आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले. त्यांच्या गुरुंनीही त्यांच्यावर पूर्ण कृपा केली अशी त्यांची श्रद्धा आहे. गुरुकृपा हे पूर्वसुकृताचे फळ आहे, पूर्वपुण्याईचा प्रसाद आहे असे ते मानत. ‘माझे जे आहे ते सर्व गुरुचे आहे. माझ्या हातून जे सत्कार्य घडते ते गुरु घडवतात. माझ्या हातून घडलेली समाजसेवा ही त्यांचीच. मी त्यांचा पाईक, मी उरलो नावापुरता. अशा निर्लेप वृत्तीने बापूंनी केलेली समाजसेवा हा त्यांचा उदारतेचा आणखी एक ठळक पैलू!
 उद्योग, व्यापारात नित्य नवे प्रयोग, नवी साहसे हा बापूंचा आवडता छंद. कापड धंद्यात आलेल्या मंदीस तोंड देता यावे म्हणून बापूंनी १९४६ मध्ये इचलकरंजीत एक छोटी कापड गिरणी सुरू केली. कोल्हापुरात राहून ही गिरणी चालवणे कठीण झाल्याने त्यांनी १९५२ साली आपली नलिनी वीव्हिंग मिल कोल्हापुरातील उद्यमनगरात आणली. १९६९ पर्यंत ती चालली. पण पुढे मजुरांची वाढती टंचाई, सूत पुरवठ्याचा अभाव इत्यादींमुळे त्यांचा वस्त्रविणीचा हा छंद नाईलाजाने सोडावा लागला. काही काळ याच ठिकाणी श्री. बालावधूत बालमुकुंद महाराजांचे संगमरवरी देखणे मंदीर उभे होते. आज त्याचे रूपांतर बालावधूत हॉस्पिटलमध्ये झाले आहे.
 कोल्हापुरात व्यापार, उद्योगात घट्ट पाय रोवल्यावर बापूंनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले. सुरुवातीपासूनच समाजातील दीन दुबळ्यांची सेवा करायची त्यांची इच्छा होती. पण स्वत:च्या पायावर उभारायच्या ध्यासात इच्छा असून हे कार्य करता येत नाही, हे शल्य त्यांना आत बोचत असायचे. नाही म्हणायला सामाजिक कार्यास अर्थसाहाय्य ते आरंभीपासूनच करीत आले. पण अंगीकृत समाजकार्य करायचं म्हणून त्यांनी १९४९ साली समाजसेवा सुरुवात केली. १९४९ साली त्या काळचे प्रशासक कॅ. नंजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात रिमांड होम सुरू व्हायचे होते. बापूंनी सामाजिक कार्याचा शुभारंभ म्हणून या संस्थेची निवड केली. अवघ्या तीन मुलांनिशी सुरू झालेल्या या संस्थेत आज ४०० मुले-मुली, महिला असून तीन स्वतंत्र संस्था स्वत:च्या प्रशस्त वास्तूत बापूंच्या आशीर्वादाने उभ्या आहेत. या संस्थेबरोबरच बापू अनाथ महिला आश्रम, वृद्धाश्रम, महालक्ष्मी धर्मशाळा, राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, आंतरभारती शिक्षण मंडळ यासारख्या अनेक संस्थांचे संस्थापक, हितचिंतक, आश्रयदाते म्हणून त्यांनी कार्य केले. कोल्हापुराबाहेर मुंबई, मुणगे, देवगड, खानोली, मालवण, नंदगाव आदी ठिकाणी त्यांनी शैक्षणिक, सामाजिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये व दवाखाने उभारले आहेत.
 राष्ट्रीय शाळेत घेतलेले प्राथमिक शिक्षण, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग, गांधीवादी ध्येयवाद्यांचा सहवास यामुळे गांधीवादी जीवनादर्श बापूंनी अंगीकारला नसता तरच आश्चर्य! हे कार्य आपल्या पश्चातही अव्याहत चालू राहावे या भावनेने बापूंनी आपल्या संपत्तीतून वेगवेगळे विश्वस्त निधी उभारले.सन १९७४ साली ‘ॐ श्री बालावधूत ट्रस्ट स्थापनेने त्यांनी विश्वस्त वृत्तीचा स्वीकार केला. या ट्रस्टमार्फत श्री लक्ष्मीनारायण बालावधूत गणेश मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, श्री बालावधूत धर्मशाळा, श्री बालावधूत मोफत दवाखाना इत्यादी उपक्रम चालविण्यास सुरुवात झाली. सन १९७७ साली त्यांनी ॐ श्री लक्ष्मीनारायण बालमुकुंद शां.कृ. पंत वालावलकर पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट या दुस-या ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टमार्फत सामाजिक, शैक्षणिक संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाते. १९७९ साली आपल्या सुविद्य पत्नीच्या नावे सौ. नलिनी शां. पंत वालावलकर धर्मादाय विश्वस्त निधी स्थापन केला. या निधीच्या विद्यमाने सन १९८७ पासून ५० खाटांचे रुग्णालय चालविले जात असून ते श्री लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालय व संशोधन केंद्र या नावाने गेल्या अनेक वर्षांच्या सतत सेवेने लोकादरास पात्र ठरले आहे. या रुग्णालयाचे रूपांतर सुमारे ५०० खाटांच्या भव्य अशा रुग्णालयात करण्याची बापू व सौ. ताईची इच्छा होती. तथापि बापूंना अपघाताने आलेल्या अपंगत्वामुळे ती अपूर्ण राहिली व भव्य रुग्णालयाचे स्वप्न स्वप्नच राहिले.
 बापूंनी आपल्या जीवनात जे काही मिळवले ते सारे स्वकष्टार्जित. मध्यंतरीच्या काळात पूज्य बालावधूत महाराजांचा त्यांच्यावर अनुग्रह झाला व त्यांनी आपले सारे जीवन व वित्त समाजासाठी अर्पण केले. आपल्या कापड दुकानाचा ट्रस्ट करून त्यांनी त्यांचा नफा समाजातील वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यास समर्पित केला. आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपली कापड गिरणी बंद करून त्या जागी बालावधूत मंदिर व धर्मशाळा उभारली. मंदिर, धर्मशाळा, कार्यालय यापेक्षा अधिक विधायक व जनसेवेचे कार्य करायचे म्हणून त्या सर्व वास्तूचे रूपांतर लोकोपयोगी रुग्णालयात करून त्याद्वारे समाजास अल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. हे सर्व करत असताना मी उरलो नावापुरता, अशा निरिच्छ वृत्तीने ते सर्व करत राहिले. आपल्या जीवनातील या कार्याचे श्रेय ते लोकांनाच देतात. लोकांनी मला मूठ-मूठ भरून दिले. गुरूकृपेने त्याची ओंजळ झाली व माझ्या ओंजळीत जे आले ते समाजाचेच होते, ते मी समाजास दिले. इतक्या सहजपणे ते दिले,' असे ते सांगत. यातच आपले जीवन, हा लोक कृपेचा प्रसाद आहे असे मानण्यातील त्यांचा खरेपणा स्पष्ट होतो. जीवनातील शेवटच्या क्षणापयरत लोकांसाठी झटत राहायचं बळ आपणांस मिळावं अशी ते करत असलेली प्रार्थना हेच त्यांच्या जीवनाचे पाथेय होय.
 बापूंच्या जीवन व कार्याचे मूल्यांकन त्यांनी किती कोटी रुपये समाजास दिले यापेक्षा त्यांची मदत किती कोटी लोकांपयरत पोहोचली या कसोटीवर पारखायचे झाले तर अवघा महाराष्ट्र त्यांचा ऋणाईत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गृहस्थ जीवनात ब्रह्मचर्य, व्यापारात सचोटी, सामाजिक कार्यात प्रसिद्धी-पराङ्मुखता, शैक्षणिक कार्यातील परिवर्तनवादी दृष्टी या सवारमुळे त्यांचे जीवन व कार्य एक ‘करुणाकल्पतरू' बनून गेले.
 'मी काही घेऊन आलो नव्हतो. येथून जातानाही मला काही घेऊन जायचे नाही. येथे जे मिळवलं, ते इथलंच होतं. लोक त्याला 'दान' म्हणतात. मला विचाराल तर ज्याचं होतं, ज्याच्या हक्काचं होतं, त्यांना दिलं. देण्यात औदार्य नव्हते. मी तो हमालभारवाही' 'मिळवतानाही नि देतानाही!' अशा निरिच्छ वृत्तीने शां. कृ. पंत वालावलकर यांना जगताना मी अगदी जवळून पाहिलं, अनुभवलं आहे. त्यांच्या या निरिच्छ वृत्तीनं प्रभावित होऊन करवीर पीठाचे शंकराचार्य पंतांच्या ‘सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात म्हणाले होते की, "पंत वालावलकर हे ‘संत वालावलकर आहेत." वालावलकरांना सर्व सानथोर बापू नावानेच ओळखतात. पण त्यांचं समग्र जीवन म्हणजे संतांच्या गाथांचा वस्तुपाठ! माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून म्हणजे १९५९-६० पासून गेली चाळीस वर्ष मी निरनिराळ्या भूमिकेतून त्यांना पाहिलं, अनुभवलं. प्रारंभी, त्यांनी चालविलेल्या रिमांड होमचा एक अनाथ, निराधार आश्रित, नंतर रिमांड होममध्येच त्यांचा सहकारी, पुढे त्यांच्या संस्थांचा विश्वस्त, नंतर सर्व विश्वस्त संस्थांचा सचिव मी त्यांच्या ‘किचन कॅबिनेट'मध्ये केव्हा गेलो ते कळलेच नाही. बापूंना माणसांची मोठी जाण नि पारख होती. त्यांनी आपल्या हयातीत मुंबईपासून मुणग्यापर्यंत अक्षरश... शेकडो संस्थांचा पितृवत प्रतिपाळ केला. महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीस प्रमाण मानून ते जगत आले.
 बापूंचं समग्र जीवन म्हणजे ‘कर्तृत्व गाथा'वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी वडिलांशी मतभेदाचं निमित्त झालं नि त्यांनी आपलं जन्मगाव देवगड सोडलं नि मुंबई गाठली. मुंबईत हरतऱ्हेचे व्यवसाय, नोकरी करत राहिले. ‘शब्दप्रामाण्य' हे त्यांच्या जीवन यशस्वीतेचे रहस्य. अपार कष्ट, सचोटी, दुस-याबद्दलचा कळवळा यांच्या जोरावर ते रंकाचे राव' झाले, पण मनाला त्यांनी कधी अहंकार शिवू दिला नाही. दुकान, घर, संस्थांतील नोकरदार, कर्मचारी यांच्याबद्दल त्यांच्या मनात कणव होती.
 संस्थांत पगारवाढ बापू स्वतः करत आले. ज्या ज्या संस्थांचा संसार बापू सांभाळत आले तिथे कधी संप, निदर्शने, उपोषणे झाल्याचं मला आठवत नाही. महत्त्वाकांक्षी बापूंनी कर्मभूमी म्हणून कोल्हापूरची निवड केली. त्या वेळी तेथे काही व्यापारी वातावरण नव्हते. ती जागा होती शुगर मिलचं गोडाऊन. जिद्दीनं दुकान सुरू केलं (१९४३). त्या वेळी शेजारच्या त्या वेळच्या ‘राजाराम' (सध्याचे अयोध्या) चित्रपटगृहात ‘शकुंतला सिनेमा लागलेला. तो तिथे शंभर आठवडे चालला.. त्या गर्दीच्या वर्दळीनं दुकानाला गिऱ्हाईक मिळवून दिलं. पहिलंच गिऱ्हाईक ७७५ रुपयांची खरेदी करून गेलं. त्रेचाळीस साली ही खरेदी मोठीच. ताई गल्ल्यावर बसायच्या, ज्या काळात स्त्रिया दुकानात येत नसत. ताईंच्या उपस्थितीने स्त्री गिऱ्हाईकं वाढली. त्या वेळचे सरकार, सरदार सर्व घराण्यांचं हे दुकान हक्काचं झालं. दरांची घासाघीस बंद करून त्यांनी एकच भाव' पद्धत सुरू केली. परगावापेक्षा स्वस्त माल देण्याची प्रथा पाळली. आज दक्षिण महाराष्ट्रातलं सर्वात मोठे दुकान म्हणून असलेल्या लौकिकात ताईंचा वाटा न विसरता येणारा आहे. त्यामुळे ‘ताईंचा शब्द प्रमाण' हे तत्त्व बापूंनी आजन्म पाळले. बापूंच्या जीवनात ताई नेहमीच ‘व्हेटो' म्हणून राहिल्या, नि ‘रिमोट कंट्रोल' म्हणूनही! त्याला अपवाद असायचा देणगीचा. बापूंनी एखाद्या संस्थेस देणगी देतो म्हटले की, ती दिली म्हणून समजावी. याचकापेक्षा दात्यालाच देण्याची घाई असायची. बापू मनापासून मिळवायचे नि उदारपणे द्यायचे. देणगी देईपर्यंत त्यांना चैन पडायची नाही. बापूंना खोटं सांगून पैसे नेणारी माणसं मी पाहिलेत. बापूंचं दान हे त्यांच्या बाजूने ‘सत्पात्रीच' असतं. अशांना नंतर उपरती झालेली मी पाहिली आहे.
 एका मर्यादेपर्यंत मिळवल्यानंतर बापूंनी स्वेच्छादानाचा छंद लावून घेतला. गुरु बालावधूतांच्या अनुग्रहाचं निमित्त झालं नि त्यांनी सर्वस्व समाजार्पण केले. प्रारंभी ते साहाय्य मंदिरांच्या जीर्णोद्धारार्थच करत आले. १९८५ च्या दरम्यान एकदा गप्पा मारताना मी म्हटलं की, “बापू, तुम्ही मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता इतके पैसे देता. समाजात माणसांच्या जीर्णोद्धारास ते देण्याची गरज आहे. बापूंनी ते मन:पूर्वक स्वीकारलं. अनाथ, अपंग, अंधांचे संगोपन, गरिबांचं शिक्षण, आरोग्य अशा समाज नि मनुष्यहिताच्या कामात त्यांनी माझ्या कार्यकालातच दोन कोटींच्या घरात साहाय्य केलं. कधी कधी तर व्यक्तिगत खात्यावर ओव्हरड्राफ्ट घेऊन त्यांनी साहाय्य केलं. हे सारं करताना ते निर्विकार असायचे हे विशेष!
 बापूंची व्यापारात मोठी पत. रेमंड, दिग्जाम, ओसीएम, बॉम्बे डाईंग, मफतलाल... कितीतरी कंपन्या ‘सिझनचं पहिलं बुकिंग' श्रद्धेनं पहिल्यांदा बापूंच्याकडे करत आले आहेत. व्यापारात ‘एस. के. पी.' (शां. कृ. पंत) हे नाव रिझर्व्ह बँकेच्या ‘नोटे'इतकं ‘प्रामाणिक चलन' म्हणून चालायचं.
दुकानातून कधी कधी जमा नसताना चेक जायचा. बँकेच्या मॅनेजरचा फोन यायचा. पेमेंट केलंय, कधीही येऊन भरा. बापूंनी अनेक संस्था ऊर्जितावस्थेत आणल्या. मठ, धर्मशाळा, मंदिरे, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था सर्वत्र बापूंची नजर पारखी असायची. स्वत:च्या पासबुकात किती पैसे आहेत हे बापूंनी कधी पाहिलं नाही. पण संस्थांचे हिशोब चोख असण्यावर त्यांचा भर असायचा. संस्था कर्जात राहणार नाही याची काळजी घ्यायचे. अनेक संस्थांना त्यांनी भरभरून दिल्यानं त्या भरभराटीला आल्या. पुढे तिथं सत्तेच्या घारी घिरट्या घेत राहिल्या. अशा सर्व वादळात बापू स्थितप्रज्ञ रहायचे.
 बापूंचा लोकसंग्रह मोठा. सर्व थरातील मित्र परिवार, साहेबांबरोबर चपराशाची पण काळजी करणारा हा देवमाणूस. मिटींगला कलेक्टर असले तर त्यांच्या ड्रायव्हरला चहा दिला का ? ते पाहणारे बापू. बापू आले की मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट मिटिंग पण संपायची, याचा मी साक्षीदार आहे. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक नि अगदी अलीकडे मनोहर जोशी साऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून हक्कानं सामाजिक काम करून घेण्याचं कसब बापूंच्यात होतं. 'आधी केले नि मग सांगितले' हा त्यांचा कित्ता होता. त्यामुळे बापू लोकवर्गणी गोळा करायला बाहेर पडले की, लाखाच्या घरात ती जमणार हे ठरलेलं. प्रिन्सिपॉल दाभोळकर, नानासाहेब गद्रे, आर. जे. शहा, के. डी. कामत या त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी कोल्हापुरात सामाजिक कार्याचं उभारलेलं जाळं म्हणजे बापूंच्या लोकमान्यतेची साक्षच!
 बापूंचं जीवन ही एक कर्मठ तपश्चर्या होती. नव्वदी ओलांडलेल्या बापूंना सतत दोन 'स्कोर'नी प्रसन्न ठेवलं. दुकानाची विक्री ते दर तासांनी बघायचे. पुढे शय्येवर पडून फोनवर विचारत रहायचे. क्रिकेटचा'स्कोर' ही ते तितक्याच तन्मयतेने ऐकायचे. दोन्ही स्कोरच्या चढउतारावर त्यांचा ‘मूड' अवलंबून असायचा. बाहेर कितीही मंदी असली तरी बापूंनी आल्या दुकानी सतत ‘चलती’ आणि ‘तेजी'च अनुभवली.
 'जगी कीर्ति व्हावी म्हणून झालासी गोसावी।।' असा पाखंडीपणा कधीच त्यांनी केला नाही. त्यांच्यात जे होतं ते उत्कट होतं. त्रैलोकी चा नाथ, सकळांचा आधार, अनाथांचा बंधू, दासांचा कैवारी, उदार कृपाळू, दीनांचा रंक अशा संतांच्या वचनावलींचं सार्थ उदाहरण म्हणजे बापूंचं चरित्र नि चारित्र्य! आचार-विचारांच्या अद्वैतामुळे ते अजातशत्रू बनून राहिले. तप, तीर्थ, दान, व्रत व आचार ही त्यांच्या जीवनाची पंचशील तत्त्वे. ती त्यांनी अंगीकारली. आजीवन जोपासली, जपली.'आम्ही मेलो तेव्हा, देह दिला देवा। आता करू सेवा कोणाची मी।।' असा प्रश्न करणारं बापूंचं जीवन! माणसाची मात्र मती गुंग करणारेच आहे!
 बापूंच्या मनात समाजाबद्दल मोठी कणव, कळवळा असायचा. त्यांनी धुंदीत मिळवलं नि शुद्धीत वाटले. प्रसंगी वाटायचे, काय खिरापतीसारख्या देणग्या देतात हे. पण या माणसाची मिळकत, जमा वाढत निघाली की त्यांची अस्वस्थता वाढायची. कबीरांनी वर्णिलेल्या साधुसारखे या माणसांनी दोन हात भरभरून समाजाला दिले.

जो जल बाढे नाव में, घर में बाढे दाम।'
दोनों हाथ उलिचिये, यहीं साधु को काम।।'

 जन्मभर मिळवत राहावे नि जगभर वाटत सुटावे, असा छंद लागलेला हा सद्गृहस्थ. कष्टांनी मिळवायचे. सचोटी सोडायची नाही. दिलेला शब्द पाळायचा. कुणाबद्दलही अढी बाळगायची नाही. होता होईल तितकी दुस-यास मदत करत राहायची. प्रत्येक माणसाशी वेगळे ऋणानुबंध. या कानाचे त्या कानाला कधी कळल्याचे आठवत नाही. संस्था, संघटना, सभा, संमेलने हाच या माणसाचा संसार. गृहस्थ मात्र संन्यस्त, निपुत्रिक असल्याचे शल्य अपवाद म्हणूनही प्रकट न करणारा. साच्या जगातील अनाथ, अपंग, अंधांना आपले मानणारा हा संत वृत्तीचाच हा माणूस. सवारचा याला कळवळा. ‘ऐसी कळवळ्याची जाती'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शां. कृ. पंत वालावलकर! याने मृत्यूची तमा कधीच बाळगली नाही.

मृत्यू न म्हणे हा विख्यात मृत्यू न म्हणे हा श्रीमंत।'
मृत्यू न म्हणे हा अद्भुत।पराक्रमी।।'

 समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मृत्यू पराक्रमी खराच! शां. कृ. वालावलकरांची जगण्याची तीव्र इच्छाशक्ती किती होती तिचा मी साक्षीदार आहे! मृत्यूपूर्वी दोन दिवसांची गोष्ट. डॉ. महेश शहा त्यांच्यावर उपचार करीत होते. इंडोस्कोपी करायची ठरली. अन्ननलिका निकामी झाल्याने पर्यायच उरला नव्हता. ऑपरेशनला जाताना ते सजग आहेत का पाहायचे म्हणून डॉक्टरांनी त्यांना विचारले- ‘बापू वय किती?’ ‘एकोणचाळीस म्हणाले. बापूंना कमी वय सांगायची सवय होती. ९३ च्या उलट वय सांगायचे. गेल्या वर्षी ते २९ वर्षांचे होते. त्याच्या गेल्या वर्षी १९. या खोडीत ते मृत्युंजयाचा आनंद लुटायचे. पण मृत्यू पराक्रमी खराच! त्यापुढे कोणी विख्यात,  कोणी श्रीमंत, कोणी अद्भूत चुकला नाही, हेच खरे! बापू गेले खरे पण त्यांची ही जिंदादिली सतत अमर राहील, असे मला वाटते.
 बापू वृत्तीने तसे आध्यात्मिक, ‘आप’ नि ‘पर' मधील भेद त्यांनी पुरा ओळखलेला. त्यांच्या जीवनात व्यक्तिगत असे काही राहिलेले नव्हते. ‘सकळ जगतासि आधारू' असे त्यांचे चरित्र नि चारित्र्यही झालेले! दीनदुबळे, अंध-अपंगांना हीन लेखलेले त्यांना आवडायचे नाही. अगदी अनावधानाने तसा उल्लेख झाला तरी ते तत्परतेने लक्षात आणून द्यायचे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या वेळी मी बालकल्याण संकुलाचे काम पहायचो. खरे तर ते बापूंचेच काम मी करत राहायचो. मुलांना काही मदत हवी होती म्हणून बोलत होतो. म्हणालो,“त्या पोरांना तुम्ही नाही तर कोण देणार? लगेच म्हणाले कसे की,‘पोरं नाही म्हणायचे! कोकणात ‘पोरं' दुस-याची आपली ती ‘मुलं. त्यांची ती दुरुस्ती मला ‘आप’ नि ‘पर'मधील सीमारेषा समजावून गेली. त्यानंतर मात्र ती माझीही मुले झाली, जशी ती बापूंची होती. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन' असा ध्यास घेतलेला जनता जनार्दनाचा हा आधारवाड!
 कोकण बापूंची जन्मभूमी. मुंबई बापूंची स्वप्ननगरी, तर कोल्हापूर त्यांची कर्मभूमी.या तिन्हींशी बापू आजन्म कृतज्ञ राहिले. कृतज्ञता हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव. कोकणातील फारच कमी माणसं, मंदिरे, मंडळे असतील ज्यांना बापूंच्या या कृतज्ञतेचा स्पर्श झाला नसेल. मी त्यांच्या विश्वस्त संस्थांचा सचिव म्हणून काम करतानाच्या पंधरा वर्षातील पत्रव्यवहारात माझ्या लक्षात आले की, कोकणातील वाडी, वस्ती ही बापूंची मांदियाळी! वेतोरे, पाट, परूळा, दाभोळी, मुणगे, मालवण, लांजा, रत्नागिरी, वालावल अशा खेड्यापाड्यातून अखंड पत्रांचा, मदत मागण्याचा ओघ असायचा.बापूंना साऱ्या संस्था तेथील कार्यकर्त्याची माहिती असायची. (खरे तर त्यांची वंशावळच पाठ असायची!) स्वारी कोकणात निघाली, की खुशीत असायची. मंदिरांबरोबर माणसांना ते साद घालायचे. मंदिरात ‘गा-हाणे गायला लावायचे गुरवाला. माणसात आले की त्यांची गा-हाणी ऐकायची. मंदिरातील गुरवाच्या गा-हाण्यात, देवाच्या कौलात स्वहिताचे काहीच नसायचे. या शाळेची इमारत होईल काय? ते हॉस्पिटल सुरू करू कां? त्यांच्या देवाला विज्ञानही कळायचे. देवगडला केळकर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा प्रश्न निर्माण झालेला. बापू वालावलला गेले. देवाला कौल लावला. शाखा सुरू झाली. प्रसंगी पदरमोड केली.आज ती शाखा भरभराटीला आलेली मी नुकतीच पाहिली. 'कोकणचा मेवा'हा बापूंच्या आवडीचा भाग. मनसोक्त शहाळे प्यायचे. परिचितांना कोकणचे ‘खाजे' घ्यायला ते कधी विसरले नाहीत. फोंड्यात येऊन हजारभर लाडू घ्यायचे. अनाथाश्रम, रिमांड होमच्या मुलांसाठी ही खरेदी असायची. संस्थेत लाडू आले की मुले ओळखायची- 'बापू कोकणात जाऊन आले!' असा हा जग संसारी संन्याशी! घरात येईपयरत गाडी रिकामी व्हायची. ज्याला कोणी नाही त्याचा ध्यास घेतलेले बापू.
 मुंबईत आपण अनुभवाची शिदोरी घेतली. ती जन्मास पुरली. मुंबईचे ऋण उतरायचे म्हणून बापूंना ध्यास लागलेला. मुंबईचे कामगार नेते डॉ. दत्ता सामंत एकदा त्यांना भेटायला आले. कुर्ल्याला ते मोठी शाळा चालवायचे. कामगारांच्या मुलांसाठी. बापूंना त्यांनी अल्प मदत मागितली. बापूंनी साऱ्या प्रकल्पाची एकरकमी भरपाई केली. त्या दिवशी षण्मुखानंद सभागृहात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मेहरू बंगाली यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईच्या ऋणातून मुक्त झाल्याचे सांगितले. तीच गोष्ट कोल्हापूरची. कोल्हापूरला त्यांनी सर्वाधिक दिले. या शहराबद्दल त्यांच्या मनात अतीव श्रद्धा होती. इथल्या लोकांचाही त्यांच्यावर मोठा कृपालोभ होता. इथली अनेक मानपत्रे, पुरस्कार, गौरव त्यांना मिळाले पण जनसामान्यांच्या हृदयात त्यांनी मिळविलेले अनभिषिक्त सम्राटपण मला अधिक महत्त्वाचे वाटते. बापू गेले तेव्हा रस्ता झाडणारी एक बाई त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येऊन बराच वेळ रडत उभी राहिलेली मी पाहिली. ‘मावशी कोण तुम्ही?' असे विचारताना ती म्हणाली, “मी म्हारीण बाबा. ह्यो रस्ता झाडायची. उत्सवाच्या टायमाला बापू प्रसाद द्यायला कधी इसरायचे नाहीत. दिवाळी ओवाळणी अक्शी कधी चुकवली नाय! लय मोठ्या दिलाचा माणूस!' हे सम्राटपण मित्रांनो, मागून मिळत नसते. ते घेतलेल्या मानपत्राची पत्रास उतरवताना मी जेव्हा अनुभवतो तेव्हा लक्षात येते की माणसाचे मोठेपण ते, जे मागे उरते, मागाहूनही लोकांच्या जे लक्षात राहते!
 जे सामान्यांबद्दल तेच थोरामोठ्या, प्रतिष्ठांबाबत. गगनबावड्याच्या जहागिरदारीण श्रीमंत माईसाहेब बावडेकर. या साध्वीने सारे ऐश्वर्य झुगारून मुलांचा वसा घेतला. कोल्हापुरातले पहिले बालमंदिर सुरू केले. त्यांच्याबद्दल बापूच्या मनात मोठा आदर. त्यांनी हायस्कूल बांधायला काढले. मदत गोळा करीत होत्या त्या. एक दिवस बापूंकडे निरोप आला. शाळेला मदत मिळेल का ? भेटायला यायचे आहे! बापूंनी निरोप पाठवला. ‘भेटायला जरूर या पण मदत मागायसाठी नाही यायचे. तुम्ही राजमाता. कधीकाळी आम्ही सरकार म्हणून तुमचे मीठ खाल्ले! मोटारीच्या दारी येऊन साड्या दाखवल्यात आम्ही! आमचेही काही कर्तव्य आहे. श्रीमंत माईसाहेबांना पाच हजार हवे होते. बापूंनी पाच लाख दिले नि निरोप दिला. मी जिवंत असेपर्यंत तुम्ही कुणाकडे मागायला जायचे नाही. ही होती बापूंच्या लेखी माणसांची कदर ! जे नम्र असायचे, बापू त्यांचे दास व्हायचे. उर्मटाकडे ते सभ्यतेने व संयमाने दुर्लक्ष करायचे. अनुल्लेखाने उपेक्षिणे नि त्यातून ‘समझनेवाले को इशारा काफी' असा समजूतदार संस्कार बापूंनी आजन्म जोपासला. त्यांच्या जगण्याची एक खानदानी शैली होती. त्यात थाट असायचा, पण अहंकार मात्र नसायचा.
 बापू तसे करोडपती. पण त्यांच्या खिशात पैसे असे कधीच नसायचे. मला आठवते. त्या वेळी गणेशोत्सवाचे दिवस होते. मंडळाचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरीत वर्गणी गोळा करत फिरत होते. बापूंची गाडी पाहून उत्साही मंडळींनी गाडी अडवली. ते वर्गणी मागते झाले. बापू, ‘दुकानात या देतो म्हणाले, कार्यकर्ते ऐकेनात. आताच द्या म्हणून बसले. बापू म्हणाले, “अरे, माझ्याकडे पैसे नाहीत. नि खरेच नव्हतेही. शेवटी बापूंनी आपल्या ड्रायव्हरकडून घेऊन दिले. ड्रायव्हरकडे मागण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मागून देतो यात अपमानही वाटला नाही. नित्य पैशाचाच खेळ करणारा हा कारागीर. पण पैशाला लौकिक अर्थाने त्याने कधी शिवले नाही.
 त्यांची ऐपत लक्षात घेता त्यांचे ऐश्वर्य मात्र थोटकेच म्हणावे लागेल. त्यांनी कधी शेअरमध्ये गुंतवणूक करून रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने बाळगली नाहीत. एकेकाळी सुतळीचे तोडे, ताग्याची गोणपाटे नि शालूची खोकी विकून येणाऱ्या पैशाइतकाच नफा मिळवणाऱ्या बापूंनी स्वकष्टांनी दक्षिण महाराष्ट्रातील विक्रीचे सतत उच्चांक गाठले. किती तरी कंपन्यांनी त्यांना विदेश वारीची निमंत्रणे दिली. बापूंनी ‘गड्या आपुला गाव बरा म्हणत ती नाकारली. असे राष्ट्रभक्त बापू! स. का. पाटील, आप्पासाहेब पटवर्धन, दादासाहेब महाजन, प्रभृती कार्यकर्त्यांच्या पठडीत वाढलेल्या बापूंनी कधी राष्ट्रभक्तीचा टेंभा मिरविला नाही. पण जेव्हा जेव्हा एखादा राष्ट्रीय प्रश्न ऐरणीवर आला तेव्हा मात्र ते तटस्थ कधीच राहिले नाहीत. आणीबाणी असो की नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप, दुष्काळ) बापूंचा हात आणखीच ढिला व्हायचा.
 मनुष्य असा असू शकतो का? कळत्या वयात अंगावरील कपड्यानिशी रित्या हातानी घराबाहेर पडायचं, अहोरात्र कष्ट करायचे, प्रामाणिकपणे मिळवायचं. कसलेही काम करायला लाजायचं नाही. मिळवत मोठं व्हायचं.
अक्षरश: करोडोपती. गृहस्थ तरीही संन्यस्त व्हायचं. पाण्यात राहायचं पण पाण्याला शिवायचं नाही- अशी टोकाची निरिच्छ वृत्ती अंगीकारायची. जग कळालं की ते अधिक रचनात्मक, सुखी कसं होईल याचा निशीदिनी ध्यास घ्यायचा. आपला, ज्ञातीचा, रक्तताचा, स्वकीय, नातलग अशा जनरूढीच्या नातेसंबंधापलीकडे जाऊन माणसाचं मोहोळ लावणारा असा मनुष्य असू शकतो का? निरंजन, निरिच्छ व्यक्तिमत्त्व लाभलेले शां. कृ. पंत वालावलकर हे असं अजब रसायन होतं. हो, रसायनच म्हणायला हवं! कारण या रसायनाचे गुणच असे अलौकिक की याची नक्की ओळख, लक्षण, वृत्ती काय असा प्रश्न पडावा. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात मी बापूंची अनेक रूपं पाहिली. पण मला काही बापूंना पुरतं ओळखता आलं नाही. "Nearer the neighbour, away from the God' अशीच काहीशी स्थिती.
 अनाथ, निराधार. माणसाची ओळख, अस्तित्व नसलेल्या काळात माणसास माणूस म्हणून मान्यता देणं, त्याला तसं वागवणं, हे सारं करत असताना आपण काही उपकार करतो असा आव नाही आणायचा. प्रेमाची उबदार शाल पांघरून भित्याला निर्भय करायचं हे बापूच करू जाणे. प्रजासत्ताकदिनी सांगली, कोल्हापूर परिसरात जिलेबी खायचा रिवाज असतो. राष्ट्रीय सण सांस्कृतिक पद्धतीने साजरा करणारी कोल्हापूरची पंचक्रोशी राजर्षि शाहू छत्रपतींच्या संस्कारांनी अशी भारावलेली. घरोघरी मुलं, माणसं जिलेब्या, गोडधोड खाणार. रिमांड होमच्या या मुलांना कोण देणार? असा प्रश्न आख्ख्या कोल्हापुरात फक्त बापूंनाच पडू शकतो. १९५० साली संस्थेतील मुलांना जिलेबी देण्याचं सुरू केलेलं व्रत त्यांनी अखंड पन्नास वर्षे पाळलं, आपल्या पश्चात ते चालावं अशी तजवीज करणारा हा माणूस 'माणूस' म्हणून मोठा होता खराच! आपला वाढदिवस बापूंनी कधी ‘जीवेत् शरदः शतम्'च्या स्वरचर्चित जाहिराती छापून नि घराबाहेर स्वत...चंच हाराचं दुकान लावून साजरा केला नाही. त्यांचा वाढदिवस खर्चिक असायचा पण तो सार्थक खर्च असायचा. अनाथ, अपंग, मतिमंद संस्थांना मिष्टान्न, अर्थसाहाय्य, दुकानातील कामगारांना भेटी, स्वत: मात्र दूध-भात खाऊन निजायचे. असा हा निरिच्छ योगी.
 बापूंची मिळकत वाढत गेली, पण ‘बँक बॅलन्स' कधी वाढला नाही. ‘मनी बॅलन्स'पेक्षा 'मॅन बॅलन्स' नित्य जपणारे बापू. धन हे साधन आहे. गरजांच्या पूर्ततेचं ते माध्यम होय. आपल्या गरजांची पूर्तता झाल्यावर नि गरजेपेक्षा अधिक आलेल्या धनाचा विनियोग दुसऱ्यांसाठी करण्यातील त्यांची अपरिग्रह वृत्ती महात्मा गांधींच्या सामाजिक विश्वस्ताच्या कल्पनेस साद घालणारी होती. बापूंनी महात्मा गांधी कधी वाचले होते की नाही मला माहीत नाही, पण आजीवन ते आचरले जरूर. नाही म्हणायला बापूंच्यातील कार्यकर्त्यांचा पिंड काँग्रेसी मित्रात पोसला. त्यांचा असा कोणताच राजकीय विचार वा पक्ष नव्हता. ते असतीलच तर मानवतावादी. जात, धर्म, कूळ, पंथ असे संकीर्ण विचार त्यांना कधी पटले नाहीत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना त्यांचा मौन पण सूचक आशीर्वादच असायचा. अगदी आपल्या घरात असा प्रसंग घडल्यावरही त्यांनी जी उदारता दाखवली ती संन्यस्ताच्या निरिच्छ, निष्पक्ष, निरभिमानी वृत्तीस साजेशी. हरिजनांबद्दल कळवळा असायचा. ज्याच्यावर पोट चालतं, जी वाहती गंगा त्या दुकानाचाच ट्रस्ट करणारे बापू हे भारतातील एकमेवाद्वितीय उदाहरण. सुरुवातीच्या काळात तर आयकर खात्याचा त्यांच्या या विश्वस्त वृत्तीवर विश्वासच नव्हता मुळी. दुभती गाय कोण सोडेल असा त्यांचा समज. पण बापूंनी ते कालौघात त्यांच्या गळी उतरवलं. ते शंभर टक्के फायदा देणगी देऊनच. प्रसंगी आपल्या सचोटीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर उठवेपर्यंत ते लढले नि आपली निरिच्छता त्यांनी व्यवहाराने पटवून दिली. आपल्याकडे जग इतकं काळवंडलं आहे. की इथे ख-या नाण्याला आपलं खरंपण सिद्ध करण्यासाठी कायद्याच्या अग्निदिव्यातून जाणं भाग पडतं. कोणतंही काम करायचं ते चिरंतन. आपल्या पाठीमागे पण ट्रस्ट चालत रहावे अशी व्यवस्था बापूंनी केली. आपल्या ट्रस्टमध्ये सर्व विचार,थरांचे लोक घेऊन त्यांनी आपली उदारताच सिद्ध केली. विश्वस्तांमध्ये मतभेद असले तरी ते संयमाने हाताळायचे. विश्वस्त आपले उपकृत अशी भावना त्यांनी कधी ठेवली नाही.
 व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी मात्र मर्यादेपलीकडे जाणार्याचा मुलाहिजा नाही ठेवला. अशावेळी त्यांच्यातील संत पंत व्हायचा. कठोर निर्णयाशी ते बांधील असायचे. प्रसंगी ते नमतं घ्यायचे. त्यांची निरिच्छता निरंजनाप्रमाणे सतत जागरूक, प्रज्वलित असायची. त्यांना ज्यांनी गृहीत धरलं ते फसले. बापू कुणाचा उपमर्द करायचे नाहीत. पण कुणी कुरघोडी करायला धजू लागला की ते त्याला आपल्या संयमी, अनुभवी, सामंजस्य नि समजेवर जमीन दाखवायचे. यात ते कोणाचा जामीन स्वीकारायचे नाहीत. ते भोळे नव्हते तसेच धूर्तही नव्हते.पण अनुभवाचं प्रचंड शहाणपण त्यांच्याकडे होतं.
 बापूंनी जन्मभर दुस-यांचीच तळी उचलली. प्रसंगी त्यांनी स्वकीय, कुटुंबीयांचा रोष पत्करला पण एकदा का जीवनदृष्टी ठरली की मग त्यांनी त्यातून कधीच माघार घेतली नाही.त्यांच्या विश्वस्त मंडळात वालावलकर कुटुंबीय अपवाद होतं हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. माझ्यासारखा निधर्मी,निर्जातीय मनुष्य त्यांचा विश्वस्त सचिव होतो यापेक्षा या माणसातील निरांजनाचं निखळपण ते दुसरं कोणतं असणार ?
 हा निरिच्छ योगी अजातशत्रू होता.त्याचं रहस्य त्याच्या सहजप्रसन्न व्यक्तिमत्त्वात साठवलेलं होतं.आपली प्रसन्नता, समृद्धी याचा ध्यास घेतलेले,मंतरलेले बापू मी अनुभवले, निरखलेत कित्येकदा. भेटणाऱ्या प्रत्येकास गुरु बालावधूत महाराजांचा फोटो देऊन ‘पाचाचे पन्नास होतील म्हणून आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या बापूंना स्वत:ला निधर्मी समजणारे ढोंगी, भोंदू भले म्हणोत, त्यांना बापूंच्यातील ‘सर्वेपि सुखिन सन्तुची सदाशयता या जन्मी कळणे केवळ अशक्य! बापूंनी आपलं मृत्युपत्र केलं नाही. ‘दृष्टीआड ते सृष्टीआड' अशी टोकाची निरिच्छता. तत्त्वाचा टेंभा मिरवणाऱ्यांना काय कळणार? बापू तत्त्वाच्या जंजाळात कधीच अडकले नाहीत. या क्षणी माणसास कसा दिलासा मिळेल, त्यासाठी सर्व ते करण्याची ‘डॉक्टरी तत्परता' बापूंनी नित्य जपली नि जोपासली. समाज ‘आयसीयू'मध्ये असताना ‘तत्पर दिलासा देण्यातील बापूंची परहित दक्षता केवळ साधू वृत्तीची निदर्शक असायची. सवारच्या सर्व प्रसंगात सर्वस्व समर्पण करणारा हा साधनसंपन्न सद्गृहस्थ खरा सिद्ध साधक नव्हे तर साध्य साधक होता असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये.
 बापू तसे गृहस्थ, विवाहित. पण लौकिक अर्थाने ते घरी कधी रमले नाहीत. त्यांना आपल्या घरापेक्षा मोठ्या घराची-समाजघराची चिंता असायची. आपल्याशी संबंधित एखाद्या संस्थेची अडचण असली की बापू बेचैन असायचे. समाजघराचा गाडा निर्विघ्न चालावा म्हणून हरत-हेचे साहाय्य करत रहायचे. जाहिराती गोळा करणे, वर्गणी जमा करणे, देणग्या मिळवून देणे, सभासद, पदाधिकारी मंडळींतील मतभेद दूर करणे या सर्वांत बापू रमायचे. समाजातही त्यांचा शब्द हा सर्वोच्च असायचा. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे अंतिम. मग पुढे चर्चा नाही की प्रतिवाद नाही. समाज घरातील त्यांचे वडीलपण असच नि:संग असायचं. एखादी बैठक वादळी होणार म्हणून सर्व सचिंत असायचे. बापू मात्र निश्चिंत. कुणी निवर्तलं की बापूंना दु:ख जरूर व्हायचं पण वृथा शोक करत ते कधी बसायचे नाहीत. एखादी गोष्ट पाठीवर घालून पुढचा प्रवास करायची त्यांची मानसिक तयारी नि:संग ऋषीप्रमाणे खरंच समदर्शी, निरक्षीरविवेकी असायची. बापू जे ९३ वर्षांचे जीवन जगतले त्यात ‘मन की खुशी नि दिल का राज' अशी स्वच्छंदता होती. त्या स्वच्छंदतेस त्यांनी मान्य केलेले समाज नियमांचे कुंपण होते. समाजातील नियम, नियती, नैतिकता याची त्यांना चाड नि जाण होती. समाजघर सांभाळणारा हा सद्पुरुष जन्मभर सतत दुस-यांसाठी निरअहंकार जळणाच्या निरांजनासारखा. पण निरांजन (परब्रह्म) बनून निर्विकार झिजत राहिला. निरंजन योगी जरा-मरण मुक्त असतो. बापूंनी लौकिक अर्थाने इहलोकीचा निरोप घेतलेला असला तरी त्याचं येथील अलौकिक कार्य समाजमनात सतत घर करून राहील.
 बापूंच्या साहाय्य, संस्कार, सद्भावी उपकृत, अनुग्रहित न झालेली संस्था, संघटना, व्यक्ती सापडणे दुर्लभ. जे कोणी त्याच्या संपर्कात आले त्यांना बापूंनी आपलंसं केलं. आपलं असं त्याचं कोणीच नव्हतं. पण ते सवारत असे विसर्जित, विलीन, रममाण व्हायचे की प्रत्येकाला ते आपले वाटायचे. ते ज्या संस्थांत होते तिथे अनौपचारिक, घरगुती ओलावा राहील याची त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, साहचर्यात अशी काही जादू होती की माणूस मग तो कितीही अढ्यताखोर असो तो शेळी बनायचा. बापूंच्या या विलक्षण अशा जनव्यवहारी कौशल्यात त्यांची निरिच्छ, नि:संग, निरांजन वृत्तीच कामी यायची. त्यांच्यात असलेल्या क्षमाशीलतेमुळेच ते पूर्णपणे समाजशील होऊ शकले.
 बापूंच्या जाण्याने समाजघर पोरकं झालं. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा, अशी समाजमनात असलेली धारणा राजाविषयी असलेली भावना-प्रजेत, लोकांत बापूविषयी होती. त्यांच्या जाण्याची खरी जाणीव समाजघरावर होती. त्यांच्या जाण्यानं काही संस्थांवर चिंतेचे सावट असणे स्वाभाविक आहे. बापू असेपर्यंत या संस्था अभेद्य किल्ल्याप्रमाणे अभिमानाने जीवन जगत होत्या. आता त्यांचं काय होणार? असा प्रश्न- यक्ष प्रश्नच बापूंच्या माहात्म्याची साक्ष देतं. जगन्नाथाचारथ, तो चालेलच. पण बापूंच्या निरिच्छ वृत्तीने जी निर्विघ्नता असायची ती असणं कठीण.
निष्काम कर्मयोगी : शिवराम हरी गद्रे

 शिवराम हरी गद्रे याना सवर्जण नाना या नावानचे ओळखत. नानासाहबे गद्रे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनाचे आदर्श होते. मला एक प्रसगं या निमित्ताने आठवतो. १९८६ साली नाना गेल्यानंतरची पहिली श्रद्धांजली सभा बालकल्याण संकुलात झालेली होती. मला तो प्रसंग अशासाठी आठवतो की, त्या सार्वजनिक सभेला कोल्हापुरातील सगळ्या सावर्जनिक संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण आवर्जून दोन शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी या सभेला उपस्थित होते. ते म्हणजे त्या वेळचे जिल्हाधिकारी आणि डी. एस. पी. गणपतीचा मोसम होता. डी. एस. पी. बंदोबस्ताच्या फार मोठ्या कामात गुंतलेले होते आणि त्यांना मी फोन करून सांगितले की नानांची सार्वजनिक श्रद्धांजली सभा आहे. तर त्यांनी निकराचा बंदोबस्त असताना देखील तो बाजूला ठेवला आणि नानांच्या सभेला ते आले. तीन वर्षांसाठी कोल्हापुरात आलेल्या एका सरकारी अधिका-याने त्या वेळी नानांच्याबद्दल जे उद्गार काढले ते ऐकून मी पुरेपूर हेलावून गेलो होतो ते असे म्हटले होते की, “आम्ही सरकारी अधिकारी अनके शहरामध्ये बदलीवर जात असतो. अनेक प्रकारचे लोक पहात असतो आणि लोक पाहण्याची, पारखायची एक सवय आपोआप आमच्या कार्यपद्धतीत येऊन जाते. माणसू बघितला की तो पाण्यात किती आहे आणि पाण्याबाहरे किती आहे हे आम्ही लगेच ओळखतो.'नानांच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं होतं की, "या गृहस्थांना आम्ही पहिल्यांदा रेडक्रॉसच्या सभेमध्ये पाहिलं. त्यांचे विचार ऐकले आणि आमच्या असं लक्षात आलं की हा सचोटीचा मनुष्य आहे. त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की, कलेक्टर कचेरीमध्ये एक अशीच काणे ती तरी निधी सकं लनाची सभा होती. बरचे वक्ते बोलत होते, ‘असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. अमुक निधी जमा केला पाहिजे. यापद्धतीने त्या पद्धतीने इ.,' सगळे बोलल्यानंतर नाना उभारले आणि फक्त एकच वाक्य बोलल्याच त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले ‘तुम्ही कसा निधी जमवायचा तो जमवा’ ‘माझे एक हजार रुपये घेऊन काम सुरू करा.' बाकी सगळ्यांनी भाषणं केली, पैसे फक्त नानांनी दिले. नानांची उदारता अशा एका छोट्या उदाहरणातून स्पष्ट होते.
 नाना हे कोल्हापुरातले ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे' असं आचरणातून सांगणारे गृहस्थ होते. नाना हे कोल्हापुरातलं असं एक ‘शिडाचं जहाज होतं... मी ‘शिडाचे जहाज' अशासाठी म्हणतो की, या माणसानं पहिल्यांदा व्यापार शिडाच्या जहाजातून केला होता. शिडासारखा शुभ्र. ज्यांनी-ज्यांनी नानांना पाहिलंय त्यांच्या असं लक्षात येईल की अत्यंत ताठ, माझ्यापेक्षा जास्तच उंची होती त्यांची आणि नानांचं नाक जितकं सरळ होतं तितका टोपीचा कोनही सरळ होता. नानांनी कार्यकर्ता असूनही टोपी कधी तिरकी घातली नाही. तिरकी चाल नव्हती नानांची, सरळ चाल! (मी बुद्धिबळातल्या उंटासारखी सरळ चाल म्हणत नाही.) नाकासमोर चालणारा सरळ सोज्वळ मनुष्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं नानांना पाहिलेलं आहे. नानांच्या बरोबर मी साधारणपणे सहा एक वर्षे तरी बालकल्याण संकुलाचं काम केल्याचं मला आठवतंय. नंतर निवासराव पवारांच्या बरोबर महालक्ष्मी धर्मशाळेचं काही काम केलं. जनता बँकेमध्ये नानांच्या बरोबर काही वर्षे काम केलं. त्यांच्या रोटरी क्लबचा मी एक वर्ष सदस्य होतो. असे अनेक प्रसंग सांगता येतील. या सगळ्या प्रसंगातून मला कळलेले नाना आज जीवन आणि कार्याच्या रूपात मी तुमच्यापुढे उभे करणार आहे.
 नानांच्याबद्दल बोलत असताना, त्यांचे जीवन समजनू घते असताना, त्यांचे कार्य समजून घेत असताना आपण दोन गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की, नानांच्या जीवनाची जी सगळी उभारणी आहे ती दोन व्यक्तींच्या आदर्शावर उभी आहे. एक म्हणजे त्यांची आई. त्यांची आई फार शिकलेली होती असं नाही. नाना दहा वर्षांचे असतानाच नानांचे वडील वारले आणि नानांचं सगळं जीवन आईनं अशा ऊर्जित अवस्थेत आणलं. ही आई अत्यंत कनवाळू आणि ममत्व असणारी होती. नानांनी आपल्या शिवाजी पार्कमध्ये बांधलेल्या बंगल्याला ‘ममता' असे नाव दिलेलं मला आठवतं. हे ममता म्हणजे आईचं स्मरण होतं अशी माझी धारणा आहे. ही ममता कशी होती? त्या वेळी नाना देवरूखमध्ये व्यापाराचे प्राथमिक धडे घेत होते आणि नानांची आई 'मातृ मंदिर' नावाची अनाथ, निराधार स्त्रियांचा सांभाळ करणारी एक संस्था आहे इंदिराबाई हळबे नावाच्या एक परिचारिका असल या बाई त्या काळामध्ये कुमारीमातांचा सांभाळ करायच्या. कधीकधी इंदिराबाईंना मोठी अडचण यायची आणि कोणीतरी हाताखाली लागायचं. तुम्हाला माहीत आहे की देवरूखसारख्या गावी त्या काळामध्ये, १९२०-२५ चा काळ तुम्ही आठवा, गांधीयुगाचा काळ आठवा... त्या काळामध्ये ब्राह्मण वर्गातील स्त्री जात-पात माहीत नसलेल्या स्त्रीचं बाळंतपण करते, ही साधी गोष्ट नव्हती. जिला समाजानं वाळीत टाकलेलं आहे, जिला समाजाने नाकारलेलं आहे अशा कुमारीमातेच्या बाळंतपणासाठी इंदिराबाई हळबेंना हात देणारी स्त्री, अलीकडच्या डॉक्टरी भाषेमध्ये त्याला ‘वॉश घेणे' असं म्हणतात. डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात तेव्हा त्यांना मदत करण्याची ती एक क्रिया आहे - तर वॉश घेण्याचं काम करणाऱ्या नानांच्या आई होत्या. नानांचं कुटुंब तर कमठे ब्राह्मणाचं कुटुंब. आई मोठी धामिर्क, सोवळं वगैरे घरात. व्रतवैकल्ये घरामध्ये अशा बाईने, या माउलीने खरा धर्म, जाती-धर्मापलीकडे असणारा खरा मानवतेचा धर्म, एक आदर्श म्हणून नानांना आपल्या आचरणातून घालून दिला.
 त्यानंतर नानांवर मोठे संस्कार जर कुणाचे झाले होते तर त्यांच्या वडीलबंधूचे समतानंद गद्रे यांचे. त्यांचे संपूर्ण नाव सांगायचं झालं तर अनंत हरी गद्रे. अनंत हरी गढ्यांना ‘समतानंद' का म्हणायचे तर त्यांनी कोकणच्या परिसरामध्ये त्या काळात समतेचा प्रसार केला. कसा प्रसार करायचेत? तुम्ही जर इतिहासाची पाने चाळायला लागलात तर तुमच्या असं लक्षात येईल की, समतानंद गद्रेंना कोकणामध्ये लोक ‘झुणका-भाकर गद्रे' असं म्हणायचे. ‘झुणका-भाकर गद्रे' कशासाठी? तर ते त्या वेळी सत्यनारायणाची पूजा घालायचे आणि सत्यनारायणाच्या पूजेनंतर सार्वजनिक सहभोजन आयोजित करायचे. सहभोजनाचं वैशिष्ट्य असे की, त्या सहभोजनाला जात-पात, धर्म कसल्याही प्रकारचा विचार न करता सगळ्यांनी एका पंक्तीत बसायचं आणि जेवायचं. जेवणाचा बेत झुणका-भाकर असायचा. कोकणासारख्या कर्मठ भूमीमध्ये अनंत हरी गद्र्यांनी सत्यनारायणाची पूजा घालून त्या काळात सगळ्यांना एका अर्थाने बाटवण्याचा उद्योग केला होता. मी ‘बाटवण्याचा' हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. कारण समाजातील जाती-धर्माच्या भिंती धर्माच्याच नावाखाली मोडण्याचा मोडण्याचा दूरदर्शीपणा अनंत हरी गद्र्यांनी केलेला होता. हे अनंत हरी गद्रे खरं तर टिळकांच्या पठडीत वाढलेले. टिळक किती कर्मठ होते हे मी तुम्हाला सांगायला नको. कोल्हापुरामध्ये टिळकांचा वेदोक्त प्रकरणासंबंधीचा फार मोठा इतिहास आहे. शाहू महाराजांशी त्याचा संबंध आहे. अशा टिळकांचे भक्त असलेले अनंत हरी गद्रे देवरूखसारख्या गावात सहभोजन करायचे. ते पत्रकारही होते. त्या काळात ‘निर्भीड' नावाचे ते पत्र चालवायचे. त्याकाळी ‘संदेश नावाचं ही एक पत्र टिळक चालवत असत. त्याचे ते बातमीदार होते. अशा माणसाचं जीवन नानांनी आपल्या लहान वयामध्ये पाहिलेलं होतं.
 तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की, नानांनी वयाच्या पंधराव्या वर्षी जो पहिला उद्योग सुरू केला तो कोणता होता? नाना पहिल्यांदा प्रकाशक झाले, हे फार कमी लोकांना माहीत असेल. नानांनी त्यांचे मोठे बंधू दामोदरपंतांच्या बरोबर व्यापार सुरू केला खरा, पण खरा व्यापार त्यांनी मुंबईला जाऊन सुरू केला. आज मराठीतील सगळ्यात प्रख्यात जी प्रकाशन संस्था आहे ‘मौज प्रकाशन.' हे मौज प्रकाशन मित्रांनो, पहिल्यांदा गद्रे परिवारानं सुरू केलं. आज श्री. पु.भागवतांचं म्हणून ते ओळखलं जात असलं तरी ते गद्रे बंधूनी पहिल्यांदा सुरू केलं होतं. त्या काळामध्ये मला जी माहिती आहे त्याप्रमाणे आचार्य अत्रे कवी म्हणून प्रकाशात आले ते अनतं हरी गद्र्यांच्यामुळे. त्यांची झेंडूची फुले' हा काव्य संग्रह आणि 'गीतगंगा' नावाचे खडे काव्य अनतं हरी गढ्यांनी प्रकाशित केल. न. चिं. केळकराचं ‘नवलपूरचा संस्थानिक’ आणि ‘भारतीय तत्त्वज्ञान जे आज आऊट आफैं प्रिंट आहे आणि ज्याला आपण तत्त्वज्ञानातला फार मोठा ‘माइल स्टोन' म्हणतो असं पुस्तक अनतं हरी गद्रयांनी आपल्या प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं. वि. स. खांडेकरांना लेखक करणारे अनंत गद्रेच होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. 'दोन ध्रुव' सारखी कादंबरी नानांनी आणि अनंत हरी गद्रयांनी प्रकाशित केली होती. एवढंच नव्हे, इतिहासामध्ये आपण खोल जायला लागल्यानंतर असं लक्षात येईल की ही गद्रे फॅमिली आहे ना, त्यांचं गद्रे नाव का पडलं मला माहीत नाही. खरं म्हणजे त्यांच्या गद्रेमधला जो ‘जी' आहे ना, त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे, ‘गुडविल', त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे ‘गोल्ड', त्या ‘जी'चा खरा अर्थ आहे ‘जनरस' - अशी पिढ्यानपिढ्या एक मोठी परंपरा या माणसांनी निर्माण केली ती या पहिल्या प्रकाशनाच्या व्यवसायातून.
 त्या काळामध्ये अनतं हरी गद्रे यांनी सिनेमा आणि नाटक कंपनी स्थापन केली होती. आता तुमच्या लक्षात येईल की, ही ब्राह्मण परिवारातली मंडळी नाटक आणि सिनेमा काढतात ही आश्चर्याची गोष्ट असेल . पण तुम्हाला गद्रे परिवाराचा एक फार मोठा गुण मी सागंतो की, त्यांनी कधीही कोणताही धंदा तोट्यात केला नाही. मला वाटतं, चद्रं कातं गद्रे आजही सांगतील की ते काणे ताही धदा तोट्यात करत नाहीत. धदा तोट्यात निघाला की ते बदलतात. नानांनी आणि त्यांच्या सगळ्या परिवाराने व्यवसायामध्ये इतक्या मुशाफिरी केल्या. त्याचं खरं कारण तुम्हाला अनंत हरी गद्रयांच्या दूरदृष्टीत दिसेल. त्या काळामध्ये माणस शिकायला लागली होती, वाचायला लागली होती. शिक्षणाचा प्रचार सुरू झाला होता आणि अशा काळामध्ये पूर्वी इंग्रजी साहित्य वाचणारी मंडळी मोठ्या प्रमाणात मराठी वाचू लागली होती. ती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी गथ्र विकत घेऊ लागली होती. काळामध्ये मराठी पुस्तकाच्या व्यवसायामध्ये आपण आलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं. त्या काळात नाटके चालायची. किर्लोस्कर कंपनी, खाडिलकर कंपनी, नंतरच्या काळामध्ये बालगंधर्वांची नाटकं असायची. त्यांनी नाटक कंपनी व्यवसाय म्हणून सुरू केली. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नाटकांच्यामुळे संस्कृतीचा प्रसार झाला वगैरे खरं आहे, पण मुळात यांची बैठक ही अशी की असा व्यवसाय करायचा की त्या व्यवसायातून समाजाला ऊर्जितावस्था यावी, त्या व्यवसायातून आपल्याला चार पैसे मिळावते. जे काही करायचं ते सचोटीनं करायचं असा एक संस्कार अनंत हरी गद्र्यांनी नानांना दिला.
 नानांच्या सगळ्या चरित्रामध्ये अनतं हरी गद्र्यांचा आणि आईचाही साधेपणा दिसनू येतो. सचोटी ही त्यांच्यामध्ये या दोघांची दिसेल. याचं कारण असं की या दोघांवर, आईवर आणि त्यांच्या मोठ्या भावावर गांधीजींचा फार मोठा प्रभाव होता. अनतं हरी गद्रे खादीचे कपडे घालायचे. गांधी चळवळीमध्ये त्यानी फार मोठी भागिदारी कोकणामध्ये केलेली आपणास दिसले. त्यामुळे नाना हे ख-या अर्थाने गांधीवादी असलेले दिसतात. नाना गांधीवादी का? नाना प्रामाणिक का? याचा शोध जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो त्यांच्या पूर्वाश्रमीच्या संस्कारामध्ये तुम्हाला दिसेल.
 चौथीपयर्तं नानाचं प्राथमिक शिक्षण देवरूखला झाल. इंग्रजीत ते देवरुखला शिकले. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये असं ठरलं की एका मुलाला शिकवायचं. गद्रे कुटुंबामध्ये त्या काळात फार माणस उच्चशिक्षित नव्हती. सगळ्यांची अशी धारणा होती की नानांना पदवीधर करायचं. मग असं ठरलं की नानांनी देवारुखहून बसनं रत्नागिरीला जायचं आणि रत्नागिरीहून बोटीने मुंबईला जायचं आणि शिकायचं. नानांना जर त्या दिवशी बोट मिळाली असती तर नाना कदाचित व्यापारी झाले नसते. त्याची अशी गंमत झाली की, नाना रत्नागिरीला बोट पकडायला गेले आणि ते धक्क्यावर जाण्यापूर्वीच बोट निघनू गेली होती. नाना तेथून जे परत आले तसा त्यांनी शिकण्याचा नाद सोडून दिला. ते व्यापारामध्ये रमले. माणसाची गाडी चुकली की जीवनाचा सगळा प्रवास कसा बदलून जातो याचं सुंदर उदाहरण म्हणजे नानांचं आयुष्य. व्यापार एके व्यापार' असं ठरवून त्यांनी आपल्या जीवनाची मांडणी केली.
 नानांनी सुरुवातीला संगमेश्वरमध्ये ठोक (होलसेल) व्यापारी म्हणून आपल्या व्यापारी पाठशाळेची सुरुवात केली. त्या काळामध्ये सर्व खरेदी ही जवळच्या जिल्ह्याच्या गावामध्ये व्हायची. रत्नागिरीला सगळे व्यापारी खरेदी करायला यायचे आणि आपापल्या पेठेमध्ये जाऊन-मग संगमेश्वर असेल, देवरूख असेल अशा ठिकाणी-जाऊन माल विकायचे. नानांनी व्यापार करताना असं पाहिलं की याच्यामध्ये ‘पडतर' फार कमी पडते. ‘पडतर' हा व्यापारी शब्द आहे. अलीकडच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ‘मार्जिन' किंवा 'फायदा. नानांनी व्यापाराचं एक नवीन तत्रं विकसित केलं. नाना हे सतत व्यापारामध्ये संशोधन करणारे गृहस्थ होते. ‘संशोधन' याचा अर्थ असा की आपण कसा व्यापार करायचा? लोक कसे व्यापार करतात? व्यापारी म्हणून नाना गुजराती माणसांच्या सतत सहवासात राहिले. चमडी देगा लेकिन दमडी नहीं देगा' असं जे आपण गुजराती आणि मारवाडी लोकांच्याबद्दल बोलतो ना, त्या लोकांच्या व्यवहारामध्ये नानांनी पाहिलं की ही मंडळी व्यापार कशी करतात? तर ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. नंतर जिथे उत्पादन होतं तिथे खरेदी करतात. म्हणनू नानांनी आपली खरेदीची पद्धत बदलून टाकली. चहा घ्यायचा ना कलकत्त्याला घ्यायचा. साखर घ्यायची ना, कराचीला घ्यायची. मसाल्याचे पदार्थ घ्यायचे ना, कोचीनला जाऊन घ्यायचे. तुमच्या असं लक्षात येईल की कोकणात आजही बागवान आंबे खरेदी करतात ते आंबे काही किलो आणि ट्रकाने खरेदी करत नाहीत. ते बागाच खरेदी करतात. डायरेक्ट बागेमध्ये जातात आणि आंब्याच्या झाडाला लागलेलं फळ बघून ते झाडे विकत घेतात. ही जी पद्धत आहे ती नानांनी बरोबर हेरली आणि आपल्या व्यापारामध्ये फार मोठं 'मार्जिन’, ‘पडतर' कशी जास्त होईल असं पाहिलं. नानांच्या व्यापाराचं आणखी एक कौशल्य, वैशिष्ट्य असं होतं की नाना मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायचे, शिवाय ती कमी दरात खरेदी करायचे.
त्यांची व्यापाराची आणखी एक शक्कल होती. इथं मी अनेकवेळा पाहिलेलं आहे की त्या काळात ते स्टेशन रोडला बाहेर खुर्चीवर ते बसलेले असायचे. मला मोठी गंमत वाटायची नानांची. ते मला कधीच व्यापार करताना दिसले नाहीत. कायम मला ते बाहेरच्या खुर्चीवर बसलेले दिसायचे. कधी व्यापार करायचे कोणास ठाऊक? पण त्यांचा व्यापार अनौपचारिक पद्धतीनं चाललेला असायचा. दुकानाच्या दिवाणजी, नोकरांवर त्यांचा विश्वास असायचा. पेढीवर त्यांच्या हाताखाली घरातील तरुण पुतणे, नातू मंडळी काम करत असायची. वर्तमानपत्रं, रेडिओद्वारे दरदाम पहात रहायचे. खरेदीला येणाऱ्या गिऱ्हाइकांशी चर्चा करत त्यांना बाजाराचा होरा कळायचा. त्याप्रमाणे त्यांची खरेदी, विक्री होत रहायची. गि-हाइकाशी त्यांचा संवाद आत्मीय, स्वकीयाचा असायचा. घरच्यांची चौकशी करायचे. कोकणची खबरबात, पाऊस, पीक, पाणी सारं प्रेमपूर्ण संवादाच्या साखर पेरणीत होत राहायचं. बिछायती नानांनी कधी बदलू दिल्या नाहीत. गि-हाईक पिढ्यानपिढ्या नानांकडेच माल घेणं पसंत करायचे.
 जपानी लोक व्यापार कसा करतात? जपानच्या व्यापाराची एक कार्यसंस्कृती सांगितली जाते की जपानी लोक एका माणसाकडून दहा रुपये काढत नाहीत, दहा माणसांच्याकडून एक-एक रुपया काढतात. त्यामुळे टर्नओव्हर वाढतो. उत्पादन वाढतं आणि ओव्हर ऑल ग्रॉस इन्कमही वाढत जातो. नानांची पचं वीस-सत्तावीसच्या (१९२५-२७) काळामध्ये व्यापाराचं हे तंत्र सुरू केलं. नानांच्या व्यापाराचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य होतं. आजच्या ग्लोबल मार्केटिंगच्या जमानात त्यांच अनन्यसाधारण महत्त्व आहे. नानांकडे कोकणातले मोठमोठे अडते होलसेल खरेदीसाठी यायचे.
 नाना असे व्यापारी नव्हते की केवळ आपलचं उखळ पांढरं व्हावं. नानांना लाके विचारायचे, ‘साखरेचा दर काय चाललाय? तेजी आहे का मंदी आहे?' नाना सांगायचे की ‘किती घेणार आहेस तू?' तो सांगायचा ‘पाच पोती' असं कर, दर वाढायची शक्यता आहे. तू दोन पोतीच घेऊन जा आणि दर वाढला तर मी तुला फोन करून कळवीन किंवा उद्या ट्रक येणारच आहे. खाली रत्नागिरीमध्ये मी निरोप देतो.' म्हणजे असं नाही की आलेल्या माणसाला फसवायचं आणि जास्तीत जास्त आपण गिळंकृत करायचं. ही गिळंकृत करण्याची वृत्ती नानांच्यामध्ये अजिबात नव्हती. त्यांचं साधं गणित होतं. आपलंही भलं झालं पाहिजे आणि आपण ज्याच्यावर जगतो त्यांचही! रयतेच्या राजाची उदारता नानांच्या मनामध्ये तुम्हाला असलेली दिसेल!! नाना मुंबईला खरेदी करायला जायचे. मुंबईचे सगळे व्यापारी हे मारवाडी किंवा गुजराती असायचे. मराठी माणसावर त्यांचा फार कमी विश्वास असायचा. नानांनीच मला एकदा सांगितलेली गोष्ट आठवते की, ते उधारी आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या लोकांना जास्त द्यायचे. मराठी माणूस आला की त्याला उधारी कमी. अपवाद होता फक्त गद्रयांच्या पेढीचा. नाना आले की मुंबईचे सगळे व्यापारी त्यांना एक पदवी द्यायचे, ‘राजश्री' - ‘राजश्री आले म्हणायचे! राजश्री कशासाठी? राजर्षि नव्हे, राजश्री! राजश्री याचा अर्थ आहे की असा मनुष्य की जो कधी टांग देणार नाही. बाकी सगळे टांगा द्यायचे, उधारी बुडवायचे, वांदा करायचे. वादा एक करायचा आणि एक पाळायचा! नानांच्या पेढीचं वैशिष्ट्य असं होतं नानांनी जो शब्द दिला तो जन्मभर पाळला. त्यांच्या व्यापाराच्या वह्या तुम्ही आजही काढून बघा. पंचेचाळीस दिवसांची उधारी म्हटल्यावर चाळिसाव्या दिवशी ड्राफ्ट गेलाच पाहिजे. मला त्यांचे मित्र बापू वालावलकर हे नेहमी सांगायचे की, मी नानांकडून व्यापाराची सचोटी शिकलो. दोघेही कोकणातलेच. नाना त्यांना नेहमी सांगायचे की, 'बापू व्यापारामध्ये मी अघोरी साहस केलेलं तुम्हाला दिसणार नाही. नानांनी जो सगळा पैसा जमवला तो ‘पांढरा पैसा.' ते कपडेच नुसते पांढरे घालायचे नाहीत. व्यापारामध्येही सचोटी पेढीवर इन्कमटॅक्सची रेड पडली असं तुम्हाला गद्रेपरिवाराच्या इतिहासामध्ये दिसणार नाही. इन्स्पेक्शनला केस काढली जाई पण रेड नाही. ही सचोटी नानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एका गांधीवादाच्या भक्कम संस्कारावर उभारलेल्या परंपरेमुळे मिळविली.
 नानांचं दुसरं वैशिष्ट्य असं की, ते सतत व्यापार बदलत गेले. तसेच नानांनी व्यापारात नवनव्या खुब्या केल्या? साखर खुली करायला लागल्यानंतर नाना चहाचा व्यापार करू लागले. त्या काळात चहा सुटा मिळायचा. नानांनी त्या काळामध्ये चहाचे पाऊच तयार करून ते विकायला सुरू केले. पुढे त्याच्यामध्ये मोठी ड्यूटी सुरू झाली मग त्यांनी बॅग करायला सुरुवात केली. चहामध्ये देखील नानांचा होरा असा होता की, येत्या काळामध्ये गांधीवादाचा प्रभाव ओसरेल आणि माणसं चहा जास्त प्यायला लागतील. भविष्यकाळात भारतामध्ये मूलभूत गरज म्हणून चहासाखरेची गरज भासणार म्हणून त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. पूर्वी ते नुसते चहा विकायचे. नंतर त्यांनी ब्रँडिंग सिस्टिम आणली. ब्रँडिंग सिस्टिम म्हणजे आपला एक ब्रँड बाजारामध्ये रुजला पाहिजे आणि तो चालला पाहिजे. त्यांच्या चहाचा ‘एच. पी. गोल्ड' नावाचा ब्रँड आहे हे ‘एच. पी.' म्हणजे काय आहे? तर‘हरी पांडुरंग.' म्हणजे आपल्या वडिलांचे नाव देऊन त्यांनी एच. पी. जी. म्हणजे एच. पी. गद्रे अशा नावावर आपला बँड सुरू केला. विसाव्या शतकामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं स्मरण फार कमी मंडळी ठवे ताना दिसतात. अशा अपवादामध्ये नाना एक होते. कलकत्त्याला त्यांनी चहाची पेढी सुरू केली. त्यांनी तिथे असं पाहिलं की, इतर चहाचे व्यापारी आपला एक ब्रांड तयार करतात आणि आहे तोच माल विकतात. अशा अनेक संशोधन पद्धती त्यांनी बाजारात आणल्या.
 पुणे हे तसं ब्राह्मणांचं शहर. नानांनी त्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरात कसला उद्योग करावा? त्यांनी काही चितळ्यांची डेअरी नाही सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये ‘फिशरी' सुरू केली. नाना मासे खायचे नाही पण धंदा मात्र माशाचा केला. आता मला मोठं आश्चर्य वाटतं की मासे न खाणाऱ्या या माणसाला मासा विकता कसा येत असेल? तर त्यांचा व्यापारामध्ये ठरलेला शिरस्ता असायचा. एखाद्या माणसाला ते मॅनेजर म्हणून बसवायचे. मॅनेजरवर प्रचंड विश्वास. त्यांच्या भरवशावर धंदा करायचे.
 अनके वर्षांपासून इथल्या बसंत-बहार थिएटर्ससमोर असलेल्या पंपावर मी पेट्रोल भरतो. तिथं आमचा ओळखीचा एक मित्र आहे. त्याला मी नेहमी विचारायचो, “अरे अशोक, सगळं गांव पेट्रोलमध्ये, भेसळ करून विकतंय. तुम्ही शुद्ध पेट्रोल विकता, परवडतं कसं?' तो मला सांगतो की 'नानांनी आम्हाला प्रामाणिकपणाचं एक ब्रीद घालनू दिलले आहे. दुस-या महायुद्धातत्या काळामध्येदेखील नानांनी आपल्या पेढीचा शद्धतेचा रिवाज जपला होता. त्या काळामध्ये नाना शंभर-शंभर टैंकर रॉकेल या कोल्हापूर आणि कोकणामध्ये विकायचे. अशा काळात देखील त्यांनी कधी रॉकेलमध्ये भेसळ केली नाही किंवा फेसाचं रॉकेल विकलं नाही. ही सचोटी त्यांनी केवळ आपल्यामध्ये आणली नाही तर आपल्या नोकरांच्यामध्ये देखील रुजवलेली दिसेल.
 एखादा नोकर जर काम करत नसेल तर नानांची शिक्षा जगावेगळी असायची. ते त्याला आपल्या दुकानात नुसतं बसवून ठेवायचे, पण काम सांगायचे नाहीत. पगारही द्यायचे. तो ओळखायचा की आता आपलं इथलं क्रियाकर्म संपलेलं आहे. आपण निघून गेलेलं बरं. तो लाजून निघून जायचा.
 नानांनी व्यवसाय करताना अनेक प्रयोग केले. त्यातलाच एक भाग म्हणून नंतर ते ऑईल इंजिनच्या धंद्यात आले, केमिकलमध्ये आले, पेट्रोल व्यवसायामध्ये आले. अनेक प्रकारचे उद्योग केले. त्यांनी हे सगळं करत असताना त्यांनी कधी 'तुकारामाचं दुकान चालवलं नाही. याचा अर्थ कोणताही धंदा आतबट्यात येईल असा चालवला नाही. धंद्यातील उतारचढीचं पहायचं आणि मग काय ते ठरवायचं.
 नानांना व्यापाराची भविष्यलक्ष्यी दृष्टी होती. तशी ती त्याच्या समाजकारणात देखील होती. त्या काळामध्ये देवरूख, रत्नागिरीची अनेक मंडळी नानांना लकडा लावायची की तुम्ही आमच्या पक्षात या आणि निवडणूक लढवा. तुम्ही निवडून याल अशी आमची खात्री आहे. कारण त्या वेळी कोकणातलं असं कोणतंही गाव नव्हतं की, ज्या गावामध्ये गद्यांची बिछाईत नव्हती. ‘बिछाईत' याचा अर्थ त्यांची उधारी आणि व्यापार चालत नाही असं एकही गाव त्या काळामध्ये नव्हतं. गद्रे परिवार हा देवरूख आणि त्या परिसरामध्ये घरोघरी गेलेला परिवार होता. देवरूखमधील त्यांच्या दुकानात आजही तुम्ही कधी जाल तर पिढ्यानपिढ्या लोक देवरूखच्या त्यांच्या दुकानामध्ये सगळा सौदा घेताना दिसतील. हे जे ‘गुडविल' आहे व्यापारातलं, ते एका पिढीचं नाही तर पिढ्यान्पिढ्या कुटुंबांनी ते जपलं आहे.
 नानांचं घर म्हणजे मित्रांनो व्यापाराचं एक विद्यापीठच होतं. मला गद्रे कुटुबांमधील अनके मुलं, पुतणे, त्यांचे भाऊ असे माहीत आहते की त्यांनी प्रत्येकाला दुकान काढून दिलेलं आहे. कुणाला चिपळूणमध्ये दुकान काढून दिलं, कुणाला कराडमध्ये; कुणाला मुंबईमध्ये तर कुणाला कलकत्त्याला.
 आपला काका, पुतण्या, भाऊ घ्यायचा, त्याला व्यापाराचे प्राथमिक पाठ द्यायचे आणि त्याला स्वतत्रं करायच. विसाव्या शतकात आपली सगळी घरं मोडली, दुभंगली. नानांचं घर कधी दुभंगलेले तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांच्या घरामध्ये संयुक्त परिवाराची सगळ्यांना सामावून घेण्याची फार मोठी समावेशक वृत्ती असलेली दिसेल, असे व्यापारामध्ये घट्ट पाय रोवून उभारलेले नाना, त्यांची समाजात देखील तशीच घट्ट पकड होती.
 नानांचं जे समाजकारण आहे हे मुळात देवरूखपासून सुरू झालं. नंतर ते कोल्हापुरात आले. नाना नुसते एकटे कोल्हापुरात आले नाहीत तर त्यांनी आपल्याबरोबर अनके कार्यकर्ते आणले. आता या क्षणी देखील कोल्हापुरात एक गांधी तत्त्व प्रचार केंद्र सुरू आहे. शंकरराव सार्दळ नावाचे गुरुजी हे एक गांधी तत्त्व प्रचार केंद्र चालवायचे. तिथे डॉ. कापडी नावाचे त्यांचे एक स्नेही दवाखाना चालवायचे. नाना त्यांच्या कामाला मदत करायचे. नाना संगमेश्वर सोडून कोल्हापूरला आले ते या मित्रांना घेऊन. मग इथे ही त्यांनी अशाच प्रकारचे काम सुरू केलं. कोकणानं या कोल्हापुरला अनेक माणसं दिली. वि.स.खांडेकर देखील कोकणानं कोल्हापूरला दिलेली देणगी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टी निर्माण झाली नसती तर वि. स. खांडेकर कदाचित शिरोडा सोडून कोकण सोडून,कोल्हापूरला आले नसते.
 कोल्हापुरात असा एक काळ होता की, नाना एखाद्या सार्वजनिक संस्थेवर नाहीत अशी एकही संस्था सापडणे कठीण.मी अगदी नाव घेऊन तुम्हाला सांगेन की इथल्या रोटरी क्लबच्या स्थापनेच्या काळात नाना हे अत्यंत अभिमानाने आणि आदराने, आमंत्रित केलेले सन्मानित असे सभासद म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. अलीकडच्या काळामध्ये रोटरीच्या संदर्भामध्ये एक उदाहरण असं सांगितलं जातं. जे आर.डी.टाटा त्यांच्या पूर्वायुष्यात दर बुधवारी पाच वाजता ते जगातल्या कुठल्यातरी रोटरी क्लबमध्ये असायचे. नाना कोल्हापुरात आहते आणि बुधवारी रोटरी क्लबमध्ये नाहीत, असं कधी झालं नाही. रोटरी क्लबमध्ये असलेल्या मंडळींना माहीत आहे की, त्यांच्या उपस्थितीत ‘परसेंटेज' असतं. त्यांच्याबरोबर काही काळ रोटरी क्लबमध्ये एकत्र काम केल्याचे मला आठवते. नाना अत्यंत नियमाने रोटरी क्लबमध्ये जायचे. त्यांच्यामध्ये वक्तशीरपणा होता. कोणत्याही सभेला नाना वेळेवर हजर! कोणत्याही समारंभाला वेळेवर हजर! माझ्या दृष्टीने त्यांच्यावर गांधीवादाचा फार मोठा पगडा असल्याशिवाय हे शक्य नाही. गांधीजींची एक आठवण अशी सांगितली जाते की, गांधीजींनी एक गृहस्थांना वेळ दिलेली होती आणि ते गृहस्थ वेळेवर आले नाहीत. गांधीजींनी आपलं काम सुरू केलं आणि पाच मिनिटांत ते गृहस्थ आले आणि चाचरत गांधीजींना म्हणाले की, ‘क्षमा करा, मला पाच मिनिटे वेळ झालेला आहे. यावर गांधीजी म्हणाले, 'आता तुम्हाला पाच तास थांबायला लागेल. कारण पुढचे तुमच्या वेळेनंतरचे पाच तासाचे माझे कार्यक्रम ठरलेले आहते. आणि त्या गृहस्थांना गांधीजींनी शिक्षा म्हणून पाच तास थांबायला लावलं होतं. नानांनी गांधीजींसारखी कुणाला शिक्षा दिली नाही. उलट ‘आधी केले आणि मग सांगितले' असा एक वस्तुपाठ आपल्या सगळ्या चरित्रातून कोल्हापूरमध्ये निर्माण केला.
 रोटरी क्लबबरोबरच नानांनी कोल्हापूर जनता बँकेची मुहर्तमेढ रोवली. या कोल्हापूर जनता बँकेचा लौकिक असा की, नाना अगदी स्थापनेपासून मृत्यूपर्यंत या बँकेचे संचालक होते. काही काळ अध्यक्ष पण होते. त्या काळामध्ये असा एक रिवाज असायचा. निवडणुकीत पॅनल असायचं. निवडणुका लागल्या की मतदान ठरलेलं असायच. त्यामध्ये सगळ्यात जास्त मत घेऊन निवडून येणारे नानाच असायचे. लाके फक्त म्हणायचे की ‘किती लीड' घेतलं नानांनी? नाना निवडून येणार हे ठरलेलंच असायचं. त्या काळामध्ये जनता बँकेचे सगळे संचालक प्रचाराला जेव्हा जायचे तेव्हा नानांना घेतल्याशिवाय ते कधीच बाहेर पडायचे नाहीत. नाना ही त्या सगळ्या लोकांची अशी एक ढाल होती की, त्यांच्या नावाने कोल्हापुरात जोगवा मागितला की कधीही आपली झोळी रिकामी राहणार नाही, असा एक प्रचर्ड विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. जनता बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या काळामध्ये मी जनता बँकेशी संबंधित होतो. त्या काळामध्ये नानांनी जनता बँकेला असं सांगितलं की, आपला रौप्यमहोत्सव आहे ना? आपण काही पैसे एकत्र करू आणि ट्रस्ट करू. त्या ट्रस्टवर कोल्हापुरातल्या काही लोकांना घेतलेलं होतं. त्या सगळ्या लोकांत मीच लहान मनुष्य होतो आणि माझं नाव नानांनी आणि आर. जे. शहांनी सुचवल्याचं मला आठवतं. नानांना माणसांची चांगली पारख होती. कुणाकडून काय काम करून घ्यावं हे नानांना पुरेपूर माहीत असायचं.
 जनता बँकेशी माझा संबंध निर्माण झाला त्या काळातील एक आठवण सांगण्यासारखी आहे. मी कोल्हापुरात आलो त्या वेळी माझी कोल्हापुरात अजिबात ओळख नव्हती. मी इथल्या आंतरभारतीमध्ये साधा शिक्षक होतो आणि मला सायकल घ्यायची होती. त्याकाळामध्ये शिक्षकांना चारशे ऐंशी पगार असायचा. प्रत्यक्षात मात्र ऐंशी रुपयचे दिले जायचे आणि चारशे रुपयांवर सही घेतली जायची. त्याचा एक मोठा इतिहास आहे. ऐंशी रुपयामध्ये मी शिकवत होतो. सायकलची किंमत पाचशे रुपये होती. त्या काळामध्ये सगळ्यात कमी शेअर्सची किंमत असलेली बँक-जनता बँकच होती. मला असा शोध लागला की पंचवीस रुपयांचा शेअर जर मिळवला तर पाचशे रुपये कर्ज मिळतं. माझ्या आयुष्यातलं पहिलं कर्ज मी जनता बँकेचं काढलं आणि ते पाचशे रुपये होतं. मला असं कळालं होतं की, बाकीचे संचालक ओळखी-पाळखीच्या लोकांना शेअर्स देतात. मी म्हटलं, बघूया तरी परीक्षा घेऊन आणि मी त्यांच्या स्टेशन रोडवरच्या दुकानात गेलो. संध्याकाळी पाच-सहाची वेळ. नानांची दुकानात भेटायची वेळ. मी गेलो आणि सांगितलं की 'मी आंतरभारतीमध्ये शिक्षक आहे. मला सायकल खरेदी करायची आहे. पाचशे रुपयांचे कर्ज पाहिजे तुम्ही मला ते द्या.' ते म्हणाले, “अरे, आधी शेअर घ्यायला लागतो, आधी कर्ज नाही मिळत!' पुढे म्हणाले, “कुठल्या शाळेमध्ये? आंतरभारती म्हणजे खांडेकरांची का? तुला दिला शेअर.' म्हणजे माणसाची ऐपत, माणसांची क्रेडिट जगामध्ये कशी असते पहा. मी त्या आंतरभारतीमध्ये होतो म्हणून मला शेअर्स मिळाला. नानांची माणसांची पारख करण्याची आपली अशी पद्धत होती. पुढे याच जनता बँकेने मला नंतरच्या काळामध्ये कसलंही क्रेडिट नसताना चांगलं एक लाख रुपयांचे कर्ज दिलं. माझं पहिलं कर्ज पाचशे रुपये आणि शेवटचं कर्ज एक लाख रुपये. मला तो प्रसंग अजूनही आठवतो. मी जागा विकत घेत असताना नानांच्याकडे गेलो आणि म्हटलं की मला पन्नास हजार रुपये कर्ज पाहिजे. नाना म्हणाले, 'तुझ्याकडे ठेवायला काय आहे,' मला त्या वेळी कळालं की ठेवायला कायतरी लागतं (म्हणजे दागिने, जमीन जुमला, सातबारा, प्रॉपर्टी कार्ड) मी असा फाटका मनुष्य. तुम्हाला खरं वाटणार नाही. नानांनी त्या वेळी श्री. शिंदे म्हणून मॅनेजर होते. त्यांना सांगितलं की, ‘मी सही करतोय, माझंच जामीन म्हणून नाव टाका याला.' आणि नानांनी मला जागा घेण्यासाठी त्या काळात पन्नास हजार रुपये दिले. म्हणून मी या कोल्हापुरामध्ये अनाथाचा सनाथ झालो. असा एक मोठा मनुष्य मला भेटला आणि त्यामुळे या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बोलण्याचा सार्थ गौरव मला प्राप्त होतो आहे, याचा मला मोठा अभिमान वाटतो.
 त्या वेळी रत्नाप्पा आण्णांची एक संस्था होती. तिचं कॉमर्स कॉलेज इथं चालू होतं ते लॉ कॉलेजही चालवायचे. तिथे रत्नाप्पा आण्णांनी कोल्हापुरातील दोन माणसं त्यांच्या ट्रस्टवर-कौन्सिल ऑफ एज्युकेशनमध्ये निवडली होती. शं. गो. दाभोळकर वारल्यानंतरची ही गोष्ट. त्यामध्ये एक बापू होते आणि दुसरे नाना. याच रहस्य असं होतं की त्या काळामध्ये आण्णांना अशी माणसं पाहिजे होती की जी सत्तापिपासू असणार नाहीत, प्रामाणिक असतील आणि एका पैशाला देखील शिवणार नाहीत. अशा दोघांच्यामध्ये नानांचा समावेश होता. ही दोन्ही माणसं कोकणातून आलेली आणि सचोटी पाळणारी होती म्हणून आण्णांनी निवडली होती.
 नाना कोणत्याही संस्थेतल्या भांडणात कधी असायचे नाहीत. भांडणं सुरू झालं की नानांची एक ठरलेली पद्धत मला चांगली आठवते. वादावादी सुरू झाली की, ते म्हणायचे, ‘मी निघालो, मला वळे झाला आहे. त्याचा अर्थ असा असायचा की तुमचं तुम्ही भांडत बसा, माझा मी निघालो. कुणाच्या भांडणात ते पडायचे नाहीत. भांडण विकोपाला गेले की ते नानांच्याकडे जायचं. बाबूराव धारवाडे यांनी एक छान आठवण त्या काळामध्ये सांगितली होती. त्यातून सिद्ध होते की मनुष्य म्हणून नाना किती मोठे होते! त्या काळामध्ये बाबूराव धारवाडे हे ‘जनसारथी' चालवत होते. जनसेनेचा त्या काळात कोल्हापुरात फार मोठा ‘दारारा' होता. मी ‘दरारा शब्द जाणीवपूर्वक वापरतो.
 कारण ती सभा मला माहित आहे. त्या काळामध्ये बाबूराव धारवाडेंच्या जनसेनेने कोल्हापुरामध्ये महागाईविरोधी मोर्चा उघडलेला होता. आणि असं सांगितलं होतं की, चहा अमुक पैशालाच हॉटेलमध्ये मिळाला पाहिजे. मटण अमुक दराने विकलं गेलं पाहिजे. कोल्हापुरात असल्याने मटणाचा आग्रह जास्त! त्या वेळी व्यापा-यांचे प्रतिनिधित्व करणारी जी संस्था होती, त्याचे नाना पदाधिकारी होते. व्यापारी हे हटून बसलेले की अमूक दर झाल्याशिवाय ही बैठक संपणार नाही आणि व्यापारी काही रुपये दोन रुपये कमी करायला तयार नव्हते. त्या वेळी नाना त्या सभेमध्ये उभे राहिले.
 कलेक्टर कचेरीमध्ये अत्यतं तणावाचे वातावरण, हमरीतुमरीचं वातावरण. राजकीय मंडळी काही मागे घ्यायला तयार नाहीत. व्यापारी मंडळी काही तसूभर हलायला तयार नाहीत. नानांनी सगळा नूर बघितला आणि उभे राहिले. त्या वेळी त्यांनी व्यापा-यांना जे सांगितलं ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले, 'अरे, आपण पिढ्यानपिढ्या व्यापार करतो आणि खरं लोकांना माहीत नाही की आपण किती कमावतो ते. आपल्या मागील पिढ्यांनी भरपूर कमावलंय. आपणही भरपूर कमावलंय. असं करा, ते जे म्हणतात ना त्या दराने विका, जरा चार तास जादा कष्ट करा आणि रुपये दोन रुपये कमी पडतील ते मिळवा. त्या काळामध्ये शहरात नानांच्या सत्चरित्राची अशी एक जादू होती की, नानांनी सांगितल्यावर ते प्रमाण असायचं. मग ते सार्वजनिक ठिकाण असले, संस्थात्मक बैठक असेल, किंवा एखादा उपक्रम असले. नानांनी सांगितलं की तो आदेश मानला जायचा. बाबूराव धारवाड्यानं त्या काळामध्ये राजकीय कार्यकर्ते म्हणून मान्यता देण्याचं काम ज्या सभेनं केलं त्या मान्यतेमध्ये नानांचा सिंहाचा वाटा आहे आणि बहुतेक त्याचीच उतराई म्हणून बाबूरावजी हा नाना गद्रे यांच्या स्मृतिदिनाचा उपक्रम इतकी इतकी वर्षे करत असावेत. हा देखील एक वस्तुपाठ नानांनीच त्यांना दिला असावा अशी माझी धारणा आहे.
 आपण कोल्हापूरमध्ये जी महालक्ष्मी धर्मशाळा' पाहतो ती नानांच्या कार्यकाळातील आहे. महालक्ष्मी धर्मशाळेच्या उभारणीच्या त्या काळामध्ये सिमेंटची टंचाई होती. पण नाना कलेक्टरांच्याकडे जायचे आणि कलेक्टर अगदी डोळे झाकून नानांना पाहिजे तेवढे सिमेंट द्यायचे आणि सळईच्या रेशनवर ही सही करायचे. त्या काळामध्ये असा एक प्रघात होता. नाना आणि बापू गाडीमध्ये बसलेले असायचे.
 त्यांच्या गाड्या दुकानासमोर थांबायच्या आणि बाबूराव धारवाडे चंद्रकांत पाटगावकर अशी कार्यकर्ती मंडली सांगायची की नाना आणि बापू गाडीत आहते आणि हे पावती पुस्तक आहे. लोकांनी निमूटपणे पावत्या फाडायच्या असा रिवाज कोल्हापूरमध्ये होता. त्याचं कारण असं की, कोल्हापूरातल्या सगळ्या समाजाला हे माहीत होतं की ही मंडळी पहिल्यांदा स्वतः पैसे घालतात आणि मग दुस-यांच्याकडे मागायला जातात.
 त्या ‘सामना' सिनेमामध्ये ‘उरलेल्याचं आपण बघू' तसा हा व्यवहार नव्हता. तुम्ही 'सामना' सिनेमा आठवा. त्याच्यामध्ये जो नेता आहे तो पुतळ्याला पैसे गोळा करतो आणि पुतळ्याच्या खर्चापेक्षा जास्त पैसे गोळा होतात. एक प्रामाणिक कार्यकर्ता त्या नेत्याला विचारतो की, “अहो, ते पैसे थोडे उरलेले आहेत. यावर नेता म्हणतो, 'ते तुला कळणार नाही. उरलेल्या पैशाचं नंतर आपण बघू. नंतर बघू म्हणजे माझं मी बघतो. असा व्यवहार कधी नानांनी त्या काळामध्ये केला नव्हता.
 नाना आणि प्रा. चंद्रकांत पाटगावकर सर त्या वेळच्या 'इंडियन रेडक्रॉस'मध्ये काम करीत. त्या काळात मी त्यांच्या संपर्कात आलो. पासष्ठच्या दरम्यान चीन आणि पाकिस्तानचं फार मोठे युद्ध झालं होतं. बासष्ठ आणि पासष्ठला. त्यामुळे नेहरूंचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं. त्या काळामध्ये सैनिकांना इथून ब्लँकेटस् जायची. धान्य जायचं. जी मंडळी शहीद व्हायची त्यांच्या घरोघरी जाऊन पैसे देण्याचे काम नाना निधी उभारून करायचे. जमलेला सगळा निधी युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांपर्यंत कसा जाईल याचा एक वस्तुपाठ नानांनी त्या काळामध्ये निर्माण केलेला होता. त्या रेडक्रॉसमुळे आज एक मतिमंदाची शाळा सुरू आहे. ब्लड बँकरोटरी क्लबने सुरू केलेली असली तरी पहिल्या काळामध्ये या रेडक्रॉसने तिच्या उभारणीत फार मोठी मदत केलेली तुम्हाला दिसेल.
 नानांकडे एक संस्थात्मक उदारपण होतं. एखादी संस्था उभारली तर ते कधी ईर्षा म्हणून पाहायचे नाहीत. नानांचे जितके मित्र रोटरी क्लबमध्ये होते, तितकेच मित्र लायन्स क्लबमध्ये होते. नानांचे दोन्हीकडे छान येणंजाणं असायचं. ते नानाच करू जाणे.कोल्हापूरमध्ये ‘अनाथाश्रम' आणि ‘रिमांड होम' नावाच्या ज्या दोन संस्था होत्या, त्याचे ते अगदी सुरुवातीपासूनचे आश्रयदाते होते. हा मनुष्य किती मोठा होता त्याचा एक चांगला प्रसंग मला आठवतो... माझ्या पंढरपूरच्या बालकाश्रमाचा शताब्दी महोत्सव १९८६ साली सुरू होता आणि मी कोल्हापुरात निधी संकलनासाठी आलो होतो. त्या वेळी पंढरपूर बालकाश्रमाला ओळखणारी फार कमी मंडळी कोल्हापूरमध्ये होती. त्यामध्ये नाना एक होते. आम्ही त्या दिवशी कोल्हापूरमध्ये भरपूर फिरलो. पण अवघे पाचशे रुपये आम्हाला जमवता आले. त्या वेळी पाच हजार रुपये आम्हास जमवायचे होते. शेवटी संध्याकाळी आम्ही नानांच्याकडे गेलो. नानांनी बालकाश्रमाची विचारपूस केली. मग आम्ही सांगितलं की, आम्हाला पाच हजार रुपये कोल्हापुरातून न्यायचे होते आणि पाचशेच रुपये जमलेले आहेत. नाना म्हणाले, 'मी तुम्हाला पाचशे रुपये देतो आणि उद्या तुम्ही या. आपण एक चार ठिकाणी जाऊ आणि बघू काय जमतात ते. दुसऱ्या दिवशी आम्ही नानांच्याबरोबर फिरलो आणि आम्हाला सहा हजार रुपये मिळाले. आधी एक हजार रुपये मिळाले होते. म्हणजे पाचाचे सात करण्याची नानांची जी एक आचरणशुद्धता होती ती आपण सगळ्यांनी अनुकरण करण्यासारखी आहे.
 नानांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये जे काही गुण मला प्रकर्षाने दिसून येतात ते गुण आज मला परत अशासाठी आठवावे वाटतात की, आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. अठरा वर्षांनंतर जेव्हा नानांचं आपण स्मरण करतो तेव्हा ते गुण जवळजवळ इतिहासजमा झाल्याचे लक्षात येतात. नाना मोठे उदार होते असं सगळे लाके सांगतात. दहा-दहा पैशांनी एके काळी त्यांनी कोल्हापुरात वीस हजार रुपये जमा केले होते. आज तुम्ही कोल्हापुरात जा आणि दहा- दहा पैशांनी वीस हजार जमवा रुपये तुमच्या लक्षात येईल की ते किती कठिण असते. काळ बदलतो तशी वृत्ती बदलते. काही-काही गुण तर इतिहासजमाच होतात. नानांच्यामधले कितीतरी गुण आज आठरा वर्षांमध्ये... अवघ्या एका पिढीमध्ये तुम्हाला इतिहासजमा झालेले दिसतील.
 नानांच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट अशी होती की ते मितभाषी होते. फार कमी बोलायचे. पण त्या शब्दामध्ये कुणाला काही लागणारं नसायचं. नानांचं कुठं भांडण झालंय, नानांचे कुठे मतभेद झालेत अशी एकही संस्था तुम्हाला मिळणार नाही. नानांना कुणी वैरी आहे असं कधी झालं नाही. कोल्हापूरातच नव्हे, कुठंही ते अजातशत्रू मनुष्य होते. बाबूराव धारवाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांचा जो सत्कार केलेला होता त्याचं वर्णन त्या वेळी वर्तमानपत्रात आलं होतं की, 'नाना उभे होते आणि नानांच्या टोपीपयर्तं हारांचा ढीग गेलेला होता. सहा फूट हारांचा ढीग ..त्यामाणसानं या कोल्हापुरात हा सन्मान मिळविला... कोल्हापुरामध्ये नानासारख्या ब्राह्मण जातीच्या माणसाने असा लौकिक मिळवणं यामध्ये नानांचा जसा मोठेपणा आहे, तसा कोल्हापूरचा देखील उदारपणा आहे. नानांनी आपल्या आयुष्यामध्ये जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सतत मनुष्य धर्म पाळला. असा मनुष्यव्यवहार आता अत्यंत दुर्मीळ झालेला आहे. आज आपण सगळ्यांनी अठरा वर्षांनंतर नानांना अशासाठी आठवत राहिलं पाहिजे की, नानांच्या रूपाने त्यांच्या जीवन आणि कार्याच्या रूपातून जे सद्गुण आपल्याला दिसून येतात, त्या सद्गुणांचे उदात्तीकरण, त्या सद्गुणांचा भूमितीच्या पटीने आपल्यात विकास होण्याची आज गरज आहे. नानांचं सगळं जीवन बघत असताना मला जे दिसतं ते हे|
 नाना गुणांचा गुणाकार करायचे आणि दोषांचा भागाकार करायचे. अगदी एका वाक्यात नाना कसे होते? असं जर कुणी मला विचारलं तर मी सांगेन नानांच्या व्यक्तिमत्वामध्ये गुणांचा गुणाकार करायचा मोठा गुण होता. उदार वृत्ती ज्याला आम्ही हिंदीमध्ये, कद्रदानी म्हणतो ती नानांच्यामध्ये होती. कार्यकत्र्यांचं मोहाळे त्योच्या मागं असायचं. एखादा वाईट मनुष्य असेल तर त्याचा दोष मागे टाकायचा आणि दोष वजा करून माणसाला स्वीकारण्याचा एक फार मोठा उमदेपणा नानांच्यामध्ये होता. नानांचं सगळं जीवन राजकारणमुक्त व समाजकारणयुक्त होतं. ते सतत माणुसकीला साद घालणारं होतं. एकविसाव्या शतकाची मागणीच मुळी सद्गुण राहणार असल्याने अशा निष्काम कर्मयोग्याच्या जीवन व कार्याची स्मृती आपण जपायला हवी. समाजशील साहित्यिक : वि. स. खांडेकर

 भारतीय साहित्यावर मराठी भाषेची नादमुद्रा उठविणारे पहिले मराठी साहित्यिक म्हणून वि. स. खांडेकरांना ओळखलं जातं. विसाव्या शतकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लाके शाही या पचं शील तत्त्वांना बांधील राहन त्यांनी लेखन केले. धर्मांधता, जातिभदे, स्त्री-पुरुष असमानता, अधं श्रद्धा, दारिद्र्य, अज्ञान इ. विसाव्या शतकातील प्रश्नांना प्रमाण मानून त्यांनी त्यांची उकल साहित्याद्वारे प्रभावीपणे केली. यासाठी वि. स. खांडेकर हे समाजशील साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कथा, कादंबरी, रूपक कथा, लघुनिबंध, नाटक, काव्य, पत्र, समीक्षा, अनुवाद, संपादन, व्यक्तिचित्रण, पटकथा लेखन इ. साहित्यप्रकारात केवळ भरच घातली असे नव्हे तर त्यांनी रूपक कथा, लघुनिबंध, अलंकारांचे सौंदर्य व शैलीचे सुभाषित मार्दव विकसित केले. या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या समग्र साहित्यास सामाजिक चिंतनाचे रूप लाभले. पिढ्या घडवण्याचे कार्य करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत वि. स. खांडेकरांचा समावशे होतो तो या यागे दानामुळेच. त्यांनी आपल्या साहित्यातून रामायण, महाभारत, पचं तत्रं , पुराण इ.मधील मिथकांचा द्रष्टा उपयोग करून घेतला. इतकेच नाही तर त्यांचा समकालीन परिस्थितीशी अन्वय लावून नवा अर्थ सांगितला. 'ययाति' कादंबरी हे त्याचे बोलके उदाहरण होय. यामुळे वि. स. खांडेकरांचे साहित्य केवळ मराठी व महाराष्ट्रीय न राहता ते भारतीय आणि वैश्विक बनले. या त्यांच्या साहित्याच्या अभिजात कसोटी व कौशल्यामुळेच त्यांच्या साहित्य व चित्रपटांचे अनुवाद हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये झाले. गुजराती, तमिळ, मल्याळम भाषेत तर त्यांचे समग्र साहित्य अनुवादित झाल्याने त्या भाषिकांना खांडेकर आपल्याच भाषेतील लेखक वाटतात. मराठी भाषा व साहित्यास ज्ञानपीठ पारितोषिक पहिल्यांदा मिळवून देऊन खांडेकरांनी आपल्या साहित्याचं राष्ट्रीयत्व सिद्ध केलं. अशा खांडेकरांचं समग्र, सुबोध जीवन चरित्र ही मराठी साहित्यातील पोकळी होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न काळाची गरज होती. हा लेख म्हणजे खांडेकर व्यक्ती आणि वाङ्मयाचा अन्वयार्थ होय.
 बळवंत खांडेकर हे खांडेकर कुटुंबाचे ज्ञात पूर्वज होत. त्यांचे एक भाऊही होते. विष्णुशास्त्री त्यांचे नाव. हे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे. तिथल्या भटवाडीत आजही या कुटुंबाच्या रहिवासाच्या पाऊलखुणा स्थावराच्या रूपात साक्ष देतात. पैकी बळवंतराव खांडेकर हे वकिली करण्यासाठी म्हणून कर्नाटकातील हुबळी येथे गेले व तेथे स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या. मुलाचे नाव आत्माराम. तो १५-१६ वर्षांचा असताना कालॅऱ्याने वडिलांचे म्हणजे बळवतं रावांचे निधन झाले. व्यवसायाशिवाय तिथे या कुटुंबाची मिळकत नसल्याने आत्माराम आपल्यासह दोन अनाथ बहिणींना घेऊन पैतृक गावी सावंतवाडीस आला. तिथे परतल्यावर आपल्या काकांशी म्हणजे विष्णुशास्त्रींशी संपत्ती हक्कावरून मतभेद झाले. तो भरल्या पानावरून उठला तो तडक सांगलीस आला. त्या काळी सांगली, कोल्हापूर या तत्कालीन घाटमाथ्यावर परूळेकर, बावडेकरांसारखी। कुटुंबे कोकणातून येऊन स्थिरावली होती. कोकणातून येणा-यांचे ते आधार बनत. इंग्रजी चांगलं असणा-यांना लगेच नोक-या मिळत. कोल्हापूर, सांगली, मिरज, कुरुंदवाड, जमखंडी इ. संस्थानिकांच्या राजधानीत त्या वेळी पोलिटिकल एजंटस्च्या कचेच्या असत. त्यांना सनदी कामासाठी मुन्सफ लागायचे. आत्माराम सांगलीस येऊन ओळखीच्या आधारावर शिकला, वकील झाला व मुन्सफ बनला.
 १८५७ च्या बंडानंतरचा तो काळ होता. सांगली संस्थानात तात्यासाहेब पटवर्धनांचे राज्य होतं. बाबाकाका माईणकर हे दरबारी पुराणिक होते. ते गणपतीच्या देवळालगतच रहात. त्यांची सर्वांत धाकटी कन्या होती सुंदरी. ती उपवर होताच संस्थानातील आत्मारामपतं या उमद्या मन्सुफाचं स्थळ योग्य वाटून त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर वधूचे नाव 'रमाबाई' ठेवण्यात आले. आत्मारामपतं व रमाबाई यांचं कुटुंब सुखावलं. त्यांना तीन मुलं झाली. बळवंत, गणेश आणि शंकर. पैकी गणेश आत्माराम खांडेकर वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या काकांना-सखाराम खांडेकर यांना सावंतवाडीस दत्तक गेल्याने विष्णू सखाराम खांडेकर झाला. तो दत्तक पुत्र म्हणजचे मराठीतील सुविख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर होय.
 वि. स. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ रोजी सांगली येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपतीच्या देवळातच त्यांचं घर होतं. तिथं जन्म झाला म्हणून त्यांचं नाव गणेश ठेवलं गेलं. ते आपल्या वडिलांना दादा म्हणत. ते मुन्सफ होते. नोकरीत फिरती असायची. त्या वेळी सांगलीत आलेल्या एका अॅडमिनिस्ट्रेटरशी त्यांचं बिनसलं. मुन्सफाची नोकरी सोडून ते सब-रजिस्ट्रार झाले. त्यांचं घर सुखवस्तू होतं. कपडा-लत्ता, खेळणी, खाऊ मिळाला नाही, असं कधी झालं नाही. घरी मोलकरीण, स्वयंपाकी होती. वडिलांची थोरा-मोठ्यांत ऊठ-बस होती. त्यांची मुलांवर माया होती.
 गणेश शेजारच्याच मंडईमागील शाळेत जाऊ लागला. तिसरीत गेला नि त्याचा खोडकरपणा कमी झाला. तो अभ्यास करू लागला. चौथीत दुस-या क्रमांकाची तीन रुपयांची शिष्यवृत्ती पटकावून त्यानं आपल्या बुद्धीची चुणूक दाखविली. त्याला कीर्तनपुराणाचा नाद होता. हा देवळात घर असल्याचा परिणाम. तो बारा-तेरा वर्षांचा झाला असेल (सन १९११), त्याला वाचन व क्रिकेटचा छंद जडला. घरी वडील आजारी असत. त्यांची शुश्रूषा तो मनापासून करायचा. या आजारातच वडिलांचं निधन ११ ऑक्टोबर, १९११ला झालं. पोरकेपणातून त्याला नाटकाचं वेड लागलं. त्या काळी सांगली संस्थानात नाटकाचं मोठं वेड होतं. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, खाडिलकरांसारख्या नाटककारांची ही नगरी महाराष्ट्राची नाट्य पंढरीच मानली जायची. 'शारदा', ‘भाऊबदं की’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यू' सारखी नाटकं गणेशनी बालपणीच पाहिली. 'शापसंभ्रम', 'शारदा'मधील पदे त्याला तोंडपाठ होती. एकदा ती देवलांना म्हणून दाखवून त्यानं त्यांची शाबासकीही मिळविली होती.
 गणेश पंधरा वर्षांचा असेल. अभ्यासात हुशार तर होताच पण अभ्यासापेक्षा वाचनाचे वेड मोठे. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी', दाभोळकर ग्रंथमालेतील स्पेन्सर, मिल इ., हरिभाऊ आपटे यांच्या कादंब-या, शनिमाहात्म्य, नवनीत, वामन पंडित, मोरोपंत यांचे काव्य केशवसुतांची कविता, त्यानं अल्पवयात वाचल्या. वाचनाची त्याची भूक बकासुरासारखी होती. त्याचं वाचन वावटळीसारखं होतं. दैनिकं,नियतकालिकांचं वाचनही नियमित होतं. चतुरस्र वाचनामुळे लेखनाची ऊर्मी होणे स्वाभाविक होते.
 सन १९०७ मध्ये सांगली हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत प्रवेश घेतल्यापासून त्याच्या शालेय प्रगतीत उत्तरोत्तर वाढच होत गेली. शाळेतील शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगल गुरुजी यांचा त्याच्यावर लोभ होता नि वरदहस्तही! मॅट्रिकमध्ये असताना रा. ना. जोशी, गो. वा. केळकर, ब. रा. कुलकर्णी हे त्याचे वर्गमित्र होते. त्या वेळी सांगलीला मॅट्रिकचे केंद्र नसल्याने आपल्या वर्गसोबत्यांबरोबर त्याने बेळगाव केंद्र निवडले. त्याचे चुलत मामा वासूनान त्या वेळी बेळगाव शहापूर संस्थानात होते. ते केंद्र निवडण्याचं हेही एक कारण होतं.
 त्या वेळी शाळा जानेवारीत सुरू होतं. परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये लागत. डिसेंबर १९१३ च्या शेवटच्या आठवड्याला मॅट्रिकचा निकाल लागला. गणेश आत्माराम खांडेकर अहमदाबाद, बेळगाव, मुंबई केंद्रामधून उत्तीर्ण विद्याथ्यार्तं बाराव्या क्रमांकाने अव्वल आला. त्याला ५७५ पैकी ४0३ गुण मिळाले होते. तो मॅट्रिकला जाताच घरच्या मामांनी त्याला परीक्षा होताच पोस्टात चिकटवायची खलबतं सुरू केली असल्याने उच्च शिक्षणाबद्दल इच्छा असूनही तो साशंकच असायचा. पण मोठा भाऊ बळवंत त्याच्यापूर्वी मॅट्रिक होऊन पुण्याच्या फर्गुसन महाविद्यालयात शिकण्यासाठी गेला असल्याने आशा होती. मॅट्रिकचे वर्ष गणशेच्या दृष्टीने धकाधकीचे होते. वडिलांच्या जाण्याने आजोबा, मामांवर सारी भिस्त होती, दुपारचे जेवण देवळात असायचे. आजोबांच्या बदली जेवणाने शाळेला उशीर व्हायचा. रात्री कधी कधी पोह्यावरच निभावायला लागायचं. वडिलांच्या जाण्याने आलेलं पोरकंपण, फाटके कपडे, फी न मिळणं, पुस्तके दुरापास्त. गणेश घरी मदत व्हावी म्हणून संस्कृत गणिताच्या शिकवण्या करायचा. रुपये-आठ आणे मिळकत पण मोठी वाटायचे ते दिवस. अशा दिव्यातून याचं मॅट्रिकला मिळालेलं यश वाखाणण्यासारखं होतं. दुःख विसरायचा एकच उपाय होतावाचन आणि अभ्यास. त्यातून वेळ मिळाला की कृष्णाकाठी जाऊन एकांत संवाद अनुभवायचा.
 निकाल लागला तेव्हा गणशे वासूनानांकडे बेळगावला होता. सागंलीहून वकील झालेल्या चुलत मामा विनुदादाचं पत्र आलं. त्यात फर्गसनला पाठवायची आनंदाची बातमी होती. त्या पत्राने गणेशच्या मनात स्वप्नांची नवी पहाट अनेक मनोरथं घेऊन आली. डॉक्टर, प्राध्यापक होण्याची स्वप्न तो रचू लागला. या स्वप्नरंजनात त्यानं सांगली केव्हा गाठली ते त्याचं त्यालाही कळलं नाही. सांगलीत येताच तो पुण्याच्या तयारीला लागला.
 जानेवारी १९१४ मध्ये गणशे नी प्रथम वर्षांसाठी प्रवेश घेतला. पुणे यातील शालकूर बोळात असलेल्या सांगलीकर वाड्यात त्याचा मुक्काम होता. कॉलेजात गेल्यावर सलामीलाच त्याने ‘उषास्वप्न'वर आधारित ‘स्वप्नसंगम' महाकाव्य लिहायला घेतले. हा त्याचा लेखनाचा पहिला प्रयत्न होता. षोडषवर्षीय स्वप्नांच्या धुंदीचे ते दिवस होते. कॉलेजला आल्यावर इंग्रजी प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धनांच्या प्रभावामुळे मराठी वाचनाची जागा इंग्रजीने घेतली. वाढत्या वाचनाने चाळिशीची देणगी दिली. चष्मा आला. बालपणापासून गणेशची दृष्टी तशी अधूच होती. उजवा-१० तर डावा- १२ नंबरचा चष्मा. त्याने गणेशला स्कॉलर बनवले खरे! Saint's Agne's Eve, Golden Treasury, Deserted Village सारख्या रचनांनी त्याचे भावविश्व बदलले. राम गणेश गडकरी यांचे ‘प्रेमसंन्यास' आणि कोल्हटकरांच्या ‘मतिविकार' नाटकांनी त्याच्यावर गारुड केले.
 या काळात मित्र बन्याबापू कमतनूरकरांमुळे त्याचा राम गणशे गडकरी यांच्याशी परिचय झाला. परिचयाचं रूपांतर पुढे स्नेहात झालं. रोज साहित्यिकांचा सहवास, साहित्यिक चर्चा, वाद-विवाद यामुळे युवक खांडेकरांची साहित्यिक जाण प्रगल्भ होत गेली. गडकरी त्यांना वाचनाचे मार्गदर्शन करीत. गडक-यांच्या सांगण्यावरूनच खांडेकरांनी या काळात कवी गिरीश, अरविंद, बालकवी यांची काव्ये वाचली. प्रेमशोधन मानापमानसारखी नाटकं वाचून, गडक-यांबरोबर ती किर्लोस्कर थिएटरमध्ये पाहून वाद झडणे आता नित्याचेच झालेले. इब्सन, चेकॉव्ह, पिरांदेलो, युजेन, ओनील, टेनेसी विलियम, आर्थर मिलर प्रभृतींच्या साहित्य कृतींची पारायणे याच धुंदीच्या दिवसातील. Every man's Library सिरिजमधील अनेक ग्रंथांच्या वाचनाचा हा काळ. तिकडे लोकमान्य टिळकांचा केसरी, मराठासारखी वृत्तपत्रे राजकीय व सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करीत होती. खांडेकरांसाठी हा काळ वाचन व विचाराच्या मशागतीचा होता. या काळात खांडेकर कविता करीत. गडक-यांनी त्यांना केशवसुतांच्या कविता वाचण्यास दिल्या. त्यामुळे खांडेकरांना आपल्या कवितेचे तोकडेपण लक्षात आलं. त्यांनी गडक-यांच्या सांगण्यावरून आपल्या कविता जाळून टाकल्या व नवलेखन सुरू केले. सन १९१५ला शैक्षणिक वर्षामध्ये बदल करून जानेवारी डिसेंबर ऐवजी ते जून ते एप्रिल करण्यात आले. त्यामुळे सहा महिन्याची सुट्टी मिळाली. या सुट्टीचा फायदा घेऊन खांडेकरांनी रमणीरत्न' नाटक रचले. सांगलीतील या सुट्टीच्या काळात वासुदेव शास्त्री खरे यांना मिरजेत त्यांच्या घरी त्या नाटकाचे यथासांग वाचनही झाले. खरेशास्त्रींचा यावरचा अभिप्राय बोलका होता. ते म्हणाले, 'पोरा, तुझे वय लहान आहे. हे नाटक तू लिहिलेस यावर नाटकवाले विश्वास ठेवणार नाहीत.' या नाटकावर कोल्हटकर, गडकरी यांच्या कोट्यांचा प्रभाव स्पष्ट होता. ते लेखन म्हणजे पूर्वसुरींचं अंधानुकरण होतं. हे नाटक लिहिण्यामागे खांडेकरांचं एक भाबडं स्वप्न होतं. नाटक एखाद्या कंपनीला विकायचं व कॉलेज शिक्षणासाठी पैसे जमवायचे. पण खरेशास्त्रींच्यावरील अभिप्रायामुळे ते बासनात गेले.
 जून १९१५ ला खांडेकरांनी इंटरच्या वर्गासाठी फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण त्यांची मनःस्थिती ठीक नव्हती. पैशांची चणचण, नाटकांचे झपाटलेपण, वाचन वेड या सर्वांत विरंगुळा नि आधार होता तो राम गणेश गडकरी यांच्या सहवासाचा. त्या वेळी गडकरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. असेच एके दिवशी ते गडकरी यांचे बरोबर गंधर्व मंडळींच्या बि-हाडी गेले होते. बालगंधर्वांनी गडक-यांना सोबतच्या खांडेकरांकडे पाहून ‘मास्तर, हा बरोबरचा मुलगा कोणे?' म्हणून विचारणा केली. तेव्हा गडकरी मास्तर म्हणाले, ‘हा कोल्हटकरांच्या गादीचा वारस आहे. या वाक्याने खांडेकरांमध्ये साहित्यिक होण्याचे बीजारोपणच झाले.
 अशातच एक दिवस अचानक डिसेंबर १९१५ मध्ये पोस्टमास्तर असलेल्या मामांची तार हातात पडली. त्यात लिहिलं होतं, ‘ताबडतोब निघ. सावंतवाडीला जायचे आहे. दत्तक होण्यासाठी.' या तारेनं खांडेकर चक्रावून गेले. आपणास न विचारता दत्तकाचा घाट घातल्याबद्दल एकीकडे राग होता तर दुसरीकडे दत्तकामुळे आर्थिक अरिष्ट संपले अशी आशाही होती, पण ते भ्रमात नव्हते. वडिलांच्या जाण्याने आलेल्या पोरक्या जीवनात वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षांपासून खांडेकरांनी जन्मात प्रेम, करुणा, सहानुभूती या गोष्टी किती दुर्मीळ असतात, याचा अनुभव घेतला होता.नात्यांच्या रोज ताणत निघालेल्या विणीतून ते आकाशातले कोरडे ढग ओळखून होते. वडील गेल्यानंतर खांडेकरांनी काकांना मदतीचं पत्र आपल्या मामांच्या सांगण्यावरून लिहिलं होतं त्याचं साधं उत्तर न पाठवणाऱ्या काकांना- एका निर्दयी मनुष्याला आपण दत्तक जाणार या कल्पनेचं काहूर या युवकाच्या मनात घोंघावत होतं. आशा-निराशेच्या लपंडावातच कळलं की आपण ज्यांना दत्तक जाणार आहोत त्या सखाराम काकांना १४ अपत्ये झाली होती. एक विधवा मुलगी वारणाक्का वगळता सर्व निवर्तलीत चुलते अत्यवस्थ स्थितीत अंथरुणास खिळून आहेत.सावंतवाडीपासून सात-आठ मैलांवर असलेल्या नाणेली गावी त्यांचा मोठा जमीन-जुमला आहे तो सांभाळण्यासाठी त्यांना वारस हवाय. शिवाय ते अंधश्रद्ध होते. भुताखेतांवर त्यांचा विश्वास होता. आपल्या बोकांडी बसलेला समंध (भूत, पिशाच) उतरवायचा तर तरंगांनी (गुरव) सांगितल्याप्रमाणे दत्तकास पर्याय न राहिल्याने ते तयार झाले व दत्तक विधी १३ जानेवारी, १९१६ रोजी सावंतवाडीतील वडिलार्जित घरी पार पडून ते विष्णू सखाराम खांडेकर बनले.
 दत्तक विधान पूर्ण झाल्यावर खांडेकर पुण्यास शिक्षण घेण्यासाठी म्हणनू परतले. परतताना दत्तक वडिलांनी वाटखर्च देण्याचेही औदार्य दाखविले नाही. पुण्यास उतरले तेव्हा टांग्याने जाण्याइतपतही पैसे खिशात नव्हते. आता त्यांची स्थिती उपेक्षिताची झाली. ती दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच होती. 'न घर का ना घाट का दत्तक वडील रुष्ठ होते. दत्तक मुलानं शिक्षण सोडून शेती, सावकारी पहावी अशी त्यांची अपेक्षा होती. तिकडे आजोळी आजोबा वृद्ध झाल्याने त्यांचा हात आखडला होता. ते आई व भाऊ शंकरचा सांभाळ करायचे. या जबाबदारीमुळे व ते दत्तकपुत्र झाल्याने आजोळी परके झाले होते. आजोळच्या माणसांची अपेक्षा होती की आता दत्तक घरानं त्यांचं पहावं.
 खांडेकर हे विचित्र कात्रीत सापडले होते. दत्तक विधानानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली. अभ्यासातले लक्ष उडाले. परीक्षेला न बसल्याने टर्म बुडाली. मन रमवण्यासाठी वाचन व नाटक पाहणेच हाती होते. या काळात खांडेकरांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे 'वीरतनय' नाटक पाहिले. योगायोगाने प्रयोगाच्या वेळी गडकरी भेटले. त्यांना परीक्षेला न बसल्याचे कळताच ते रागावले. त्यामुळे त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मुंबईमार्गे कोकणात जाणे किफायतशीर होते. भाऊच्या धक्क्यावरून ते बोटीने वेंगुर्ल्याला आले. तेथून सारवट गाडीने त्यांनी सावंतवाडी गाठले.
 दत्तक घरी काकीची-बयावहिनीची हुकूमत चालायची. पण तिने कधी वैरभाव केला नाही. नवे गाव. मित्र नव्हते. पुस्तक माझा सखा' म्हणत खांडेकरांनी या काळात 'मूकनायक', ‘सुदाम्याचे पोहे', शेरेडनची नाटके वाचली. मोती तलाव, नरेंद्र डोंगर, चिवार टेकडी, आकेरीचे मेट, मळगावचे मेट ही निसर्ग स्थळे विरंगुळा बनली. सावतं वाडीच्या श्रीराम वाचनालयात वर्तमानपत्रे मासिके वाचणे जीवनक्रमाचा भाग होऊन गेला होता. दिवस कंठणे कठीण झाले, तरी दत्तक गावाहून सांगावा काही येईना. महिना उलटून गेल्यावर दत्तक आई व बहिणीचा निर्वाणीचा निरोप आला. नाणेलीस खांडेकरांचे जाणे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखेच होते. पण दत्तक बहीण वारणा आक्काच्या मायेने सारे निभावून जाऊ लागले. तिच्या ‘भाऊ पुकारणीनं पोरकेपण सरलं व जिणं सुसह्य होत गेलं.
 इच्छेविरुद्ध जगणं, विचार करणं, मन न लागणं या सर्वांची परिणती हिवतापात झाली आणि खांडेकर पुरते गारद झाले. नाणेलीच्या वास्तव्यात इथल दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा इत्यादी गोष्टीही धक्का देणाऱ्या ठरल्या. पुण्याच्या वास्तव्यात थोरामोठ्यांचे सान्निध्य, सहवास लाभल्याने सुधारक मनास हे सारं नवं होतं. खेड्याचं हे दर्शन विकल करणारं होतं. दारिद्र्यातही चातुर्वर्ण्य आहे. किंबहुना चातुर्वर्ण्यापलीकडचा पंचम वर्ग आहे' या जाणिवेने ते सतत अस्वस्थ असत.
 थोडे बरे वाटताच राहिलेली टर्म पूर्ण करण्याकरिता म्हणून खांडेकर परत पुण्यात आले. पण प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना परतणे भाग पडले. १९१७,१८ ही दोन वर्षे प्रकृतीच्या कुरबुरीतच गेली. या काळात बांबुळी येथे खांडेकरांचा मुक्काम होता. सोबत दत्तक बहिणीची सावली होती. प्रकृतीस उतार पडावा म्हणून येथील ब्रह्मेश्वर मंदिरात व्रत-वैकल्ये, अनुष्ठाने होत. खांडेकरांचा त्यावर विश्वास नव्हता. केवळ घरच्यांच्या मायेपोटी ते सारे निमूट सहन करीत. १९१८ सरता सरता प्रकृतीत बराच फरक पडला.
 सन १९१९ वर्ष उजाडलं पण खांडेकरांचा आराध्य सूर्य मावळला. २३ जानेवारीला राम गणेश गडकरी यांचं दुःखद निधन झालं. खांडेकरांच्या आयुष्यातली पोकळी रोज या ना त्या कारणाने वाढतच निघाली होती. वेळ घालवण्यासाठी परिसरातील मुलांना घरच्या सोप्यावर ते इंग्रजी शिकवू लागले. खांडेकरांनी याच काळात भटवाडीत छोटंसं वाचनालय सुरू केल. त्यामार्फत सभा, भाषणं असे लुटुपुटुचे समाजकार्य त्यांनी सुरू केले. याच काळात मेघश्याम शिरोडकरांसारखा ध्येयवेडा मित्र भेटला. ओळख स्नेहात बदलली. वाचनातून तयार झालेलं सुधारक मन व भोवतालची पारंपरिक वृत्ती व व्यवहाराच्या विसंगतीने खांडेकर सतत बेचैन असत. एकदा त्यांनी या विसंगतीवर बोट ठेवत लिहायचं मनावर घेतलं. दरम्यान 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेला ग. त्र्यं. माडखोलकर लिखित ‘केशवसुतांचा संप्रदाय' हा लेख खांडेकरांच्या वाचनात आला. त्यात माडखोलकरांनी गोविंदाग्रज (गडकरी) यांच्या ‘दसरा' कवितेवर कोरडे ओढले होते. त्यांचे आरोप खोडून काढणारा एक लेख खांडेकरांनी लिहिला. 'तुतारी वाङ्मय व दसरा' असं त्याचं शीर्षक होतं. कारण मूळ लेखात माडखोलकरांनी दसरा कविता म्हणजे केशवसुतांच्या ‘तुतारी'चे अधम अनुकरण' असल्याचे विधान केले होते. लेखासोबत आपली ‘होळी' ही नवरचित कविता ‘आदर्श, या टोपण नावावर पाठवली होती. दोन्ही रचना प्रकाशित झाल्या. याच दरम्यान बरेच दिवस मनात खदखदत असलेल्या वेगळ्या विसंगतीवर एक लेखमाला लिहायचे ठरवून त्याची पहिली खेप ‘उद्यान' मासिकाकडे धाडली. तीही प्रकाशित झाली. मग लेखन, प्रकाशन नित्याचे झाले. ‘उद्यान'चे संपादक ग. वि. कुलकर्णी यांच्या प्रोत्साहनामुळे ‘श्रीमत्कालिपुराण' लेखमाला चांगली चालली. या सदरात प्रकाशित लेख ‘महात्मा बाबा' गाजला, तो सावंतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबा बाक्रे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या फिर्यादीमुळे. या प्रकरणाचा एक फायदा झाला. जरी ते लिखाण आदर्श या टोपण नावाने होत असले तरी त्याचे लेखक भटवाडीतील वि. स. खांडेकर होत, हे जगजाहीर होणे. या चर्चेने लेखक म्हणून वि. स. खांडेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले होते.
 एप्रिल, १९२० ची गोष्ट असेल. सावंतवाडीपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावरील शिरोड्याहन घनःश्याम आजगावकर नावचे शिक्षक एक दिवस वि. स. खांडेकर यांच्या भटवाडीतील घरात दत्त झाले. त्यांना एका शिक्षकाची गरज होती. ते शिरोड्याला 'ट्युटोरियल इंग्लिश स्कूल चालवत. विशीतला हा तरुण इंग्रजी वाचतो, व्याख्यानं देतो, मासिकात लिहितो हे ते ऐकून होते. तत्पूर्वी खांडेकरांना मालवण, वेंगुर्ल्याहून अशी निमंत्रणं आली होती पण राष्ट्रीय आंदोलन, लोकमान्य टिळकांचे विचार, राष्ट्रीय शिक्षणाचा ध्येयवाद इ.मुळे खेड्यात जायचे त्यांनी यापूर्वीच निश्चित केले होते. बाबा काकांच्या निधनाने सांगलीची वाट बंद झाल्यात जमा होती. तिकडे नाणेलीत जाऊन दत्तक वडील बापूंच्या तडाख्यातून सुटायचं होतं. शिरोडे खेडे असल्याची खात्री करून घेतली. आक्का आणि काकींच्या संमतीने आजगावकर मास्तरांना होकार दिला.
 १२ एप्रिल, १९२० या दिवसानं वि. स. खांडेकरांच्या जीवनात स्वातंत्र्य व स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला. शिरोड्याला जाणं हे त्यांच्या दृष्टीने नव्या जीवनाची, स्वतःच्या ध्येय, स्वप्नांची नवी पहाट होती. पहाटेच त्यांनी शिरोड्याचा रस्ता धरला. मनात प्रश्नांचं काहूर होतं. ‘माझे इतर सर्व जाऊ दे; पण एक बुद्धी तेवढी माझ्यापासून जाऊ देऊ नकोस. तिची मला सोबत राहू दे' असं आर्य चाणक्याप्रमाणे मनास बजावत ते शिरोड्याला पोहोचले.
शिरोडे छोटं खेडं होतं. हजार-पंधराशेची वस्ती. अरबी समुद्राचा सुंदर किनारा लाभलेलं तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव. आता त्याचा समावेश नव्याने झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला आहे. रेडी, तिरोडा, आजगाव, आरवलीसारखी गावं मिळून शिरोडा पंचक्रोशी होते. तिथल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अ. वि. बावडेकर यांनी १ जानेवारी, १९१५ मध्ये ट्युटोरियल न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. अवघ्या वर्षांचं आयुष्य असलेली ही शाळा खांडेकर आले तेव्हा बाल्यावस्थेतच होती. १००-१२५ विद्यार्थी होते. बावडेकर मास्तरांनी परगावी येऊन सुरू केलेली ही शाळा. गावच्या शिक्षणाविषयी आस्था असलेली स. ग. प्रभू, आप्पा नाबर, गजानन कामत, ग. सी. खटकटे आदी मंडळ विद्यार्थी जमवायला मदत करीत. शाळेला स्वतःची इमारत नसल्याने ती तीन ठिकाणी भरे. महादेव नाबरांचे घर, कोटणीसांचे घर, बाजारातील निखग्र्याची माडी अशी शाळेची त्रिस्थळी यात्रा असायची. अ. वि. बावडेकर, घ. आ. आजगावकर, वि. स. खांडेकर, शं. प. शिनारी, भि. ना. दळवी या गुरु पंचायतानी शाळेचा संसार चालवायचं ठरलं. पण बावडेकर मास्तर येऊ न शकल्याने वि. स. खांडेकरांनाच शाळेच्या मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळणे भाग पडले.
 शाळेत ते इंग्रजी,ह्रसंस्कृत, बीजगणित शिकवत. जे जे ठाऊक आहे. ते ते सांगावं या भावनेनं त्यांचं शिकवणं असायचं सांगली, पुणे इ. घाटावरची शहरं सोडू नको कोकणात आल्यावर नाणेली, बांबुळी परिसरातल दु:ख, दारिद्र्य पाहिले होते. शिरोड्याची स्थिती त्यापेक्षा वेगळी नव्हती. अठरापगड जातीचा समाज त्यांनी इथंच येऊन पहिल्यांदा अनुभवला. ‘‘पांढरपेशांच्या चार भिंतींच्या आत आयुष्यातली पहिली वीस वर्षं गेली यामुळे घरट्याबाहरे कधीही न पडलेल्या पाखराच्या पिलासारखी आपली स्थिती आहे हे या मुलांना शिकवताना माझ्या लक्षात येऊ लागलं. समाजाचा एक फार मोठा श्रमजीवी वर्ग कसा जगतो, कसा राहतो, याची सुखदु:खं काय असतात, याचं प्रत्यक्ष ज्ञान मला नव्हतचं, पण हे सारं जीवन वाङ्मयात प्रतिबिंबीत झालेलं मी पाहिलं नव्हतं. त्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं. आपण अगस्ती ऋषी भले नाही होऊ, पण टिटवी होता आलं ती पुरे या अपेक्षेने मी काम सुरू केले' असे त्यांनी सांगितले होते. जग बदलायचा ध्यास त्यांनी घेतला.  पहिल्या पंधरा दिवसाचा पगार २० रु. हाती आला. नोकरी म्हणून केलेली ती पहिली कमाई होती. तिथल्या निसर्गानं खांडेकरांना भुरळ घातली. सुरुची बाग, भिके डोंगरी, मिठागरे, काजी सारं पाहताना शहरातून आलेला हा तरुण शिक्षक रोमांचित व्हायचा. तांबड्या मातीत रंगलेले जेमतेम गुडघे झाकणारे धोतर, धोतराला साजेसा तांबूस सदरा, वर जुना पुराणा कोट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चांदीच्या काड्यांचा जाड काचेचा चष्मा, एका हातात छत्री तर दुस-या हातात पिशवी, पिशवीत पुस्तकं अशा वेशात खांडेकर मास्तरांचा सर्वत्र संचार असायचा.
 शाळेला स्वतःची इमारत नव्हती. इमारत बाधं कामासाठी त्यांनी निधी उभारायला सुरुवात केली. खांडेकर मास्तर, आप्पा नाबर, अन्य शिक्षक बाजार, जत्रांमधून फंडाची पेटी फिरवत. घरोघरी जाऊन खांडेकर प्रकृतीची पर्वा न करता उंबरे झिजवू लागले. सभा होत. जुना अनुभव लक्षात घेऊन विरोधही व्हायचा. पण खांडेकरांना ध्येयवादानं पछाडलं होतं. सन १९२५ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झालं. त्या वेळी शिक्षकांना ७५-८० रुपये पगार असायचा. पैकी प्रत्यक्षात निम्माच मिळायचा. त्या काळात प्रत्येक शिक्षकांने इमारत फंडास १००० रुपयांची देणगी देऊन आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्या काळात इमारतीस २५००० रुपये खर्च आला होता. त्याचा सविस्तर जमाखर्च खांडेकरांच्या हस्ताक्षरात उपलब्ध असून तो शिवाजी विद्यापीठातील वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयात पाहताना खांडेकरांच्या समर्पण व त्यागाची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.
 शिक्षक म्हणून खांडेकर विद्यार्थ्यांना आईसारखा जीव लावत. त्यांच्या विचारांप्रमाणे आचाराचे संस्कारही विद्याथ्र्यांवर घडत. एकदा खांडेकर आपल्या एका विद्यार्थ्याला घेऊन सावंतवाडीला गेले होते. काम संपेपर्यंत रात्र झाली. सोबत खांडेकरांचे स्नेही होते. त्यांनी घरी आग्रहानं जेवण्यास नेलं. मित्र सनातनी होते. जातपात पाळायचे. त्यांनी विद्यार्थी जेवायला वेगळा बसवला. दारावरील पायरीवर शेणगोळा ठेवला. संकेत हा की भोजन झाल्यावर त्यानं आपली जागा सारवावी. खांडेकरांच्या हे लक्षात आलं. आपलं नि विद्याथ्र्यांचं जेवण होताच खांडेकरांनी शेणगोळ्यात हात घातला. मित्र खजील झाला. त्यानं प्रतिबंध केला पण विद्याथ्र्यांच्या डोळ्यात मात्र आपल्या शिक्षकांच्या आचारधर्म नि आदर्शामुळे पाणी आलं. असंच एकदा शाळेची सहल गेली होती. मुलगा समुद्रात बुडतो बघून खांडेकर मास्तरांनी समुद्रात मारलेली उडी त्यांच्या कर्तव्य व बांधिलकीची परिसीमा होती. एक आजारी विद्यार्थी खांडेकर मास्तरांना बघायचा घोशा लावतो व खांडेकर त्याच्या इच्छेचा आदर करतात. अशा अनेक कहाण्यांतून खांडेकरांचं विद्यार्थी प्रेम सिद्ध होतं.
 खांडेकर वेगवेगळ्या प्रसंगी विद्यार्थ्यांसमोर भाषणे करीत. त्यातून विद्याथ्र्यांचे अनुभव विश्व रुंदावयाचं. स्नेहसंमेलन, वाद-विवाद, प्रदर्शन, थोरामोठ्यांच्या भेटी, त्यांची विद्यार्थ्यांशी हितगुजं, पुस्तकांवर चर्चा, ग्रंथालयाचा विकास अशा चतुर्दिक मार्गांनी ते विद्यार्थ्यांना अधिकाधिक देऊन अभ्यासाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी घेत. काकासाहेब कालेलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, न. चिं. केळकर, बा. भ. बोरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कितीतरी महनीय व्यक्ती त्यांनी शाळेत आणल्या व विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणला.
 गावातील राजकारणात भाग घ्यायचं त्यांनी कटाक्षाने टाळलं. तरी काही मंडळी विरोध करत राहायची. खांडेकरांनी शेवटपर्यंत शाळेस संस्कार केंद्र म्हणून सुरक्षित व अलिप्त ठेवलं. त्यामुळे त्यांची शाळा माणूस घडविणारं संस्कृती केंद्र बनून राहिली| पुणे सोडून सावंतवाडीला आल्यानंतरच्या काळात वि. स. खांडेकरांनी साहित्य क्षेत्रात लेखन, व्याख्याने, वाचनालय इ. स्वरूपात जे प्रयत्न नि धडपड सुरू केली होती त्या १९१९ च्या दरम्यानच्या काळात भेटलेला ध्येयवादी मित्र मेघ:श्याम शिरोडकर.
 त्यानं महात्मा गांधींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शिक्षण सोडून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली होती. पुढे तो पुण्याच्या राष्ट्रीय शिक्षण देणाच्या टिळक महाविद्यालयातून पदवीधर झाला. परत गावी आला. तेव्हा सावतवाडी संस्थान होते. लोकांचा कैवार घेणारं, त्यांची दुःखं वेशीवर टांगणारं, संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं वृत्तपत्र असावं असं त्यांच्या मनानं घेतलं आणि एक साप्ताहिक प्रकाशित करायचं ठरलं. खांडेकरांनी लेखन साहाय्य करण्याचे मान्य केलं. खांडेकर त्या वेळी आत्मरंजनासाठी काव्य, विनोद, कथा असं लिहीत होतेच. त्याला प्रकट व्हायला आणखी एक माध्यम मिळाल. 'वनैतये 'च्या पहिल्या अंकापासून ते १९३२ पयर्तं त्यांनी नियमित लेखन केलं.
 मेघ:श्याम शिरोडकर वैनतेय'चे संपादक झाले तर वि. स. खांडेकर सहसंपादक वाङ्मय विभागाचे ते मुख्यतः संपादक असले तरी साप्ताहिकाची जी गरज पडेल ते लेखन त्यांनी केलं. मुद्रणाची जबाबदारी भाऊसाहबे सप्ते यांच्यावर सोपविण्यात आली. साप्ताहिकासाठी 'वैनतेय' नाव वि. स.खांडेकरांनीच सुचविलं. हे नाव निवडताना त्यांच्यापुढे दोन गोष्टी होत्या. दक्षिण कोकण हा डोंगरांनी वेढलेला भूप्रदेश. त्या डागें राच्या खडकावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणाच्या गरुडासारखा आपणास सामाजिक, राजकीय प्रश्नांचा वेध घेता आला पाहिजे. दुसरे म्हणजे मेघःश्याम शिरोडकर न. चिं. केळकर, शिवरामपतं परांजपे अशा गुरुंपासून वृत्तपत्रीय प्रेरणा घेऊन आलेले. त्यांच्यापुढे 'केसरी'चा आदर्श होता. केसरी म्हणजे सिंह. प्राण्यांचा राजा सिंह तर गरुड पक्ष्यांचा. त्यामुळे ‘वैनतेय' नाव निश्चित करण्यात आलं.
 ‘वैनतेय'चं ध्येय, धोरण, प्रतिबिंबित करणारा एक श्लोक ही खांडेकरांनी लिहिला होता. तो गरूडाच्या चित्राबरोबर प्रत्येक अंकाच्या डोक्यावर छापला जायचा. तो श्लोक असा होता-
  “वसे दास्यी माता, नयनसलिली मग्न विनता
   असे पंगू भ्राता, अहिकुलछले भीत जनता
  नसे साह्या कोणी, अमृत लपलें स्वर्ग भुवनी
  हसे माता आणी विहगपति ते शत्रु वधुनी"
 यातील ‘वसे दास्यी माता' हे भारतमातेच्या पारतंत्र्यास उद्देशून होते. “अहिकुल छलें भीत जनता'चा संबंध आपल्याच समाजाचा एक भाग दुस-यावर हुकूमत गाजवतो. स्वातंत्र्याप्रमाणे त्यापासून ही मुक्ती मिळावी असे ते सुचविणारे होते.
 वैनतेय साप्ताहिकाचा पहिला अंक २९ ऑक्टोबर, १९२४ रोजी प्रकाशित झाला. सावंतवाडीचे राजबहाद्दूर बापूसाहेब महाराजांचा राज्याभिषेक समारंभ याच दिवशी होता. त्यानिमित्त पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. १९२४ ते १९३२ या कालखंडात वि. स. खांडेकरांनी अग्रलेख, स्तंभ लेखन, स्फुटं, टिपणे तर लिहिलीच पण प्रसंगी बातमीपत्रेही लिहिली.‘समुद्रमंथन', 'गाजराची पुंगी', 'गाढवाची गीता', 'बहुरत्ना प्रसवा’,‘गाढवापुढे गीता’, ‘परिचयाची परडी, कणसाचे दाणे', 'रानफुले' ‘कल्पनातरंग' अशी विविध सदरे खांडेकरांनी लिहिली. ‘वाङ्मय विचार विभागाचे संपादन खांडेकर करीत. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक अशा तत्कालीन अनेक प्रश्नांवर खांडेकरांनी अक्षरशः शेकडो पानं भरतील इतका मजकूर लिहिला. कधी स्वतःच्या नावाने कधी अनामिक तर कधी, विहंगम,आदर्श, कुमार इ. टोपण नावांनी. याशिवाय त्यांनी ‘वैनतेय'मध्ये कथा, लघुनिबंध, लेख, विनोदी साहित्य, नाट्यछटा, कविता असं अनेकांगी साहित्य लेखन केलं. वि. स. खांडेकरांचा पहिला लघुनिबंध ‘वैनतेय' च्या २२ फेब्रुवारी, १९२७ च्या अंकात ‘रानफुले' सदरात ‘निकाल द्या' (How's that) शीर्षकाने प्रकाशित झाला होता. लघुनिबंधकार म्हणून खांडेकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची गंगोत्री 'वैनतेय' होती. पाच दशके खांडेकर लघुनिबंध लिहीत राहिले. या काळात त्यांनी सुमारे पावणे दोनशे लघुनिबंध लिहिले.
 वैनतये साप्ताहिक डेमी आकारात (Tabloid) छापलं जायचं. त्या काळी विविध वृत्त, धनुर्धारी नवयुग नियतकालिके याच आकाराची असत. ‘वैनतये'मधील वैविध्यपूर्ण लेखनामुळे साहित्यिक, संपादक, समीक्षक, स्तंभलेखक म्हणून वि. स. खांडेकरांचा लौकिक सर्वदूर पसरला. या संपादन कार्यामुळे वृत्तपत्र हे लोकजागृतीचे व लोकशाही शिक्षणाचे प्रभावी साधन असल्याची खात्री खांडेकरांनी झाली. शाळेप्रमाणचे वर्तमान पत्र हे सांस्कृतिक साधन वाटू लागले. ‘वैनतेय'च्या माध्यमातून खांडेकरांनी जातीय सलोखा, प्रबोधन, समाजास पुरोगामी बनविण्याचे कार्य केले. गैर गोष्टींवर प्रहार करण्यात ‘वैनतेय'नं कधी कुचराई केली नाही. सद्सदविवेकाचा कौल सार्वजनिक जीवनात निमार्ण करण्याचं कार्य ‘वैनतेय'मुळे खांडेकर करू शकले. ‘वैनतेय'चं ग्राहक क्षेत्रे मर्यादित असलं तरी त्याचा वाचक, ग्राहक चोखंदळ व चिकित्सक होती. त्यामुळे बुद्धिवादी व विवेकशील वर्गाशी आपल्या साहित्याद्वारे खांडेकर नाळ जोडू लागले.
 अंधश्रद्धा निर्मूलन विचारास हातभार लावून खांडेकरांनी समाज पुरोगामी व वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न केला.
 वि. स. खांडेकरांना लेखनाचा छंद बालपणापासूनचाच. पण त्यांचं लेखन सन १९१९ पासून विविध नियतकालिकांत प्रकाशित होत होतं. उद्यान, नवयुग, वैनतेय, ज्योत्स्नासारख्या नियतकालिकांतून प्रकाशित होत राहिलं. कथा, कविता, विनोद, परीक्षण, लेख असं त्याचं स्वरूप असायचं. पण पुस्तक रूप प्रकाशन होण्यास मात्र १९२८ वर्ष उजाडावं लागलं.
 त्याचं असं झालं की, सन १९२६ मध्ये माधवराव जोशी यांनी ‘म्युनिसिपालिटी' हे नाटक लिहिलं होतं, ते रंगमंचावरही आलं. प्रेक्षकांच्या पसंतीसही ते उतरलं. पण त्या नाटकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची काळी आणि डावी बाजूचे तेवढी प्रकाशात आली. या संस्थेचे कल्याणकारी व विकासाचे कार्यही महत्त्वाचं आहे व ते समाजापुढे यायला पाहिजे असं बाबासाहेब परांजपे या प्रसिद्ध सामाजिक कार्यकत्र्याला वाटलं.  त्यांनी स्पर्धा जाहीर करून एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सकारात्मक नाटक लिहिण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रकाशित केली. ती वि. स. खांडेकरांच्या वाचनात आली. त्या वेळी खांडेकरांना २५ रु. पगार होता. त्यांना नाटक लिहिण्याचा झटका आला. त्याच्या मुळाशी अर्थातच बक्षिसाचे प्रलोभन होते. स्पर्धा झाली. बक्षीसपात्र नाटक काही संयोजकांना मिळालं नाही. या परीक्षण मंडळात बेळगावचे नाट्यरसिक व मर्मज्ञ भाऊसाहेब सोमण होते. ते ‘किरात या टोपण नावाने त्या वेळी लिहीत. ते केशवसुतांचे मित्र व चाहते. त्यांना वि. स. खांडेकरांचे नाटक आवडले. त्यामुळे बेळगावचे नाट्यप्रेमी डॉ. के. वा. साठे व पु. ल. ओगले यांना ते रंगभूमीवर यावे असे वाटले. डॉ. के. वा. साठे यांचा नाट्यकला प्रसारक संगीत मंडळी, सांगलीशी संपर्क व परिचय होता. त्यांच्या शिफारशीवरून नाटक निवडले गेले. त्याचा पहिला प्रयोग सांगलीच्या सदासुख नाट्यगृहात १६ मे, १९२८ रोजी झाला. यात कमलाबाई कामत यांनी नायिका उषाची तर शि. ह. परांजपे यांनी प्रदोषची भूमिका केली होती. परांजपे त्या वेळी 'प्रेमसंन्यास'मध्ये गोकुळची भूमिका करत.
 हे नाटक पुस्तकरूपात प्रकाशित होईल असे वि.स.खांडेकरांना कधी वाटले नव्हते. पण खांडेकर सांगली हायस्कूलला शिकत असताना त्यांच्या पुढे-मागे वामन वासुदवे अतीतकर होते. ते बी. ए. होऊन विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयाचे आजीव सेवक होते. पुण्याच्या सदाशिव पेठेत संस्थेचा समर्थ भारत छापखाना होता. त्यांना वाटलं की, आपण हे नाटक प्रकाशित केलं तर संस्थेस चार पैसे मिळतील. म्हणून ते त्यांनी सचित्र प्रकाशित केलं. नाटकाचं नाव होतं 'संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित या नाटकाची किंमत होती १ रुपया. या नाटकास मुरूड जंजि-याचे बा. अ. भिडे यांची प्रस्तावना आहे. नटवर्य केशवराव दाते यांनी पुण्यात हे नाटक पाहून नाटकाची नायिका श्रीमती कमलाबाई यांच्या अभिनयाची प्रशंसा करणारे एक पत्र खांडेकरांना लिहून नव्या नाटकाची मागणी केली हाती. यावरून ‘संगीत रंकाचे राज्य' किती यशस्वी होते याची कल्पना येऊ शकते. खांडेकरांनी प्रतिसाद म्हणून त्यांना आपले ‘मोहनमाळ' नाटक पाठवल्याचे उल्लेख पत्रव्यवहारात आढळतात. केशराव दाते व खांडेकर यांच्यात सन १९२९ पासून १९७१ पर्यंत पत्रव्यवहार दिसून येतो. त्यातून केशवराव दाते खांडेकरांना नाट्यदोष दाखवित व मार्गदर्शन करत, असे आढळून येते. वि. स. खांडेकर केशवराव दातेच्या सूचनांचा आदर करीत. एका पत्रात त्यांनी केशवरावांना लिहिले आहे की, “आपले दोष दिग्दर्शन सौम्य झाले आहे हे मी जाणून आहे. पण निर्जीव स्नेहदेखील जिथे मृत्युत्वाबद्दलच प्रसिद्ध आहे, तिथे सहृदयाचा स्नेह अकारण मृत्यू व्हावा यात नवल काय? (१) रसहानिकारक रहस्ये (२) विनोदी पात्रांची लांबण (३) कोटिक्रमाचा अतिरेक हे तिन्ही दोष कोल्हटकर-गडकऱ्यांच्या परंपरेत माझे लेखन वाढल्यामुळे उत्पन्न झाले आहेत. देवल-खाडिलकरांच्या औषधाने हे विष निरुपद्रवी करण्याचा मी यापुढे शक्यतो प्रयत्न करणार आहे.
 वि. स. खांडेकरांचा जन्म व बालपण नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाच्या सांगलीत गेले. देवल, खाडिलकरांसारखे नाट्यक्षेत्रातील पूर्वसुरी व कोल्हटकर-गडकरी यांच्यासारखे त्याचे समकालीन ज्यष्ठे साहित्यकार याचं या नाट्यवाचन व रगं भूमीवरील त्यांच्या नाटकांचे सादरीकरण पाहून आपणही नाटककार व्हावे असे स्वप्न खांडेकर बालपणापासून पाहायचे. ‘शनिमहात्म्य' वाचून त्यावर आधारित नाटक लिहिण्याचा प्रयत्न खांडेकरांनी केल्याचे उल्लेख आढळतात. पुढे १९१८-१९ च्या दरम्यान पुणे सोडून कोकणात आल्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बांबुळीत होते. निवातंपण होते. लेखन, वाचनाशिवाय पयार्य नव्हता. त्या वर्षभराच्या कालावधीत व नतंरच्या तीन-चार वर्षांत हौस म्हणून त्यांनी ‘शीलशोधन', 'मोहनमाळ', ‘शांतिदेवता, ‘मृगलांच्छन, 'स्वराज्याचं ताट' सारखी नाटके लिहून ती समकालीन नाटककारांना अभिप्रायार्थ पाठवली होती. या सर्वांतून खांडेकरांचा प्रारंभिक लेखन पिंड हा नाटककाराचा होता हे स्पष्ट होते. पण तो काळ (१९२०-३0) हा मराठी संगीत नाटकांच्या ओहोटीचा असल्याने एक प्रकारे तो संधिकाल होता. नाट्य कंपन्या बंद पडत होत्या. राजाश्रय संपत आलेला. चित्रपटांच्या आगमनामुळे नाटकांचा जनमानसावरील प्रभाव कमी होत चाललेला. त्यामुळे खांडेकर कथा, कादंब-यांकडे वळले असावेत.
 ‘संगीत रंकाचे राज्य'चा मुख्य विषय स्थानिक स्वराज्य असला तरी त्यात स्त्रीपुरुष प्रीतीभाव, प्रेमातील संयोग-वियागे इ.चे चित्रण त्यात प्रभावीपणे आले आहे. हे मूलतः संगीत नाटक असल्याने यात २५ गाणी आहेत. नाटकाची शैली कोटीबाज, विनोदाकडे झुकणारी. Dramatic Irony असं प्री. प्र. ना. परांजपेंसारखे समीक्षक त्याचे वर्णन करतात. खांडेकर नाटककार जरी होऊ शकले नाही तरी नाट्यसमीक्षक म्हणून पुढे त्यांचा लौकिक झाल्याचा आढळतो. एवढे मात्र खरे की, नाटक हा त्यांच्या वाचन व व्यासंगाचा विषय होता. पुढे खांडेकरांनी तो जन्मभर जपला.
सांगलीला ‘संगीत रंकाचे राज्य' नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर वि. स. खांडेकर आपल्या आजोळीच मे महिन्याच्या सुट्टीसाठी होते. या काळात सदर नाटकाच्या प्रकाशनाचा योग जुळून आल्याने त्यांनी तिथेच बसून दि. २६ मे, १९२८ ला नाटकासंबंधी आपली भूमिका “राज्याचा इतिहास शीर्षकाने लिहिली. बा. अ. भिडे यांची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. (२२ मार्च, १९२८) नाटक मार्गी लागल्याने खांडेकरांची प्रकृती सुधारू लागली होती. दत्तक बहिणीने लग्नाचे टुमणे लावल्याने व वयाने तिशी गाठल्याने लग्न करण्यास खांडेकरांनी तत्त्वतः तयारी दर्शविली तरी लग्नास होणा-या हजार-पंधराशे रुपयांच्या खर्चाची विवंचना होती. स्नेही दत्ताराम घाटे यांच्या भरवशावर हातउसने घेऊन लग्न करण्याचे ठरले.
 घरी पत्नी म्हणून येणाऱ्या वधूबद्दल खांडेकरांची स्वतःची अशी धारणा होती. फार शिकलेली नसली तरी चालले पण आपण ज्या कोकणात खेड्यात राहतो तिथे आपल्यासारख्या शिक्षकाचा ओढग्रस्तीचा संसार सांभाळणारी असावी. याच होत्याने त्यांनी अन्य स्थळे नाकारून बेळगावखानापूरजवळील आसोग्याच्या मणेरीकरांची कन्या मनूचे स्थळ पसंत केले. मे १९२८ मध्येच आक्का व दत्तक आईच्या संमती व उपस्थितीत वधूपरीक्षा आसोग्याला झाली. १६ जानेवारी, १९२९ रोजी आसोगे मुक्कामीच निवडक पाहुणे व मित्रांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.
 विवाहानंतर पत्नीचे नाव त्यांनी उषा ठेवले ते त्यांच्या संगीतकारांचे राज्य'च्या नायिकेचे होते. मनाची नायिका प्रत्यक्षात मिळाल्याचीच ती साक्ष होती. विवाह साधेपणी, कर्मकांडास फाटा देऊन करण्यात आला. लग्नातील भोजनाच्या वेळी पंक्तीभेद (जातिभेद) होणार नाही याचे आश्वासन घेऊन केलेला हा विवाह म्हणजे खांडेकरांच्या आचार-विचारातील अद्वैत सिद्ध करणारा वस्तुपाठच ठरला. त्यानंतर लग्नविधी आवरल्यावर यथावकाश त्यांनी शिरोड्यास संसार थाटला. तो पाहण्यासाठी (लग्न चुकल्याची चुटपूट दूर करण्याच्या हेतूने) गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मे, १९३० च्या पहिल्या आठवड्यात शिरोड्यास मुद्दाम आले व शिष्यास आशीर्वाद देऊन गेले.
 भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे व दीर्घकालीन (१९३० ते १९३४) जनआंदोलन म्हणून मिठाचा सत्याग्रह ओळखला जातो. मिठावरच्या कराचा भार गरिबातील गरीब भारतीयावर पडत असे. लहरी पावसामुळे लाखो शेतकरी कर भरू शकत नसत. करबंदी आंदोलनाचा भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याची सुरुवात गुजरातमधील दांडी यात्रेने झाली. ६ एप्रिल १९३० ला दांडी येथे कायदाभंग करून मीठ तयार करण्यात आले. त्यात महात्मा गांधींना अटक करण्यात येऊन पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्याच दिवसापासून महाराष्ट्रातही मिठाचा सत्याग्रह विलेपार्ले (मुंबई) येथे सुरू करण्यात आला. कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रात संघटित रितीने व शिस्तीने व्हावी म्हणून महाराष्ट्र कायदेभंग मंडळ स्थापन करण्यात आले. त्या मंडळातर्फे शिरोडे येथे १२ एप्रिल ते १५ एप्रिल, १९३० या कालावधीत राज्यस्तरीय मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याचे नेतृत्व मामासाहेब देवगिरीकर व धर्मानंद कोसंबी यांच्याकडे होते. शिरोडे गाव गोवा व महाराष्ट्राची सरहद्द असल्याने व तिथे मिठागरे असल्याने शिरोड्याची निवड करण्यात आली. गोव्यात तेरेखोल येथे पोर्तुगिजांविरुद्ध तर महाराष्ट्रात शिरोडे येथे ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. ५०० जणांनी त्यात भाग घेतला. ३००जणांना अटक करण्यात आली. उरलेले जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 वि. स. खांडेकर या सत्याग्रहात सक्रिय सहभागी होते. त्यांचे सहकारी आप्पा नाबर यांचेच मिठागर सत्याग्रहासाठी निवडण्यात आले होते. त्यांचे दुसरे एक सहकारी व 'वैनतेय'चे संपादक मेघश्याम शिरोडकर या सत्याग्रहात सामील होते. वि. स. खांडेकरही यात सामील होणार होते पण सरकारी मदत घेणाच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर बंधन होते. परंतु स्वयंसेवक, व्यवस्थापन इ.मध्ये ते सक्रिय होते. आप्पा नाबरच्या घरावर अटकेनंतर जप्ती आली होती. आपल्या हृदयाची हाक' कादंबरीच्या मानधनाची रक्कम देऊन खांडेकरांनी आप्पा नाबरांचे घर वाचवले. 'वैनतेय'मध्ये सत्याग्रहाची बातमीपत्रे खांडेकरांनी लिहिली. सभांत त्यांनी भाषणे केली. सत्याग्रहात भाग घेऊन शकल्याचे शल्य जीवनभर गांधीवादी विचार आचाराचा वसा जपून खांडेकरांनी भरून काढले. गांधी जन्मशताब्दीस खांडेकरांनी विपुल लेखन केलं. त्याचे संकलन ‘दुसरे प्रॉमिथिअसः' ‘महात्मा गांधी' या नावाने प्रकाशित झाले आहे.
 वि. स. खांडेकरांनी सन १९३० ते १९३५ या कालखंडात केवळ विपुल लेखन केले असे नाही तर जे लेखन केले ते विविधांगी पण होते. ‘संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित झाल्यावर लगेच १९२९ मध्ये नवमल्लिका' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दरम्यान खांडेकरांना वक्ते म्हणून ही आमंत्रित केले जाऊ लागले होते. त्या काळी ‘भारत-गौरव माला' वाचकांच्या पसंतीस उतरली होती. मंगेशराव कुलकर्णी त्यासाठी खूप मेहनत घेत. खांडेकरांचे स्नेही गं. दे. खानोलकर त्या वेळी भारत-गौरवमालेत काम करत. त्यांच्या सांगण्यावरून खांडेकरांनी आपली पहिली कादंबरी ‘हृदयाची हांक' लिहिली व एप्रिल, १९३० मध्ये लगेच ती प्रकाशित झाली. एव्हाना वि. स. खांडेकर बहुप्रसव साहित्यिक म्हणून वाङ्मय वर्तुळात सर्वपरिचित झाले होते. तत्कालीन नियतकालिकात ते नियमित लिहीत. या काळात त्यांनी ३ लेख, ५ कविता, ११ परीक्षणे, १९ कथा, ३ लघुनिबंध लिहिले. शिरोड्यातील निसर्ग व खेड्यातील निवांत जीवन हे त्याचं कारण होतं. सन १९३१ मध्ये ‘कांचनमृग' कादंबरी नंतर लगेचच त्यांचे ‘गडकरी : व्यक्ती व वाङ्मय' प्रकाशित झाले. सन १९३२ मध्ये त्यांनी ‘आगरकर चरित्र' वाचकांच्या हाती आले. नंतर ‘उल्का (१९३४), दोन ध्रुव (१९३४) या कादंबच्या व ‘दत्तक व इतर गोष्टी (१९३४) चे प्रकाशन झाले.
 यामुळे वि. स. खांडेकर मान्यताप्राप्त साहित्यिक बनले. बडोद्याच्या साहित्य संमेलनात कथा विभागाचे अध्यक्षपद त्यांना लाभलं. पुढे सन १९३५ ला तर ते पहिल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पाठोपाठ त्यांना पुण्याच्या शारदोपासक संमेलनाच्या चौथ्या अधिवेशनचे अध्यक्षपद मिळाले. नंतर ते मुंबई मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. त्यांचे विचार व मते यांना एक प्रकारची मान्यता लाभून ते मराठी साहित्यरसिकांचे प्रिय लेखक, वक्ते, विचारक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार म्हणनू सन्मानित झाले. त्यांच्या साहित्य विचारातील गांभीर्य, नवता व भाषेतील सौंदर्य याची विलक्षण मोहिनी मराठी भाषा व साहित्यात निर्माण झाली होती. मराठी वाचक 'वि. स. खांडेकर' शीर्षक दिसताच प्रथम पसंतीने त्यांना वाचू लागला.
 २० जानेवारी, १९३६ ला वि. स. खांडेकरांचे घरी पुत्ररत्न आले. सर्वत्र आनंदीआनंद होता. वि. स. खांडेकर यांनी मुलाचे नाव अविनाश ठेवून जीवनावरची दुर्दम्य आस्थाच व्यक्त केली होती. तशातच मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी खांडेकरांना चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे आमंत्रण दिल्याने अनपेक्षितपणे त्यांच्यापुढे साहित्याचे नवे दालन व माध्यम खुले झाले. प्रथम हे काम त्यांना आपल्या आवाक्याबाहेरचे वाटत होते. पण मग आग्रहामुळे त्यांनी प्रयत्न करायचे ठरवून 'छाया' ही पटकथा 'हंस'ला दिली व ती निर्माता व दिग्दर्शकांच्या पसंतीला उतरल्याने लगेचच मुहूर्त करून चित्रीकरण सुरू झाले. सहा महिन्यात चित्रपट तयार होऊन तो २० जून,१९३६ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, लीला चिटणीस, इंदिरा वाडकर, अनंत मराठे यांच्या या बोलपटात भूमिका होत्या. पांडुरंग नाईक यांचे चित्रीकरण होते. आण्णासाहेब माईणकरांचे यास संगीत लाभले होते. हिंदीत डब करून तो प्रकाशित करण्यात आला होता.
 वि. स. खांडेकर १९३६ ते १९६२ पर्यंत चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत होते. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भाषांत सुमारे २८ चित्रपटांच्या खांडेकरांनी पटकथा, संवाद, गाणी लिहिली. त्यांच्या पहिल्या चित्रपटास गोहर सुवर्ण पदक तर अंतिम ‘माणसाला पंख असतात'ला भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता. साहित्याप्रमाणेच खांडेकर चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांना भारतीय साहित्यिक बनवण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांतून खांडेकरांनी अनेक सामाजिक समस्यांचे चित्रण केले. तसेच विनोदी कथांचे लिहन मनोरंजनही केले. त्यांच्या अनेक चित्रपट गाण्यांना मोठी पसंती लाभली होती.
 चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्य, कर्तृत्वाचा विस्तृत आढावा लक्षात घेता एक गोष्ट मात्र निश्चित होते की साहित्याप्रमाणेच त्यांचे चित्रपटही संस्कार, मूल्य, आदर्श, प्रबोधन इ.ची पाठराखण करताना दिसतात.
 अविनाशच्या जन्मानंतर (१९३५) ६ ऑगस्ट, १९३७ ला कन्या मंदाकिनीचा जन्म झाला. तिला बाळलेणं द्यायचं म्हणून वि. स. खांडेकरांनी आपल्याला मिळालेलं गोहर मेडल मोडलं. चित्रपट व शाळा यांची कसरत त्यांना जमेनाशी झाली. कारण चित्रपटाच्या कामासाठी वारंवार कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करणं जिकिरीचं झालं. म्हणून खांडेकर सपरिवार सन १९३८ च्या प्रारंभी कोल्हापूरला आले. त्यांनी शाहूपुरीतील मास्टर विनायकांच्या बंगल्यात आपलं बि-हाड थाटलं. आजचं राजारामपुरीतील कन्येनं बांधलेलं 'नंदादीप' निवासस्थानी कायमचे राहण्यास येण्यापूर्वी खासबाग इथे मूग यांच्या घरी, नंतर राजारामपुरीतील ‘मुक्ताश्रम' येथे ते राहात. या काळात त्यांना कल्पलता (१९३९), सुलभा (१९४१) आणि मंगल। (१९४४) या कन्यारत्नांचा लाभ झाला. खांडेकरांचे आपल्या मुलांवर प्रेम होतं. आपलं लेखन, वक्तृत्व, संपादन, संमेलने, चित्रपट या सर्वांतून वेळ काढून मुलांवर संस्कार करणे, शंका समाधान, गोष्टी सांगणं आवर्जून करत.
 गृहस्थ जीवनाचे संस्कार वि. स. खांडेकरांवर आजोळी असल्यापासूनच होत राहिले. त्यांचे वडील अकाली निवर्तले. त्या काळातही पोरेले खांडेकर आपल्या अर्धागवायू झालेल्या वडिलांची सेवा-शुश्रूषा करीत. आल्या गेल्यांचं स्वागत हे त्यांच्या समाजशील स्वभावातच होतं. जे घरी तेच दारी. मित्रांना सदैव मदत करीत.
 मित्रही त्यांना मदत करायचे. विद्यार्थ्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा मनुष्य संग्रह मोठा होता. त्यांच्या चेह-यावर व्यथेचं चिन्ह कधी उमटत नाही. बोलण्यात कधी दुःखाचा उद्गार नाही. सगळे सोसायचं. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेते रहायचं, ही वृत्ती. (डॉ. सुमती क्षेत्रमाडे - गौरविका पृ. ६०) ते सोशिक होते. गृहस्थधर्म पाळणारे होते. इतरांपेक्षा अधिक सहनशील होते. लेखन करताना आपल्या कौटुंबिक जबाबदाच्या टाळल्या असंही त्यांच्याकडून कधी झालं नाही. मुलं, मुली लहान असताना ताप यायचा. खांडेकर सहा-सहा तास मुलींना खांद्यावर घेऊन शतपावली करत, औषधोपचार करत. प्रसंगी लेखन बाजूस सारत. लेखनिकाला सुट्टी देत. पण मुलांच्या संगोपनात कुचराई करत नसत.
 वि. स. खांडेकर उपजत शिक्षक होते. शिरोड्याच्या शाळेत संस्कृत, इंग्रजी, बीजगणित, भूमिती पडेल ते विषय त्यांनी शिकवले होतेच. मुली शिकत असताना मॅट्रिकपर्यंत ते घरी त्यांना संस्कृत, इंग्रजी, बीजगणित शिकण्यास मदत करीत. तीच गोष्ट मुली एम.ए. करतानाही. खाडिलकरांची नाटके खांडेकर त्यांना शिकवीत. मुलींच्या अगोदर बायकोने शिकावे, वाचावे असा त्यांचा प्रयत्न होता. ते पत्नी उषाताईंना सुरुवातीच्या काळात वाचूनही दाखवत. पण त्यांचा ओढा शिक्षणापेक्षा संसाराकडे अधिक होता. त्या स्वयंपाकात सुगरण. राहण्यात टापटीप होत्या. घर नीटनेटकं ठेवण्यात त्या दक्ष होत्या. पत्नीच्या निधनानंतर (२६ ऑक्टोबर १९५८) खांडेकरांनीच मुला-मुलींचा सांभाळ केला. पत्नीबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना सदैव भरलेली असायची.
 त्यांच्या वृद्धापकाळात मोठी मुलगी मंदाकिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. नोकरी सांभाळून वि. स. खांडेकरांचं त्या सारं करीत. लेखनिक, लोकांचं येणं-जाणं, पुढे वि. स. खांडेकरांचं वृद्धत्व, अंधत्व साच्या समर प्रसंगी त्या खांडेकरांच्या मागे खंबीर उभ्या होत्या. पत्नी निवर्तल्यानंतरही त्यांना जे १८-१९ वर्षांचं आयुष्य लाभलं त्या काळात मंदाताईच त्यांच्या पालक होत्या.
 वि. स. खांडेकर आचार, विचारांनी खरे पुरोगामी होते. अन् खरं तर ‘नास्तिक' होते. देवावर त्यांचा विश्वास नव्हता. घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे कधीही झाली नाही. धार्मिक विधीही होत नसत. (अविनाश खांडेकर शिवराज्य (खांडेकर विशेषांक) पृ. ४५) सकाळ, संध्याकाळ फिरण्याचा खांडेकरांना छंद होता. फिरायला जाताना कोणीतरी नेहमी त्यांच्याबरोबर असायचे. दत्ताराम घाटे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर, कवी गिरीश, नाटककार वसंत कानेटकर, प्रभृती मित्र, साहित्यकारांचं घरी येणं, जाणं राहणं असायचं.
 टपाल वाचणं, उत्तर लिहिण्याचा त्यांचा छंद होता. येणा-या टपालाला उत्तर देण्याचा त्यांचा प्रघात व कटाक्ष होता. सामाजिक भावनेनं विद्यार्थी, संस्था, उपक्रमानं ते मदत करीत. त्यांच्याकडे वाचक, स्नेही, आप्त मार्गदर्शनासाठी येत. वेळ, प्रकृतीचीही तमा न बाळगता खांडेकर सर्वांशी हितगुज करीत. लहान-मोठा, आप-पर असा भेद ते बाळगत नसत. माणूसप्रेमी, समाजशील गृहस्थ खांडेकर सुहृदय होते.
 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा व साहित्याचे केंद्र म्हणून बडोद्याचे महत्त्व प्रारंभापासूनच राहिले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजाश्रयाचे ते फळ होय. सन १९३८ च्या २५ डिसेंबरला म्हणजे नाताळात तेथील मराठी साहित्य संमेलनाचे १९ वे अधिवेशन योजले होते. त्या वेळी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना वाहिलेली शाखा संमेलने घेण्याचा प्रघात होता. या संमेलनात पां. वा. काणे (भाषा), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (इतिहास), माधव ज्युलियन (काव्य) इ. बरोबर वि. स. खांडेकरांची कथा संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्या वेळी वि. स. खांडेकर होते अवघे ३६ वर्षांचे. त्यांच्या अनेक कथा नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाय ‘नवमल्लिका' ‘दत्तक आणि इतर कथा 'जीवन कला’, 'ऊन पाऊस' सारखे कथासंग्रह प्रकाशित झाले होते. वाचकांची त्या कथांना, भाषा व शैलीच्या नव्यापणाला मोठी पसंती लाभली होती. ही निवड त्याचीच पोचपावती होती. या निवडीने वि. स. खांडेकरांना साहित्य वर्तुळात मान्यताप्राप्त साहित्यिक म्हणून सन्मान लाभला, तेथून सन्मानाची शृंखला आजीवन सुरूच राहिली. त्यानंतर गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव (१९३५), शारदोपासक साहित्य संमेलन, पुणे (१९३५), मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, दादर (१९३५), सोलापूर प्रांतिक साहित्य संमेलन (१९३६), दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, जमखंडी (१९४०) अशी एकापाठोपाठ एक अध्यक्षपदे त्यांना मिळत राहिली. सन १९४१ ला तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा (आजचे अ. भा. साहित्य संमेलन) रौप्य महोत्सवी अधिवेशनाचा अध्यक्षपदाचा बहुमान मिळून चाळिशीतच ते मराठी साहित्य, संस्कृती, भाषेचे अग्रणी नेते बनले. त्यानंतरच्या १९७५ पर्यंतच्या पस्तीस वर्षांत कोणत्याही मोठ्या साहित्य उपक्रमाचे अध्यक्षपदी वि.स.खांडेकरांकडे असणार हे ठरूनच गेलेलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,भा.रा.तांबे,केशवसुत यांची जन्मशताब्दी, नटवर्य केशवराव दाते सन्मान असे कितीतरी उपक्रम वि.स. खांडेकरांच्या नेतृत्वाने व सक्रिय सहभागाने पार पडले. निधी संकलन, स्मारक ग्रंथ संपादन,अध्यक्षीय भाषण इ.तून वि. स. खांडेकरांचं साहित्यिक मन, समाजाचं अनभिषिक्त सम्राटपण सिद्ध होत गेलं व मान्यता पावलं.
 भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींकडे सन १९२० च्या दरम्यान आलं. याच वेळी वि. स. खांडेकर यांनी लेखक म्हणून प्रवेश केला. भारतीय राजकारणाच्या गांधी युगाचा काळ हा वि. स. खांडेकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्व विकसित होण्याचा काळ होता ज्याला स्थूल मानाने टिळक युगानंतरचा स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणता येईल. या काळात १२ कादंब-या, २० कथासंग्रह, ७ लघुनिबंध संग्रह, २ रूपककथा संग्रह, ५ लेखसंग्रह, १ व्यक्ती व वाङ्मय, १ चरित्र, १५ पटकथा असं विपुल लेखन करून ते मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून समाजमान्य होते. १९३७ साली त्यांच्या 'छाया' बोलपटाच्या कथेस कल्पकता चित्रपट पत्रकार संघांचं ‘गोहर सुवर्णपदक' लाभलं होतं. भारतातील चित्रपट सृष्टीचा पहिला पुरस्कार म्हणून त्याचं असाधारण नि ऐतिहासिक महत्त्व असलं, त्यांना साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं चालून आली असली तरी त्यांच्या साहित्यकृतीस स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत मात्र नामांकित असे पुरस्कार लाभले नव्हते. नाही म्हणायला कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या पत्नी रमाबाई आपटे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ ठेवलेले कै. ह. ना. आपटे पारितोषिक -१९४२' वि. स. खांडेकरांना त्यांच्या क्रौंचवध' कादंबरीस मिळाले होते. ते पारितोषिक स्वीकारावे म्हणून रमाबाईंनी लिहिलेले २६ मे, १९४३ चे पत्र मोठे हृद्य होते. ते त्यांच्या आनंदाश्रमातून लिहिले गेले होते.
 सन १९६० ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली व वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति' कादंबरीस तो दिला गेला. ययाति' कादंबरी मराठी साहित्याची अभिजात साहित्यकृती म्हणून तिला साहित्य अकादमी (१९६०) व भारतीय ज्ञानपीठ (१९७४) असे पुरस्कार लाभले. मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ मिळवून देण्याचे कर्तृत्व वि. स. खांडेकरांचेच. 'ययाति' कादंबरी आजही मराठी वाचकांची वरची पसंती म्हणून ध्रुवपद टिकवून आहे.
 वि. स. खांडेकरांनी मराठीत चतुरस्त्र लेखन केलं. साहित्य व चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगल गुजराती, कन्नड, मल्याळम् आदी भाषांत अनुवादित झाले. काही साहित्य कृती रशियनसारख्या भाषेतही गेल्या. यामुळे वि. स. खांडेकर केवळ मराठी साहित्यिक न राहता ते भारतीय साहित्यिक झाले. भारतीय ज्ञानपीठ पारितोषिकाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी भारत सरकारने सन १९६८ मध्ये त्यांना पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी साहित्य अकादमीने साहित्यिक योगदानाची नोंद घेऊन 'महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केले. या विविध पुरस्कारांच्या निमित्ताने भारतभर त्यांचे सत्कार सन्मान झाले. षष्ठ्यब्दी गौरव, अमृत महोत्सव झाले. अनके विशेषांक, गौरव अंक प्रकाशित झाले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने डी. लिट. पदवी प्रदान केली. (१९७६) जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारने सन १९९८ मध्ये त्यांचे स्मृती तिकीट प्रकाशित केले. सन १९७५ च्या नागपूर येथे संपन्न पहिल्या विश्वहिंदी संमेलनात भारतीय श्रेष्ठ साहित्यिक म्हणनू सत्कार करण्यात आला. या नि अशा अनेक घटनांतून वि. स. खांडेकरांचं साहित्यिक श्रेष्ठत्व राजमान्य, लोकमान्य झालं.
 वि. स. खांडेकर बालपणापासूनच कृश होते. सतत ताप इ. विकाराने ग्रस्त असत. दृष्टी अधू असल्याने बालपणीच चष्मा लागलेला. तरुणपणी हिवतापाने ग्रस्त झाल्याने दीर्घकाळ उपचारासाठी व विश्रांतीस बांबुळीला दत्तक बहिणी वारणाआक्का बरोबर रहावे लागले होते. पुढे शिरोड्यात शिक्षक असताना सर्पदंशाने बेजार झाले होते. रक्तदाबाचा विकारही होता. त्यांच्या पत्रव्यवहारात, लेखात, मुलाखतीत, प्रस्तावनात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे उल्लेख सर्वत्र आढळतात. शिवाय पत्नी व मुलांचे आजारपण होतेच. या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत वि. स. खांडेकरांनी आपले वाचन, चिंतन, मनन, लेखन, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्य यात सातत्य ठेवले. ते त्यांनी ज्या अविचलपणे केले त्यांतून ‘शब्दचि आमच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोकां।' हा तुकारामांचा वस्तुपाठ त्यांचा आचारधर्मच होता हे प्रत्ययास येते.
 सन १९७१ संपत आले तसे उजव्या डोळ्याने जे वाचता यायचे ते ही येईनासे झाले. वृद्धत्व आणि अशक्तपणामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे धोक्याचे होते, पण वाचनच प्राणवायू असलेल्या खांडेकरांना शस्त्रक्रियेशिवाय शवाय पयार्य नव्हता. मागच्या ऑपरेशनचा अनुभव काही चांगला नव्हता. पण नाइलाज म्हणून १५ फेब्रुवारी, १९७२ ला डॉ. परांजपे यांचेकडे ऑपरेशन झाले. पण पुढे गुंतागुंत वाढत गेली. डोळा काढण्यावाचून गत्यंतर उरले नाही. अन् जगाला प्रकाश देणारा हा साहित्यऋषी स्वतः मात्र अंधार सोबती झाला. पूर्ण अंधत्व आले. तरी वि. स. खांडेकरांनी लेखन, वाचनाची आस सोडली नाही. प्रवास, फिरणे बदं झाले तरी घरी शतपावली चालायची. तशातच त्यांनी १९७५ चे कराडचे अखिल भारतीय साहित्य संमेलन, ज्ञानपीठ पारितोषिक समारंभ व त्याप्रीत्यर्थ दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूरचे सत्कार समारंभ केवळ लोकांच्या प्रेमामुळे पेलले. ऑगस्ट १९७६ मध्ये त्यांची प्रकृती वृद्धापकाळामुळे ढासळत गेली. ऑगस्टच्या शेवटी त्यांना मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. उपचार घेत असतानाच त्यांचे २ सप्टेंबर, १९७६ मध्ये दुःखद निधन झाले. त्यांची कोल्हापुरात 'न भूतो, न भविष्यति' अशी अंत्ययात्रा निघाली. त्यात मी एक पाईक होऊन अंतिम श्रद्धांजली अर्पण केली होती. मला खांडेकरांचा सहवास सन १९६३ पासनू लाभला तो त्यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून. नंतर त्याच शाळेत मी हिंदी शिक्षक झालो. त्या काळातही सतत भेटणं, बोलणं होत राहायचं. त्यांच्या आचार, विचारांचे व साहित्याचे संस्कार मजवर झाल्यानेच मी मूल्यनिष्ठ जीवन जगू शकलो, अशी माझी विनम्र धारणा आहे. त्यांच्या या ऋणाची परतफेड म्हणून शिवाजी विद्यापीठ व खांडेकर कुटुंबीय यांच्या मदतीने वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय सन २००४ मध्ये शिवाजी विद्यापीठात उभारू शकलो. सन २00१ ला त्यांच्या निधनास २५ वर्षे झाली. रजत स्मृती म्हणून त्यांच्या असंकलित व अप्रकाशित साहित्याचे संपादन केलं. कथा, कादंबरी, लघुनिबंध, आत्मकथा, वैचारिक लेख, मुलाखती, पटकथा संग्रह अशी १८ नवी पुस्तके प्रकाशित झाली. व्यक्तिचित्रे, भाषणे, विनोदी लेख वैनतेयचं लेखन अशी आणखी ७ पुस्तके प्रकाशित करून त्यांची रजत स्मृती पूर्ण होईल. हे चरित्र लेखनही त्यांच्या मजवरील संस्कारांचीच उतराई होय. दलितमित्र : बापूसाहेब पाटील

 बापूसाहेबांचा जन्म २६ नोव्हेंबर, १९१९ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण कोगनोळीत झालं. माध्यमिक शिक्षणासाठी म्हणून ते कोल्हापुरात आले. पुढे कोल्हापूरच त्यांची कर्मभूमी झाली. विद्यार्थिदशेपासूनच ते सार्वजनिक जीवनाकडे ओढले गेले. त्यामध्ये त्यांचे मामा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फार मोठा वाटा होता. कर्मवीर आण्णा कोल्हापुरी आले की, बापूसाहेबांना त्यांचा घरगुती सहवास लाभायचा, शिवाय संस्कारही. घरी मोठमोठ्यांची उठबस होत राहायची. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांचे रूपांतर धडाडीच्या नेत्यात झालं. अळीचं फुलपाखरू होतं तसं!
 १९३४-३७ च्या दरम्याच्या प्रांतिक स्वराज्य चळवळीने जनतेत राज्यशकट चालविण्याची आकांक्षा निर्माण केली. सन १९४२ च्या लढ्यात या महत्त्वाकांक्षेचं रूपातंर स्वयंपूर्णतेत झालं मबंई इलाख्यात बाळासाहबे खरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांतिक सरकारची स्थापना हाऊ न काँग्रेसच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालले होते याचा फार मोठा परिणाम विद्यार्थी व तरुण वगार्त आत्मविश्वास व उभारी निमार्ण होण्याच्या दृष्टीने झालेला. बापूसाहेब पाटील, यशवंत चव्हाण, वसंत नाईक, मनोहर बागी, डेव्हिड डिसिल्वा, लीला फडके प्रभृती तत्कालीन तरुणांनी 'स्टुडंटस् युनियन'ची स्थापना करून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होण्याचे ठरविले. बापूसाहेब या युनियनचे जनरल सेक्रेटरी झाले. घटनात्मक सर्वाधिकार असलेलं हे पद ‘डिक्टेटर' म्हणनू प्रचलित होते. पुढे या युनिनयनमध्ये फूट पडून जहाल मंडळी कम्युनिस्ट लाल निशाण पक्षाच्या वाटेनं गेली. या मंडळींवर क्रांतिकारी भगतसिंगाच्या रेव्होल्यूशन आर्मी'चा प्रभाव होता. बापूसाहेबांनी गांधीजींच्या शांततामय मार्गाचा स्वीकार करून समाजवादी काँग्रेसचे सभासद होणं पसंत केलं. या विचाराच्या विद्याथ्र्यांनी 'डेक्कन स्टुडंट युनियन' स्थापली. बापूसाहेब त्याचेही जनरल सेक्रेटरी झाले. या काळातली सर्व आंदोलनं, चळवळी, सत्याग्रह बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
 विद्यार्थी चळवळीतील बैठका, शिबिर, मेळावे, गुप्त खलबतं यात मुलींचा सहभाग अपवादात्मक होता. लीला फडके या त्यापैकी होत. त्यांची धडाडी पाहून बापूसाहेब त्यांच्याकडे आकर्षित झाले. पुढे बापूसाहेबांचा त्यांच्याशी प्रेमविवाह झाला. तो त्या वेळचा अशा प्रकारचा पहिला । आंतरजातीय विवाह होय.
 सन १९४५ ला त्यांचा विवाह झाल्यानंतरचा पहिल्या दहा वर्षांचा काळ कौटुंबिक संघर्षाचा जसा होता, तसा तो विचार व व्यवहाराच्या घालमेलीचाही होता. नोकरी करायची नाही हे बाप साहेबांनी ठरवलेलं. तसेच ते बी. ए., एलएल. बी. झालेले म्हटले तर जमीनदाराचे वकील होऊन सहज बस्तान बसवता आलं असतं. पण मळलेली वाटचालायची नाही हा त्योचा स्वभाव, स्वातंत्र्य, स्वराज्याचा हुंकार हुंगलेल्या बापूसाहेबांनी आजीवन निर्वेतन कार्य करण्याचं ठरवलं. शेवटपयर्तं ते निभावलं. त्यांचं या पत्नी लीलाताई पाटील यांच्या खंबीर साथीमुळेच हे शक्य झालं.
 सन १९४०-४२ चा काळ आठवतो. बापूसाहेब तसेच काही तरुणतरुणी त्या वेळी विद्यार्थी सघंटनेत सक्रिय होते. भारत छोडो' आंदोलनाचे वातावरण तापत होते. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी संघटनांपेक्षा कोल्हापूर येथील विद्यार्थी संघटना सक्रिय व आक्रमक होती. सांगली येथील एका व्याख्यानात सर्वश्री बाळासाहेब खेर, युसूफ मेहरअल्ली, सरदार पटेल प्रभृतींनी त्यांच्या कामाची जाहीर प्रशंसा केल्याचे ऐकून आहे. त्या वेळी आंदोलनासंबंधी वेगवेगळ्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्या संघटनेच्या गुप्त बैठका होत. सर्वश्री ह. रा. महाजनी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना. ग. गोरे आदींचे अशा बैठकांना मार्गदर्शन लाभले.
 सन १९४५-४६ चा काळ आंतरजातीय विवाहांना अनुकूल खचितच नव्हता. त्यांच्या उभयतांच्या घरात अशा निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. बापूसाहेबांचे घराणे कर्मठ जैनधर्मीय. कर्मवी भाऊराव पाटील त्यांचे मामा. पण घरी पारंपरिकतेचे समाजभय व दडपण होतेच. तिकडे तकड लीलाताईंचे इतके धर्मप्रभावी की घरी ब्राह्मणांची पण शिवाशिव चालायची नाही. बापूसाहेब प्रा. ना. सी. फडकेंचे विद्यार्थी. ते त्यांना राजाराम कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान शिकवायचे. त्यांच्या कानी त्यांच्या प्रेमाची कुणकुण गेली तेव्हापासून ते त्यांच्याशी थोड्या सावधपणे (खरे तर हातचे राखून!) बापूसाहेबांशी बोलायचे. मामांच्या (कर्मवीर भाऊराव पाटील) समजावण्यामुळे त्यांचे लग्न झाले.
 बापूसाहेब प्रारंभीच्या काळात राजकारणात सक्रिय होते. सन १९५५ च्या जवळपास त्यांनी राजकारण सोडून सामाजिक कामास वाहून घ्यायचे ठरवले. विशेषतः दलितांचे काम करण्याचे ठरवल्यावर या संदर्भा अनेक लढे, चळवळी, मोर्चे, सभा इत्यादींद्वारे हरिजनांच्या वतनांच्या जमिनी मिळवून देण्याकामी यश आले. फासेपारध्यांना पोलिसांच्या जाचातून मुक्त करता आले याचे त्यांना मोठे समाधान होते. या कामात लीलाताईंची मोठी मदत झाली. लीलाताईंच्या कामात मात्र आपण काही करू शकलो नाही,याची बापूसाहेबांना खंत असायची. त्यांच्या समाजकारणातील सक्रियतेच्या काळात अनेक हरिजनांना वैद्यकीय साहाय्य गरजेचे व्हायचे. अन्य डॉक्टरांचे तितकेसे साहाय्य झाले नाही. वॉनलेस हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सातवेकरांनी मोठी मदत केली. अशा अनके प्रसंगात लीलाताईंनी हरिजन रुग्णांना कितीतरी वेळा मनापासनू घरून डबे करून पुरविले. कार्यकर्ता म्हणून त्यांच्या घरात अनेकांची ये-जा, ऊठ-बस असायची. आल्यागेलेल्यांचे अतिथ्य हे एक मोठे कामच होते. ते लीलाताईंनी केले.
 सन १९५३ च्या दरम्यान बाई नोकरी करायला लागल्या. प्रथम तत्कालीन कोल्हापरू हायस्कूलध्ये त्या शिक्षिका होत्या. कोरगावकर ट्रस्टच्या नागाळा पार्क मधील विनय कुमार छात्रालयाच्या जागते पूर्वी ग्रामसेवाश्रम होता. तिथे एक छोटे गेस्ट हाऊस होते. त्यांचा पहिला स्वतंत्र संसार तिथे थाटला गेला. संन्याशाच्या संसारासारखा तो आटोपशीर होता. उत्पन्नाचे/ मिळकतीचे साधन म्हणजे लीलाताईंची नोकरी. पुढे प्रभाकरपंत कोरगावकरांनी जे. पी. नाईक यांचे साहाय्यक म्हणून बापूसाहेबांना मासिक १५० रुपयांचे साहाय्य सुरू केले. अर्थार्जन करता समाजसेवेला वाहून घेण्याचे त्यांनी ठरवल्यावर घरची सारी जबाबदारी लीलाताईंवर येऊन पडली. ती त्या जी शेवटपर्यंत पूर्ण केली. तेव्हापासून त्या बापूसाहेबांना दरमहा पैसे देत. ते देण्यात व घेण्यात कधी मानहानी झाली नाही. त्या काळात पूर्णवेळ सामाजिक परिवर्तनाचे काम उभयता करायचे.  पुढे लीलाताई सरकारी सेवेत गेल्या. त्यामुळे अकोला, पुणे अमरावती, रत्नागिरी, कोल्हापूर अशा अनके ठिकाणी बदल्या होत गेल्या. बापूसाहेब बहुधा कोल्हापूरलाच असायचे. कार्यक्षेत्र सोडायचे नाही, हे उभयतांच्या संमतीने ठरलेली गोष्ट होती. यात त्यांच्या गृहस्थी जीवनाची ओढाताण सतत हाते राहिली. त्यांचा मुलगा बाळ याच्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. त्याचे सारे लीलाताईंनीच केले. बापूसाहेबांनी जगाची मुले सांभाळली पण आपला मुलगा सांभाळू शकलो नाही याचे दु:ख त्यांना अनावर करत असायचे. पालक म्हणून मनातील अपराधी भावना मुलाच्या अपघाती निधनानंतर तर त्यांच्या या मनात प्रबळ झाल्याची जाणवते. त्यांच्या जाण्याने लीलाताईंच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली. पण लीलाताईंनी मोठ्या धैर्याने स्वतःस सावरलं!
 बापूसाहेब बी. ए.,एलएल.बी. झाले. लीलाताई बी. ए., एम. एड. झाल्या. शासकीय सवे ते सर्वोच्च पद मिळत असताना पदावनती घेऊन लीलाताईंनी अध्यापनाचे कार्य करणे पसंत केले. लोक त्यांना कुशल प्रशासक म्हणून मान्यता देत असले तरी प्रशासक होण्याचे टाळून हेतू त्या प्राध्यापक, प्राचार्या झाल्या. अध्ययन, अध्यापन, लेखन, संशोधन ही त्यांची आवडीची क्षेत्रे. प्रशासकीय कार्य त्यांनी केले. पण त्यात त्या फारशा रमल्या नाहीत. शासकीय सेवेत अनेकदा वरिष्ठांचा रोष त्यांना पत्करावा लागला. पण त्यांनी कधी विचार व व्यवहारात फारकत येऊ दिली नाही.
 या उभयतांनी आपापल्या क्षेत्रांत झोकू न द्यायचे ठरवले व ते शेवटपर्यंत निभावले. त्यांच्या संसाराच्या यशाचे सारे श्रेय लीलाताईंना द्यावे लागेल. बापूसाहेब बेशिस्त. लीलाताई घरी-बाहरे शिस्तीच्या भोक्त्या. बापूसाहेब बेहिशोबी (नि अव्यवहारी), त्या हिशेबी. मध्यमवर्गीय काटकसरीच्या संस्कारात त्या वाढल्या. लीलाताईंची काटकसरच त्यांचा संसार पार करू शकली.
 त्यांच्या विवाहानंतर उभयतांच्या घरच्यांचे एकमेकांशी संबंध राहिले, पण जाणे-येणे फारसे राहिले नाही. त्यांचे खरे कुटुंब कार्यकर्त्यांतूनच वाढले व विकसित होत गेले. जीवनाच्या अनेक प्रसंगात या जोडलेल्या आप्तांचे मोठे साहाय्य झाले.
 इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना लक्षात येते की, स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे महत्त्व पटले ते सुराज्य करण्याच्या ध्यासामुळे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात 'एकता' ही त्यांना अधिक महत्त्वाची वाटत आलेली गोष्ट होय. संगठन, संघर्ष, सर्वांतून त्यांना त्याचे महत्त्व उमगले.  त्या काळात राजकारण असो की समाजकारण ही काही मिळकतीची क्षेत्रे नव्हती. ते लष्कराच्या भाकऱ्या भाजणेच होते. पण त्यात मोठा आनंद होता. तत्कालीन समाजकल्याण मंत्री दादासाहबे रुपवते यांनी त्यांच्या कामाचे मूल्यांकन करताना म्हटले होते की, ‘इकडच्या महार समाजाने बाबासाहेब आंबेडकर व राजर्षि छ. शाहूनंतर कुणाचा जयजयकार केला असेल तर तो बापूसाहेब पाटलांचा. तो प्रसगं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची एका दृष्टीने मिळालेली पावती होती. आज आपला देश विभाजनाच्या उंबरठ्यावर येऊन ठाकला आहे. एक काळ असा होता की, केरळमधील एका छोट्या घटनेनेही कोल्हापूर बंद' पुकारला जायचा व तो यशस्वी व्हायचा. आज हा सर्व व्यवहार बंद झाल्याचे लक्षात येते. ही एकता आज राहिली नाही. आत्यंतिक भाषावाद, प्रांतीय संकुचितता, पक्षीय मर्यादांत आपण गुरफटलो आहोत हे सारं पाहून बापूसाहेबांना कधी कधी निराशा येते, पण लीलाताईंच्या कामात मिळणारं यश पाहिलं की त्यांची व्यक्तिगत मरगळ दूर होते.
 सन १९५५ ला बापूसाहेबांनी विचारपूर्वक राजकीय संन्यास स्वीकारून समाजकारण करायचे ठरवले. या काळात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहबे आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन, कार्य, विचार, साहित्य याचा सखाले अभ्यास केला होता. इतिहास हा बापूसाहेबांचा आवडता विषय. आजही ते दुर्मीळ ऐतिहासिक ग्रंथ मिळवून वाचून आपला व्यासंग जोपासताना मी पाहतो, तेव्हा त्यांच्या अध्ययनशील वृत्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहात नाही.
 सन १९४६ ला म्युनिसिपल कामगार संघटनेची स्थापना करून कार्य करताना जेव्हा त्यांनी दलित कामगारांची दुरवस्था अनुभवली त्यातून त्यांनी ‘दलितोद्धार’ हेच आपले जीवन कार्य ठरवले.
 वेळोवेळी दलितांवर होणाच्या अत्याचारांचा निषेध करणे, दलितांच्या संघटना बांधणे, दलितांसाठी कार्य करणाच्या राजकीय चळवळींना समर्थन देणे, झोपडपट्टीवासीयांचे लढे उभारणे, फासेपारधी समाजावर होणारे पोलिसी अत्याचार दूर करणे, अशा स्वरूपाच्या कामास बापूसाहेबांनी स्वतःस समर्पित केले. राष्ट्रसेवा दल, सर्वोदय, समाजवादी पक्ष, जनता पक्ष, कोरगावकर ट्रस्ट अशा अनके संस्था, संघटना, कार्यकत्र्यांच्या मदतीने त्यांनी वेळोवेळी लढे उभारले व ते यशस्वी करून दाखवले. व्यंकाप्पा भोसले, आबा कांबळे, बाळासाहेब कांबळे, दत्ता जाधव अशी अनेक नावे सांगता येतील की जी सारी मंडळी बापूसाहेबांच्या लढ्यातून उदयाला आली. महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून समता परिषदांच्या माध्यमातून बापूसाहेब यांनी बाबा आढावांच्या 'एक गाव एक पाणवठा' चळवळीस मोठे बळ दिलं. सन १९६० ते ७० हा बापूसाहेबांच्या सामाजिक कार्याचा ‘सुवर्णकाळ म्हणावा लागेल. १९६३ ला आमशी गावी झालेल्या दलितांवरील अन्यायाच्या विरोधात बापूसाहेबांनी दिलेली पुरुषार्थ लढत सामाजिक परिवर्तनाच्या स्वातंत्र्योत्तर लढ्यातील सोनेरी पान' ठरावे. या गावच्या सुमारे ८७ हरिजन कुटुंबात मिळून जगण्याचे साधन असलेली अवघी ४0 एकर जमीन (तीही जिराईत) तेथील सवर्णांनी दांडगाईने व कायद्यातील पळवाटा शोधून हडपण्याचा प्रयत्न केला. त्यातून झालेल्या संघर्षात चार खून झाले. दलितांना अपराधी ठरवले गेले. पण सामाजिक अन्यायांना पुरावे व साक्षीदार न मिळण्याचा शाप असतो म्हणे. बापूसाहेबांनी या दलितांचं नेतृत्व केलं. हरिजन परंपरेने सवर्णाचे दास असायचे. मयतांचे निरोप देणे, मेलेली ढोरं वाहून नेणे यासरख्या अमानुष चालिरीतींना बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली दलितांनी विराधे केला. त्यातनू हरिजनांचा छळ सुरू झाला. हरिजनांचे जाण्या-येण्याचे रस्ते बंद करणे, त्यांना पिण्याचे पाणी मिळू नये म्हणून गावबंदी करणे, एकट्या दुकट्या हरिजन स्त्रीस गाठून अचकट विचकटं हावभाव करणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार झाले. पुढे हरिजन शेतमजुरांनी संप केला. अशा प्रकारचा हा देशातील पहिला संप होय. याची नोंद तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांनीही घेतली होती.
 आरे गावातील हा लढा बापूसाहेबांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होय. आमशीच्या लढ्यात तर सरकारला नामुष्की पत्करायला लागून भरपाई द्यावयास लागली होती. न्यायालयातील कायदेशील लढाई सवर्णांच्या कावेबाजीने हररले तरी बापूसाहेबांनी सामाजिक न्यायाच्यातत्त्वावर सनदशीर मार्गाने जिंकून हरिजनांना जमिनी परत मिळवून दिल्या.
 महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षात बापूसाहेबांनी कोल्हापूर ते सांगली अशी निवडक कार्यकर्त्यांची पदयात्रा योजून श्री. वसंतदादा पाटील यांना निवेदन देऊन गांधीजींचा जीवन संदेश अंमलात आणण्यासाठी म्हणून २५ कलमी कार्यक्रम सादर केला होता. असेच निवेदन त्यांनी १०१ कार्यकर्त्यांचा पायी मोर्चा योजून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले होते. या धडपडीतूनही बापूसाहेबांची महात्मा गांधींच्या विचार व कार्यावरील श्रद्धा तर व्यक्त होतेच, शिवाय ते अंमलात आणण्याचा आग्रहही स्पष्ट होतो. आज समाजपरिवर्तन हे प्रसार माध्यमांतून होत आहे असे मानले जाते. दलित, शोषित आणि वंचितांच्या प्रश्नांचे नेमकेपण न हेरता सवंग पद्धतीने प्रसिद्धीचा भाग, साधन म्हणून प्रश्नांची हाताळणी होते असे वाटते व त्यामुळे गाभ्याचा भाग उपेक्षित राहतो आहे. ‘दलितमित्र' बापूसाहेब पाटील यांनी जीवनभर ज्या लोकचळवळीची कास धरली ती लापे पावत चालली आहे की काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सामाजिक प्रबाधे नाच्या वर्तमान स्थितीचे मूल्यांकन करून पुनर्माडणी करणे, नवे कार्यकर्ते घडविणे, नवी लोकचळवळ व लोकशिक्षणाची केंद्रे सुरू करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.
 स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी संघटना होत्या. त्या विशिष्ट वर्गाच्या मागण्यांपेक्षा व्यापक हिताच्या प्रश्नात रस घेत. स्वातंत्र्याची चळवळ मजबूत करण्याकडे त्यांचा कल होता. या सगळ्या प्रवासात भारताची उभारणी समाजवादी समाजरचनेची व्हावी असा त्यांचा ध्यास होता.त्यासाठी ते समाजवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणनूही कार्यरत होते. आजच्या विद्यार्थी संघटना व चळवळींचा वापर राजकीय हेतूंच्या पुर्ततेसाठी होत आहे. विद्यार्थीहिताचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते सोडवायचे. प्रमुखत: या संघटना आज एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाची शाखा म्हणनू चालतात. विद्यार्थी संघटनांनी व्यापक हिताला वाहन घेऊन शिबिरे, व्याख्याने, श्रमदान, लोकप्रबोधनादी मार्ग चोखाळत त्या आपल्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणाच्या कार्यशाळा बनविणे ही आता काळाची गरज झाली आहे.
 स्वातंत्र्योत्तर काळात पक्षीय अभिनिवशे वाढला आहे छोट्या-मोठ्या मताग्रहांपोटी व्यापक उद्दिष्टांकडे डोळेझाक होऊ लागली. राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन न राहता ते सत्ताप्राप्तीचे हत्यार बनले आहे. राजकारणात कार्यापेक्षा कारणाला, साध्यापेक्षा साधनांना व मूल्यांपेक्षा मतांना महत्त्व आले आहे. अशा परिस्थितीमुळे बापूसाहेब पाटील यांनी त्या वेळी राजकारण संन्यास स्वीकारून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले. प्रत्येकाची स्वतःची अशी राजकीय मतप्रणाली असते. अशा परिस्थितीत बापूसाहेब पाटील यांनी काया, वाचा, मने समाजवादी, विचारसरणीचा आजन्म पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेसारख्या मूल्यांचे ते आचार व विचारांच्या पातळीवर सक्रिय समर्थक राहिले. आज पुन्हा एकदा त्यांच्या वस्तुपाठाचा अंगिकार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आज समाजकारण ‘बुळ्यांचा खेळ' म्हणून उपेक्षिला जातोय. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वाधिक गरज असले तर ती छोटे उद्यागे वाचविण्याची, रोजगारांच्या संधी सुराक्षित ठेवण्याची, शिक्षण जीवनलक्ष्यी बनविण्याची, शेतीमालास किमतीची हमी देण्याची आणि वंचित वर्गाच्या हितसंबंधाच्या रक्षणाचीही. दुर्दैवाने समाजाच्या या कळीच्या मुद्यांकडे राजकारणी हेतुतः कानाडोळा करीत आहेत. आज खरी गरज आहे ती समाजकारण केंद्रित चळवळींना बळकटी आणण्याची. बापूसाहेब पाटील यांनी उत्तरायुष्यात समाजकारणाद्वारे समाजपरिवर्तनाचा जो आदर्श घालून दिला होता, त्याचा कित्ता गिरवणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. समाजकारण इतके प्रबळ व्हायला हवे की, राजकारणावर त्याचा अंकुश असायला हवा. ते बापूसाहेबांचे एक स्वप्न, एक ध्यास होता. आमशी, आरे, बीड, कुडित्रे येथे बापूसाहेबांनी दिलेले लढे या संदर्भात नव्या समाजकार्यकत्र्यांनी अभ्यासून समकालीन प्रश्नांच्या सोडवणुकीची व्यूहरचना करायला हवी.
 बापूसाहेब पाटील यांनी राजकारणाचा त्याग केल्यानंतर आयुष्यभर दलित, वंचितांच्या या मानवी हक्कांची पाठराखण केली. सवर्णांनी दलितांवर जेव्हा जेव्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा बापूसाहेब तुटून पडले. दलित संघटित होतात ते पाहिल्यावर तत्कालीन धन-साधनसंपन्न सवर्णांनी दलितांवर बहिष्कार, पाणीबंदी, वाटबंदी, रोजगारबंदी, पाणझच्यात विष्ठा टाकणे, दलित महिलांना शिवीगाळ करणे अशा हरत-हने अमानषु वागणकू दिली. त्या काळात काणे त्याही पक्ष, संघटनेचा ध्वज न मिरवता बापूसाहेब पाटील यांनी 'बळीचे संघटन करून अत्याचाच्यांचे कान पिळण्याचे असाधारण कर्तृत्व करून दाखविले. बापूसाहेब पाटील हे सारे करू शकले, त्यामागे विचारांवरील अविचल श्रद्धा, मूल्यांवरचा गाढ विश्वास, सचोटी, उद्दिष्टांची स्पष्टता, ध्येयनिश्चिती या गोष्टी होत्या.
 आज दलितांच्या संघटनांचे विभाजन, शोषितांच्या वर्ग संघर्षास लागलेले ग्रहण व अनाथ, निराधार, अंध, अपंगांसारख्या वंचितांचे अल्पसंख्य असणे, असंघटित राहणे, हे नव्या विश्वरचनेपुढे एक आव्हान बनून उभे ठाकले आहे. या वर्गाचे वाली कोण, असा प्रश्न आहे, सर्व राजकीय पक्ष या वर्गाकडे हक्काची, हुकमी गठ्ठा मतपेटी म्हणून पहात आहे. त्यांना या वर्गाच्या जगण्याच्या संघर्षाशी देणे-घेणे राहिले नाही.
 अशा काळात या वर्गाचे नेतृत्व प्रश्नकेंद्रित करणे हा ऐरणीचा प्रश्न होऊन बसला आहे. 'श्रमिक सहयोग सारखी अपवाद संस्था कोकणच्या कुशीतील पिंपळी खुर्द सारख्या छोट्या गावात ‘अंधार फार झाला तरी पणती जपून आहे. तिथले 'बापूसाहेब पाटील अभ्यास केंद्र प्रयोग म्हणून सर्वत्र उभारणे हा वर्तमानातील चक्रव्यूह भेदण्याचा एक हुकमी प्रयत्न व्हायला हवा.
 बापूसाहेब पाटील यांनी धरणग्रस्त, भूमिहीन शेतमजूर, झोपडपट्टीवासी, पारधी आदींसाठीही लढे दिले. आज या सर्व आघाड्यांवर सामसूम असल्यासारखी स्थिती आहे. प्रश्नरहित समाज कधी असत नाही. आजच्या काळातील प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्याचे नवे उपाय, कार्यपद्धती, लढ्याचे नवे तंत्र, कार्यकर्त्यांची घडण हे आजच्या निद्रिस्त समाजापुढचे ज्वलतं प्रश्न आहेत. बापूसाहेब पाटील यांचे आजचे स्मरण या संदर्भातील जागराचे नवे पर्व ठरावे म्हणून हा सारा खटाटोप.
  गीत नवे, मंत्र नवे, क्षितिज मोकळे
  स्वप्नांना फुटले हे पाय कोवळे|
बाल साहित्यिक : रा. वा. शेवडे गुरुजी

 वय वाढत निघाले की माणसू थकत जातो नि त्याची प्रतिमाही थकते असे सामान्यपणे दिसनू येते. शेवडे गुरुजींनी हे स्थूल समीकरण चुकीचे ठरविले नसते तरच आश्चर्य!' त्यांचा साहित्यिकाचा उत्साह वाढतो आहे. वयाच्या अमृतमहोत्सवात हे आपल्या साहित्यपूर्तीचाही अमृतमहोत्सव करताहेत हे पाहिलं की अचंबा वाटतो.
 शेवडे गुरुजींनी आपल्या व्यक्तिगत नि साहित्यिक जीवनात मादाम मॉन्टेसरी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांना आदर्श मानले. मराठी बालसाहित्याच्या प्रांगणात १ कवितासंग्रह, ४ नाट्ये ४० कादंब-या व ३० कथासंग्रह गुणात्मक भर घालणारे ते एकमेव साहित्यिक होत. अद्भुतरम्यता, हास्यकारकता, कल्पनासौंदर्य, सुबोध व नादमधुर भाषाशैली यांसारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे मुले पुस्तके निवडतात ती शेवडे गुरुजींचीच. ही निवड कोणत्याही पुरस्काराइतकीच त्यांच्या लेखनकलेचा गौरव करणारी आहे.
 गुरुजींचा जन्म १४ मार्च, १९१५ मध्ये झाला. मध्यमवर्गीय परिवार. शिक्षण हेच उद्धारांचे नि उदरभरणाचे एकमेव साधन वाटल्याने गुरुजींनी त्याची कास धरली.
 औपचारिक शिक्षणाच्या एम.ए., बी.टी.,मान्टेसरी डिप्लोमा, हिंदी कोविंदसारख्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. आपल्या नोकरीच्या कालखंडात त्यांनी शिक्षकांपासून ते प्राचार्यांपर्यंतची सर्व पदे भूषविली. पण गुरुजी या शब्दामागे येणारे आदर्श शिक्षकाचे ब्रीद त्यांनी कधीच सोडले नाही. मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्स, मुंबई येथील एक वर्षाच्या नोकरीचा अपवाद सोडल्यास सर्व सेवाकाळात ते शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. नाशिकचे त्र्यंबक विद्यामंदिर व कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूल व ताराराणी विद्यापीठ ही त्यांची कार्यस्थळे. पैकी उत्तरार्धातील २५ वर्षं ते ताराराणी विद्यापीठात अखडे सेवेत होते. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य 'अशा सतत बढतीच्या जागा मिळवून त्यांनी शिक्षण, प्रसारण क्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध केले. १४ मार्च, १९७३ मध्ये ते सेवामुक्त झाले. ही मुक्ती लौकिक होती.
 गुरुजींनी आपले महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात घेतले. १९३७-३८ ची गोष्ट असेल. तेव्हा ते बी. ए. शिकत होते. सतत वाचन, भाषणे ऐकणे. त्यावेळच्या छंदामुळे लेखनाची निमार्ण झाली. सुरुवातीस दैनिक पुढारीच्या रविवारीय परिशिष्टातील 'बालवाडी'साठी लिहिले. पुढे काही काळ दि. द. पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी ‘बालवाडी' हे सदरही चालविलं. बालवाडीतील सतत लेखनामुळे त्यांच्यातील लेखक आकारला. बालवाडीतील निवडक कथांचा संग्रह 'खेळणी' प्रकाशित झाला. त्यांच्या या पहिल्या कथासंग्रहास वि. स. खांडेकरांची प्रस्तावना लाभली. भाऊंच्या या प्रोत्साहनामुळे पुढे त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या लेखनावर सानेगुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या भाषा नि आशयाची छाप सहज लक्षात येते. साने गुरुजी हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यातील लेखनाची मिणमिणती पणती सतत तेवत राहिली ती साने गुरुजींच्या लेखनाच्या सतत वाचनाने. हे ते अभिमानाने सांगतात. पुढे ते मास्टर विनायकांसारखा कल्पक कलाकार व वि. स. खांडेकरांसारख्या सामाजिक जाणीव असलले या प्रतिभावंतांच्या सहवासात राहिले. मास्टर विनायकांकडे ते पटकथा लेखनाचे काम करीत. या काळात सिनेमाचे बिलोरी विश्व त्यांनी जवळून अनुभवले. चंदेरी दुनियेतील मास्टर विनायकांच्या कितीतरी आठवणी गुरुजी नेहमी सांगतात. लतादीदी, बाबूराव पेंढारकर इत्यादींविषयीच्या काही आठवणी तर मनाचा ठाव घेणा-या आहेत. वि. स. खांडेकरांच्या आठवणीप्रमाणे त्याही त्यांनी लिहायला हव्या होत्या. मराठी चित्रपटाच्या इतिहासातील तो अमूल्य ठेवा ठरता.
 गुरुजींना वि. स. खांडेकरांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांचे लेखनिक म्हणून सुरुवातीस ते भाऊंच्याकडे होते. पुढे भाऊंची दृष्टी अधू झाली. त्या काळी तर गुरुजीच भाऊंचे डोळे होते. भाऊंना नित्य वाचून दाखवायचे काम ते व्रत म्हणून करायचे. भाऊंच्या साहित्यिक गप्पा, चिंतन, लेखन, सामाजिक दृष्टी यांतून गुरुजींना जे मिळाले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात आपसूक पाहायला मिळते. गुरुजींनी -रंजनाबरोबर संस्कार हे बालसाहित्याचे अभिन्न तत्त्व अंगिकारले, ते साने गुरुजी व वि. स. खांडेकरांच्या प्रभावामुळेच.
 बालसाहित्यातील कला, नाटुकली, बडबडगीते, चरित्र कादंबरिका, आठवणी इ. अनके साहित्यप्रकार गुरुजींनी हाताळले. कथालेखक म्हणून बालसाहित्यात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या खाती जमा असलेल्या तीस कथासंग्रहांपैकी ‘रबरी फुगे', 'एक होता राजा’, ‘फजितवाडा’, ‘आचारवंत, ‘इमानी शेरू' हे उल्लेखनीय कथासंग्रह होत. या कथांमध्ये रंजकतेइतकेच उद्बोधनाचे कौशल्य असते. या संदर्भात त्यांनी लिहिलेली ‘सोनेरी मुंगूस ही कथा लक्षात घेण्यासारखी आहे. ही कथा ‘मंगल वाचन'मध्ये संग्रहित झाल्याने महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा ती वस्तुपाठ ठरली. मध्यंतरी एका स्वातंत्र्यसैनिकाच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ विचारवंत ना. ग. गोरे यांनी या कथेचा उल्लखे करून आजच्या राजकीय व सामाजिक जीवनाची चिकित्सा केल्याचे आठवते. यापेक्षा त्यांच्या कथेचा आणखी मोठा गौरव कोणता असणार?
 गुरुजींनी कुमारांसाठी सुबोध श्रीरामायणही लिहिलं आहे. गुरुजींच्या प्रकाशित पुस्तकांपैकी सर्वांत जाडजूड असलेलं हे पुस्तक प्रत्येक घरातील ग्रंथालयात यायला हवं. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण घर, शाळेप्रमाणे पुस्तके करीत असतात, अशी गुरुजींची ठाम श्रद्धा असल्यामुळे त्यांच्या सर्व कथा आदर्शवादी पठडीत बसतात. ‘वरदवंत’, ‘निष्ठावंत', 'आचारवंत', 'यशवंत', ‘पुण्यवंत' या शृंखलेतील सर्व कथा आदर्शवादी होत. संग्रहांच्या नावात ही त्यांचा आदर्श प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते.
 तारुण्याच्या शेतीची पेरणी बालसंस्काराच्या बिजातून व्हायला हवी, हे लक्षात घेऊन त्यांनी ४० कादंबऱ्या कुमारांसाठी लिहिल्या. १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुले-मुली ‘चंपक', 'चांदोबा'ची दोस्ती सोडून 'किशोर', ‘अमृत', 'अपूर्व’, ‘सर्वोत्तम'कडे वळायला लागतात. या काळात मुलांच्या या मनावरची अद्भुततेची मोहिनी हळूहळू कमी व्हायला लागते. त्यांना वास्तव नि वर्तमानाची ओढ लागत असते. गुरुजींच्या वास्तवाचे भान देणाच्या ‘गुरु नानक’, ‘फ्लॉरेन्स नायटिंगले', 'देवी अहिल्या', ‘अब्राहम लिंकन', 'नेताजी सुभाषचंद्र', 'बुद्धभक्त डॉ. आंबेडकर', 'मदर तेरेसा', विश्वकवी रविबाबू, ‘राजाराणी मीरा', करुणासागर ईश्वरचंद्र, ‘इंदिरा प्रियदर्शनी' व 'मानवतेचे पुजारी शास्त्रीजी' या काही उल्लेखनीय कादंब-या गुरुजींच्या या लेखनशैलीत चरित्रास कथारूप देण्याचं एक आगळं कौशल्य आहे. शीलवतं शिवराय' हा त्यांचा एकांकिका संग्रह ‘गरिबी हटाव' हे त्याचं आणखी एक छोटं नाटक. या नाटकातील संवादात प्रौढ औपचारिकता नाही. बालवयातील हरघडी तू मी करत चाललेल्या संवादातील भांडकुदळ अनौपचारिकता बाल-विश्वाच्या घटना यामुळे शेवडे गुरुजींची नाटके मुलांची वाटतात.
 विनोद हा प्रौढांप्रमाणे मुलांनाही भावणारा विषय. तो लक्षात घेऊन गुरुजींनी ‘जम्माडी जम्मत' या पुस्तकात दररोजच्या जीवनातील विसंगतीवर बेतलेले प्रसंग निवडून तयार केलेले चुटके संग्रहित आहेत. कोणत्याही मुला-माणसांच्या हातात हे पुस्तक जाऊ द्या, तो ते एका बैठकीत वाचल्याशिवाय उठणार नाही.
 गुरुजींनी बाळगाणीही लिहिली. ‘गंमतगीते' या नावाने ती प्रकाशित झाली. यांतील काही गीते मास्टर विनायकांना इतकी आवडली होती की, लतांनी त्याच्या रेकॉर्डस् कराव्यात, असे त्यांनी सुचविले होते.
 गुरुजी शाळेत असताना अनेक प्राथमिक शाळांत स्नेहसंमेलन, निरीक्षण, भेटी या निमित्ताने जात. एकदा ते असेच एका शाळेत गेले होते. स्नेहसंमेलनानिमित्त वर्ग सजावटीची स्पर्धा होती. गुरुजींना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
 गुरुजी वर्ग पहात एका वर्गात गेले. वर्गात तक्ते लावले होते. त्यात एक कविताही होती. गुरुजी ओळखीची कविता म्हणून पाह लागले. वर्गशिक्षिका पुढे आल्या नि म्हणाल्या, 'मी कविता लिहिते. ही माझीच कविता आहे. गुरुजींना ती कविता आपली आहे हे सांगायचं धाडस त्या उत्साही बाईपुढे कसं होणार?
 शिक्षक नि साहित्यिकाइतकेच गुरुजी माणूस म्हणूनही मोठे आहेत. गुरुजींच्या सहवासात येणारा प्रत्येक मनुष्य हे नित्य प्रतिदिनी अनुभवत असतो. साधी राहणी नि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव.
 सचोटी,प्रामाणिकता हा गुरुजींच्या जीवनमूल्यांतील एक अविभाज्य मूल्य. मी वि. स. खांडेकर तथा भाऊंच्या एका शिक्षण संस्थेत त्या वेळी सेवेत होतो. काही अंतर्गत मतभेद संदर्भात भाऊंना भेटायला गेले होते. गुरुजी भाऊंना वाचून दाखवत होते. गेलो सविस्तर बोलणे झाले. पण भाऊ मधल्या काळात निवर्तले. त्या बोलण्याच्या आधारे पुढे मी एक निवेदन काढले ते निवेदनच खोटे ठरविण्याचा प्रयत्न झाला. गुरुजींची साक्ष काढली गेली. गुरुजींनी सांगितलेले शब्द आजही माझ्या कानात आहेत. टेप जरी लावला असता तरी यापेक्षा वेगळे ऐकायला मिळाले नसते. त्याच्या आचरणातील या सचोटीनेच त्यांना गुरुजी बनवले आहे. मराठी बाल वाङ्मयात कथा, कादंबरिका, चरित्रे, नाटुकली, आठवणी इ. प्रकारच्या ८५ साहितयकृतींची भर घालणा-या अनेक पुरस्कार विजेत्या या साहित्यकारांनी महाराष्ट्राच्या गेल्या चार पिढ्यांना संस्कारशील केलं. गुरुजींमधील लेखकास कोकणाने आधार दिला. आजही गुरुजींचं कोणतंही पुस्तक प्रकाशित होवो कोकणातनू त्यास मोठी मागणी असते. देशावरील माणसांपेक्षा कोकणच्या माणसास आजही साहित्य, संस्कृतीचं वेड नि ओढ दिसते, त्याचं श्रये साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांच्या पिढीनंतर शिक्षकी संस्कारांची बैठक घेऊन लिहिणाच्या शेवडे गुरुजींना द्यावे लागेल. गुरुजींच्या पंच्याऐंशी वर्षांच्या वाटचालीनं महाराष्ट्राला दिलेल्या या पाथेयाची नोंद साहित्याच्या इतिहासकारांनी घ्यायला हवी.
 शेवडे गुरुजींच्या समग्र जीवनात साहित्य म्हणजे 'वयो ज्यष्ठा, मनो युवा'च मूर्तिमंत उदाहरण. आपल्या मूल्यनिष्ठ जीवनाचा त्यांनी १९८९ ला ‘अमृत महोत्सव' पूर्ण केला, तेव्हा गुरुजींनी ७५ पुस्तकं पूर्ण केली होती. एकदा त्यांना विचारलं, 'गुरुजी एकूण किती पुस्तकं झाली?' ते उत्तरले, ‘वयाला जेवढी वर्ष पूर्ण झाली तेवढी.' गुरुजींनी सुमारे ३६ कथासंग्रह, ४२ कादंब-या, नाटकं, चरित्रे काही बालकविता असं चतुरस्र लेखन केलं. त्यांच्या लेखनास आजवर अनके छोटे-मोठे पुरसस्कार लाभले. ‘वि. स. खांडेकर : चरित्र आणि आठवणी' या संस्मरणपर साहित्यकृतीस महाराष्ट्र शासनाने ‘विनायक कोंडदेव ओक पुरस्कार देऊन गौरविलं. एस. एम. जोशींनी अपर्ण केलेल्या एका साहित्यकृतीस त्यांना ‘साने गुरुजी पुरस्कार'ही। मिळाला आहे.
 मादाम माँटेसरी, ताराबाई मोडक, गिजाभाऊ बधेका प्रभृती बालशिक्षण तज्ज्ञांच्या सहवास नि मार्गदर्शनाने गुरुजींमधील शिक्षक आकारला. 'साधी राहणी नि उच्च विचारसरणी' हा सर्रास वापरला जाणारा परंतु आचरणास कठीण असलेला ‘जीवनमत्रं' गुरुजी आजही ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा'च्या ध्यासाने जपताहेत. शेवडे गुरुजींच्या नावामागे लागलेली ‘गुरुजी' उपाधी स्वघोषित नव्हे. अलीकडे लोक स्वतःच ‘सम्राट' ‘आचार्य म्हणवून घेताना दिसतात. रा. वा. शेवड्यांचे ‘शेवडे गुरुजी' होणं हा समाजाने त्यांच्या रोजच्या आचरण, व्यवहारातील निरीक्षणानंतर वापरलेला वाक्यप्रचार होय. असं जनताजनार्दनाने दिलेलं मोठेपण नि तेही अत्यंत सहज, अकृत्रिमपणे निव्र्याज भावनेनं दिलेलं- फारच अपवादात्मक लोकांना लाभतं. यापेक्षा गुरुजींच्या जीवन व कार्याचा गौरव तो दुसरा कोणता असू शकतो?
 गुरुजींचं समग्र साहित्य हे प्रामुख्याने ८ ते १० वर्षांच्या मुलांसाठी मुलांसाठी लिहिलले आहे. मानसशास्त्रानुसार हे वय सर्वाधिक संस्कारशील असतं. स्पंज नि टीपकागदासारखं टिपणारं, आत्मसात करणारं! गुरुजी स्वतःच्या साहित्यास बाल साहित्यापेक्षा ‘शिशुसाहित्य' म्हणणं पसंत करतात. खांडेकर एकदा म्हणाले होते (खरं तर लिहिते झाले होते!) की, ‘आठ ते दहा वयोगटातील मुलांना शेवडे गुरुजींचं साहित्य दिले तर वेगळा संस्कार देण्याची गरज राहणार नाही. या अर्थाने शेवडे गुरुजी बालसाहित्यातील ‘संस्कारशील नंदादीप'च होत. नंदादीप अंधाच्या गाभा-यात जसा कोप-यात तेवत राहतो, तसं गुरुजींच्या लेखनातील सातत्याचं आहे. अद्भुतरम्यता, हास्यकारकता, कल्पनाचातुर्य, सहजता, अनुप्रासिकता ही गुरुजींच्या साहित्याच्या यशामागील वैशिष्ट्ये होत. पूर्वीच्या पिढीतील ज्या लोकांनी त्यांचं साहित्य वाचलं ते आपल्या मुला-नातवंडांना हटकून गुरुजींची पुस्तकं भेट देतात, यातच त्यांच्या साहित्याचे थारेपणं सामावलेलं दिसतं. त्याची एक गोष्ट सांगतो. मदर टेरेसांवरचं एक पुस्तक बाजारात आलं असं कळल्यावरून मी एका पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. विक्रेता पुस्तकशोधत होता. एक वृद्ध गृहस्थ दुकानात आले नि विचारते झाले, ‘शेवडे गुरुजींच्यापुस्तकांचा संच' केवढ्याला हो. दुकानदाराकडे त्याचं उत्तर नव्हतं. तो हतबल होऊन म्हणाला, सगळी पुस्तकं मिळण' अवघड आहे. उपलब्ध आहेत ती देतो. मागणी जास्त असते. ते ऐकून माझ्या मनात एक विचार आला. हिंदीमध्ये लेखकाचं समग्र साहित्य रचनावली'च्या रूपात येते. या धर्तीवर गुरुजींच्या कथासंग्रह, कादंबरिका, चरित्रे याचे संच यायला हवेत व ते घरोघरी जायला हवेत. ज्याना कुणाला आपली पुढची पिढी संस्कारशील व्हावी वाटते, त्यांनी या संदर्भात सक्रिय पुढाकार घ्यायला हवा. | शेवडे गुरुजींनी साहित्य लेखनाबरोबर साहित्य संघटनांकडेही लक्ष दिलं. कोल्हापुरात सक्रिय असलेल्या ‘बाल-कुमार साहित्य सभा'चे ते संस्थापक अध्यक्ष. इथं अनाथ, निराधार बालकांसाठी चालविण्यात येणाच्या बालकल्याण संकुलात त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ‘बाल साहित्य संमेलन भरविण्याचा प्रघात पाडला.
 औदुंबराच्या कवी संमेलनासारखा तो वर्धिष्णू होतो आहे. केवळ मोठ्यांनी लहानांसाठी लिहून चालणार नाही. बालवयातच लेखनाचे संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी मुलांची ‘लेखन शिबिरे योजली. त्यांच्या या उपक्रमाने आता चांगलं बाळसे धरलं आहे.  त्यातून बालकवींचा (त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‘बालकवी' नव्हे!) छोट्या कवि-कवयित्रींचा एक काव्यसंग्रह आकारतो यात शेवडे गुरुजींच्या दूरदृष्टीचं गमक लक्षात येतं !
 शेवडे गुरुजींनी संस्कार पेरणीच्या याच ध्यास नि ध्येयातून अनेक चरित्रग्रंथांची निर्मिती केली. धर्म समाजसेवा, साहित्य, काव्य, राजनीती, दशे सेवा इत्यादी क्षेत्रातील आदर्श धुंडाळून ते मुलांपुढे ठेवायचे व बालवयातच त्यांच्या भविष्यवेधी स्वप्नांची रुजवण करायची असं द्रष्ट नियाजे ने गुरुजींच्या लेखनामागे असतं हे चरित्रांच्या स्वरूप व रचनेवरून ध्यानात येते. चरित्रासारखं प्रेरक लेखन काही लेखक इतिवृत्तात्मकासारख्या रूक्ष नि रटाळ शैलीत का करतात असा प्रश्न नहे मीच माझ्या मनात येतो. गुरुजी या सर्व चरित्रांची कथात्मक बांधणी करतात व ती चरित्रे कादंबरीच्या रूपात सादर करतात. मुलं गुरुजींचे साहित्य हटकून का निवडतात, याचं रहस्य या रचना कौशल्यात सामावल्याचं दिसतं. लिटल माँटेसरी : माईसाहेब बावडेकर

 'मॅन के म फ ाम अदर प्लसे अडॅ ट्रॅव्हल नन' असं इंग्रजीत एक प्रसिद्ध लोक प्रचलित वाक्य आहे. त्याचा आशय जगणं म्हणजे नुसतंश्वास घेणं नि सोडणं नाही, जगणं म्हणजे जीवन सार्थकी लावणं.काही माणसांचा जन्मच मुळी आजीवन अंगीकारलेल्या कायार्त जात असतो. अशी माणसं अपवाद असतात की, जी आयुष्यभर एका कामास वाहून घेतात. श्रीमंत माईसाहेब बावडेकर अशा व्यक्तीपैकी एक होत्या. त्यांच्या मृत्युपूर्वी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट.त्यांना दवाखान्यात दाखल केलं म्हणनू विचारपसू करायला मी डॉ.केळवकरांच्या ताराबाई पार्कमधील रुग्णालयात गेलो होतो. तिथं त्यांची सावली म्हणून गेली अनेक वर्षे सेवारत राहणाऱ्या संतोषला हाक मारताच तो माईसाहेबांपुढे भक्त हनुमानासारखा 'जी महाराज म्हणून अदबीनं उभारायचा.त्याचा शिरस्ता हा माईसाहेबांवरील भक्तीचं प्रतीक असायचा. चौकशीत कळलं की, माईसाहेबांचं खाणं संपलंय...' आता भिस्त गोळ्यावर नि कृत्रम प्राणवायूवर... अशा स्थितीतही माईसाहेब मनाने शाळेतच होत्या.
 शाळते कालच झालेल्या बाहुला-बाहुलींच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली म्हटल्यावर त्यांचं आतुरतेन, आनंदाने चष्मा लावून, थरथरत्या हातानं, भिरभिर नजरेनं वाचणं या साऱ्यात जगण्याचा आनंद ओसंडून वाहताना मी अनुभवला... या स्थितीतही वर्तानपत्रातलं शब्दकोडं सोडविणाऱ्या माईसाहेब. अतिदक्षता विभागात नाका-तोंडावर नळ्या असलेला रुग्ण शब्दकोडी सोडवतो हे पाहून तेथील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना मोठे अप्रपू वाटायचं,हे मी त्यांच्या डोळ्यातून अनुभवलं.हे सारं घडतं जीवनावरील अविचल श्रद्धेमुळं.  माईसाहेबांची माझी ओळख गेल्या वीस एक वर्षांतली. निमित्त होतं... अनुताई वाघ यांचं. कोसबाडच्या टेकडीवर, दाभोणच्या जंगलात बालशिक्षणाचा दिवा घरोघरी लावणाऱ्या अनुताई आमच्या बालकल्याण संकुलाबद्दल ऐकून होत्या. त्यांना दाखवायला म्हणून माईसाहेब आल्या होत्या. ती त्यांची नि माझी पहिली ओळख. त्या भेटीत कळलं की, माईसाहेबांना आलेल्या अकाली वैधव्याच्या उदत्तीकरणाच्या संक्रमणकाळात त्यांनी आमच्या संस्थेतली एक मुलगी सांभाळली होती. पुढे त्यांना त्यातून मुलांचा लळा लागला नि त्यांनी ‘बाल देवो भव' हे आपल्या जीवनाचं ब्रीदंच बनवून टाकलं.
 तरुणपणीच पतीनिधनाचा आघात सहन करावा लागलले या माईसाहेबांनी मुलांसाठी जीवन समपिर्त करायचं ठरवलं. खुद्द माँटेसरीकडूनच त्यांनी बालशिक्षणाचा ओनामा नि वसा घेतला. तो आजन्म जपला. शाळेतील मुलांशी वागा-बोलायची माईसाहेबांची रीत खानदानी होती. त्या स्वतः बालवाडीत शिकवत, तेव्हा जातीनं उभं राहून नमस्कार करून मुलांचं स्वागत करायच्या... या अमोल नमस्ते.. तुम्ही काल आला नाही...' असं बालवाडीतील मुलांशीही यांचे ‘अहो-जाहो बालणं बरचं सांगून जायचं. त्यामागं एक संस्कार असायचा. आपण मुलांचा, उगवत्या पिढीचा आदर करायचा. मग उत्तरायुष्यात ती आपला आदर करेल... ‘आधी केले नि मग सांगितले' च्या पुढचा आचारधर्म असायचा माईसाहेबांचा. सारं द्यायचं, सांगायचं, शिकवायचं ते आपल्या व्यवहारातून. माईसाहेबांबद्दल समाजमानसात आदरभाव होता, त्याचं हे रहस्य होतं.
 बालवाडीनंतर प्राथमिक शाळा सुरू झाली. चौथीपयर्ती माईसाहेबांकडे शिकललेली मुलं बाहेर रमायची-रुळायची अवघड व्हायचं. मग पालकांचा आग्रह म्हणून त्यांनी हायस्कूल काढायचं ठरवलं. आपल्या छपरीच्या बखरीत हायस्कूल मावायचं नाही म्हणून त्यांनी हायस्कूलच्या स्वतंत्र इमारतीचा घाट घातला, तो पालकांच्या उसन्या उत्साहामुळेच. आराखडा तयार करून प्रत्यक्ष इमारत बांधताना त्यांना पैशांची चणचण भासू लागली. शहरातील धनिकांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. तशी त्यांना वालावलकरांची आठवण झाली. माईसाहेब येणार म्हणून म्हणून बापूसाहेब वालावलकरांनी मला बोलावून घेतले. त्या वेळी मी त्यांच्या ट्रस्टचा सचिव होतो. बापूंना माईसाहेब घरी येणार म्हणून कोण आनंद झाला होता.
 ‘किती पैसे हवेत तुम्हास?' पाच हजार... माईसाहेबांचं उत्तर... शाळेला एकूण किती पैसे लागणार आहेत! पाच लाख रुपये. ‘दिले, तुम्ही राणीसाहबे आहात. मुलांचं काम करता... कुणाच्या दारी तुम्ही जायचं नाही... मी जिवतं असेपर्यंत...' माईसाहेबांची शाळा पूर्ण झाल्यावर बापूंनी सांगितलेली भूमिका मला माईंचं मोठेपण स्पष्ट करणारी वाटते. बापूंनी कोल्हापुरात कापडाचं दुकान सुरू केलं होतं. तेव्हा राजघराण्यातल्या स्त्रिया मोटारींनी यायच्या... मोटारीत बसायच्या... दुकानदारांनी हेलपाटे घालत साड्या दाखवायच्या... मग बापू कसे हेलपाटे घालायला लावणार? माईसाहेबांनी आपल्या बँकेतील ‘मनी बॅलन्स'ची कधी चिंता केली नाही. त्यांना माणसांच वेड होतं. मॅन बॅलन्स' हाच त्यांचा ‘मेन बॅलेन्स' होता.
 शाळेतील मुलं' हा माईसाहेबांचा जीवनाचा नर्मबिंदू. त्यामुळे शाळेतील मुले मोठी झाली की त्याची पहिली पसंती ही ‘माईसाहेबांची शाळा'च असायची. मुलांच्या सवयी, गुण-दोष, अक्षरज्ञान, नाव सारं माईसाहेबांना ठाऊक असायचं. शिक्षकाच्या जीवनाचे मूल्यमापन हे त्यांच्या हाताखालून किती मुलं गेली यावर होत नसतं. किती हाती लागली हे महत्त्वाचं. माईसाहेबांचे कितीतरी विद्यार्थी उच्चविद्याविभूषित झाले. सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांवर त्या सारखंच प्रेम करायच्या. मुलं-मुली, असा भेद त्यांच्या लेखी नसायचा.
 माईसाहेबांना वाचनाची मोठी आवड. सोमवारी माईसाहेबांचा महाविद्यालयात फोन ठरलेला. रविवारच्या अंकातील वाचलेली ‘पुस्तक परीक्षण’, ‘नवं कोरं' सारखी सदरं त्यांना सतत अस्वस्थ करायची... पुस्तक हाती येईपर्यंत दहा फोन नि पंधरा निरोप... मी त्यांच्या सान्निध्यानं रोज वाचायला शिकलो. त्या स्वतः वाचत. पुस्तकं विकत घेत. शिक्षकांना सांगत. वाचनसंस्कृतीवर त्यांनी व्याख्यानं आयोजली. वाचन चोखंदळ असायचं. वर्तमानपत्रातलं मदतीचं निवेदन त्या वाचायच्या. मदत पाठवायच्या. संस्थांना पाठबळ पुरवायच्या. सामाजिक संस्थांत मुलांना पाठवायच्या. स्वतः जायच्या, विधायकतेचं मोठं वेड, आपल्याला मिळालेल्या पुरस्कार रकमेतून त्यांनी पुरस्कार सुरू केले. स्वतःचं वैधव्य त्यांनी महिलांना ‘सावली सन्मान पुरस्कार' देऊन व्यापक केलं.
 ‘बालसेवा पुरस्कार' देऊन ‘बालनाम सुखबोधाय'चा ध्यास जपला. माईसाहेबांचं निरिच्छ, निरपेक्ष जगणं मी जवळून अनुभवलंय. भैयासाहेबांना दत्तक घेतल्यावर त्यांनी आपलं सर्वस्व त्यांच्या नावे केलं. डोळे पाहेपर्यंत पसरलेली जमीन, इस्टेट मुलाच्या नावे करून संस्थान विलीनीकरण करारातून शासनाकडून येणा-या अवघ्या पाचशे रुपयांत त्यांनी राहणं, जगणं स्वेच्छेने स्वीकारलं. मध्यंतरी त्यांना माहेरच्या वाटणीतून काही रक्कम आली. ती शाळेला देऊन बिल्डरच्या घशात जाणारं मुलांचं क्रीडांगण त्यांनी वाचवलं. हिऱ्याच्या कुड्या, मोत्याच्या बांगड्या, चपलाहार, अशी स्वप्नं त्यांना पडली नाहीत. कधी काळी त्यांच्या दारी बांधलेल्या घोड्याच्या अंगावर शंभर-दोनशे तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. इतकं वैभव लाभलेल्या या राणीन साध्वीसारखं साध राहणं, असा घरंदाजपणा माणसात जन्मतःच असावा लागतो.
 शाळेतील बालवाडी त्यांनी सन १९४६ ला सुरू केली होती. पन्नास वर्षे उलटली तरी त्यांनी स्वतः आखून घेतलेली शिस्त, शिरस्ता कधी सोडली नाही. विनाअनुदान शाळेची खरी कल्पना माईसाहेबांनी राबविली. शाळा चालवताना त्यांनी आपली स्वायत्तता जपली. कुणा शासकीय अधिका-याला त्यांनी भीक घातली नाही. शिक्षकांना शिक्षणबाह्य उपक्रमात राबवायच्या शासनाच्या धोरणांचा त्यांनी कठोरपणे विरोध केला.
 प्रवेशात कुणाची लुडबूड त्यांनी चालू दिली नाही. जिल्हाधिकारी असो की मंत्री, त्यानं पालक म्हणूनच यायला हवं, असा त्यांचा आग्रह असायचा. एकदा एका जिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्याच्या मुलीस त्यांनी प्रवेश नाकारला. पण मध्येच बदली होऊन आलेल्या एका कनिष्ठ न्यायाधीशाच्या मुलास एवढ्याचसाठी प्रवेश दिला की, त्यानं न्यायाधीश म्हणून प्रवेश मागितला नव्हता. तत्त्व, मूल्य, कायदा या माईसाहेबांसाठी रोजच्या जगण्याच्या गोष्टी होत्या. अशा माईसाहेबांचं जीणं म्हणजे मला समाजानं आपली श्रीमंती गमावणं वाटतं. त्या नावाच्या श्रीमंत नव्हत्या... त्यांची संस्कार नि व्यवहाराची श्रीमंती त्यांनी पाळलेल्या टिपू कुत्र्यासही कळत असावी. त्यानं कधी माईसाहेबांची पाठराखण सोडली नाही. त्यांचा संस्कार, व्यवहार, आचार पाळणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरले. त्यांच्या वारसदार विश्वस्तांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
मनुष्यपारखी समाजसेवक : के. डी. कामत

 १९७५ च्या दरम्यानची गोष्ट मी त्या वेळी कोल्हापूर येथील ‘आंतर भारतीच्या कारे गावकर हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. हायस्कूलमध्ये शिक्षक असताना मी अनके विषय शिकवले आपल्या मूळ विषयाशिवाय अडचण म्हणून कधी कधी असंबंध विषय शिकवावे लागत, तर कधी आवडीचे म्हणूनही. त्या काळात मी ‘समाजसेवा' शिकवायचो. त्यात शिकवण्यापेक्षा कृतीवर भर असायचा. श्रमदान शिबिरही असायचे. अशाच एका श्रमदान शिबिराला तेथील काम पाहून संस्थेचे अध्यक्ष डॉ. ग. श्री. मिरजे यांनी त्यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र के. डी. कामत यांना बोलाविले होते. कार्यक्रम झाल्यावर के. डी. कामतांचे आम्हाला कौतुक व मूल्यमापन करणारे पत्र आले. पत्रासाबेत कामाच्या किमतीएवढा मदतीचा धनादेश होता. सूचना होती की एवढ्या किमतीचे आणखीन सामाजिक काम भविष्यातही व्हावे. के. डी. कामत यांनी आचार्य विनोबांचे साहित्य वाचले की नाही मला माहीत नाही. पण ‘दान माणसास नादान करत' हे त्यांना माहीत होते. 'सत्पात्री नि चोखंदळ दान हे के. डी. कामतांच्यामधील समाजसेवक कार्यकर्त्यांचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य होय. कुणीही यावे, मागावे नि घेऊन जावे, असं दानाचं सदावर्त त्यांनी कधी थाटलं नाही.
 के. डी. कामतांची नि माझी झालेली ही पहिली ओळख. ती औपचारिक व अल्पकालिक परिचयापुरतीच मर्यादित होती. पुढे मी पीएच.डी. झाल्यावर तत्कालीन ‘रिमांड होम'चे काम पाहू लागलो. आमची भगिनी (खरे तर मातृ) संस्था असलेल्या ‘अनाथ महिलाश्रम'चे ते अध्यक्ष होते. कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांच्याकडे जाणे होऊ लागले व परिचयाचे रूपांतर ऋणानुबंधात झाले. गेल्या पंचवीस एक वर्षात आम्ही उभयतांनी अनाथ महिलाश्रम, बालकल्याण संकुल, दाभाळे कर ट्रस्ट, वालावलकर ट्रस्ट, सारस्वत बोर्डिंग अशा अनेक संस्थांतून एकत्र काम केले. पण आम्ही खरे एकमेकांचे ऋणाईत झालो ते अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यामुळे. या कामात माणसाची पारख असलेला एक सहृदय कार्यकर्ता म्हणून जवळून मी त्यांना पाहिले, अनुभवले आहे.
 त्यांच्याच आग्रहामुळे मी अनाथ महिलाश्रमाचेही कार्य करू लागलो. बालकल्याण संकुलासारखे अनाथ महिलाश्रमाचे कार्य व्हावे म्हणून त्यांची कोण धडपड असायची. अपुरे मनुष्य व अर्थबळामुळे ते शक्य असायचे नाही. त्यांच्या मनाची तगमग ते अनेकदा बोलून ही दाखवायचे. या अवस्थते नू त्यांनी महिलाश्रमाचे विलीनीकरण करायचे ठरवून तो बालकल्याण संकुलाला दिला. त्यास अनेक महिला सहकार्यांचा विरोध होता. इकडे बालकल्याण संकुलातील काही मंडळी अशी जबाबदारी घेण्यास तयार नव्हती. पण तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्यामुळे ते शक्य झाले. या वेळी संस्थेस कर्ज होते. कुणीतरी मागे बोलल्याचे कळाल्यावर त्यांनी आपल्या ‘दाभोळकर ट्रस्ट' मार्फत भरघोस साहाय्य दिले. तत्त्व नि व्यवहाराची बेमालूम सांगड कशी घालायची हे समाजसेवक के. डी. कामत यांच्याकडून शिकावं त्यांच्याशिवाय चांगले कसब असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही.
 चांगल्या कार्यकर्त्यामागे ते आपली सर्व शक्ती अडचणीच्यावेळी उभी करत असतात. एकदा एखाद्या सहकाऱ्याला आपले मित्र मानले की, त्याच्याशी प्रतारणा करणे हा त्यांचा स्वभाव नाही. बालकल्याण संकुलाच्या अनेक वार्षिक बैठकीत ते अक्षरशः इष्ट मित्र, नातलगांसह घरचे कार्य म्हणून येताना मी अनुभवले आहे. अनाथाश्रमाची पाखरण त्यांनी 'घर' म्हणून केली. काही लोक त्याबद्दल टीकाही करायचे. आपल्या टीकाकारांना वादावादी न करता आपल्या कार्याने शह देण्याची त्यांची शैली शिकण्यासारखी आहे.
 के. डी. कामत हे व्यवसाय व शिक्षणाने अभियांत्रिक, पण त्यांची लेखनाची हातोटी निष्णात वकीलाला लाजवणारी. सार्वजनिक संस्था, संघटनांशी त्यांचा पत्रव्यवहार हे त्याचे ठळक उदाहरण. सारस्वत बोर्डिंगची स्टेट बँकेकडून मिळविलेली भाडेवाढ ही केवळ त्यांच्या वकिली लेखणीची कमाई होय. एखादी गोष्ट करायची म्हटली की ते चिकाटीने टोकाने जाऊन करतात. प्रसंगी गांधीवादी मार्गाने ते उपोषण करतील, लोकशाही मार्गाने निवेदने देतील, भेटतील, समजावतील पण कोण झोपेचे सोंग घेऊ लागला तर कायद्याचा बडगाही दाखवायला ते कमी करत नसतात. वारंवार डोळ्यात पाणी आणून बोलणारा हा कार्यकर्ता मग असा कणखर होतो की, ज्याचे नाव ते. या कार्यकत्र्यांस अपयश माहीत नव्हतं.
 महिलाश्रमाचे कार्य करत असतानाच्या काळात त्यांचं घर हे महिलाश्रमातील मुलींचं ‘हक्काचं माहेर' होतं. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. कान्ता कामत या मुलींचं बाळंतपण, औषधोपचार हवं नको सारं पहायच्या. कामतसाहेबांना प्रत्येक मुलीची माहिती असायची. मुलींच्या लग्नात ते कन्यादान अगदी मनापासून करायचे. पदरी अनेक मुली असूनही या अनाथ मुलींबद्दलची त्यांच्या मायेत मी कधी दिखावा अनुभवला नाही. एका मुलीचं लग्न यशस्वी झालं नाही म्हणून जन्मदात्या बापाप्रमाणे भांडून पोटगी घेणारा मुलीचा बापही मी कामत साहेबांमध्ये पाहिला आहे.
 कामत साहेबांमधला साहेब' गेली पंचवीस वर्षे मी थाट नि रुबाबात पाहिला आहे. त्यांचा ‘साहेबी आलेख' मी कधी खाली आलेला पाहिला नाही. फोनवर
 बोलायची त्यांची ऐट केवळ साहेबी...
 ‘बोलाऽऽ!'
 ‘कुठून मशिदीतून की मठीतून?'
 “काय खबर?'
 अशी पृच्छा करणा-या फोनवरच्या संवादात आपुलकीही असते. अलीकडे त्यांना ऐकू कमी येते. त्यांचे मित्र आर. जे. शहा कमी ऐकू आल्याने निराश झालेत. पण कामतसाहेबांनी कमी ऐकू येण्याची अपवादात्मकही कधी तक्रार केली नाही. तक्रार म्हणजे निराशा, निष्क्रियता, नकार असे त्याचे जीवन तत्त्वज्ञान, त्यांचा साहेबी थाट बाहेर जसा तसा घरातही. बायको, मुले, मुली, सुनांचे पण ते ‘साहेब'च असतात.
 एखादी गोष्ट त्यांना सांगितली, पटली व त्यांनी करतो म्हटले की फत्ते झाली समजा, काम छोटं असो वा मोठं, ते करायचा त्यांचा कटाक्ष असतो. ते मध्यंतरी अमेरिकेला निघाले होते. तेथील अनाथ, निराधार मुलांचे संगोपन, पुनर्वसन विषयक माहिती घेऊन या म्हटल्यावर आपल्या दीड-दोन महिन्याच्या वास्तव्यातून किती तरी कात्रणे, वृत्तपत्रे, मासिके माझ्यासाठी घेऊन आले. निरीक्षणातील कितीतरी बारकावे सांगितले नि लक्षात आले, यांच्यात एक मनुष्यपारखी निरीक्षकही दडलेला आहे. आलेला मनुष्य का, कशासाठी आला, त्यांना कसे हाताळायचे याचं एक विलक्षण चाणाक्षपण त्यांच्यात मी अनुभवलं. ते मोठे आतिथ्यशील. घरी गेल्यावर कोणी चहापानाशिवाय जाऊच शकणार नाही. सही घ्यायला आलेल्या शिपायाचीपण मग यातून सुटका असत नाही. 'किरी कुंजर समान' (मुंगी-हत्ती) अशी त्यांची उदारता केवळ अनुकरणीय!
 ते अंकलीच्या शितोळ्यांचे वंशज, शितोळे घराण्यास शिवकालीन प्रतिष्ठा आहे. मंत्री, पुरंदरे परिवाराशी त्यांचे नाते संबंधही. पंढरपूरच्या विठोबाच्या पालखीतील पादुकांचे ते मानकरी. ते मोठे विठ्ठलभक्त. अंघोळ झाली की स्वतः बुक्का लावणार व उपस्थित इतरांनाही. त्यात प्रदर्शनापेक्षा भक्तिभाव मोठा असतो. माझ्यासारख्या नास्तिकासही ते तो लावतात, आपल्या मनाची सचोटी म्हणून.
 व्यक्तिगत जीवन व सामाजिक चेहरा अशी त्यांनी फारकत करून कुणाची फसगत केल्याचा इतिहास नाही. सारस्वत बोर्डिंगचा त्यांनी केलेला ‘कायाकल्प' हा त्यांच्या समाजकार्याचा कळस होय. छत्रपती शाहू महाराजांनी हे बोर्डिंग तत्कालीन सारस्वत अल्पसंख्यांकासाठी सुरू केलेले काळाबरोबर आपण बदलले पाहिजे अशी धारणा असलेल्या कामतसाहेबांनी सारस्वत बोर्डिंग सर्व जाति-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुले केले. एक धार्मिक मनुष्य समाजजीवनात मात्र धर्मनिरपेक्ष कार्य करतो हे केवळ व्यक्तीविकास नसून वैचारिक प्रगल्भतेचे व भविष्यवेधी चिंतनाचेच गमक होय. सारस्वत बोर्डिंग त्यांच्या धडपडीतून आथिर्क दृष्ट्या संपन्न व स्वावलंबी झाले. त्यांनी आपल्याकडे होणा-या धनसंचयाचा लाभ अनाथ, अंध, अपंग, मतिमंद संस्थांतील सर्वथा वंचितांच्य कल्याणासाठी करून दिला. के. डी. कामत व्यवसायानचे बाधं काम करणारे ठेकेदार नव्हते. तर नव्या समाजरचना व धारणेचा त्यांनी पकडलेला ठेका, त्यातील तान, ताल व सुरातील फेक दर्दी समाज हितैषीच जाणतील. त्यांच्या त्या उदार समाजसेवकास ‘सारस्वत रत्न' सारखी पदवीच शोभून दिसते.
 कामतसाहेबांनी ज्या संस्थांची धुरा सांभाळली त्यांची आर्थिक स्थिती नेहमी चांगली राहील याची त्यांनी नियोजनपूर्वक आखणी केली. सारस्वत बोर्डिंगप्रमाणेच अंकलीचे हायस्कूल, कौन्सिल आफैं ज्युकेशनसारखी संस्था सर्वांची आथिर्क बांधणी त्यांनी आपल्या पूर्ण कौशल्याने केली. कै. दे. भ. रत्नाप्पा कुंभार, करुणाकल्पतरु शां. कृ. पंत वालावलकर, धर्मानुरागी आर. जे. शहा हे त्यांच्या शैक्षणिक कार्यातील सहकारी. अशा दिग्गजांबरोबर कार्य करताना आपले ‘अर्थ’ विषयक कौशल्य कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले. प्रिन्सिपल शं. गो. दाभोळकरांना ते आपले सामाजिक गुरु मानतात.
 आपल्या गुरुबद्दल त्यांच्या मनात निस्सीम असा आदर. तो आदर शब्दापेक्षा कार्याने जपणे, जोपासणे त्यांना आवडते.
 के. डी. कामत हे माझ्या व्यक्तिगत आयुष्यात नेहमीच मार्गदर्शक व हितचिंतक म्हणून ‘आधारवड' वाटत आलेत. माझ्या कामाकडे त्यांचे तटस्थ लक्ष असते. त्यातील वेदनांची जाणीव त्यांना असते. अशी जाणीव यणे यासाठी लागते सहृदयता. ती त्यांच्यामध्ये आहे. वयापेक्षा मी त्यांना किती तरी लहान. पण मला ते नेहमी आदराने, आत्मीयतेने वागवतात. माझ्याशी बाले तात. मोठे प्रेम असते त्यात. माझ्यामागे नेहमीच ते कृष्णार्जुना प्रमाणे सुदर्शन घेऊन उभे असतात. मग कधी शरसंधान तर कधी पटवधर्नअसा विवेकी पवित्रा घेणारे कामतसाहेब वृत्तपत्रात येणा-या माझ्या प्रत्येक शब्दांचे चिकित्सक वाचक असतात. वाचलं की फोन ठरलेला. ही उदारता तेच दाखवू शकतात. कारण मनामागे त्यांच्या 'कृष्ण' नि ‘कपट' पटलं कधीच नसतात. एकदा वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लिखाणावर जाहीर प्रशंसा करणारा लेख लिहिणारे कामतसाहबे मला आप-पर भेद पलीकडे गेलेले सतं मनाचे समाज सेवकच वाटतात. Man is known by the company he keps असं म्हटलं जातं. त्यातील उभयांगांनी येणारा अर्थ सार्थ करणारे कामतसाहेब हे खरे मनुष्यपारखी समाजसेवक व माणुसकीची पखरण करणारे प्रति वारकरी. त्यांच्या वारकरी व्यक्तिमत्त्वात 'वार' करण्यातील भक्ती पण असते व प्रसंगी 'वार' करण्याची आक्रमकताही. त्यांचं सारं व्यक्तिमत्त्व जैसे को तैसा' अशा अलिखित कराराने विकसित झालंय. त्यांच्या फणसातील ज्यांना ‘गरे' मिळतील ती माणसं असतात. कवचावरील ज्यांना ‘काटे' बोचले असतील त्यांनी अंतर्मुख व्हावं. कामतसाहेबांच्या समग्र जीवनाची मला समजलेली ही ‘लिटमस टेस्ट' होय. मितभाषी समाजसेवी : प्रा. डी. एम. चव्हाण

 जिल्हा परिवीक्षा व अनुसंरक्षण संघटना मानद चिटणीस पदावर गेली पंचवीस वर्षे व्रतस्त वृत्तीने कार्य केलेले प्रा. डी. एम. तथा दादासाहबे चव्हाण प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे या पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. कोल्हापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे ‘दादा' निःस्पहूपणे व प्रसिद्धी विन्मखुतेने कार्य करणारे समाजसेवक म्हणून सर्वश्रुत आहेत. शहरातील अनेक बँका, सोसायट्या, ट्रस्ट, क्लब, शिक्षण संस्थांचे ते संस्थापक शिल्पकार आहेत. समाजातील इतक्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याची अमीट छाप सोडणारे दादा हे सर्व मौन व शातंपणे, स्थितप्रज्ञतने करत आले हे विशेष पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी विन्मुखतेने कार्य करणारे समाजसेवक म्हणून सर्वश्रुत आहेत. पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी इत्यादीच्या मोहजालात गुंतण्याचा त्यांचा स्वभाव नाही. काम करायचे पण ते कळू द्यायचे नाही, हा त्यांच्या स्वभावधर्मस्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल दादा कधी बोलल्याचे ऐकिवात नाही, असा या मौन समाजसेवकांच्या जीवन व कार्याचा परिचय सर्वांना व्हावा म्हणून हा लेख प्रपंच.
 दादाचे पूर्ण नाव दिगंबर मसाजी चव्हाण. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर, १९११ रोजी झाला. आईचे नाव विठाबाई. वडिल मसाजी हे तत्कालीन संस्थानी सवे ते अर्थ विभागाचे लिपिक होते. त्यांची आई किसरूळ (भोगाव)ची. दादा वयाच्या आठ-दहाव्या वर्षी आपल्या मावशीस दत्तक गेले. दादांना एक भाऊ व बहीण होती. दादांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या बाबूजमाल मशिदीजवळ भरणाच्या शिवचैतन्य विद्यालयात झाले. पुढे इंग्रजी इ. ४ थी पर्यंतचे शिक्षण न्यू स्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर ते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तेथून सन १९२७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. तेथून त्यांनी सन १९३३ मध्ये विज्ञान शाखांतर्गत बी. ए. (ऑनर्स)ची भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील पदवी संपादन केली. सन १९३४ मध्ये ते रसायनशास्त्र विषय घेऊन बी. एससी. झाले. विज्ञान शाखचे फेलो म्हणनू त्यांना राजाराम महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पुढे भौतिकशास्त्राचे डेमॉन्स्ट्रेटर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. राजाराम महाविद्यालयात शिक्षणापासून निवृत्तीपर्यंतचा काळ (सन १९२७ ते १९६९) त्यांनी घालवला. या कालावधीत त्यांच्या हाताखालून शिकून मोठे झालेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, अधिकारी झाले आहेत. दादांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेला आदर मी अनेक प्रसंगी अनुभवला आहे. दादांनी समाजसेवेच्या आपल्या कार्याचा प्रारंभ राजाराम महाविद्यालय कर्मचारी सोसायटी, कोल्हापूर जिल्हा गव्हर्मेन्ट सटस् को-ऑप बँक इत्यादींच्या स्थापनेने केला. सन १९६३ साली राष्ट्रसेवा दल, समाजवादी संस्काराच्या मंडळींनी प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आतंरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली. दादांचा या संस्थेच्या स्थापनेत फार मोठा वाटा आहे. या संस्थेत दादा काही काळ कार्याध्यक्ष होते. सध्या ते या संस्थेच्या उपाध्यक्षपदांची धुरा सांभाळत आहे.
 आंतरभारती विद्यालयाबरोबरच संस्थेने गरीब व हरिजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावयाचे ठरवले. दादांनी राजारामपुरीतील आपली जागा वसतिगृहासाठी देऊ केली. मुलांच्या जेवणाचा यक्षप्रश्न संस्थेपुढे होता. दादांनी पन्नास-साठ विद्यार्थ्यांचे जेवण स्वतःच्या शिवाजी पेठेतील घरात करायचे व ते राजारामपुरीत पोहोचवायचे. गरीब व हरिजन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दादांनी उचललेले हे सतीचे वाण आज दुर्मीळच म्हणावे लागेल! दादांच्या समाजकार्यात त्यांना घरातील मंडळींचे योगदान कुणालाच विसरता येणार नाही. समाजासाठी सतत राबत राहायचे. मोबदल्यात पद, प्रतिष्ठेचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही. मी अमुक केल्याचा दंभ, अहंकार दादांना कधी शिवला नाही. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!' या निष्काम कर्मयोगाची कास दादा सदैव धरत आलेत.
 जिल्हा परिविक्षा व अनुसंरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाच्या आजच्या वैभवशाली रूपाचे शिल्पकार दादाच. सुरुवातीस आश्रयदाते म्हणून दादांनी संस्थेच्या कार्याविषयी आस्था व्यक्त केली. संस्थेचे तत्कालीन मानद कार्यवाह प्रा. एन. जी. शिंदे हे दादांच्या कामाविषयी जाणनू होते. त्यांनी सन १९५७ मध्ये आपले साहाय्यक म्हणून निवडले त्या वर्षीपासूनच दादांनी सह कार्यवाह म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. १९६० साली प्रा. एन. जी. शिंदे यांच्या अकाली निधनाने संस्थेच्या मानद कार्यवाहपदाची जबाबदारी दादांवर येऊन पडली, ती आजवर. गेल्या २५ वर्षांत दादांनी डॉ. राधाकृष्णन् बालगृहाचे विस्तारित बांधकाम, कन्या अभिक्षणगृहाचा प्रारंभ व भवन निर्माण, अनिकेत निकेतनची स्थापना, बाल मार्गदर्शन केंद्राचा प्रारंभ करून संस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. आज संस्था उत्कर्षाच्या ज्या शिखराप्रत पोहोचली आहे त्यात दादांची चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.
 प्रा. डी. एम. चव्हाण हे तसे विज्ञानाचे शिक्षक, पण उर्दूवर त्यांची मास्टरी होती. ते एस.एस् सी बोर्डाचे अनेक वर्ष मॉडरेटर होते. आपलं काम चोख करायचा. त्यांचा रिवाज होता. सेवादलातील आपल्या मित्रांसोबत ते हॉटेल व्यवसायात आले. त्यावेळी पद्मा, सेरेकन, ओपल ही होटेल्स कोल्हापूरी जेवणासाठी प्रसिद्ध होती. फार कमी लोक हे जाणत असावेत की आज कोल्हापूरात तांबडा, पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. तो पद्मा गेस्ट हाऊसनं पहिल्यांदा प्रचारात आणला. अबोल राहून ध्येय व कार्य अविचल करत रहाण्याचे व्रत दादांनी जीवनभर जोपासलं ते स्वकौशल्यावर. घरातील सारेजण आपल्या आचार-विचाराचे बनवण्याचा त्यांचा चमत्कार हा दूरदृष्टीचं प्रतीक म्हणायचा. मोठ्ठा मुलगा प्राध्यापक झाल्यावर त्याला स्वतः घर बांधून देऊन स्वतंत्र करणारे दादा खरे पुरोगामी वडील. प्रतिभानगर वाचनालयाच्या स्थापनते ते आघाडीवर होते. जे जे समाजहिताचं ते ते करण्यात पुढाकार घेणारे प्रा. डी. एम. चव्हाण हे पुरोगामी बहुजन समाजाचे आदर्शभूत, अनुकरणीय, आदरणीय शिक्षक होते. निर्भय सत्याग्रही : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

 आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रबोधनाचे प्रवक्ते' म्हणून अग्रभागी आहेत. त्यामागे कार्य सातत्य, विचारांची स्पष्टता, ध्येयावरील निष्ठा व सतत समाजास जागृत ठेवण्याची धडपड दिसून येते. या साऱ्या मागे आपण कधीतरी वंचित, उपेक्षित असल्याची जाण असते.
 प्रा. एन. डी. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील. ढवळी या छोट्या गावी ते जन्मले. घरची गरिबी, आई-वडील, आजी-आजोबा निरक्षर, आजोबांनी आपल्या दोन्ही नातवांना एकदमच शाळेत घातले. जन्म, मृत्यूची नोंद सक्तीची असण्याचा तो काळ नव्हता. स्वातंत्र्यपूर्ण काळातील अर्थी शिक्षणेच्छू पिढी जून-जुलैमध्ये जन्मली. एनडी त्यापैकी एक. १५ जुलै ही त्यांची जन्मतारीख तशी सार्वत्रिक. विठ्ठल, मारुती मंदिरात लोकांचं येणं जाणं, घंटानाद (कधी कधी शंखनादही) यात भरणाऱ्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं.
 तो काळ भटा-बामणांच्या शिक्षणाचा. कुणब्याच्या पोरानं गुरं राखायची अशी आजोबांची धारणा. पण हा दरिद्री नारायण ज्ञानश्रीमतं होता खरा. आजोबांनी गुरुजींकडे साकडं घालून लकडा लावून या नारायणास हायस्कूलात धाडलं. इथं एन. डी. पाटील यांना खैरमोडे नावाचे शिक्षक भेटले नि त्यांचं जीवन बदलून गेलं. खैरमोडे सर वाचन वेडे. एन. डींनी त्यांच्याकडून वाचन संस्कार घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांना सामाजिक बनवलं. तो काळ ‘भारत छोडो' आंदोलनाचा होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारच्या प्रभावाचा तो काळ. किशोर वयातच यांनी दारूबंदी आंदोलनात भाग घेतला नि त्यांना अटक झाली.
 पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. इथे त्यांना डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विनायक गोकाक यांच्यासारखे इतिहास तज्ज्ञ, इंग्रजीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणनू लाभले. विद्यार्थी चळवळीत सतत सहभाग, अभ्यास वर्गांना उपस्थिती, शिबिरात सक्रियता, चळवळीतला सतत संचारता सा-यांतून त्यांच्यातील ध्येयवादी आकारला. शंकरराव मारे यांचे ‘जनसत्ता' पत्र ओरडत विकणारा नारायण 'कमवा व शिका'चे धडे गिरवत आचार्य जावडेकर, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी वाचू लागला व बघता बघता पुरोगामी बनला. सन १९४८ च्या गांधी हत्येच्यावेळी महाराष्ट्रात मोठी जाळपोल झाली. त्या वेळी पदवीधर झालेले एन. डी. आष्ट्याच्या ट्रेनिंग कॉलेजात शिकत होते. इथे त्यांनी गनीसाहेब आत्तारांचा सत्याग्रह पाहिला. एन. डी. पाटील निर्भय सत्याग्रही म्हणून आज आपणास दिसतात. त्यामागे संस्कार आहेत गनीसाहेब आत्तारांच्या निर्भय सत्याग्रहाचे. इथेच त्यांची भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी झाली. वडील व भाऊ एकाच वर्षी निधन पावले. निर्धन नारायणाला आईने कर्मवीरांकडे सुपूर्द केले. एन. डी. कर्मवीराचे आज्ञापालक विद्यार्थी बनले. कर्मवीर भाऊरावांनी त्यांना आपल्याच रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक करून स्वावलंबी बनवलं.
 प्रा. एन. डी. पाटील केवळ पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हते. त्यांच्यात एक समाजशिक्षक सतत जागा असायचा. शिकवायची खरी जागा त्यांनी जाणलले हाते . तो काळ त्यांच्या वैचारिक द्वंद्वाचा होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्याग, सेवा एकीकडे खुणावत असताना दुसरीकडे केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख प्रभृतींचा शेतकरी संघ आकषिर्त करीत असायचा. एनडींनी शेतकरी, कामगाराचं कार्य करायचं पसंत केलं पुढे ते विधिवत स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले. मजल दरमजल करत ते या पक्षाचे सरचिटणीस झाले. कायकर्ता ते पक्षप्रमखु असा त्यांच्या कार्याचा आलेख म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची निशाणीच. त्यांच्या जीवनातील प्रत्येक यशास कष्टाची अट असते.
 सन १९६०-७० च्या दशकात मी पोरगेलासा होतो.कोल्हापूरच्या शिवाजी, मंगळवार पेठेतच माझा वावर होता. या काळात त्र्यं. सी. कारखानीस, दाजिबा देसाई, यांच्या निवडणुका मी पाहिल्या आहेत.  कोपरा सभातील तरुण एन.डींच्या घणाघाती भाषणांचा मी साक्षीदार आहे. पुढे आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य पाहिलं आहे. सहकार मंत्री असताना एक सामाजिक कायकर्ता म्हणून त्यांना भेटण्या, बोलण्याचा, निवेदन देण्याचा योग आला. त्यांची विधान परिषदेतील काही भाषणं ऐकल्याचं आठवतं. तो काळ माझ्या मंत्रालयातील येरझाऱ्याचा होता. या काळात मी अनुभवलंय की, या माणसामागे सतत कार्यकर्त्यांच मोहोळ असायचं.
 प्रस्थापिता विरोधी सतत लढा दते त्यानी कार्य विचाराचं पुरोगामीपण, डावंपण जपलं. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करून आपण शिक्षणात क्रांती घडवून आणत असल्याचा आव आणला. प्रा. एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप ‘कृष्ण पत्रिका' पुस्तिका प्रकाशित करून त्यातील फाले पणा स्पष्ट के ला. प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलन, चळवळीबरोबरच प्रबोधनपर लेखनही विपुल केलं.
 सत्ताधारी असताना तत्त्व जपणारा अपवाद मंत्री म्हणून एन.डीचं लौकिक केवळ वादातीत. मुलास नियमाने प्रवेश घेणे, मंत्री म्हणून सवलती न घेणं, सत्तेबाहेर सत्ताकेंद्र विकसित न करणं, उपकृत न होणं इ. सारखे त्यांनी जाणीवपूर्वक पाळलेले नियम त्यांना निष्कलंक कार्यकर्ता, नेता, मंत्री, मित्र, सहकारी म्हणून नेहमी अग्रभागी ठेवत आलेत. एन्रॉन आंदोलन, जागतिकीकरण विरोधी चळवळ इ. पुरोगामी विचारवेधी कृतीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं ते आचार व विचारांच्या अद्वैतामुळे. हाकेसरशी पाच-दहा हजार माणसं जमवायची हिंमत असणारे एनडी म्हणजे 'नॉन डिस्पुटेबलपर्सन' म्हणून सर्वपरिचित आहेत.
 प्रा. एन. डी. पाटील यांचं नि रयत शिक्षण शिक्षण संस्थेचं अतूट असं नातं आहे. प्रथम विद्यार्थी नंतर शिक्षक, सदस्य, कार्यकारी सदस्य, आजीव सेवक, पदाधिकारी व अध्यक्ष अशा अनेक विणीतून रयतशी असलेलं त्यांचे संबंध दृढ होत गेले. पण आपली नाळ कायम रयतेशीच जोडून ठेवली.
 कर्मवीर भाऊराव पाटील यांची मृत्यूपूर्व अंतिम इच्छा म्हणून रयत शिक्षण संस्थेने त्यांना सभासदत्व बहाल केलं. शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यापन, प्रशिक्षण, लेखन अशा त्रिवीध मार्गांनी त्यांनी आपली छाप उमटवली. विद्यापीठीय व्यवस्थापनात सिनेट सदस्य, सल्लागार, तज्ज्ञ, कार्यकारी सदस्य, अधिष्ठाता म्हणून केलेल्या कार्याची लोक आजही आठवण काढत राहतात. रयत शिक्षण संस्थेचा चेहरा एन. डी. पाटील यांनी अनेक उपक्रमांतून जपला, जोपासला. आपण कधीकाळी वंचित होतो याचं भान ठेवत ते सतत ‘उपेक्षितांसाठी शिक्षण' ध्यास ठेवून योजना आखतात. त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय उघडायला, शिक्षणाचा बाजार मांडायला रयतेतही विरोध केला. त्यापेक्षा त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणं पसंत केलं. महाग शिक्षण घेऊन नोकरीस महाग होणारी सुशिक्षित बेरोजगारांची फलटण तयार करणारे कारखाने त्यांनी सुरू केले नाहीत. ‘पब्लिक स्कूल' धर्तीची शिक्षण केंद्र सुरू करण्याऐवजी त्यांनी आश्रमशाळा उभारल्या. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळेचं त्यांनी जाळं उभा केलं. नापासांची शाळा सुरू करून ‘एन.डींनी शिक्षण वंचितासांठी ज्ञानोदय विद्यालय सुरू केलं. बहुजन विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केली. स्पर्धा परीक्षा केंद्रांवर भर दिला. मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवली. दुर्बल शाखांसाठी विकास निधी जमवला. महषी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन सरू करून विठ्ठल रामजी शिंदेंच्या उपेक्षेची भरपाई केली. आपल्या शिक्षण संस्थांच्या खऱ्या समृद्धीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी सुरू करून शैक्षणिक प्रकाशने रुजवली. डॉ. आंबेडकर प्रबोधिनी, समाजवादी प्रबोधिनी, अधंश्रद्धा निर्मूलन समिती सर्वांच्या माध्यमातनू त्यांनी पुरोगामी आचार, विचार रुजवला. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यांची नोंद घेऊन त्यांना अनेक विद्यापीठांनी डी. लिट. पदवी बहाल केली. अनेक पुरस्कार त्यांना लाभले. असे असले तरी त्यांची अनेक स्वप्नं अद्याप पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत.
 संकटग्रस्तात अनाथांना अभय देणारं नंदनवन, गोकूळ त्यांना सुरू करायचं आहे. शासकीय अनुदानाशिवाय लोकवर्गणीतून ते चालवावं अशी त्यांची जिद्द त्यांच्या भविष्यलक्ष्मी वृत्तीचं प्रतीक होय. एन. डी. पाटील यांचं समग्र कार्य, कर्तृत्व, विचार म्हणजे भोगलेल्या दैन्य, दुःखांचं विधायक उदात्तीकरण होय. एनडीचं मोठेपण यातच दिसतं की ते भूतकालीन भोगात स्मरणकातर न होता त्यातल्या वेदनांची विधायक, रचात्मक, सर्जक फलश्रुती कशी होईल याचा त्यांना ध्यास असतो. म्हणून ते केवळ आक्रस्ताळी गरळ ओकत नाही राहात. ते रचनात्मक पर्यायाच्या शोधात असतात. आपल्या पूर्वसुरींबद्दल ते कृतज्ञपणे भरभरून बोलत राहतात. ही असते त्यांची ऋजुता. ते विरोधकांवर तोफ डागतात. त्यांना वैचारिकदृष्ट्या नेस्तनाबूत करतात. प्रस्थापितांजागी विस्थापित, वंचित, उपेक्षित आले पाहिजे म्हणून ते धोरणात्मक रचना करतात. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद इ.ची घोषणा न करता ते त्या विचारांनाच आपला आचारधर्म, आपली आचारसंहिता बनवनू टाकतात. मूल्यांशी प्रतारणा होणार नाही अशी ते सतत खबरदारी घेतात. कार्यात घराणेशाही त्यांना पसंत नसते. गुणवत्ता हा यशप्राप्तीचा ते राजमार्ग मानतात. शिक्षणास ते धर्मादाय कार्य न मानता राष्ट्रासाठी केलेली भविष्यलक्ष्मी पेरणी, गुंतवणूक म्हणून ते स्वीकारतात. अल्पमतात असतानाही विचार निष्ठेच्या बळावर बहुसंख्यांकांवर कुरघोडी करायची निर्भयता दाखवावी एनडींनींच. विचार व आचाराची दरी रुंदावत असतानाच्या काळात त्यांच्या जीवन, कर्माचं ऐतिहासिक मूल्य आहे. समाज गणु ग्राहक व्हायचा तर गुणगौरव अनिवार्य असतो. प्रा. एन. डी. पाटील यांचा होणारा प्रत्येक गौरव रया गेलेल्या रयतते पुन्हा एकदा गतचतैन्य भरेल. जननिष्ठ समाजशिक्षक : कॉ. गोविंदराव पानसरे

 आचार-विचारांचं आजीवन अद्वैत साधणं फार कमी माणसांना जमतं... ते जमवण्यासाठी विचारांची स्पष्टता व बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं विचार नि कृतीत सातत्य येतं ते अशा अटळ जीवन तत्त्वज्ञानातून. जीवन त्यांना कळलं हो' म्हणणाऱ्या कवीपुढे असतात वरील ओळी सार्थ करणाच्या गोविंदराव पानसरेंसारख्या व्यक्ती. आपल्याकडे आपण माणसास मोकळेपणानं संपूर्णपणे स्वीकारत नसल्यामुळे ब-याचदा माणसाचं मूल्यमापन योग्य. साजेसं होत नाही. तसं ते योग्य वेळीही होत नाही. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक,आर्थिक जडणघडणीत श्री. पानसरे यांनी आपल्या विचार व व्यक्तित्वाचा कधीही पुसून न टाकता येणारा असा वाटा उचलला आहे. विद्यार्थिदशेत असल्यापासून ते आजपावेतो सतत समाजसाठी झटणारा कायकर्ता म्हणून त्यांचे चरित्र माझ्यासारख्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्याला सतत आपणाकडे आकषिर्त करत असतं; त्यात व्यक्तित्व प्रभावापेक्षा कार्यकतृत्वाचा ठसा मोठा असल्याचं सतत जाणवतं!
 गोविंदराव पानसरे तसे मुळचे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हारचे. वडील पंढरीनाथ पानसरे छोटेसे शेतकरी. पुढे शेती गेली नि छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत राहिले. आई शेतमजूर. घरच्या ओढग्रस्त स्थितीत शिक्षण घेणे अशक्य म्हणून ते नगरला आले. तिथं पत्की नावाच्या एका शिक्षकाचं छत्र नि मार्गदर्शन लाभलं. ते कोल्हापूरला आले. छत्रपती शाहू महाराजांनी इथं सुरू केल्या अनेक बोर्डिंगापैकी प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इथली त्या वेळची आठ रुपये फी भरणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या वेळी बिंदू चौकात असलेल्या ‘बुक स्टॉल द रिपब्लिक'मध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचं काम पत्करलं त्या वेळी सध्याच्या बिंदू चौकात असलले डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुतळे खाली व एकमेकांपासून दूर होते. त्या पुतळ्यांमागे कौन्सिलचे मोठे दिवे होते. त्या दिव्याखाली अभ्यास करायचा व पुतळ्याच्या चबुतऱ्यावरच वामकुक्षी असं त्यांचं जीवन होतं. कोटीतीर्थ हे आंघोळीचं ठिकाण. अशी त्रिस्थळी जीवनयात्रा कंठत असताना, स्वतःचा स्वतःशी संघर्ष सुरू असल्यापासून ते वेगवेगळ्या चळवळीशी नातं जोडत गेले. कोल्हारला असताना पत्की सरांच्या विचार, कार्यान प्रभावित होऊन त्यांनी राष्ट्र सेवा दलात काही काळ उमेदवारी केली. कोल्हापुरात आल्यावर ते येथील विद्यार्थी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते झाले. मॅट्रिकमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शास्त्र शाखेत प्रवेश न मिळाल्यानं बी. ए. झाले. या काळात सप्रे गुरुजींचा त्यांना मोठा आधार मिळाला. शेख सनाउल्ला, शंकराव सावंत या आपल्या तत्कालीन सहका-यांसह त्यांनी १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे काम सुरू केलं. मधल्या काळात ते कोल्हापूर म्युनिसिपल कौन्सिलच्या जकात खात्यात शिपाई होते. पुढे शिपायाचे प्राथमिक शिक्षक झाले नि त्यांच्यातील कार्यकर्त्यानं संघटकाचं रूप धारण केलं.
{gap}}सन १९५५ ला गोवा मुक्ती आंदालनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रसेवा दलाच्या पठडीत वाढलेले अनके कार्यकर्ते पुढे समाजवादी पक्षात गेले. तसे पानसरेही. पण त्यांचा पिंड मुळातच मूलभूत परिवर्तनकारी विचारांच्या असल्यानं ते डाव्या समाजवादी गटात (Left Socialist Group) गेले. पुढे कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या जीवन व कार्याचा केंद्रबिंदू झाला. कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखालील सातत्यपूर्ण वाटचालीत त्यांनी अनके लढे दिले, चळवळी केल्या, तुरुंगवास भोगला, अनके कामगार संघटना उभारल्या नि विस्तारल्या. पक्षकार्याचा भाग म्हणून स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक जबाबदा-या पेलल्या. ऑल इंडिया स्टुडंडस् फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बार कौन्सिल, लेबर लॉ प्रेक्टिशर्स असोसिएशन, समाजवादी प्रबोधिनी, लाके वाङ्मय प्रकाशन गृह, अशा संस्था व संघटनात्मक कार्यातून त्यांनी काळम्मावाडी धरणगस्त आंदोलने, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, उपासमारविरोधी आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र राखीव जागांसाठी आंदोलन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलन आदींमध्ये केवळ सहभाग घेतला असं नव्हे, तर त्याचं नेतृत्वही केलं.  पानसरे एका विशिष्ट पक्षाचे संघटक वा कार्यकर्ते नव्हेत. ते कार्यकर्ते घडविणारे समाजशिक्षक आहेत. आधी केले नि मग सांगितले हा त्यांचा परिपाठ असल्यानं त्यांच्यामागं कार्यकर्त्यांच मोहोळ सतत घोंघावत असल्याचं मी अनुभवलंय! या माणसास कुठे, कसं नि कुणास घेऊन जायचं पक्कं भान असल्यानं त्यांची फसगत झाली असं कधी घडलं नाही. त्यांच्यामागे घोंघावणाच्या मोहोळात बुद्धिजीवी असतात नि श्रमिकही. कोल्हापूरच्या राजकीय नेतृत्वाचं पुढारीपण गेली अनेक वर्ष ते करत आलेत. पक्षीय अभिनिवेश सोडून राजकीय मंडळी ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात त्यांचं नाव गोविंदराव पानसरे!
 पानसरे जसे कुशल संघटक, तसे वक्ते नि लेखकही. कामगार, विद्यार्थी, कर्मचारी कुणाचीही सभा असो, प्रत्येकाला पानसरेंचे मार्गदर्शन हवंसं वाटत असतं. शिवाजी कोण होता?' हे १९८४ मध्ये लिहिलेलं त्यांचं पुस्तक युती शासनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात अधिक वाचलं जाऊ लागलं. त्यात त्यांच्यातील लेखकाचं द्रष्टेपण दिसून येतं. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले ‘राजर्षि शाहूः वसा आणि वारसा' हे पुस्तकही असेच लक्षवेधी. त्यांच्या विचार नि लेखनास एक चिकित्सक बैठक आहे. काळापुढे पाहण्याची त्यांची दृष्टी त्यांचं पुरोगामित्व सिद्ध करते. ‘मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न' सारखं त्यांचं पुस्तक वाचलं की। पक्षीय अभिनिवेशापलिकडे जाऊन समाजरचनेचं आकलन करण्याचं या माणसाचं कसब केवळ थक्क करून सोडणारं!' समकालीन समस्यांची तर्कपूर्ण मांडणी हे त्यांच्या लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य. समाज मतिगुंग होत असताना (खरं तर नेते समाजास गुंगारा देत असताना) पानसरेंनी आपल्या लेखणीनं प्रत्येक वेळी समाजास वैज्ञानिक दृष्टी दिली व काळाचं आव्हान पेलणारं मार्गदर्शन दिलं. '३७० कलमाची कुळकथा', 'मुस्लिमांचे लाड','पंचायत राज्याचा पंचनामा'सारख्या पुस्तिका ही त्यांची ठळक उदाहरणं! सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून कमीत कमी शब्दांत सोप्या पद्धतीनं लिखाण करणारे भाई माधवराव बागल-त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार गोविंदराव पानसरे यांना मिळणे क्रमप्राप्तच होतं.
 पानसरे हे कोल्हापुरातील निष्णात वकील. त्यांनी सतत कष्टकरी नि कामगार वर्गाची किली केली. बऱ्याच मडंळींच्या जागा बदलल्या की, वकिली बदलल्याचा अनुभव येतो. पानसरे यांचं असं घडलं नाही. कोर्टातील, कोपरा सभातील मांडणीत तुम्हास कधी खोट दिसणार नाही की विसंगती. तर्कशुद्ध विचार विवेचन हा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यवच्छेदक असा पैलू! याची जाण अनेकांना असल्याचं समाधान कोणास कधी मिळले असं वाटत नाही. पक्षकार्य ही त्यांची जीवननिष्ठा होय. वकिली ही त्यांची जीविका. या फारकतीमुळे हा कार्यकर्ता कणा नि-मान ताठ करून सतत निधड्या छातीनिशी उभ्या असलेल्या अजेय योद्ध्याप्रमाणं सतत झगडताना दिसतो.
 भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्यानंतरच्या अनौपचारिक प्रतिक्रियेत हा सामूहिक कार्याचा व्यक्तिगत गौरव असला तरी त्यात तुमचाही वाटा आहे, असं जेव्हा पानसरेंना म्हणताना मी ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे काही एरंडाचं झाड नाही. असेलच तर अक्रोडाचं. ज्याला संयम आहे, शालीनता आहे, त्याचबरोबर कणखरताही असाच एक माणूस हे करू शकतो. यश पचवायची मानसकिता लाभलेला हा कार्यकर्ता म्हणून मोठा वाटतो, कारण आपलं मोठेपणा दुस-यात दडल्याची यास जाण असते. एक निगर्वी, समाजशील माणूस म्हणून त्यांच्याबद्दल प्रत्येकास आदर वाटतो तो, ते कुणाचा कधी अनादर करत नाहीत म्हणून. त्यांच्याकार्यतृत्वाचा गौरव, मूल्यमापनाचं निमित्त पुरस्कार हे आहे. मी पक्षकार्यकर्ता नाही. त्यांचा-माझा संपर्कही फारसा नाही नि नसतो. पण त्यांच्याबद्दल मला का वाटत राहतं, असा प्रश्न मी मलाच विचारत राहतो, तेव्हा लक्षात येतं की जात, धर्म, पक्षविचार यांच्या पलीकडे जाऊन पानसरे प्रत्येक समाज घटकास स्वीकारतात. प्रत्यके माणसात घेण्यासारखं असतं, अशी उदारमतवादी धारणा या माणसाच्या व्यवहारात आढळते. पानसरे इतर कम्युनिस्टांसारखे कसे नाहीत, हा मित्राने मला केलेला प्रश्न! या प्रश्नाचं उत्तर हेच खरं त्यांच्या जीवन व कार्याचं न सुटणारं गणित! कळूनही न आकळणारं! आचरणास कठीण! गांधीवादी सर्वोदयी : प्रा. चंद्रकांत पाटगावकर

 प्रा. चंद्रकांत पाटगावकरांनी, युवावस्थेत स्वतः ला विद्यार्थी चळवळीद्वारे राष्ट्रीय चळवळीशी जोडलं. नंतर सेवा दलाचे ते सर्ववेळ सेवक नि सघंटक झाले. पुढे शिक्षक, प्राध्यापक झाले, तरी त्यांच्यातील राष्ट्रीय बाण्याच्या समाजसेवक, प्रबोधकाने कधी हाय खाल्ली नाही. कोयना भूकंप, बिहार दुष्काळ, हिंदी विरोधी दक्षिणेतील आंदोलन, श्रम संस्कार छावणी अशा किती तरी आव्हानात्मक प्रसंगी प्रा. पाटगावकर यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांचं झोकून देणं कधीच एकाकी नव्हतं. प्रत्यके शिबिर, प्रचार, प्रबोधन कार्यास ते आपल्या विद्यार्थ्यांसह उतरले. सरांचं मोठेपण मला त्यांच्या विद्यार्थीनुवर्ती व्यक्तिमत्त्वात दिसतं. शिक्षकांच्या हाताखालनू अनके विद्यार्थी जात असतात. त्यांच्या हाताला किती विद्यार्थी लागले हे महत्त्वाचं. अस्मादिकांशिवाय ‘उपरा'कार लक्ष्मण माने, देवदासी चळवळीचे जनक प्रा. विठ्ठल बन्ने, मराठी समीक्षक प्रा. कमलाकर दीक्षित, ऑस्ट्रेलियातील प्रख्यात मकरंद टेंबे, किर्लोस्कर उद्योगाचे प्रमुख श्याम गोखले वृत्तपत्र विद्याशाखेचे प्रमुख डॉ. ज. वा. जोशी हे त्यांच्या हाती लागलेल्या काही विद्यार्थ्यांपैकी होत. बऱ्याचदा शिक्षकच हा माझा विद्यार्थी म्हणून सांगत असतात. हे आमचे सर' अशी प्रत्यक्ष नि पाठीमागेही ओळख सांगणारे सरांचे अनेक विद्यार्थी मला माहीत आहेत.
 तत्कालीन भक्तिसेवा विद्यापीठातून सर मॅट्रिक प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्या वेळी १९४२ चे ‘भारत छोडो' आंदोलन समेवर होतं. सरांनी मॅट्रिक होऊन राजाराम कॉलेजमध्ये प्रवशे घेतला होता. इंग्रजांनी महात्मा गांधींना अटक केल्याची तीव्र प्रतिक्रिया त्या वेळच्या युवकांत, महाविद्यालयीन विद्याथ्यार्त उमटली. त्यातून विद्यार्थी आंदोलन उदयास आले. विद्याथ्र्यांनी कॉलेजवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र केलं. त्या वेळी कोरगावकर कंपौंडमध्ये राष्ट्रसेवा दलाची शाखा चालायची. राजा विचारे, विश्वनाथ बांदिवडेकर, जगन्नाथ फडणीस, बापूसाहेब पाटील प्रभृती मित्रांसह सर या शाखते सक्रिय होते. १५ ऑगस्ट, १९४२ ला त्या वेळीच्या रविवार बुरुजाजवळ आताचा (बिंदू चौक) बंड्या हरिदास नावाच्या पोलिसाने केलेल्या मारहाणीत बिंदू माधव कुलकर्णीचा मृत्यू झाल्याने विद्याथ्यार्तं तीव्र असंतोष निमार्ण झाला होता. आजचे कॉम्रड यशवतं चव्हाण त्या वेळी विद्यार्थी संघटनेचे नेते होते. त्यांचे त्या वेळी एक प्रभावी भाषण झाले. त्यातून ज्या अनके विद्यार्थ्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले, त्यापैकी सर एक होते. सोळा ऑगस्टला बिंदू माधव कुलकर्णीची निघालेली आजवरची कोल्हापुरातील सर्वांत मोठी अंत्ययात्रा, मुकयात्रा काढण्याच्या अटीवर त्या यात्रेत नि स्मशानभूमीवर ‘स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही', अशा शीर्षकाखाली जी प्रक्षोभक पत्रे वाटण्यात आली त्यात सरांचा सहभाग होता.
 सरांनी त्या वेळी पुढे ९ ऑगष्ट, १९४२ ते फेब्रुवारी १९४३ या काळात भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. बॅरिस्टर खर्डेकरांच्या सहकार्यामुळे ज्या अनेक विद्यार्थ्यांना जीवदान मिळाले, त्यात सर एक होते. त्यामुळे ते पुढे बी. ए. झाले, सन १९४६ ला पदवीधर झाल्यावर ते १९५० पर्यंत राष्ट्रसेवा दलाचे पूर्णवेळ सेवक म्हणनू कार्यरत राहिले. सन १९५०-५१ मध्ये ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात शिकले. पण विवाहामुळे शिक्षण खंडित झाले. विवाहानंतर सर विद्यापीठ हायस्कूलमध्ये इतिहास व नागरिकशास्त्राचे शिक्षक झाले. पुणे १९५४ ला ते बी. टी. झाले. सन १९५८-५९ ला बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीची एम. ए. केले. पदवी संपादिली. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या माध्यमातून राष्ट्रभाषा प्रचार कार्य कले. पुढे प्रारंभी कीर्ती कॉलेजात, तर नंतर शाह महाविद्यालयात ते हिंदीचे प्राध्यापक झाले. शिवाजी विद्यापीठाचे सिनेट नि कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांचे कार्य संस्मरणीय ठरले. आंतरभारती'च्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
 प्रा. पाटगावकर यांना मी १९६३ पासून आजवर अनेक अंगांनी स्तरावर पाहात आलो. ‘साधी राहणी नि उच्च विचारसरणी' असं परवलीचं जीवनसत्रू ते कधी सांगत बसले नाहीत. त्यांचे समग्र जीवन म्हणजे सुसंगत आचार नि आचार्य धर्माचा एक अनुकरणीय वस्तुपाठ. मला आठवतं सर, निवृत्त झाले १९८८ ला. निवृत्तीवेतन हाती आलं की माणसं चक्रवाढ व्याजाने ते गुंतवतात. सरांनी बालकल्याण संकुल, ‘सुटा'सारख्या संस्था, संघटनांची निवड करून त्यातील काही हिस्सा स्वेच्छादान केले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरांना बसचा मोफत पास मिळाला. सरांनी त्याचा वापर तीर्थयात्रा, अष्टविनायक यात्रा असा न करता ते महाराष्ट्रभर फिरत राहिले. डॉ. नेल्सन मंडलो, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्या जीवन व कार्यावर आधारित सुमारे हजारभर शाळांतून तीन लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलं.
 लेखन, प्रबोधन, संघटन, प्रचार, प्रसार, भ्रमण अशा अनेकविध मार्गांनी सरांनी समाजास सतत गती नि मती देण्याच सहकार्य केलं. सर्वोदय, राष्ट्रसेवा दल, रेडक्रॉस, रयत शिक्षण संस्था, आंतरभारती, गांधीतत्त्व प्रचार ही त्यांच्या जीवन व कार्याची क्षेत्रं. बापूसाहेब पाटलांच्या भाषेत मंदीच्या छायेत धुगधुगी धरून राहिलेल्या या मूल्यसंघटना. सरांसारख्या कार्यकत्र्यांनी मृत्यूपूर्व धडपड म्हणून जगवलेल्या एकविसाव्या शतकातला भारत मला अधिकाधिक भौतिकदृष्ट्या समृद्ध, उपभागे शील होणारा दिसतो आहे. युरोप-अमेरिकेतील समृद्धी हाच आमचा आता एकमेव आदर्श होऊ पाहतोय. भारतातील रोज समृद्धीकडे झेपावणाच्या प्रत्यके मध्यमवर्गीय कुटुंबातील एक निकटवर्ती अमेरिकेत असल्याचं दिसू लागलं असताना सरांचा अमृतमहोत्सव मागे पडणाच्या मूल्यांचं स्मरण देण्याच्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा ठरतो. सृजनानंदी शिक्षिका : प्राचार्या लीला पाटील

 लीलाताईंना मी सर्वप्रथम पाहिलं ते १९६३-६५ च्या दरम्यान, आंतरभारती विद्यालय नुकतंच सुरू झालेलं. बी. टी. कॉलेजच्या विद्यार्थांचे पाठ निरीक्षण करायला त्या विद्यार्थी घेऊन यायच्या. आम्ही आठवी-नववीची मुलं. पाठ झाला की त्या आमच्या शिक्षकांना (त्यांच्या विद्यार्थांना) काही सांगायच्या. त्यातलं फारसं कळायचं नाही पण त्यांच्या बोलण्यात चांगलं, रंजक , क्रियात्मक शिकवण्याबद्दलचं सांगणं असायचं. ऐकत असताना आमच्या मनातलं या बाईंना कसं कळतं, अशी माझी जिज्ञासा असायची. आज माझ्या लक्षात असं येतं की, सृजनात्मक नि आनंददायी शिक्षणाचा त्यांनी चालविलेला प्रयत्न हा काही शोध किंवा प्रयोग नव्हे. अध्ययन, अध्यापनाच्या प्रवासातील चिंतनातून उमजलेला तो शिक्षणविषयक आचार नि विचार होय. काहीतरी नवे करा म्हणून केलेला तो उद्योग नव्हे, तर शिक्षणविषयक चिंता नि चिंतनाची ती इतिःश्री होय!
 पुढे मी 'आंतरभारती'मधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालो. पुढील शिक्षणासाठी गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे डी.आर.एस.(एज्युकेशन) ही बी. ए., बी. एड. समकक्ष पदविका पूर्ण करताना शिक्षणशास्त्र विषयावरील लीलाताईंचे पुस्तक त्या वेळी सर्व विद्यार्थी आवर्जून अभ्यासायचे. अन्य लेखकांची पुस्तके शिक्षणशास्त्राचा विचार सांगणारी होती. शिक्षकाचा आचारधर्म सांगणारं, शिक्षण शास्त्रामागील शिक्षकाची सृजनात्मकता जागवणारं त्यांचं पुस्तक लीलाताईंच्या त्या 'मेथड मास्टर'च्या विवेचनांचा अर्थ सांगत गेलं. माझ्यातील कृतिशील शिक्षक लीलाताईंनी जागवला. द्रोणाचार्यांनी एकलव्याला कधी प्रत्यक्ष शिकवलं नाही, तरी त्याचं प्रेरणास्रोत द्रोणाचार्यच होते. लीलाताई हे माझे प्रेरणास्रोत! औपचारिकपणे नि अनौपचारिकपणे, प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष शिकवणारे, समजावणारे अनेक असतात. त्यापैकी ब-याचदा अनौपचारिकपणे नि अप्रत्यक्षरित्या जे शिकवतात, समजावतात, त्यांच्याकडून आपण अजाणतेपणे जे घेत असतो, त्यात सहजता असते. सहजतेनी झालेली रुजवण अधिक परिणामकारक असते. लीलाताईंच्यामधील ‘शिक्षक' असा दीर्घजीवी सर्जनात्मकता जोपासणारा आहे. याची मला सतत प्रचिती येत राहिली आहे.
 मी डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) पाठ्यक्रम पूर्ण करून औपचारिक शिक्षक झालो नि ‘आंतर भारती'त रुजू झालो. १९७३ मध्ये त्या श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य' म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या येथील प्राचार्य' म्हणून १९८५ पर्यंतच्या कार्यकालात सेवांतर्गत प्रशिक्षण, शिक्षण विस्तार कार्यक्रम, विविध उपक्रमात त्यांचं औपचारिक, अनौपचारिक मार्गदर्शन लाभत राहिलं. या साऱ्या प्रवासात त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली ती १९८५ मध्ये. त्यांच्या अध्यापक महाविद्यालयांचे ते 'सुवर्णमहोत्सवी वर्ष' होते. अनेक उपक्रमात त्यांनी एक उपक्रम योजला होता चर्चासत्राचा. विषय होता ‘मला लाभलेले पालकत्व. वक्ते होते प्रा. मंदाकिनी खांडेकर, वि.स.खांडेकरांसारखं समृद्ध पालकत्व त्यांना लाभलं होतं. दुसरे होते ‘उपराकार लक्ष्मण माने- आपल्याला लाभलेल्या उपेक्षित पालकत्वाबद्दल ते बोलले. मी असा वक्ता होतो की मला पालकत्वच लाभलेलं नव्हतं. अनाथ म्हणून मी काय बोलणार याकडे लीलाताईंचं अधिक लक्ष होतं, असं माझ्या लक्षात आलं. इतरांचे पालक लादलेले होते. मला लाभलेले पालकच मी सांगितले. परिसंवाद समोर बसून ऐकणाऱ्या लीलाताईंच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा मला आजही आठवतात. लीलाताईंचा ‘कठोर प्रशासक म्हणून त्यांचा अधिक गवगवा झाला. त्यांच्यातील सजग, संवेदनशील शिक्षकाची मात्र सतत उपेक्षाच झाली. गेल्या तपभराच्या निकट सहवासात मला समजलेल्या लीलाताई या त्यांच्या सर्वपरिचित ओळखीपेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत.
 लीलाताईंच्या व्यक्तिगत आयुष्यात संतुलित पालकत्व लाभलं नाही. त्याची खंत त्यांनी कधी व्यक्त केलेलीही मी ऐकली नाही. वडिलांबद्दल त्या नेहमी आदरानेच बोलत आल्या. आई मनोरमाबाईंच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष जागा होती.  आईच्या मृत्यूनंतर ‘मनोरमा महिला व बाल उत्कर्ष विश्वस्त कुंज' स्थापन करून त्यांनी हे स्पष्ट केले. लीलाताईंच्या प्रत्येक कृतीमागे दीर्घ चिंतन, सूक्ष्म नियोजन व भविष्यवेधी लक्ष्य असतं. व्यक्तिगत दुःखाचं सामाजिक उन्नयन हा त्यांच्या जीवन पद्धतीचा अविभाग्य भाग होय.
 घरातला कर्त्या वयाचा मुलगा गेला म्हणून लीलाताई कधी हळहळत बसल्या नाहीत. त्यांनी जगाची मुलं गोळा केली व त्यांना शिकवलं. आपल्या बदलीच्या नोकरीत मुलास न्याय देता न आल्याचं शल्य त्यांनी असं व्यापक कृतीनं दूर केलं. आईच्या नावे पुरस्कार सुरू केला तो आईच्या व्यक्तिगत आयुष्यातील परवड लक्षात घेऊन.
 लीलाताईंचा नि बापूसाहेबांचा संसार प्रेमविवाहाने सुरू झालेला. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांच्या पत्नींनी संसार सांभाळायची एक रीतच रूढ झाली होती. बापूसाहेबांच्या प्रत्येक कामास लीलाताईंनी पाठबळ दिलं नि अर्थबळही पण केलेल्याबद्दल न बोलण्याचा कटाक्ष लीलाताई कशा आजन्म पाळू शकतात हे मला अद्याप न उमजलेलं एक कोडे होय.
 स्वतःला एखाद्या कामात गाडून घेतलेली माणसं बहुधा विक्षिप्त, एकसुरी जीवन जगतात. जीवित कार्यापलीकडचं जग त्यांना फारसं माहीत असत नाही. लीलाताईंचं तसं नाही. शिक्षण म्हणजे बालशिक्षण एवढीच त्यांची समज नाही. विविध शिक्षण आयोगांचा त्यांचा अभ्यास, उच्च शिक्षणाबद्दलचं त्यांचं चिंतन हे त्यांच्या शिक्षणविषयक विस्तारलेल्या क्षितिजाचंच निदर्शक होय. शिक्षणापलिकडे साहित्य, संगीत, कला, निसर्ग, बागकाम, गृहशोभन, आधुनिकता, स्त्री-मुक्ती, समाज अशा कितीतरी विषयात त्यांना गती नि रुची आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांची त्यांना चांगली जाण आहे. या भाषांतील साहित्याचे वर्तमान प्रवाह त्या चांगल्या जाणतात. त्यांच्याशी फोनवर बोलतानाही त्या मला जिज्ञासू असल्याचं वारंवार जाणवलं. आपल्याला माहीत नाही ते विचारण्यात त्या संकोचल्या तर कधीच नाहीत पण आपण ज्यास विचारतो तो त्यातला दर्दी असल्याची दाद देण्याची त्यांची अदा पाहिली की, त्यांच्यातील संस्कारित प्रगल्भता लक्षात यायला वेळ लागत नाही.
 मराठीतील'साजणवेळ असो किंवा उर्दूतील 'कैफियत' साऱ्या ध्वनीफितींची त्यांना जाण असते. त्यांचं घर हे त्यांना गृहशोधनाची कशी दृष्टी आहे याचं सुंदर प्रतीक! कुणाच्या घरी- बागेत चांगलं झाडं, फूल दिसलं की त्या हेरतात. आपल्याकडचं दुसऱ्यास देण्याची त्यांची उदारता केवळ अनोखी. मला मध्यंतरी पुरस्कार मिळालेला कुणी- किती प्रकारच्या भेटी, पुस्तकं, वस्तू दिल्या. लीलाताईंनी मोठ्या कष्टानं तयार केलेली एक छोटी, सुबक कुंडी मला दिली होती. 'Grow your Happyness!' म्हणत. लीलाताईंच्या बोलण्यात (प्रत्येक!) प्रामाणिकता असते. राग नि प्रेम हे त्यांच्या जीवन तराजूत मी नेहमीच एका न्यायाने तोलत राहिल्याचे अनुभवले आहे. ‘पोटात एक नि ओठावर दुसरे' अशी आपली नि दुस-यांची फसगत करणारे तथाकथित शिष्टाचार त्यांनी कधी पाळले नाहीत. राग नि प्रेम मनापासून करणा-या लीलाताई मी जवळून पाहिल्या आहेत.
 वरून काळ्याकभिन्न पत्थरांनी घेरलेल्या डोंगर पर्वतात रसरसता ज्वालामुखी असतो, तसे जीवनदायी जलस्रोतही त्यात सुप्तपणे वावरत असतात. लीलाताईंनी मला अनेक प्रसंगात मोठ्या बहिणीचे प्रेम दिलं नि मार्गदर्शनही. संवेदनशील लीलाताईंचं मी पाहिलेलं रूप फार कमी लोकांनी अनुभवलं असावं! हिंद कन्या छात्रालयातील संगीता सुट्टीत घरी का जात नाही म्हणून चौकशी करता ती अनाथ असल्याचे कळाल्यावर आपल्या घरी तिला सुट्टीत नेणा-या लीलाताई कितीजणांना ठाऊक आहेत? ‘आशा नावाची माझी विद्यार्थिनी केवळ पारंपरिक मुस्लीम संस्कारामुळे खितपत पडल्याचे लक्षात आल्यावर तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आणणाच्या कुंकू लावण्यातील लावण्य समजावणाऱ्या, चष्म्याची फ्रेम कशी असावी तो सल्ला देणाऱ्या लीलाताई- त्यांच्यातील ‘भानू अथैय्या' चा प्रत्यय देताना मी पाहिल्या आहेत.
 लीलाताईंनी निवृत्तीच्या वयात छोटे केस ठेवायला सुरुवात केली. कमीज-कुर्ताही त्यांनी निवृत्तीनंतर वापरायला सुरू केला. आधुनिकता, सुधारणा, नवमतवादाचा संबंध मनाच्या मशागतीशी असतो. त्याला वय, वार्धक्याच्या मर्यादा लोक उगीच लावत असतात, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणानेच दाखवून दिले. रुईकर कॉलनीत १९८५ नंतर स्त्री-मुक्तीच्या झुळका लाटा झालेल्या मी जवळून पाहिल्या आहेत. स्त्रीस शरीराच्या चौकटीत बांधून बंदिस्त करणारी समाजरचना लीलाताईंनी ‘दो टूक' लेखन करून मोडली. लेखनातील त्यांचे धाडस तस्लिमा नसरीनच्या अगोदरचं आहे, हे ‘ओलांडताना' सारखं पुस्तक वाचताना लक्षात येतं. ‘मोडेन पण वाकणार नाही' हा तर लीलाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा असाधारण पैलू. त्याची मोठी किंमत त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात मोजली. मूल्यांना मुरड न घालण्याचा त्यांनी जपलेला संकल्प आपणास बरंच काही शिकवून जातो. 'भीड' नावाच्या रसायनांनी त्यांच्या जीवनास कधी स्पर्श केला नाही. त्यामुळे त्यांचे समग्र जीवन नि यश हे स्वप्रकाशित तान्यांसारखे नेहमी लुकलुकत राहिलं आहे. विजेच्या चमकेत क्षणिकता असते. तान्यांचं लुकलुकणं चिरंजीव असतं. लीलाताईंच्या कार्य नि कर्तृत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या समाज पटलावर दीर्घकाळ प्रभाव करत राहील, असा मला विश्वास वाटतो, तो त्यांच्या स्वप्रकाशी व्यक्तिमत्त्वामुळे.
 या ओळी लीलाताईंची भलावण वाटेल पण लीलाताईंना भुलवून कोणी काही मिळवू शकल्याचा इतिहास नाही. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात 'सृजन' नि 'आनंद' शब्दांची क्रियात्मक नि अर्थपूर्ण भर घालणाच्या लीलाताईंचं मुलांशी असलेलं नातं मादाम माँटेसरीपेक्षा तसूभरही कमी नाही हे आपण सर्वांनी मान्य करायला हवं. युनिसेफ' सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या सर्जनात्मक नि आनंददायी शिक्षणाची घेतलेली दखल, विद्यमान प्राथमिक अध्यापन तंत्रात या प्रयोगाचा झालेला समावेश हा लीलाताईंच्या सातत्यपूर्ण धडपडीचाच विजय होय. एखादा प्रश्न, विचार, कल्पना लावून कशी धरायची हे लीलाताईंकडूनच शिकायला हवं. लीलाताईंनी बालशिक्षणाच्या क्षेत्रात सुरू केलेल्या या प्रयोगापूर्वी शिक्षणशास्त्रात 'सृजन' नि 'आनंद' हे शब्द नव्हते, हे शैक्षणिक इतिहासाची पाने चाळताना स्पष्ट होते. ‘सृजन आनंद विद्यालय' सुरू होण्यापूर्वी लीलाताईंनी आपल्या राहत्या घरी अनौपचारिक ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र सुरू केले होते. प्रारंभिक काळात प्रासंगिक शिक्षक (अतिथी अध्यापक) होण्याची संधी मला देऊन लीलाताईंनी गौरविलंच होतं. मी लीलाताईंपासून आदरयुक्त भीतीने बरीच वर्षे दूर राहिलो. आता लक्षात येतं की, या कातळात फणसांचे गरेच अधिक आहेत. शासकीय प्राथमिक शिक्षणविषयक धोरणात अलीकडे बदल घडवून आणण्याचे श्रेय लीलाताई, निर्मला पुरंदरेसारख्या या विषयाचा ध्यास घेतलेल्यांनाच द्यावं लागेल.
 शिक्षकांनी आपल्यातील प्रयोगशीलता जपायला हवी म्हणून लीलाताईंनी घेतलेला ध्यास, प्रयोगशीलता ही प्रासंगिक वृत्ती नव्हे. तो ‘फुटवा' असायला हवा असा त्यांचा आग्रह असतो.'शिक्षण म्हणजे आनंद' अशी त्यांची शिक्षणाची सुबोध व्याख्या आहे.शिक्षण देण्याची प्रक्रिया आनंददायीच असायला हवी. अन्यथा, त्यात विद्यार्थांचा सहभाग राहणार नाही, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या दृष्टीने 'शिक्षक' होणे हा व्यवसाय (Profession) नव्हे, ती एक वृत्ती (Tendency) असायला हवी. मग माणसातला शिक्षक हरवलेला तुम्हाला दिसणार नाही. त्यांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया एक 'लगन' (Devotion) होय. ती विद्यार्थी व शिक्षकांत उभयपक्षी असायला हवी. ज्ञानसंपादनाची स्वप्रक्रिया ज्या शिक्षकात असते, ज्या शिक्षकाची साधनांवर घट्ट पकड असते तोच परिणामकारकपणे शिकवू शकतो. शिक्षणाने दृष्टी देण्याचे (Vision Development) काम करायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे. आजचं शिक्षण ‘छत्रीसारखं आहे. ते पॅराशूट' सारखं असायला हवं.आकाश कवेत घेणारं, नवीन जमीन शोधणारं, साहस जोपासणारं! लीलाताईंच्या दृष्टीतले शिक्षण भविष्यवेधी आहे. त्याला ‘एकविसाव्या शतकाचे शिक्षण' अशी संकुचित, कालबद्ध संज्ञा देणार नाही. त्यांच्या कल्पनेतील शिक्षण कालातीत आहे. जे रुजतं, भावतं ते माणसानं सतत बोलत रहायला हवं. 'Being Vocal' वृत्तीमुळे विचार रुजायला मदत होते. आपल्या विचारावर आपण ठाम असायला हवं (Affirm) असा त्यांच्या जीवनाचा वस्तुपाठ होय. नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य' या विषयासंबंधात त्यांचे विचार या संदर्भात लक्षात घ्यायला हवेत. आपल्या विचारांची वकिली व प्रचार करण्यात (Advocacy) त्यांना कधी कमीपणा वाटला नाही नि कुणी तो काढून घेऊ नये असं त्यांचं सांगणं असतं!
 आजचं सारं शिक्षण ‘बाल' (Child) केंद्रित आहे. ते ‘बाल्य' (Childhood) केंद्रित व्हायला हवं असं लीलाताईंचं म्हणणं किती सार्थक आहे हे तपासून पाहायला आरसा' नको की ‘लिटमस', आजचं आपलं सारं शिक्षण व्यक्तिकेंद्रित झालंय ही बोच लीलाताईंच्या लेखन, भाषण, विचारातून सतत व्यक्त होत असते. व्यक्तीपेक्षा विचार प्रणालीला महत्त्व द्यायला हवं असं त्यांचं मत आहे. लीलाताईंच्या निकट सहवासात, त्यांचे समग्र लेखन वाचताना, त्यांची सारी धडपड जवळून पण तटस्थपणे न्याहाळताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते की, त्यांच्या ‘सर्जनात्मक' नि ‘आनंददायी शिक्षण प्रयोग नि केंद्राविषयी सविस्तर लिहायला हवं. त्याचा आवाका लेखाचा खचितच नाही. त्यासाठी स्वतंत्र ग्रंथप्रपंच व्हायला हवा.
 लीलाताईंच्या सहवासात मला बरंच शिकता आलं. त्यांच्या हाताखाली काही शिकलो नाही तरी पण अजाणतेपणी शिकताना माझ्या हाती बरंच लागलं. प्रत्यक्ष शिकविणाच्या शिक्षकापेक्षा मला लीलाताईंकडून बरंच मिळालं! दुसऱ्याला मोठेपणा देण्याने आपण मोठे होतो. केल्याची वाच्यता न करण्यातच केलेल्याचं महत्त्व असतं. आपणाला पटेल तेच बोलावं.आजीवन भीडेखातर जपून शेवटी माणूस तोडण्यापेक्षा माणूस क्षणभर दुखावेल पण त्यास वास्तवाचं भान येताच तो आपल्या सच्चाईची कदरच करेल असा वर्तन विश्वास. कुणाला बरं वाटावं म्हणून नाटकी व्यवहार करणे टाळणे अशा कितीतरी गोष्टी मी त्यांची शिकवणी न लावता शिकल्या. खरं शिक्षण अनौपचारिक (Informal), दूर (Distant) असतं हे लीलाताईंच्या वर्तन व्यवहारातून मला अधिक उगमलं! त्याच्या या प्रयोग धडपडीत मला कसलंच (गरज असताना आर्थिकही!) योगदान देता आलं नाही. हे शल्य बहुधा जीवनभर मला बोचत राहणार! लीलाताईंच्या मनाचा मोठेपणा असा, की माणसातील दुध, पाणी, रक्त, पेशी, अवयव, असं फारकत व्यक्तिमत्त्व (Partial Personality) जोखण्यात मोठं कसब त्यांच्यात आहे. काही गोष्टी वजा करून माणसास जवळ करता येतं, तो आपला असू शकतो हे भान फार कमी लोकांना असतं. अशा अपवाद व्यक्ती म्हणजे लीलाताई। मला समजलेल्या!
 सृजन आनंद शिक्षण केंद्र, कोल्हापूर सन १९८५ पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ‘सृजन आनंद विद्यालय' ही प्रायोगिक शाळा चालविली जाते. लीलाताई पाटील या प्रयोगाच्या अध्वर्यु, त्या बी. एड. कॉलेजच्या प्राचार्य होत्या. २८ वर्षांच्या शासकीय, अध्यापक महाविद्यालयातील अध्यापनाच्या कार्यातून सुटका झाल्यावर त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न सुरू केला. त्या ज्या शासकीय सेवेत होत्या तेथील बांधीव रचनेमुळे त्यांच्यासारख्या स्वतंत्र नि प्रयोगशील शिक्षकाची घुसमट व्हायची. असे असले तरी ‘पावलापुरता प्रकाश' या न्यायानं त्या शासकीय सेवेत असतानाही प्रयोग करीत राहिल्या. यंत्रणेस टक्कर देत प्रयोग करण्यात माणसाची दमछाक होते हे खरं आहे. पण कर्ता माणूस कुठंही गप्प राहात नाही. वाचन, मनन, लेखन, प्रयोग व नवोपक्रम अशी पंचसूत्री मनात ठेवून त्या सतत धडपडत राहिल्या. श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्या प्राचार्य असल्यापासून मी त्यांना जवळून ओळखतो. त्या संस्थेचा त्यांनी साजरा केलेला सुवर्ण महोत्सव त्यांच्या सर्जनशीलतेस साजेसाच होता, असं आजही स्मरतं.
 १९८५ साली सृजन आनंद शिक्षण केंद्र सुरू झाल्यापासूनचा मी एक साक्षीदार आहे. बंदिस्त शिक्षणास भेद देऊन स्वतंत्र विचाराचा विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेऊन सृजन आनंद शिक्षण केंद्राची सुरुवात झाली. प्रथम केंद्र सुरू झालं. मग त्यांना औपचारिक मान्यता देण्याच्या दृष्टीनं विद्यालय सुरू झालं. भारतीय प्रयोगशील शिक्षणाची मानसिकता नसलेला आपल्या पाल्यावर प्रयोग करायला पाच-पंचवीस पालक तयार झाले असते तर लीलाताईंनी शाळेचा प्रपंच मांडण्यापेक्षा प्रयोग करणं पसंत केलं असतं. जगभर प्रयोगशील शिक्षणाचं जाळं जुनं आहे. जॉन ड्युईपासून ते तोतोचानपर्यंत अनेक प्रयोग सांगता येतील.
 भारतीय शिक्षणातील मर्यादांचं चांगल भान असल्यामुळे लीलाताईंनी सृजन आनंद शिक्षणाद्वारे शिक्षणात ‘ओअॅसिस' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. Three 'R', Four 'H' नंतर Five 'E' असं त्यांच्या शिक्षण प्रक्रियेचं, प्रयोगाचं वर्णन करता येईल. Experimental, Evaluative, Educative, Environmental and Excellent! प्रायोगिक शिक्षणाचा पायाच मुळात चौकट तोडण्याचा असतो. आपले पारंपारिक शिक्षण शब्दात अडकलेले आहे, याचं लीलाताईंना पुरेपूर भान आलं नि त्यांनी ते सर्जनात्मक करण्याचे ठरविले. घोडेबाजार केवळ राजकारणात नाही तर शिक्षणातही आहे. स्वातंत्र्याच्या वाटचालीत आपण ‘सब घोडे बारा टक्के' या न्यायानं सार्वत्रिक शिक्षणाचा धडाका लावला. मुलांना शब्द समजले पण त्यांचा अर्थ उमजला नाही. अर्थ न उमजल्याने जीवनात त्याचा उपयोग करता आला नाही. परिणामी शिक्षणाने माणूस बदलण्याचं काम केलं नाही. स्थितीशील शिक्षणातून येणारी प्रगती असमान असते. ती विकासाचा भ्रम तयार करते. क्षमता विकास म्हणजे शिक्षण याचा विसर पडलेल्या शिक्षण व्यवस्थेत स्मरणाला महत्त्व राहून परीक्षा स्मरणशक्तीच्या झाल्या. कौशल्याची कसोटी कधीच लावली गेली नाही. लीलाताईंनी याला छेद देत प्रयोगशीलतेवर भर दिला. प्रत्यक्ष पाहणं, अनुभवणं, प्रश्न विचारणं, उत्तर शोधणं, मुलांना कार्यप्रवण करणं, शिक्षणातील निष्क्रिय श्रवण बंद करणं इत्यादी अनेक मार्गांनी ‘सा विद्या या विमुक्तये' असं बिरूद लाभलेल्या प्रा. श्रीपाद दाभोळकरांच्या प्रयोग परिवार' सारखं शिक्षण प्रयोगशील केलं. मग त्यांनी मुलांची सहल चक्क स्मशानभूमीत नेऊन मृत्यूची अटळता तर समजावलीच पण मृत्यूची भीतीही दूर केली. नवं देतं ते शिक्षण हे ठासवलं.
 शिक्षण म्हणजे सततच्या मूल्यांकनातून घेतलेला क्षमता विकासाचा आढावा. पण ते मूल्यांकन प्रश्नोपनिषदात त्यांनी बांधलं नाही. सृजनाधारे निरीक्षण, परीक्षणातून निष्कर्ष, निर्णयाचे आयोजन व त्यातून जाणीव जागृती असा शिक्षणाचा क्रम असतो हे ओळखून लीलाताईंनी ‘रक्तदानाचा प्रकल्प अंगिकारला. कोवळ्या वयातील मुलं रक्त देऊ शकतात का? येथून सुरू झालेलं प्रश्नांचं काहूर 'दान' म्हणजे काय इथवर नेऊन लीलाताई भिडवतात तेव्हा त्यांचं शिक्षणाचं क्षितिज किती व्यापक, असीम असतं हेच सिद्ध करतं. 'दान' माणसास नादान' बनवतं असं आचार्य विनोबांनीच आपल्या ‘त्याग व दान' या निबंधात स्पष्ट केलंय. ते अनुदानित शिक्षणाने बऱ्यापैकी सिद्धही केलंय. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी शासन मान्यता घेणाऱ्या लीलाताईंनी अनुदान घेण्याचं ठरवून नाकारलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. माईसाहेब बावडेकरांनी पण प्रयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अनुदान न घेणं पसंत केलं होतं. ज्याला शिक्षण स्वायत्त हवं त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला हवं हे लीलाताईंनी कृतीनं दाखवून दिलं आहे.
 विहंगमावलोकन, सिंहावलोकन हा शिक्षणाच गाभा. मूल्यांकनात मूल्य शब्द आहे. मूल्य' (Value) ते शिक्षणात असल्याशिवाय ‘अंकन (Counting) अशक्य. मूल शाळेत गेल्यावर त्याला काय येऊ लागलं याची मोठी उत्सुकता पालकात असते. सामान्य पालक आपल्या पाल्यास पोपट, पपेटस् (Puppets) बनवू इच्छितात. त्यांना काय येतं हे ते त्यांच्या घोकमपट्टीवरून ठरवतात. लीलाताईंनी पोपट बनवण्यापेक्षा मुलांना गरुड बनवणं पसंत केलं. गरूड आपल्या पिलास एका मर्यादेपर्यंत भरवतो. मग देतो दरीत ढकलून. तुझं तू मिळव, तुझं तू शिक, तुझी तू शिकार कर. बाटलीने किती पाजायचं नि चमचा वाटीनं किती याचं भान ज्या आईला असतं तिची मुलं लवकर स्वावलंबी होतात. लीलाताई मुलांना स्वप्रज्ञ बनवायच्या मताच्या. पाजणं त्यांना मान्य नाही. पाझरण्यावर त्यांची भिस्त आहे. म्हणून मग त्या मुलांना जितक्या लहान वयात समजेल तितकी ती अधिक प्रगल्भ होतात, यावर लीलाताईंचा प्रगाढ विश्वास. शिक्षणात बुद्ध्यांकापेक्षा संवेदनासूचकांक महत्त्वाचा. तो पारंपरिक शिक्षणाने कधी विकसित केला नाही. म्हणून या देशात नागरिक घडले नाहीत. प्रेक्षक घडवले गेले. सर्जनात्मक शिक्षण आनंददायी असतं. म्हणजे केवळ रंजक असतं. नाही तर ते प्रबोधकही असतं. त्यातून सामाजिक संवेदनेचा, कृतिशील सहभागाचा वस्तुपाठ सृजन आनंदाने दिला. परिसरात काही घडो, त्यांची नोंद, जाणीव मुलांपर्यंत पोहोचवण्याची लीलाताईंची धडपड मी जवळून पाहिली आहे. प्रजासत्ताकाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी बालमनाची केलेली मशागत, तिचं ग्रंथरूप हे सर्व अभ्यासण्यासारखं तसंच अनुकरणीयही!
 शिक्षण म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणं हे एकदा सूत्र ठरलं की, वहिवाटीचा रस्ता सोडायचा. अभ्यासक्रमाची चौकट तर नाकारायची नाही पण पाठ्यपुस्तक अधिक आनंददायी करायचं. मग खेळ, भेंड्या, संग्रह, सर्वेक्षण, तक्ते, असा फेरावर फेर रुंदावत लीलाताईंचं शिक्षण ज्ञानकेंद्री न राहता कर्मकेंद्री होतं. शिक्षण म्हणजे श्रवण साधना नाही ते आस्वादन आहे. रस,ताल,संगीत,नाद, नृत्य, सान्यांचा फेर त्यात असेल तर शिकूनही बेकार राहण्याच्या फे-यांतून पिढ्या मुक्त होऊ शकतात. हे पक्क ज्ञात असलेल्या लीलाताईंचा मूळ पिंड संशोधकाचा. रोज नवं शोधायचं हा शोध आशय, मांडणी, स्पष्टीकरण साच्या अंगांनी घेत सुबोध पद्धतीनं मुलांपर्यंत पोचवायचा. डोक्यात भरायचा नाही. स्वीकारायचं नि नाकारायचं स्वातंत्र्य आपल्या विद्यार्थ्यांस समजावणाच्या लीलाताई म्हणून तर नवी वाट नव्याने ओलांडतात. त्यामुळे सृजनाचं शिक्षण शिळी भाजी आणि शिंपडून ताजी केल्याचा बनाव न होता ती एक रसरशीत जिवंत संवादाचं, चर्चेचं साधन बनते. ऐकणं, लिहिणं, पहाणं या पलीकडे जाऊन ते 'अनुभव' होतं हे महत्त्वाचं. हा अनुभव आश्वासक असतो. तो स्वतःहून पाहिलेला स्वर्ग असतो. सर्वसाधारण शिक्षण ‘बबई का समुंदर देखो, आगरा का ताजमहाल देखो' असा प्रेक्षणीय खेळ ठरत असता सृजनचं शिक्षण समुद्र खारट का झाला हे समजावतं, ताजमहालाचं सौंदर्य सांगताना त्याच्या निर्मिती आणि क्रौर्यही विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचवतं म्हणून ते अधिक प्रभावी, परिणामी असतं. पाहणं आणि अनुभवण्यातील दरी सांधणारं लीलाताईंचं शिक्षण अधिक सापेक्ष नि साक्षेपी ठरतं. एक तरी ओवी अनुभवावी' या न्यायानं त्या आपल्या शाळेत विद्याथ्र्यांना प्रयोग दाखवत नाहीत. ते करायला लावतात. विज्ञान शिक्षक मला शाळेत असताना जादूगार वाटायचे. लीलाताई मुलांच्या किमयागार होतात, ते त्यांच्या अध्यापनाच्या आगळेपणानं. तुम्ही वेगळे करता ही सामान्य गोष्ट असते. तुम्ही वेगळेपणानं करू शकता का, हे लक्षणीय । असतं. जडत्व दूर सारणं, चैतन्याचे झरे वाहते करणं, मन फिरतं ठेवणं, ते भिरभिरू देणं म्हणजे शिक्षण. आपणास छापाचे गणपती बनवायचे होते म्हणून आपण सार्वत्रिक शिक्षण समान ठेवलं. शिक्षकांचे सैनिकीकरण केलं. त्यांच्या 'फँटसी'ला जेरबंद केलं. म्हणून आपल्या शिक्षणात Action Research ला अवकाश लाभला नाही.
 शिक्षणाचं पण आपलं असं पर्यावरण असतं. ते बनवायला लागतं. नुसत्या भिंती बोलत्या झाल्या, तक्ते लटकले की झालं पर्यावरण असं असत नाही. मुलांनी बनवलेले तक्ते शिक्षणाच्या सर्जनशीलतेची खरी अभिव्यक्ती! मुलांनी काढलेले सूर्य (भले किरण नसो त्यात!) पण ते मुलांचं म्हणून महत्त्वाचं. इतकं छोटं भानही आपण इतक्या वर्षांत निर्माण करू शकलो नाही. मुलांचा सूर्य मुलांनीच दुरुस्त करण्याचा लीलाताईंचाआग्रह बघितला की त्यांचं शिक्षण केवळ ‘बालकेंद्री' न राहता ते ‘बाल्यकेंद्री' कसं असतं याची प्रचिती येते. शिक्षणाला भांडवली गुंतवणूक ठरवणाच्या शासन, समाज व पालकांनी शिक्षणाचं पर्यावरण कधी मुळापासून समजूनच न घेतल्यानं वर्गरचना, फर्निचर, यात अडकलेलं आपलं शिक्षण सैल करून भिंतीबाहेरची शाळा साकारत लीलाताई सामूहिक वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करण्याचा घाट घालतात. त्याला विजय तेंडूलकरांसारखा संवदनशील पाहुणा बोलवतात. डोळ्यांची आरती उतारतात. (इथं ही प्रयोग!). त्यामुळे शिक्षणाचं पर्यावरण एकदम समाज संवेदी होऊन जातं! अपंगांच्या वेदना, अंधांची धडपड (खरं तर तडफड!) ही त्या अभिनव पद्धतीनं समजावतात. 'पाणी' साक्षरतेचा त्यांचा प्रयोग असाच पर्यावरणाची भावसाक्षरता वाढवणारा. त्यामुळे सृजनच आनंद विद्यालयाचे शिक्षण जिवंत होते.
 विद्यार्थ्यांना जे द्यायचे ते सकस, त्याचा शिक्षण गुणांक (Percentage) वाढवणारं ते नसतं. गुणवत्ता (Quality and Excellence) वृद्धी त्यांचं लक्ष्य असतं. ती उत्तर ओकण्याच्या क्षमतेवर न जोखता तुम्हाला कळालेलं स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीनं कसं सांगता ती खरी गुणवत्ता. मुलखावेगळं उत्तर देणारी मुलं लीलाताईंना भावतात. म्हणून सृजनचे विद्यार्थी स्वप्रज्ञ! ते नाटकासाठी तयार संहिता नाकारतात व स्वतः नाटक लिहितात. चौथीतल्या मुलांत निर्माण झालेला हा आत्मविश्वास सृजनची आनंददायी व्यक्तिविकासाची किमया असते. एकविसाव्या शतकातील शिक्षण हे व्यक्तिविकास केंद्री असलं पाहिजे असा जागर आज सर्वत्र ऐकण्यास मिळतो. पण लीलाताईंनी हा गजर २५ वर्षांपूर्वी लावला होता, हे लक्षात घेतले की त्यांच्या दूरदृष्टीचा अचंबा वाटल्यावाचून रहात नाही.
 सृजन आनंद विद्यालयाची ही प्रायोगिक धडपड हा सामूहिक आविष्कार असला तरी त्यातली लीलाताईंची मानसिक गुंतवणूक कॅटॅलिक एजंटची भूमिका बजावणारी होती. गेली सतत २५ वर्षे त्या बालहक्क म्हणून बालशिक्षणाचा विषय लावून धरतात. त्यामागे भारताचं बाल्य समृद्ध नि संपन्न करण्याचा ध्यास आहे नि नवा भारत स्वप्रज्ञ करण्याची तळमळही! जीवनाचे सहस्रदर्शन झालेल्या लीलाताई या वयातही तरुणास लाजवेल अशा समर्पणाने कार्य करतात.
पुरोगामी कुलगुरु : रा. कृ. कणबरकर

 प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांनी शिक्षण परिवर्तनात दोन्ही मार्गाने कार्य केले. त्यांचे प्रमुख कार्य अध्यापन व प्रशासकीय असले तरी त्यांच्या शिक्षकापेक्षा प्रशासकानेच अनेकदा बाजी मारल्याचे दिसते. निवृत्तीपर्यंत ते शिक्षणाच्या अध्ययन, अध्यापन, लेखन, वाचन अशा चतुर्दिक मार्गाने कार्यरत राहिले. त्यांनी परिश्रम,चिकाटी व सातत्याच्या जोरावर कामावरील आपली पकड अबाधित ठेवली. या त्यांच्या कृतीशील शिक्षणाचा, प्रबोधन कार्याचा गौरव राजर्षि शाहू पुरस्काराने झाला ही आनंदाची गोष्ट होय.
 प्राचार्य कणबरकर हे मूळचे बेळगावचे. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बेळगावीच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणून ते कोल्हापुरी आले. राजाराम महाविद्यालयात त्यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. बी. ए. व एम. ए. या दोन्ही पदव्या त्यांनी राजाराम महाविद्यालयातून मिळवल्या व ते इरग्रजीचे प्राध्यापक झाले. इंग्रजी ही विदेशी भाषा समजून घेण्यासाठी कणबरकर सरांनी हैद्राबादच्या मध्यवर्ती भारतीय इंग्रजी संस्थेतून इंग्रजी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमह पूर्ण केला. या विशेष प्रशिक्षणामुळे अध्यापन कौशल्य विकसित झाले. त्यामुळे ते इंग्रजी विषयाचे निष्णात प्राध्यापक बनले.
 बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयातनू कणबरकरांचा शिक्षकी प्रवास सुरू झाला. भारत स्वतत्रं झाला आणि ते प्राध्यापक म्हणून परत महाराष्ट्रात आले. रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या तीन नामांकित संस्थांमध्ये प्राचार्य म्हणून केलेल्या त्यांच्या कार्याचा वाटा महत्त्वाचा. आज शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ही तिन्ही महाविद्यालये गुणवत्ता शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीनही महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते कणबरकर सर. सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय, कराड, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि न्यू कॉलेज, कोल्हापूर. ज्या महाविद्यालयांना कुशल प्राचार्य लाभतात त्यांचा कायापालट होतो.
 प्राचार्य म्हणून कार्य करत असताना ते शिवाजी विद्यापीठाच्या विविध सभा, समित्यांवर कार्यरत राहिले. त्यांनी विद्यापीठ कायदे व उपविधी तयार केले. तसेच अभ्यासक्रम व क्रमिक पुस्तकेही! एकाच वेळी शिक्षक व प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक विकसित होत गेला. त्याची परिणती म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती.
 कणबरकर सरांनी प्राध्यापक, प्राचार्य म्हणून पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कार्य केले होते. अन्य विद्यापीठांचे कार्य त्यांना माहिती असल्याने कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ विकासाची योजना आखली. सन १९८० ते १९८३ या अवघ्या तीन वर्षांत त्यांनी शिवाजी विद्यापीठात ललित, कला, संख्याशास्त्र आणि प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग सुरू केले. उच्च शिक्षणात त्यांनी काळाची पावले ओळखून विकेंद्रीकरणाचे धोरण अवलंबले व सोलापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले. त्यांचा भर शिक्षण विस्तारावर होता. नोकरी व संसारात गुंतलेल्या प्रौढ स्त्री-पुरुषांना बहिस्थ शिक्षणाची सोय केली पाहिजे हे ओळखून प्रौढ व निरंतर शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण व शिक्षणशास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरशिक्षणाने करता येण्याची सोय केली. बेरोजगार युवकांसाठी सेवा सल्ला केंद्र सुरू केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार निरंतर अंतगर्त मूल्यमापन पद्धतीचा स्वीकार केला. या कार्यकालात प्रा. कणबरकरांनी डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्यकालात सुरू झालेले परंतु मधल्या काळात बंद पडलेले शाहू संशोधन केंद्र पुन्हा सुरू केले. यातून राजर्षि शाहू छत्रपतींच्या विषयीचा त्यांचा आदर स्पष्ट होतो. त्यांच्या या कार्यकालातच शाहू जन्मशताब्दीच्या निमित्ताने राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली. त्याचे कुलगुरु या नात्याने ते पदसिद्ध विश्वस्त बनले. ते निवृत्तीनंतर समाज प्रतिनिधी विश्वस्त बनले.
 निवृत्तीनंतरही त्यांचा अनेक शैक्षणिक संस्थांशी घनिष्ठ संबंध राहिला. ताराराणी विद्यापीठाचे ते कार्याध्यक्ष तर विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून आज आयुष्याची नव्वदी पार केली तरी कार्यरत आहेत. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट व भाई माधवराव बागल विद्यापीठ ही त्यांची आजची कार्यक्षेत्रे होत. या माध्यमातून त्यांनी विविध स्पर्धा, मेळावे, परिसंवाद, व्याख्यानमाला कार्यकर्ता प्रशिक्षण, समाज प्रबोधन महोत्सव संयोजन अशी अनेक कार्ये केली. पण त्याचा आधार शाहू कार्यच राहिला. लेखक म्हणून प्रा. कणबरकरांनी अनके ग्रंथ आपणास दिले आहेत. त्यांचे लेखन इंग्रजी व मराठीत उपलब्ध आहे. एकूण सात ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले ‘भाई माधवराव बागल समग्र वाङ्मय' व अलीकडचे शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले ‘ग्लिंप्ससे आफॅ राजर्षी शाहू महाराज हे चरित्र साहित्य क्षेत्रातील त्यांचे अजरामर योगदान म्हणून ओळखले जाइर्ल. स्वच्छ चरित्र, वादातीत व्यक्तिमत्त्व, विचारांची स्पष्टता अशा आपल्या अनके अंगभूत गुणांमुळे कणबरकर हे महाराष्ट्राच्या शिक्षण व समाजजीवनात अनुकरणीय आदर्श राहिले. राजर्षी शाहू पुरस्काराने ते सन्मानित आहते. आयुष्यभर निरपक्षे, निरलस राहणं ही पण एक जीवन साधनाच. ती फार कमी लोकांना जमते. कणबरकर सरांनी ती निभावली खरी! प्रयोग परिवारी विज्ञानी : प्रा. श्री. अ. दाभोळकर

 'मला शांतपणे मरू द्या. मरताना मला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे, असं वैज्ञानिक विल्यम हार्वेनं म्हटलं होतं. प्रा. श्री. अ. दाभोळकरांनीही ते मूलतः प्रयागे शील असल्यानं त्यांनी हेच केलं असल्याचा संभव आहे. मला शांतपणे मरू द्या. मला मरताना वेदनांवर प्रयोग करायचा आहे.' असं ते म्हणाले असतील, तसं नसतं तर त्यांना मलेरियाच निमित्त होऊन मरण आलं नसत. जीवनात हरघडी, हरप्रसंगी प्रयोगशील सलगी नि संवाद करणाच्या दाभोळकरांनी आपल्या मरणावरही प्रयोग केला असावा, असं वाटण्याइतकं त्यांचं जाणं अकल्पित आहे.
 सर आम्हाला श्री मौनी विद्यापीठात गणित नि विज्ञान शिकवायचे. त्यांचं शिकवणं प्रायोगिकच असायचं. त्यांचा पहिला तास मला अजून आठवतो. १९६७-६८ असले, मी प्रिपेटरी पास होऊन डी. आर. एस.च्या प्रथम वषार्त गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्या वेळचं मौनी विद्यापीठ हे 'व्यासेगी (नि विक्षिप्तही!) विद्वानाची पंढरी म्हणून ओळखलं जायचं. युनेस्कोचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. व्ही. चिक्करमने, प्रसिद्ध मराठी कथाकार स्नेहलता दसनूरकर, प्रयोग परिवाराचे जनक प्रा. श्री. अ. दाभाळे कर अशी मंडळी आम्हाला शिकवायची. सर तासावर आले, (त्याचं शिकवणं स्वसंवादच असायचा.) की म्हणायचे, मी श्री. अ. दाभोळकर. माझं खरं नाव मुकुंद अच्युत दाभोळकर, कॉलेजमध्ये मुलं मला एम. ए. डी. या आद्याक्षरावंरून 'मॅड दाभोळकर' म्हणत. म्हणून मी ठेवलेले (ठेवणीतलं!) नाव वापरायला सुरुवात केली. श्रीपाद अच्युत दाभोळकर, नंतर कळालं, की आता लोक मला सँड (एस. ए. डी.) दाभोळकर म्हणतात (अर्थात माघारी!) पण मॅडपेक्षा सँड बरं नाही का?
 आज कळतं, सर सतत ‘सँड' राहिले. 'मॅड' (चांगल्या अर्थानं!) ते मुळात होतेच. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की परिपूर्तीपयर्तं त्यांना निश्चिंती नसायची. सरांनी कोणत्या क्षेत्रात प्रयोग, संशोधन किंवा अभ्यास केला नाही, हाच संशोधनाचा विषय ठरावा. शेती, विज्ञान, गणित, लोकशाहीकरण, आहार, आरोग्य, गर्भातील मुलाची वाढ, बाल संगोपन, निकापे यौवन, सुखी पालकत्व हे त्यांचे आजवरचे प्रयोग. प्रयोगांचे विषय ते ग्रंथालयातील विश्वकोषात शोधत नसायचे. परिसर हाच त्यांचा परिवार, पृथ्वी ही त्यांची प्रयोगशाळा. मनुष्यजीवन हा त्यांचा लक्ष्यबिंदू. भूत, वर्तमान नि भविष्य यांचा वेध घेण्याचं त्यांचं कसब केवळ अचंबित करणारं.
 सरांचा जन्म साताऱ्याच्या ख्यातनाम दाभोळकर कुटुंबात झाला. या एका घराण्यातील दाभोळकर आडनावाची सारी माणसं नामांकित. प्रिन्सिपॉल,शं. गो. दाभोळकर (व्यासंगी समाजशील विधिज्ञ), अरुण दाभोळकर (प्रसिद्ध चित्रकार,जलतरंगातील गणपतीचे शेकडो मनोवेधक नमुने यांचेच),भरत दाभोळकर (प्रख्यात जाहिरातज्ज्ञ). तसं यांच्या घरातील कुलगुरु देवदत्त दाभोळकर, दत्त प्रसाद दाभोळकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गजच! सरांनी एम.एस्सी. होऊन शिक्षक होणं पसंत केलं. गारगोटीसारख्या आडगावी येऊन ते राहिले. इथल्या लाल मातीनं त्यांच्यासारखं अनेकांना म्हणजे आचार्य स.ज.भागवत, पद्मभूषण जे. पी. नाईक, डॉ. चित्रा नाईक आदींना ‘प्रयोग पंढरीचे वारकरी' बनवले. सर प्रारंभीच्या काळात रामे मधील ‘जागतिक भूक मुक्ती संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे सदस्य झाले भुकेचा नि विकासाचा, दुष्काळाचा नि दारिद्र्याचा घनिष्ठ संबंध डॉ. अमर्त्य सेनांपूर्वीच सरांच्या लक्षात आला नि ते 'मनुष्य, जीवन व पृथ्वी' असा व्यापक विषय परीघ घेऊन प्रयोग करत राहिले. आजचे विज्ञान हे गरिबाला अधिक गरीब व श्रीमंताला अधिक श्रीमतं करणारे आहे, असे विज्ञान साचेबंदं तंत्रात अडकून, वस्तुरूप गोळीबंद करून भरमसाट नफ्याच्या योजना आखत विज्ञानाच्या नावावर बाजार करणाऱ्या भ्रष्ट अर्थव्यवस्थेचा भाग आहे, हे ओळखून सरांनी प्रयागे परिवार' सुरू केला. प्रत्येक व्यक्तीला सर्व त-हेचे उच्च ज्ञान, विज्ञान व संशोधन शाळा कॉलेजमध्ये न जाता स्वतःच्या प्रयोग अभ्याससाठी मिळाले पाहिजे, ही त्यामागची कल्पना. या चळवळीचं बोध वाक्य म्हणून त्यांनी ‘सा विद्या या विमुक्तये'ची निवड केली. त्यांना मुळात ज्ञान हे सामान्यांसाठी मुक्त करायचं होतं. शिवाय विद्यादानाला लाभलेलं 'रहस्यवलय' त्यांना छेदायचं होतं. त्यासाठी त्यांनी गट शिक्षणाचे तंत्र अवलंबिलं. गटाचे गोफ गुंफले व त्यातून जगभर त्यांचा प्रयोग परिवार साकारला. ते ‘प्रयोग-माऊली' बनले. स्वायत्त,स्वाश्रयी, स्वयंशोधी, मुक्त, विकेंद्रित, वैज्ञानिक कार्य कुले विकसित करून अनौपचारिक विद्याशाखा विकसित करण्यावर त्यांचा भर असायचा. सूर्यकिरणांची सुगी साधणारं, पृथ्वीस पोशिंदा बनविणारं त्यांचं शिक्षण होतं. वर्तमान शिक्षणाला छेद देणारं नि म्हणून प्रयोगशील होतं.
 शेती हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय. लोक नेहमी नसणाऱ्या गोष्टीचं रडगाणं गातात. सरांनी असणाऱ्या गोष्टींच्या द्रष्ट्या उपयोगाचं तंत्र अवलंबिलं. एक शेतकरी सरांकडे आला. म्हणाला, "जमीन सारी कातळ आहे. काही उपाय सुचवा." सरांनी जागा पाहिली. १'१' खड्डे खणून पपई लावायची शिफारस केली. एक पपईचं झाड आपल्या पानांच्या घेराइतकी जमीन भुसभुशीत करतं, हे समजून सांगितलं. वर्षाला खड्डे बदलायचे नि लागवड करायची. तीन वषार्तं साऱ्या रूपांतर मुरमाड जमिनीत झालं. पुढे पिकांची पालट व पाल्याच्या वापरानं याच कातळाची मळीची जमीन झाली, हे दाभोळकरच करू जाणे.
 खेड्यात लोक शेतीमध्ये खतावर भरपूर पैसा खर्च करतात. त्यामुळे जमिनीचा पोत घसरतो, हे लक्षात येऊन सरांनी ‘तण देई धन'चा प्रयोग राबवला. झाड, पाला, रोग, मूत्र साऱ्यांचा नियोजनबद्ध वापर त्यांनी शेतकऱ्याला शिकवला. द्राक्षशेती प्रयोगातही हे तंत्र त्यांनी अवलंबिलं. द्राक्ष बागायतदार प्रारंभी एकरी सहा टन खत वापरायचे तेही रासायनिक. दाभोळकरांनी द्राक्ष छाटणीतील काड्या, पानं, बागेत उगवणारं तण तिथंच कुजवून खताच्या बचतीचं व स्वयंनिर्मितीचे तंत्र विकसित केलं.
 शेती नि पाणी, शेती नि माती असं कृषिविषयक सूत्र दाभोळकरांनी छेदून दाखविलं. मातीविना शेती हा सध्या पाठ्यक्रमात असलेला विषयही दाभोळकरांच्या प्रयोगाचीच फलनिष्पत्ती होय. माती हे जीवरस पुरविण्याचं माध्यम आहे. ते नसेल तर अन्य माध्यमं- गवत, भाताचे तुस, उपलब्ध पालापाचोळा काहीही वापरून ते पुरविता येतं, हे त्यांनी सप्रयोग करून दाखवून दिलं. कमी पाण्यात भरपूर उत्पादनासाठी त्यांनी 'बास्केट' व 'पॉट' मिळून ‘बापू कुंडी' विकसित केली. असेच प्रयोग त्यांनी कुक्कुटपालन,शेळीपालन, मधमाशीपालन, मत्स्यपालन, रेशमी किड्यांची पैदास आदी क्षेत्रांत केले. कुक्कुटपालन व मत्स्यपालनाची सांगड घालून खाद्यान्नाच्या बचतीचा दाभोळकरांनी केलेला प्रयोग समजून घेण्यासारखा आहे. शेळीपालनातील त्यांचा प्रयोग तर त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेला.
 गारगोटीच्या बाजारात विक्रीला आलेली शेळीची पिलं, त्यातून दाभोळकरानी एक शेरडू खरेदी केलं. त्याला हिरव्या पाल्याऐवजी प्रथम केळीचे ओले सोप, अर्धे ओले सोप, वाळलेले सोप व नंतर कागद खायला शिकवलं. हिरव्या चाऱ्याशिवाय शेळी वाढवली. ती दुभती झाल्यावर तिचं दुध हिरवा चारा खाणाऱ्या शेळीपेक्षा सरस असल्याचं वैज्ञानिक निकषावर दाखवनू दिलं. डेन्मार्कच्या जगप्रसिद्ध नॅशनल डेअरीनं त्यांच्या या प्रयोग लेखनास घसघशीत मानधन देऊन जगमान्यता मिळवून दिली. या लेखाचं आलेलं मानधन पाहून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन प्रयोगाला वाहून घेतलं. आजच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेचे (व्हीआरएस) प्रा. दाभोळकर हे आद्य प्रणेते ठरले, असे किती प्रयोग वर्णावे?
 प्रा. दाभोळकरांची शिक्षणविषयक धारणाच और होती. माझ्या दृष्टीनं हे अवलिया अध्यापक होते. जीवनाकडे पाहण्याची त्यांची स्वतःची एक दृष्टी होती. १९९२ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी केलेलं 'आपण प्रयागे करुया' हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रयेंगाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा आलेख होता. ज्यांना कुणाला प्रयोग परिवाराच्या या विज्ञानेश्वराला समजून घ्यायचं असेल त्यांनी हे भाषण वाचायला हवं.
  प्रा. दाभोळकरांनी आपण केलेल्या प्रयोगाची माहिती 'ग्रंथरूपानं मागं ठेवली आहे. 'केल्याने होत आहे रे','विपुलाचं सृष्टी', ‘प्लेंटी फॉर ऑल' ही पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाउसनं प्रकाशित केली. या पुस्तकांचीही मोठी गंमतच आहे. लेखक प्रकाशकाला शोधत असतात. प्रा. दाभोळकरांना प्रकाशकांनी शोधून काढलं. दाभोळकर आपल्या प्रयोगाची छोटी टिपण छापायचे. प्रयोग परिवारात वितरीत करायचे. मेहतांच्या दुकानात शेतकरी शोधत यायचे. दाभोळकर सरांचं प्रयोग माऊलीचं फलाणं पुस्तक हाय का?' अनिल मेहतांनी एकदा त्यांना शोधून काढलं.
 आपल्याकडे श्रम,ज्ञान,वळे यांचे मूल्य करण्या-आकारण्याची पद्धत नसल्याने आपण सारेच या बाबतीत वेंधळे,प्रा.दाभोळकरांनी कोणतीही गोष्ट मोफत घ्यायची नाही नि द्यायची नाही, असा कटाक्ष पाळला. गरिबातील गरीब शेतकरी त्यांच्या प्रयोग परिवारात फी भरून सहभागी होत असे.
 सरांच्या या कार्याला डेन्मार्क, जर्मन, मेक्सिको अशी अनेकदेशी मान्यता मिळाली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिसंवादात भाग घेतला. बीजभाषणं केली. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आलं. अरुण शौरींसारख्या शोधक पत्रकारानं त्यांच्या प्रयोगाची दखल घेऊन लेखन केलं. विजय तेंडुलकरांनी ‘दिंडी' कार्यक्रमांतर्गत त्यांचा प्रयोग प्रक्षेपित, प्रसारित केला. मराठी विज्ञान परिषदेनं त्यांना गौरविलं. हे सारं जरी खरं असलं, तरी त्यांनी प्रयोग परिवारामार्फत रुजवलेली शिक्षणपद्धती, विज्ञानाच्या सरलीकरणाची चळवळ, तंत्रज्ञान लोकभाषेत प्रसारित करण्याचा प्रयत्न या सा-यांची नोंद घेऊन आपलं शिक्षण पुनर्रचित करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सर्व कृषी विद्यापीठांनी त्यांच्या प्रयोगाचं तंत्र सार्वत्रिक करणं यातूनच त्यांना अपेक्षित असलेला प्रयोगधन समाज साकार होईल.
 प्रा. श्री. अ. दाभोळकर यांनी शिक्षण संस्थांच्या लोकशाही करणाचा केलेला प्रयागे आजच्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या युगात अधिक महत्त्वाचा आहे. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाचं झालेलं लोकशाहीकरण म्हणजे प्रा. दाभोळकरांच्या द्रष्टेपणाचं फलित होय. मौनी विद्यापीठात सन १९७५ च्या दरम्यान अशांतता निर्माण झाली. तिथलं शिक्षण धोक्यात आलं.प्रा. दाभोळकरांनी शिक्षक व कर्मचा-यांचे संघटन करून,आंदोलन, संघर्ष इ.द्वारे ती संस्था लोकशाही घटना पद्धतीची केली. त्यामुळे शिक्षणात संबंधित घटकानच्या मताला कायदेशीर रूप आलं. तो प्रयोगेनंतर महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांत अंमलात आला. आज कायद्याने शिक्षक व कर्मचारी शिक्षण संस्थेच्या संचालनाचे अगं बनले. हे योगदान प्रा. दाभोळकरांचे, त्याचे विस्मरण करून चालणार नाही.
शाहूप्रेमी समाजसेवक : बाबूराव धारवाडे

 सन १९७० ची गोष्ट असावी. मी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठातील रा. वि. परूळेकर ग्रंथालयात रोजची वृत्तपत्रे वाचत असताना नित्य जनसामान्यांचे काही ना काही प्रश्न घेऊन लढणारी जनसेना नावाची संघटना वर्तमानपत्रात रोज डोकावत असायची. तिचे संघटक म्हणून बाबूराव धारवाडे यांचे नाव असायचे.
 जनसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून तेव्हापासून माझ्या मनात कुतूहल असायचं. पुढे मी शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी म्हणून कोल्हापुरात आलो. तत्पूर्वीही कोल्हापुरात येणे जाणे होत राहायचे. त्या काळात महागाई शिगेला पोहोचली होती. रेशनच्या कार्डावर मिलो (निकृष्ट प्रतीची ज्वारी, ती काळसर असायची, नाचण्यापेक्षा थोडी मोठी.) मिळवायला पण लोकांची काय झुंबड! साखर ग्रॅममध्ये मिळायची. ती मिळवायला पण मोठी यातायात करावी लागायची; हे आजच्या पिढीला सांगू खरे वाटणार नाही. त्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी जनसेना दलाचे कार्यकर्ते सायकल फेरी काढायचे. अशा एका फेरीत मी पहिल्यांदा बाबूराव धारवाडे यांना पाहिलं. त्या फेरीत वारकऱ्याप्रमाणे मी उत्स्फूर्तपणे सामील झाल्याचंही आठवतं. बाबूराव धारवाडे यांच्याबद्दल माझ्या मनात केलेल्या घराचं एकच कारण होतं, नि ते म्हणजे जनसामान्यांशी नाळ जोडायचा त्यांचा खुळा नाद.
 पुढे मी स्वावलंबी झालो नि माझी उठबस थोरा-मोठ्यातं होऊ लागली. अनाथ, निराधारांच्या संगोपन, पुनर्वसन कार्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांशी रोजचा संपर्क असायचा. सन १९८० नंतरच्या काळात ते येथील राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते त्या काळात ट्रस्टचे अनेक उपक्रम मी जवळून पाहिले, ऐकले. त्या काळात बाबूराव पक्ष नि प्रबोधन अशी दुहेरी कसरत करत असत. पुढे त्यांनी पक्षाशी संपर्क ठेवून प्रबोधन हेच आपलं जीवित कार्य मानलं व ते विविध व्याख्याने, मेळावे, शिबिरात अधिक रमू लागले. आता त्यांना स्वतःचा स्वर सापडला. ते भाई माधवराव बागल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सक्रिय झाले नि त्यांनी शाहू स्मारक भवनला प्रबोधनाचं सजग व्यासपीठ बनवलं. हे सारं विस्ताराने मी अशासाठी सांगतोय की बाबूराव धारवाडे हे जन्मलेले कार्यकर्ते नव्हते. त्यांचे कार्यकर्ता म्हणून असलेलं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. त्या घडणीत त्यांच्या जीवन संघर्षाचा मोठा वाटा आहे. त्यांचा जन्म झाला तो काळ भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा होता. देशात ‘सविनय अवज्ञा आंदोलन' जोर धरू लागलं होतं. ते कुमारवयात असताना त्यांनी भारत छोडो आंदोलन कुतूहलाने पाहिलेलं. ते धोक्याच्या वयाचा उंबरठा ओलांडत असतानाच्या काळात देश स्वतंत्र झाला. देश प्रजासत्ताक होत असतानाच्या काळात त्यांना मिसरूड फुटत होती. व्यक्तिगत जीवनात जन्म-मरणाचा प्रश्न सोडवत ते देशाची तगमग अनुभवत होते. त्या वेळचं गोखले महाविद्यालय म्हणजे बहुजन समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांचं आशास्थान होतं नि आधारवडही. डॉ बाळासाहबे खर्डेकर आणि प्रा. एम. आर. देसाई यांनी तरुण बाबूरावांमधील धडाडी पाहून त्यांच्या शिक्षणाचा विडा उचलला. अन्यथा, त्या वेळच्या ओढग्रस्त स्थितीत शिक्षण घेणं हे दिवास्वप्नच होतं. विद्यार्थी चळवळीत सतत पुढे असणारे बाबूराव क्रीडांगणावरही तळपत राहायचे. फुटबॉल, क्रीकेट हे त्यांचे आवडते खेळ. या खेळात तारुण्याची रग मुरवत ते नेतृत्वाचे प्राथमिक धडे घेत राहिले. गोखले महाविद्यालयाने त्यांच्या कप्तानपदाच्या काळात दाभोळकर शील्डवर सतत कब्जा मिळविला.
 शिक्षण पूर्ण करताच ते लोकल बोर्डात रुजू झाले. पंचायत राज्य व्यवस्थेच्या झुंजुमुंजूच्या काळात तलाठी, ग्रामसेवकांशी त्यांचा निकटचा संबंध आला. ग्रामीण समाजाचे प्रश्न त्यांनी जवळनू अभ्यासले याच काळात त्यांना लेखनाचा नाद लागला. लोकशाहीचे विकेंद्रीकरण' हा त्या वेळचा परवलीचा शब्द. प्राचार्य मा.पं.मंगडूकर व प्राचार्य पी. बी. पाटलांच्या वाचन, वक्तृत्व नि वाङ्मयाने बाबूराव धारवाडेंमधील तरुण कार्यकर्ता भारावला. लोकल बोर्डातील आकडेमोडीत त्यांचे लक्ष लागेना.
आकड्यांपेक्षा अक्षरांच्या वळणांनी त्यांना मोहित केलं. त्यांनी लोकल बोर्डाला रामराम ठोकला व ते लिहीत राहिले आणि लेखक बनले. पंचायत राज्य व्यवस्थेवरील सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर लिहिलेल्या मार्गदर्शक पुस्तिका आजही आख्ख्या महाराष्ट्रात प्रमाण मानल्या जातात.
 बाबूराव धाडवाडे यांच्या समाजकार्याची आपली अशी एक वेगळी वळणवाट आहे. ते आपला घरसंसार स्वतःच्या पैशावर चालवत सामाजिक काम करत राहतात. सामाजिक व राजकीय कार्य हा कधी त्यांनी आपला पोटा-पाण्याचा उद्यागे केला नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याला एक नैतिक अधिष्ठान आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाई माधवराव बागल हे त्यांचे जीवन आराध्य. राजर्षी छत्रपती शाहूच्या विचार व आचारांचा वसा आणि वारसा एकदा त्यांनी स्वीकारला तो आजवर टिकवला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य टिकवण्याच्या प्रत्येक लढाईत ते अग्रणी राहिले आहते. राजर्षी शाहू स्मारक भवनची उभारणी, उत्तर प्रदेशात शाहू जिल्ह्याची निर्मिती, विधान भवनातील शाहू पुतळा, करवीर गॅझेटमधील छ. शाहूसंबंधी मजकूर दुरुस्ती, गंगाराम कांबळे व छ.शाहूच्या अद्वैत संबंधांचा सामाजिक स्मारक स्तभं,दूर चित्रवाणीवरील शाह मालिका, छ. शाहू जन्मशताब्दी महोत्सव अशी एक लांब लचक सूची होऊ शकेल. या साऱ्या उपक्रमांतून बाबूराव धारवाडे यांची भागिदारी, नेतृत्व हा त्यांच्या अतूट शाहू भक्तीचा ढळढळीत पुरावाच.
 बाबूराव धारवाडे, सखारामबापू खराडे, भिकशेठ पाटील, प्राचार्य रा. कृ. कणबरकर ही अशी काही कोल्हापूरातील माणसं आहेत की ते विविध कार्यातून कोल्हापूर जागं ठेवतात. त्यात आणखी एक व्यवच्छेदक नाव म्हणजे अॅड. गोविंद पानसरे. हे कोल्हापूरच्या विद्यमान पुरोगामी चळवळीचे पंचप्राण म्हटले तर वावगे ठरणार नाही. यात बाबूराव प्रबोधनाच्या अंगाने कोल्हापूर जागं ठेवत कार्यकर्ता घडविण्याचा ध्यास घेतलेले कर्मवीर. पन्हाळ्याला सतत ते कार्यकर्ता प्रबोधन शिबिरं योजतात.छ.शाहूंचं कोल्हापूर टिकवण्यासाठी तरुण कार्यकर्ते ते सतत हेरतात.त्यांना प्रोत्साहन देतात. त्यांचं नाव व्हावं म्हणून त्यांना संधी देतात. त्यांना पुढे करतात. स्वतः मागे राहतात. फोटोला पुढे होणाऱ्या (इतरांना मागं ढकलून!) अन्य समकालीन पुढाऱ्यांच्या तुलनेत बाबूराव कितीतरी उजवे ठरतात. विजय चोरमारे, उदय गायकवाड,विश्वास पाटील, प्रा. टी. एस. पाटील यांच्यासारख्या बहुजन समाजातील तरुणांची त्यांची निवड त्यामागे त्यांची दूरदृष्टी असते. अशी उदारता हे बाबूराव धारवाडे यांच्या चित्र व चरित्राचं वेगळेपण मनावर ठसवते.
 बाबूराव धारवाडे हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते पण सत्तेच्या राजकारणापेक्षा पक्षांच समाजकारण त्यांना अधिक भावत आलं. पक्ष, निवडणुका, शहकाटशह यापेक्षा ते समाज निर्मिण्यावर अधिक भिस्त ठेवतात. नाही म्हणायला ते एकदा विधान परिषदेवर निवडून गेले. त्याच्या निधीचा विनियोग त्यांनी आपला सारा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस एकरकमी देऊन नवा वस्तुपाठ सादर केला. गल्लीबोळातून आमदार निधीची खिरापत वाटणारे ते सवंग पुढारी झाले नाहीत, याचा मला मोठा आनंद वाटतो. कार्यकर्त्यांचे मतभेद ते उमदेपणाने स्वीकारतात. मतभेदाने मनभेद होणार नाही याची ते काळजी घेतात. एका प्रश्नात त्यांचे नि माझे उघड मतभेद झाले. पण ते वजा करून त्यांनी सतत माझ्याबद्दल प्रशंसेचा भाव ठेवला. मनाचं असं मोठेपण समकालीन कार्यकर्त्यांत अपवादानं दिसतं.
 राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व भाई माधवराव बागल विद्यापीठामार्फत ते दोन पुरस्कार प्रतिवर्षी देत असतात. या पुरस्कारांची सतत वाढत जाणारी पत ही बाबूराव धारवाडेंच्या चोखंदळपणाची चुणूकच. त्यामागे पुरोगामी विचार रुजवण्याची त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. भाई माधवराव बागलांचे समग्र साहित्य, जीवन, कार्य, कला, राजकारण, समाजकारण यांचा समग्र अभ्यास अद्याप झालेला नाही. बाबूराव धारवाडे यांनी आपल्या विद्यापीठामार्फत याचा पाठपुरावा करायला हवा. गॅझेटचा केला तसा. छ. शाहू महाराज, भाई बागल यांच्या जीवनकार्याचा वारसा ते सध्या सागर शिक्षण मंडळामार्फत नव्या पिढीत प्रतिबिंबित करताना दिसतात. त्यात एक विशिष्ट दृष्टी दिसून येते. नानासाहेब गद्रे व भाई बागल स्मारक व्याख्यानमालेतून ते आपल्या प्रेरकांची प्रेरणा जिवंत ठेवतात. तिथं महाविद्यालय सुरू व्हावं असं त्यांचं स्वप्न आहे. ते साकार झालं तर त्यांचं भाई माधवराव बागल विद्यापीठ हे खऱ्या अर्थानं प्रबोधनाचे औपचारिक अभिमत विद्यापीठ बनू शकेल.
 बाबूराव धारवाडे यांना कार्यकर्त्यांच्या मोहोळात सतत रुंजी घालायचा छंद. पुरोगामी कार्यकर्ता हा त्यांच्या जीवनाचा चरमबिंदू. अशा माणसांचं मोहोळ त्यांच्या भोवती सतत पिंगा घालत राहतं. त्याचा उपयोग ते कुणाला इंगा दाखवण्यासाठी करताना दिसणार नाहीत. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी असा संघर्ष त्यांच्या कार्यात अनेकदा उभा राहिला. लोकशाहीत लोकप्रतिनिधी हा सर्वश्रेष्ठ, अधिकारी, शासकीय अधिकारी ब-याचदा हुकूमशहा होऊ पाहतात. बाबूराव धारवाडे अशा प्रसंगी कधी कौशल्याने तर कधी धोरणीपणे प्रशासकीय सनदी अधिका-यांना त्यांचा योग्य तो मान ठेवून मर्यादांची जाणीव करून देतात. हे बाबूरावच करू जाणे. जिथे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा अधिका-यांपुढे मान तुकवताना मी प्रत्यही पहातो; तिथं बाबूरावांचा करारीपणा, ताठ मान मला सतत अनुकरणीय वाटत आली आहे.
 बाबूराव धारवाडे कार्यकर्ते असले तरी त्यांचे राहणीमान हे पुढाऱ्याला साजेसं. हा असतो त्यांच्यावरील काँग्रेसी संस्कृतीचा प्रभाव, शुभ्र खादीचे खळ घातलेले करकरीत पोषाख ही त्यांची करारी व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात असतात. अलीकडे त्यांना कमी ऐकू येतं हे किती बरं आहे. सामाजिक प्रदूषणातून त्यांची आपोआप झालेली मुक्ती मला या वयात लाभलेलं एक वरदानच वाटतं. अन्यथा, कान किटून जाण्याचाच बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला असता. बाबूराव धारवाडे सतत कार्यरत राहिल्यानं त्यांनी अमृतमहोत्सवी वय जेव्हा गाठलं ते कळलंसुद्धा नाही. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने तेव्हाच जाऊ शकेल, जेव्हा त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्ती होईल. त्यांना स्वप्नपूर्तीच्या शुभेच्छा देणारा हा लेख लिहिताना सतत एक आशा मनात आहे. एकविसावं शतक हे आत्मकेंद्रित माणसाचं राहणार असा नूर आहे. अशा स्थितीत बाबूराव धारवाडे यांचं जीवन व कार्य नव्या पिढीस एक आश्वासक दिलासा देत राहील. जग अंधारलं हे खरं आहे, पण काळोखातही एक कवडसा शिल्लक असण्याची उमेद हेच त्यांच्या जीवनाचं मला फलित वाटतं. प्राध्यापकांचे कवचकुंडल : प्रा. संभाजी जाधव

 मी काही तुम्हास साताउत्तराची पुराणी कहाणी नाही सागं त... हा काळ अवघा पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. ध्येय वादाने स्थापन झालेल्या (एखादा सन्मान्य अपवाद वगळता) सर्व शिक्षण संस्था संस्थानिक झालेल्या... संस्थाचालकांचा शब्द हाच कायदा... त्यांच्या जीभेवर येईल तो पगार... त्यांच्या मनात असेल तोवर नोकरी... वेतनमान निश्चित झालं तरी मस्टरवर एक पगार... हाती कपात...३१ मार्चचा दिवस... (नंतर तो ३० एप्रिल झाला)... अशाश्वत सूर्य घेऊन उगवायचा... त्या दिवशी संस्थाचालक ज्यांची नावं वाचतील त्यांनीच पुढे येणाऱ्या जूनला कॉलेजात यायचं... प्राध्यापक संघटना झाली तरी प्राध्यापकांचे प्रतिनिधी संस्थाचालक, प्राचार्य ठरवत... पगाराचा दिवस म्हणजे कपिलाषष्ठीचा योग... आवई उठायची आज पगार होणार... मग कळायचं चेअरमन गावी गेलेत... मग चेक आला... आज बँक बंद... आज पाकिटं झाली नाहीत... आय. ए. एस. करणारे, डॉक्टर, इंजीनिअर, वकील, न्यायाधीश, पंतप्रधान राष्ट्रपतींना शिकविणारे प्राध्यापक मात्र दोन वेळच्या भाकरीला महाग... घर भाडं तटलेलं, दुधाचं बिल थकलेलं, किराणा उधार बंद... काल शंभरात मिळविणार प्राध्यापक आज लाखाची कमाई करतात. नोकरी अर्जाने, मुलाखतीने मिळते. पगार एक तारखेस. तोही चेकने व बँकेतून! पेन्शन-ग्रॅच्युइटी, एल. टी. सी., फेलोशिप, रिसर्च अँट, बुक अँट, संस्थेवर, विद्यापीठावर नुसतं प्रतिनिधित्वच नाही तर प्रभुत्व... अधिराज्यही! प्राध्यापक संघटनेने ठरवलं की सारी कॉलेजीस, विद्यापीठे एकमुखी बंद, परीक्षा रद्द... हे सारं घडलं एका माणसाच्या आयुष्यभरच्या ध्यास, बांधिलकी आणि तळमळीनं... त्यांचं नाव प्रा. संभाजीराव जाधव! ते वार्धक्य व अल्पशा आजाराने निधन पावले. संघटनांचा एक झंझावात निमाला! प्राध्यापक समाजापुढे तो झंझावात एक यक्षप्रश्न ठेवून गेलोय... नोकरीला पैसे द्यावे लागतात... सगे सोयरे फिक्सिगं करतात... सीएचबींना वाली नसणं... जे सुरक्षित आहेत ते अतिरिक्त सुखी... सुस्त...! संघटनेचा पोशिंदा हरवणं म्हणजे समाजाचं अनाथ होणं असतं. तो असेपर्यंत संघटना कवचकुंडल असते... नसला की माणूस माणूस गलितगात्र! कधी-कधी माणसं जाईपर्यंत त्यांचं असणं, महत्त्व उमजत नसतं... तसं प्रा. संभाजीराव जाधव यांचं! जायच्या आदल्या आठवड्यात अॅपेक्स हॉस्पिटलच्या कॉटवर निरोप घेतानाही प्रा. बाबा पाटील, प्रा. सुधाकर मानकरना डॉक्टरांच्या टिप्स विसरून संघटनेचा गुरुमंत्र देत राहणं...! याचा मी साक्षीदार आहे.
 पुण्यातून इंग्रजीत एम. ए. होऊन प्रा. संभाजी जाधव हे वारणा महाविद्यालयात रुजू झाले. प्राचार्य भा. शं. भणगे नि त्या वेळी प्राध्यापक असलेल्या अ. के. भागवतांमुळे ते इथल्या कॉमर्स कॉलेजात आले. तेथून संस्थेची गरज म्हणून छ. शहाजी महाविद्यालयात. संघटनेचे काम करतात म्हणून नोकरी गेली. मग महावीर महाविद्यालयात असा त्यांचा पोटार्थी नोकरीचा प्रवास असला तरी तो मात्र त्यांचा जीवन आलेख नव्हे! त्यांचं जीवन म्हणजे प्राध्यापक संघटनेचे कार्य... प्रतिष्ठा आणि कर्तृत्व!
 प्रा. संभाजीराव जाधव यांनी संघटनेचे कार्यकरावी अशी काही त्यांची पार्श्वभूमी नव्हती. जमीनदार कुटुंब, संस्थानी सासर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. जे. पी. नाईक, गं. बा. सरदार अशा पूर्वसुरींचा मेळ व मेळावा असताना त्यांनी संघटनेकडे ओढ घ्यावी याचं रहस्य त्यांच्यातील सव्यसाची वाचकात दडलयं. ते इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक, मराठी साहित्याचे व्यासंगी. घरी हजारो पुस्तकांच्या गराड्यात झोपणारे संभाजीराव ज्यांनी पाहिले असतील त्यांना त्यांच्या ग्रंथ ऐश्वर्याचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. तो नुसता संग्रह नव्हता. स्वतः नित्य डोळे फिरवायचे नि हातही! (पुस्तकं लावण्याचही नाद होता. ब्रशनी पुस्तकं साफ ठेवत.) महावीर महाविद्यालयात मी स्टाफरूममध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत त्यांच्या शेजारी बसायचो. एखादा विषय सुरू केला की, संभाजीराव तासनतास अनके संदर्भ देत बोलत राहात. ते बहुश्रुत होते. त्यांना शिकवायची तयारी नाही करावी लागायची. प्राध्यापक संघटनेच्या कामासाठी त्यांना नेहमी मुंबईला जावे लागायचं... दुस-या दिवशी सकाळी रेल्वेने जायचे ते तडक वर्गात जायचे... मग शेक्सपियर, मिल्टन, गटे कोलरिज, यिटस्, शॉ, रसेल सारे त्यांना घाबरत! थरथरत वगार्त उभे!! ही असते व्यासंगी शिक्षकाची खूण.
 जो धाक, अधिकार भाषा, साहित्यावर तोच संस्थाचालक, विद्यापीठ आणि शासनावर! मला आठवतं, एकदा संप झाला होता. शासनाने मागण्या मान्य केल्या होत्या. पण आदेश जारी होत नव्हता. आम्ही मंत्रालयात शिक्षण सचिवांकडे गेलो होतो... ते थातूरमातूर उत्तर देऊ लागले. संभाजीराव तडक म्हणाले...आम्ही नाही तुम्हाला या बोटावरची थुकी त्या बोटावर करायला शिकवली... हे तुमचं उपजत शिक्षण दिसतं...मंत्र्यांना सांगा... २० तारखेच्या आत आदेश नाही निघाला तर आमचे दोनच प्रतिनिधी विधान परिषदेत तुम्हास रोखतील.' आम्ही बी रोडवरील होस्टेलवर उतरलो होतो... सायंकाळी आदेश आमच्या हाती पोच झाला होता.
 प्रा. संभाजीरावांचं लेखन व वक्तृत्व बिनतोड होतं. मला कधी कधी वाटायचं की, लॉ कॉलेजातच यांनी शिकवलं असतं तर सारे वकील अधिक निष्णात झाले असते. त्यांची निवेदने म्हणजे तर्कशुद्ध लेखनाचा वस्तुपाठ! विरोधी पक्षाला बिनताडे नामाहेरम करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखणीत उतरलं होतं, ते प्राध्यापकांवर झालेल्या अनेक अन्याय, अत्याचारांच्या हृदय पिळवटणाच्या कहाण्यांतून! फार कमी लोकांना हे माहीत असले की, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम असो वा विद्यापीठांचे स्टॅट्यूटस- ते संभाजीरावांच्या एकटाकी प्रारूप लेखनाचीच फलनिष्पत्ती! त्यांनी प्राध्यापक ट्रिब्युनल्समध्ये अनके केसीस लढल्या... त्यांना अपयश नव्हती त्यांच्या कार्यकालात एकही प्राध्यापक घरी बसला नाही. त्यांनी ट्रिब्युनलला कधी संघटनेचा वकील दिला नाही. मुंबई उच्च न्यायालयात ते कै फियती लिहित. सनद नसल्याने वकीलपत्र दुस-याचं असायचं! अॅड. फडणीस साच्या केसीस लढत पण सारी कागदपत्रे, एक्झिबिटस, जी. आर, स्टॅट्यूटस् संभाजीराव पुरवत. पुढे ते वकीलही प्राध्यापक संघटनेचे प्रवक्ते झाल्यासारखेच प्लीड करत.
 एखाद्या संस्थेविरुद्ध शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेने (सुटा) ब्र काढलं की त्याचा बभ्रा ठरलेला. भल्यभल्यांनी संघटनेपुढे हात टेकले. त्यांच्या नावाची जंत्री मोठी आहे. कधी कधी (अपवाद म्हणून) प्राध्यापकाची चूक असायची. संभाजीरावांच्या लेखी तो प्राध्यापक निर्दोषच असायचा. ते म्हणत... ‘प्राध्यापकाची चूक ज्या परिस्थितीतून झाली ती परिस्थितीच त्याला जबाबदार असल्याने प्राध्यापक निर्दोषच. त्यांच्या मनाची ठेवणच अशी होती की प्राध्यापक समाजाविरोधी जो तो आपला प्रतिस्पर्धीच. (शत्रू नव्हे!) त्यास गारद केल्याशिवाय माघार नाही. हे सारं करताना त्यांनी मूल्यनिष्ठा, साधनशुचिता, विवेक, सत्यप्रियता कधी ढळू दिली नाही. मागच्या दाराने, बंद दरवाजे करून त्यांनी कधी काही संघटनेसाठी वा स्वतःसाठी मिळवलं नाही. मीच नाही तर माझे सारे सहकारी माझ्यासारखे सच्चे हवेत असा त्यांचा आग्रह असायचा. त्यासाठी पत्रे, निवेदने, चर्चा, बैठका झडत. त्यांच्या लोकशाहीला एकदिशा होकायंत्र होतं. ते म्हणजे प्राध्यापक हित.
 संघटना शक्तीवर विद्यापीठावर निरंकुश राज्य करण्याचा करिश्मा हा प्रा. संभाजीराव जाधव यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचं फलित! कुलगुरु निवडण्यापासून ते डी. लिट. डिग्री प्रदान करण्यापर्यंत सर्व अभ्यासमंडळे, अधिष्ठाते, विद्वत सभा, सिनेट, व्यवस्थापन परिषद सर्वांवर एकाधिकार मिळवून प्रा. संभाजीराव जाधव यांनी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक कीर्तिमान निर्माण केला होता! संघटनेशिवाय ते जगूच शकत नव्हते. संभाजीराव व संघटना म्हणजे अद्वैत!
 अलीकडच्या काळात संघटनेत काही मतभेद निर्माण झाले होते. अनेक ज्येष्ठ सहकारी संघटनांविरोधी भूमिका घेतात असं त्यांना वाटायचं! पण एकहाती नेतृत्व करणाऱ्याला मतभिन्नता म्हणजे विरोध वाटत राहतो. अशा काळातही प्रा. संभाजीराव आपल्या मतांवर कसे ठाम असत हे मी त्या काळातील एका कामात जवळनू अनुभवलं आहे. संघटना त्यांनी शेवटपर्यंत एकमुखी ठेवली त्याचं रहस्य संघटनेच्या आर्थिक स्थैर्यास आहे. प्राध्यापक विश्व, प्राध्यापक कल्याण निधी, प्राध्यापक पतसंस्था, कुठंही तुम्हास भ्रष्टाचार आढळणार नाही. उलटपक्षी या संघटनेने अनेक कामगार संघटना, सामाजिक उपक्रमांना साहाय्य केल्याचं तुमच्या लक्षात येईल.
 प्राध्यापक समाजाचं सारं रूप पालटणारा हा किमयागार... त्यानं कधी आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळवला नाही. महाविद्यालयात निरोप समारंभ घेतला नाही. एकसष्ठी नाही की गौरव नाही. निवृत्त तरी कार्यप्रवृत्त राहून एका अर्थानी त्यांनी प्राध्यापक समाजास न सांगता एक शिकवणच मागं ठेवली आहे. पोट, घर, मुलं- बाळं यासाठी नोकरी असते. पण ती इमाने इतबारे करत स्वतःच्या पलिकडे जाऊन बरचं करता येतं. समाजासाठी... दुसन्यासाठी! इतरांसाठी करायला घरावर तुळशीपत्र नाही ठेवावं लागत. गरज असते फक्त सामाजिक भानाची! ...दुसऱ्यासाठी करायची कळकळ म्हणजे शिक्षण, प्रा. संभाजीराव जाधव यांनी प्राध्यापक समाज इतका सुरक्षित, समृद्ध केला आहे की आता जर त्यांनी शिक्षण, संशोधन, लेखन, वाचन, समाजकार्य इ.शी प्रतारणा केली तर मात्र त्यांचा कोणीच वाली असणार नाही. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी म्हणजे कधी भरून न येणारं शून्य होय! शिक्षण संघटक : डी. बी. पाटील

 डी. बी. पाटील सरांना मी सन १९६० पासून ओळखतो. तेव्हा मी १० वर्षांचा होतो नि शाह दयानंद मोफत मराठी शाळेत पाचवीत शिकत होते. आमच्या शाळेस लागूनच शाहू दयानंद हायस्कूल होते. सर तिथे प्रथम शिक्षक, नंतर मुख्याध्यापक झाले. मला त्या वेळची एक आठवण लक्षात आहे. सर मुख्याध्यापक झाल्यानंतर त्या हायस्कूलने कात टाकली. तिथे शिस्त आली. नवनवीन सुविधा त्यांनी सुरू केल्या. त्यातील एक सुधारणा पक्की माझ्या लक्षात आहे. त्यांनी एका वर्गात वाचनालय स्वतंत्रपणे सुरू केले. तिथं वर्तमानपत्रे, मासिके ठेवली जायची. आम्ही मराठी शाळेतील मुले तिथे वाचण्यास जात असू. तिथं ‘बहुश्रुत माला लागायची. ते एक मासिक होतं. ते मी वाचायचो. कारण त्यात माझ्या ओळखीच्या सुधाकर प्रभू या बालसाहित्यिकाचं लेखन छापून यायचं. मला लेखक होण्याची प्रेरणा या वाचनालयानं प्रथम दिली. शिक्षकानं सतत उपक्रमशील असलं पाहिजे. आपले छोटे प्रयत्न पण विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यास कारणीभूत होतं राहतात, हे मी डी. बी. पाटील सरांच्या उपक्रमशीलतेतून शिकलो.
 पुढे मी आंतर भारती विद्यालयात शिकण्यास गेलो पण माझे अनेक मित्र डी. बी. सरांच्या हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यांच्या बोलण्यातून नि माझ्या त्यांच्या शाळेत जाण्या-येण्यातून लक्षात आलं की ती शाळा पूर्वी काही दखलपात्र नव्हती. सरांनी तिथे मैदान विकसित केलं. वर्ग बांधून विस्तार केला. शिस्त आणली. त्या वेळी बजरंग नावाचा शिपाई होता. नाव शिपाई पण, त्याचा व्यवहार साहेबाचा असायचा. वाजवून तुझ्याशिवाय शाळा चालू शकते, हे दाखवून दिलं नि तो पुढे सुतासारखा सरळ आला. प्रशासक म्हणून त्यांचा दरारा ही जुनीच गोष्ट होय. आज ती अमृतमहोत्सवी वर्षातही टिकून आहे याचं आश्चर्य वाटतं नि लक्षात येतं की, शिस्त, करारीपणा, व्यवस्था, नियोजन हा त्यांच्या जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग होय. त्या शाळेत त्यांनी क्रीडा महोत्सवात संघ पाठवले व पारितोषिके मिळविली. त्या हायस्कूलचं एक बोर्डिंग होतं. आर्य समाजाची ती शाळा असल्यानं रोज प्रार्थना असायची. मुलं ती चुकवत. सर मागून येऊन चुकार मुलांना पकडत. ते शिकवायचेही चांगले असे माझे मित्र सांगत. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा हौद बांधला आणि आम्हास पोटभर पाणी मिळू लागलं. 'विद्यार्थी केंद्री शिक्षण' असं आज बोललं जातं. त्या वेळी याचा शिक्षणक्षेत्रात गंध नव्हता. त्या काळात डी. बी. सरांची विकास दृष्टी विद्यार्थी केंद्री होती हे विशेष.
 कालांतराने मी शिक्षक झालो. जिथं शिकलो तिथंच शिक्षक होण्याची संधी मिळाली. माझ्या शिक्षक होण्याच्या स्वप्नात साने गुरुजीही होते नि डी. बी. सरही. माझ्या शिक्षकात गरेही आहेत नि काटेही, त्याचं हे रहस्य. मी ज्या आंतरभारती विद्यालयात शिक्षक झालो त्याचे मुख्याध्यापक ए. बी. देशपांडे सर बी. डी. सरांचे स्नेही. सरांचं आमचं हायस्कूलमध्ये नेहमी जाणं-येणं असायचं. ते आमच्या शाळेचे कोणीच नव्हते. पण आमचे शिक्षक त्यांचा आदर करायचे. नंतर कळलं की, ते मुख्याध्यापक संघाचे सर्वेसर्वा आहेत. ते पद त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व महत्त्वाकांक्षेने मिळवलं. ते एव्हाना शाहू दयानंद सोडून महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक झाले होते. पूर्वी मुख्याध्यापक संघ एका विशिष्ट जाती, विचाराचा होता. डी. बी. सरांनी तो बहुजनांचा केला. डी. बी. सर जिथं जातील तिथं आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतात. पूर्वी माध्यमिक मुख्याध्यापक संघ जेवणावळीसाठी प्रसिद्ध होता, सरकारधार्जिणं असं त्याचं स्वरूप होतं. सरांनी ते बदललं. त्यांनी या संघास ‘शैक्षणिक संस्था संघटक संघ' असं रूप दिलं ते कार्यातून. त्यांनी सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे चाचण्या, परीक्षा केंद्रीय पद्धतीने सुरू केल्या. त्यामुळे परीक्षांत एकवाक्यता आली. त्यासाठी त्यांनी विषय शिक्षक समित्या निर्माण केल्या. त्यातून शाळातील शिक्षक व शाळा यात एक सुसंवाद सुरू झाला. त्यातून संघास आर्थिक बळ नि बाळसं लाभलं. त्यातून शिवाजी पार्कसारख्या प्राइम लोकेशनवर संघाची स्वतःची वास्तू ‘विद्याभवन' उभी राहिली. खेड्यातून शाळेच्या कामासाठी येणाच्या मुख्याध्यापकांची निवासाची सोय झाली. प्रेस सुरू केला. माझा एक वर्गमित्र तिथं कामास होता. त्याच्याकडून कळायचं की डी.बी सर तिथं फार बारकाईने लक्ष देतात.कागद, शाईची खरेदी अल्पदरात करण्याबाबत ते दक्ष असायचे. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।।' हा तुकारामांचा अभंग हे त्यांच्या यशस्वी प्रशासकाचं गुपित म्हणून सांगता येईल. त्यातून संघाने स्वतःची प्रतिष्ठा निर्माण केली. कधी काळी सरकारी अधिका-यांचा मांडलिक,बटीक समजला जाणारा मुख्याध्यापक संघ डी. बी.सरांच्या कुशल संघटन शक्तीच्या जोरावर सरकारी अधिका-यांनाच आपल्या दावणीला बांधता झाला. हा कायाकल्प डी. बी. सरांच्या द्रष्ट्या योजकत्वामुळे शक्य झाला हे कुणासही नाकारता येणार नाही.
 डी. बी. पाटील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य पातळीवरचे अध्यक्ष झाले नि त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने राज्य शिक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था (एस. आय. टी.), महाराष्ट्र शिक्षण संचालनालय, क्रीडा संचालनालय, शिक्षण मंत्रालय असा चौफेर गोफ गुंफत डी. बी. सर राज्यातील एक प्रस्थ' झाल्याचं मी अनुभवलं आहे. ते एक स्वप्न उराशी बाळगतात. कार्यकत्र्यांचा संच उभारतात. विशिष्ट काळात विशिष्ट काम करून आपली छाप उठवतात. मग पदावर मांड ठोकतात. केवळ पदाची आसक्ती हा त्यांचा स्वभाव नाही. पद हे सत्ताकेंद्र असतं तसं सेवा साधनही. त्यांनी नित्य नवी पदं भूषविली पण त्यांचा अहंकार त्यांनी कधी येऊ दिला नाही. उलट हाती आलेल्या सत्तेतून त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावला. एस. एस. सी. चं कोल्हापूर बोर्ड, कोल्हापूरचं क्रीडा संचालनालय यांच्या विकासात सरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल' जे पूर्वी पुण्या-मुंबईची मक्तेदारी होती, ते कोल्हापूरला आणलं. त्याची सभासद संख्या वाढवली ती त्याचं मराठीकरण करून, त्यात शिक्षणाच्या व्यावहारिक अडचणी मांडून त्यांनी त्यास माध्यमिक शिक्षणाचं मुखपत्र बनवलं. शिक्षण संक्रमण' पेक्षा लोक त्या वेळी हे जर्नल वाचणे अधिक पसंत करायचे कारण त्यात 'Realities' असायच्या.
 आणिबाणीच्या काळात मी शिक्षक संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होतो त्या वेळी माध्यमिक शिक्षक संघटना संस्थाधार्जिणी जशी होती तशी ती मुख्याध्यापकांचं ताटाखालचं मांजरही होती. शिक्षक संघटनेचे चक्क मुख्याध्यापकच शिक्षक प्रतिनिधी असायचे. त्या वेळी आम्ही वेगवेगळ्या राजकीय विचारांचे (काँग्रेस, जनसंघ, कम्युनिस्ट) तरुण शिक्षक एक झालो नि शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक प्रतिनिधी शिक्षकच असले पाहिजे असा पवित्रा घेतला. डी. बी. सरांचा यास विरोध होता. लढाईत आमची सरशी झाली. पण डी. बी. सरांनी रोजच्या व्यवहारात शिक्षक विरुद्ध मुख्याध्यापक असा पवित्रा येऊ दिला नाही. काळाची पावलं ओळखून वर्तमान स्वीकारण्याचा त्यांचा उदारपणा नि उमदेपणा यामुळे त्यांचा संघटक, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ नेहमी उजवा ठरत गेला. कोणत्याही चांगल्या उपक्रमामागे आपल्या संघटनेचे बळ उभारावयाच्या डी. बी. पाटील सरांच्या सकारात्मक वृत्तीमुळे ते अधिक मोठे वाटतात. ज्याला सत्ता हे सेवेचे साधन आहे हा विवेक जमला तो माणूस यशस्वी झाला असं समजा. सरांनी किती संस्था, संघटना, व्यक्ती, विचारांना अभय दिलं म्हणून सांगू? मी त्यांच्याबरोबर कितीतरी उपक्रमात भागिदारी केली. त्यांनी माझ्या अनेक उपक्रमात डोंगर उचलले. कोल्हापूरच्या बी. टी. कॉलेजच्या श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालय (एस. एम. टी टी.) सुवर्ण महोत्सव, महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, मराठी बालकुमार साहित्य सेंलन, बालक हक्क परिषद, शिक्षण व्यासपीठ ग्रंथमहोत्सव अशा अनेक उपक्रमांत मला त्यांचा निकटचा सहवास लाभला. त्यातून मला नियोजन, काटकसर, वक्तशीरपणा, नेटकेपणाचा संस्कार मिळाला.
 डी. बी. पाटील सर व्यक्ती म्हणनू अत्यतं मितभाषी. चर्चेच्या फापट पसाऱ्यात मुद्दे निवडण्याचं, टिपण्याचं कसब शिकावं तर सरांकडून. एखाद्या विषयावरची बैठक सुरू असते. कार्यकर्ते वेगवेगळी मत मांडत असतात. सर पॅड घेऊन त्यातलं मुद्याचं टिपण लिहून घेतात. परिषद, महोत्सव, चर्चासत्र समारंभाच्या चर्चेत त्यांना कामं दिसतात. माणसं दिसली की त्यांचे गुण दिसतात. त्यांच्या दोषाचं त्यांना भान असतं. त्या दोषावर उतारा म्हणून दुसरा एक माणूस ते दोष नियंत्रक म्हणून नेमतात. माणसांना कामातलं नेमकेपण समजावून देतात. कामाचं बजेट सांगायला सर कधी विसरत नाही. कामाची जबाबदारी सोपवून ते घरी झोपत नाहीत. कोणत्या कामात कधी गोंधळ होण्याची शक्यता आहे हे त्यांनी आधीच हेरलेलं असतं. त्या वेळी ते दत्त म्हणून उभे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आपत्ती व्यवस्थापनाचं एक होकायंत्र (खरं तर होरायंत्र) सतत चक्राकार फिरत असत. त्यांना कामचुकाराचं भान असतं. ते अशा माणसास न दुखावता गाळतात. ते अधिक साथर्क, समर्थ पयार्य देऊन. ‘तुमच्याबरोबर त्यांना जरा घ्या' असं डी. बी. सर जेव्हा सांगतात तेव्हा सुजाण कार्यकर्ता आपला पत्ता साफ झाला, पतंग कटला ओळखून आपसूक दुरुस्त होतो. सराची दुरुस्ती परीक्षा Indirect असते. कामात भिडेपोटी कसर ते कधी स्वीकारत नाहीत. त्यांच्या उपक्रम सफलतेचं हे गमक होय. अलीकडच्या काळात ते ‘प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाउस' मूळ संस्थेतून विकसित झालेल्या शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेस विद्यापीठ आयोगाचं अनुदान मिळालं होतं. अनुदानापेक्षा कमी पैशात त्यांनी वसतिगृहाची उभारणी केली व उरलेलं अनुदान आयोगाला परत पाठवून एकविसाव्या शतकात आपल्या संतपणाचा सुखद धक्का दिला. हा चमत्कार घडवणारा महापराक्रमी कोण ते पाहण्यासाठी आयोगाचे अधिकारीच चक्क त्यांना भेटण्यास आले. ‘केल्याने होत आहे रे। आधी केलेच पाहिजे।।' हा त्यांचा जीवनमंत्र नव्या पिढीने अंगिकारायला हवा.
 डी. बी. पाटील सर कर्ते सुधारक जसे आहेत तसे समाजचिंतक, शिक्षण तज्ज्ञही आहेत. ते वृत्तपत्रात समकालीन सामाजिक समस्या, शिक्षणविषयक प्रश्न इत्यादींबद्दल नित्य लिहित असतात. अलीकडे त्यांचे शैक्षणिक विचार ग्रंथरूप प्रकाशित झालेत. ते वाचत असताना लक्षात येतं की, या माणसात नव्या बदलाची चाहूल हेरण्याची स्वीकार्यता आहे. त्यातून वर्तमानात बदल घडावा अशी भावना आहे. पण ते भावनेत, भाबडेपणात गुरफटत नाहीत. भावना कार्यप्रवण कशी होईल याबाबत ते प्रयत्नशील असतात. अगदी अलीकडे आम्ही इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले. ती पद्धत समाजहिताची, सामान्याच्या भल्याची आहे हे लक्षात घेऊन आपलं सार.बळ या प्रवेशामागे उभे केलं. 'भिऊ नको मी तुझ्या पाठिशी आहे','खांद्यावर हात ठेवून लढत रहा म्हणणारे' डी. बी. पाटील सर कार्यकर्त्यांसाठी असा डॅशिंग बोर्ड असतो की त्यानं मारलेली उडी विक्रमी असणार हे ठरलेलं. अशा डी. बी. पाटील सरांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने केवळ आनंद नि अभिनंदनाची गोष्ट नसून ती अनुकरण पर्वणी होय. असे अमृतकुंभ, कृतीस्तंभ, अनुभव मेरू या समाजात आहे म्हणून इथं अजून चांगलं टिकलं आहे. ते वाढण्याची उमेद शिल्लक राहते ती डी. बी. सरांसारखे आधारवड जख्ख झाले तरी लख्ख आहेत म्हणून. अशा व्रतस्थ आधार वडाखालीच स्वास्थ्य व सभ्यतेची सावली नांदत असते. मी त्यांना शिक्षण महर्षी म्हणणार नाही कारण असं म्हणून घेणान्यांचा बाजार तेजीत आहे. डी. ब.सारखी जी माणसं आरक्षणाचा उपयोग मुलींसाठी करण्याचा दूरदर्शीपणा दाखवतात ते खरे सेवाव्रती, शिक्षणप्रेमी असतात. नीरक्षीर न्यायव्रती : एस. व्ही. नेवगी

 स्वातंत्र्यपूर्व काळ हा वर्तमान देशस्थितीच्या संदर्भात न्याय नि नैतिकतेचा काळ होता, ही निर्विवाद गोष्ट होय. पोलीस व न्याय यंत्रणेचं भय अपराधी आणि निरपराध अशा दोन्ही वर्गावर होतं. आज अपराधी निडर, बेमुर्वत झालेत. कायदा पाळणारा नैतिकतेस पुण्यकर्म, धर्म म्हणून जपणारा मात्र भांबावून गेल्यासारखी स्थिती आहे. याचं कारण न्याय यंत्रणेची कार्यपद्धती, गती जशी आहे तद्वतच या व्यवस्थेत न्यायमूर्ती एस. व्ही. नेवगींसारखी माणसं अपवादानं दिसणं हेही असावं? समाज चोहोबाजूनी अंधारून येत असताना न्यायमूर्ती नेवगींचं व्यक्तिमत्त्व माझ्यासारख्याला आश्वस्त करतं. आपल्या समाजात अजून न्याय, नैतिकता, कर्तव्यपरायणता आदी मूल्यांची बूज राखली जाते, ती नेवगींसारख्या 'इंद न मम' म्हणनू जगणाच्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींमुळे. 'अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' असंही माणसं कधी गुणगुणतात की नाही मला माहीत नाही. पण या ओळीचा आशय जगताना, जागवताना मी नेवगीसाहेबांना पाहतो, तेव्हा ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असा व्यवहार आपसूक घडून येतो.
 न्यायमूर्ती नेवगींचा नि माझा परिचय शांतारामपंत वालावलकर यांच्यामुळे झाला. बालकल्याण संकुलाच्या एका बक्षीस समारंभास बापूंनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तेव्हापासून मी त्यांना पाहात आलोय. गेल्या पंधरा वर्षांत मला त्यांच्या वर्तन-व्यवहारात कधी काही विसंगत दिसलं नाही. अशी माणसं अपवाद नि अवघड असतात, हे मात्र खरं. प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या आत्मस्मृतीपर चरित्रग्रंथात 'विसंगती नसलेली माणसं व्यंग करायला एक आव्हान असतं,' असं म्हटलयं. अशी आव्हानात्मक चरित्र नि चारित्र्याची माणसं समाजमनास न्याय, नैतिकतेचे आवाहन करण्याचा अधिकार बाळगून आहेत, म्हणून आदर्श मूल्यांची समाजात रोज रुजवण होत राहते. अन्यथा, हा समाज मूल्यहीन वाळवंटच झाला असता.
 न्यायमूर्ती नेवगी हे तसे मूळचे बेळगावचे. तिथचे वाढले, शिकले कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी विधी शाखेत प्रवेश घेतला. बेळगावच्या लॉ कॉलेजातून ते एलएल. बी. झाले. तिथेच त्यांनी वकिली सुरू केली. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारची प्रकरणे ते चालवत. पुढे १९६२ ला ते शासनाच्या विधी सेवेत दाखल झाले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले. आपल्या कार्यकालाचा मोठा कालखंड त्यांनी कोल्हापुरात व्यतीत केला. प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या प्रख्यात व्यंग चित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी आपल्या लक्ष्मणरेषा' या कोल्हापुरातून ते १९८३ च्या दरम्यान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
 न्यायाधीश म्हणून कार्य करीत असताना त्यांचा न्यायालयाच्या वर्तुळात विलक्षण दबदबा होता. विशेषतः अपराधी वर्गामध्ये त्यांची मोठी जरब होती. नेवगींच्यापुढे केस चालणार म्हटले की जबर शिक्षा ठरलेली. त्यांनी आपल्या कार्यकालात हा- ताळलेले अनेक खटले व निकाल महाराष्ट्रभर गाजले. अभिनेत्री पुष्पा भोसले खून खटला (१९८१), हेलें खून व सांगली बँक दरोडा खटला (१९८३) यापैकी होत. या खटल्यांच्या निकालामुळे ते ‘जबर शिक्षा देणारे न्यायाधीश' (Conviction Minded Judge) म्हणून ओळखले जात. पण ते खरे नव्हते. त्यांच्या हातात काही ‘वॉशिंग्टनची कु-हाड' नव्हती. त्यांनी कुणाला कधी सूडबुद्धीने, आकसाने शिक्षा नाही दिली. पण अपराधी वृत्ती समाजात नियंत्रितच हवी, अशी त्यांची धारणा होती नि आहे. त्यांच्या अनेक निकालानंतर शिक्षा झाल्यावरही पश्चात्तापदग्ध आरोपींनी भर न्यायालयात साष्टांग दंडवत घातल्याचे अनेक जण सांगतात. त्यांच्यातील त्यांतील ‘निरक्षीर न्यायवृत्तीस आणखी कोणता दृष्टान्त हवा?
 अलीकडे उठसूठ अटकपूर्व जामीन घेण्याची प्रवृत्ती बळावते आहे. बहुधा अर्ज केला की तो मिळतो असे दिसून येते. नेवगींनी अपवादाने असे अर्ज मंजूर केले.ते परिस्थितीजन्य मूल्यांकन करीत. अर्जदार अपराधी वाटला तर ते असे अर्ज नामंजूर करीत. आज अपराधी उजळ माथ्याने फिरतात.त्यामुळे न्यायपद्धतीच्या पुनर्मूल्यांकनाची मागणी जोर धरते आहे. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करण्याची, पळवाटा शोधून अपराध्यांना अभय द्यायची प्रवृत्ती वाढत आहे. अशा स्थितीत नेवगी साहेबांसारख्या ‘अपराध नियंत्री न्यायाधीशांचे महत्त्व नव्याने जाणवल्यावाचून राहात नाही.
 न्यायमूर्ती नेवर्गीनी आपल्या कार्यकालात अधिकांश अपराध्यांना शिक्षा ठोठावली. त्यापैकी निम्म्या आरोपींना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे न्यायमूर्ती नेवगी हे नैतिक न्याय रुजवू पाहणारे न्यायाधीश असा समज होता. पण त्यांनी कायदे, पुरावे, पंचनामा या सा-यांची चौकट पाळून दिलेले हे निवाडे जनसामान्यांस, साधनहीन समाजास मोठे दिलासा देऊन गेले. फाशी, बलात्कार, हुंडा, न्यायाधीशांच्या नेमणुका अशा कायद्याशी संबंधित परंतु विवाद्य विषयासंदर्भात न्यायमूर्ती नेवगी यांची परखड मते आहेत. आजच्या गोंधळलेल्या स्थितीत त्यांच्या मतांचे मार्गदर्शन समाजाला लाभणे गरजेचे आहे.
 न्यायमूर्ती नेवगींनी निवृत्तीनंतरही अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. गोवा राज्याच्या औद्योगिक लवादाचे मुख्य न्यायाधीश म्हणून केलेले कार्य सर्वश्रुत आहे. त्यानंतर गोव्याच्याच शासन व सागरी दळणवळण कर्मचा-यांमध्ये असलेल्या विवादात त्यांनी लवादाची यशस्वी भूमिका पार पाडली. आपल्याकडील शिवाजी विद्यापीठात मध्यंतरी १९८८-९० च्या दरम्यान पेपर फुटीचे एक प्रकरण मोठे गाजले होते. सध्याही परीक्षेतील भ्रष्टाचारासंदर्भात गदारोळ सुरू आहे. त्या वेळी न्यायमूर्ती नेवगींची एक सदस्यीय समिती विद्यापीठाने नेमली होती. या समितीच्या अहवालाने महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या परीक्षाविषयक कार्यपद्धतीत मूलभूत स्वरूपाच्या सूचना केल्या होत्या. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खासगी शिकवण्या बंद व्हाव्यात म्हणून धाडी घालणे, असे गैर व्यवहार बंद करणे हे विद्यापीठाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले होते. विद्यमान विद्यापीठांचा जो नवा कायदा अस्तित्वात आला आहे तो शैक्षणिक भ्रष्टाचारास बांध घालणारा कायदा मानला जातो. त्यातील अनेक तरतुदी या नेवगी समितीच्या शिफारसींवर बेतलेल्या आहेत हे फार कमी लोकांना माहीत असावे.
 निवृत्तीनंतर न्यायमूर्ती नेवगी लेखन, वाचन, सामाजिक कार्यात सक्रि य राहात आले. सौ. नलिनी शां. पंत वालावलकर धर्मादाय विश्वस्त निधीचे ते कार्याध्यक्ष आहेत. या न्यासामार्फत श्री लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र चालवले जाते. त्याच्या उभारणीच्या काळात ते सक्रिय सहभागी होते. कामगार नेते संतराम पाटील यांच्या स्मृतिन्यासाचे ते विश्वस्त आहते. अनके जनहित याचिकांच्या मसुद्यांचे ते शिल्पकार होते. न्यायासंबंधी विवाद्य प्रश्नांवर त्यांचे लेखन समाजास सतत प्रेरक व मार्गदर्शक ठरलेलं आहे. सामाजिक दृष्टीने न्यायाचं राज्य यावं म्हणून त्यांची चाललेली सततची धडपड आपणास एका कर्तव्यतत्पर, देशप्रेमी नागरिक म्हणून बळ दते राहते.
 साधारणपणे माणसं मोडेन पण वाकणार नाही अशा व्यवहारी मार्गाने जगत असतात. मी नेवगीसाहेबांना गेली पंधरा वर्षे सुरक्षित अंतरावरून (आदरामुळे!) निरखत आली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व 'मी मोडणार नाही नि वाकणार पण नाही' अशा करारी बाण्याचं आहे. न्यायाधीश मंडळींचं जगणं त्यांच्यावरील विशिष्ट जबाबदारीमुळे एकटेपणाचं असतं. ब-याचदा ही माणसं समाजापासून दुराव्याचे जीवन जगत असतात, हे खरंय पण ती दुरावलेली खचितच नसतात. न्यायमूर्ती नेवगींचं मोठं नसलं तरी आपलं असं मित्रमंडळ आहे. नुकतेच निवर्तलेले उद्योगपती तात्या तेंडुलकर, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष के. डी. कामत, शां. कृ. पंत वालावलकर हे त्यांच्या सुहृदयापैकी एक होत. या सा-यांशी त्यांचं बोलणं, वागणं मी अनुभवलंय. समवयस्कांमध्ये त्यांचा न्यायाधिशी अंगरखा केव्हा गळून जातो ते कळत सुद्धा नाही.
 न्यायमूर्ती नेवगींचं सामाजिक जीवन जसं आदर्शवत राहिलं तसं कौटुंबिकही. त्यांच्या पत्नी सौ. तिलोत्तमा नेवगी या रसायनशास्त्र विषयाच्या ख्यातनाम प्राध्यापिका. येथील गोखले महाविद्यालयाच्या त्या काही काळ प्रभारी प्राचार्या होत्या. मुलगा अॅड. अभय नेवगी व सून अॅड. कैलाश नेवगी उभयतांनी व्यवसायाबरोबर सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविला आहे. ब-याचदा मोठी माणसं स्वतः उत्तुंग होतात. नेवगींचं मोठेपण आपल्याबरोबर सर्वांना मोठं करण्यात दिसून येतं.
 त्यांच्या जीवनाचा अमृतमहोत्सव ही केवळ आनंदाची गोष्ट नव्हे! ब-याचदा मोठ्या माणसांचे असे महोत्सव म्हणजे आतषबाजी, चैन, प्रदर्शन ठरते. न्यायमूर्ती नवे गींचा अमृत महोत्सव आजच्या विकल स्थितीत चिंतनयुक्त अनुकरणाचा व्रतोत्सव व्हायला हवा. त्यांच्या जीवन व कार्याची प्रेरणा घेऊन न्यायाच्या राज्यास बळकटी आणणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याबद्दलचा आदर वाढणे, जनसामान्यांना न्यायाचे अभय मिळणे यांसारखे उपक्रम, प्रयत्नांची मुळे समाजात घट्ट रुजायला हवीत. वकील, पोलीस, न्यायाधीश यांच्याबद्दल समाजात विश्वासार्हता वाढणे अशा महोत्सवामधील उद्देश असायला हवेत. आपण अशा महोत्सवांची बोळवण केवळ शुभेच्छा समारंभ म्हणून करतो.
आपल्या साऱ्या वर्तनव्यवहारांची आपण नव्याने मांडणी करायला हवी. अन्यथा असे एकेक दीपस्तंभ काळाच्या उदरात बघता बघता गडप होतील नि मग आपण अंधारल्या जगात पणती घेऊन आदर्श धुंडाळत राहू. अशी शोकांतिका व्हायची नसेल तर समाजाने न्यायमूर्ती नेवगींसारख्या दुर्मीळ चारित्र्यवान असलेल्या, समाजाला आदर्शवत असलेल्यांचे, परंपरा जोपासायला हवी. न्यायमूर्ती नेवगींना उत्तम आयुरारोग्य अशासाठी लाभायला हवं की, आपल्या भोवती सर्वत्र अनैतिकता, भ्रष्टाचार, बेइमानीचे मळभ असं भरून येत आहे की, नैतिकतेचे नंदादीप तेवत राहण्याची धुकधुकी वाटते. नाही चिरा, नाही पणती...' म्हणणाऱ्या कवीने नेवगींसारखी चरित्रचे आपल्या काव्याची प्रेरणास्राते मानली होती. आज आपल्या जीवनाचे प्रेरणास्रोत आपल्याला साद घालत आहे. नव उभारणीसाठी, नव रचनेसाठी. जैनसेवी संघटक : बी. बी. पाटील

 बी. बी. पाटील आपले अनुभव पाथेय एक सामाजिक दस्तऐवज म्हणून लोकार्पण करत आहेत. ‘माझे सामाजिक कार्य : एक दृष्टिक्षेप' अशा नावाने त्यांनी लिहिलेलं एक आत्मकथन प्रकाशित होत आहे. काळोखाच्या ग्रहणांनी ग्रासलेल्या समाजजीवनात परत एकदा सदाचाराचं चांदणं शिंपलं जावं म्हणून त्यांचा हा प्रयत्न होय.
 घरची समद्धी असली तरी ज्ञानाच्या समद्धीने त्या वेळच्या तरुणांत कायाकल्प घडवून आणला, याचे उदाहरण म्हणजे बी. बी. पाटील यांचे जीवन. पारंपरीक पाटिलकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचं शिक्षित होणं याला त्या वेळी एक आगळी प्रतिष्ठा होती. राजकारण व समाजकारण अशा दुहेरी मार्गांनी समाजोन्नती साधली. अशा कार्यकर्त्यांपैकी बी. बी. पाटील एक होत.
 बी. बी. पाटील यांनी नगरसेवक म्हणनू आपल्या समाजकारणाची सुरुवात केली. त्यांनी गल्लीपासून आख्ख्या नगराला आपल्या कार्याने प्रभावित केले नि ते नगराध्यक्ष झाले. त्या वेळी कोल्हापूर महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट होती. उत्पन्न कमी नि खर्च मोठा. बी. बी. पाटील यांनी जकात वसुली नेटाने करून महानगरपालिका समद्भू केली. वसुली वाढवून आलेल्या उत्पन्नातून त्यांनी या शहरात प्राथमिक शाळांचं जाळं विणलं. त्यामुळे तेथील बहुजन समाज शिक्षित होणं शक्य झालं. त्या वेळी या शहरावर शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व होतं. त्यांनी पक्षाचे चिटणीस असताना शहरातील व जिल्ह्यातील अधिकांश लोकप्रतिनिधी निवडून आणले. बी. बी. पाटील यांनी कोल्हापुरात दिगंबर जैन बोर्ड, जैन श्रविकाश्रम, प्रगती आणि जीनविजय साप्ताहिक, देशभूषण प्रेस अशा अनेक मार्गांनी जैन समाजाच्या अर्थबळाचा वापर येथील जनसामान्यांच्या कल्याणासाठी घडवून आणला. येथील आचार्य रत्न देशभूषण शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जाणाच्या बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, महावीर महाविद्यालय, धर्मभारती, विद्यानंद सांस्कृतिक भवन हे सारं बी. बी. पाटील यांच्या सतत २७ वर्षांच्या अविरत परिश्रमाचं सामाजिक फलित होय. त्यांच्या या कार्यामुळे जैन समाजाचे ते ‘भूषण' ठरले हे आपणास विसरता येणार नाही.
 स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्राला प्रभावित करणारी दोन आंदोलनं लक्ष्यवेधी ठरली. एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर दुसरा गोवा मुक्ती संग्राम! या दोन्ही लढ्यातं बी. बी. पाटील यांनी कुशल संघटकाचे कार्य केले.
 राजकारण, शिक्षण, समाजसेवा, धर्मसंघटन, पत्रकारिता ही त्यांच्या जीवनकार्याची पंचसूत्री म्हणून सांगता येतील.
 रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सल्लागार म्हणून ते अनेक दशके कार्यरत आहेत. कोल्हापुरात शाहू कॉलेज व महावीर कॉलेज ही धर्मनिरपक्षे सामाजिक विद्या केंद्रे म्हणून लोकमान्य झाली. त्यांचे श्रेय बी. बी. पाटील यांनी पेरलेल्या समाजविचारांनाच द्यावे लागले. त्यांचे आत्मकथन आत्मश्लाघेसाठी नाही. असेलच तर त्यात समाजशिक्षणाचा भाव आहे. बी.बी.पाटील यांनी व्यक्तिगत जीवनात शेती व उद्योगाची सांगड घालत समृद्धी निर्माण केली.संसार स्वकष्टानी व स्वधनावर करायचा. सामाजिक कार्य पूर्ण पणे संघटना शक्तीच्या जोरावर.त्यामुळे त्यांनी जोपासलेल्या संस्था आज उर्जितावस्थेत आहेत. बी. बी. पाटील यांचं द्रष्टेपण त्यांच्या संस्थांच्या स्थैर्यपूर्ण विस्तार व विकासात दिसून येतं. सचोटी व निष्ठा या मूल्यांवर ते मोठे झाले. धर्म हे समाज संघटनांचं साधन बनवून त्यांनी शिक्षण साध्य समाज निर्मितीचं स्वप्न बाळगलं होतं. आज ते यशस्वी झालेलं पाहतो. हे त्यांच्या आयुष्याचं यश होय. करुणाकल्पतरूची सावली : नलिनी वालावलकर

 सन १९४० चा काळ आठवा. त्या वेळेच कोल्हापूर म्हणजे चार वेशीतलं गाव होतं. भवानी मंडपाची कमान, बिंदू चौकातील सबजेलची कमान (रविवार गेट म्हणून ती ओळखली जायची),टाऊन हॉल जवळची कमान (आता ती उचलून केशवराव भोसले नाट्यगृहासमोर लावली आहे),शिवाजी पुतळ्याजवळ मंडईच्या दाराजवळ असलेली कमान,अशा वेशीत वसलेल्या कोल्हापूरचा तो काळ आठवा. फोन नव्हते, वीज फक्त वाड्यावर असायची. रस्ते फरशी बोळ होते. मोटारी फक्त हुजूर स्वारींच्याच होत्या. त्या काळात सर्वसामान्य स्त्रियाही घोशा पाळायच्या. स्त्रिया सर्रास शाळेत जात नव्हत्या. अशा काळात नलिनी वालावलकर नावाच्या एका महिलेने कापड दुकान उघडून चक्क गल्ल्यावर बसणे, जथ्थ्याची गि-हाईकं करणं, मिलचे एजंट आले की खरेदीच्या ऑर्डर देणे अशी कामे सुरू करून पारंपारिक कोल्हापुरात चर्चेचं काहूर उठवलं होतं.
 हे धाडस नलिनीताई वालावलकरांच्यामध्ये कसं नि कोठून आलं याचा शोध घेताना लक्षात येते की, त्या मूळच्या कोकणातल्या. त्यांचं माहेर व्यापारी कुटुंब असलेलं. व्यापाराचं बाळकडू मिळालेल्या नलिनीताई कोल्हापूरला आल्या त्या नवऱ्या व्यापार करावा म्हणून. करुणाकल्पतरू शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर हे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित असण्याची दोन कारणं. एक कापड व्यापाराच्या क्षेत्रातील दक्षिण महाराष्ट्रातलं मोठं नाव, दुसरं कारण या माणसानं जे मिळविलं ते महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीनं समाजाला दिलं. अशाच पण या सर्वांमागं एका करुणेच्या कल्पतरूमागं एक सतत धडपडणारी, कर्तव्यकठोर व सदैव स्थितप्रज्ञ राहणारी सावली होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
 १९३४ मध्ये शा. कृ. पंत वालावलकर यांचा विवाह नलिनीताईंशी झाला. त्या मूळच्या मालवणच्या. सामंत-नेवाळकरांचं घर हे त्यांचं माहेर. तिथं भाड्याचं दुकान थाटून संसार केलेल्या नलिनीताईंना दूरदृष्टी होती. त्या वेळचं कोकण म्हणजे कोल्हापूरची उतारपेठ. कोकणात पडतरीत व्यापार करावा लागायचा. माया फार सुटायची नाही. घाटावर गेलो तर व्यापार वाढले नि मायाही. झालंही तसंच. आज भाऊसिंगजी रोडवर जिथं बनाजी मुकुंदशेठ वेल्हाळ म्हणून कापड दुकान आहे तिथं पूर्वी वालावलकरांचं कापड दुकान होतं. तिथं व्यापार वाढला, जागा अपुरी पडू लागली म्हणून मग पुढे आजची लक्ष्मीरोड वरील पारगावकर बिल्डिंग मधील जागा घेतली. त्या जागते पूर्वी बँक ऑफ कोल्हापूर होती. ती कोल्हापुरातील पहिली संस्थानकालीन बँक. ती बुडाली. (पतसंस्था बुडल्या म्हणनू आश्चर्य नको, परंपरा जुनीच आहे.) ही जागा निवडण्याची दूरदृष्टी नलिनीताईंची...
 नलिनीताईंनी व बापूंनी मिळून नुसता संसार केला नाही तर व्यापारउद्योगही केला. लक्ष्मीरोडवरचं ताईंचं दुकान १९४३ मध्ये सुरू झालं. तो काळ व्यापार- उद्योगाच्या दृष्टीने मंदीचा काळ होता. दुसरं महायुद्ध झालेलं. जागतिक मंदी आलेली. भारतात ‘भारत छोडो' आंदालनानं तीव्र रूप धारण केलेलं होतं. साखर नि कापडाचा काळाबाजार सुरू झालेला. कापड तर चक्क रेशनिंगनं मिळायचा तो काळ, नवीन दुकान सुरू झालं आणि मंदीचा फटंका. कापडाच्या गाठीचं गोणपाट व सुतळ्या इतक्याच फायद्यावर व्यापार करणं अशक्य म्हणून ताईंनी-बापंनी इचलकरंजीत चक्क कापडाची मिलच सुरू केली. त्या वेळी हा व्यवसाय गुजर-मारवाड्यांचाच मानला जायचा. त्या काळात वालावलकर दांम्पत्याने ही मिल सुरू करून मोठं धाडस दाखवलं. ताई दुकान व मिल दोन्ही सांभाळायच्या. पुढे ही कसरत झेपेना म्हणून ती मिल कोल्हापुरात आणली. आज जिथे वालावलकर हॉस्पिटल आहे तिथं पूर्वी पत्र्याची शेड होती. त्या शेडमध्ये नलिनी वीव्हिंग मिल चालायची.
 १९६० च्या दरम्यान मी कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये एक अनाथ मुलगा म्हणून दाखल झालो होतो. त्या काळात रिमांड होममध्ये गुलाबाची मोठी बाग होती. गुलाबाची फुलं वालावलकरांच्या घरी देवपूजेसाठी पाठविली जायची. हिरवी अॅम्बेसिडर गाडी येऊन ती फुलं घेऊन जायची. कधी-मधी काही मुलांना त्या गाडीतनू फुलं घेऊन जाण्याचा चान्स मिळायचा. अशाच एका संधीत ‘लक्ष्मीनारायण प्रसाद' या प्रासादतुल्य बंगल्यात मी पहिल्यांदा ताईंना पाहिलं, अनुभवलं ते मातृधर्मी लक्ष्मी म्हणून. हातावर चिरीमिरी देऊन त्या आमची प्रेमाने चौकशी करायच्या. एका अर्थाने आपल्याला अपत्य नसल्याचं त्या उदात्तीकरणच करत असायच्या. आम्हा सर्व मुलांवर त्यांची अपार करुणा निर्व्याज प्रेमाची पाखर सदैव असायची.
 पुढे मी मोठा झालो नि रिमांड होमचे काम करू लागलो. त्या काळात बापू नि ताईंचं औदार्य जवळून अनुभवलं. बापू उदार तर ताई व्यवहारी. बापूंकडे कोण, कशासाठी, कसं येतं याची ताईंना जाण असायची. बापू भाबडेपणाने एखाद्यास देणगी, मदत देऊ लागले तर त्याला ताईंचा चाप ठरलेला. त्यात कंजूषी नसायची. कष्टाने मिळविलेले पैसे... त्याचे दान सत्पात्री असायला हवं, असं ताईचं म्हणणं असायचं! अन् ते योग्यही होतं.
 नंतरच्या काळात मी वालावलकर कापड दुकान, ट्रस्ट, बालावधूत ट्रस्टचा विश्वस्त झालो. ताईंशी आणखी घनिष्ठ संबंध आला. तो काळ १९८०-८५ चा असावा. मिल बंद होऊन तिथं बालावधूत मंदिर व धर्मशाळा सुरू होती. तीही बंद पडल्यात जमा होती. इतकी मोठी वास्तू पडून राहू नये असं नलिनीताईंना वाटायचं. त्यातून मग आम्ही नवा ट्रस्ट स्थापन केला, तो नलिनीताईंच्या नावानेच.सौ. नलिनी शां.पंतवालावलकर धर्मादाय विश्वस्त निधी स्थापून आम्ही धर्मशाळेचं रूपांतर धर्मादाय रुग्णालयात केलं. १९८६ पासून अत्यल्प दरात कोल्हापुरात सुरू असलेली रुग्णसेवा ही नलिनीताईंच्या कल्पनेचे अपत्य आहे. वालावलकर कापड दुकान ट्रस्टच्या फायद्यातून चालणारं हे कार्य म्हणजे विश्वस्त निधीतून चाललेलं अधिक व्यापक समाज कार्य होय.
 नलिनीताईंनी आपल्या भावांच्या मुलांना आपली मुलं मानली. सतीश,उदय नि दीपक या तिघांचं लालन-पालन, शिक्षण, संस्कार, विवाह,व्यापार सर्व ताईंनी केलं. ते पोटच्या गोळ्यापेक्षा अपार मायेनं. बापूंनी सामाजिक संस्कार सांभाळला नि ताईंनी घर सांभाळले. ताईंना स्वच्छता, नीटनेटकेपणा, नियमितपणा याचं मोठं वेड. गैर त्यांना खपायचं नाही. एखाद्या माणसास आपलं म्हटलं की त्याला त्यांनी आजन्म जपलं, जोपासलं म्हणून समजा.
 पैशावर सारं विकत घेता येतं असा समज आज सर्वत्र पसरलेला आढळतो. पण पैशापेक्षा कष्टाचं, त्यागाचं, समर्पणाचं मोल अधिक असतं हे ताई जाणून होत्या. माईसाहेब बावडेकर हुजूर स्वारी म्हणून कधीकाळी दुकानात यायच्या. गाडीत बसलेल्या असायच्या. ताई बापू त्यांना दुकानातनू कधी गाडीत तर वाड्यावर साड्या दाखवायला जायचे. एक जहागीरदार बाई आपल्याकडे मदत मागते... एखादा माणूस सुखावला असता. ताई माईसाहेबांना म्हणाल्या, "तुम्ही राणीसाहेब; मागायचं नाही, हुकूम द्यायचा. मी जिवंत असताना तुम्ही कोणाकडे मागायला जायचं नाही." ताईंनी पाच लक्ष रुपयांचे साहाय्य देवू केलं. पुढं माईसाहेब त्यांच्यापेक्षा खानदानी निघाल्या. तुमच्या पैशांतून शाळा झाली तर त्याला नाव तुमचंच हवं म्हणून हटून बसल्या. एक साध्वी तर दुसरी माधवी असा सामाजिक समसमासंबंध आज किती दुर्मीळ आहे ना! ताईंच्या घरी नोकर-चाकरांची रेलचेल असायची. दुकानात नोकरांचा राबता असायचा. सगळ्यांच्या घरकार्यात ताईंचा आहेर ठरलेला. आपण तूप खातो, गरिबास तेल तर मिळावं म्हणून ताईंची होणारी तगमग मी जवळून अनुभवली आहे. वरकरणी कठोर वाटणाऱ्या ताईंमध्ये एक मृदू व्यवहारीपण भरलेलं असायचं. त्यांचं घर म्हणजे सतत नातलगांची उठबस असलेलं गलबत. ताईंना आल्यागेल्याचं करण्याची मोठी हौस. आतिथ्य, स्वागत, सत्कार, मानपान, आहेर-माहेर यातून ताईंनी भारतीय संस्कृतीचे उमदेपण मनस्वी जपलं होतं. गेली काही वर्षे त्या अबोल होत्या. विशेषतः बापूंचा जाण्यानंतर याचं अबोल होणं म्हणजे एका पतिव्रतेनं स्वीकारलेली सामाजिक सल्लेखनाच होती. बापूंच्या निधनानंतर या वालावलकर ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या कार्यकाळात वालावलकर कापड दुकान ट्रस्टने व्यापाराच्या क्षेत्रात ‘पेशवाई ड्रेस मटेरियल'सारखी नवी दालनं उघडली नि काळाला साद घालत आपलं नवपण जपलं.
 नलिनीताई वालावलकर म्हणजे काळाच्या पुढे पाहणारी एक महत्त्वाकांक्षी मानिनी! स्त्रीविकासाच्या ज्यांना पाऊलखुणा शोधायच्या असतील त्यांनी या लक्ष्मीपावलांच्या खुणा अभ्यासायला हव्यात. तेव्हा कळेल की शिक्षणाचं खरं रूप शहाणपण असतं. ते शाळेत मिळत नाही. ते मिळतं माणूस व्यवहारात, जीवनाच्या अनुभवात.त्यासाठी आयुष्यभर स्थितप्रज्ञ राहून कर्मपूजा करत राहावी लागते. सार्वजनिक संस्थांचा आधार : निवासराव पोवार

 काल परवा बसून उद्याची स्वप्ने रंगवणाऱ्या बैठकीतील स्वर विरण्यापूर्वी बैठकीचा सवंगडी निमावा..खरंच वाटत नाही. निवासराव नावाचे चैतन्याचे झाड वादळ न येताही उन्मळून पडावे हे एक अनाकलनीय गूढच नव्हे का? मनाच्या मोहळात लक्षावधी स्वप्नांचा सतत गुंजारव निर्माण करणाच्या निवासरावपुढे आज इतक्या अकल्पितपणे कै. ही उपाधी लावून, कैक स्वप्नांना पूर्णविराम द्यावा लागेल... नाही पटत!
 निवासराव पोवार कोल्हापूरच्या अनेक सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, धार्मिक, कलाविषयक नि सांस्कृतिक विश्वाचे संवेदनशील आधारस्तंभ होते. त्यांचे समग्र वैयक्तिक जीवन तपासले तरी त्याला एक सार्वजनिक झालर असल्याचे आपसूक दिसून येते. कै. वाय. पी. पोवार हे त्यांचे काका. त्यांच्यापासून त्यांनी उद्योग, व्यवसायाची प्रेरणा तर घेतलीच, पण सार्वजनिक सेवेचे व्रतही त्यांनी आपल्या कर्मयोगी काकांकडून घेतलं. स्व.श्री. शि. ह. तथा नानासाहेब गद्रे व शां.कृ.पंत वालावलकर यांना ते आपल्या कामाचे आदर्श मानत. या त्रिमूर्तीनी (काका,नाना,बापू) कोल्हापुरात जी विविध कामे उभारली, ती निवासरावांनी समृद्ध केली, काही नव्याने उभारली.
 निवासराव पोवार हे एक ‘झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते.एखादे काम त्यांनी हाती घेतले की ते तडीस गेले असेच समजायचे. रोटरी क्लब, रोटरी समाजसेवा केंद्र राजर्षि शाहू ब्लड बँक, आय बँक, प्रायव्हेट एज्यु. सोसायटी, आंतरभारती, बालकल्याण संकुल, महालक्ष्मी धर्मशाळा, टेंबलाई शिल्पतीर्थ अशी कितीतरी नावे त्यांच्या कामाशी अभिन्न जोडलेली.
 बालकल्याण संकुल, आंतरभारती, वालावलकर ट्रस्टसारख्या कामांच्या निमित्ताने आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.सर्वसमावेशकता' हा त्यांच्या कार्यातला फार मोठा गुण. अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक संस्थांत सतत सुरुंग लावणारी मंडळी, तिथे निवासराव नावाचे एक ‘अग्निशामक व्यक्तिमत्त्व' संयम, संतुलन नि शीतलतेचा पखरण सतत करत असायचे आणि म्हणूनच इतर शहरांच्या तुलनेने कोल्हापुरातील सार्वजनिक संस्था अधिक निकोप व भरीव काम करू शकल्या हे मान्य करावे लागेल.
 निवासरावांच्या कामाचे एक अलिखित सूत्र होते. ते स्वतः काम हेरायचे. काय काम करायचे ते ठरवायचे. ते ठरवले की स्वतः भूमिगत राहून ते करायचे ठरलेले. कामाला पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धीची चमक त्यांना कधी लागायची नाही. आंतरभारतीत विद्यार्थी म्हणून शिकत असताना मी निवासरावांचे काका कै. वाय. पी. पोवार यांना पाहिले, अभ्यासले होते. निवासरावांची ही ठेवण तीच. अगदी वसा घेतल्यासारखी. त्यांची कितीतरी कामे मी जवळून पाहिलीत. त्यांच्या सान्निध्यात शिकण्यासारखे कितीतरी आढळले. अर्थात ते अनुकरणे मात्र अवघड असायचे, हे मान्य करायला हवे.
 मतभेदपूर्ण मैत्रीतून मी निवासरावांच्या जवळ आलो. 'कार्य' व 'मत' यांची फारकत करून मनुष्य संबंधाचे मजबूत रज्जू बांधायचे निवासरावांचे कसब वाखाणण्यासारखे होते. या नीरक्षीर न्यायविवेकी माणसाभोवती माणसांचे मोहोळ होते. त्याचे खरे गूढ त्यांच्या कार्यकेंद्री प्रयत्नात. ‘आधी केले मग सांगितले', हा त्यांच्या कार्याचा मेरूमंत्र होता. आंतरभारतीस जागा विकत घ्यायची होती. आधी स्वतः पैसे दिले नि मग इतरांना आवाहन केले. त्यांच्या प्रत्येक आवाहनामागे 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम'चे अधिष्ठान असायचे. आंतरभारती'च्या अनेक प्रकल्पांना आतून बाहेरून जी प्रचंड आर्थिक मदत झाली ती निवासरावांनी आपली कवच-कुंडले पणाला लावली म्हणून.
 काम करत असताना साऱ्याना सोबत घेऊन जायची, सर्वांना बरोबरीची वागणूक द्यायची जी नीती निवासरावांनी अंगिकारली त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यास अभूतपूर्व यश आले. आरंभीच्या काळात ते ‘रोटरी'मध्ये सक्रिय होते. कोल्हापूरच्या रोटरीचे आजचे ते चतुर्दिक रूप दिसते त्यातील कितीतरी प्रकल्प निवासरावांच्या ध्यास व धडपडीतून आकारले, साकारले. पुढे त्यांनी रोटरीत जाणे औपचारिकपणे बंद केले तरी अनौपचारिकपणे संबंध राहिले नि ते सतत दृढमूल होत राहिले. निवासराव नावाची ‘राजापूरची गंगा' अनेक संस्थांना लाभली तशी रोटरीला पण.
 येथल्या बालकल्याण संकुलात अनेक वर्षांच्या मध्यंतरानंतर आम्ही निवासरावांना सक्रिय केले. दररोज या संकुलास नवा मित्र, दाता जोडून देण्याचे त्यांचे व्रत या संकुलास खऱ्या अर्थाने सामाजिक संस्था बनवून गेले. येथल्या प्रत्येक मुलाला खेळ मिळायला हवे म्हणून त्यांनी ‘रोटरी' व इतर मित्रांच्या माध्यमातून पस्तीस हजार रुपयांची खेळणी दिली. खुळखुळा, पांगूळगाडा इ.पासून ते चक्क टेबल टेनिसपर्यंत. क्रिकेट, टेबल टेनिससारखे खेळ देऊन ‘रिमांड होम' नामे तुरुंगसदृश संस्थेचा चेहरा मोहरा बदलून त्याला ‘पब्लिक स्कूल'चा दर्जा दिला निवासरावांनीच.
 कुणी सांगितले की द्यायचे नाही हा त्यांचा कटाक्ष. पण गरज नोंदली की भविष्यात त्याची वर्णी लागणार हे ठरलेले. संस्था उभ्या राहतात त्या कार्यकर्त्यांमुळे. कार्यकर्त्यांकडे निवासरावांचे व्यक्तिगत लक्ष आयचे. कार्यकर्त्यांवरील विश्वास व तो सतत वाढेल असा त्यांच्यात आत्मविश्वासही होता. “हो जायेगा' हे सूत्र त्यांनी अंगिकारले व ते इच्छिले ते सारे होतही राहिले.
 धार्मिक वृत्तीच्या निवासरावांनी धर्माचरणातील कर्मठतेस सतत फाटा देऊन त्याला एक सामाजिक परिमाण दिले. महालक्ष्मी धर्मशाळा प्रवाशांचे सेवा केंद्र कसे होईल ते त्यांनी पाहिले. धर्मशाळेत प्रेक्षणीय स्थळांची माहिती, पर्यटन केंद्र, दवाखाना, निवास सुविधा तीही अल्पदरात. हे सगळे करताना संस्थेचे अर्थशास्त्र त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळले. प्रवाशांकडून रुपया घेऊन लाखो रुपयांची बचत करून संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ, स्वावलंबी कशी होईल ते त्यांनी पाहिले. गरूड मंडपातील शतकोत्सवी गणेशोत्सवात वाद निर्माण झाला पण निवासरावांच्या चिकाटीने सर्वांवर मात केली. महालक्ष्मी हे निवासरावांचे आराध्य दैवत. त्या देवतेची उपासना फ्रेंच माणसेही करू लागली ती निवासरावांमुळे. मध्यंतरी मी फ्रान्सला जाताना निवासरावांनी फ्रान्सच्या मित्रांना महालक्ष्मीचा प्रसाद दिला तेव्हा मी अक्षरशः चक्रावून गेलो होतो. पॅरिस, मेट्झ, बायोन इ. शहरात निवासरावांचे मित्र-मैत्रीण तो प्रसाद सश्रद्ध स्वीकारताना मी याची देही, याची डोळा' पाहिला! ही सर्व किमया निष्काम मैत्रीची.
.  खेळ व त्यातही ‘फुटबॉल' हा निवासरावांचा ‘विक पॉईंट'. मिटिंगला उशीर झाला की समजायचे आज फुटबॉल मॅच असणार. टेबल टेनिसच्या तर ते प्रतिवर्षी स्पर्धा भरवत. कै. वाय. पी. पोवार यांच्या स्मरणार्थ खेळाडूंना प्रोत्साहन हा त्यांच्या उभारीचा भाग. ऑलिंपिकपटू माणगावे मास्तरांची महाराष्ट्र शासनाने केलेली अपेक्षा निवासरावांनी त्यांना पॅको पोवार पुरस्कार देऊन भरून काढली नि मग शासनाला जाग आली! हेच कार्यकर्त्यांबाबत. सतत समाजासाठी कार्य करणा-यांबद्दल त्यांना फार बरे वाटायचे. अशा कार्यकर्त्याला अभय, प्रोत्साहन, त्यांची पाठीमागे तोंडभर स्तुती-कौतुक हा त्यांच्या उदारतेचा पुरावा.
 टेंबलाईचे शिल्पतीर्थ हे त्यांच्या अनेक अपूर्ण स्वप्नांपैकी एक. प्रत्येक मंदिराचा परिसर त्यांनी आपल्या कल्पकतेने लोकवर्दळीचा व लोकप्रबोधनाचा बनविला. टेकडीवर अपवादाने जाणारे कोल्हापूरकर आता आबालवृद्धांसह जातात ते निवासरावांच्या कल्पक, शोधक, सृष्टी निर्मितीमुळे. हे शिल्पतीर्थ पूर्ण होणे त्यास निवासरावांचे नाव देणे यासारखे त्यांचे उचित स्मारक होणे नाही. महापालिकेने मनावर घेतले तर ते अशक्य नाही. मनुष्य जेव्हा सर्वांचा होतो तेव्हा तो दुर्दैवाने स्वतःचा राहात नाही. निवासरावांचे तसेच झाले. सार्वजनिक संस्थांचा रथ ओढणाऱ्या या निगर्वी, प्रसिद्धीपराङ्मुख कार्यकर्त्याने स्वतःकडे स्वतःच्या घराकडे दुर्लक्षच केले.'आप' नि ‘परमध्ये निवासरावांनी ‘पर, ची परार्थाची, परमार्थाची,निवड केली,आपल्या लाडक्या मुलीचे लग्न तोंडावर आलेले असताही पॅको पोवार पुरस्कार वितरणासारखा घाम गाळणारा कार्यक्रम त्यांनी शिरावर घेतला खरा, पण तो जिवावर बेतला. अतिश्रम, अतिचिंता यामुळे त्यांची प्राणज्योत अकाली निमाली. त्यामुळे अनेक स्वप्ने विरली, योजना थबकल्या. कन्येचे लग्न, अनिकेत निकेतनचे उद्घाटन, वालावलकर प्रशालेची इमारत उभारणी,शिल्पतीर्थाची उभारणी, एक ना दोन,अनेक स्वप्नांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्यासारखीच स्थिती आहे.शरीर व मन गोठविणारी. डॉ. सुभाष देसाईंनी मला जेव्हा निवासरावांच्या ‘निरोपाचा निरोप दिला तेव्हा माझेही शरीर-मन वरील स्वप्नाप्रमाणे गोठले, बिथरले. आधारवड कोसळल्याने निराधार होऊन सैरभैर आकाशाचा ठाव घेणा-या पाखरासारखी स्थिती झालेले कार्यकर्ते, संस्था मी अनुभवत होतो. अंत्येष्टीच्या प्रत्यके पावलात, प्रत्यके संवादात, प्रत्येक स्वरात... न भरून येणारी आर्तता, आर्द्रता होती. अंधश्रद्धा निर्मूलक : के. डी. खुर्द

 कलाकार जन्माला यायला लागतो तसा समाजसेवकही. समाजसेवक अनेक प्रकारचे असतात. दृश्य नि अदृश्य. के. डी. खुर्द हे अदृश्य, भूमिगत समाजसेवक. समाज विसंगती, विषमता, वर्तन विरोध, अंधश्रद्धा, अज्ञान अशा कितीतरी गोष्टी शासकीय सेवेत बेचैन करत असतात. तसे के. डी. खुर्द हे शासकीय सेवेत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत राहिले. पण शासकीय सेवेचा काच त्यांनी स्वतःस कधी स्पशू दिला नाही. मी संपर्कात आलेला माणूस शासकीय सेवेत असेल तर लगेच ओळखतो. के. डी. खुर्द मला सेवेत असतानाही कधी शासकीय वाटले नाहीत. ते समाजसेवक म्हणून जसे जन्मसिद्ध तसे ते जन्मसिद्ध अशासकीय व्यक्ती. मला वाटतं, माणसाला जन्मतः अशासकीय व्यक्तिमत्त्व लाभणं मोठं वरदान. शिक्षण, समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, देवदासी प्रथा विरोधादी कार्यात त्यांनी केलेलं योगदान शासकीय सेवेत आल्यापासूनच आहे हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला अचंबा वाटतो नि हेवाही? मला या रहस्याचा उलगडा नाही होत की शासकीय व्यक्ती उदार मनाची, सहयोगी, मार्गदर्शक, मदतनीस, सहकारी, समाजसेवी असूच कशी शकते? पण नियम अपवादाने सिद्ध होतो म्हणतात. के. डी. खुर्द हे अनेकांगी अपवाद व्यक्तिमत्त्व!
 के. डी. खुर्दीचा जन्म २ सप्टेंबर, १९३४ चा. घरची गरिबी. शिंपी हा वडिलोपार्जित धंदा. मलकापूरसारख्या आडवळणी गावात बाजारादिवशी चाळीस खण विकायचे नि तेवढ्याच चोळ्या बाजार उठायच्या पूर्वी शिवून देण्याचं कसब के.डी.खुर्दच करू जाणे. गिनिज बुकवाल्यांना त्यांचा त्या वेळी परिचय कसा झाला नाही याचं आश्चर्य वाटतं. १९५५ दरम्यान ते एस. एस. सी. झाले. त्यावेळी मॅट्रिक पास होणं म्हणजे स्वर्गाचे महाद्वार उघडणं असायचं. त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. ऑर्डर हाती आली. हे इतके भोळे की शिक्षणाधिका-यांकडे ऑर्डर घेऊन गेले. सोबत एक अर्ज ‘तुम्ही ‘सादळे' या डोंगर गावी मला नेमलंय, मला शिकायचंय. मी तिथे जाऊ शकत नाही. सबब माझी नियुक्ती रद्द करावी. त्या शिक्षणाधिका-याला हसावं की रडावं ते समजेना! म्हणाले, 'तुम्ही शिकू शकाल अशा ठिकाणी नेमलं तर नोकरी करणार कां? नाही म्हणणं मूर्खपणाचं ठरलं असतं. म्हणून खुर्द 'हो' म्हणाले. शासकीय सेवेत कधी कधी ‘सांन्तॉक्लाज' भेटतो म्हणे. त्यांची नियुक्ती हेरले गावी झाली. नोकरी करत त्यांनी बी. ए. केलं.
 १९५५ चाच काळ. अहमदनगरचे श्री. गोविंदराव पत्की आपल्या मूळ गावी मलकापुरात येऊन स्थिरावले. सेवादल, जनवादी चळवळीचे अभ्यासक पत्की सर आपल्याबरोबर गोविंद पानसरे या गरीब विद्यार्थ्यांस शिकायला घेऊन आले. त्यांचं मलकापूरला कोल्हापूरातून येणं जाणं राहिलं. त्या काळातही तरुण गोविंद पानसरेंचे विचार काळापुढे धावणारे. मलकापूरची तरुण मंडळी त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित. शिवाय पत्की गुरुजींचं प्रबोधन, शिकवण. 'माझी गरिबी हाच माझा गुन्हा आहे', के. डी. खुर्द या मंडळींच्या तालमीत पुरोगामी झाले. घरचं वळण पारंपारिक. ब्राह्मणांचा आदर करावा असे घरचे सांगणे असायचे. पण तत्कालीन शुचिर्भूत वगार्च शुचित्व यांना चकित करत राहायचं. तिकडे मलकापूर हा शेतकरी कामगार पक्षाचा तत्कालीन बालेकिल्ला. श्री. रंगराव पाटील, श्री. त्र्यं.सी. कारखानीसांसारखे आमदार या मलकापूर मतदारसंघाने काँग्रेसचं अधिराज्य असताना कोल्हापूर जिल्ह्यास दिले.
 पुढे वर्षभरातच खुर्द सरांची बदली मलकापुरी झाली. तत्कालीन पहिले राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सनगर गुरुजी त्यांचे मुख्याध्यापक. ते त्या वेळी पुणे विद्यापीठाचे बहि:शाल मंडळ चालवत. खुर्दाना त्यांनी मंडळाचे सचिव पद देऊ केलं. मंडळाच्या व्याख्यानमाला चालायच्या. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, प्राचार्य ए. ए. पाटील प्रभृतींच्या विचारांनी खुर्द प्रभावित झाले नि चाकोरीबाहेर काम करण्याची त्यांना दृष्टी लाभली.
 पुढे ते शिक्षणविस्तार अधिकारी झाले. (१९६७). तीस शाळांचा गट त्यांना मिळाला. ते शाळा तपासण्यास खेडोपाडी जात. सहकारी अधिकारी ‘साहेब' म्हणून वागत. खुर्द सर ‘सर'च राहिले. त्यांनी ‘भाषाशुद्धी प्रकल्प राबवला. त्यांनी परिसरातील विद्यार्थ्यांच्या अशुद्ध शब्दाची जंत्री तयार केली. त्यांच्या लक्षात आलं की, अशुद्धाचं ही शुद्ध व्याकरण आहे. शब्द एकाच प्रकारे अपभ्रंश होतात. तिखट, तेलकटपासून तिखाट, तेलकाट, दगड, डोंगरपासून दगुड, डोंगुर, केळ, तेल, केसपासून क्याळ, त्याल, क्यास! ज्या भाषा संशोधकांना मराठी ग्रामीण साहित्याचा भाषा विषयक अभ्यास करावयाचा असले त्यांनी खुर्दाना गाठावं. अगदी साहित्य अकादमी विजेते आमचे मित्र डॉ. राजन गवस यांनी पण तणकट' शीषर्क ‘तणकाट लिहायला हवं होतं. हे खुर्दीच्या भाषा भावामुळचे आम्हाला उमजलं. ‘श्येतात वंगाळ तणकाट माजलयं' हे मला कळू लागलं खुर्दीच्या अभ्यासामुळं.
 के. डी. खुर्द व त्यांचे सहकारी श्री. चौगुले इत्यादींनी १९८२ ते १९९० या काळात ग्रामीण भागात राबवलेल्या ‘जटा निर्मूलन मोहिमेमुळे देवदासी मुक्ती आंदोलनाला लोकाश्रय लाभला. गती आली. जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सर्वांनी मिळून ग्रामीण भागात देवदासी प्रथा रोखली. त्या काळी एकेकावेळी ५०-६० मुलींचं, स्त्रियांचं जटा निर्मूलन करून विक्रम केला. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड परिसरात तर या मंडळींच्या प्रयत्नांना विलक्षण यश लाभलं. पुढे खुर्द सरांनी या सर्वांचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की, मुलींचे मानेवरचे केस हे उवांचे अभयारण्य आहे. त्यांनी शाळाशाळांत जाऊन त्या काळात ‘बॉबकट' अभियान राबवलं, रुजवलं. पुढे तर गावच्या न्हाव्यांच्या बायका या कामात सहभागी झाल्या नि केसांच्या स्वच्छतेसंबंधी ग्रामीण भागात लोकजागृती आली. अगदी इंग्लंडला पण ‘बॉब कट' हा हिवाळ्यातील सहा महिने अंघोळ करू न शकणाऱ्या तपमानातील स्वच्छतेच्या विचारातून जन्माला आला. 'बॉबकट' ही 'फॅशन' नसून तो स्वच्छतेचा ‘शॉर्टकट' आहे. केस विंचरणे, स्वच्छ करणे, निगा राखणे यातील अकारण जाणारा वेळ वाचवणारा आहे हे पटलं नि स्वच्छता मोहीम फत्ते झाली.
 सन १९९० ला के. डी. खुर्द शासकीय सेवेतून मुक्त झाले नि त्यांनी उन्मुक्तपणे समाजसेवेस वाहून घेतलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी नदी, तलावाचं पाणी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य दान' मोहीम राबवली. तिच्या सातत्यांतून गणपतीदान योजना जन्माला आली. ही चळवळ प्रथम खुर्दीसारख्या शिक्षकांनी चिकाटीनं राबवली. पुढे ती महाराष्ट्रभर फोफावली. 'गणपती दान' योजना तर निर्माल्य दान' करणाच्या जनतेनं निर्माण केल्याचं खुर्द सांगतात तेव्हा लक्षात येतं, समाज विज्ञाननिष्ठ बनू शकतो. गरज असते दिशा देण्याची. खुर्दीसारखा बुद्रुक (पूज्य, श्रेष्ठ, सामान्य) समाजसेवीच हे करू शकतो. ते सांगतात, 'आम्ही निर्माल्य दान योजना सतत चार वर्षं राबवली.  पाचव्या वर्षी लोकच म्हणू लागले की “अहो गणपतीचा शाडू, रंग यांनी पण पाणी प्रदूषित होतं आम्ही नाही गणपती पाण्यात टाकणार.' प्रारंभीपासून कोल्हापूर महानगरपालिकेनं या मोहिमेस साहाय्य करून छ. शाहूंचा पुरोगामी वारसा जपला. पूर्वी पोलिसांची भूमिका विरोधी नसली तरी काखा वर करणारी होती. पोलीस दलास अद्याप छ. शाहू महाराजांचे पुरोगामीपण उमजल्याचं दिसत नाही. काळच त्यांना ते समजावेल.
 अलीकडच्या काळात के. डी. खुर्दानी अशाच चिकाटीने शाळाशाळातून होळी लहान करा, पोळी दान करा' उपक्रम राबवून पर्यावरणविषयक जागृती घडवून आणली. ही योजना राबवण्याच्या काळात ते एकदा बालकल्याण संकुलात आल्याचं मला आठवतं. आम्ही पोळ्या गोळा करू. तुम्ही घ्याल का? त्यांच्या तळमळीतील पारदर्शीपणामुळे मी त्या स्वीकारल्याचं मला आठवतं. आता आमच्या दहा-एक तरी शाळा नियमितपणे हा उपक्रम राबवतात.
 के. डी. खुर्द यांचं हे कार्य भूमिगत, अप्रसिद्ध चालत राहतं, म्हणून मला ते अधिक भावतं. त्यांच्या समाजसेवेचं एकंदरीत सूत्र माझ्या लक्षात आलंय. त्यांना समाज विसंगती दिसते. प्रश्न लक्षात येतो. ते भाषणं करत फिरत नाहीत. मुलं, विद्यार्थी हा त्यांच्या कार्याचा केंद्र असतो. मुलांत विज्ञाननिष्ठा रूजली तर उद्याचा भारत विज्ञाननिष्ठ बनेल अशी त्यांची दूरदृष्टी असते. ते विद्यार्थ्यांना प्रभावित करणारा वर्ग शोधतात. शिक्षक, पालक त्यांचे कार्यवाहक असतात. ते त्यांच्या दृष्टीने प्रभावी ‘कॅटॅलिक एजंट होत. मग ते विविध संस्था, संघटना, यंत्रणांना साद घालतात. के. डी. खुर्दीच्या चेह-यावर एक भाबडेपण असतं. बोलण्यात मार्दव असतं. समोरच्याला मोठेपण देण्याचं उमदेपण त्यांच्या उदारतेचं अपत्य होय. ते संस्थांचा गोफ विणतात. त्यांच्या समाजकार्यास पैसे लागत नाहीत. फक्त वेळ व श्रमाची अट असते. ते पत्रक तयार करतात. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघ, महापालिका, तरुण संघटना, नागरी संघटना सान्यांना ते वेठीस धरतात. 'थेंबे थेंबे तळे साचे' हे असतं त्यांच्या यशाचं रहस्य. मुख्याध्यापक संघ पत्रक छापून देतो. ते शाळा शाळांत स्वतः जाऊन पोहोचवतात. मुलांमार्फत ते हजारो घरात पोहोचतात व समाज नकळत त्यांच्यात गुंततो. ही किमया नावाने खुर्द (लहान) पण वृत्तीने बुद्रुक (महान) असलेले के. डी. खुर्दच करू जाणे!
 अशा या प्रसिद्धीच्या पडद्यामागे (खरं तर आड!) राहून गेली चार दशके कार्य करणाऱ्या के.डी.खुर्द यांना रोटरी क्लब कोल्हापूरमार्फत देण्यात येणारा ‘कै. निवासराव पोवार स्मृती पुरस्कार' बहाल करण्यात आला. खुर्द सरांना तो देण्याने त्या पुरस्काराचे वजन वाढले आहे. खुर्द सरांच्या मोठेपणाच्या किती गोष्टी सांगाव्यात? सावित्रीबाई फुल्यांवर त्यांनी छोटी पुस्तिका लिहिली. पण त्यांची मोठी अप्रकाशित माहिती त्यांच्या संग्रही आहे. ते काल परवापर्यंत श्रीमती सोनुबाई मानपुत्रे यांच्या घरी भाड्याने राहात. त्या एकट्या होत्या. त्यांनी आपलं राहतं घर खुर्द सरांच्या हवाली केले नि त्या निवर्तल्या. मालकांनी भाडेकरूला मालकीचे घर बक्षीस देण्याचा चमत्कार अन् तोही एकविसाव्या शतकात हे खुर्द सरांच्या सौजन्यशील आचारधर्माचीच पोचपावती. ते अॅड. गोविंद पानसरे यांना आपल्या कार्याचे ‘दिशादर्शक' मानतात. त्यांच्या शब्दात सांगायचं तर ‘पानसरेंचा आयएसआय मार्क' म्हणजे प्रयत्न निष्ठा कार्यास बळकटी देते अशी खुर्द सरांची धारणा. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अघोषित ‘सर्ववेळ सेवक होत. पक्षाच्या प्रबोधन मोर्चाचा, आघाडीचा पाठीचा कणा म्हणजे खुर्द सर. ‘सारं करून नामा निराळं रहाणं' शिकायचं असेल त्यांनी ते के. डी. खुर्द सरांकडूनच ते शिकायला हवं. ग्राहक हितरक्षक : प्रा. श्रीश भांडारी

 फायदा करून घेण्यासाठी कोण नाही धडपडत ? व्यापारी अनेक युक्त्या योजून फायदा कमावतात. वस्तू चांगली व स्वस्त मिळाली म्हणून ग्राहक आटापिटा करीत असतो, पण ग्राहकाच्या डोळ्यात धूळ फेकून लाभ कमावणे अनैतिक तसचे फसवणूक ही! अलीकडे फसवणूक हेच व्यापारी तंत्र होऊ पाहात आहे. लोकांचे अज्ञान हाच आमचा फायदा असं गृहीत मूळ धरू पाहात असताना ग्राहकांना सज्ञान करणं, त्यांना त्यांची हक्काची जाणीव करून देणं, व्यापारी, व्यवसायातील लुबाडणूक, फसवणुकीचे शंभर मार्ग शोधून काढणं, ते सर्वसामान्यांना समजावणं हे आधुनिक काळातील अत्यावश्यक, सामाजिक, वैज्ञानिक व व्यवहारी प्रबोधन होय. प्राध्यापक श्रीश भांडारी यांनी गेली १५ वर्षे जीवनकार्य म्हणनू उराशी कवटाळलं. जीवघेणे कष्ट घेतले या माणसान अन् त्या कष्टानचं त्याचा जीव घेतला म्हणायचा. अन्यथा, काल-परवापर्यंत बैठकीत असलेला हा सन्मित्र असा अचानक जावा हे केवळ अकल्पित. अवघी पन्नाशीपण या गड्यानं ओलांडली नाही. त्याआधीच यानं काळाचा उंबरठा ओलांडावा खरंच नाही वाटत!
 प्रा. भांडारी यांच्या ग्राहक हितरक्षण, ग्राहक हक्क जागृती, ग्राहक प्रबोधन, ग्राहक हक्क संरक्षण यांचं महत्त्व मला विशषेत्वाने पटते, ते शहाणी सुरती, शिकली सवरलेली, अगदी उच्च विद्याविभूषित माणसं ही सध्या साध्या कारणांसाठी डुबतात, फसतात, तोंडघशी पडतात, हे जेव्हा स्टाफरूममध्ये त्यांच्या शेजारी बसून ग्राहकांच्या कैफियती मी ऐकत आलो, तेव्हा लक्षात येत गेलं. बिल्डरनी करारपत्रास फ्लॅटची उंची ११ फूट लिहिलीय, प्रत्यक्ष ती १० फूटच आहे, अमुक दुकानातून साडी घेतली, धुतली आणि अर्धावार आटली, संगणक खरेदी केलाय, ब्रँडचे पैसे घेतलेत नि असेंबल्ड दिलाय, बटाट्याचं बियाणं घेतलंय अन् पीक पडलंय... किती प्रकारे फसवणूक.
 जितके व्यापारी, व्यावसायिक तितके फसवणुकीचे प्रकार... असं ऐकताना वाटतं राहायचं. प्रा. भांडारी लगेच ग्राहक न्यायालयात धाव घ्यायचे. महाराष्ट्रभर प्रत्यके जिल्ह्यात ग्राहक संरक्षण कक्ष सुरू करणे, ग्राहक न्यायालय सुरू करणे यासाठी त्यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून अभय दिलं. 'ग्राहकास राजा' बनवणारा हा राजपुरोहित! प्रा.श्रीश भांडारी हे संस्कृतच्या नामवंत प्राध्यापक डॉ.विश्वनाथ श्रीराम भांडारी यांचे कनिष्ठ चिरंजीव. नागपूर विद्यापीठातून ते अर्थशास्त्र घेऊन एम.ए.झाले. वडील कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणनू आले नि त्यांनी कोल्हापुरात राहायचं ठरवलं.श्रीश भांडारी येथील महावीर विद्यालयाच्या बी.एम.रोटे कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.अल्पावधीत ते विद्यार्थीप्रिय झाले.व्यावसायिक शाश्वतीसाठी त्यांना बी.एड.किंवा डी.एच.ई.होणं आवश्यक होतं. त्यांनी डी.एच.ई.व्हायचं ठरवलं! डी.एच.ई.साठी त्यांनी प्रबंध लेखनासाठी म्हणून ग्राहक हितरक्षण' विषय निवडला नि तो त्यांचा श्वास बनला. अक्षरशः अगदी शेवटच्या श्वासापयर्तं!... सोमवारी ते औरंगबादहून ग्राहक परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीचं आन्हिक संपवून आले ते मरण ओढवूनच!
 प्रा. भांडारी एक अजातशत्रु व्यक्तिमत्त्व होतें समाजहिताचं कार्य करत असताना‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडीसाखर' ठेवून काम करणं फार थोड्यांना जमतं. त्यापैकी श्रीश भांडारी एक होते. कुणाबद्दल पुढे अथवा माघारी गरळ ओकताना या माणसाला अपवाद म्हणूनही ऐकलं नाही. जिभेचा विटाळ होऊ न द्यायचं, सरांचं गुणवैशिष्ट्य केवळ अनुकरणीय!... कोणतंही काम त्यांच्यावर सोपवा, नाही शब्द कधी यायचा नाही. कॉलेजमध्ये तर ‘कुणीही यावे, सरांना काम सांगून खुशाल बसावे' असा रिवाजच होऊन बसलेला. त्यांच्या जाण्यानं अनेकजण अनेक प्रकारे अस्वस्थ झाले. ग्राहक चळवळीचा खंदा कार्यकर्ता गेला!- एक सन्मित्र गेला! एक सत्शील कार्यकर्ता निमाला!!!- या नि अशासारख्या औपचारिक ठोकळेबाज श्रद्धांजलीपेक्षा एक उमदा सहकारी हरपल्याचं कार्यकर्ता म्हणून मला होणारं दुःख अधिक सामाजिक महत्त्वाचं वाटतं!... रोज खुजा होते जाणारा माणूस पाहात असताना अशा बुलंद माणसाचं जाणं केवळ क्लेशकारी!... सर मनानं मोठे रसिक, नाटक, गाणं, सांस्कृतिक कार्याची मोठी हौस. आमच्या कॉलेजची सहल, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, सूत्र संचालन सर्व ठिकाणी ते एकांड्या शिलेदाराप्रमाणे बाजीप्रभू होऊन खिंड लढवायचे नि हाती घेतलेलं कार्य पावन करायचे. खिंडीत जेरबंद करून जेरीला आणण्याचा गनिमी कावा या शिलेदारानं कधीच केला नाही. खिंड सोपविली की काम फत्ते झाल्याची तोफ ऐकायला येणार हे ठरलेलेच!...
 एकीकडे नोकरीचे काम इमानेइतबारे करायचं. कोर्ट-कचेऱ्या पदरमोड करून झिजवायच्या. गाठी-भेटी, चर्चा-समेट,निवेदन, प्रबोधन, व्याख्यानआदींबरोबर त्यांनी प्रारंभापासून लेखणीही झिजवली. दै.'पुढारी'ने दूरदृष्टी दाखवून ज्या काळात ग्राहक हित नि संरक्षणाची कल्पना रुजली नव्हती, त्या काळात ग्राहक हित' सदर सुरू केलं. गेली ११-१२ वर्षे प्रा. भांडारी यांनी हे सदर निष्ठेने चालविलं. त्यांच्या या सेवाभावी कार्याची नोंद घेऊन मुंबईच्या ‘समथर्न' सारख्या संस्थेने १० हजार रुपयांची गौरववृत्ती देऊन त्यांनी लढलेल्या मानवी हक्क लढ्यास लोक मान्यताच बहाल केली. तपभरच्या सातत्यपूर्ण लेखनाने हे सदर आता 'ग्राहक व्यासपीठ बनले!... हा केवळ नामांतराचा भाग नाही, तर कार्यविस्तार नि प्रसाराची पोचपावती होय. हे आपण लक्षात घ्यायला हवं. १९८९ साली 'ग्राहकांनो फसू नका' हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे सारख्या संस्थेने प्रकाशित केलेलं सचित्र पुस्तक. त्याच्या अनके आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. अगदी अलीकडचे (१९९९) त्यांनी लिहिलेलं ‘ग्राहक दृष्टी' पुस्तक त्यांच्या क्षेत्रातील अनुभवसमृद्धतेचा आरसाच!... अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदू माधव जोशी त्यांना 'चळवळीचा जाणकार विद्यार्थी म्हणून गौरवत. नव्या पिढीचा वारसा' म्हणून त्यांच्याकडे पहात. तसे विचाराने प्रा. भांडारी उजवेपण डाव्यांच्या नाव व विचारांपुढे फुली मारण्याचा संकीर्णपणा केव्हाही दाखविला नाही. अलीकडच्या काळातील त्यांचा ऐतिहासिक व संस्मरणीय कार्य म्हणजे शालेय, महाविद्यालयीन पातळीवरील ग्राहक संरक्षण, ग्राहक हक्क विषयक पाठ्यक्रम निर्माण करणं. नवी पिढी सज्ञानी ग्राहक, साक्षर ग्राहक,जाणकार ग्राहक व्हावी म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत कुणालाच विसरता येणार नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी ग्राहक संरक्षण परिचय',‘ग्राहकांचे अर्थशास्त्र,‘ग्राहक समस्या निराकरण'सारख्या लिहिलेल्या पुस्तिका म्हणजे ग्राहकांचे बायबल ठराव्यात इतक्या उद्बोधक,सरळ,सोपं लिहिणं त्यांची अनोखी हातोटी होती. सूक्ष्म अर्थशास्त्र' पुस्तकही विद्यार्थ्यांनी खूप पसंत केलं होतं.
 लेखन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार त्यांना लाभले. त्यापेक्षा त्यांचा मोठा गौरव म्हणजे कोर्टात एखादा फसलेला ग्राहक वकिलाकडे गेला की, वकील पहिल्यांदा याला सांगतो प्रा. भांडारींना भेटा. ग्राहक फसवणूक प्रतिबंधक कार्यकर्ता' म्हणून त्यांचा झालेला लौकिक लाखमोलाचा.
 प्रारंभीच्या काळात व्यापारी, व्यावसायिक प्रा. भांडारींकडे तिरक्या नजरेनं पाहायचे. आता ग्राहकच इतका सज्ञानी झाला आहे की, तो दुकानदारास एम. आर. पी. (कमाल किंमत) समजावतो. ग्राहक पेठांची निर्मिती ही या चळवळीने सामान्यांना दिलेली नवी दृष्टी होय. अपार्टमेंट, सोसायटीमधील माणसं एकत्र येतात. संस्था रजिस्टर करतात,एकत्र फटाके,धान्य,वह्या,पुस्तके खरेदी करतात. हे केवळ सरांसारख्या कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रबोधनामुळेच शक्य झालं. जाहिरात वजन,माप, कमाल किंमत, निश्चित दर, पॅकिंगवजा जाता मालाचे वजन, सेलचा भुलभलैय्या, पाच का दो, पाच का दो,कौन बनेगा करोडपतीसारख्या कार्यक्रमांतून ग्राहक, प्रेक्षकांची होणारी दिशाभूल ही प्रा.भांडारींना लगेच लक्षात यायची. पाण्यात संताजी धनाजी दिसावा,सारी सृष्टी कृष्णमय वाटावी तसं प्रा. भांडारींना सारं जग हे ग्राहक व व्यापारी अशा दोन वर्गातच विभागल्याचं अष्टौप्रहर दिसायचं !
 हे सारं आचार-विचारांच्या अद्वैतेतूनच येतं! प्रा. श्रीश भांडारी हे ध्येयवादी कार्यकर्ते म्हणून शासन, समाज व सामान्यांच्या कसोटीला उतरले होते. त्यांच्या कायार्त कोणताही अभिनिवशे नसायचा. विचारांची आग्रही छाया त्यांना कधीच शिवली नाही. समन्वयाने जे काम होतं त्यासाठी फुका संघर्ष कशासाठी असा त्यांचा कामातील युक्तिवाद असायचा. ग्राहकाला न्याय कायद्याने मिळण्यावर त्यांचा भर होता. काम झाल्यावर, नुकसानभरपाई मिळाल्यावर लोक श्रद्धेने, कृतज्ञतेने कधी भेटवस्तू, कधी मिठाई घेऊन यायचे. हा सत्शील कार्यकर्ता विनयानं नाकारायचा. निरपेक्ष कार्य ही त्याची सचोटीच होती. अंगा-पेरानं बलदंड आमचा हा मित्र मनानंही तितकाच उमदा होता. त्यांच्या कार्याचा पेठेत आदरपूर्वक धाक होता. त्यांनी पावती मागितली की व्यापा-याचे थरथरणारे हात व कापणारे पाय मी ‘याचि देही याचि डोळा' पाहिले. अनुभवले आहेत. ज्ञान माणसास बलवतं करतं, पण हक्क माणसास धैर्य देतं. संरक्षण माणसास आश्वस्त करतं. चळवळ माणसाचं नीतिधैर्य वाढवते. कायदा माणसास शहाणा करतो. प्रा. श्रीश भांडारी यांनी सामान्य माणसास अशा अष्टदिशांनी प्रबुद्ध केलं. ते अजून आपल्यात असायला हवे होते. इतकं सारं आपण त्यांच्यामुळे मिळवलं तरी त्यांना आपणास अजून बरंच द्यायचं होतं. 'ग्राहक हितानुवर्ती व्यापारी पेठ' हे त्यांचं स्वप्न होतं. आता आपण ते साकार करू या. श्रमिक संघटक : कॉ. अविनाश पानसरे

 सन १९९७ ची गोष्ट. महाराष्ट्र फाऊंडेशन बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूरला व्हायचा होता. विंदा करंदीकरांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार होते. त्या निमित्ताने पुरोगामी कवींची फौजच कोल्हापुरात दाखल होणार होती. सारे कवी एकत्र येतात तर सान्यांचे एक संमेलन योजावं अशी टूम संयोजनसंबंधी बैठकीत निघाली. मराठी, हिंदी कवितेची जाण असलेल्यांनी या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करावं असं ठरलं. मग ही वीणा माझ्या गळ्यात आली. पत्रिका तयार करण्यापासून ते सूत्रसंचालनापर्यंत. संयोजकांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. या स्वातंत्र्याचा स्वैर आनंद लुटत असताना मला एक स्वतंत्र विचारांचा तरुण कार्यकर्ता भेटला. त्याचं नाव अविनाश पानसरे. संमेलन संयोजनाच्या पहिल्या बैठकीतच हा तरुण माझा जिवलग झाल्याचं आठवतं.
 पहिल्याच भेटीत मला लक्षात आलं की, अवीला साहित्याची चांगली जाण आहे. शिवाय तो पारंपरिक कम्युनिस्ट नाही. मोर्चे, मागण्या, संप, घेरावाच्या घेण्यात अडकलेल्या कामगाराची स्वतःची म्हणून ‘सांस्कृतिक भूक' असते अशी पक्की धारणा असलेला अवी, अस्तित्वाच्या लढाईबरोबर व्यक्ती विकासाची चढाई केल्याशिवाय हे साधणार नाही, याचं पुरतं भान त्याला होतं. अर्थवादात अडकून पडलेल्या कामगार वर्गाला शब्द, सुरांच्या झुल्यावर झुलवावं- जेणेकरून त्याचा शोषणाचा शोक, सोस विधायक मार्गांनी त्याचं उदात्तीकरण होईल याची त्याला खात्री होती. श्रम व संस्कृतीच्या संगमाने एक नवी श्रमसंस्कृती रुजवू पाहणारा तो एक द्रष्टा कार्यकर्ता होता.
 कवी संमेलनात आयत्या वेळी कैफी आझमी, नारायण सुर्वे यांचं यायचं रद्द झालं. पत्रिकेवर तर त्यांची नावं टाकलेली. आलेले श्रोते निराश होणार. काय करायचं! मग या कवींच्या रचना ऐकवायचं ठरलं. ही कल्पना अविचीच. लगेच तो कैफींची ‘कैफियत' कॅसेट घेऊन आला. त्या कवी संमेलनात मिरवत मी होतो, अवी मात्र पडद्यामागे धडपडत होता. एक कार्यकर्ता म्हणून आयत्या वेळी काय होऊ शकेल याचं त्याला पुरतं भान असायचं. माईक जोड, गाद्या घाल, पडदा लाव अशी कोणतीही काम करणं त्याला कमीपणाचं वाटलं नाही. अवी जाण असलेला अबोल परंतु संवेदनशील कार्यकर्ता होता. त्याला माणसांची चांगली पारख होती. माणसाचं पाणी जोखायचं जन्मजात कसब त्यात होतं. कवी संमेलनातील माझी यशस्वी खेळी बघून श्रमिक प्रतिष्ठानचा हिला सांस्कृतिक कार्यक्रम 'श्रमिक शाहिरीचा यळकोट'चा भंडाराही उधळायची जबाबदारी माझ्यावर आली. कोणतं शिवधनुष्य कुणाच्या हाती द्यावं याची पारख वडिलांप्रमाणे अवीसही चांगली होती. या यळकोटाच्या जागरात पण कार्यकर्ता म्हणून अवीने घेतलेले, उपसलेले कष्ट आज तो आपल्यात नसताना मला अधिक अस्वस्थ करतात. कारण त्या कष्टामागे विचार, श्रद्धा होती. आपला सूर्योदय तो जाणून होता. आपल्याला 'पुढारी' व्हायचं नाही, 'नेता' व्हायचं आहे याची त्याच्या मनी पक्की खूणगाठ होती. अवीच्या मागं माणसांचं मोहोळ असायचं. कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेऊन जायचं विलक्षण कौशल्य अवीत होतं. अवीच्या चरित्राचं एक वेगळेपणं होतं. तो राज्य पातळीवरील कामगाराचं नेतृत्व करणाच्या कॉ.गोविंद पानसरेंचा मुलगा.आपलं नाव,आपली ओळख त्यानं ‘अवी पानसरे' या दोन शब्दात ठेवली होती. आयुष्यभर रिकाम्या जागा ‘बाप कमाईवर नाही तर ‘आप कमाईवर भरायच्या असतात हे तो पुरेपूर जाणून होता. अवीनं स्वकर्तृत्वावर आपलं जीवन फुलवलं होतं. आई -वडिलांच्या विचार, संस्काराची घट्ट वीण अवीला मिळाली होती.
 आपल्या विचारांवर तो ठाम असायचा. बाबांशीपण मतभेद असेल तर तो व्यक्त करण्याचं बळ अवीनं कमावलं होतं. तो शिस्तप्रिय होता पण कामाच्या भाऊगर्दीने त्याला हैराण करून सोडलं होतं. कॉम्रेड गोविंद पानसरे अलीकडे राज्यभर फिरत असायचे. कार्यक्रम ठरवायचे नि त्यांना परगावी जाणं भाग असायचं. अवी त्यांचं सारं शिरावर घ्यायचा. त्यांची उणीव भासू द्यायचा नाही. पस्तीस वर्षांच्या जिंदगीत पन्नाशीचं प्रौढत्व प्रयत्न साध्य होतं खरं, पण ते आलं होतं विविध कार्यानुभवामुळे. नेता व्हायचं तर माणसांत मिसळायला हवं, हे तो ओळखून होता. पण यात हेरगिरी, डोळा ठेवणं, जाळं टाकणं असा धूर्तपणा नसायचा. ती त्याची सहजता होती. तो त्याचा स्थायीभाव होता. जीवन विकासाची त्याची आपली अशी ‘बहुसूत्री होती. स्पष्टवक्तेपणा, मन भरून ऐकणं, विचारपूर्वक कृती, द्रष्टं नियोजन, मोठेपणा द्यायची उदारता, अरभाट वाचन, संगीत संग्रह, चोखंदळ पाहणं, निसर्गवेड अशा कितीतरी गोष्टी अवीच्या स्वतःच्या होत्या. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ, कनिष्ठ कार्यकर्त्यांतील काही ‘पंच परमेश्वर' तो हेरून होता. त्यांच्याबद्दलची त्याची ठाम मतं होती. मत व्यक्त न करता अशा लोकांपासून आपली चळवळ, आपलं कार्य सुरक्षित कसं राहील, कार्यहानी कशी होणार नाही याची तो काळजी घ्यायचा.
 अवीला मुलांचं वेड होतं. मुलांसाठी काही करण्याची त्याची धडपड असायची. मुलांची छायाचित्रं काढणं, मुलांत खेळणं, मुलांचं करणं त्याचा एक अकृत्रिम छंद होता. मुलं-घरची नि दारची असा दुजाभाव त्याच्यात नसायचा. मुलांचा तो बाबा, काका, दादा, मामा सर्व असायचा. नात्याच्या वडिलकीचं जू त्यानं आपल्या मानेवर कधी वागवलं नाही. जीवन समरसून जगायची कला त्यानं विकसित केली होती. अवीत दुसऱ्याला देण्याची उदारता होती. ही कॅसेट कुणाला आवडेल, हे पुस्तक कुणाच्या संग्रही असलं पाहिजे, हा शेर कुणाला ऐकवायचा, हे चित्र कुणाला दाखवायचं, ही कल्पना कोण चांगली साकारेल याचा अवीचा वेध टिपणारा असायचा. अवि हरहुन्नरी होता. गाडी चालवणं त्याला आवडायचं. उठून जंगलात निघायचा. कधी कामगार संघटनेच्या कोपरा सभांत तो मनापासून बोलायचा. तोडा, फोडा, झोडा ही त्याच्या कामाची मूलभूत शैली नव्हती. समझोता त्याची पहिली पसंती असायची. पण कामगारांना हवं ते पदरात पाडून घेण्यात मात्र त्यानं कधी न कुचराई केली न काटकसर. तसं ‘शठं प्रति शाठ्य्म' वागण्याचा त्याचा रिवाज होता. कुणी अधिकारी फेरीवाल्यांना जेरीला आणायचं म्हणून ‘ब्ल्यू गार्ड’ घेऊन फिरू लागला तर अवी रेड ब्रिगेड' उभा करायचा. 'गांधी' नाटकासंबंधी शाहू स्मारकाच्या व्हरांड्यात घेतलेला परिसंवाद कोण उधळू पहातंय लक्षात आल्यावर त्याची ‘अॅटॉनॉमस आर्मी' आदेशाच्या आधीच सज्ज असायची. त्यांना तो लोकांचा रेटा लावून हैराण करायचा.अवी निष्णात वकील होता. वडिलांच्या अशिलांवर त्याची वकिली नव्हती. वडिलांच्या विचारांचं बळ त्याच्यात एकवटलं होतं.मृत्यूपूर्वी दोनच दिवस सांगलीच्या एक साखर कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून दिल्यानंतर त्याला कोण आनंद झाला होता.त्याची वकिली विचार, तत्त्व, मेहनतीवर आधारित होती. शोषितांचीच वकिली करण्याचा वडिलांचा वसा त्यानी चालवला होता. त्याच्या सादरीकरणावर, वैचारिक बांधिलकीवर वरिष्ठ वकील, कधी-कधी न्यायाधीश खुष व्हायचे. वकील हा बुद्धिजीवी वर्ग. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातील वर्गाबद्दल काही केलं पाहिजे असं त्याला वाटायचं. तो आपल्या तरूण वकील मित्रांवर कधी-कधी तोंडसुख घ्यायचा. त्याच्याच धडपडीतून 'प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशन' जन्माला आली. संस्था, मंच, पेढी, मंडळ स्थापायचं पण हा नामानिराळा राहायचा. पडद्यामागे राहून कष्ट उपसण्याचा जणू त्याला छंदच जडून गेला होता.
 दोन ऑक्टोबरला त्याचा बालमित्र नि माझा सहकारी मानसपुत्र मिलिंद यादवचा रात्री दहाला फोन आला... सर अवीला अॅटक आलाय्... ताबडतोब या...' धो-धो पावसात मी आधार नर्सिंग होम गाठलं... कॉरिडॉरमध्येच कॉम्रेड दिलीप पोवारांनी मोबाईल हाती दिला. .. पुण्याहून अनंत दीक्षित बोलत होते... तुम्हीच सगळं सांभाळा... अवी इज नो मोअर... मी सकाळी पोहोचतोय... डॉक्टर दामलेंशी बोलून घेतलं... हळूहळू सांगत गेलो... आवार हंबरड्यांनी धुमसू लागलं... कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मात्र छातीवर दगड ठेवला...' अशा वेळी समजुतीनंच घ्यायचं असतं' म्हणत ते आम्हासच समजावत राहिले... मग आम्ही बळेच त्यांना घरी पाठवून रात्रभर अवीशी संगत करून राहिलो... पहाटे अविला घरी घेऊन गेल्यावर मात्र पित्याचा मायेचा पाझर, पान्हा मलाही हुंदका देऊन गेला. सकाळी तर सारं जग अविमय होतं... आता अवी नव्हता... होत्या एकेक स्मृती... नव श्रम संस्कृतीचा अलख जागवणारा हा योद्धा,उद्गाता... ज्यानं ऐन तारुण्यात लाल बावटा आपल्या खांद्यावर मिरवला... त्यातच तो लपेटून पडलेला राहिला... सर्वांनी त्याला अखेरचा लाल सलाम दिला खरा... पण पित्यानं आपल्या पुत्राला वाहिलेली श्रद्धांजली त्याला अमर करून गेली...अवी का अधुरा काम कौन करेगा?... “हम करेंगे'... हम करेंगे'ची त्या दिवशीची ललकार, आरोळी हवेत विरणारी नव्हती. न्यायाच्या वाटेनं निघालेल्या या प्रवाशाला दिलेलं ते आश्वासन होतं... सहवेदना होती... दुनिया के रंज सहना और कुछ मुँह से न कहना सच्चाइयों के बल पे आगे को बढते रहना... पूर्वप्रसिद्धी


१. सामाजिक जीवनशिल्पी : प्राचार्य शं. गो. दाभोळकर
 (दै.सत्यवादी,३ फेब्रुवारी,१९८६)
२. करुणाकल्पतरू : शां. कृ. पंत वालावलकर
 (दै. पुढारी, तरुण भारत, सकाळ, लोकमतमध्ये
 मृत्यूनंतर प्रकाशित लेखांचा संपादित लेख सप्टेंबर,२०००)
३. निष्काम कर्मयोगी : शिवराम हरी गद्रे
 (स्मृती व्याख्यान- १४ सप्टेंबर, २००५)
४. समाजशील साहित्यिक : वि. स. खांडेकर
 (वि. स. खांडेकर चरित्र -२०१२)
५. दलितमित्र : बापूसाहेब पाटील
 (दै. सकाळ,पुढारी, लोकमतमध्ये वेळोवेळी
 लिहिलेल्या,लेखांचा संपादितलेख- २७ सप्टेंबर, १९९८)
६. बाल साहित्यिक : रा. वा. शेवडे गुरुजी
 (दै. सकाळ व पुढारीत प्रकाशित लेखांचा संपादित लेख
 १४ मार्च, १९८९ व १९९४)
७. लिटल माँटेसरी : माईसाहेब बावडेकर
 (दै. लोकमत, ४ जानेवारी, २००५)
८. मनुष्यपारखी समाजसेवक : के. डी. कामत
 (दै. लोकमत, १ फेब्रुवारी, १९९९)
९. मितभाषी समाजसेवी : प्रा. डी. एम. चव्हाण
 (बालकल्याण संकुल वार्षिक अहवाल- १९८५)
१०. निर्भय सत्याग्रही : प्रा. डॉ. एन. डी. पाटील
 (दै. तरुण भारत, १६ नोव्हेंबर, २००३)
११. जननिष्ठ समाजशिक्षक : कॉ. गोविंद पानसरे
 (दै. सकाळ, २८ मे, १९९८)
१२. गांधीवादी सर्वोदयी : प्रा. चंद्रकांत पाटगावकर
 (दै. सकाळ, १८ जुलै, १९९९)
१३. सृजनानंदी शिक्षिका : प्राचार्य लीला पाटील
 (दै. सकाळ, २७ सप्टेंबर, १९९८ व अन्य लेखांचा
 संयुक्त आलेख) १४. पुरोगामी कुलगुरु : रा. कृ. कणबरकर
 (दै. तरुण भारत, २६ जून, २०११)
१५. प्रयोग परिवारी विज्ञानी : प्रा. श्री. अ. दाभोळकर
 (दै. सकाळ, ६ मे, २००१)
१६. शाहूप्रेमी समाजसेवक : बाबूराव धारवाडे
 (गौरव ग्रंथ, २३ सप्टेंबर, २००६)
१७. प्राध्यापकांचे कवचकुंडल : प्रा. संभाजी जाधव
 (दै. सकाळ, १७ जून, २०११)
१८. शिक्षण संघटक : डी. बी. पाटील
 (गौरव ग्रंथ -२००९)
१९. नीरक्षीर न्यायव्रती : एस. व्ही. नेवगी
 (दै. सकाळ, २ जुलै, १९९९)
२०. जैन सेवी संघटक : बी. बी. पाटील
 (तरुण भारत, २५ ऑक्टोबर, २००६)
२१. करुणाकल्पतरूची सावली : नलिनी वालावलकर
 (दै. सकाळ, १८ जानेवारी २००९)
२२. सार्वजनिक संस्थांचा आधार : निवासराव पोवार
 (कोल्हापूर उद्यम वार्ता-दिवाळी अंक १९९४)
२३. अंधश्रद्धा निर्मूलक : के. डी. खुर्द
 (अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यगौरविका-२०११)
२४. ग्राहक हितरक्षक : प्रा. श्रीश भांडारी
 (दै. पुढारी, १५ जून, २००१)
२५. श्रमिक संघटक : अविनाश पानसरे
 (अविनाश पानसरे स्मृतिका- २००९)
डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा


१. खाली जमीन, वर आकाश(आत्मकथन)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००६/पृ.२१०/रु.१८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक(समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२००७/पृ.१३८/रु.१४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
 निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र(चरित्र)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण(शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे(व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं(संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद(भाषण संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर(आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
 साकेत प्रकाशन,औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक(समीक्षा)
 मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती १५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा
 (सामाजिक लेखसंग्रह)अक्षर दालन,कोल्हापूर/२०१८/पृ १७६/रु.२००/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण(सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण,नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य(समीक्षा)
 साधना प्रकाशन पुणे २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५०/पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती(साहित्यिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती(व्यक्तीलेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले(समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१८५ रु.२५०/पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही(समीक्षा)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
 अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती

आगामी

  • भारतीय भाषा (समीक्षा)
  • भारतीय साहित्य (समीक्षा)
  • भारतीय लिपी (समीक्षा)
  • वाचन (सैद्धान्तिक)
  • वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन