कल्याण स्तवन, रामचंद्रपंत अमात्यकृत
Jump to navigation
Jump to search
रामचंद्रपंत पंत अमात्यकृत कल्याण स्तवन[संपादन]
सत्यस्वरूप निर्विकार। जाले तदाकार अंतर । आणि सगुण साक्षात्कार । निरंतर ॥
ऐसे जे साधू भले । जे स्वामी समागम लाभले । त्यांची वंदिता पावले । घडे अलभ्य लाभ ॥
त्यंचे वर्णावे स्वरूप । तरी ते नित्य कल्याणरूप । स्मरणमात्रे प्राणी अमूप । तरती भवसागरि॥
त्यांच्या कृपावलोकने । अक्षई सुख लाधणे । त्यांची कृपा होणे । पूर्वपुण्येकरून ॥
ऐसे जे सज्जन । त्यांचे करिता चिंतन । तेणे होइजे धन्य । इह आणि परत्री ॥