एक पाऊल समतेच्या दिशेने

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

________________

एक पाऊल समतेच्या दिशेने... संयुक्तराष्ट्र लोकसंख्या निधी लेक लाडकी अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र ________________

एक पाऊल समतेच्या दिशेने... महाराष्ट्र राज्य हे शाहु, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या चिंताजनकरित्या कमी झाली आहे. त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर कारणांवर प्रकाश टाकणे आणि सकारात्मक बदलाची प्रक्रिया लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून गतिमान करणे ही काळाची गरज ठरली आहे. या पुस्तकासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य संयुक्तराष्ट्र लोकसंख्या निधी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांचे लाभले आहे. प्रकाशन दिनांक ११ ऑक्टोबर २०१६ प्रकाशक : लेक लाडकी अभियान ४९०/अ, गुरुवार पेठ, सातारा. फोन : ९८२२०७२०५६ ईमेल : dmvm1991@gmail.com छायाचित्रण : कैलास जाधव संकल्पना व लेखन : अॅड. वर्षा देशपांडे मांडणी : धनंजय यादव सदर पुस्तक छापण्यासाठी अॅड. शैला जाधव, संजीव बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले डॉ. आसाराम खाडे, अनुजा गुलाटी, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सदर पुस्तकाचे सर्व अधिकार हे लेक लाडकी अभियानाकडे आहेत. पुनर्मुद्रण किंवा वापरासाठी पुर्व परवानगी आवश्यक. ________________

प्रस्तावना मुलींची कमी होणारी संख्या हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. सोनोग्राफी मशिनचा, जनुकिय तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन प्रसूतीपूर्व आणि गर्भधारणापूर्व गर्भलिंग निदान करुन बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रकार वाढल्याने मुलींची संख्या भयावहरित्या घटली आहे. म्हणूनच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. | भारत सरकारलाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घ्यावा लागला. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय कार्यक्रमात समाविष्ट अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, जळगाव, बुलढाणा, उस्मानाबाद, वाशिम, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण पोषण आहार स्वच्छता समितीच्या सदस्यांना प्रशिक्षित करुन गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित करण्यात आले. लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यांच्या आर्थिक सहका-याने प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. | या प्रशिक्षणादरम्यान आणि प्रशिक्षणानंतर जिल्हाधिका-यांपासून ते आशा, अंगणवाडी ताई पर्यंत, धार्मिक सण समारंभापासून ते ग्रामसभांपर्यंत लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात यश आले. त्या त्या ठिकाणी सक्षमपणे ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. सरपंचांचा सहभाग घेण्यात आला. घडलेल्या अनेक घटना, कार्यक्रम आणि व्यक्ती यांच्या माध्यमातून समतेच्या दिशेने टप्याटप्याने घडत असलेले हे बदल इतिहासाच्या पटलावर या पुस्तकाच्या माध्यमातून नोंदवण्याचा हा छोटासा पण महत्वपूर्ण प्रयत्न आम्ही करीत आहोत. वाचकांच्या ते पसंतीस उतरेल, त्यातून लेक लाडकी अभियानाचे बळ वाढेल, हा विश्वास आहेच. अॅड. वर्षा देशपांडे प्रवर्तक, लेक लाडकी अभियान ________________

दलित महिला विकास मंडळ आयोजीत ग्रामीण आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती सदस्य प्रशिक्षण प्रशिक्षक र्यशाळी विषय - मुलींची कमी होणे 5 व्या आणि (PCPNDT) गर्भधारणापूर्व प्रसव दान प्रतिबंधक कायह आरोग्य विभा जिल्हा परिषद, आरोग्य विभा। महारा Capacity Building of Members of Village Helth Nutrition and Sanitation Committees to Address Declining Sex Ratio in their Villages :: 2 UNFPA DMM ग्रामीण आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, ________________

बीड जिल्हा चंपावतीचा बीड बदलतोय... बीड जिल्हा हा राज्यातील मुलींची संख्या कमी असणारा जिल्हा. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०१५ रोजी ९० गावांमध्ये ख-याखु-या ग्रामसभा झाल्या. या सर्व ग्रामसभांमध्ये 'गर्भलिंग निदान आपल्या गावामध्ये होवू दिले जाणार नाही. असा ठराव पारित करण्यात आला. हुंड्याच्या प्रश्नावर ग्रामसभेत उघडपणे चर्चा झाली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामीण पोषण आहार व स्वच्छता समितीच्य सदस्यांनी प्रशिक्षण पश्चात ग्रामसभा होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. | सर्व तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसभेसाठी निवडलेल्या निरीक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या. सरपंच ते जिल्हापरिषद सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय झाले होते. ग्रामसेवकापासून जिल्हाधिका-यांपर्यंत सर्व प्रशासक २६ जानेवारीच्या ग्रामसभेस सज्ज झाले होते. प्रसिध्दी माध्यमातील प्रतिनिधी प्राधान्याने या उपक्रमाविषयी लिहिते झाले होते. माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ए.एन.एम. श्रीमती सोनवणे, परळीचे डॉ. एस.बी. साफे, शिरुर कासारचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे, ए.एन.एम. शकुंतला ठोंबरे, बीडचे आरोग्य अधिकारी डॉ. कासार, अॅड. अंबादास आगे, लिगल कौन्सिलर अॅड. करुणा टंकसाळ, ज्योतीराम हारकुंडे, सरपंच रंजना हारकुंडे, वडवणीच्या सरपंच मीरा उजगरे हे आपआपल्या विभागात, तालुक्यात घरचे कार्य असल्याप्रमाणे कार्यरत झाले होते. लेड लाडकी अभियानाचे कैलास जाधव, बाजीराव ढाकणे, पत्रकार शशी केवडकर, जिल्हाधिकारी श्री. नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नविनचंद्र रेड्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. वडगावे, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नामदेव ननावरे या सर्वांनी या महत्वपूर्ण उपक्रमाचे समर्थपणे नेतृत्व केले. संपूर्ण 'लेक लाडकी' अभियानाला म्हणजेच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला चळवळीचे स्वरुप देणारा, ग्रामसभा सक्षम करणारा हा उपक्रम इतर जिल्ह्यातील कामासाठी मार्गदर्शक ठरला. ________________

लेक लाडकी अभियान २६ जानेवारी २०१५ ग्रामसभा : बीड जिल्ह्यातील लाडक्या लेकींसाठी । * घर दोघांचे आपल्या मुलींचे आणि मुलांचेही

  • गावातील कोणतीही गरोदर महिला * मुलगा मुलगी एक समान दोघांनाही वाढवू छान

गर्भलिंग निदान करणार नाही. * मुलींनाही शिकवा एक मुलगी शिकली तर दोन

  • गावात जन्माला येणारा प्रत्येक बालक घरांचा विकास होतो.

मुलगा असो वा मुलगी त्यांच्या जन्माचे स्वागतच होईल. * घराघरात स्त्रीयांना समानतेने वागवुया

  • गावात ठरणा-या आणि होणा-या लग्नामध्ये | हिंसा नको विकासाच्या वाटेने चालूया

हुंडा दिला घेतला जाणार नाही. * कोणत्याही कारणासाठी गावातून नांदायला

  • मुलींची कमी होणारी संख्या स्त्रीयांची गेलेल्या लेकी किंवा सुनांचा छळ होणार नाही.

सुरक्षितता हा गंभीर प्रश्न आहे. स्त्री/पुरुष समतेचा २६ जानेवारी २०१५ बीड जिल्ह्यातील मुलींची संख्या कमी रोजी प्रजासत्ताक दिनी कृतिशील झाली आहे ही खेदाची गोष्ट आहे. कार्यक्रमातून ग्रामसभा स्वीकार करत आहे. म्हणूनच आम्ही ग्रामसभेत स्त्री/पुरुष समतेचा निर्धार करणार आहोत. HEILU बेटी पढाओ । . UNFPA बेटी बढाओ । संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी ग्रामसभेत सहभागी होण्यासाठी आवाहन करणारे बोर्ड लावून अशा प्रकारे चित्ररथ पथनाट्य करणा-या मुलांच्या पुढे फिरुन वातावरण निर्मितीत भर टाकत होता. ________________

भान्टस Fun 'N Wat1/11 1733 वातावरण निर्मिती माध्यमे चळवळ गतिमान करतात... मानव लोक समाज विज्ञान महाविद्यालय, आंबेजोगाईच्या विद्याथ्र्यांनी जिल्ह्यातील प्रमुख गावात ग्रामसभेचे महत्व, स्त्री पुरुष समानता, मुलींची कमी होणारी संख्या या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. १० दिवस मुलामुलींनी एकत्र येऊन निकोप वातावरणात सादर केलेली पथनाट्ये प्रभावी ठरली. ग्रामसभेला येण्याबाबत आवाहन करणारी ऑडिओ क्लिप आणि चित्ररथ गावा-गावांतून लोकांचे लक्ष वेधून घेत होते. पथनाट्याची टिम रस्त्याने चालताना हातातील काठ्यांचा आवाज करत गाणी म्हणत गावागावात वातावरण निर्मिती करत फिरत होते. बीड आकाशवाणीवरील रेडिओ जिंगल्स वातावरण निर्मितीत भर टाकीत होते. पथनाट्य, चित्ररथ, रेडिओ जिंगल्स, स्थानिक केबलवरील मुलाखती, चर्चा व आवाहन करणा-या जाहिराती यामुळे ग्रामसभा प्रत्यक्ष होण्यासाठी उत्तम वातावरण निर्मिती झाली. तक मिल लेक नागभियान 21 112॥ ________________

Capacity Building Workshop of Master Trainers To Train Village Health Nutrition and Sanitation Committee Members In Beti Bachav Beti Padhav Abhiyan - Organisers Unipa Lek Ladki Abhiyan DMVM Healin Dept. Govt. of Maharashtra कार्यक्रमाची सुरुवात श्री. गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्या हस्ते कन्येला पाळण्यात घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने करण्यात आली. ________________

मठ मारत मिशन । जिल्हा पाणी व स्वछता विभाग, ज Capacity Building Workshop of Master Trainers Train Village Health Nutrition and Sanitation Committee Members Beti Bachav Beti Padhav Abhiyan Organisers Labhiyan वाशिम जिल्हा सरपंच परिवर्तनाचे दूत बनतील... | वाशिम जिल्हा हा विदर्भातून नव्याने निर्माण झालेला जिल्हा. मुलींची कमी होणारी संख्या आणि शेतक-यांची आत्महत्या या दोन प्रश्नांसाठी हा जिल्हा ओळखला जातो. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत या जिल्ह्यात झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा परिषद सदस्य गजाभाऊ अमदाबादकर म्हणाले, "शेतकरी आणि स्त्रीया हे दोन घटक गुणाकार करणारे घटक आहेत. म्हणजेच एक बी पेरल्यानंतर हजारो दान्यांचे कणीस आणि धान्य शेतकरी निर्माण करतो तर स्वत: जेवलेले अन्नाचे पोषण वापरुन स्त्री मरणाची कळ काढून माणसाला जन्म देते. या दोन घटकांचा न्याय केल्यासच ख-या अर्थाने विकास साधला जाईल." कार्यक्रमाचे उद्घाटन पाळण्यात छोटी मुलगी घालून तिच्या जन्माचे स्वागत करुन मा. गणेश पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अॅड. वर्षा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्यपूर्ण रितीने करण्यात आले. कारंजालाड या वाशिम जिल्ह्यातील ४८ सरपंच आणि सरपंच संघटनेचे प्रमुख पांडुरंग हिंगणकर यांनी गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि मुलींची कमी होणारी संख्या हा विषय पूर्ण दिवस कार्यशाळेला हजर राहून समजून घेतला. ‘सरपंच हे केवळ राजकारणासाठी असणारे पद नसून ते परिवर्तनाचे दूत बनू शकतात' असे मत सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री पांडूरंग हिंगणकर यांनी व्यक्त केले. महिला सरपंचांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा गिरीगोसावी या उपस्थित होत्या. सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे तसेच पंचायत समिती सदस्यांसाठी या विषयाची अशी कार्यशाळा झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी मी पुढाकार घेईन असे गिरीगोसावी म्हणाल्या. मेहकर व रिसोड हे दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मुलींची संख्या वाढताना दिसत आहे. २०२१ पर्यंत शेतक-यांची आत्महत्या व मुलींची कमी होणारी संख्या हे दोनही कलंक दूर करण्याचा निर्धार आशाताई पासून ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान समन्वयकांपर्यंत सर्वांनी व्यक्त केला. ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळे सरपंच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेत सक्रीय झाले. ________________

VISIT TO PRIMARY HEALTH CENTRES AND INTERACTION WITH VHNSC MEMBERS UNEPA Lek Ladki Abhiyan Health Dept. Govt. of Maharashtra संगमनेर येथे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. अनिल कवडे, जिल्हाधिकारी अहमदनगर ________________

अहमदनगर जिल्हा VISIT TO PRIMARY HEALTH CENTRES AND INTERACTION WITH VHNSC MEMBERS e k Ladi Mahugas alth Def हो, बदल घडतोय... अहमदनगर जिल्हा हा धार्मिक सद्भावना सांगणा-या शिर्डीच्या साईबाबांचा जिल्हा. पण या जिल्हयात शिर्डीसह १३ तालुक्यांपैकी ९ तालुके हे मुलींची संख्या कमी असणारे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. संगमनेर तालुक्यात मुलींची संख्या भयावह पध्दतीने कमी झाल्याने जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. ग्रामसेवक आणि सरपंच मोठ्या संख्येने पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी हजर होते. स्त्रीयांच्या प्रश्नांवर मोठ्या संख्येने पुरुषांचा सहभाग ही विशेष बाब या प्रशिक्षणादरम्यान घडली. तालुका स्तरावर येऊन मा. जिल्हाधिका-यांनी सन २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढविणे या प्रश्नाला प्राधान्यक्रम दिले जाईल असे सांगितले. | दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन कुंडीतील झाडाला पाणी घालून करण्यात आले. 'सबका मालीक एक है' हा विचार समस्त जगाला देणा-या साईबाबांचा जिल्हा हा स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणारा ठरेल. त्यासाठी कालबध्द अभियान राबविण्याचा निर्णय मा. जिल्हाधिका-यांपासून ते ग्रामसेवकापर्यंत या प्रशिक्षणादरम्यान सर्वांनी केला आहे. ________________

सरपंच काकड आजीची नात आजीला तिचे म्हणणे विचारुन प्रश्नावली भरण्यासाठी मदत करतानाचे छायाचित्र आशादायी आहे. ________________

बुलढाणा जिल्हा ताराबाई शिंदेचा विजय असो... स्त्री मुक्तीच्या आद्यप्रणेत्या ताराबाई शिंदे आणि राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असणारा बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यात मुलींची संख्या कमी झालेली आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. टाकसाळ, वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष श्री. रविकांत तुपकर, जिल्हापरिषद सदस्य श्री. विनोद वाघ या सर्वांनीच ही बाब गांभिर्यता पूर्वक स्वीकारली असून कालबध्द कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. • जिजाऊचे जन्मगांव असणा-या सिंदखेड राजामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ. बनसोडे यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात यश आले ही कारवाई हा या प्रशिक्षणाचा परिणाम आहे. सिंदखेड राजा येथे विनोद वाघ यांच्या पुढाकाराने सामुहिक विवाह सोहळा पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियाना अंतर्गत विद्याथ्र्यांचा महामेळावा आयोजित केला. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांची सर्व माहिती उघडपणे सांगितली. डीकॉय ऑपरेशन करुन गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना रंगेहात पकडण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांच्या कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवानंद टाकसाळ यांच्या उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक अधिकारी टास्कफोर्सचा सर्वसदस्यांची तातडीने आणि विशेष बैठक आयोजित केली. प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रशिक्षणा पश्चात 'लेक माझी लाडकी' नावाने चळवळ गतीमान करण्यात यश आले आहे. लवकरच ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्यात यावे आणि जिजाऊंच्या जिल्ह्यात गर्भाशया पासून थडग्यापर्यंत आणि जीवनभर स्त्रीयांना सुरक्षितता मिळावी आणि विकासाची सर्व दालने खुली व्हावीत असा मनोदय अॅड. शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला. प्रथितयश वकील असणा-या या बुलढाण्याच्या कन्येने स्वत: गरोदर असताना डिकॉय ऑपरेशनमध्ये भाग घेऊन, आपली साक्ष नोंदवून गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना शिक्षा होण्यासाठी पुढाकार घेतला. ________________

चाओ-बेटी पढ़ाओ २ बाल विकास सेवा योजना - भोकरदन जालना - VISIT TO PRIMARY HEALTH CENTRES AND INTERACTION WITH VHNSC MEMBERS । । १।। Nealth Dept. kt. OTM आमदार संतोष दानवे उपस्थितांना भोकरदन येथे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना. ________________

जालना जिल्हा स्त्रिया मालकीणी होत आहेत.... | हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा, दुष्काळी आणि स्त्री विषयक हिंसेमध्ये अग्रणी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ३०% मुलींचे विवाह हे बाल वयात केले जातात. त्यामुळे मुलगी नको ही मानसिकता असणा-या जिल्ह्यात लेक लाडकी अभियान चालविणे एक आव्हानच आहे. वस्तुस्थिती बदलण्यासाठी सर्व घटकांसह कालबध्द कृती आराखडा आखणे आवश्यक आहे. म्हणूनच प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय प्रशिक्षक प्रशिक्षीत करण्यात आले. जालना जिल्ह्यातील तरुण तडफदार आमदार संतोष दानवे यांनी भोकरदण येथे प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहून स्त्रीया आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हे जन आंदोलन झाले पाहिजे, राजकारणा पलिकडे जाऊन नेत्यानी या बाबत संवेदनशील झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. शेती आणि शेती पूरक व्यवसायामध्ये स्त्रीयांना मालकी देण्या मध्ये भोकरदन तालुका नावाजला जात आहे. आता तालुक्यात मुलींची संख्या ही वाढती आहे. हुंडा देऊन घेऊन होणा-या बाल विवाहाला राजकीय पुढा-यांनी हजर राहू नये असे आवाहन लेक लाडकी अभियानाच्या वतीने करण्यात आले. वर्षा पवार या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या जिल्हा समन्वयक, मा. जिल्हाधिकारी श्री. शिवाजी जोंधळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील या तिघांनीही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमाला प्राधान्य दिले आहे. शेत जमिनींना नव-याबरोबर स्त्रीयांना सहमालक करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींची संख्या वाढविणे या चारीही आघाड्यांवर सक्रीय होण्याचा निर्णय प्रशासन स्तरावर आणि लोक प्रतिनिधींनीही जाहिर केला हे महत्वाचे असून ग्रामीण आरोग्य, आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळेच शक्य झाले आहे, असे मत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या समन्वयक श्रीमती वर्षा पवार यांनी नोंदविले. ________________

श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह Capacity Building Workshop of Master Trainers || ।। Train Village Health Nutrition and Sanitation Committee Members Beti Bachav Beti Padhy Abhiyan - Organisers Lek Ladan OMVM जळगांव येथे ग्रामीण आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना वासंती दिघे ________________

॥ छत्रपती महाराज सा जळगांव जिल्हा लेकींसाठी वासंती धडपडते... एकेकाळी 'वासनाकांड' मुळे चर्चेत असणारा जिल्हा पुन्हा एकदा मुलींची कमी होणारी संख्या, बालिका हत्या या बाबतीत अग्रेसर आहे. जिल्हयाची आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. श्री. संजय मस्कर (अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगांव) यांच्या उपस्थितीत झाडाला पाणी घालून प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. | मूळचे सातारचे श्री. संजय मस्कर यांनी डिकॉय ऑपरेशनवर भर दिला आहे. दुष्काळ हे आस्मानी संकट तर मुलींची संख्या कमी होणे हे सुलतानी संकट जळगाव जिल्ह्यावर कोसळले असून सर्व घटकांनी सक्रीय व संघटीतपणे यावर मात करण्याचा निर्णय करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. जळगाव जिल्हयातून सुरतला आणि नाशिक जिल्हयात गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपातासाठी नेले जात असल्याचे प्रशिक्षणार्थीनी सांगितले. संजय मस्कर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मीरे, सामाजिक कार्यकत्र्या वासंती दिघे यांच्या नेतृत्वाखाली जळगांव जिल्ह्यातील चित्र टप्प्याटप्प्याने बदलते आहे. वासंती दिघे यांनी पुढाकार घेवून डिकॉय ऑपरेशन करुन कायद्याचा वचक जिल्ह्यावर बसवला आहे. जळगांव जिल्हा महिला संघटना 'लेक लाडकी अभियाना' सोबत सक्रीयपणे भूमिका घेत आहे. प्रशिक्षणामुळेच गावागावात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ची चर्चा आशा व ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांमुळे सुरु झाली. A FIR - RIB સાદ ________________

PCPNDT ☺ WORKSHOP HEALTH DEPARTMENT ZILLA PARISHAD, AURANGABAD SAVE THE GIRL CHILD कै. यशवंतराव चव्हाण ग्रामीण आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती सदस्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम-यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद औरंगाबाद ________________

औरंगाबाद जिल्हा । । । । धार्मिक उत्सवात मुलींचे जन्मोत्सव साजरे होतात.... | औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी समजली जाते. महाराष्ट्रातील महत्वाच्या महानगरांपैकी एक महत्वाचे महानगर, ज्या ठिकाणी स्त्रीविषयक हिंसा व मुलींची कमी होणारी संख्या हा गंभीर प्रश्न आहे. अशा ५० प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रशिक्षकांना प्रशिक्षीत करुन जिल्ह्यामध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान प्रत्येक गावापर्यंत ग्रामीण पोषण आहार व स्वच्छता समिती मार्फत नेण्यात आले. जिल्ह्यातील १०० गावे जोखमीची म्हणजेच मुलींची संख्या कमी असणारी आहे. | या परिक्षेत्राचे आयुक्त उमाकांत दांगट यांनी पुढाकार घेऊन आठ जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांसोबत मुलींची कमी होणारी संख्या आणि गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी या बाबत चर्चा आयुक्तालय कार्यालय औरंगाबाद येथे घडवून आणली, या बैठकीस अॅड. वर्षा देशपांडे मार्गदर्शक म्हणून हजर होत्या. प्रशिक्षणानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील पर्यवेक्षीका अतिशय प्रभावीपणे लेक लाडकी अभियानात सक्रीय झाल्या आहेत. ही बाब या जिल्ह्यातील विशेषत्वाने वाखाणण्यासारखी आहे. गरोदर मातांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी संपर्क साधून गावागावातून गर्भलिंग निदानाची माहिती गोळा केली आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव यासारख्या धार्मिक उत्सवांमध्ये मुलींचे जन्मोत्सव साजरे होत आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृह Capacity Building Workshop of Master Trainers Train Village Health Nutrition and B Sanitation Committee Members Beti Bachav Beti Padhav Abhiyan Unpa Lek Ladhal Abhiyan ________________

| १७ wanitation Commiteens बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ अभियान cha Bettadhan dian ७ । 262 उस्मानाबाद येथील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. धीरज पाटील जिल्हापरिषद अध्यक्ष, मा. प्रशांत ननावरे जिल्हाधिकारी, मा. सुमन रावत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महिला बाल कल्याण सभापती व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता शहापूरकर ________________

उस्मानाबाद जिल्हा शक्तीपीठाचा सन्मान करू... जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत ननावरे, जिल्हा परिषदेच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुमन रावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे समन्वयक श्री तुकाराम नवले, अॅड. वर्षा देशपांडे यांनी दीप प्रज्वलीत करुन ग्रामीण आरोग्य स्वच्छता व आहार समितीच्या प्रशिक्षणाचे उदघाटन केले. ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या परस्पर संवादातून कार्यशाळा संपन्न झाली.या प्रशिक्षणाच्या दरम्यान ‘जिल्हयातील सर्व पदाधिका-यांचे वाढदिवस हे लाडक्या लेकींचा दिवस म्हणून साजरे करण्यात यावेत' असे आवाहन अॅड.वर्षा देशपांडे यांनी केले. | यावेळी बोलताना अॅड. धिरज पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हयात तुळजापूर आहे.जो माझा मतदार संघ आहे.या ठिकाणी महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक शक्तीपीठ तुळजा भवानी या स्त्रीची पूजा केली जाते आणि म्हणूनच उस्मानाबाद जिल्हयात सर्व नागरिकांनी ख-या अर्थाने धर्माचरण करावे, एका बाजूला तुळजाभवानीची पुजा करायची आणि दुस-या बाजूला गर्भातील मुलींशी दुजाभावाने वागायचे हा दांभीकपणा सोडून आपण उस्मानाबाद जिल्हयातील हा कलंक नाहीसा करु. त्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असून ही निर्धारसभा आहे." भूम आणि वाशी या दोन तालुक्यातील मुलींची संख्या चिंताजनकरित्या कमी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्य मोठया प्रमाणावर प्रशिक्षणासाठी हजर झाले. जिल्हापरिषद अध्यक्ष व तुळजापूर महिला बाल कल्याण सभापती या कार्यक्रमास हजर होते. या सदस्यांनी आपला वाढदिवस हा लाडक्या लेकिंचा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहिर केला. सदर प्रशिक्षणामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या राष्ट्रीय कार्यक्रमाचा कृती आराखडा बनण्यास मदत झाली. सदर कार्यक्रमाला गती मिळाली. सरपंच, आशा, अंगणवाडीताई यांचा सहभाग वाढला. हा कार्य जह HIFI . ________________

cii Buildina Workshop OF Master Traine Tule Health Nutritica and faciun Conmittee Members th Dept. Maharashtra Beli bachay Peti Pad'lav Abhiyan - Organisers Lek Ladki Abbio DMYM Baille गडहिंग्लज येथील प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधिश संजय देशमुख सोबत एस.व्ही. पाटील, अॅड. वर्षा देशपांडे, रमेश चव्हाण ________________

कोल्हापूर जिल्हा keshop ताराराणी लढायला सज्ज आहे... | कोल्हापूर हा २००१ आणि २०११ दोन्हीही जनगणणेच्या अहवालानुसार मुलींच्या संख्येबाबत जोखमीचा जिल्हा ठरला आहे. कुलस्वामिनी आंबाबाईची कुलदैवत म्हणून पुजा करणा-या कोल्हापूर जिल्ह्यात गर्भात मुलींना गायब करण्याचे प्रकार वाढते राहिले आहे, ही बाब चिंतेची आहे. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी प्रशिक्षणा दरम्यान मार्गदर्शनासाठी हजर राहून न्यायीक अधिका-यांनी संवेदनशिलता दाखविली. मार्गदर्शन करताना त्यांनी 'स्त्रीयांनीच या गोष्टींचा विरोध केला पाहिजे' असे नमूद केले. त्यांच्यासह न्यायमुर्ती श्री. एस. व्ही. पाटील हे हजर होते. जिल्हा न्यायाधीश हे तालुका स्तरावरील ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता सदस्यांच्या प्रशिक्षणादरम्यान आशा, अंगणवाडीताई यांच्याशी संवाद साधायला आल्याने प्रसिध्दी माध्यमांनीही त्याची विशेष नोंद घेतली. | भद्रकाली ताराराणीने नेतृत्व केलेल्या या जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वडगणे, पुलाची शिरोली, वडींगे या ठिकाणी मुलींची संख्या घटली आहे. त्या प्रत्येक गावामध्ये जावून ग्रामीण आहार, पोषण व स्वच्छता समितीच्या सदस्यांना प्रशिक्षित करण्यात आले. | गाव निहाय गरोदर मातांशी संवाद साधण्यात आल्याने गरोदर माताच या गोष्टींना विरोध करायला उभ्या राहतील हा विश्वास कोल्हापूरमध्ये अभियान राबविताना आला आहे. लेलाडकी । ॥ मि । १५ ३ ५ । , 7 र ________________

इस्लामपूर येथे बालिका जन्मोत्सव साजरा करताना अॅड. वर्षा देशपांडे व आरोग्य विभाग ________________

सांगली जिल्हा परिवर्तन शक्य आहे. | सांगली जिल्ह्यातील मुलींची संख्या वाढीस लागली होती. परंतू मुळातच झालेली तूट न भरुन निघणारी होती. त्यामुळेच हा जिल्हा बेटी बचाओ-बेटी पढाओ या कार्यक्रमातील वाईट १० जिल्ह्यातील दहावा जिल्हा ठरला. महाराष्ट्र, कर्नाटक सिमेवर असणा-या या जिल्ह्यातील सर्व ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सलग २ दिवस गंभीरतापूर्वक पार पाडले. जिल्ह्यातील आणि सीमेलगत सुरु असणा-या छुपे पध्दतीने चाललेल्या गर्भलिंग निदानाच्या प्रकारावर मुक्तपणे सविस्तर चर्चा झाली. बेकायदेशीर गर्भपाताची संख्या वाढली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करणा-या कर्मचा-यांनी नोंदविली. प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. दिपेंद्र कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतिश लोखंडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चे समन्वयक पूर्णवेळ हजर होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्भपाताची औषधे पतीच्या सहकार्याने वापरुन बेकायदेशीर, तज्ञता नसताना १५० बेकायदेशीर गर्भपात करणारी महिला डॉक्टर तपासणी दरम्यान सापडली. तिच्यासह ५ डॉक्टरांवर वैद्यकिय गर्भपाताच्या कायद्यानुसार पोलीस केस, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे सल्लागार समिती सक्रीय झाली. जिल्हाधिकारी व लोक प्रतिनिधी स्तरावर याची चर्चा झाली. प्रसिध्दी माध्यमांनी कारवाईची, त्यानंतरच्या कारवाईची चर्चा केली. स्वयंसेवी संस्था, संघटना सक्रिय झाल्या. त्यामुळे कायद्याच्या अंमल बजावणीच्या दृष्टीने वातावरण निर्मिती झाली. मुलींची संख्या सर्व तालुक्यांमध्ये सातत्याने पण हळूहळू वाढताना दिसत आहे ही बाब सकारात्मक आहे. 'लेक लाडकी' ही पुस्तिका 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या कार्यकमांतर्गत कॅलेंडर स्वरुपात छापण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांनी व्यक्त केला आहे. गावागावात वातावरण लेक लाडकीसाठी पोषक बनत आहे. ही गोष्ट केवळ ग्रामीण आरोग्य आहार व स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणामुळे शक्य झाली. या प्रशिक्षणापश्चात जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, संघटना सक्रीय झाल्या, टास्क फोर्स, जिल्हा सल्लागार समिती सक्रीय झाली. ________________

Department of Public Health National Heah Missigpvernment of M ashtra ular Sun ३ || |

  • 3 जल्हा परिषद सांगली, य, व,प

मणि दलित महिला विकास मंडळ" यां दिंडी लेक लाडकी अधि Eि ) दिनांक : १५ ऑक्टोबर २००८ जिल्हा ग्रामीण आरोग्य अभियान, E लोककला परिवर्तनाचे माध्यम ________________

वंशाला दिवा हवा हा पारंपारिक विचार दृढ असणा-या समाजात मुलींचे अस्तित्व टिकले पाहिजे आणि स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे हा विचार घेऊन आपण कृतीशील भूमिका घेणार आहोत. आपण स्त्रीत्वाचा आदर करता. आपण रुढीवादी पुरुषसत्ता समाज बदलण्यासाठी प्रयत्न कराल. आपण आपल्या कृतीशील भूमिकेतून समाज मानस बदलण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहात. आपला आदर्श इतरांना प्ररेणादायी ठरावा असाच आहे. म्हणूनच आपल्या हाती हे पुस्तक देताना आणि लेक लाडकी अभियानात आपले स्वागत करताना आम्हास आनंद होत आहे..... ________________

हिला विक %rस मंडळ

MISSIO N. MAHAA दलित म HEALTH AONAL HE NATION RASHTRA NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र