इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग

विकिस्रोत कडून
page=1

इंद्रधनु समलैंगिकतेचे विविध रंग बिंदुमाधव खिरे इंद्रधनु : बिंदुमाधव खिरे

Indradhanu: Bindumadhay Khire प्रकाशक / मुद्रक समपथिक ट्रस्ट, १००४, बुधवार पेठ, ९ रामेश्वर मार्केट, पुणे - ४११ ००२ फोन : ९८९०७४४६७७ E-mail : samapathik@hotmail.com © बिंदुमाधव खिरे ई-१८/१२, सरितानगरी, फेज २, पुणे-सिंहगड रोड, पुणे ४११०३० E-mail: khirebindu@yahoo.com मुखपृष्ठ : चंद्रशेखर बेगमपुरे प्रकाशन : जानेवारी २००८ मूल्य : १२५ रुपये मात्र गोर विडाल, लॅरी उमर, र. धों कर्वे, व अशोक राव कवी यांस आदरपूर्वक. आपलं लिखाण मला सदैव प्रोत्साहन देत राहतं... विचार करायला लावतं.... 1. मनोगत मी पुण्याचा. पुण्यात माझा जन्म झाला. माझं बालपण, शिक्षण सगळं पुण्यात झालं. मला एक धाकटी बहीण. आई-वडील दोघंही शिकलेले. वडील सरकारी ऑफिसात शास्त्रज्ञ होते. एकट्या वडिलांच्या पगारावर संसार चालवणं अवघड झालं म्हणून आईने बी.एड. केलं व शिक्षिका झाली. घरचं वातावरण धार्मिक होतं. घरी सत्यनारायणाची पूजा, तुळशीचं लग्न, महाशिवरात्री, हरतालिका पूजा हे सगळं व्हायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाणं म्हणजे तीर्थक्षेत्राला जाणं- ह्या वेळी शेवगाव तर पुढच्या वेळी पंढरपूर, तुळजापूर. घरची माणसं अंधश्रद्धाळू होती. शनिवारी तेल विकत आणायचं नाही, केस कापायला जायचं नाही, नवीन कपड्यांना पाणी लावल्याशिवाय ते अंगावर घालायचे नाहीत इत्यादी. आम्ही हे नियम मोडलेले घरच्यांना आवडायचं नाही. घरच्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधली नाही. कोणत्याही चळवळीत कधी भाग घेतला नाही. वर्तमानपत्रातील बातमी, लेख वाचून घरात मतप्रदर्शन व्हायचं तेवढंच. थोडक्यात सगळ्या समाजाला, देवाधर्माला घाबरून, रूढी, रीती-रिवाज पाळून राहणारं एक टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब! लैंगिक विषयावर घरात कधीही बोललं जायचं नाही. मला आठवतंय- लहान असताना एकदा बहिणीने आईला विचारलं 'मुलं कशी होतात?' आई म्हणाली, 'पोटातून येतात.' मला हे उत्तर पूर्णपणे समाधानकारक वाटलं. पण बहीण जास्ती चौकस. बहीण : पोटातून येतात म्हणजे कुठून येतात? आई : पोट फाटून येतात. बहीण : तुझं पोट कुठं फाटलंय? आई : मग ते आपोआप बंद होतं. बहीण : असं कसं बंद होतं? तेव्हा आईनं काय उत्तर दिलं हे मला आठवत नाही. काहीतरी टोलवाटोलवी केली असणार. हे असं सगळं असलं तरी काही बाबतीत घरचे उदारमतवादी होते. काहीही वाचायला कधी विरोध झाला नाही. मी सहावीत हॅरॉल्ड रॉबिन्सची पुस्तकं वाचायला लागलो. पण 'हॉट' पुस्तकं जरी वाचली तरी मला लैंगिक माहिती मिळाली नाही. आपण काय वाचतो याचा अर्थ कळायचा नाही. इंद्रधनु ... ५ सेक्सबद्दलचं अर्धवट आणि काही अंशी चुकीचं ज्ञान कादंबऱ्यांतून, मित्रांच्या सेक्सबद्दलच्या बोलण्यातून व मुतारीतली चित्रं बघून हळूहळू मिळायला लागलं. जे कळायचं ते घाण वाटायचं. या पार्श्वभूमीवर मला पहिल्यांदा जेव्हा सातवीत वीर्यपतन झालं तेव्हा तो अनुभव अनपेक्षित होता व घाबरवणारा होता. मला आजार झालाय का? कुणाला विचारू? ही माझ्या मनाची अवस्था. वर्गात मुलं अर्धनग्र स्त्रियांची चित्रं असलेली मासिकं आणायला लागली होती. ती मधल्या सुट्टीत शाळेच्या मागे जाऊन बघायची. मला कधीच मुलींबद्दल आकर्षण वाटायचं नाही. पण असं सांगितलं असतं तर माझं लगेच 'रॅगिंग' झालं असतं. त्यामुळे बोलून दाखवणं परवडण्यासारखं नव्हतं. वर्गात एक मुलगा मला खूप आवडायचा. त्याच्याशी संभोग करायचा विचार मनात येऊ लागला. पण तोही मी कधी कुणाशी बोलून दाखवला नाही. त्याला मनात आणून मी हस्तमैथुन करायचो. तेव्हा 'समलिंगी' शब्द माहीत नव्हता. फक्त भावना आणि शारीरिक इच्छा कळत होत्या. मला कधीही मुलींबद्दल प्रेम, लैंगिक आकर्षण वाटलं नाही. माझ्या मित्रांना पुरुषांबद्दल लैंगिक जवळीक वाटत नाही, हे जाणवलं व मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे कळायला लागलं. याचा मला मानसिक त्रास व्हायला लागला. मीच का असा? मी काय पाप केलंय? आपण इतरांसारखे नाही आहोत, ही भावना मनात रुजली आणि हळूहळू स्वभाव एकलकोंडा बनत गेला. एकाही मुलीशी माझी मैत्री झाली नाही. मला काही समलिंगी पुरुष सांगतात की त्यांना खूप मैत्रिणी आहेत कारण, 'मुली आपल्याला जास्त स्वीकारतात.' पण माझं का कोण जाणे तसं झालं नाही. अवती-भवती मुलंच असावीत, जगात एकही मुलगी नसली तर चांगलंच अशी भावना मनात यायची. जाणवायला लागलं की जो मुलगा मला आवडतो त्याला मी न आवडता दुसरी मुलगी आवडते. त्यामुळे मुली मला स्पर्धक वाटायला लागल्या. या शर्यतीत मी कितीही मनापासून एखाद्या मुलावर प्रेम केलं तरी माझ्या वाट्याला अपयशच येणार असा न्यूनगंड माझ्यामध्ये निर्माण झाला. आपण सदैव सगळ्यांतच कमी पडणार, इतर पुरुषांच्या तुलनेत आपण कायम मागे राहणार असं वाटायला लागलं. कुठलीही महत्त्वाकांक्षा उरली नाही. दोन भिन्नलिंगी पुरुषांवर एकतर्फी प्रेम केलं, त्यात साहजिकच निराशा पदरी पडली. या अस्वीकारानी मी अजूनच खचून गेलो. मी वरवर भिन्नलिंगी असल्याचं नाटक करायचो- भिन्नलिंगी मुखवटा घालायचो. माझ्या मित्रांना माझं खरं रूप कळलं तर ते मला सोडून जातील ही भीती कायम मनात असायची. इंद्रधनु ६ सारखा प्रश्न पडायचा की या पुरुषांमध्ये असं आहे तरी काय? यांचा आत्मविश्वास, मयूरी कुठून येते? आपण सगळ्यात श्रेष्ठ, ही भावना त्यांच्यात कुठून येते? ते त्यांची गुपितं माझ्याइतकी व्यवस्थित लपवतात का? त्यांच्याकडे बघून त्यांना काही प्रश्न/ शंका आहेत असं वाटत तरी नाही. हे त्यांचं राजेशाही वागणं खूप लोभसवाणं वाटायचं आणि ते आपल्या नशिबी नाही म्हणून नशिबाला कोसायचो. एकीकडे पुरुष हवा आहे आणि त्याच बरोबर त्याच्यासारखं आयुष्य हवं आहे, अशी मनाची ओढाताण व्हायची. दोन्ही हाती लागत नाही म्हणून हळूहळू पुरुषांबद्दल द्वेष वाटायला लागला. म्हणजे स्त्रियांबद्दल मत्सर आणि पुरुषांबद्दल द्वेष आणि या दोघांच्या मध्ये मला कुठेही स्थान नाही. नैराश्य आलं. काही करायची इच्छाच उरली नाही. कशासाठी शिकायचं, नोकरी करायची हेच कळेना. मला माझ्या लैंगिकतेनी पूर्णपणे ग्रासून टाकलं. घरच्यांना कळलं तर त्यांना किती दु:ख होईल! त्यांनी मला इतक्या प्रेमाने वाढवलं आणि मी हा 'असा!' आत्महत्या करायचा विचार मनात यायचा. सगळ्या भावनांचा कोंडमारा व्हायचा. कुणाशी बोलता यायचं नाही. कुणाला माझं गुपित कळेल या नुसत्या विचारानं मूत निघेल असं वाटायचं. हळूहळू लग्नाचं वय आलं. मी परत एका भिन्नलिंगी मुलाच्या प्रेमात पडलो. त्याला माझी लैंगिकता माहीत नव्हती. तो 'होमोफोबिक' होता. पण त्यानं मला स्वीकारावं ही माझी तळमळीची इच्छा. आणि त्याने मला स्वीकारायचं असेल तर मी भिन्नलिंगी आहे असं दाखवणं माझ्यासाठी तेव्हा गरजेचं होतं. घरच्यांची अशी इच्छा असते की नोकरीत स्थिरस्थावर झाला की मुलाचे लग्न व्हावं. इतर काही नाही तरी कर्तव्य म्हणून लग्न करणं, मुलं होणं हे सर्व झालं पाहिजे अशी धारणा. या सगळ्याच्या विरोधात जायची माझ्यात ताकद नव्हती. मला आता या दुबळेपणाची लाज वाटते. चीड पण येते. त्यावेळीही यायची. पण कुठल्याही संस्कृतीचा विरोध करायचा तर, पहिलं पाऊल म्हणजे आपण आपल्याला स्वीकारायला हवं. माझा तोच पाया कुचका होता. समलिंगी असणं चूक आहे, ही भावना मनात होती. या सगळ्यात, लग्नाची आपली मानसिक तयारी, त्याच्या बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, प्रेमाचा पाया याचा मी काहीही विचार केला नाही. 'पुरुष' आणि 'स्त्री' च्या नात्याबद्दल कधी विचारच केला नाही. स्वतंत्र विचाराची सवयच नव्हती. शिकायचं असतं, एक चांगली नोकरी मिळवायची असते (बिझनेस नाही. नोकरी.), ती टिकवायची असते, एका वयात लग्न करायचं असतं, नुसतं लग्न नाही तर त्यानंतर एखादं मूल हवं (दोन मुलं असली तरी बरी. एकात एक खेळतं असा समज.. म्हणजे काय कोण इंद्रधनु ... ७ जाणे!) लग्न झाल्यावर बायकोनं तिचं घर सोडून आपल्या घरी यायचं, तिचं आडनाव बदलायचं. या पद्धतीत ती एक व्यक्ती आहे, तिला काही भावना, अपेक्षा, आकांक्षा आहेत याचा अजिबात विचार केला नाही. या ढाच्यात काही चुका, वैगुण्यं आहेत का? असा कधी प्रश्न पडला नाही. माझी सगळी मानसिक ताकद 'मी भिन्नलिंगी आहे', हे भासविण्यात खर्च व्हायची. दुसऱ्या इतर गोष्टींना स्थानच नव्हतं. माझा पुरुषार्थ जपण्यासाठी मी कोणाचंही प्यादं बनवायला तयार होतो... नाहीतर जीव द्यायला तयार होतो. माझं लग्न झालं आणि वर्षानं घटस्फोट झाला. (तेव्हा मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे एचवनबी (H1B) व्हिसावर अमेरिकेत नोकरी करत होतो.) खूप मनस्ताप झाला आणि आधारासाठी मी सॅन फ्रेंन्सिस्कोमध्ये असलेल्या एका भारतीय समलिंगी सपोर्ट ग्रुपकडे (त्रिकोण) मदत मागितली. त्यांना भेटायचं मनात खूप दडपण होतं- तिहाईत माणसासमोर गेल्याबरोबर ते मला ओळखणार की मी 'तसा' आहे. प्रचंड शरम वाटत होती आणि..... आणि पहिल्या भेटीत जादूची कांडी फिरवावी तसं माझं विश्वच बदललं. माझ्यासारखे अनेक पुरुष आहेत. माझ्यासारखे अनेकांचे अनुभव आहेत. मीच एकटा काही जगात 'असा' नाही, हे कळलं. इतरांना (विशेषत: आई-वडिलांना) कसं सांगायचं हा प्रश्न असला तरी मला माझ्याबद्दल जो तिरस्कार होता तो एका क्षणात गळून गेला. माझ्या लैंगिकतेत लपवण्याजोगं काय आहे? असं वाटायला लागलं. आणि त्या दिवसापासून माझा पुढचा रस्ता स्वच्छपणे दिसायला लागला. हळूहळू मला मी 'गे' आहे याचा अभिमान वाटायला लागला. त्या दिवसापासून माझी दृष्टी बदलली. हे दडपण कमी झाल्याबरोबर प्रत्येक गोष्ट मला वेगळ्या रंगात दिसायला लागली. 'त्रिकोण'च्या सपोर्ट ग्रुपमध्ये मला समलिंगी, उभयलिंगी पुरुष व स्त्रिया भेटल्या. सुरूवातीला मी तिथे येणाऱ्या मुलीवर जरा (जरा नाही बराच) नाखूषच होतो. “त्रिकोण'ची जागा फक्त पुरुषांसाठीच असावी असं वाटायचं. या बाया' नाही आल्या तर बरं होईल, असं वाटायचं. त्याचबरोबर ज्या मुली खूप अंग्रेसिव्ह होत्या, त्यांच्याबरोबर संवाद साधायला अवघड वाटायचं, अस्वस्थ वाटायचं. मुली अंग्रेसिव्ह असू शकतात ही सवयच नव्हती. पुरुषांनी अंग्रेसिव्ह असलं पाहिजे पण बायकांनी असू नये, ही माझी धारणा होती. हळूहळू जसा माझा न्यूनगंड कमी होत गेला तसा मी त्यांना स्वीकारायला लागलो. त्यांचे प्रश्न कळायला लागले. लेस्बियन मुलींना काय अडचणी येतात हे कळायला लागलं. मुलींना पुरुषांइतकं स्वातंत्र्य नाही, पुरुषांइतक्या शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत, एकटीने इंद्रधनु ८ राहणं मुश्किल. लेस्बियन मुलींना लग्न करायची जबरदस्ती, लग्न झालं की नवऱ्यांनी केलेला संभोग म्हणजे एक प्रकारचा रेपच', हे सगळं कळायला लागलं. माझी मुलींबद्दलची पक्षपाती वृत्ती कमी होत गेली. ती पूर्णपणे गेली आहे असं मी म्हणणार नाही. पण बऱ्याच प्रमाणात कमी झाली आणि दिवसेंदिवस कमी होत आहे. चार वर्षांनी मी कायमचा भारतात आलो. घरच्यांना सांगितलं की मी 'गे' आहे. घरच्यांना खूप धक्का बसला. आपण आपल्या मुलाला वाढवण्यात कुठेतरी चुकलो, असं त्यांना अपराधी वाटलं. मी सांगायचा प्रयत्न केला की यात कोणाचीही चूक नाही आणि मी आहे तसा सुखी आहे. त्यांना ते पटत नव्हतं. ज्या संस्कृतीत ते वाढले, त्यात त्यांचीही प्रतिक्रिया साहजिकच होती. घरच्यांचे मला ठीक करायचे प्रयत्न चालू झाले. महाराज/बाबाकडे जाऊन झालं. शेवटी मी त्यांना एका मानसोपचारतज्ज्ञाकडे नेलं. त्यांनी माझी बाजू घेऊन सांगितलं की हा बदलणार नाही; समलैंगिकता हा आजार किंवा विकृती नाही; माझ्या आई- वडिलांनी मला स्वीकारावं. हे ऐकल्यावर मी बदलेन ही घरच्यांची आशा संपली. हे सगळं चालू असताना मी पुण्यात महिन्यातून एक 'गे' सपोर्ट मीटिंग भरवायला लागलो. प्रतिसाद खूप कमी होता. इथे माझा दुसरा पुनर्जन्म झाला. अमेरिकेतील स्वप्नं एका वर्षात मोडली. इथली परिस्थिती काय आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. मुलांना लैंगिक शिक्षण नाही, बहुतेक पुरुष-पुरुषांबरोबर (किंवा स्त्रियांबरोबर) लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरत नव्हते (अजूनही परिस्थितीत फार फरक पडलेला नाही). माझ्या लक्षात यायला लागलं की भिन्नलिंगी पुरुषांनाही बरेच प्रश्न आहेत. प्रश्न फक्त स्त्रियांना, समलिंगी लोकांनाच आहेत हा भ्रम दूर झाला. पुरुषांना आपल्या लैंगिक समस्या सहजपणे मांडता येत नाहीत. स्त्रियांपासून होणारा छळ, लैंगिक संबंध/लैंगिक इच्छेबद्दलची लाज, लैंगिक विषयावरचे प्रश्न/अडचणी मोकळेपणाने कुणाशी बोलणार? नावं न ठेवता कोण अचूक माहिती देणार? अनेकजणांचा बायको (किंवा प्रियकरा) बरोबर लैंगिक इच्छा, गरजांबद्दल संवादच नसतो. त्यामुळे मग अनेक लैंगिक/भावनिक इच्छा अपुऱ्या राहतात आणि म्हणून दोघांनाही मानसिक/शारीरिक समाधान मिळत नाही. स्त्रीने एक विशिष्ट भूमिका घेतली पाहिजे, पुरुषांनी एक विशिष्ट भूमिका घेतली पाहिजे, स्त्रियांसाठी हे नियम, पुरुषांसाठी हे नियम. जेंडर, धर्म, संस्कृतीचे पायात खोडे घालून पुरुष कसा स्वत:च बळी झालाय हे कळायला लागलं. हे सगळं समजून घेताना वाटायला लागलं, की आपण एक संस्था सुरू करावी. या पार्श्वभूमीवर मी मुंबईला 'हमसफर ट्रस्ट'चे संचालक अशोक राव कवी यांना इंद्रधनु ९ ... भेटलो. (आम्ही सगळे प्रेमाने यांना 'अम्मा' नावाने हाक मारतो.) त्यांनी मला संस्था सुरू करण्यासाठी खूप उत्तेजन दिलं. आणि मग सप्टेंबर, २००२ साली मी समलिंगी लोकांसाठी 'समपथिक ट्रस्ट' ही संस्था पुण्यात सुरू केली. संस्थेचं नुसतं 'गे सपोर्ट ग्रुप' एवढंच कार्य न ठेवता लैंगिकता/लैंगिक शिक्षण देणं, एसटीडी/एचआयव्ही/ एड्सवर हेल्पलाईन चालवणं, काउन्सेलिंग, समलैंगिकतेबद्दल लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं हे ही कार्य सुरू केलं. ट्रस्ट सुरू केल्यावर लैंगिकतेचे इतर पैलू समजायला लागले. उदा. ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स इ. यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल हळूहळू समज यायला लागली. यांना जर कोणी स्वीकारलं नाही, जर यांना शिकायची, नोकरीची संधी मिळाली नाही तर यांनी काय करायचं? असे सगळे लैंगिक अल्पसंख्याक (LGBT and Intersex) पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या सगळ्या कल्पना मोडणारे आहेत. आणि म्हणून ते कोणालाच नको आहेत. पुरुषांना नको आहेत कारण त्यांच्या पुरुषार्थाच्या कल्पनेला तडा जातो. स्त्रियांना नको आहेत, कारण त्यांना असुरक्षित वाटतं. म्हणून अनेक लोकांना (अगदी काही फेमिनिस्ट बायकानांसुद्धा) हे लोक नको असतात. कारण त्यांना सहजपणे स्त्रीविरुद्ध पुरुष अशी स्पष्ट भूमिका घेता येत नाही. पुस्तकाची गरज संस्था चालवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की समलिंगी विषयावर मराठीत फारसं काही लिखाण नाही. म्हणून मी समलिंगी विषयावर 'पार्टनर' नावाचं एक मराठी पुस्तक लिहिलं. एका समलिंगी मुलाची डायरी अशी या पुस्तकाची रचना होती. हे पुस्तक मुख्यतः समलिंगी व्यक्तींसाठी लिहिलं होतं. त्यांना स्वत:बद्दलचा जो द्वेष, न्यूनगंड आहे तो दूर व्हावा हे त्या मागील उद्दिष्ट होतं. नंतर अनेक वेळा समलैंगिकतेबद्दल बोलण्याचे योग आले. भाषणं, चर्चा इ. हे करताना वारंवार दिसत होतं की या विषयाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, समलिंगी लोकांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. सगळ्या महाराष्ट्रात मी स्वत: जाऊन हा विषय मांडणं अनेक कारणास्तव अशक्य आहे. म्हणून ठरवलं की, समलैंगिकतेच्या विविध पैलूंवर एखादं पुस्तक लिहावं. या पुस्तकातून या विषयाची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचेल; समलिंगी समाजाबद्दल, समलिंगी जीवनशैलीबद्दल संवेदनशीलता निर्माण होईल. हे पुस्तक कोणीही वाचावं असं लिहिलं आहे. वयात आलेल्या मुलां/मुलींनी, पालकांनी, समलिंगी व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावं. त्याच बरोबर वकील, डॉक्टर, पत्रकार, पोलिस, काउन्सेलर्स यांनाही या पुस्तकातली माहिती उपयोगी पडू शकेल. इंद्रधनु ... १० , पुस्तकाविषयी थोडंसं पुस्तकाच्या पहिल्या भागात समलिंगी विषयावरचे विविध दृष्टिकोन मांडले आहेत. (एक पैलू मी मुद्दामच मांडला नाही, तो म्हणजे 'लोक समलिंगी का होतात?' यावर चाललेलं संशोधन. याचं एकच कारण आहे की यातलं बहुतेक सर्व संशोधन हे अत्यंत पूर्वग्रहदूषित आहे. समलिंगी असणं विकृती आहे आणि त्याचं कारण शोधून ती समूळ नष्ट करता आली पाहिजे या दृष्टीतून हे संशोधन केलेलं आहे. या असल्या अमानुष संशोधनाला या पुस्तकात थारा दिलेला नाही). दुसरा भाग हा समलिंगी जीवनशैलीबद्दल बोलतो- त्यांचं भावविश्व, त्यांच्या अडचणी, त्यांचे अधिकार इ. मला अनेकांनी पुस्तकासाठी मुलाखती दिल्या आहेत. काही जणांचे मुद्दे मांडले आहेत, तर काही जणांचे 'quotes' मी वापरले आहेत. (सगळ्यांचे ‘quotes' वापरणं शक्य नव्हतं. तसंच काही वेळा 'quotes' संपादित करून संक्षिप्त ठेवावे लागले.) काहीजणांना आपलं नाव पुस्तकात येऊ नये असं वाटत होतं. या गोष्टींचा विचार करून काही मतं नावानिशी आहेत तर काही मतं नावं वगळून प्रसिद्ध करीत आहे. मी प्रयत्न करून सुद्धा मला फार थोड्या लेस्बियन मुलींनी मुलाखती दिल्या. त्यामुळे त्यांचे अनुभव मी कमी प्रमाणात मांडू शकलो याची मला जाणीव आहे. पुस्तकात सरळ, सोपी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत शब्द नाहीत. उदा. 'आऊट', 'क्लोजेट' इत्यादी. या इंग्रजी शब्दांची यादी व त्यांचा अर्थ मी सूचीत नमूद केला आहे. पुस्तकाचा विषय समजायला अवघड आहे, पचायला त्याहून अवघड आहे याचा मी अनुभव घेतला आहे, घेतो आहे. या पुस्तकाचा समाजात समलिंगी लोकांबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्यास उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. तरीही हे पुस्तक माझीच गरज आहे, याचे भान मला आहे. बिंदुमाधव खिरे , 0 O इंद्रधनु ... ११ ऋणनिर्देश 1 मला अंधारातून उजेडाकडे आणणारी 'त्रिकोण' संस्था (सॅन फ्रेंन्सिस्को, कॅलिफोर्निया) तिचे आधारस्तंभ अरविंद कुमार, अशोक जेठनंदानी आणि संदीप रॉय; भारतात मला मोलाचं मार्गदर्शन करणारी, माझ्या संस्थेला आर्थिक आधार देणारी 'हमसफर' संस्था आणि तिचे विश्वस्त अशोक राव कवी, विवेक आनंद यांच्या ऋणातच मी कायम राहू इच्छितो. मी पुण्यात समलिंगी लोकांसाठी संस्था सुरू करताना मला पुण्यात विश्वस्त मिळत नव्हते. अशा वेळी मुंबईचे नितीन करानी, अभिजीत अहेर हे विश्वस्त बनले. यांचे मनापासून आभार! मला पुस्तक लिहिताना अनेकांची मदत लाभली. संध्या गोखले, अमोल पालेकर, ओनीर, सलीम किडवई, रुथ वनीता, गीती थदानी, जमीर कांबळे, राणी सोनावणे, अनिल कदम, मिलिंद चव्हाण, श्रीधर रंगायन, सागर गुप्ता, सुहेल, शुभांगी देशपांडे, केतकी रानडे, नयन कुलकर्णी, उज्ज्वला मेहेंदळे, डॉ. आनंद देशमुख, किरण मोघे (अखिल भारतीय जनवादी महिला संघटना) यांचा मी मनापासून आभारी आहे. डॉ. भूषण शुक्ल, डॉ. हेमंत आपटे, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. जया सागडे, डॉ. अरविंद पंचनदीकर, डॉ. मंगेश कुलकर्णी, नितीन करानी, नयन कुलकर्णी यांनी माझ्या पुस्तकाचा कच्चा आराखडा वाचून मला मोलाच्या सूचना दिल्या. याच्या व्यतिरिक्त मला सुनीता वाही, डॉ. विजय ठाकूर, डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे, चंद्रा कन्हाडकर, अनुराधा करकरे (कृपा फाऊंडेशन), मेघना मराठे, पवन ढाल (साथी संस्था), डॉ. अनुराधा तारकुंडे, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. रमण खोसला, डॉ. सौमित्र पठारे, एमआयएमएच (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ) च्या संचालिका डॉ. अलका पवार, डॉ. मयूर मुठे, आनंद पवार (सम्यक), सीमा वाघमोडे (कायाकल्प), अरविंद नारायण, गिरीश कुमार (हमसफर ट्रस्ट), संजय शेळके, नंदिता अंबिके, डॉ. राजीव बांबळे, संतोष वाणी (पुणे सिटी एडस् कंट्रोल सोसायटी), मनोज परदेसी (एनएमपी+), डॉ. ललित सरोदे, गीता राव, डॉ. पूजा यादव, प्रकाश यादव (अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था), आनंद ग्रोव्हर (डायरेक्टर लॉयर्स कलेक्टिव्ह एचआयव्ही/ एड्स युनिट), विवेक दीवान (लॉयर्स कलेक्टिव्ह), सी.वाय.डी.ए., पाथफाईंडर इंटरनॅशनल, लॉयर्स कलेक्टिव्ह यांचा आधार मिळाला. प्र. न. भारद्वाज यांनी काही इंग्रजी उताऱ्यांची भाषांतरं केली. कामात व्यस्त असूनसुद्धा वेळ काढून अंजली मुळे इंद्रधनु , " 1 १२ , यांनी पुर्फ तपासली. या सगळयांचे मनापासून आभार. काही जणांनी मला त्यांचे अनुभव सांगितले पण त्यांना त्यांचं नाव पुस्तकात येऊ नये अशी इच्छा आहे. त्यांची नावं इथं देत नसलो तरी त्यांच्या अनुभवांनी पुस्तकाची गुणवत्ता नक्कीच उंचावली आहे. तथापि ट्रस्ट, ओपन स्पेस, आलोचना, भांडारकर ओरिऐंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, इतिहास संशोधक मंडळ, पुणे विद्यापीठ- जयकर ग्रंथालय, बीजेएनएच (बॉम्बे जरनल ऑफ नॅचरल हिस्ट्री), मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय (दादर), आयएलएस लॉ कॉलेज, पुणे यांची ग्रंथालयं मला अभ्यासाला उपयोगी पडली. मी काही फोटो, वर्तमानपत्र/मासिकातील लेख, मुलाखतीचे भाग या पुस्तकात वापरले आहेत. ते भाग वापरण्यास खालील संस्थांनी परवानगी दिली. त्यांचे मनापासून आभार. Photo 1: Ancient Homosexuality? Context: Picture No.: 7409 Copyright: © K.L.Kamat. All Rights Reserved. Reel Name: Dubella Museum. Reel Notes: Sculptures and Paintings of Chandela and Orechha kings, Dubella Date of Exposure: January 08,1977. Source: http://www.kamat.org/picture.asp?Name=7409.jpg Photo 2: Erotic Sculptures of Nad-Kalse: Homosexual Men Making Merry Detail from a sculpture from Karnataka. Copyright: © K.L.Kamat. All Rights Reserved. Source: http://www.kamat.org/picture.asp?Name=3670.jpg Photo 3: Two Women having Sex Copyright: ©Giti Thadani. All Rights Reserved. This Picture has also appeared in 'Sakhiyani' & 'Moebiustrip'.

  • लोकमत

'सर्व बंधने झुगारत त्या विवाहबंधनात अडकल्या.' ०७/११/२००६. 'इट्स अ वे ऑफ लाईफ.' डॉ. संज्योत देशपांडे. २५/०६/२००७. इंद्रधनु ... १३

  • सकाळ

'आगळे विश्व माझे.' प्रतिभा घीवाला (समन्वय). ०८/०७/२००६.

  • Trikone

Meeting the Dalai Lama. By Tinku Ishtiaq. Oct 1997. Monkey Business. By Simon LeVay. April 1999. Pledging their Love. Photo of Ashok Jethnandani and Arvind Kumar getting married. By Munia and Everlyn Hunter. July 1997. Trikone Cover Photo. July 1997.

  • Bombay Dost.

Cover Photo. Volume 4, Number 4, 1996. (या पुस्तकात अजूनही अनेक लेख वापरायची इच्छा होती. पण काही वर्तमानपत्रं, इंटरनेट वेबसाईटवरचे लेख वापरण्यास अनेक कारणांमुळे परवानगी मिळू शकली नाही. काहींनी साफ नकार दिला, काहींनी मला पैसे मागितले, काहींनी मला धावाधाव करायला लावली पण 'हो' किंवा 'नाही' असं काहीच उत्तर दिलं नाही. म्हणून हे लेख मी वापरू शकलो नाही.) बिंदुमाधव खिरे O इंद्रधनु ... १४ सूची गे

जी समलिंगी व्यक्ती स्वत:च्या समलैंगिकतेचा पूर्णपणे

स्वीकार करते अशी व्यक्ती. लेस्बियन

समलिंगी स्त्री.

एमएसएम (MSM) : पुरुषांबरोबर लैंगिक संबंध करणारे पुरुष (Men who have Sex with Men) होमोसेक्शुअल

समलिंगी

होमोफोबिया

समलिंगी व्यक्तीची, समलिंगी जीवनशैलीची भीती व

त्यातून उत्पन्न होणारा द्वेष. बायसेक्शुअल : उभयलिंगी व्यक्ती हेटरोसेक्शुअल : भिन्नलिंगी व्यक्ती पीएलएचए (PLHA) : एचआयव्हीबाधित व्यक्ती. (People Living with HIV/AIDS) एसटीआय (STI) : लैंगिक संबंधातून पसरणारे आजार (Sexually Transmitted Infection) एसटीडी (STD) : गुप्तरोग (Sexually Transmitted Diseases) 3118€ (Out)

आपण समलिंगी आहोत हे इतरांना सांगणं.

क्लॉजेट (Closet) आपण समलिंगी आहोत हे इतरांपासून लपवणं, आपण भिन्नलिंगी आहोत असं ढोंग करणं. रिसेप्टिव्ह जोडीदार/बॉटमः घेणारा जोडीदार इन्सर्टिव्ह जोडीदार/ टॉप : आत घालणारा जोडीदार व्हरसटाईल जोडीदार जी व्यक्ती इन्सर्टिव्ह व रिसेप्टिव्ह अशा दोन्ही भूमिका घेते. जेंडर आयडेंटिटी : लिंगभाव (व्यक्ती स्वत:ला मानसिकदृष्ट्या पुरुष समजते का स्त्री समजते तो त्या व्यक्तीचा लिंगभाव) ट्रान्सजेंडर पुरुष

जी व्यक्ती शरीराने पुरुष आहे पण मानसिकदृष्ट्या स्त्री

आहे. (तो पुरुष स्वत:ला स्त्री समजतो.)

इंद्रधनु ... १५ ट्रान्सजेंडर स्त्री ट्रान्ससेक्शुअल

जी व्यक्ती शरीराने स्त्री आहे पण मानसिकदृष्ट्या पुरुष

आहे. (ती स्त्री स्वत:ला पुरुष समजते.)

काही ट्रान्सजेंडर पुरुष, आपलं शिश्न, वृषण शस्त्रक्रिया

करून काढून टाकतात. काही जण कृत्रिम योनी बसवतात. काही जण कृत्रिम स्तन बसवतात. शस्त्रक्रिया, संप्रेरकं, व्हॉइसथेरपी, कॉसमेटिक शस्त्रक्रिया करून स्त्री बनतात. अशा व्यक्तीला ट्रान्ससेक्शुअल म्हणतात. तसंच, काही ट्रान्सजेंडर स्त्रिया शस्त्रक्रिया, संप्रेरकं, व्हॉइसथेरपी, कॉसमेटिक शस्त्रक्रिया करून पुरुष बनतात. अशा व्यक्तीला ट्रान्ससेक्शुअल म्हणतात.

गुणसुत्र, संप्रेरकं किंवा इतर काही गांमुळे जन्माला

आलेल्या काही बाळांची जननेंद्रिय पूर्णपणे पुरुषाची किंवा स्त्रीची म्हणून विकसित झालेली नसतात. त्याच्यामुळे त्या बाळाला स्त्रीलिंगी म्हणायचं का पुरुषलिंगी म्हणायचं हे समजणं अवघड होतं. ते बाळ मोठं झाल्यावर ते स्वत:ला पुरुष समजतं का स्त्री (त्याचा लिंगभाव काय आहे) त्यावर त्याचं लिंग ठरतं. अशा व्यक्तीला इंटरसेक्स म्हणतात. इन्टरसेक्स O इंद्रधनु ... १६ अनुक्रमणिका १९ २७ ३३ भाग १ समलैंगिकता १) ऐतिहासिक दृष्टिकोन २) धार्मिक दृष्टिकोन ३) कायद्याचा दृष्टिकोन - कलम ३७७ ४) कायद्याचा दृष्टिकोन - समलिंगी विवाह ५) वैद्यकीय दृष्टिकोन - प्राथमिक माहिती ६) वैद्यकीय दृष्टिकोन - आजार ते वेगळेपण ७) प्रसारमाध्यमांचा दृष्टिकोन ४७ ५८ ६६ ७४ ८० ८८ भाग २ समलिंगी जीवनशैली १) वयात येताना २) सामाजिक समस्या ३) लैंगिकतेचा स्वीकार ४) समलिंगी नाती ५) लैंगिक आरोग्य ६) समलिंगी व्यक्तींसाठी आधारसंस्था ७) समलिंगी लोकांचे अधिकार ९४ १०२ १११ ११५ परिशिष्ट अ) संदर्भ ब) समलिंगी समाजाबरोबर काम करणाऱ्या काही संस्था क) वाचन क्रॉस इंडेक्स ११९ १२५ १२७ १२८ इंद्रधनु . ... भाग १ समलैंगिकता इंद्रधनु ऐतिहासिक दृष्टिकोन , भारताच्या संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण हा इतिहास सलगपणे उपलब्ध नाही. धार्मिक ग्रंथ, नियमावली, लैंगिकतेबद्दलचं लिखाण, वैद्यकीय साहित्य, पुरातन शिल्प यांच्यातून आपल्याला वेगवेगळ्या काळातल्या संस्कृतीची झलक बघायला मिळते. प्राचीन भारतातले लैंगिकतेबद्दलचे उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांत आढळतात. लैंगिक इच्छापूर्तीशी निगडित अनेक उल्लेख आपल्याला काही वेदांमध्ये दिसतात (उदा. 'ऋग्वेद', 'अथर्ववेद'). 'मनुस्मृती', 'कौटिलीय अर्थशास्त्र' यांसारख्या नियम/ कायद्यांच्या ग्रंथांत लैंगिकतेबद्दल उल्लेख आहेत. कामरसावर लिखाण असलेले 'कामसूत्र', 'अंगरंग' सारखे ग्रंथ आहेत. वैद्यकीय ग्रंथांत आपल्याला लैंगिकतेचे काही पैलू दिसतात (उदा. 'सुश्रुतसंहिता', 'चरकसंहिता'). विविध लैंगिक इच्छा, रूपं दर्शवणाऱ्या अनेक पौराणिक कथा उपलब्ध आहेत (उदा. 'महाभारत', 'स्कंद पुराण'). काही पुरातन देवळांच्या शिल्पात विविध प्रकारचे लैंगिक संबंध दाखवले आहेत (उदा. 'खजुराहो', 'कोनार्क'). या सगळ्या साहित्यातले बहुतांशी उल्लेख भिन्नलिंगी संबंधांशी निगडित असले तरी काही ठिकाणी समलैंगिकतेची (व इतर लैंगिक पैलूंची) उदाहरणंही दिसतात. यातली काही उदाहरणं खाली दिली आहेत. नारद पुराण [1] जे महापापी अयोनीत (योनीपेक्षा भिन्नस्थानी), वियोनीत (विजातीय योनी, पशु योनीत) वीर्यत्याग करतात त्यांना यमलोकी वीर्याचेच भोजन मिळते. त्यानंतर चरबीने भरलेल्या विहिरीत ढकलून त्यांना वीर्याचे भोजन दिले जाते. कौटिल्याचे अर्थशास्त्र [2] ४.१२.२० स्त्रीकडून भ्रष्ट झालं कुमारिकेने, तिची संमती असल्यास व ती त्याच वर्णाची असल्यास बारा पण दंड दिला पाहिजे, भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीने दुप्पट दंड दिला पाहिजे. ४.१२.२१ तिची संमती नसल्यास भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीने आपल्या वासनापूर्तीप्रीत्यर्थ शंभर पण दंड व तिचे शुल्क दिले पाहिजे. ४.१२.२२ स्वत:ला आपल्या हाताने भ्रष्ट करून घेणाऱ्या कुमारिकेने राजाचे दास्य पत्करले पाहिजे. ४.१३.४० योनीशिवाय अन्यत्र स्त्रीशी समागम करणाऱ्यास, समागम करणाऱ्यास प्रथम साहसदंड करावा. तसेच पुरुषाशी इंद्रधनु ... १९ कामसूत्र [3] भाग १. सत्र ५ २७. याच्यात एक तिसरे नाव (तृतीय प्रकृती) घातले पाहिजे...... भाग २. सत्र८ ११. ती याच प्रकारे एका मुलीबरोबर वर्तन करते.... संभोगाचं वर्णन ३१. हे वर्तन एक स्त्री तिच्या विचाराच्या दुसऱ्या स्त्रीबरोबर करते. भाग २. सत्र ९ १. तृतीय प्रकृतीचे पुरुष, ते दिसण्यास पुरुषी आहेत की बायकी आहेत यावरून त्यांची दोन प्रकारात विभागणी करता येते..... संभोगाचं वर्णन ..... ..... लैंगिकतेसंदर्भातील शब्द अनेक ग्रंथांत लैंगिकता, लैंगिक वर्तन, शारीरिक वेगळेपणाबद्दल वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले दिसतात. या शब्दांचे आताच्या शास्त्रीय शब्दांत मॅपिंग करता येणं अवघड आहे. आपण फक्त अंदाज करू शकतो. काही उदाहरणं खाली दिली आहेत. ग्रंथ शब्द अंदाज मनुस्मृती [4] कापुरूष, क्लीबः | नपुंसक, समलिंगी, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स सुश्रुतसंहिता [5] | आसेक्य, कुंभिक समलिंगी वर्तनाचे प्रकार चरकसंहिता [6] घण्ढी समलिंगी स्त्री, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स विनयपिटक [7] पंडक पंडकाचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारची व्याख्या वेगळी आहे. | जैनसूत्र [8] अमरकोष [9] किन्नर, किमपुरुष ८ व्यंतरांतले (Passing Beings) प्रकार तृतीयप्रकृतिः षण्ढ: क्लीबः पण्डो नपुंसकम् इंद्रधनु ... २० शिल्प लैंगिक संबंध दर्शवणारी अनेक पुरातन शिल्प आहेत. काही शिल्पात समलिंगी संबंध दिसतात. समलिंगी संबंध. दुबेला संग्रहालय.© के. एल. कामत. (संबंध करणाऱ्या एका पुरुषाला मिशा आहेत, दुसऱ्या पुरुषाला दाढी आहे आणि तिसऱ्या व्यक्तीच्या हातात एक मोठी कृत्रिम लिंगासारखी वस्तू आहे.) नाद कळसेची लेणी. © के. एल. कामत. शेजारील चित्रात पुरुषांमध्ये मुखमैथुन दिसतो, त्याचबरोबर डावी व्यक्ती ऑटोफिलेशिओ (Autofellatio) करताना दिसते. भुवनेश्वर- राजरानी देऊळावरील शिल्प (इसवी सन १०-११)© गिती थदानी. शेजारील चित्रात दोन स्त्रियांमधला लैंगिक संबंध दिसतो. इंद्रधनु ... २१ मुघल साम्राज्य मुघल आक्रमणं १० व्या शतकात सुरू झाली. ते हळूहळू उत्तर भारतात स्थायिक व्हायला लागले. १० ते १८ शतकाच्या कालखंडात काही समलिंगी प्रेमाचे, आकर्षणाचे उल्लेख आढळतात. यातली काही उदाहरणं खाली दिली आहेत. जहिरुद्दिन महोम्मद (बाबुर) (१४८३-१५३०) आणि बाबुरी- तरुणपणी बाबुरची नजर बाबुरीवर पडली आणि तो त्याच्या प्रेमात पडला. त्या प्रेमावर बाबुरनी काव्य रचलं. (बाबुरनामा) [10] May none be as I, Humbled and Wretched and love-sick; No beloved as thou art to me, cruel and careless. दर्गा कुली खानच्या नोंदी (दिल्ली-इ-मुरक्का)- दर्गा कुली खान जून १७३८ ते जुलै १७४१या कालावधीत दिल्लीमध्ये स्थायिक होते. त्यांनी तिथल्या संस्कृतीचं वर्णन केलं आहे. त्यात समलिंगी आकर्षणाचे उल्लेख आढळतात. [11] अबू फझलचा अकबरनामा- शहा कुली खान महाराम्सचं कुबुल खान या युवकावर प्रेम होतं. अकबराला हे पसंत नव्हतं व त्यांनी त्यांची नापसंती व्यक्त केली. शहा ऐकेनात म्हणून शेवटी अकबरानी कुबुल खानला शहापासून दूर केलं. शहाला त्याचं इतकं दु:ख झालं की त्याने संन्यास घेतला. कालांतराने तो परत अकबराकडे आला. [12] काही कवींनी 'होमोइरॉटिक' काव्य रचलं आहे. उदा. अबरू, मीर-ताकी-मीर इ. [13] ब्रिटिश साम्राज्य १८५७ च्या उठावानंतर राणी व्हिक्टोरियाने भारताचा कारभार हाती घेतला. १८६० साली भारतीय दंडसंहिता तयार करून लागू करण्यात आली. या संहितेत ३७७ कलमाने प्रौढांनी राजीखुशीने केलेला समलिंगी संबंध गुन्हा बनला. तो आजतागायत भारतात गुन्हा आहे. वरील उदाहरणं दाखवून देतात की, समलैंगिकता व इतर लैंगिक विविधता ही काही पाश्चात्त्य लोकांपासून आली नाही. ती आधीही इथे होती. भारतीय समाजाने या विषयाकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याच्याबद्दल न बोलून त्याचं अस्तित्व नाकारलं. अगदी २०व्या शतकापर्यंत हीच मानसिकता दिसते. अॅलन डॅनिलाऊ यांनी 'कामसूत्र' या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर केलं, त्यात त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे की- महात्मा गांधींनी देवळांवरची लैंगिक शिल्प तोडण्यासाठी त्यांच्या अनुयायांना सांगितलं होतं. रवींद्रनाथ टागोरांनी हे थांबवलं. जेव्हा अॅलन डॅनिलाऊनी भारतातल्या समलिंगी शिल्पांचे फोटो जगासमोर मांडले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु त्यांच्यावर वैतागले. [14] इंद्रधनु २२ ... र.धों.कबें, एम. समोर १९५० Rani N,मंडरा विसावे शतक विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला समाज सनातनी होता. पुरुषांचे आणि स्त्रियांचे वर्तन, पेहराव, जबाबदाऱ्या या विभागलेल्या होत्या व हे सगळे नियम काटेकोरपणे पाळणं अपेक्षित होतं. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ समजली जायची (अजूनही बहुतेक ठिकाणी हीच स्थिती कायम आहे.) लैंगिक विषयाबद्दल बोलणं, लिहिणं, माहिती पुरवणं भारतीय दंडसंहिता २९२ कलमाच्या खाली गुन्हा होता (आजही आहे). लैंगिक विषयावरच्या प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करून विकणं सुद्धा दंडास पात्र ठरू शकत होतं. (१९३७ साली जेव्हा गजानन रघुनाथ मुळे यांनी 'अनंगरंग' (लेखक कल्याणमल्ल) चं मराठी भाषांतर छापलं तेव्हा त्यांच्यावर हे कलम लावण्यात आलं. ते त्यातून निर्दोष सुटले पण त्यासाठी त्यांना सांगावं लागलं की हे वाड्:मय फक्त विवाहित पुरुषांसाठी आहे व ते वाचून पुरुषांना आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्यास मदत होईल. [15]) या अशा अत्यंत सनातनी व संकुचित समान स्वास्थ विचारसरणीला छेद देण्याची मोठी कामगिरी र. धों. कर्वे यांनी केली. त्यांनी १९२०च्या दशकात मुंबईत कुटुंबनियोजनाची माहिती व साधनं लोकांना द्यायला सुरूवात केली. त्यांच्या 'समाजस्वास्थ्य' मासिकातून त्यांनी लैंगिकतेच्या विविध पैलूंवर संवाद सुरू केला. संतती नियमन, गुप्तरोग इत्यादी विषयावर पुस्तकं लिहिली. लैंगिक विषयाचं ज्ञान लोकांना मिळावं, समाजाच्या लैंगिक इच्छा, गरजांकडे बघण्याचा दृष्टिकोन निरोगी व्हावा यासाठी त्यांनी काबाडकष्ट केले. समलिंगी संभोगावरचा कायदा बदलावा असं 'समाजस्वास्थ्यच्या' अंकांत १९५३ साली लिहून आलं होतं. [16] अर्थातच त्यांच्या कामात त्यांना प्रखर विरोध झाला. त्यांचा सखोल अभ्यास, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत, पुरोगामी विचारसरणी लोकांना झेपणारी नव्हती. त्यामुळे त्यांचं कार्य सदैव उपेक्षितच राहिलं. १९३० साली 'ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स'नी वाढती लोकसंख्या हा विषय हाती घेतला. त्यांनी मातेचं व नवजात बालकांचं मृत्यूचं प्रमाण हे महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले. गरीब लोकांनी कुटुंबनियोजन केलं नाही तर भारत देश अजूनच गरीब होईल या विचारातून १९५१साली कुटंबनियोजनाचं धोरण तयार करण्यात आलं. १९५०च्या दशकात आयपीपीएफ (इंडियन प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशन) व एफपीओआय मो.रनाथ शिकार सम्पmeterm14.. म.heaternet इंद्रधनु ... २३ है (फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया) यांची स्थापना झाली. बहुतेक कुटुंबनियोजनाचे कार्यक्रम स्त्रियांवर राबवले जात होते. (आजही कुटुंबनियोजन म्हणजे स्त्रीचा प्रश्न समजला जातो.) आणीबाणीच्या काळात कुटुंबनियोजनाच्या ज्या सक्तीच्या पध्दती राबवल्या गेल्या त्यामुळे कुटुंबनियोजन विषय वादग्रस्त झाला. १९८० च्या दशकात एचआयव्ही विषाणुचा शोध लागला. त्याकाळी एचआयव्ही वर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यामुळे समाजात भीती पसरली. लैंगिक शिक्षणाचा अभाव, एचआयव्हीबद्दलचं अज्ञान, नीतीमूल्यांची जबरदस्त पकड या सगळ्यामुळे एचआयव्हीबाधित लोकांवर अत्याचार होऊ लागले. 'बीभत्स पाश्चात्य संस्कृतीचं हे फळ आहे', 'व्यभिचारी लोकांना चांगली अद्दल घडली' असं लोक म्हणू लागले. कोणी कसं लैंगिक आचरण करायचं याची नीतिमत्ता शिकवण्याचं नवं पर्व सुरू झालं. संस्कृती आणि नीतिमत्तेचा आधार घेऊन लैंगिक वर्तनावर नियंत्रण घातलं जावं असा विचार मांडला जाऊ लागला. या वातावरणात लैंगिक शिक्षणाचा जन्म झाला. लैंगिक शिक्षण वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे ही धारणा वाढू लागली. ही धारणा बनत असताना लैंगिक शिक्षण हे पालकांनी घ्यायला हवं असा एक मुद्दा उपस्थित होत होता तर अनेक पालक हे काम कोणीच करू नये या धारणेचे होते. लैंगिकतेबद्दल बोलण्यास बहुतेक सर्व शिक्षक, पालक अत्यंत नाखूष होते. लैंगिक शिक्षण देण्याने मुलं/मुली चुकीच्या मार्गाला लागतील ही अनेकांना भीती होती. आज जे काही लैंगिक शिक्षण दिलं जातं ते बहुतांशी जुजबी असतं. भिन्नलिंगी लैंगिकतेबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत. लैंगिक शिक्षण हे जनसंख्येला आवर घालणं व एचआयव्ही ला आवर घालणं या दोन मुद्द्यांतून जन्माला आलं आहे. या दोन्हीत ‘आवर' हा शब्द महत्त्वाचा आहे. वयात आल्यानंतर मुलां-मुलींच्या लैंगिकतेला आवर घालणं, लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली मुला/मुलींच्या मनात लैंगिक सुखाविषयी भीती निर्माण करणं सर्रास घडतं. समाजाला पाहिजे तेव्हा, समाजाला मान्य असलेल्याच कारणासाठी, समाजाला मान्य असलेल्याच व्यक्तीबरोबर व समाजाला मान्य असलेल्याच प्रकारे लैंगिक जवळीक साधली गेली पाहिजे हीच या मागची इच्छा. अशा दूषित वातावरणात आजची मुलं-मुली वाढतात. लैंगिक गरजा, लैंगिक सुखाची आवड, लैंगिकता, मानसिक आरोग्य आणि लैंगिक अधिकार यांचा कुठेही विचार होत नाही. जिथे भिन्नलिंगी लैंगिकतेची ही स्थिती तिथे समलिंगी जीवनशैली इच्छिणाऱ्यांची काय अवस्था असणार? जगू इंद्रधनु ... २४ एकविसावे शतक विसाव्या शतकाच्या शेवटी जागतिकीकरण, तंत्रज्ञान, माध्यमांचा (टीव्ही, इन्टरनेट इ.) वाढता प्रभाव यामुळे समाजात झपाट्याने बदल होऊ लागले. जागतिक घडामोडी सहजपणे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचू लागल्या. कुठलाही विषय समाजापासून लपवून ठेवण्याच्या शक्यता कमी झाल्या. सरकारी माध्यमांवर जरी निबंधनं असली तरी खासगी माध्यमांतून लैंगिक विषय समोर येऊ लागले. हा बदल समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कोणताही विषय समाजासमोर येणं, त्याच्या विविध पैलूंवर चर्चा होणं, त्यावर विचार होणं, अंतर्मुख होऊन त्याच्यावर चिंतन करणं हे समाजाच्या दृष्टीने हिताचंच असतं. अर्थात हे मंथन होत असताना असुरक्षितताही निर्माण होते. समलैंगिकतेबद्दल हेच दिसतं. पूर्वी या विषयावर बोललं जात नव्हतं. विषय निघाला तरी थट्टा किंवा अशा व्यक्तींबद्दलचा द्वेष याच मार्गाने तो व्यक्त व्हायचा. आज विविध माध्यमांमधून हा विषय समोर येतो आहे. काही समलिंगी व्यक्ती उघडपणे त्यांची जीवनशैली जगताना दिसत आहेत. काही जण त्यांचे अधिकार मागू लागले आहेत. यामुळे लोकांची असुरक्षितता वाढायला लागली आहे. (पूर्वी समलैंगिकतेबद्दल न बोलणं हाही एक असुरक्षिततेचाच भाग होता.) ही असुरक्षितता वेगवेगळ्या मार्गातून दिसू लागली आहे. उदा. दोन मुलांनी, पुरुषांनी एकमेकांच्या हातात हात धरून चालणं, खांद्यावर हात ठेवणं, कमरेभोवती हात टाकणं आपल्याकडे उघडपणे केलं तरी चालत होतं. मला काही अमेरिकन विचारतात की, 'हे सगळे गे आहेत का?' मी म्हणतो 'नाही. तुम्हाला असं का वाटतं?' ते म्हणतात 'आमच्या संस्कृतीत समान लिंगाच्या व्यक्तींनी कोणतीही शारीरिक जवळीक करणं हे समलिंगी कल असल्याचं लक्षण मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या समान लिंगाच्या व्यक्तीपासून काही अंतर ठेवणं अपेक्षित असतं.' अशी वागणूक त्यांच्या समाजरचनेचा एक भाग आहे. (ही रचना मोडण्याची परवानगी फक्त खेळात मिळते. खेळाडूंनी एकमेकांच्या अंगावर उड्या मारणं इ. गोष्टी चालतात. हीच एक शारीरिकदृष्ट्या 'मेल बाँडिंग' व्यक्त करायची पळवाट त्यांच्या इथे उपलब्ध आहे.) समलैंगिकता हा विषय जसा-जसा चर्चेत यायला लागला तसतसे कॉलेजचे विद्यार्थी दोन समान लिंगाच्या मित्रांना समलिंगी जोडपं म्हणून चिडवायला लागली आहेत. कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विरुध्द लिंगाचा जोडीदार असला पाहिजे हा दबाव वाढायला लागला आहे. एखाद्या मुलाला किंवा मुलीला जोडीदार नाही हा नावं ठेवण्याचा विषय बनला आहे. इंद्रधनु ... २५ कुठलेही वेगवेगळे विचार समोर आले की अशा त-हेची असुरक्षितता निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण ही असुरक्षित स्थिती लवकरात लवकर बदलली नाही तर समाजावर विपरीत परिणाम होतो. कळत नकळत विचारात, वर्तनात याचा प्रभाव पडतो व आपल्यापेक्षा वेगळ्या (समलिंगी) असलेल्या व्यक्तींबद्दल द्वेष निर्माण होतो. ही समलिंगी व्यक्तींबद्दल असणारी भीती व त्यातून निर्माण होणारा द्वेष याला 'होमोफोबिया' म्हणतात. अशा दृष्टिकोनामुळे समलिंगी व्यक्तींवर अन्याय होतो. असा अन्याय होऊ नये म्हणून या विषयाच्या विविध विचारधारा समजून घेणं महत्त्वाचं आहे, याच्यातूनच ही असुरक्षितता कमी होईल आणि समाज सुदृढ व सहिष्णु बनेल. O O इंद्रधनु ... २६ धार्मिक दृष्टिकोन अनेक शतकांपूर्वी विविध कालखंडात वेगवेगळ्या ठिकाणी विविध धर्मांची स्थापना झाली. प्रत्येक धर्मांनी आपापले रीती-रिवाज बनवले, नीतिमत्ता ठरवली. हे रीती-रिवाज, नीतिमत्ता त्या त्या समाजाला लागू झाली. पुरुषांवर, स्त्रियांवर वेगवेगळ्या त-हेचे निर्बध आले. यातला एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे लैंगिक संबंधांचं नियंत्रण. कोणी कोणाबरोबर लैंगिक संबंध करायचे, कधी करायचे, कोणत्या प्रकारे करायचे याचा उल्लेख बहुतेक सर्व धर्मात दिसतो. या ठरवलेल्या नियमांचं उल्लंघन केलं तर ते पाप समजलं गेलं. वेगवेगळ्या पापासाठी वेगवेगळे शाप दिले गेले, शिक्षा ठरवल्या गेल्या. कालांतराने प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या शाखा बनत गेल्या. प्रत्येक शाखेचे वेगवेगळे नियम बनले. अनेक धार्मिक/आध्यात्मिक शाखांचा पाया विरक्तीवर आधारित आहे. सगळ्या अहिक गोष्टींच्या पलीकडे गेल्याशिवाय मुक्ती नाही, या विचारसरणीला फार कमी अपवाद आहेत (उदा. तंत्रशाखा). लैंगिकसुख घेणं, देणं हे अध्यात्माच्या आड येणारं आहे, म्हणून लैंगिक इच्छेवर काबू मिळवणं जरुरीचं आहे, अशी त्यांची धारणा. पण लैंगिक इच्छेवर मात करणं फार थोड्या जणांना शक्य होईल या वस्तुस्थितीची जाणीव आणि सगळ्यांनीच हा उद्देश साधला तर धर्म जोपासायला कोणी उरणार नाही याची व्यावहारिक जाण याच्यातून लैंगिक संबंध हे विवाहित जोडप्यांनी संतती मिळवण्यासाठी कर्तव्य म्हणून करावेत (पण ते कर्तव्य करताना त्यातून शरीरसुख उपभोगू नये) असा दृष्टिकोन बनला. जिथे भिन्नलिंगी लैंगिक सुख घेण्याबद्दलचा दृष्टिकोन नकारात्मक होता तिथे समलिंगी संबंधांबद्दल तो नकारात्मक असेल तर काय नवल? त्यामुळे समलिंगी संबंधांना कुठल्याही धर्माची मान्यता दिसत नाही. धर्मात समलिंगी संबंध करणं दुराचार, पाप समजलं गेलं. तुलनात्मकदृष्ट्या इस्लाम व ख्रिस्ती धर्मापेक्षा हिंदू, जैन, बौध्द धर्म समलैंगिकतेबद्दल खूप मवाळ आहेत. (याचा अर्थ हिंदू, जैन, बौध्द धर्मात समलिंगी संबंधांना मान्यता आहे असं अजिबात नाही.) हिंदू धर्म मनुस्मृती [4] ८:३६९- जर एखाद्या कुमारी स्त्रीने दुसऱ्या कुमारिकेबरोबर असा संग केला तर तिला दोनशे पण दंड करावा, वधूने (मुलीने) द्यावयाच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम इंद्रधनु ... २७ " देण्यास तिला भाग पाडावे आणि तिला चाबकाचे दहा फटके मारावे. ८:३७०- मात्र जर एखाद्या प्रौढ स्त्रीने एखाद्या कुमारिकेबरोबर असे कर्म केले तर तत्काळ तिचे केशवपन करावे (डोक्यावरील केस पूर्णपणे काढावे) किंवा तिच्या बोटांपैकी दोन बोटे कापून टाकावी आणि तिची गाढवावरून धिंड काढावी. ११:६८- पुरुषाने धर्मगुरुला दुखापत करणं, मद्याचा किंवा तशा दुसऱ्या निषिध्द पदार्थाचा वास घेणं, कपटीपणा करणं आणि दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संग (समागम) करणं यामुळे परंपरेनुसार तो जातिबहिष्कृत होतो. ११:१७५- द्विज वर्णातल्या पुरुषाने (म्हणजे ब्राह्मणाने) अनैसर्गिक समजला जाणारा लैंगिक दुराचार केला किंवा एखाद्या स्त्रीशी बैलगाडीतून जाताना, पाण्यात किंवा भर दिवसाउजेडी संभोग केला तर त्याने त्यानंतर सचैल स्नान करायला हवं. नारद स्मृती [17] पुरुष व स्त्रीचं नातं- या भागात चौदा प्रकारच्या लैंगिक विविधता दिल्या आहेत. यात समलैंगिकतेचा उल्लेख आहे. स्त्रियांनी अशा (समलिंगी व्यक्ती व इतर काही प्रकारच्या लैंगिकता असलेल्या) नवऱ्याला सोडून द्यावं असं नमुद केलं आहे. बौद्ध धर्म बौद्ध धर्माचे जे पंचशील आहेत त्यातला तिसरा आहे- [18] ३) लैंगिक व्यभिचार न करणं. इथे लैंगिक व्यभिचाराची व्याख्या स्पष्ट नाही, पण समलिंगी संभोग करणं तिसऱ्या शीलाचं उल्लंघन आहे असं मानलं जातं. (काही गे आणि लेस्बियन कार्यकर्त्यांना १ जून १९९७ साली तिबेटच्या दलाई लामांची भेट घेऊन समलैंगिकता आणि बौद्ध धर्माबद्दल संवाद साधायची संधी मिळाली. त्यावेळी दलाई लामा म्हणाले की, समाजाने समलिंगी लोकांचा अव्हेर करणं चुकीचं आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. [19]) जैन धर्म जैन धर्मात लग्नाच्या चौकटीतच पुरुष व स्त्रीमधल्या लैंगिक संबंधांना मान्यता आहे. इंद्रधनु ... २८ शीख धर्म कॅनडाच्या संसदेत जेव्हा समलिंगी लग्नाला मान्यता देण्याचं विधेयक मांडलं गेलं तेव्हा 'वर्ल्ड शीख फोरम'चे ज्ञानी जोगिंदर सिंग वेदांती यांनी शीख-कॅनडीयन संसद सदस्यांना आवाहन केलं की, त्यांनी समलिंगी जीवनशैलीला आधार बनणाऱ्या कायद्यांचा विरोध करावा. असे कायदे अस्तित्वात आले तर शीख लोक समलैंगिकतेला बळी पडतील. [20] ख्रिस्ती धर्म बायबल- लेव्हिटिकस [21] १८:२२ एखादा पुरुष स्त्रीशी शय्यासोबत करतो तशी त्याने दुसऱ्या पुरुषाबरोबर शय्यासोबत करायची नाही. हे निंध कृत्य आहे. २०:१३ एखादा पुरुष स्त्रीशी शय्यासोबत करतो तशी त्याने दुसऱ्या पुरुषाबरोबर शय्यासोबत केली तर त्या दोघांनी अत्यंत निंद्य कृत्य केलं असून (महापाप केलं असून) दोघांनाही मृत्युदंडाचीच शिक्षा दिली जावी. याच्या व्यतिरिक्त 'रोमन्स' (१:२६, १:२७), 'कॉरिनथियन्स् (६:९, ६:१०), ' टिमोथी' (I-१:९, १:१०), मधेही समलिंगी संबंधांबद्दल नकारात्मक भूमिका दिसते. इस्लाम धर्म

कुराण [22] ४:१६ तुमच्यातल्या दोघा पुरुषांनी कामुक कृत्य केलं तर दोघांनाही शिक्षा करा. त्यांना पश्चात्ताप होऊन त्यांचं वर्तन सुधारलं तर त्यांना सोडून द्या. परमेश्वर क्षमाशील आणि दयाळू आहे. ७:७६ तुम्ही स्त्रियांबद्दल कामवासना बाळगण्याऐवजी पुरुषांबद्दल तशी आसक्ती बाळगता. हा खरोखर तुमचा अधमपणा आहे. २६:१६६ देवाने तुमच्यासाठी निर्माण केलेल्या बायकांना सोडून तुम्ही पुरुषांशीच व्यभिचार कराल का? मग तुम्ही महापापीच ठराल. २७:४८ तुम्ही जाणूनबुजून व्यभिचार करता, स्त्रियांशी समागम करण्याऐवजी पुरुषांशी करता? मग खरोखर तुम्ही अडाणीच आहात. याच्या व्यतिरिक्त 'स्पायडर' (२९:२७) मध्येही समलिंगी संबंधांबद्दल नकारात्मक उल्लेख आहे. इंद्रधनु २९ हादीथ हादीथ अनेकजणांनी लिहिली आहेत. सगळ्याच हादीथमधले प्रत्येक समलिंगी संभोगासंबंधीचे उतारे इथे देणं शक्य नाही. उदाहरणादाखल ‘सूनन अबू दाउद' हादीथमधले काही उल्लेख खाली दिले आहेत. [23] ३८ : ४४४७ अब्दुलला इब्न-अब्बास यांनी सांगितले की, प्रेषित म्हणाले, लॉटच्या लोकांनी वर्तन केले तसे वर्तन करताना तू कोणाला बघितले तर जो करणारा आहे त्याला ठार मारावं व ज्याला केलं जातंय त्यालाही ठार मारावं. ३८ : ४४४८ अब्दुलला इब्न-अब्बास यांनी सांगितले की, जर एखादी लग्न न झालेली व्यक्ती गुदमैथुन करताना नजरेस आली तर त्याला दगडाने ठेचून मारलं जाईल. धार्मिक वातावरणाचा परिणाम जी समलिंगी मुलं/मुली धार्मिक वातावरणात वाढतात त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. समलिंगी प्रेमाचा विचार करणं, ते प्रेम व्यक्त करणं, समलिंगी संभोग करणं हे परमेश्वराच्या आदेशाचा भंग करणं आहे, या विचारसरणीमुळे आपण पापी आहोत, वाईट आहोत अशी त्यांची धारणा बनते. एकदा का हा न्यूनगंड निर्माण झाला की आपण शिक्षेस पात्र आहोत असं वाटू लागतं. त्यामुळे जो काही (कुठल्याही कारणांनी) आपल्याला त्रास होईल, अन्याय होईल तो आपण चुपचाप स्वीकारला पाहिजे कारण आपली तीच लायकी आहे अशी विचारधारा बनते. एकदा का या स्वद्वेषाच्या गर्तेत अडकलं, की बाहेर पडणं खूप अवघड होतं, तो कोंडमारा असह्य होतो. “माझ्या घरच्यांना माहीत नाही की मी समलिंगी आहे. आम्ही खूप धार्मिक आहोत. माझं मन मला दोन्हीकडे ओढतं. मला माझा बॉयफ्रेन्डही हवा आहे आणि माझं देवावरही खूप प्रेम आहे. काय करू ते मला कळत नाही. हे पाप आहे ना?" काहींच्या घरचे आपल्या मुलावर करणी झाली आहे असा समज करून घेतात तर काही जणं समलैंगिकता हे गेल्या जन्माच्या पापाचं प्रायश्चित्त आहे असं समजतात. 'ही विकृती आहे, माझ्या मागच्या जन्मीचं पाप माझ्या उदरी तुझ्या रूपानं आलं आहे.' किंवा 'मागच्या जन्मी तू खूप मोठी पापं केलीस म्हणून तुला असा जन्म मिळाला.' अशी वाक्यं अनेकांच्या वाट्याला येतात. घरचे-दारचे लोक 'देवाधर्माचं कर म्हणजे हे विचार कमी होतील' असा सल्ला देतात. वेगवेगळे होमहवन करून, उपवास, नवस करून, गंडे-दोरे घालून हे कर्म शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. याने अर्थातच काहीही फरक पडत नाही. इंद्रधनु ३० याच्या उलट आपल्याला काहीही कारण नसताना समाजाकडून एवढा त्रास सहन करावा लागतो त्याअर्थी आपण अध्यात्मात इतरांपेक्षा पुढे आहोत का? अशी काहींना शंका येते. “चारचौघांसारखेच आपण आहोत. मग एवढा त्रास, कुचंबणा आपल्याच वाट्याला का येते? एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीचा समाजाला एवढा त्रास का व्हावा? याचं काय कारण असेल? एवढी घुसमट आपल्या वाट्याला येते तर आपण कदाचित देवाच्या जास्त जवळचे असू शकू का? म्हणूनच तो आपली एवढी कठीण परीक्षा घेतो आहे?" (असे तर्क लावणं माझ्या चौकटीत बसत नाही पण त्यांना असं वाटणं साहजिक आहे, एवढं मी नक्की समजू शकतो. एकेकाळी कॉलेजमध्ये असताना देवासमोर रडून रडून ‘मला बदल' म्हणून मीही त्याला साकडं घातलं होतं, हे मी कसं विसरू शकेन?) काहीही कारण नसताना आपल्याला समाज का स्वीकारत नाही हेच कळत नाही आणि मग ह्या होणाऱ्या हालअपेष्टांमागे त्या जगनियंत्याची वेगळी कृपादृष्टी आपल्यावर असली पाहिजे असा विचार वारंवार मनात येऊ लागतो. आपल्या वाट्याला या आयुष्यात दु:खाशिवाय काहीही येणार नाही हे टोकाचं नैराश्य आल्याशिवाय, एवढ्या टोकाचं स्वप्नरंजन लोक करत नाहीत. आपण अध्यात्मात स्वत:ला वाहून घेऊ, आपलं पापक्षालन करू, या इच्छांपासून मुक्त व्हायला बघू असा विचार करून काही समलिंगी व्यक्ती संन्यास घेतात. मग अशा व्यक्ती हे महाराज, ते महाराज, हा मठ, तो मठ असं भटकत मोक्षाची वाट शोधतात. काहीजण आपण समाजकार्य करून आयुष्य सत्कारणी लावू असा विचार करतात आणि समाजकार्यात उतरतात. अशोक राव कवी (संचालक: हमसफर ट्रस्ट) म्हणाले, “मी अध्यात्म शिकण्यासाठी रामकृष्ण मठात दाखल झालो. मला संन्यासी व्हायचं होतं. तिथं मी समलिंगी आहे हे कळल्यावर मला स्वामी हर्षानंदांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले 'समलिंगी असणं हे नैसर्गिक आहे. तू समलिंगी आहेस. तर तू स्वत:ला स्वीकार. त्याचा अव्हेर करू नकोस.' असं मोलाचं मार्गदर्शन करणारे फार थोडे असतात. सावलीसारखा लैंगिक कल आपल्याबरोबर असणारच. तो दाबून टाकावा, काढून टाकावा, बदलावा, असा कोणताही उपचार स्वत:वर करणं, करवून घेणं म्हणजे स्वत:वर अन्याय करणं आहे. जोवर शरीर आहे तोवर त्याच्या गरजा असणारच. शरीराला जसं पाणी आणि जेवण लागतं तसंच त्याला शरीरसुखही लागतं आणि ते त्या व्यक्तीच्या लैंगिक कलावर अवलंबून असतं. संन्यास घेतला तरी शरीराची गरज संपत नाही. ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर असते. " इंद्रधनु धर्मा-धर्मात लैंगिकतेकडे बघण्याचा तुलनात्मक फरक असला तरी, सगळ्या धर्मातली स्त्रियांबद्दलची मतं, जातीव्यवस्था, लैंगिकतेबद्दलची मतं कालबाह्य झालेली आहेत. हजारोंवर्षांपूर्वीच्या मानवाची स्वत:बद्दलची समज आणि आताची समज यात खूप अंतर आहे. पूर्वीपेक्षा आज समाज जास्त अनुभवी आहे, ज्ञानी आहे. अनेक शतकांच्या प्रवासातून हळूहळू बदल होत जावून आज समाज समानतेच्या पायावर, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांची जपणूक करण्याच्या सिध्दांतांवर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हजारो वर्षांपूर्वीचे रीती-रिवाज, नियम आजच्या जगात लागू होऊ शकत नाहीत. धर्मानी ठरवलेले नियम बाजूला ठेवून आजच्या आपल्या ज्ञानाचा, मानवाधिकारांचा आधार घेऊन समलैंगिकतेचा विचार केला पाहिजे. इंद्रधनु ... ३२ कायद्याचा दृष्टिकोन - कलम ३७७ - पूर्वीचे ब्रिटिश कायदे ख्रिस्ती धर्माच्या विचारसरणीने प्रभावित होते. एकेकाळी ब्रिटनमध्ये समलिंगी संभोग करणाऱ्या व्यक्तींना देहदंडाची शिक्षा देण्याचा कायदा होता. ही स्थिती सतराव्या शतकापर्यंत होती. जस जसा समाज बदलत गेला तस तसे कायद्यात बदल होत गेले, व हा कायदा बदलून समलिंगी संभोगास तुरुंगवास व दंडाची शिक्षा ठेवण्यात आली. ब्रिटिशांचं राज्य येण्याअगोदर भारतात अनेक राज्यं होती. प्रत्येक राज्याचे वेगवेगवेळे नियम होते. हळूहळू ब्रिटिश साम्राज्य पसरत गेलं व त्यांनी संपूर्ण भारतावर सत्ता मिळवली. सबंध भारतात एकच कायदाव्यवस्था लागू व्हावी या हेतूने त्यांनी त्यांच्या कायद्याचा आराखडा घेऊन भारतीय दंड संविधान तयार केलं. ही दंडविधान संहिता १८६० साली भारतात लागू झाली. या संहितेच्या कलम ३७७ नुसार समलिंगी संभोग करणं गुन्हा ठरला. कलम ३७७ (भारतीय दंडसंहिता) [24] जो कोणी निसर्गक्रमाविरुद्ध कोणत्याही पुरुषाशी किंवा स्त्रीशी किंवा प्राण्याशी इच्छापूर्वक शरीर संभोग करील त्याला आजीव कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल. (Note: The offence is cognizable, non-bailable, non- compoundable and is triable by Magistrate of the first class.) कायद्याची व्याप्ती

  • या कायद्यानुसार समलिंगी संभोग करणं गुन्हा आहे, समलिंगी असणं गुन्हा

नाही. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीनी सगळ्यांसमोर सांगितलं की, तो समलिंगी आहे तर त्या व्यक्तीवर, ती व्यक्ती समलिंगी आहे. म्हणून कोणीही गुन्हा दाखल करू शकत नाही, पण त्या व्यक्तीने त्याच्या लिंगाच्या व्यक्तीशी संभोग केला तर तो गुन्हा ठरतो.

  • किंचित प्रमाणात तरी लिंगप्रवेश होणं गरजेचं आहे (वीर्यपतन होणं आवश्यक

नाही). समलिंगी संभोग करण्याच्या उद्देशाने नुसती चड्डी, लुंगी खाली ओढणं हे ३७७ कलम लागू होण्यास पुरेसं नाही. [25] 1 इंद्रधनु . ... समजला जातो.

  • दोन मांड्यांमध्ये लिंगप्रवेश करून केलेल्या संभोगास ३७७ कलम लागू

होतं. संभोगाचा अर्थ Visiting organism being enveloped by visited organism' असा लावला जातो. यामुळे मांड्यांमध्ये लिंग घालणं हाही अनैसर्गिक संभोगाचा प्रकार [26]

  • एका व्यक्तीने मूठ करून त्या मुठीत दुसऱ्या व्यक्तीने त्याचं लिंग घालणं/

एका व्यक्तीनं दुसऱ्याचा हस्तमैथुन करणं हा अनैसर्गिक संभोग समजला जातो. [27]

  • पुरुषाने किंवा स्त्रीने जनावराशी कोणत्याही प्रकारचा संभोग करणाऱ्याला

कलम ३७७ लागू होतं. व्यक्तीचं वय सात वर्षापर्यंत वयाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणताही गुन्हा केला तरी तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा समजला जात नाही. 'गुन्हा' च्या व्याख्येचा अर्थ समजण्यास ती व्यक्ती अपात्र आहे अशी कायद्याची धारणा आहे. आठ ते बारा वर्षांच्या वयातल्या मुला/मुलींनी गुन्हा केला तर तो गुन्हा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी जुव्हेनाइल कोर्टात करतात. ज्यानी गुन्हा केला आहे ती व्यक्ती 'मी काय करत होतो याची मला समज नव्हती' असा बचाव घेऊ शकते. त्याच्या वकिलाला हा बचाव सिद्ध करून दाखवावा लागतो. तेरा ते अठरा वर्षांच्या वयातल्या मुला/मुलींनी गुन्हा केला तर तो गुन्हा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी जुव्हेनाइल कोर्टात करतात. जो गुन्हा करतो ती व्यक्ती 'मी काय करत होतो याची मला समज नव्हती' असा बचाव घेऊ शकत नाही. आठ ते अठरा वर्षाच्या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा सौम्य असते, पुनर्वसनाकडे झुकलेली असते. त्याच्या दोन व्यक्तींमधल्या संभोगाचे प्रकार योनीमैथुन जर एका पुरुषाने एका १६ वर्षांच्या आतील मुलीबरोबर योनीमैथुन केला तर तो बलात्कार समजला जातो व कलम ३७५ लागू होतं (या वयात मुलीला संभोगासाठी संमती देण्याची प्रगल्भता नसते म्हणून तिची संभोगाला संमती आहे का नाही याला काही अर्थ उरत नाही). जर एका पुरुषाने १६ वर्षांवरील स्त्रीबरोबर जबरदस्ती करून योनीमैथुन केला (जर ती त्याची बायको नसेल तर) तर तो बलात्कार समजला जातो व कलम ३७५ लांगू होतं. इंद्रधनु . ३४ ---- मुखमैथुन, गुदमैथुन जर एका पुरुषाने कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर मुखमैथुन किंवा गुदमैथुन केला तर त्याला कलम ३७७ लागू होतं. जर एका स्त्रीने कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर मुखमैथुन केला तर तिला कलम ३७७ लागू होतं. या कायद्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी या कायद्यामुळे समलिंगी लोकांवर होणाऱ्या अनेक अत्याचारांवर न्याय मागण्यास अडचण येते. समलिंगी व्यक्तींना होणारा ब्लॅकमेल, गुंडांचा त्रास, जोडीदाराकडून झालेला छळ या सारखे गुन्हे फार थोड्या प्रमाणात पोलिसांपर्यंत पोचतात. या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी सर्रास केला जातो. काही वेळा एखादी समलिंगी व्यक्ती कोणाबरोबर नातं जमवते. काही काळ हे नातं चालू राहिल्या नंतर भेटलेली व्यक्ती ब्लॅकमेल करायला लागते. अशा वेळी पोलिसांत तक्रार करणं अवघड होतं. माहीत असतं की, तक्रार केली की तो ब्लॅकमेलर तुरुंगात जाईल पण त्याच बरोबर आपणही ३७७ खाली अडकू का? ही भीती असते. "मी ठिकाणी जोडीदार शोधायला रात्री गेलो होतो. तिथं माझं लक्ष नसताना मागून एक पोलिस आला. त्याने माझी गचांडी धरली. म्हणाला, 'तुम्हा गांडू लोकांनी उच्छाद मांडलाय. चल ठाण्यात, तुला चांगला धडा शिकवतो'. मी खूप घाबरलो. माझ्या घरच्यांना माहीत नाही (की मी गे आहे). “मला सोडा' म्हणून त्याची विनवणी केली. मग तो मला थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि मला त्याच्या बरोबर मुखमैथुन करायला लावला. मग मला सोडून दिलं. जाताना म्हणाला, 'परत इथं दिसलास तर चामडी सोलून काढीन.' आपल्याला पोलिस कस्टडीत नेलं तर आपण समलिंगी आहोत म्हणून आपल्यावर काय अत्याचार करतील हा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो." ज्या व्यक्तीने त्याला ब्लॅकमेल केलं ती व्यक्ती साध्या वेशातील होती. तो खरंच पोलिस होता का? हे कळायला काही मार्ग नाही. काही वेळा 'ठाण्यात चल, नाहीतर पाकीट दे, गळ्यातील चेन दे' अशी धमकी दिली जाते. माणूस काहीही विचार न करता हे सगळं देऊन टाकतो. कोणाकडं दाद मागणार? काही गुंड, चोर या कायद्याचा फायदा चोरी करण्यासाठी करतात. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या पुरुषाला इशारा करायचा. त्यानी प्रतिसाद दिला तर आपल्याला तो आवडलाय असं भासवायचं. त्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जायचं. मग आरडाओरडा करायचा 'ह्यानी माझा विनयभंग केला'. लगेच त्याच्या जवळ असलेले त्याचे साथीदार गोळा होतात. 'मारा साल्याला', 'पोलिस ठाण्यात घेऊन जाऊ' असं म्हणून त्या इंद्रधनु ... माणसाची बोलती बंद करायची. मग बाजूला घेऊन पाकीट, सेलफोन, अंगठी, चेन घेऊन त्याला सोडून द्यायचं. त्यांना माहीत असतं की हा माणूस पोलिसात जाणार नाही. (या अशा चोऱ्यामाऱ्या करणारे काही समलिंगी लोकही असतात.) काही समलिंगी पुरुष वेश्याव्यवसाय करतात. त्यातले काहीजण इमानदारीनं काम करतात. पण काही जण चोर असतात. 'कस्टमरला' अंधाऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, त्याच्या बरोबर सेक्स करताना, त्याच्या पाकिटातील पैसे, गळ्यातील चेन, सेलफोन आदि वस्तू चोरायचा धंदा करतात. अशा तक्रारी फार कमी प्रमाणात पोलिसांपर्यंत जातात. (जर एखाद्या गुंड 'कस्टमर'ला लुबाडलं तर मग त्याचे परिणामही भोगायला लागतात. कारण तो गुंड पोलिसात जात नाही. तो त्या पुरुष वेश्येला हुडकायला त्याचे साथीदार पाठवतो आणि त्याला बेदम मारतो.) काही वेळा समलिंगी पुरुषावर बलात्कार होतो. बलात्काराची कारणं अनेक असू शकतात- तो बायकी आहे; प्रतिकार करण्यास सबळ नाही; अशांना हेच हवं असतं; याला असाच धडा शिकवायला हवा; तो पोलिसात जाणार नाही ही खात्री; त्या व्यक्तीने एखाद्याला नकार दिला तर तो नकार सहन न झाल्याने, चिडून ती व्यक्ती त्या पुरुषावर बलात्कार करू शकते इ. (स्त्रियांबद्दलची पुरुषांची विचारसरणी आणि समलिंगी पुरुषांबद्दलची (विशेषत: बायकी समलिंगी पुरुषांबद्दलची) इतर पुरुषांची विचारसरणी यात फरक नाही.) बळी पडलेली समलिंगी व्यक्ती पोलिसात जायला घाबरते. तिथे गोपनीयता पाळली जाईल का! आपल्याला कोणत्या त-हेची वागणूक मिळेल! ही भीती मनात असते. बलात्कारी परवडला पण पोलिस नको, एवढी धास्ती असते. एकदा या तक्रारी पोलिसात जाणार नाहीत हे कळलं की, गुन्हेगारांचं बळ वाढतं व हे प्रकार परत परत होण्याची शक्यता वाढते. विसाव्या शतकापर्यंत अशाच त-हेचे प्रश्न ब्रिटनमध्येही दिसून येत होते. एकीकडे समाजकंटकांकडून अनेक समलिंगी लोकांचं शारीरिक व आर्थिक शोषण होत होतं तर दुसरीकडे अनेक समलिंगी लोकांना समलिंगी संभोग केला म्हणून अटक होत होती. पोलिस साध्या वेशात समलिंगी आहे असं भासवून समलिंगी लोकांना त्यांच्या जाळ्यात पकडून अटक करत होते. या जाळयात अनेक मान्यवर सापडत होते. शिक्षा अल्पशा दंडापासून ते आजन्म कारावासापर्यंत दिल्या जात होत्या. जर सुटका हवी असेल तर इच्छा नसताना लैंगिक कल बदलण्यासाठी औषधोपचार घेणं सक्तीचं होतं (ज्याने अर्थातच काही फरक पडणार नव्हता). या सगळ्या कारणांनी माध्यमांमध्ये समलैंगितेबद्दल वादळ उठलं व दोन संसद सदस्यांनी डिसेंबर १९५३ साली ब्रिटिश सरकारला विनंती केली की एक समिती स्थापन करून या कायद्यावर विचार करावा. इंद्रधनु ३६ ... 7 वुल्फेंडेन समिती १९५४ साली वुल्फेंडेन समितीची स्थापना झाली. या समितीत १४ पुरुष व ३ स्त्रिया होत्या, ज्यांमध्ये धर्मगुरु, मानसोपचारतज्ज्ञ, राजकीय पुढारी आदी सदस्य सामील होते. या समितीचे अध्यक्ष होते सर जॉन वुल्फेंडेन, रेडिंग विश्वविद्यापीठाचे उपकुलगुरु. तीन वर्षाच्या कालावधीत या समितीने अनेक धर्मगुरु, पोलिस, मानसोपचारतज्ज्ञ, समाज कार्यकर्ते व समलिंगी लोकांच्या मुलाखती घेतल्या. या सगळ्याचा अभ्यास करून १९५७ साली या समितीने तिचा अहवाल सादर केला. १४ सदस्यांपैकी १३ सदस्यांचं मत झालं की समलिंगी संभोग जर खाजगीत होत असेल, तो राजीखुशीने होत असेल व दोन व्यक्तींचं वय किमान २१ वर्ष असेल तर तो गुन्हा समजला जाऊ नये (जर त्या दोन्ही व्यक्ती लष्करातल्या नसतील तर). अहवालाचे ठळक मुद्दे [28] या अहवालाने समलैंगिकतेचं खंडन केलं, ते अनैतिक आहे असं मत मांडलं, पण त्याच बरोबर सांगितलं की समलिंगी संभोग गुन्हा ठरवणं हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. कायद्याचं काम समाजव्यवस्था सांभाळणं आहे, नागरिकांना इजा होणार नाही याची दखल घेणं आहे, कुणाचं शोषण होणार नाही, अन्याय होणार नाही (विशेषतः समाजातील दुर्बळ घटकांवर) याची खबरदारी घेणं आहे. कोण कुठल्या त-हेचं खाजगी आयुष्य जगतं, खाजगीत कोणतं वर्तन करतं यात दखल देणं हे कायद्याचं काम नाही. समितीतल्या जेम्स अडैरना हा दृष्टिकोन मान्य नव्हता. त्यांची भूमिका होती की समलिंगी संभोगाला कायद्याने मान्यता दिली तर समलिंगी लोकांना अश्लिल वागणुकीचा परवानाच मिळेल. समितीने समलिंगी असण्याला आजार मानला नाही. पण त्याच बरोबर समितीनी समलिंगी होण्यामागच्या कारणांवर संशोधन व्हावं हेही नमुद केलं. समितीने पुरुष वेश्या व्यवसायावर जास्त निबंध आणावेत अशी शिफारस केली. अहवालावरच्या प्रतिक्रिया हा अहवाल खूप लोकप्रिय व वादग्रस्त झाला. अनेक धर्मगुरु, राजकीय पुढारी, अनेक वृत्तपत्रांनी या अहवालाचं खंडन केलं. समितीने समलैंगिकता हा आजार नाही हे सांगितल्यामुळे अनेक मानसोपचारतज्ज्ञही चिडले. लॉर्ड डेव्हलिन म्हणाले की, . समाजाने काही ठरवलेल्या नीतिमत्तेवर समाज आधारित आहे. समलिंगी संबंधांना जर मान्यता दिली तर समाज टिकणार नाही. समलिंगी संबंध सहनशीलतेचा अंत बघतात. अशा काही विशिष्ट कारणांसाठी खाजगीत केलेले व्यवहारही सार्वजनिक नीतिमत्तेत आणले पाहिजेत. (म्हणजे कायद्याने खाजगी व्यवहारात दखल दिली पाहिजे.) इंद्रधनु ... ३७ एच.एल.ए.हार्ट यांनी लॉर्ड डेव्हलिनच्या मताला विरोध केला. त्यांचं मत होतं की खाजगीत (राजीखुशीने) केलेल्या समलिंगी संभोगात कायद्याने दखल देवू नये, ती वैयक्तिक बाब आहे. [29] (हार्ट यांनी, डेव्हलिनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कायदा व नीतिमत्ता यांच्यावर 'लॉ, लिबर्टी अॅन्ड मोरॅलिटी' हे पुस्तक लिहिलं.) याच बरोबर कॅन्टरबरीचे आर्चबिशप म्हणाले की, प्रत्येक माणसाचं एक खाजगी आयुष्य असतं. त्याचं स्वातंत्र्य, अस्मिता जपण्यासाठी त्याच्या खाजगी आयुष्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. या अहवालाला ब्रिटिश मेडिकल असोसिशन, हॉवर्ड लीग फॉर पेनल रिफॉर्म, नॅशनल असोसिओशन ऑफ प्रॉबेशन ऑफिसर्स यांनी पाठिंबा दिला. या समितीच्या शिफारसीवर हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये १९५७ साली चर्चा झाली. १७ पैकी आठ जणांनी समलिंगी संभोग हा गुन्हा नसावा असं मत मांडलं. गृहसचिव सर डेव्हिड मॅक्सवेल-फेफ या शिफारशीवर खूप नाराज झाले व या विषयावर अजून अभ्यास व्हायला पाहिजे असं सांगून त्यांनी या शिफारसी अमलात आणण्यास नकार दिला. १९६० साली 'होमोसेक्शुअल लॉ रिफॉर्म सोसायटी' नी कायद्यात बदल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले. १९६७ साली (वुल्फेंडेन अहवाल मांडल्यानंतर १० वर्षांनी) संसद सदस्य लिओ अबसे यांनी (गृह सचिव रॉय जेन्कीन्स व पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा पाठिंबा घेऊन) 'सेक्शुअल ऑफेन्सेस' विधेयक मांडलं. याच्यावर कडवी चर्चा झाल्यानंतर कसंबसं संसदेत हे विधेयक पास झालं. [30] वुल्फेंडेन समितीचा अहवाल खूप उदारमतवादी होता असं अजिबात नाही. त्यांनी समलिंगी व भिन्नलिंगी नाती समान मानली नाहीत. त्यांनी समलिंगी संबंधांचं खंडन केलं. तरी सुद्धा, त्याकाळात समाजाच्या दबावाला बळी न पडता त्यांनी जे मत मांडलं, ते पाऊल महत्त्वाचं ठरलं. पुढे १९९४ साली समलिंगी संभोगासाठी संमतीसाठी किमान वय २१ वरून १८ वर करण्यात आलं. २००० साली ते १६ करण्यात आलं. (जे भिन्नलिंगी संभोगासाठी वय आहे.) २००० सालापासून ब्रिटनमध्ये समलिंगी जोडप्यांना कायद्याने लग्न करायची (सिव्हिल मॅरेज) मान्यता मिळाली. खाजगीतल्या लैंगिक संबंधातली नीतिमत्ता हा कायद्याचा विषय नाही हा या अहवालातल्या तत्त्वाचा ·उपयोग अमेरिका, कॅनडामध्ये लैंगिक विषयाशी निगडित कायदे बदलण्यासाठी करण्यात आला. भारतातील ३७७ कलमावर जनहित याचिका विसाव्या शतकाच्या शेवटास एचआयव्हीचा प्रसार भारतात होऊ लागला. एचआयव्ही व गुप्तरोगांच्या नियंत्रण कार्यक्रमाला ३७७ कायद्याचा अडथळा होऊ इंद्रधनु ३८ ... लागला. समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना, समलिंगी संभोग करणाऱ्या पुरुषांपर्यंत पोचणं अवघड होत होतं कारण सुरक्षित संभोगाची माहिती. देणं, कंडोम पुरविणं म्हणजे गुन्हा करण्यास (समलिंगी संभोग) करण्यास उत्तेजन देणं आहे अशी काही जणांची धारणा होती. १९९० च्या दशकात एका वैद्यकीय गटाला दिसून आलं की तिहार तुरुंगात समलिंगी संबंध होतात. या संबंधांतून एचआयव्हीचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता असल्यामुळे तुरुंगात कंडोम पुरवले जावेत असं त्यांनी सुचवलं. याला किरण बेदी (आ.जी. तुरुंग) यांनी विरोध केला. कंडोम वाटल्यामुळे समलिंगी संबंध वाढतील व कंडोम वाटणं म्हणजे समलिंगी संबंधांना एक प्रकारे मान्यता देणं होईल असं सरकारी सूत्रांचं मत होतं. [31] या सर्व कारणांमुळे ३७७ कायदा बदलला जावा असं काही जणांचं मत बनलं. ‘एडस् भेदभाव विरोधी आंदोलन (ABVA) यांनी ३७७ कलम बदलावं यासाठी १९९४ साली एक जनहित याचिका दिल्लीच्या कोर्टात दाखल केली. [32] तिचा पाठपुरावा न झाल्यामुळे ती निकालात निघाली. २००१ साली, जर दोन प्रौढ व्यक्ती (कोणत्याही लिंगाच्या) राजीखुशीने संभोग करीत असतील तर त्यांना हा कायदा लागू होऊ नये यासाठी 'नाझ फाऊंडेशन इंडिया' यांनी नवी दिल्लीच्या हायकोर्टात 'लॉयर्स कलेक्टिव्ह'च्या मदतीने एक जनहित याचिका दाखल केली. [33] ही याचिका दाखल करताना त्यात मांडलेले मुख्य मुद्दे असे - ३७७ कलमामुळे भारतीय राज्यघटनेच्या खालील कलमांचं उल्लंघन होतं. १. खाजगी आयुष्य जगण्याचा अधिकार- कलम २१ चं उल्लंघन. दोन व्यक्ती (कोणत्याही लिंगाच्या) शयनगृहात कोणत्या प्रकारचा संबंध करतात याची सरकारनं दखल घेणं हे या अधिकाराचं उल्लंघन आहे. २. समान अधिकाराचं उल्लंघन- कलम १५ चं उल्लंघन. हा कायदा भिन्नलिंगी व समलिंगी व्यक्तींमध्ये भेदभाव निर्माण करतो. ३. हा कायदा समलिंगी संबंध गुन्हा ठरवत असल्यामुळे कलम १९(१) (अ ते ड) चं उल्लंघन होतं. कलम १९-१-अः या विषयावर विचार मांडणं; वक्तव्याचं स्वातंत्र्य कलम १९-१-ब: या विषयासंबंधित संमेलन भरवणं, मोर्चा काढणं कलम १९-१-क: या विषयासंबंधित संस्था बनवणं, संघटित होणं कलम १९-१-ड: या विषयासंदर्भातील कामासाठी भ्रमंती करण्याचं स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींवर गदा येऊ शकते. इंद्रधनु ... ३९ ४. कलम १४ चं उल्लंघन : लैंगिक संबंध हे फक्त प्रजननासाठीच केले जातात या कालबाह्य समजुतीवर हा कायदा आधारलेला आहे. ज्याच्यावर ३७७ कलमामुळे अन्याय झाला आहे त्यानेच ही याचिका मांडली पाहिजे हे कारण सांगून न्यायाधीशांनी ही याचिका बरखास्त केली. ही याचिका बरखास्त झाल्यावर लॉयर्स कलेक्टिव्हनी समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्था व इतर कार्यकर्त्यांबरोबर एक बैठक घेतली. पुढची दिशा काय असावी यावर विचार विनिमय झाला, आणि मग 'केवळ एखादी व्यक्ती (या कलमामुळे अन्याय झालेली) समोर नाही म्हणून एक जनहित याचिका बरखास्त केली जाऊ शकते का?' एवढ्याच मुद्द्यावरून सुप्रिम कोर्टात जायचं ठरलं. सुप्रिम कोर्टात अपील केल्यावर सुप्रिम कोर्टाने निकाल दिला की ३७७ कायद्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, व ही जनहित याचिका या कारणानी बाद केली जाऊ नये. या निर्णयामुळे हे प्रकरण परत दिल्ली हायकोर्टात आलं व आता (डिसेंबर २००७) तिथे ही केस चालू आहे. या याचिकेला उत्तर देताना सरकारतर्फे खालील मुद्दे मांडले गेले. १) समलैंगिकता भारतातील संस्कृतीच्या विरुद्ध आहे. भारतीय समाजाची समलिंगी संबंधांना मान्यता द्यायची आता तरी मानसिक तयारी नाही. २) समलिंगी संबंधाना जर मान्यता दिली तर समाजातील नीतिमत्ता बिघडेल. 'नॅशनल एडस् कंट्रोल ऑर्गनायझेशन'नी उत्तर दिलं की, ३७७ कायद्यामुळे एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवण्यास अडथळा येतो- "5. It is submitted that the enforcement of section 377 of IPC can adversely contribute to pushing the infection underground, make risky sexual practices go unnoticed and unaddressed. The fear of harassment by law enforcement agencies leads to sex being hurried, leaving partners without the option to consider or negotiate safer sex practices...." [34] ३७७ कायदा बदलावा याला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनी पाठिंबा दिला. २००३ साली वृंदा करात (तेव्हाच्या AIDWAच्या सचिव) यांनी अरुण जेटलेंना (तेव्हाचे कायदामंत्री) ३७७ कलमासंदर्भात एक पत्र पाठवलं. त्यात त्यांनी म्हटलं की, दोन प्रौढ व्यक्तींनी खाजगीत राजीखुषीने कोणत्या प्रकारचा लैंगिक संबंध करायचा या गोष्टीत लक्ष घालायचा सरकारला अधिकार नाही. सरकारचं म्हणणं आहे की, हे संबंध आपल्या समाजाला मान्य नाहीत, म्हणून आयपीसी ३७७ हा कायदा तसाच ठेवला पाहिजे. असाच युक्तिवाद सरकारने कायम केला असता तर स्त्रियांचे इंद्रधनु ... ४० , आणि दलितांच्या अधिकाराचे अनेक कायदे अस्तित्वात आलेच नसते, कारण अनेक समाजातील लोकांना हुंडा घेणं, स्त्रियांना मारहाण करणं, जातीभेद पाळणं हे संस्कृती, परंपरेनुसार बरोबर वाटतं. [35] धर्मनिष्ठ राजकीय पक्षांचा समलिंगी संभोगाला मान्यता देण्यास उघडपणे विरोध आहे. समाजवादी पक्षांचा विरोध उघडपणे झालेला नसला तरी याचा अर्थ ते या बदलाला अनुकूल आहेत असा अर्थ लावणं चुकीचं होईल या प्रांतांत समलिंगी संभोग गुन्हा आहे. (२००७) (Map Source- http://www.sodomy.org) ३७७ कलमातून निर्माण होणारे कायद्याचे प्रश्न

  • लहान मुलांच्या लैंगिक शोषणावर वेगळे कायदे असावेत का?
  • संमती नसतातना केलेला गुदमैथुन किंवा मुखमैथुन बलात्कार मानायचा

का?; समलिंगी संभोगाला संमती असणं किंवा संमती नसणं या दोन गोष्टींना कायद्यानी एकाच मापदंडानी मोजणं बरोबर आहे का?

  • नैसर्गिक संभोगाची व्याख्या काय? जननेंद्रियांव्यतिरिक्त इतर शरीराचे अवयव

वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून जोडीदाराबरोबर केलेला संभोग नैसर्गिक समजायचा का अनैसर्गिक? स्वत:बरोबर केलेला संभोग नैसर्गिक का अनैसर्गिक मानायचा? नैसर्गिक/अनैसर्गिक कोणी व कशाच्या आधारावर ठरवायचं? इंद्रधनु ४१ ...

  • दोन व्यक्तींमधला संभोग आणि एक व्यक्ती व एका जनावराबरोबरचा संभोग

यांची तुलना होऊ शकते का?

  • या कायद्याला समांतर असलेला लष्करातील कायदा बदलावा का?

लहान मुलं व लैंगिक शोषण आतापर्यंत बहुतेक वेळा ३७७ कलम लहान मुली/मुला बरोबर केलेल्या मुखमैथुन/गुदमैथुनासाठी लावण्यात आलेलं आहे, कारण अशा प्रकारे झालेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणासाठी कायद्यात वेगळं कलम नाही. १९९० ते २००० या दशकात, ३७७ खलील जी प्रकरणं कायद्याच्या नजरेस आली त्यांचं विभाजन- पुरुष व स्त्री: १ प्रकरण, दोन पुरुष: ३ प्रकरणं, लहान मुली/मुलांबरोबर केलेला संभोग: १८ प्रकरणं. [36] म्हणून लहान मुलांच्या सगळ्या प्रकारच्या लैंगिक शोषणावर कायद्याने स्वतंत्र तरतुद करावी. संमती कायद्याच्या दृष्टिकोनातून बलात्कार म्हणजे पुरुषानी जबरदस्तीने स्त्रीबरोबर केलेला योनीमैथुन. नवऱ्याने बायकोवर जबरदस्तीने केलेल्या योनीमैथुनाला बलात्कार मानला जात नाही, तसंच इतर कोणतेही जबरदस्तीने केलेले लैंगिक संभोगाचे प्रकार बलात्कारात मोडत नाहीत. पुरुषानी जबरदस्तीने दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषावर केलेल्या गुदमैथुनाला, मुखमैथुनाला बलात्कार मानला जात नाही. स्त्रीने जबरदस्तीने दुसऱ्या स्त्रीवर केलेल्या मुखमैथुनाला बलात्कार मानला जात नाही. जबरदस्तीने केलेला संभोग हे नुसतं लैंगिककृत्य नसतं. शरीरसुखाच्या प्रबळ इच्छेव्यतिरिक्त, दुसऱ्या व्यक्तीची अवहेलना करणं, अपमान करणं, त्या व्यक्तीची अस्मिता नष्ट करणं असे अनेक उद्देश असू शकतात. (मग तो पुरुषानी स्त्रीवर केलेला असो अथवा पुरुषाने पुरुषावर केलेला असो.) म्हणून कोणत्याही व्यक्तीने जबरदस्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही भोकात आपली जननेंद्रियं घालण्याला बलात्कार मानला जावा. आताची कायद्याची बलात्काराची व्याख्या अपुरी आहे. या व्याख्येत सुधार होणं गरजेचं आहे. बलात्काराची व्याख्या बदलावी यासाठी 'साक्षी' संस्थेनी दिल्लीच्या हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. [37] या याचिकेवर सरकारने मत मांडलं की आताचं ३७५ कलम परिपूर्ण आहे. समजण्यासाठी सरळ, सोपं आहे. हे कलम जर विस्तारित केलं तर गोंधळ निर्माण होईल. इतर गुन्ह्यांसाठी (उदा. जबरदस्तीने केलेला गुदमैथुन) इतर कलमं आहेत. सरकारची बाजू कोर्टानी उचलून धरली. सरकारी . पक्षानी मांडलेलं मत कितपत बरोबर आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. , इंद्रधनु ... ४२ इतर अवयव/ कृत्रिम वस्तूचा वापर जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव किंवा एखादी कृत्रिम वस्तू जबरदस्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जननेंद्रियांमध्ये घालण्याला बलात्कार समजला जावा. जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून स्वतःशी केलेला संभोग गुन्हा समजला जाऊ नये. जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराचे इतर अवयव वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून प्रौढांनी संमतीने केलेला संभोग गुन्हा समजला जाऊ नये. लों कमिशन लॉ कमिशनच्या १७२व्या अहवालानी सुचवलं की, ३७५ बलात्कारावरचं कलम बदलून ते लैंगिक अत्याचाराचं कलम करावं. त्या कलमाखाली संमती नसताना केलेला योनीमैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन व कृत्रिम वस्तूचा वापर करून केलेला संभोग गुन्हा ठरवावा. त्याच बरोबर ३७७ कलम रद्द करावं असंही सुचवण्यात आलं. [38] ही नवीन व्याख्या लिंगभेद करत नाही (पुरुष व स्त्रिया यांना एकाच मापात तोलते) व या नव्या व्याख्येत सुध्दा नवऱ्याने बायकोची संमती नसताना बायकोबरोबर केलेला संभोग गुन्हा मानलेला नाही, म्हणून काही स्त्रीवादी संघटनांनी या नव्या व्याख्येचा विरोध केला. नैसर्गिक व अनैसर्गिक संभोग गुदमैथुन व मुखमैथुन जर अनैसर्गिक मानायचे झाले तर मग प्रश्न पडतो की, कोणत्या कृत्याला नैसर्गिक समजायचं? प्रजननासाठी केलेली शरीराची, मनाची रचना नैसर्गिक? निसर्गाने ज्या कारणांसाठी जे अवयव दिले आहेत ते त्याच कारणांसाठी वापरणं हे नैसर्गिक? निसर्गात ज्या त-हेचे लैंगिक संबंध दिसतात ते नैसर्गिक? जे उपजत येतं ते नैसर्गिक? प्रजननासाठी केलेली शरीराची, मनाची रचना लैंगिक संबंध फक्त प्रजननासाठीच केले जातात का? लैंगिक संबंध हा जोडप्यांचा प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. दर वेळी संभोग फक्त प्रजननासाठी केला जात असता तर कंडोमचा काय उपयोग? एकमेकांना प्रेम, आनंद, सुख देणं हा लैंगिक संबंधाचा मोठा भाग आहे. भिन्नलिंगी नवरा-बायकोच्या नात्यात हे पैलू नसतात का? नवरा, बायको या दोघांना काही कारणानी मूल होणार नसेल, किंवा नको असेल तर त्यांच्या नात्याला काही अर्थ नाही का? मग त्यांनी संसार करायचा नाही का? एखाद्या लैंगिक नात्यातून प्रजनन होणार नसेल तर प्रेम करणं, शरीरसुख घेणं/देणं चुकीचं आहे, हा निष्कर्ष आपण कसा काढायचा? 1 इंद्रधनु ४३ निसान ज्या कार्यासाठी जे अवयव दिलेले आहेत ते त्याच कारणांसाठी वापरणं निसर्गाने जो अवयव ज्या कामासाठी दिला आहे तो अवयव त्याच कारणासाठी वापरायचा अशी काहींची धारणा आहे. पण आपण शरीराचे अनेक भाग वेगवेगळ्या कार्यासाठी वापरतो. तोंडाचं कार्य खाणं आणि बोलणं असलं तरी चुंबन घेण्यास आपण वापर करत नाही का? हाताचा/बोटांचा उपयोग लोक वस्तु उचलण्यासाठी करतात. पण त्याचबरोबर अनेक जण हाताचा/बोटांचा उपयोग स्वतःला किंवा दुसऱ्याला शारीरिक सुख देण्यासाठी करत नाहीत का? निसर्गातले लैंगिक संबंध निसर्गाचा अभ्यास करताना प्राण्यांमध्ये विविध लैंगिक पैलू आढळून आले. सुरुवातीच्या काळातला हा अभ्यास, सर्वेक्षणं पूर्वग्रहदूषित होती. प्राणी, पक्षांची समलिंगी जोडपी संभोग करताना दिसली तर- ती खेळत आहेत, पुढच्या भिन्नलिंगी आयुष्याची तयारी करत आहेत असे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून चुकीचे निष्कर्ष अनेक वेळा काढले गेले. जेव्हा निकोप दृष्टीने सर्वेक्षणं व्हायला लागली तेव्हा निसर्गात लैंगिकतेचे अनेक पैलू दिसून आले. जो समज होता की निसर्गात फक्त भिन्नलिंगी संबंध, नाती दिसतात ही धारणा साफ चुकीची ठरली. अनेक प्राण्यांमध्ये समलैंगिकता, उभयलैंगिकता आढळून येते. चिंपांझी, गोरिला, हनुमान लंगूर, बॉटल नोज डॉल्फिन, ग्रे देवमासा, ग्रे सील, पांढऱ्या शेपटाचे हरीण, जिराफ, हत्ती, शेळी, सिंह, चित्ता, अमेरिकन बायसन, ग्लॅग गुस, काळा बगळा, मॅलर्ड बदक, रिंग बिल्ड गल, फ्लेमिंगो, पेंग्विन, पाईड किंगफिशर इत्यादी प्राण्यांत समलैंगिकता आढळते. [39] मॅनहॅटन च्या सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालयामध्ये अनेक समलिंगी पेंग्विन्सची जोडपी आहेत. त्यातील रॉय आणि सिलो नावाच्या नर पेंग्विनचं एक समलिंगी जोडपं आहे. या दोघांच्या घरट्यात एक गोल दगड ठेवल्यावर त्यांनी तो उबवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी रॉब ग्रॅमजे यांनी तो दगड काढून एका पेंग्विनचं सूपीक अंड ठेवलं. या दोघांनी ते उबवलं व टँगो ही मादी पेंग्विन जन्माला आली. तिला या दोघांनी प्रेमाने वाढवलं. [40प्राण्यात अशा त-हेची अनेक समलिंगी जोडप्यांची उदाहरणं आढळतात. काही ठिकाणी प्राण्यांची जोडपी दिसत नाहीत पण समलिंगी संबंध दिसतात. हनुमान लंगुरांबद्दल सायमन ली व्हे लिहितात "हनुमान लंगूर माकडांच्या, गटाच्या काठावरच नर आणि मादी माकडांमध्ये खूप प्रमाणात समलिंगी संबंध दिसून आले. दोन नरांच्या समलिंगी संबधांमध्ये एक नर दुसऱ्या नराच्या शेपटीखाली वीर्यपतन होईपर्यंत इंद्रधनु ... ४४ 3) आपले लिंग घालताना पाहण्यात आले. काही जनावरांमध्ये दोन नरांमध्ये गुदमैथुन होतो तसं इथे (या माकडांत) दिसून आलं नाही." [41] इतके दिवस जनावरात समलैंगिकता आढळते हे माहीत नव्हतं तोवर, 'प्राण्यांना सुद्धा जे कळतं ते हे ‘या असल्या लोकांना कळत नाही', असं बोललं जायचं. आता, 'पण ती जनावरं आहेत. आपण जनावरं आहोत का? त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक?' असं बोललं जातं. प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ लावतो. जे उपजत येतं ते नैसर्गिक? काही जणांचं म्हणणं आहे की समलिंगी आकर्षण हा निवडलेला पर्याय आहे. ही समजूत साफ चुकीची आहे. समलिंगी कल उपजत येतो. तो काही शिकवता येत नाही. हे जर आकर्षण उपजत आहे तर समलिंगी संभोग करण्याची इच्छा होणंही स्वाभाविक आहे पण ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की, आपली आवड, गरज पुरी करताना जोडीदार प्रौढ आहे व दोघांची या संबंधांना संमती आहे. दोन प्रौढ व्यक्तींनी संमतीने मुखमैथुन किंवा गुदमैथुन केला तर कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा का असावा? कोणावर अन्याय घडतो आहे? कोणता अन्याय होतो आहे? अनेक जण ही भीती व्यक्त करतात की, सगळे समलिंगी झाले तर मनुष्यच नष्ट होईल. याला उत्तर असं की, थोडे जण समलिंगी असतात, काही जण उभयलिंगी असतात व बहुतांशी भिन्नलिंगी असतात. त्यामुळे ही भीती अवास्तव आहे. याच बरोबर असाही विचार करावा की आताची जनसंख्या बघता, त्या जनसंख्येमुळेच सगळी पृथ्वी नष्ट होईल याची भीती निर्माण झाली आहे. समलिंगी जोडप्यांना मुलं होणार नाहीत म्हणून एक प्रकारे जनसंख्येला आळा घालण्यास थोड़ी का होईना मदत नाही का होणार? गंमतीची गोष्ट अशी की जेव्हा कुटुंबनियोजनाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हाही हीच भीती व्यक्त करण्यात आली होती. मनुष्य व जनावरांचा संभोग समलिंगी संभोग व माणसाने जनावराबरोबर केलेला संभोग कायदा एकाच मापदंडाने मोजतो. पुरुष किंवा स्त्री एखाद्या जनावराबरोबर संभोग करतात तेव्हा जनावराची संमती घेतलेली नसते (ती घेता येत नाही). दोन प्रौढ समलिंगी पुरुषांनी (किंवा दोन प्रौढ समलिंगी स्त्रियांनी) जर एकमेकांच्या संमतीने संभोग केला तर त्याला का अडचण यावी? दुसरी गोष्ट- मनुष्य व जनावर वेगळ्या जातीचे (Species) आहेत. दोन पुरुष (किंवा दोन स्त्रिया) वेगवेगळ्या जातीचे (Species) कसे काय? एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दुसऱ्या जातीचा (Species) म्हणतो का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला दुसऱ्या जातीची (Species) मानते का? म्हणून माणूस व जनावर यांच्यामध्ये होणाऱ्या संभोगाचा कायद्याने स्वतंत्र विचार करावा. इंद्रधनु ... ४५ ! या कायद्याच्या समांतर असलेला लष्करातील कायदा समलिंगी वर्तन करणाऱ्या लष्करातील व्यक्तींवर खटला दाखल होऊन कैद होऊ शकते. [42] समलिंगी लैंगिक वर्तन करणाऱ्या व्यक्ती लष्करात आल्या तर सैन्याचं मनोबल खचेल, अराजकता माजेल ही यामागची भीती असते. समलिंगी लोकांना लष्करात भरती न करण्याचा कायदा पूर्वी ब्रिटनमध्येही होता. हा कायदा समलिंगी लोकांवर अन्याय करणारा आहे, हे जाणून २००० साली, ब्रिटनमध्ये तो बदलण्यात आला. आता ब्रिटनमध्ये समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती होता येतं. [43] प्रत्येकाची लैंगिक आवड, आकर्षण व प्रेम व्यक्त करायची पध्दत वेगळी असते. सगळ्यांनी सगळ्या प्रकारची नाती, लैंगिक सुखाच्या पद्धती अनुभवल्या पाहिजेत किंवा त्यांना त्या आवडल्या पाहिजेत असा अजिबात हट्ट नाही. पण जर काही जोडीदारांना समलिंगी संबंध आवडत असतील (किंवा काही भिन्नलिंगी जोडीदारांना मुखमैथुन, गुदमैथुन आवडत असेल) तर ती त्यांची खाजगी बाब आहे असा विचार कायद्याने व समाजाने करावा. , o O इंद्रधनु ... ४६ कायद्याचा दृष्टिकोन - समलिंगी विवाह भारतात विवाहाचा अर्थ दोन भिन्नलिंगाच्या व्यक्तींचं धर्माने, समाजाने व कायद्याने मानलेलं लैंगिक नातं. बहुतेकांच्या मते विवाह धर्माशी निगडित आहे. धार्मिक रीती- रिवाज पूर्ण झाल्यावरच पुरुष व स्त्रीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणं अपेक्षित असतं. देव-देवतांचा आशीर्वाद मिळून, संस्कृतिक-धार्मिक क्रिया यथासांग पार पाडून मगच लग्न लागलं असं धरलं जातं. याच्या मागे देवाचा आशीर्वाद घेतला नाही तर पुढे या संसारावर संकटं येतील ही भीती असते. कोणताच धर्म समलिंगी जीवनशैलीला मान्यता देत नसल्यामुळे समलिंगी जोडप्याला धार्मिकदृष्ट्या मान्यता देणं चूक आहे असं अनेकांचं मत असतं. तरी काही समलिंगी जोडपी त्यांच्या समाधानासाठी विवाहाचे धार्मिक विधी करतात. शहरात जरी भिन्नलिंगी जोडपी लग्न न करता एकत्र राहताना दिसली तरी अजूनही बहुतांशी भागात याला समाजमान्यता नाही. त्या जोडप्याच्या देखत किंवा मागे अनेक वेळा त्यांच्याबद्दल कुजबुज होते. अशी नाती अनैतिक समजली जातात (त्याच्या मागे आमचा (समाजाचा) आशीर्वाद न घेता ही जोडपी एकत्र राहतात; आपल्या धर्माचा, संस्कृतीचा ही जोडपी अनादर करतात ही भावना असते). समाजात अनेकांना समलिंगी जीवनशैली मान्य नसल्यामुळे समलिंगी जोडप्यांनाही अशाच प्रकारच्या सामाजिक दृष्टिकोनाला सामोरं जावं लागेल. विवाह टिकावा, सुदृढ रहावा यासाठी कायद्याच्या अनेक तरतुदी आहेत, अधिकार आहेत (उदा. वारसा हक्क, विमा इ.). हे कोणतेच अधिकार कायद्याने मान्यता नसलेल्या जोडप्याला (मग ते नातं भिन्नलिंगी असो वा समलिंगी असो) मिळत नाहीत. भारतीय दंडविधान संहितेचं कलम ३७७ कायदा समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवत असल्यामुळे हा कायदा समलिंगी विवाहाचा अधिकार मिळवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. या कायद्यामध्ये जोवर बदल होत नाही (समलिंगी संभोगाला गुन्ह्याच्या यादीतून काढलं जात नाही) तोवर समलिंगी विवाहासाठी झटता येत नाही. धार्मिकदृष्ट्या अशा लग्नांना जरी मान्यता मिळाली नाही तरी 'सिव्हिल मॅरेज'ची व्यवस्था सरकारला नक्कीच करता येऊ शकेल. सध्या या नात्याला कायद्याने मान्यता नसल्यामुळे समलिंगी जोडपी अनेक अधिकारांपासून वंचित राहिली आहेत. समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' शब्द लागू होत नाही. उदा. द पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, १९७२. या अॅक्टमध्ये ‘कुटुंब'च्या व्याख्येत समलिंगी जोडीदार बसत नाही. या अॅक्टमधील कामगाराच्या 'कुटुंब' याची व्याख्या खाली दिली आहे- [44]

इंद्रधनु ... ४७ पुरुष कामगारासाठी- तो स्वत:, त्याची बायको, त्याची मुलं लग्न झालं असो/ नसो, त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे पालक (व अवलंबून असलेले त्याच्या बायकोचे पालक, विधवा) व त्याच्या वारलेल्या मुलाची मुलं (जर असतील तर). स्त्रीकामगारासाठी- ती स्वतः, तिचा नवरा, तिची मुलं लग्न झालं असो/नसो, तिच्यावर अवलंबून असलेले तिचे पालक, व तिच्यावर अवलंबून असलेले तिच्या नवऱ्याचे पालक आणि तिच्या वारलेल्या मुलाची विधवा आणि त्या विधवेची मुलं. समलिंगी जोडप्यातला एक जण दुसऱ्यावर अवलंबून आहे (डिपेंडंट) असं दाखवता येत नाही. उदा. द प्रॉव्हिडंट फंड अॅक्ट, १९२५. या अॅक्टमध्ये अवलंबून असलेली व्यक्तीच्या (डिपेंडंट) व्याख्येत समलिंगी जोडीदार बसत नाही. अवलंबन (डिपेंडंट) ची व्याख्या - [45] प्रॉव्हिडंट फंडाच्या योजनेत सहभागी असलेल्या व्यक्तीचे खालील नातेवाईक अवलंबनच्या व्याख्येत बसतात - बायको, नवरा, पालक, मुल, धाकटा भाऊ, लग्न न झालेली बहीण, वारलेल्या मुलाची बायको व तिचं मूल आणि ज्या ठिकाणी कोणताही पालक जिवंत नाही त्या ठिकाणी वडिलांच्या बाजूचे आजी/आजोबा. या वरील गोष्टींमुळे लग्न झालेल्या भिन्नलिंगी जोडप्यांना ग्रॅच्युइटी, पी.पी.एफ., जीवनविमा, वैद्यकीय विमा इत्यादी सुविधांचा जो आधार असतो तो समलिंगी जोडप्यांना मिळत नाही. नामांकन नामांकन याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मरणोत्तर त्याची संपत्ती (किंवा इतर गोष्टी) ज्याचं नामांकन आहे त्यानं जो कायदेशीर वारसदार आहे त्याच्यापर्यंत ही अमानत पोहोचवण्याचं कार्य बजावणं. Nominee acts as an agent for the legal heirs of the deceased person. नामांकन करणं म्हणजे वारसा हक्क नाही. म्हणून समलिंगी जोडीदाराचं नामांकनात नाव घालणं म्हणजे त्याला वारसा हक्क देणं नाही. डिप्लोमॅट प्रत्येक देशात समलिंगी नात्यांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळेही काही प्रश्न उपस्थित होतात. उदा. काही देशात समलिंगी जोडप्यांना लग्न करता येतं. अशा देशाचा डिप्लोमॅट समलिंगी असेल आणि त्याला भारतात पोस्टिंग मिळालं तर त्याच्या जोडीदाराला भारतात डिप्लोमॅटिक स्टेटस मिळत नाही, कारण त्यांच्या नात्याला या देशात मान्यता नाही. [46] , इंद्रधनु ... ४८ मूल दत्तक घेणं < अनेक समलिंगी व्यक्तींना आपला संसार असावा, आपल्याला मुलं असावीत असं वाटतं. समलिंगी व्यक्तीला किंवा समलिंगी जोडप्याला मूल हवं असेल तर दत्तक घेण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे का? समलिंगी विवाहाला मान्यता नसल्यामुळे समलिंगी जोडप्याला मूल दत्तक घेता येत नाही. 'सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी' मार्गदर्शिका सांगते की ज्या बाहेरच्या देशात समलिंगी विवाहाला मान्यता आहे, तिथल्या समलिंगी जोडप्यांनाही भारतातील मुलं दत्तक देऊ नयेत. [47] भारतातील एकट्या पुरुषाला किंवा एकट्या स्त्रीला मूल दत्तक घेता येऊ शकतं पण अनेकांना असं वाटतं की, समलिंगी व्यक्ती (किंवा समलिंगी जोडपं) मुलांना वाढवायची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकणार नाहीत; समलिंगी पालक असलेल्या वातावरणात मुलाची वाढ चांगली होणार नाही. म्हणून बहुतेक दत्तक देणाऱ्या संस्था समलिंगी व्यक्तींना मूल दत्तक देत नाहीत. मला एका संस्थेत सांगितलं गेलं, “आपण मुलांच्या हिताचं काय आहे हे बघितलं पाहिजे. त्यांना जर समलिंगी व्यक्तीनी दत्तक घेतलं तर त्यांची सुदृढ वाढ होणार नाही. म्हणून आम्ही समलिंगी व्यक्तींना मूल दत्तक देत नाही." या उलट मत 'अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'चं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'पालकांच्या लैंगिक कलावर त्यांच्या पालकत्वाची कुशलता अवलंबून आहे, असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. गे किंवा लेस्बियन पालक, भिन्नलिंगी पालकांइतकेच आपल्या मुलांना पोषक व सुदृढ वातावरण पुरवू शकतात. संशोधनात दिसून आलं आहे की, मुलांच्या वाढीचा, मानसिक आरोग्याचा व पालकांच्या लैंगिक कलाचा काहीही संबंध नाही व समलिंगी पालकांची मुलं भिन्नलिंगी पालकांच्या मुलांइतकीच सुदृढ होऊ शकतात.' [48] समाजातले समलिंगी लोकांबद्दलचे पूर्वग्रह जोवर दूर होत नाहीत तोवर या विषयाकडं उदारमतवादी दृष्टिकोनातून बघितलं जाणार नाही. समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत. जबाबदारी मानणाऱ्यातील आहेत, बेजबाबदार वर्तन करणारेही आहेत. दत्तक देताना त्या व्यक्ती/जोडप्याची संपूर्ण माहिती मिळवणं, त्यांची आर्थिक, धार्मिक, लैंगिक, सामाजिक, कायद्याची, वैद्यकीय पार्श्वभूमी समजावून घेणं हे दत्तक देणाऱ्या संस्थांचं काम आहे. पण केवळ ते समलिंगी आहेत म्हणून त्यांना मूल दत्तक द्यायचं नाही हे धोरण त्यांच्यावर व त्या अनाथ मुलावर अन्याय करणारं आहे. काही समलिंगी व्यक्ती विचार करतात की, आपली लैंगिकता लपवून आपण मूल दत्तक घ्यावं. यामागे आपलं मूल असावं ही तळमळीची इच्छा असली तरी या । . ! 1 इंद्रधनु ... ४९ मार्गाचे काही धोके संभवतात. आपण खोटं बोलून आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा पैलू लपवून मूल दत्तक घेत आहोत. त्यामुळं एक गोष्ट लपवण्यासाठी कदाचित आयुष्यभर खोटेपणा करावा लागेल. यामुळे काही जण ब्लॅकमेलला बळी पडू शकतात. याला पर्याय म्हणून काही जण ‘फॉस्टर' पालक बनतात. या ठिकाणी डॉ. राज राव (पुणे विद्यापीठ इंग्रजी शाखा) यांचा अनुभव मांडण्याजोगा आहे. ते म्हणाले- “मी एका मुलाचा 'फॉस्टर' पालक आहे. त्याच्या शिक्षणाची आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतली आहे. हे मूल कायद्यातून दत्तक घेतलेलं नाही. आपल्याकडे खूप पैसे असले, खूप शिकलेलो असलो, आपला स्वभाव, वागणूक चांगली असली, तरी आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही. भिन्नलिंगी लोकांपेक्षा आपण मुलांना चांगलं वाढवू. आपल्यासाठी मुलं जास्त मोलाची आहेत कारण आपल्याला समलिंगी नात्यातून मुलं होणार नाहीत याची आपल्याला जाणीव आहे. या सगळ्यांचा विचार समाजानं करायला पाहिजे पण तसं दुर्देवानं होत नाही.' " 'त्रिकोण'चे संस्थापक अशोक व अरविंद विवाहबद्ध होताना O O इंद्रधनु ... ५० वैद्यकीय दृष्टिकोन - प्राथमिक माहिती - लैंगिक कल (Sexual Orientation) वयात येताना मुला/मुलींच्यात शारीरिक आणि मानसिकदृष्टया विविध बदल व्हायला लागतात. वर्गातील किंवा शेजारी राहणारी एखादी व्यक्ती खूप आवडू लागते. त्या व्यक्तीकडे सारखं लक्ष जातं, तिच्याबद्दल आपुलकी वाटते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीशी शरीरसंबंध करायची इच्छा उत्पन्न होते. वयात येताना अनेक मुलांना भावनिक व लैंगिक आकर्षण फक्त मुलींबद्दल वाटतं. तसंच अनेक मुलींना भावनिक व लैंगिक आकर्षण फक्त मुलांबद्दल वाटतं. अशा विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षणाला भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. अशा भावनिक व लैंगिक आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल म्हणतात, काही मुलां/मुलींना फक्त त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. मुलांना फक्त मुलांबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. तसंच मुलींना फक्त मुलींबद्दल भावनिक व लैंगिक आकर्षण वाटतं. अशा लैंगिक आकर्षणाला समलिंगी लैंगिक कल म्हणतात. एक सैध्दांतिक शक्यता आहे की एखाद्या व्यक्तीला पुरुष व स्त्री या दोघांबद्दलही अजिबात भावनिक व लैंगिक आकर्षण वाटत नाही. समलैंगिकता या शब्दाबद्दल थोडंसं डॉ. भूषण शुक्ल म्हणतात, “समलिंगी हा शब्द उच्चारला की लोकांसमोर फक्त शरीरिक पैलू येतो. भिन्नलिंगी व्यक्तींसारखंच समलिंगी व्यक्ती प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं परिपूर्ण नातं अनुभवते हे आपण जाणतो. म्हणून समलिंगी या शब्दाला पर्यायी शब्द शोधला पाहिजे. मला वाटतं समलिंगीच्या जागी 'समसुखी' हा शब्द वापरावा म्हणजे लोकांचा जो संभोगावरचा केंद्रबिंदू आहे तो कमी होईल आणि लोकांना या नात्याच्या भावनिक पैलूंचीही जाणीव होईल." डॉक्टरांची सूचना महत्त्वाची आहे. यावर अनेक लोकांशी संभाषण करून मी असं ठरवलं की समलिंगी हा शब्द अनेकांना परिचित आहे, म्हणून या पुस्तकात तोच शब्द वापरावा. शहरातील समलिंगी 'गे' हा शब्द वापरतात पण हा शब्द भारतात फारसा प्रचलित नाही. तोच शब्द हळू-हळू रुळेल अशी आशा धरू. इंद्रधनु ... ५१ लैंगिक कल आणि लैंगिक वर्तन (Sexual attraction and Sexual behavior) अनेकांना वाटतं की ज्या व्यक्तीचा जो लैंगिक कल आहे त्या प्रमाणेच ती व्यक्ती लैंगिक वर्तन करते. लैंगिक कल व लैंगिक वर्तन या दोन गोष्टी वेगळया असू शकतात. त्यांचं स्पष्टीकरण खाली दिलं आहे. उदा. १ अजयला भावनिक/लैंगिकदृष्ट्या फक्त पुरुषंच आवडतात. याचा अर्थ त्याचा लैंगिक कल समलिंगी आहे. अजय फक्त पुरुषांबरोबरच संभोग करतो. याचा अर्थ त्याचं लैंगिक वर्तनही समलिंगी आहे. उदा. २. सविताला नववीपासून मुलांबद्दलच भावनिक/लैंगिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ तिचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. आता ती कॉलेजमध्ये आहे. तिच्या वर्गातल्या एका मुलावर तिचं प्रेम आहे. त्याच्याबरोबर तिला शरीरसुख घ्यायचं आहे पण तिने अजून तरी त्याच्याबरोबर शरीरसुख घेतलेलं नाही म्हणजे तिने अजून तरी भिन्नलिंगी लैंगिक वर्तन केलेलं नाही. उदा. ३. रमेशचा लैंगिक कल समलिंगी आहे. त्याने अजून एकाही पुरुषाबरोबर संभोग केलेला नाही. समाजाच्या दबावामुळे त्याने एका स्त्रीशी लग्न केलं व तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा अर्थ रमेशचा लैंगिक कल हा समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन हे भिन्नलिंगी आहे. प्रत्येक व्यक्तीचा कोणता तरी लैंगिक कल असतोच पण त्याचा अर्थ त्या व्यक्तीनी त्या कलाचं लैंगिक वर्तन केलेलं असेलच असं नाही. म्हणूनच समलिंगी लैंगिक आकर्षण असणं म्हणजे समलिंगी संभोग (वर्तन) करणं नाही. आपण वर उदाहरण ३ मध्ये पाहिलं की, रमेश समलिंगी असून भिन्नलिंगी लैंगिक वर्तन करतो त्याचप्रमाणे काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या व्यक्ती समलिंगी लैंगिक वर्तन (संभोग) करणाऱ्या असतात. अनेक पुरुष जे समलिंगी नाहीत किंवा स्वत:ला समलिंगी मानत नाहीत ते सुद्धा समलिंगी संभोग करतात. जर त्यांनी असुरक्षित (कंडोम न वापरता) संभोग केला तर त्यांना एखाद्या एचआयव्हीबाधित व्यक्तीपासून एचआयव्हीची लागण होऊ शकते. गुप्तरोग, एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून या सगळ्यांना सुरक्षित संभोगाची माहिती देणं आवश्यक झालं. म्हणजे सुरक्षित संभोगाची माहिती फक्त समलिंगी व्यक्तींनाच देणं पुरेसं नव्हतं तर समलिंगी संभोग करणाऱ्या सगळ्या पुरुषांना देणं गरजेचं होतं. या उद्देशाने एमएसएम (MSM-Men who have Sex with Men) इंद्रधनु ५२ ... असा शब्द वापरात आला. एमएसएम म्हणजे पुरुषांबरोबर संभोग करणाऱ्या पुरुषांचा समूह. या समूहाचे अनेक प्रवर्ग आहेत- समलिंगी, उभयलिंगी, परिस्थितीजन्य समलिंगी लैंगिक वर्तन करणारे, ट्रान्सजेंडर, काही इंटरसेक्स व्यक्ती व प्रायोगिकदृष्ट्या लैंगिक संबंध करणारे. एमएसएम प्रवर्ग १. समलिंगी (Homosexual) अशा व्यक्तींचं भावनिक व शारीरिक आकर्षण त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल असतं. हे आकर्षण कालांतरानी बदलत नाही (भिन्नलिंगी किंवा उभयलिंगी बनत नाही), बदलता येत नाही. समलिंगी पुरुषांची शारीरिक रचना इतर पुरुषांसारखीच असते. (तसंच समलिंगी स्त्रियांची शारीरिक रचना इतर स्त्रियांसारखीच असते). बहुतेक समलिंगी पुरुष समाजाला घाबरून आपली लैंगिकता लपवून ठेवतात. यातले काही जण लाजेपोटी पुरुषाबरोबर कधीही संभोग करत नाहीत. काही जण फक्त पुरुषांशीच नाती जोडतात. त्यांचा लैंगिक कल समलिंगी असतो व लैंगिक वर्तनही समलिंगीच असतं. - काही जण स्त्रीशी लग्न करतात व फक्त त्या स्त्रीबरोबर संभोग करतात. अशा व्यक्तींचा लैंगिक कल समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन (नाइलाजाने) भिन्नलिंगी आहे. - काही जण स्त्रीशी लग्न करतात व बाहेर पुरषांबरोबर लैंगिक संबंध ठेवतात. अशांचा लैंगिक कल समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन उभयलिंगी आहे (घरी बायकोबरोबर व बाहेर पुरुषांबरोबर संभोग होतो). - समलिंगी पुरुष एखाद्या जोडीदराबरोबर इन्सर्टिव्ह भूमिका घेऊ शकेल किंवा रिसेप्टिव्ह भूमिका घेऊ शकेल किंवा व्हरसटाइल भूमिका घेऊ शकेल. कोणती भूमिका घ्यायची हे त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या त्यावेळच्या लैंगिक इच्छेवर व स्वप्नरंजनावर अवलंबुन असतं. २. उभयलिंगी (Bisexual) अशा व्यक्तींचं भावनिक व शारीरिक आकर्षण पुरुष व स्त्रिया या दोन्हीबाबत असतं. उभयलिंगी पुरुषांची शारीरिक रचना इतर पुरुषांसारखीच असते. (तसंच उभयलिंगी स्त्रियांची शारीरिक रचना इतर स्त्रियांसारखीच असते). - बहुतेकजण आपण उभयलिंगी आहोत हे सांगत नाहीत व लग्न करतात कारण त्यांना विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींबद्दल कमी/जास्त प्रमाणात आकर्षण असतं. इंद्रधनु ५३ काहींची धारणा आहे की, उभयलिंगी व्यक्ती सगळ्या समलिंगी लैंगिक कलाच्या असतात पण उभयलिंगी लैंगिक कलाच्या आहोत असं ढोंग करतात. काही समलिंगी व्यक्ती आपण उभयलिंगी आहोत असं ढोंग करत असल्या तरी सगळ्या उभयलिंगी व्यक्तींबद्दल असं विधान करणं बरोबर नाही. अनेक जण उभयलिंगी असतात. त्यात कोणतंही ढोंग किंवा दुटप्पीपणा नसतो. ३. परिस्थितीजन्य समलिंगी लैंगिक वर्तन (Homosexual Behavior due to Circumstance) काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषांना काही विशिष्ट परिस्थितीत स्त्री जोडीदार मिळायला अडचण येते. अशा वेळी हे पुरुष गरज भागवण्यासाठी दुसऱ्या पुरुषाबरोबर संभोग करू शकतात. उदा. १. रवीचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. त्याला एका गुन्ह्यासाठी पाच वर्ष कैदेची शिक्षा झाली आहे. तुरुंगात असताना त्याला त्याच्या शारीरिक इच्छा पुऱ्या करण्यासाठी स्त्री मिळणं शक्य नव्हतं. अशा वेळी कैदेतच त्याने गरज भागविण्यासाठी तुरुंगातील दुसऱ्या पुरुषाबरोबर संभोग केला. या उदाहरणात रवीचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे पण कैदेत असताना लैंगिक वर्तन समलिंगी आहे. उदा. २. सचिनचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. त्याचं लग्न झालं आहे. सचिनला मुखमैथुन करून घ्यायला खूप आवडतं. त्याच्या बायकोला मुखमैथुन करायला अजिबात आवडत नाही. म्हणून तो त्याच्या माहितीच्या एका पुरुषाकडून मुखमैथुन करून घेतो. या उदाहरणात सचिनचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे पण लैंगिक वर्तन उभयलिंगी आहे. ४. काही इंटरसेक्स व्यक्ती काही इंटरसेक्स व्यक्ती स्वत:ला पुरुष मानतात व यातल्या काही जणांना पुरुषांबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण असतं. ५. ट्रान्सजेंडर जे पुरुष स्वत:ला स्त्री समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात ते एमएसएम समूहात येतात. (स्वत:ला स्त्री मानत असल्यामुळे या गटातील काही जण स्वत:ला एमएसएम समूहातले मानत नाहीत). (समलैंगिकता व ट्रान्सजेंडर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समलैंगिकता हा लैंगिक कलाचा एक प्रकार आहे. ट्रान्सजेंडर हा लिंगभावाचा प्रकार आहे.) इंद्रधनु ... ५४ ६. प्रायोगिक लैंगिक संबंध (Experimental Sex) वयात आल्यावर जेव्हा शरीरसुख घ्यायची इच्छा उत्पन्न होते, तेव्हा प्रायोगिक तत्त्वावर समलिंगी संभोग होऊ शकतो. उदा. आपल्या मित्राबरोबर, बोर्डिंग स्कूलमधल्या रूममेट बरोबर इ. ही एक तात्पुरती अवस्था असू शकते. याचा अर्थ असा की, या वयात समलिंगी संभोग झाला म्हणजे ती व्यक्ती समलिंगी लैंगिक कलाची आहे असा तर्क काढणं चुकीचं होईल. पहिला लैंगिक संबंध एखाद्या व्यक्तीचा पहिला लैंगिक अनुभव समलिंगी आहे का भिन्नलिंगी आहे या वरून त्या व्यक्तीचा लैंगिक कल ठरवता येत नाही. काही पुरुषांचा पहिला लैंगिक अनुभव भिन्नलिंगी असतो पण नंतर हळू हळू त्यांना पुरुष आवडायला लागतात. एक जण म्हणाला, “कॉलेजमध्ये असल्यापासून मला अनेक गर्लफ्रेंड्स आहेत. अनेकींबरोबर मी झोपलो आहे. पण हळूहळू मला पुरुषांबद्दल आकर्षण वाटायला लागलं, कसं ते ठाऊक नाही. मग मी एका बरोबर सेक्स केला. आता मला पुरुषंच आवडतात. पुरुषांपासून जे सुख मिळतं ते स्त्रीपासून मला मिळत नाही.' तर काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषांचा पहिला लैंगिक अनुभव समलिंगी असतो, पण नंतर त्यांना समलिंगी आकर्षण अजिबात राहत नाही. “मी मुलांच्या होस्टेलमध्ये वाढलो. रूममेटबरोबर अनेक वेळा सेक्स केला. तेव्हा तो आवडलाही पण एका स्टेजनंतर मला स्त्रियाच आवडायला लागल्या. आता माझं लग्न झालेलं आहे. मला पुरुषांबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही." डॉ. आल्फ्रेड किनसेंची प्रमाणपट्टी (Dr. Kinsey Scale) १९४८ मध्ये अमेरिकेत डॉ. आल्फ्रेड किनसे यांनी पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. अमेरिकेतल्या किती पुरुषांनी भिन्नलिंगी, उभयलिंगी, समलिंगी संबंध ठेवले आहेत, किती जणांनी असे संबंध ठेवले नाहीत पण त्यांना उभयलिंगी, समलिंगी शारीरिक आकर्षण वाटलं अशा अनेक गोष्टींची माहिती सर्वेक्षणातून गोळा केली. त्यांनी याच धर्तीवर नंतर स्त्रियांवरही एक सर्वेक्षण केलं. या अभ्यासासाठी त्यांनी एक प्रमाणपट्टी तयार केली. त्याला डॉ. किनसे प्रमाणपट्टी म्हणतात. या प्रमाणपट्टीत ते ६ असे सात भाग आहेत. ० म्हणजे पूर्णपणे भिन्नलिंगी, ६ म्हणजे पूर्णपणे समलिंगी आणि मधले आकडे म्हणजे उभयलिंगी. त्यांनी ज्या ज्या व्यक्तींची मुलाखत घेतली त्या व्यक्ती या प्रमाणपट्टीवर कुठे बसतात याचा अंदाज घेतला. . इंद्रधनु ... ५५ या सर्वेक्षणामुळे पहिल्यांदा लोकांसमोर समलैंगिकता आणि उभयलैंगिकतेबद्दल आकडेवारी उपलब्ध झाली. समाजाच्या कल्पनेपेक्षा जास्त प्रमाणात समलिंगी, उभयलिंगी संबंध होतात हे वाचून अमेरिकन लोकांच्या लैंगिकतेच्या कल्पनांना मोठा धक्का बसला. वास्तविक पाहता आश्चर्य वाटायचं काही कारण नव्हतं, कारण जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्ती समलिंगी किंवा उभयलिंगी होत्या. उदा. सोफोक्लीस, अॅलेक्ॉन्डर द ग्रेट, रिचर्ड द लायन हाटेंड, किंग जेम्स - १, फ्रेड्रिक द ग्रेट, वॉल्ट व्हिटमन, पीटर इलीच चायकोव्हस्की, लिओनारडो दा विंसी, ऑस्कर वाईल्ड, आंद्रे गीड, अॅलन ट्यूरिंग, ख्रिस्तोफर आयशरवुड, टेनिसी व्हिल्यम्स इत्यादी. पण हा विषय लोकांना इतका अस्वस्थ करणारा होता की लोकांनी शतकानुशतके प्रयत्नपूर्वक हा विषय नजरेआड केला होता. डॉ. किनसे यांच्या सर्वेक्षणांनी लोकांना परत वास्तव दाखवून दिलं. या सर्वेक्षणाचा चिकित्सक अभ्यास करताना उणिवा दिसून आल्या. यानंतर अनेकांनी अशा त-हेची सर्वेक्षणं केली. वेगवेगळे आकडे समोर आले. भारतातही लैंगिकतेवर काही सर्वेक्षणं झाली. या सर्वेक्षणातून समलिंगी लैंगिक कल, समलिंगी लैंगिक वर्तन, समलिंगी समाजाच्या समस्यांची माहिती मिळाली. [49] आपल्या लैंगिक इच्छा समाजच्या नीतिमत्तेत बसत नसल्या तर अशा गोष्टी भीतीपोटी, लाजेपोटी बोलल्या जात नाहीत. म्हणून बहुतेकजण लैंगिक कल, लैंगिक इच्छा, वर्तनाबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. सर्वेक्षण पूर्वग्रहदूषित असेल तर आकडे, निष्कर्ष चुकीचे निघू शकतात. या सगळ्या कारणांमुळे समलिंगी लैंगिक कल, वर्तनाची नक्की टक्केवारी सांगणं अवघड आहे. अंदाज असा लावला जातो की, जगात ३% पुरुष पूर्णपणे समलिंगी कलाचे असतात तर १% स्त्रिया पूर्णपणे समलिंगी कलाच्या असतात. [501 विशेष उल्लेख : लहान मुलांचं लैंगिक शोषण अनेक वेळा काही लहान मुलींचं किंवा लहान मुलांचं एखादी वयाने मोठी असलेली व्यक्ती (बऱ्याच वेळा दिसतं की, ही व्यक्ती ओळखीची असते) लैंगिक शोषण करते. लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार आहेत. लैंगिक स्पर्श, लैंगिक अवयवांचं प्रदर्शन, मैथुन इ. अशा लैंगिक शोषित मुला/मुलींना त्या वयात आपल्याबरोबर काय केलं जातंय याची समज नसते (काहींना तो शरीरस्पर्श आवडतो). हळूहळू जस जशी मुलं/मुली मोठी होतात तस तसं त्यांना या शोषणाची जाणीव व्हायला लागते. याचा त्यांना खूप मानसिक क्लेश होतो. अनेकांच्या भावी आयुष्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. . इंद्रधनु ५६ ... al लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण कोणत्या कारणांनी होतं? १) काहीजण लहान मुला/मुलींकडे 'सेक्स ऑबजेक्ट' म्हणून बघतात. लैंगिक सुख मिळवण्याची एक वस्तू म्हणून त्यांचा वापर करतात. लहान मुला/मुलींना आमिष दाखवून, गोड बोलून किंवा भीती दाखवून त्यांचा लैंगिक उपभोग घेतात. २) काही जणांना लहान मुला/मुलींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. अशा आकर्षणाला 'पेडोफिलिया' म्हणतात, व अशा व्यक्तींना 'पेडोफाइल्स' म्हणतात. पेडोफिलिया आणि समलैंगिकता यांचा काहीही संबंध नाही. समलिंगी व्यक्तींना लहान मुलांबद्दल अजिबात लैंगिक आकर्षण नसतं. अल्पवयीन मुलां/मुलींचं लैंगिक शोषण करणं हा कायद्याने गुन्हा आहे व तो असलाच पाहिजे. (त्या मुलांना/मुलींना जरी त्यावेळी हे लैंगिक संबंध आवडत असले तरी त्याचा अर्थ समजण्याची, त्याच्यासाठी अनुमती देण्याची प्रगल्भता त्यांच्यात नसते; त्याचबरोबर लहान वयात त्यांच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसते. म्हणून या संबंधाना त्यांची संमती आहे किंवा नाही याला काहीही अर्थ उरत नाही.) O इंद्रधनु . ५७ ... वैद्यकीय दृष्टिकोन - आजार ते वेगळेपण प्राचीन काळात समलिंगी वर्तन पाप समजलं जात होतं. त्यावरून समलिंगी वर्तन कायद्याने गुन्हा झाला. एकोणीसाव्या शतकापासून या विषयावर वैद्यकीय विचार व्हायला लागला. सुरुवातीला समलैंगिकता विकृती आहे असं सर्व डॉक्टरांचं मत होतं. ही मानसिकता बदलली पाहिजे असंच त्यांचं मत होतं. समलिंगी लोकांचा कल बदलण्यासाठी शस्त्रक्रिया, औषधं, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, काऊन्सेलिंगचा वापर झाला. या प्रयत्नांना यश आलं नाही. कालांतराने मानसोपचारतज्ज्ञ मानू लागले की, लैंगिक कल बदलता येत नाही. एका बाजूने हे प्रयोग चालू असताना दुसरीकडे समलिंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अधिकारांची चळवळ सुरू केली. समलैंगिकता हे वेगळेपण आहे, आजार किंवा विकृती नाही, म्हणून आजारांच्या यादीतून समलिंगी कलाला वगळावं अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. बराच काळ लढा दिल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. आज अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिएशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्युएचओ) समलिंगी असणं आजारपण मानत नाहीत. आकृती १ : वैद्यकीय प्रवास समलिंगी वर्तन हे पाप समजलं जात होतं समलिंगी वर्तन गुन्हा समजला जात होता/(काही देशात अजून समजला जातो) समलैंगिकता विकृती आहे असं मानलं गेलं (१८ वं शतक) समलैंगिकतेवर अभ्यास सुरू झाला समलैंगिकतेला आजार मानू नये समलिंगी लोकांचा लैंगिक कल बदलण्याचे प्रयत्न म्हणून समलिंगी कार्यकर्त्यांची चळवळ समलिंगी व भिन्नलिंगी व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास स्टोनवॉलची दंगल : १९६९ समलैंगिकता हा आजार नाही अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिशन : १९७३ समलैंगिकता हा आजार नाही अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिशन : १९७५ समलैंगिकता हा आजार नाही (डब्लू.एच.ओ.) : १९८१ समलैंगिकतेचं विभाजन इगोसिंटोनिक -इगोडिस्टोनिक (ICDIO) (F66.1)) इंद्रधनु ५८ ... एकोणीसावं शतक एकोणीसाव्या शतकात काही मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेच्या केसेस प्रसिद्ध करू लागले. समलिंगी आकर्षणामागच्या जडणघडणीच्या कारणांचा विचार करू लागले (त्याकाळात लैंगिक कल व लिंगभाव (Gender Identity) अशी दोन विभाजनं झाली नव्हती). या विषयावर नवा प्रकाशझोत टाकणारे कार्ल हेन्रीच उलरीच (१८२५- १८९५) हे जर्मन ज्युरिस्ट होते. ते स्वतः समलिंगी होते. समलिंगी होण्याला कारणीभूत मूल गर्भात असताना वेगळी जडणघडण होत असेल अशी त्यांची धारणा होती. अशा लोकांना समाजात मान्यता मिळाली पाहिजे आणि त्यांची लैंगिकता समाजाने स्वीकारली पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. ऑस्ट्रियाचे डॉ. रिचर्ड फ्रायहर फॉन क्रॅफ्ट एबिंग (१८४० - १९०२) यांनी विविध लैंगिक पैलूंचा अभ्यास करून 'सायकोपॅथिया सेक्शुअॅलिस' हा ग्रंथ लिहिला. समलिंगी आकर्षण ही विकृती आहे असं त्यांचं मत होतं. [51] ब्रिटिश डॉ. हॅवलॉक एलिस (१८५९ - १९३९) यांनी लैंगिकतेवर अभ्यास करून ‘स्टडीज् इन द सायकॉलॉजी ऑफ सेक्स' चे खंड लिहिले. त्यातला दुसरा खंड हा समलैंगिकतेवर आधारित आहे. त्यांचा समलैंगितेकडे बघण्याचा दृष्टिकोन काही अंशी सहिष्णु होता, अशा व्यक्ती विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करू शकतात व त्यांना तसं करण्यास उत्तेजन दिलं पाहिजे, समलिंगी संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा बदलला पाहिजे अशा मताचे ते होते. [52] डॉ. मॅग्लस हर्चफेल्ड ( १८६८-१९३५) यांनी १८९७ साली बर्लिनमध्ये जगातील पहिली समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Wissenchaftlich- humanitares' (Scientific-humanitarian Committee) स्थापन केली. १९१९ साली त्यांनी जगातील पहिली लैंगिकतेवर संशोधन करणारी संस्था 'Institute fur Sexualwissenschaft' स्थापन केली. ते स्वतः समलिंगी होते. समलैंगिकता हा आजार आहे अशी त्यांची धारणा होती पण समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं (जर्मन दंडविधान संहितेचं) १७५ कलम बदलावं यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. पण त्यांना यश आलं नाही. या काळात ॲडॉल्फ हिटलरची सत्ता वाढत होती. समलिंगी लोकांची कीड आपल्या सर्वश्रेष्ठ आर्यन समाजास घातक आहे, ती लवकरात लवकर काढून टाकली पाहिजे ही धारणा नाझी जनतेत वाढायला लागली होती. समलिंगी लोकांवरचे अत्याचार वाढायला लागले. १९३३ साली 'Institute for Sexual wissenschaft' संस्था जाळण्यात आली. १९३५ साली नीसमध्ये डॉ. इंद्रधनु... ५९ मॅग्नस हर्चफेल्ड यांचं निधन झालं. १९३३ ते १९४५ च्या दरम्यान जर्मनीमधल्या हजारो समलिंगी पुरुषांना छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. त्यात अनेकजण दगावले. या छळछावण्यांत समलिंगी कैद्यांना ओळखण्यासाठी एक गुलाबी त्रिकोण त्यांच्या कपड्यावर लावलेला असायचा. म्हणून कालांतराने गुलाबी त्रिकोण, समलिंगी अधिकारांच्या चळवळीत समलिंगी अभिमानाची निशाणी बनला. विसावं शतक समलिंगी आकर्षण निर्माण होण्यामागच्या मानसिक कारणांचा शोध डॉ. सिग्मन्ड फ्रॉईड (१८५६ - १९३९) यांनी घेतला. त्यांनी समलिंगी बनण्यामागचे वेगवेगळे सिद्धांत मांडले. डॉ. फ्रॉईड यांच्या मनात समलैंगितेबद्दल थोडा तिढा असला तरी समलैंगिकता ही विकृती नाही व समलिंगी पुरुष, स्त्रिया त्यांच्या जीवनशैलीत राहून चांगल्या तऱ्हेने आयुष्य जगू शकतात, अशी त्यांची धारणा होती. जसजशी लोकांच्या ज्ञानात भर पडत गेली तसतसे त्यांचे विचार हळूहळू बदलू लागले. १९४८ साली गोर विडाल यांनी 'द सिटी ॲण्ड द पिलर' हे समलिंगी विषयावरचं पुस्तक लिहून अमेरिकेत खळबळ उडवली. याच साली डॉ. अल्फ्रेड किनसे यांनी समलिंगी संभोग हे लोकांना वाटतं तेवढं दुर्मीळ नाही हे आपल्या सर्वेक्षणातून दाखवून दिलं. १९२४ साली शिकागोमध्ये 'सोसायटी फॉर ह्युमन राइट्स' ची स्थापना हेन्री गर्बर यांनी केली. ही संस्था फार काळ टिकू शकली नाही. नंतर १९५० साली लॉस एंजलिसमध्ये समलिंगी पुरुषांसाठी 'मॅलॅचिन सोसायटी'ची स्थापना झाली. १९५५ साली सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये 'डॉटर ऑफ बिलीटीस' ही लेस्बियन अधिकारासाठी झटणारी संस्था स्थापन झाली. सुरुवातीला या संस्थासुद्धा समलैंगिकतेला आजार मानत होत्या. समलिंगी असल्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमी आहोत आणि आपण परिपूर्ण आयुष्य जगण्यास कमी पडतो ही त्यांची धारणा होती. आपल्याला कसं बदलता येईल असा विचार होत होता. तर काही समलिंगी कार्यकर्त्यांची भूमिका खूप वेगळी होती. त्यातला एक फ्रॅन्क कामेनी. कामेनीचं मत होतं- जसं आपल्याला लोक भिन्नलिंगी का होतात हे माहीत नाही तसंच काही लोक समलिंगी का होतात हे माहीत नाही, भिन्नलिंगी व्यक्तीला ती व्यक्ती भिन्नलिंगी का आहे? हा प्रश्न पडत नाही, अफ्रिकन माणसाला त्यांच्या कातड्याचा रंग काळा का आहे? हा प्रश्न भेडसावत नाही. त्यांनी स्वतःला स्वीकारलं आहे. त्यामुळे आपण समलिंगी का आहोत याच्यावर विचार करायचं काहीही कारण नाही. इंद्रधनु... ६० १९५० च्या उत्तरार्धात या चळवळीला एव्हलीन हुकर यांच्या संशोधनाचा फायदा झाला. सायकॉलॉजिस्ट एव्हलीन हुकरला तिच्या माहितीच्या एका समलिंगी जोडप्यानी विनंती केली की तिला त्यांच्या जीवनशैलीकडे बघून ते आजारी आहेत असं वाटत नसेल तर तिने या विषयावर संशोधन करावं व त्या अभ्यासाचे निष्कर्ष सगळ्यांसमोर मांडावे. या विनंती वरून तिने पुढाकार घेऊन काही भिन्नलिंगी आणि समलिंगी व्यक्तींच्या चाचण्या घेतल्या. या चाचण्यांतून भिन्नलिंगी व समलिंगी व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्यात काही वेगळेपण आढळून येतं का? हे शोधायचा प्रयत्न केला. त्या संशोधनातून तिने मानसशास्त्रज्ज्ञांना दाखवून दिलं की, त्यांच्या चाचण्या जर निकोप दृष्टीने वापरल्या तर समलिंगी व्यक्ती मानसिकदृष्टया आजारी आहे हे सिद्ध होत नाही [53]. या अहवालामुळे समलिंगी कार्यकर्त्यांना अजून बळ आलं. अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिओशनच्या संमेलनात निदर्शनं होऊ लागली. एका संमेलनात एक मानसोपचारतज्ज्ञ वेशभूषा बदलून आले व सगळ्यांसमोर म्हणाले की, ते समलिंगी आहेत, व त्यांना व त्यांच्या सारख्या अनेक मानसोपचारतज्ज्ञांना त्यांचा लैंगिक कल व समलिंगी नाती व्यावसायिक मान्यतेपायी लपवून ठेवावी लागत आहेत. स्टोनवॉलची दंगल १९६० च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये काही बार्समध्ये समलिंगी लोक जमा होत. या बार्सवर पोलिस धाड टाकत व समलिंगी लोकांना त्रास देत. २८ जून १९६९ मध्ये 'स्टोनवॉल इन' वर पोलिस धाड घालायला आले तेव्हा उत्स्फूर्तपणे समलिंगी लोकांनी विरोध केला. दंगल उसळली. याला स्टोनवॉलची दंगल म्हणतात. तेव्हापासून अमेरिकेत समलिंगी हक्कांसाठी चालविलेल्या चळवळीला खूप जोर आला. काही मानसोपचारतज्ज्ञ उघडपणे म्हणू लागले की, समलैंगिकता हा आजार नाही. तर काही जणांचं मत होतं की हा आजार आहे. या विषयावर कडाक्याचे वाद सुरू झाले व शेवटी १९७३ साली अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिओशनने समलैंगिकता आजाराच्या यादीतून काढून टाकली (Diagnostic & Statistics Manual III-R). अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनने १९७६ साली समलिंगी असणं हा आजार नाही हे घोषित केलं. त्यांचा या विषयावरचा ठराव संक्षिप्त स्वरूपात देत आहे [54] - 'निर्णयक्षमता, स्थिरवृत्ती, विश्वासार्हता किंवा सर्वसाधारण सामाजिक आणि धंदा-व्यवसायातली कार्यकुशलता या सायात समलिंगी प्रवृत्तीमुळे मुळात बाधा येत नाही. इंद्रधनु... ६१ अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशन असं आवाहन करीत आहे की, मानसोपचारतज्ज्ञांनी समलिंगी मानसिकतेला फार पूर्वीपासून जोडलेला मनोरुग्णतेचा कलंक काढून टाकण्यात पुढाकार घ्यावा. समलिंगी संबंधांमध्ये ज्यांचा सहभाग होता अथवा आहे अशांच्या बाबतीत नोकरी, घर, सार्वजनिक निवास आणि परवाना देणं (लायसन्स देणं) यासारख्या क्षेत्रांमधे केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनला खेद वाटतो. तसेच निर्णयक्षमता, कार्यकुशलता, विश्वासार्हता या बाबींमध्ये इतर सामान्य व्यक्तींना जे निकष लावले जातात त्यापेक्षा अधिक निकष या व्यक्तींना लावले जाऊ नयेत. तसंच, परस्पर संमतीने खासगी जागेत केलेल्या समलिंगी संबंधांच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या भेदभावाचा कायदा रद्द करण्यात यावा. यास अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनचा पाठिंबा असून तशी त्यांची विनंती आहे.' १९८१ मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशननी समलैंगिकतेला आजाराच्या यादीतून काढून टाकलं. याचा अर्थ आता पाश्चात्त्य देशात सगळे मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेला आजार मानत नाहीत असं अजिबात नाही. त्यांच्या वादातून समलैंगिकतेला दोन भागात विभागण्यात आलं. इगो सिंटोनिक / इगो डिस्टोनिक समलैंगिकता. ज्या व्यक्तींना आपण समलिंगी आहोत याचा काही त्रास होत नाही, जे आपली लैंगिकता स्वीकारतात अशांना इगोसिंटोनिक म्हणतात. यांचा लैंगिक कल बदलण्याचे प्रयत्न करू नयेत असं काहींचं मत पडलं. ज्या समलिंगी व्यक्तींना आपली लैंगिकता स्वीकारण्यास त्रास होतो, अशांना इगो डिस्टोनिक असं म्हणतात. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं काही मानसोपचारतज्ज्ञ मानतात. या विचासरणीवरून ICD10 मध्ये इगो डिस्टोनिक लैंगिक कलासाठी F66.1 प्रवर्ग करण्यात आला. (55) (काही मानसोपचारतज्ज्ञांना हे प्रवर्ग मान्य नाहीत. सगळे समलिंगी आजारी आहेत असं त्यांचं मत आहे.) भारतातील परिस्थिती आजही भारतातले बहुतेक मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेला आजार मानतात. ही लैंगिकता बदलायचा प्रयत्न केला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका असते. या भूमिकेमागे संस्कृतीचा पगडा, जुनी शिक्षणप्रणाली, व्यावसायिक दृष्टिकोन अशी अनेक कारणं आहेत. मानसोपचारतज्ज्ञही सनातनी संस्कृतीच्या चौकटीतच वाढले आहेत. स्वतंत्र विचार करायची, एखादी नवीन विचारप्रणाली तपासून बघायची सवय जशी इतरांची नाही तशी त्यांचीही नाही. मी जेव्हा माझ्या संस्थेचा प्रसार करायला मानसोपचारतज्ज्ञांना इंद्रधनु ६२ ... . भेटत होतो तेव्हा एकाने विचारलं - "या लोकांना 'ठीक' करण्याचे सपोर्ट ग्रुप तुम्ही चालवत नाही का? तुमची संस्था तर उलटं काम करते. या अशाही उलट काम करणाऱ्या संस्था आहेत हे मला माहीत नव्हतं." अजूनही एमबीबीएस च्या अभ्यासक्रमात जी पुस्तकं आहेत त्यात समलैंगिकता हा आजार मानला जातो. त्यामुळेही डॉक्टरांचे स्वत:चे पूर्वग्रह बळावतात. व्यवसायाचाही एक भाग आहे. काही मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, 'समलिंगी केसेस हा आमच्या प्रॅक्टिसचा फार थोडा भाग आहे', पण येणाऱ्या व्यक्तीकडे गिऱ्हाईक म्हणून बघायची दृष्टी काही मानसोपचारतज्ज्ञांमध्ये आढळते. काही मनसोपचारतज्ज्ञ चारचौघात उदारमतवादी वक्तव्य करतात. 'हा आजार नाही' हे चार लोकांपुढे म्हणतात. पण खाजगीमध्ये एखादा 'पेशंट' समोर बसलेला असतो, तेव्हा मात्र त्यांचं धोरण बदलतं. एक 'एक्स पेशंट' म्हणाला, "मला एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं की 'चाचणीवरून दिसून येतं की तुम्ही पूर्णपणे समलिंगी आहात, पण तुम्ही लग्न करायला काही हरकत नाही. लग्नानंतर सारं काही सुरळीत होईल. " तर दुसऱ्या एका मनसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं, “आता डब्ल्युएचओ याला आजार मानत नाही. पण तू विचार कर, या देशात तुला असं असणं परवडेल का? मग तुझी इच्छा असेल तरच मी तुला बदलायचा प्रयत्न करीन. अर्थात या प्रयत्नांना यश येणार की अपयश हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू जर मनावर घेतलं नाहीस तर यश येणार नाही." काही मानसोपचारतज्ज्ञ, समलिंगी लैंगिक कल बदलण्याचा मापदंड म्हणजे त्या व्यक्तीला लग्न करण्यास सक्षम करणं असा धरतात. म्हणजे समलिंगी पुरुषाला स्त्रीबरोबर संभोग करता आला पाहिजे. तसंच समलिंगी स्त्रीला तिच्या नवऱ्याबरोबर होणारा संभोग सहन करता आला पाहिजे. ( आई-वडिलांनासुद्धा आपल्या पाल्याकडून एवढंच हवं असतं.) लग्न झाल्यावर त्या समलिंगी व्यक्तीची व त्याच्या जोडीदाराची काय घुसमट होते याची कुणाला काहीही पर्वा नसते व आई-वडील आपल्या मुला/ मुलीच्या हिताच्या नावाखाली डॉक्टरांच्या वाटेल त्या अघोरी प्रयत्नांना मान्यता देतात. (नसलेला) आजार बरा करणं हे प्रयत्न (खरं तर अत्याचार हाच शब्द बरोबर आहे) अनेक प्रकारे केले जातात. अ) पुरुषांना पुरुषांची नग्न चित्रं दाखवायची. ते उत्तेजित झाले की त्यांना विद्युत शॉक द्यायचा. म्हणजे पुरुषांकडे पाहून त्यांना लैंगिक उत्तेजना येणार नाही. स्त्रीची नग्न चित्रे दाखवायची पण शॉक द्यायचा नाही. ब) पुरुषांची लैंगिक चित्रं दाखवायची आणि तो पुरुष उत्तेजित झाला की त्याला मळमळायला होईल, ओकारी होईल अशी औषधं, इंजेक्शनं द्यायची. इंद्रधनु... ६३ क) काउन्सेलिंगच्या नावाखाली ब्रेनवॉशिंग करायचं.

  • तुझ्यात कुठेतरी भिन्नलैंगिकता असणार, आपण ती हुडकून काढू.
  • स्त्रिया चांगल्या असतात, त्यांची भीती वाटायचं काही कारण नाही.
  • पुरुषाचं पुरुषाशी नातं अपूर्ण असतं.
  • तुला या जीवनशैलीत काय सुख लाभणार ?
  • तुला त्यानी नादी लावलं आहे. त्याच्यापासून दूर गेलास की हळूहळू स्त्री

आवडायला लागेल.

  • तू आता याचा विचारच करू नकोस. तुझं शिक्षण होऊ दे. पुढे पाहू या.

आता हे सगळं दाबून टाक.

  • तुला लहानपणी कोणीतरी नादी लावलं असणार.

अर्थातच यातल्या कोणत्याही मार्गांना यश येत नसतं. उलट त्या व्यक्तीच्या इच्छा अमान्य ठरवून, त्याची अस्मिता पूर्णपणे ढासळते. त्या मुला/मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करण्यात, त्याचे आई-वडील, मानसोपचारतज्ज्ञ, काउन्सेलरस् कारणीभूत ठरतात. जिथे धर्म, कायदे, समाज समलिंगी असणं हा आजार आहे, विकृती आहे, पाप आहे असं समजतात समलिंगी संभोग करणं हा गुन्हा आहे असं मानतात, अशा वातावरणात वाढणाऱ्या सर्व समलिंगी व्यक्ती इगो डिस्टोनिक असणारच. मीही यातलाच एक होतो. पण एकदा का मला माझ्यासारखे लोक भेटले, आपल्यात काही वाईट नाही हे जाणवलं की मग मी इगो सिंटोनिक झालो. त्यामुळे मानसोपचातज्ज्ञांनी इगो डिस्टोनिक कॅटेगरीतल्या लोकांचा लैंगिक कल बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे धोरण म्हणजे भोंदुगिरी आहे असं माझं मत आहे. समलिंगी असलेल्या पुरुषाला 'बरं' करून त्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न लावलेल्या मानसोपचातज्ज्ञाचं उदाहरण माझ्या माहितीत नाही. संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञ काही तुरळक मानसोपचारतज्ज्ञ उदारमतवादी दृष्टिकोन बाळगतात. ते समलिंगी व्यक्तींना स्पष्ट सांगतात की, " हा आजार नाही. समाज समलैंगिकतेला आजार मानतो आणि ह्या समाजाकडे बघून तुला तुझं प्रतिबिंब आजारी म्हणून दिसतं. तू आजारी नाहीस त्यामुळे तुला बरं करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी डाव्या हातानं लिहितं, कुणी उजव्या हातानी लिहितं, कुणी दोन्ही हातांनी लिहू शकतं, तसंच आहे हे. यात हे चांगलं किंवा ते वाईट असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ९५% लोकांना संत्री आवडतात व ५% इंद्रधनु ६४ ... लोकांना सफरचंद आवडतात. म्हणजे ५% लोकांची आवड कमी दर्जाची आहे असं अजिबात नाही. ती वेगळी आहे एवढंच. हे मानसोपचारतज्ज्ञ, पालकांनी मुला/मुलीला आहे तसं स्वीकारावं यासाठी पालकांना काउन्सेलिंग द्यायला तयार असतात. जर पालक म्हणाले की, “नाही, आम्हाला हे मान्य नाही. काहीही करा पण त्याला/तिला ठीक करा” तर हे मानसोपचारतज्ज्ञ सरळ पालकांना बाहेरचा रस्ता दाखवितात. डॉ. भूषण शुक्ल म्हणाले, “मी स्वत: 'person centred approach' वापरतो. मी त्यांना 'इगो सिंटोनिक व इगो डिस्टोनिक' समलैंगिकता म्हणजे काय हे सांगतो. जर क्लायंटला समलैंगिकतेचा त्रास होत असेल तर त्या त्रासाची कारणं शोधतो. ही कारणं कशी दूर करता येतील याचा प्रयत्न करतो. त्या मुलाला त्याच्या गरजांची जाणीव करून देतो. स्वत:ला बदलण्यापेक्षा (जे शक्य नाही) त्यांनी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारावं ही माझी भूमिका असते. This usually works for the client पण काही पालक हट्ट धरतात की त्याला 'बरा' करा. पण असे पालक फार काळ टिकत नाहीत कारण त्यांना लगेच कळतं की मी त्यांचा मुलगा 'बरा' होण्यासाठी काहीही औषधोपचार करणार नाही.... खूप सायकिअॅट्रिस्ट समलिंगीद्वेष्टे आहेत. वैद्यकीय शिक्षणात या विषयावर संवेदनशीलता शिकवण्यात येत नाही. त्यामुळे या विषयावरचा संवेदनशील दृष्टिकोन (निर्माण करणं) हा स्वतःच्या मानसिक वाढीचाच एक भाग आहे.” [56] डॉ. संज्योत देशपांडे म्हणतात, "याबाबतीत शास्त्रीय दृष्टिकोन असं सांगतो की, होमोसेक्शुअल व्यक्ती त्या पद्धतीनेच जन्माला आली आहे. आपल्याला माणसाच्या रंग-रूपाचे असे प्रश्न पडतात का? ती व्यक्ती तशीच आहे हे आपण जितक्या सहजतेने म्हणतो तितकी सहजता याही बाबतीत यायला हवी असं मनोविकारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. इटस् अ वे ऑफ वनस् लाइफ!" इंद्रधनु... ६५ प्रसार माध्यमांचा दृष्टिकोन समलिंगीव्देष्टी विचारसरणी विविध माध्यमांतून व्यक्त होत असते. त्याचे इतरांवर काय परिणाम होतात याचा लोकांना अंदाज येत नाही. या विचारसरणीनी कित्येक वेळा आपण आपल्याच जवळच्या मित्रांवर, नातेवाईकांवर अन्याय करत असतो. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपण आपली भीती, असुरक्षितता, द्वेष व्यक्त करत असतो, पसरवत असतो. एक दशकापूर्वी समलैंगिकता हा विषय फारसा बोलला जात नव्हता. त्याच्यावर फार क्वचित लिहून यायचं. आलं तरीही सूर पूर्णपणे नकारात्मक असायचा. या विषयावर काही संवेदनशील लिखाण वाचायचं असेल तर परदेशी पुस्तकं किंवा मासिकांचा आधार घ्यावा लागायचा. ही मासिकं, पुस्तकं परदेशातून आणण्याचा प्रयत्न व्हायचा. पण अशी पुस्तकं, मासिकं आणण्यात अडचणी यायच्या. 'कस्टम्स अॅक्ट', १९६२, आयपीसी २९२ मुळे अश्लील वाङमय लिहिणं, छापणं, वितरित करणं गुन्हा आहे. कुठल्या साहित्याला अश्लील साहित्य म्हणायचं हा निकष प्रत्येकजण आपल्या सोयीने लावतो. 'त्रिकोण'चा ऑक्टो. १९९७ चा अंक कलकत्त्याच्या कस्टम डिपार्टमेंटनी जप्त केला होता. [58 ] विसाव्या शतकाच्या अखेरपासून हळूहळू बदल व्हायला लागले. या विषयावर इंग्रजी वर्तमानपत्रात, मासिकांत थोडबहुत लिहिलं जाऊ लागलं. सुरुवातीचं लिखाण अभ्यासपूर्ण, संवेदनशील नव्हतं. बहुतेक लिखाण हे समाजमान्य चौकटीतूनच लिहिलं गेलं. (काही समलिंगी व्यक्तीही समलिंगीद्वेष्टे लेख लिहितात. त्यांचा स्वत:बद्दलचा द्वेष या मार्गाने व्यक्त होतो.) हे चालत आलं कारण स्वतःची लैंगिकता स्वीकारलेल्या समलिंगी व्यक्तींनी 'आऊट' होऊन आपली बाजू मांडण्याचं धाडस दाखवलं नाही. सहिष्णुतेने हा विषय मांडायची सुरुवात इंग्रजी मासिकं व वर्तमानपत्रांतून झाली. आता आता मराठी वर्तमानपत्रांत, मासिकांत या विषयावर थोडं लिहिलं जातं. समलिंगी कार्यकर्त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी मिळू लागली आहे. समलिंगी विषयावरची मासिकं १९८०-१९९० च्या दशकात भारतात काही समलिंगी विषयावरची मासिकं काढली जायची. उदा. 'प्रवर्तक', 'सेक्रेड लव्ह'. ही मासिकं लपूनछपून समलिंगी समाजात वाचली जायची. पण बहुतेक समलिंगी समाजाला या मासिकांची माहिती नव्हती. पुढे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी चालवलेली 'त्रिकोण' संस्था 'त्रिकोण' नावाचं त्रैमासिक काढू लागली. पण हे मासिक अमेरिकेत प्रसिद्ध होत इंद्रधनु... ६६ असल्यामुळे ते भारतीय लोकांपर्यंत पोहोचणं अवघड होत होतं. १९९० साली भारतात, अशोक राव कवी यांनी समलिंगी लोकांसाठी 'बॉम्बे दोस्त' हे इंग्रजी मासिक काढलं. त्याला खूप चांगली मागणी होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे काही वर्षांनी हे मासिक बंद पडलं. brikone MAGAZINE htoes Dear Mummy and Papa I have something to tell you.... BORN GAY THE GENE GENERATION 2 Rtd) a भाषा समलिंगी विषयावरचं बरंचसं साहित्य इंग्रजीत आहे (उदा. सुनीती नामजोशी, होशंग मर्चंट, गीती थदानी, अश्विनी सुकथनकर, रूथ वनिता, हनिफ कुरेशी, सलीम किडवाई, महेश दत्तानी यांचं लिखाण ). याला अनेक कारणं आहेत- यातले बहुतेक लेखक इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत; अशा विषयाच्या इंग्रजी पुस्तकाला प्रकाशक मिळणं सोपं जातं; सबंध भारतातील इंग्रजी वाचकांपर्यंत पोचता येतं इ. बहुतेक भारतीय लोकांना फक्त स्थानिक भाषा येते. म्हणून स्थानिक भाषांतून विविध विचार मांडणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत व हा एक 'इलिटिस्ट' विषय म्हणून ओळखला जाईल. मराठीत समलैंगितेवर फार थोडं लिखाण आहे. यातलं काही लिखाण समलिंगीव्देष्टं आहे. हल्ली या विषयाकडे संवेदनशीलतेने बघणाऱ्या 'तृष्णा' (लेखक - सुमेध रिसबुड- वडावाला), 'हे दुःख कुण्या जन्माचे!’ (मंगला आठलेकर), 'पार्टनर' (बिंदुमाधव खिरे), 'कोबाल्ट ब्लू' (सचिन कुंडलकर) यासारख्या कादंबऱ्या समोर येऊ लागल्या आहेत. स्थानिक भाषेतलं फार थोडं साहित्य लैंगिकतेच्या अंगानं वाचलं गेलं आहे. सलीम किडवाई म्हणाले, "गे विषयाबद्दल मी नाही सांगू शकत पण, प्राथमिक संशोधनातून दिसून आलंय की जवळपास सगळ्या भाषेतून क्वीअर (Queer) साहित्य इंद्रधनु ६७ ... आहे. याचा आतापर्यंत फार अभ्यास झालेला नाही. Text often speak in multiple languages and a rereading needs to be done." (लैंगिकता हा विषय विचारात घेऊन परत मराठी वाङ्मयाचं वाचन होणं गरजेचं आहे). नाटक समलिंगी विषयांवरची व्यावसायिक नाटकं काढणं आर्थिकदृष्टया परवडणारं नसतं, पण प्रायोगिक रंगभूमीतून कमी पैशात चौकटीबाहेरची नाटकं बसवता येतात. समलिंगी विषयावर असलेली अनेक मराठी नाटकं ही प्रायोगिक रंगभूमीने पुढे आणली आहेत. विजय तेंडुलकरांचं 'मित्राची गोष्ट', सुनील खानोलकरांचं 'हॅपी बर्थडे', महेश एलकुंचवार यांचं 'होळी', गौरी देशपांडे यांच्या एका छोट्या गोष्टीवर आधारित राजश्री सावंत-वाड यांचं 'जावे त्याच्या वंशा', चेतन दातार यांचं '१ माधव बाग', सचिन कुंडलकर यांचं 'छोट्याशा सुट्टीत' ही या विषयावरची काही नाटकं. समलिंगी विषय असलेल्या नाटकांवर 'द ड्रॅमॅटिक परफॉरमन्सेस अॅक्ट १८७६ ची टांगती तलवार असल्यामुळे हा विषय फार जपून मांडावा लागतो. प्रायोगिक रंगभूमी असल्यामुळे यातल्या बहुतेक कलाकृती पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातच सादर होतात. छोट्या शहरात, गावोगांवी पोहचू शकत नाहीत. मी 'समलिंगी विषया'वरची पुस्तकं, नाटकं, सिनेमे, असं लिहिलं असलं तरी सगळ्या लेखकांना असं लेबल लावणं मान्य असतंच असं नाही. सचिन कुंडलकर (नाटककार : छोट्याशा सुट्टीत ) म्हणाले, "मला नाटक, सिनेमा किंवा कुठल्याही कलाकृतीला 'गे' किंवा कुठलंही लेबल लावणं मान्य नाही. कुठल्याही कलाकृतीला आपण असं लेबल लावू शकत नाही. माझ्या लिखाणात, नाटकात, समलिंगी पात्रं सहजपणे येतात. मला मुद्दामहून काही विशिष्ट स्टँड घ्यायचा म्हणून ती पात्रं येत नाहीत. माझ्यासाठी समलिंगी लोकांचा 'बायकी' स्टिरिओटाईप आणि अॅक्टिव्हिस्ट लोकांचा 'आपण किती वंचित आहोत!' हा स्टिरिओटाईप या दोन्हीही तितक्याच हास्यास्पद वाटतात." टेलिव्हिजन टीव्हीच्या मालिकांमध्ये समलिंगी विषयाचे फार क्वचित उल्लेख असतात. श्रीधर (दिग्दर्शक : 'गुलाबी आयना') म्हणाले, "टीव्ही सध्या फक्त मास ऑडियन्स, महिलाप्रधान फेजमध्ये आहे.... कोणीही काहीही वेगळं देण्याचा प्रयत्न करत नाही... 'गे' इशू तर बाजूलाच" (समलिंगी जीवनशैलीवर मालिका नसल्या तरी मराठी मालिकांमध्ये, नाटकांत, सिनेमांत, पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी बायकी पुरुषांची पात्रं विनोद आणि टवाळीसाठी सर्रास वापरलेली दिसतात.) इंद्रधनु... ६८ गेल्या चार-पाच वर्षांपासून टीव्हीवर समलैंगिकता या विषयावर चर्चा व्हायला लागल्या आहेत. या चर्चा बघताना काही अडचणी जाणवल्या- जर कार्यक्रमाचा संयोजक समलिंगोद्वेष्टा असेल तर तो ती चर्चा त्याच्या सोयीने वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातूनच प्रश्न विचारणं, समलिंगी कार्यकर्ते मत मांडत असताना मध्येच त्यांचं मत तोडणं इ. दुसरी अडचण अशी जाणवते की काही ठरलेले पाच-सात समलिंगी पुरुषच अशा चर्चेत भाग घ्यायची तयारी दाखवतात. इतरजण पुढे येत नाहीत. विशेषतः लेस्बियन्स 'मी मराठी' दूरदर्शन वाहिनीवर 'दिलखुलास'च्या एका चर्चेत मी भाग घेतला होता. विषय होता 'समलैंगिकता योग्य की अयोग्य?' ही चर्चा समलिंगी पुरुषांवर आधारलेली होती. तो शो रेकॉर्ड झाला. त्यावेळी संयोजकांना वाटलं की, अजून एक शो लेस्बियन्स्वर रेकॉर्ड करावा. पण खूप प्रयत्न करून, लेस्बियन्स्बरोबर काम करणाऱ्या काही संस्थांशी संपर्क साधून सुद्धा एकही लेस्बियन या कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ शकली नाही. सिनेमा काही सिनेमे समलैंगिकता हा विषय थट्टा, विनोद करण्यासाठी वापरतात. तर काही सिनेमे हा विषय सनसनाटी निर्माण करण्यासाठी वापरतात. या विषयाशी निगडित संवेदनशील पात्र असलेले सिनेमे फार थोडे (उदा. हिंदी सिनेमे - 'सेवन रूल्स : प्यार का सुपरहिट फॉरम्यूला', 'हनिमून ट्रॅव्हलस्' इ.). फार थोडे सिनेमे हा विषय संवेदनशीलपणे हाताळतात- 'बॉमगे' (BOMBgAY ) (डॉ. राज राव यांच्या कवितांवर आधारित रियाध वाडीयांनी काढलेली शॉर्ट फिल्म ), 'मँगो सुफले' (दिग्दर्शक: महेश दत्तानी), 'गुलाबी आयना' (दिग्दर्शक: श्रीधर रंगायन), 'माय ब्रदर निखिल' (दिग्दर्शक: ओनीर), 'थांग' (English Version - The Quest' ) (दिग्दर्शक: अमोल पालेकर), 'अडसट पत्रे' (दिग्दर्शक: श्रीधर रंगायन). मराठी सिनेमा 'उंबरठा' मध्ये दोन स्त्रियांच्या लैंगिक संबंधाचा एक प्रसंग दाखवला आहे. मराठीत समलिंगी विषय प्रामुख्याने हाताळणारा एकच सिनेमा आतापर्यंत निघाला आहे, 'थांग'. या सिनेमात समलिंगी संबंधांना मान्यता दिली पाहिजे हे अगदी स्पष्टपणे मांडलं आहे. संध्या गोखले (पटकथाकार 'थांग') म्हणाल्या, “ हा विषय मांडण्यासाठी मी पटकथेची स्त्रीकेंद्रित रचना केली. तिच्याबरोबर प्रेक्षकांनी चित्रपटभर राहणं आणि तिच्याबरोबर समलैंगिकतेचा प्रश्न समजून घेणं हे महत्त्वाचं होतं. नाहीतर प्रेक्षक सिनेमात गुंतला नसता आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत तटस्थ राहिला असता. आपल्या उंबऱ्यावर हा प्रश्न आल्यावर, जो क्लेश होतो आणि हळूहळू त्यातून सावरून इंद्रधनु ... ६९ ती कशी उभी राहते; तिची पहिली प्रतिक्रिया आणि नंतर परिस्थितीचा सम्यक विचार केल्यावरचा तिचा दृष्टिकोन याचा आलेख दाखवणं मला महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे यात त्या व्यक्तीची झालेली वाढ दाखवता आली. तिच्याबरोबर प्रेक्षकांचाही असा प्रवास होणं महत्त्वाचं होतं. शेवट शोकांतिका न दाखवता (जे अनेक चित्रपट दाखवतात. उदा. ‘ब्रोकबॅक माउंटन') आम्ही अत्यंत सहिष्णु शेवट केला. समलिंगी नात्याला मान्यता असली पाहिजे असा स्पष्ट संदेश दिला. " " अशा विषयावर सिनेमा काढायला आर्थिक पाठबळ मिळणं खूप अवघड असतं. ओनीर (पटकथाकार, दिग्दर्शक : 'माय ब्रदर निखिल') म्हणाले, “आर्थिक पाठबळ मिळवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सिनेमातल्या दोन्ही गोष्टी, समलैंगिकता व एचआयव्ही/एडस् 'टॅबू' (taboo) आहेत. फायनान्सर्सनी मला अनेक वेळा सांगितलं की समलिंगी पात्र भिन्नलिंगी कर आणि आम्ही तुम्हाला सिनेमासाठी पैसा देऊ. पण मला हे मान्य नव्हतं. माझ्या गोष्टीशी आणि निखिलशी मला प्रामाणिक राहायचं होतं. मी माझा हट्ट सोडला नाही. ' 27 अनेक नट समलिंगी भूमिका करायला तयार नसतात. आपण समलिंगी आहोत असा लोकांचा समज होईल ही एक भीती. एकदा समलिंगी व्यक्तीची भूमिका केली की कायम अशाच भूमिका मिळत राहतील, ही दुसरी भीती. त्यामुळे अशा भूमिका करायला तयार होणारे फार थोडे धाडसी कलाकार असतात. सेन्सॉर बोर्ड वेळ, कष्ट, पैसे खर्च करून सिनेमा काढला तर सेन्सॉर बोर्डाची कृपादृष्टी मिळवणं अवघड होऊ शकतं. श्रीधर रंगायन ('गुलाबी आयना' बद्दल बोलताना ) म्हणाले, “एक सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले ‘Why can't you say ' without saying it & show without showing it?' मी म्हटलं जे मी दाखवलं ते आवश्यक होतं. त्यांनी सर्टिफिकेट नाकारलं. Now it's mired in red tape." एकही लैंगिक दृश्य नसतानासुद्धा 'थांग' सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळायला अडचण आली. संध्या गोखले म्हणाल्या, "जेव्हा सेन्सॉर बोर्डानी 'थांग' हा मराठी सिनेमा पाहिला तेव्हा अमोल (पालेकर) आणि मला सांगण्यात आलं की हे सगळं मराठी माणसाला न पटणारं आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. ग्रँड ज्युरींना हा सिनेमा दाखवून निर्णय घेऊ. आम्ही विचारलं की, यात लैंगिक दृश्य नाहीत, भाषा अश्लील नाही तर मग सर्टिफिकेट नाकारायचं कारण काय? Give us your verdict in writing and we will pursue our legal course of action. विरोध विषयालाच होता. समलैंगिकतेचं अस्तित्व नाकारणं, ही वृत्तीच त्या मागे होती. इंद्रधनु. ७० ... नंतर सर्टिफिकेट मिळालं पण फक्त प्रौढांसाठीच! परत वादावादी झाली. आमचा आग्रह होता की सगळ्या कुटुंबानी बघण्याजोगा हा सिनेमा आहे. प्रत्येक मुला/मुलीला हा सिनेमा बघू देत. या विषयावर चर्चा होऊ देत. माझ्या तेरा वर्षांच्या मुलीबरोबर मी हा सिनेमा बघू शकते. याच्यावर चर्चा करू शकते आणि व्हायचीच ना! विविध विषयांवर आपल्या मुलांशी आपण नाही संवाद साधायचा तर कोणी? पण सेन्सॉर बोर्डाला काही पटलं नाही.' "" da FDEM brother... Nikhil ORIA The Humsafor Trust s Quest 200 68 Pages Avted by Pain, Ane by Hape 2952135Hn Enjabih and Gas Pipª Dist वितरण एवढे कष्ट करून केलेले सिनेमे लोकांपर्यंत पोचावेत ही किमान अपेक्षा असते. पण अशा सिनेमांच्या वितरणातही अडचणी येतात. संध्या गोखले म्हणाल्या, "असे इंद्रधनु... ७१ my सिनेमे पुण्या-मुंबईत चालतात पण वितरकांची साथ मिळत नाही. आम्ही इतर किती शहरात स्वतः रीळं घेऊन ड्रायव्हरला पाठवायचं? दोन शहरात, चार शहरात? याच्या पलीकडे हे वितरण शक्य होत नाही. हा सिनेमा कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. पण तो पोहोचला नाही म्हणून खूप नैराश्य आलं. मी आणि पालेकर दोघंही प्रत्येक शहरात चित्रपट प्रदर्शनानंतर जाऊन प्रेक्षकांशी चर्चा करायला तयार होतो. तरी अशा विषयांना सामाजिक मान्यता मिळतच नाही.' " एवढं करूनही सनातनी लोकांनी विरोध करून चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडलं तर ही सगळी मेहनत वाया जाऊ शकते. 'फायर', 'गर्लफ्रेंड' सिनेमे जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा याची झलक दिसली. 'फायर' सिनेमा लागलेल्या थिएटर्सवर सनातनी लोकांनी मोर्चे काढले. या सिनेमांचं प्रक्षेपण बंद पाडलं. मुक्तार अब्बास नकवी (Federal Minister of State for I & B ) म्हणाले की, "अशी नाती दाखविणं आपल्या समाजासाठी हानीकारक आहे". प्रमोद नवलकर म्हणाले की, " हा सिनेमा दाखवणं चालू ठेवलं तर हिंसा परत उफाळू शकेल". बीजेपी म्हणालं की, “ “गर्लफ्रेंड'सारखे सिनेमे हे भारतीय संस्कृतीविरोधी आहेत". [59] उर्दू वर्तमानपत्रातून 'गर्लफ्रेंड' सिनेमाच्या विरोधात लिहून आलं- 'इन्किलाब' : 'इतर मतभेद असले तरी या बाबतीत या (शिवसेना, बीजेपी) लोकांशी आमचं एकमत आहे'. 'हिंदूस्तान' : 'समलैंगिकता हा पाश्चात्त्य देशातून आलेला शाप आहे.' [60] " समाज जर प्रगल्भ व सुसंस्कृत बनवायचा असेल तर प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे. ते विचार पटत नसले तरी संवाद बंद होता कामा नये. विचारस्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. समाजात दहशतीचं वातावरण असलं तर समाजमान्य नसलेली मतं मांडण्यास लोकं कचरतात. संवाद हळूहळू कमी होतो व शेवटी बंद पडतो. ज्या समाजात संवाद नाही त्या समाजाचा -हास होतो. इंद्रधनु ७२ भाग २ समलिंगी जीवनशैली इंद्रधनु वयात येताना वयात आल्यावर समलिंगी मुला/मुलींना त्यांच्याच लिंगाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण वाटू लागतं. एक लेस्बियन म्हणाली, "मी नववीत होते तेव्हा आमच्या एक शिक्षिका मला खूप आवडायच्या. त्यांची एक दिवस जरी रजा असली तरी मला सहन व्हायचं नाही. त्यांना बघण्यासाठीच मी शाळेत जायची, असं म्हटलं तरी चालेल. त्यांना मनात आणून मी स्वत:ला शरीरसुख द्यायचे. एक-दोन मुलं माझ्यावर लाईन मारायची. मी त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.” उभयलिंगी मुलांना मात्र आपली लैंगिकता लगेच उमजत नाही. एकजण म्हणाला, “मी सुरुवातीला खूप गोंधळलो होतो. मला दोघांबद्दल (मुलं/मुली) आकर्षण वाटत होतं. या अर्धवट स्थितीत असल्याचा त्रास व्हायचा. आता मला जाणीव आहे की, मी उभयलिंगी आहे व बहुतांशी माझं आकर्षण पुरुषांकडेच आहे.' " आपला लैंगिक कल इतरांपेक्षा वेगळा आहे हे सहसा कोणी इतरांपाशी बोलत नाही. आपली लैंगिकता कळली तर इतर जण नावं ठेवतील, त्रास देतील ही भीती असते. जर तो मुलगा बायकी असेल तर त्याला अनेक जण त्रास देतात. हेटाळून बोलतात. शाळा/कॉलेजमध्ये रॅगिंग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना शाळा, कॉलेज एक नरक बनतो. शाळा, कॉलेजमध्ये जायचं म्हणजे अंगावर काटा येतो. "मी समलिंगी आहे हे होस्टेलमध्ये कळलं. तेव्हापासून मला मुलं सारखा त्रास देऊ लागली. चेष्टा करायची, नावं ठेवायची. रॅगिंग करायची. मला जीणं नकोसं करून टाकलं. मी मेलो तर यांच्या कचाट्यातून सुटेन असं वाटायला लागलं.” मुलगा बायकी नसला तर त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. अशी मुलं चार-चौघात सहजपणे एकरूप होतात. ती जोवर आपल्या लैंगिक कलाबद्दल बोलत नाहीत तोवर त्यांची लैंगिकता काय आहे हे कळणं शक्य नसतं. हीच बाब मुलींबद्दलची.. पुरुषी स्त्रिया लोकांच्या नजरेत येतात. असा जेंडरवर आधारित दृष्टिकोन असल्यामुळे समाजात गैरसमज आहे, की सगळी समलिंगी मुलं बायकी असतात व सगळया समलिंगी स्त्रिया पुरुषी असतात. ह्या वयात खूप असुरक्षितता असते. चार लोकात आपण सामावणं, त्यांनी आपला स्वीकार करणं फार महत्त्वाचं असतं. आपण स्वीकारलो गेलो आहोत का? हे संदेश शोधणं सदैव चालू असतं. आपलं वेगळेपणं लक्षात आलं की आपल्याला स्वीकारणारा एकही संदेश मिळत नाही. समलिंगी लोकांबद्दलचा व्देष, त्यांची केलेली थट्टा, बायकी मुलांची हेटाळणी एवढेच संदेश त्यां मुलापर्यंत पोहोचत असतात. इंद्रधनु ७४

      • अपल्याला समाज वाईट समजतो ही भावना मनात रुजायला लागते. या काळात

मानसिक स्थिती अत्यंत नाजूक असते. आधाराची, आदर्श प्रतिमांची फार मोठी गरज असते. आई-वडिलांचा आधार असावा, आपल्याला आपल्या मित्रांनी स्वीकारावं व आपल्या सारख्या समलिंगी व्यक्तींच्या आदर्श प्रतिमा आपल्या समोर असाव्यात असं प्रकर्षाने वाटत असतं आणि हाच महत्त्वाचा आधार उपलब्ध नसतो. त्यामुळे आपलं वेगळेपण स्वीकारण्यास बहुतेकांची तयारी नसते. आपण समलिंगी आहोत याचा खूप क्लेश होतो. आपल्या लैंगिकतेच्या जाणिवेपासूनचा प्रवास खूप कष्टाचा असतो. आपली लैंगिकता मानण्यास नकार, राग, बदलण्याचे मार्ग शोधणं, नैराश्य, आपली लैंगिकता मान्य करणं, आपली लैंगिकता पूर्णपणे स्वीकारणं, आपल्या लैंगिकतेचा अभिमान बाळगणं हे या प्रवासाचे काही टप्पे. हे नमुद केलेले टप्पे 'कुबलर-रॉस’ मोजपट्टीच्या साहाय्याने खाली दिले आहेत. (मी या मोजपट्टीत शेवटी थोडा बदल केला आहे.) लैंगिकता मानण्यास नकार (Denial) काही समलिंगी पुरुष असा विचार करतात की, तारुण्यातली ही एक तात्पुरती अवस्था आहे. आज ना उद्या ही आवड आपोआप कमी होईल आणि आपल्याला मुलींबद्दल आकर्षण वाटू लागेल. पण दोन-तीन वर्षे गेली तरी आपल्याला मुलींबद्दल थोडंसुद्धा आकर्षण वाटत नाही हे कळतं आणि लक्षात येतं की ही तात्पूरती अवस्था नाही. “मी नट्यांना मनात आणून हस्तमैथुन करायचा प्रयत्न करायचो, एकदाही मला ते जमलं नाही. ती नटी निसटून जायची आणि एखादा चांगला दिसणारा नट समोर यायचा. काहीजण समलिंगी असूनसुद्धा आपण उभयलिंगी आहोत असं भासवतात. समलिंगी असण्याबद्दल मनात खूप द्वेष असल्यामुळे ते विचार करतात की, आपण उभयलिंगी आहोत असं सांगितलं तर समाजाच्या नजरेत आपण अर्धेच वाईट ठरू, पूर्ण वाईट ठरणार नाही. आपण उभयलिंगी आहोत अशी समजूत करून घेतली की, आपल्याला अपराधीपणाची भावना न बाळगता लग्नही करता येईल. “मला माहीत होतं की, मी समलिंगी आहे. तरी मी सुरवातीला सांगायचो की, मी बायसेक्शुअल आहे. स्वतःला बायसेक्शुअल म्हणवून घेण्यात फार कमीपणा वाटायचा नाही.” " काही समलिंगी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाबरोबर रिसेप्टिव्ह रोल घ्यायला आवडतो. प्रत्यक्षात लैंगिक संबंध झाले नसले तरी स्वप्नरंजनाच्या वेळी, हस्तमैथुनाच्या वेळी हाच सेक्स रोल मनामध्ये येतो. आपण पुरुष असून रिसेप्टिव्ह जोडीदार बनायची इच्छा ठेवतो याचा काहीजणांना खूप त्रास होतो, न्यूनगंड वाटतो. एक वेळ पुरुषाबरोबर इंद्रधनु ७५ ... इन्सर्टिव्ह भूमिका घेणं चालेल पण त्याच्या बरोबर रिसेप्टिव्ह भूमिका घेणं लांछनास्पद वाटतं. मग असे अनेक रिसेप्टिव्ह भूमिका आवडणारे समलिंगी पुरुष, ते नेहमी इन्सर्टिव्ह रोल घेतात असं सांगतात. नंतर जसजसं समलिंगी समाजाशी परिचय वाढतो, काही जण मोकळेपणाने ते रिसेप्टिव्ह आहोत असं सांगतात, तसतसं धाडस करून काहीजण स्वतःला व्हरसटाइल म्हणायला लागतात; आणि नंतर यातले काहीजण मोकळेपणाने सांगतात की, त्यांना रिसेप्टिव्ह भूमिका घ्यायला जास्त आवडतं. “सुरवातीला माझा बॉयफ्रेंड टॉप आणि मी बॉटम असं नातं होतं. हळूहळू तो मला आग्रह धरायला लागला की, मी इन्सर्टिव्ह पार्टनर बनावं. मला इन्सर्टिव्ह रोल घ्यायला आवडत नाही पण आता तो सारखाच रिसेप्टिव्ह रोल घेतो." काही समलिंगी व्यक्तींशी बोलताना असं लक्षात येतं की त्यांना त्यांच्या समलैंगिकतेबद्दल इतका द्वेष आहे की, त्यांनी “मी लहानपणी लैंगिक शोषणाचा बळी झालो," असं काल्पनिक विश्व तयार केलं आहे. म्हणजे मला दोष देऊ नका, मी वाईट नाही. माझ्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याला जबाबदार धरा, हा सांगायचा उद्देश. काहीजण आपल्या लैंगिकतेने होणारी कुचंबणा कोणाला कळू नये म्हणून एका खुशालचेंडूचा मुखवटा चढवून घेतात. विनोदबुद्धी दाखवून, थट्टामस्करी करून आपल्या मित्रगटाची जान बनतात. काहीजण अभ्यासात मन गुंतवून आपली लैंगिकता विसरण्याचा प्रयत्न करतात. राग हळूहळू आपण बदलणार नाही हे जाणवायला लागतं आणि मनात खूप चीड निर्माण होते. आपणच असे का? माझ्याच वाट्याला हे का आलं? मी काय पाप केलं आहे? परमेश्वरानी माझ्यावर का अन्याय केला? माझ्या आई-बाबांनी मला असं का जन्माला घातलं? ह्या रागाचं कारण कुणला सांगणं शक्य नसतं. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून चिडचिड, भांडणं, तोडफोड होते. बाकी सर्व जग सुखी आहे, आणि आपल्याच वाट्याला हे भोग आले आहेत म्हणून मनात इतरांबद्दल मत्सर उत्पन्न होतो. मित्रांचं चांगलं झालेलं बघवत नाही. आपण इतरांसारखे होऊ शकत नाही ही भावना मनात रुजली की काहीजणांचा स्वभाव एकलकोंडा बनायला लागतो. मित्र, मैत्रिणी नकोसे वाटू लागतात. अभ्यासातून, शिक्षणातून लक्ष दूर होत जातं. शिक्षणाचं वर्ष वाया जाऊ शकतं. आपल्या पाल्यात काय फरक पडला हे पालकांना कळत नाही. पालकांनी संवाद साधायची कितीही संधी दिली तरी त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. हळूहळू आई-वडिलांना राग आवरता येत नाही. सगळं पुरवून सुद्धा आपल्या मुला/मुलीला त्याची किंमत नाही असं त्यांना इंद्रधनु ७६ ... वाटायला लागतं. अपशब्द बोलले जातात. त्या मुला/मुलीला आपली शिव्याशाप खायचीच लायकी आहे असं वाटतं व त्याचं / तिचं मनोबल पूर्णपणे खचून जातं. या काळात जर एखाद्या भिन्नलिंगी कलाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर प्रश्न अजून बिकट होतो. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती आयुष्याचा केंद्रबिंदू होते. "मला तो म्हणाला, 'ए, मी तुझ्यासारखा गांडू नाही.' मला ते खूप लागलं. वाटायला लागलं की, ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती जर आपल्याला, आपण आहोत तशी स्वीकारणार नसेल तर आपलं जिणं व्यर्थ आहे.” अशा एकतर्फी प्रेमात साहजिकच निराशा पदरी पडते. या अस्वीकारामुळे मुलं अजूनच नैराश्याच्या गर्तेत ओढली जातात. समाजासमोर मात्र भिन्नलिंगी असल्याचा मुखवटा सदैव धारण करावा लागतो. ही दोन आयुष्यं जगण्यात संपूर्ण शक्ती खर्च होते. मनावर कमालीचा ताण येतो. मन सारखं त्याच विषयाभोवती घिरट्या घालायला लागतं. मी असा एकटाच आहे का? इतरजण असतील तर ते कुठे आहेत? एखादा जरी भेटला तरी त्याच्याशी मोकळेपणानं बोलता येईल. त्यांची या विषयाकडे बघण्याची काय नजर आहे? माझ्यासारखेच प्रश्न त्याला पडतात का? कोणत्या मार्गाने माझ्यात बदल होईल? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात. सुटकेचे मार्ग शोधणं (Negotiation) काही जण मानसोपचारतज्ज्ञाकडे जातात तर काही जण अध्यात्माकडे वळतात. काही पुरुष स्त्रीबरोबर संभोग करावा असा विचार करतात. जर स्त्रीबरोबर आपल्याला संभोग करता आला तर मग आपल्याला लग्न करता येईल (आपल्याला ते आवडो वा न आवडो) असा विचार करतात. (या विचारात लग्न म्हणजे संभोग हीच धारणा असते. यात प्रेमाचा, आपुलकीचा अजिबात विचार केलेला नसतो.) फार थोडे जण समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या काउन्सेलरची मदत घेतात. काहीजण समलिंगी व्यक्तींचा शोध घेतात- इंटरनेटचा आधार घेऊन, अंदाजे खडा टाकून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या मुलां/ मुलींची स्थिती अत्यंत नाजूक असते. अशा स्थितीत काहीजण त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यांना मानसिक आधार द्यायचा सोडून त्यांच्या बरोबर संभोग करून त्यांना सोडून देतात. आपला वापर झाला आहे हे जाणवल्यावर अजूनच नैराश्य येतं. कशासाठी जगायचं? असं वाटायला लागतं. इंद्रधनु... ७७ नैराश्य (Depression) नैराश्य आलं की काही करायची आकांक्षा उरत नाही. कशासाठी शिकायचं, नोकरी करायची कळत नाही. आपली लैंगिकता आपल्याला पूर्णपणे ग्रासते. आपल्याला कोणीही स्वीकारणार नाही, याच्या इतकी क्लेशदायक भावना दुसरी कोणती नसते. अनेक समलिंगी मुला/मुलींनी कधी ना कधी तरी आत्महत्येचा विचार केलेला असतो. काहींनी प्रयत्न केले असतात. काहीजण मरता मरता वाचतात. काहीजण आत्महत्या करून काळाच्या पडद्याआड जातात. “कुठल्या प्रकारे आत्महत्या करावी ? याचा मी विचार करू लागलो. घरच्यांना कमीत कमी त्रास होईल असा निरोप घेतला पाहिजे, असा विचार केला. चिठ्ठी लिहून ठेवली तर घरच्यांना कारण कळेल आणि त्यांना खूप दुःख होईल. त्यापेक्षा कारण न सांगताच गेलं पाहिजे. काय करायचं? विष घ्यायचं? का फास लावून घ्यायचा? लौकरात लौकर, कमीत कमी वेदना होऊन कशा प्रकारे आत्महत्या करता येईल याविषयीचे विचार मनात यायला लागले." काही वेळा एखाद्या समलिंगी व्यक्तीशी नातं जमतं. आपल्याला स्वीकारणारी जगातली ही एकमेव व्यक्ती असल्यामुळे तळमळीने त्या व्यक्तीवर प्रेम केलं जातं. चोवीस तास त्याच व्यक्तीचा ध्यास लागतो. तिच्याशिवाय दुसरं अस्तित्वच उरत नाही. अशा वेळी काही कारणांनी ती व्यक्ती नातं सोडून गेली तर हे दुःख असह्य होतं. आपल्याला स्वीकारणाऱ्या एकमेव व्यक्तीला सुध्दा आपण नको आहोत तर जगायचं कशाला? असा विचार मनात येतो. (त्यात जर दारू प्यायची सवय असेल तर नशेत मनावरचा ताबा सुटण्याचा धोका वाढतो. ) आपली लैंगिकता स्वतः मान्य करणं (Tolerance) काहीजण या सगळ्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर स्वतःची लैंगिकता सहन करायची तयारी दाखवतात. आपण आहोत असेच राहणार, यात बदल नाही अशी खात्री होते. याला स्वीकारणं म्हणायचं का? नाही. कुठलाच उपाय उरला नसल्याने ही स्थिती येते. अनेकांचा प्रवास इथेच थांबतो. काहीजण मात्र याच्यापुढचे दोन महत्त्वाचे टप्पे गाठतात. आपली लैंगिकता स्वीकारणं (Acceptance) स्वतःला स्वीकारणारे समलिंगी लोक भेटले की, त्यांची जीवनशैली बघून स्वत:बद्दलचा व्देष कमी व्हायला लागतो. आपण इतरांपेक्षा कमी दर्जाचे नाही, आपण चारचौघांसारखे आहोत हे जसजसं लक्षात यायला लागतं तसतशी त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा बदलते. ते स्वत:वर प्रेम करायला लागतात. स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागतात. मन शांत व्हायला लागतं. एका इंद्रधनु... ७८ समलिंगी व्यक्तीवर प्रेम करताना निखळपणे या नात्याचा अनुभव घेतात. अर्थात हे एका दिवसात घडत नाही. कळत नकळत जसजसा मनावरचा ताण कमी होतो तसतसं मानसिक दडपण कमी होतं आणि आयुष्याचे इतर रंग दिसायला लागतात. त्या रंगांकडे लक्ष जातं, त्यांचं सौंदर्य दिसायला लागतं. याचा अर्थ आपण कोण आहोत हे ते सगळ्यांना सांगतातच असं नाही. काहीजण कोणालाच सांगत नाहीत (आयुष्यभर 'क्लोजेट'मध्येच राहतात.) काहीजण फक्त आई-वडिलांना सांगतात. घरच्यांना सांगणं हा प्रामाणिकपणाचा भाग आहे असं मानतात. काहीजण आपलं भिन्नलिंगी लग्न होऊ नये म्हणून नाइलाजानेच घरच्यांना सांगतात तर काहीजण फक्त त्यांच्या जवळच्या समलिंगी मित्रमंडळींनाच सांगतात. आपल्या लैंगिकतेचा अभिमान (Out and Proud) आपली लैंगिकता स्वीकारण्याचा टप्पा गाठला की हळूहळू समाजव्यवस्थेकडे एका तटस्थ वृत्तीने बघण्याची दृष्टी येते. आपल्यावर झालेले संस्कार, समाजाची बंधनं, चालीरीती, धर्म, कायदा, वैद्यकीय दृष्टिकोन या सगळ्यांकडेच ती व्यक्ती एका चिकित्सक वृत्तीने बघायला लागते. समाजातील सोंग-ढोंगं, वैगुण्यं स्वच्छ दिसायला लागतात. आपण या दुटप्पी संस्कृतीचे बळी आहोत आणि आपणच नाही तर समाजातील इतर घटक (उदा. स्त्रिया, दलित इ.) याच संस्कृतीचे बळी आहेत हेही स्वच्छपणे दिसायला लागतं. आणि मग मनात विचारांचा अंकुर फुटतो की ज्या संस्कृतीने आपल्या आयुष्याचं वाटोळं केलं ती संस्कृती बदलायला पाहिजे. संस्कृती बदलायची म्हणजे भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या लोकांचा द्वेष करून नाही तर त्यांना संवेदनशील बनवून त्यांच्यात लैंगिकतेबद्दल माणूसपण आणून. आणि हे सगळं करायचं असेल तर आपण कोण आहोत, आपल्यावर या संस्कृतीमुळे कळत नकळत कसा अन्याय झाला आहे हे समाजाच्या समोर मांडलं पाहिजे. आपल्याला काय क्लेश भोगावे लागले याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे आणि यासाठीच 'आउट' झालं पाहिजे असा विचार मनात येतो. समाजाला आपल्या लैंगिकतेविषयी अभिमानानं सांगणं गरजेचं बनतं. अभिमान हा शब्द महत्त्वाचा आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून आपल्या लैंगिकतेला विरोध असूनसुद्धा, जो आपली लैंगिकता न लाजता, कुठल्याही कारणांमागे न दडता, कुठल्याही दबावाला न जुमानता सांगतो त्याच्यासाठी अभिमान हाच शब्द सार्थ आहे. O इंद्रधनु ७९ ... सामाजिक समस्या प्रत्येक समलिंगी व्यक्ती मागच्या सत्रात नमुद केलेल्या सगळ्या टप्प्यांतून जातेच असं नाही. काहीजण आयुष्यभर आपल्या लैंगिकतेकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतात तर काहीजण कालांतराने आपल्या लैंगिकतेचा स्वीकार करतात. शिक्षण संपलं, नोकरी लागली की आपली लैंगिकता सामाजिक प्रश्न बनू लागते. आपली लैंगिकता कायम लपवून ठेवायची का? घरच्यांना सांगायचं का? लग्न (भिन्नलिंगाच्या व्यक्तीशी) करायचं का? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असतात. यावर होणारे निर्णय आयुष्याचा पुढील प्रवास ठरवतात. हे कोणतेच निर्णय घेणं सोपं नसतं. या निर्णयामुळे संसार, अर्थार्जनाचे मार्ग या सगळयावर दूरगामी परिणाम होणार असतात. लग्न वयात आल्यावर लग्न करणं, हे आपल्या देशात क्रमप्राप्त आहे. मुलांचं शिक्षण किती झालंय, आर्थिकदृष्टया ते स्थिरस्थावर झाले आहेत का ? याचा कुठलाही विचार इथे केला जात नाही. अजूनही पालकांनी वधू-वर शोधण्यासाठी उंबरे झिजवण्याची पद्धत आहे. मुला/मुलींची बाजू अशी की जोडीदार मिळवणं हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. तो निर्णय घेण्यात सगळ्यांचा सहभाग असलेला बरा. उद्या काही अडचण आलीच तर, 'मी कुठे निवड केलीय, पालकांनी केली' असं म्हणून आपली जबाबदारी टाळता येते. लग्न झाल्यावर वर्षात पाळणा हलणं अपेक्षित असतं. पुरुषावर त्याचं पुरुषत्व सिद्ध करण्याबाबत दडपण असतं, तर स्त्रीला मुलगा देण्याबाबत दडपण असतं. या जोडप्याचं एक स्वतंत्र जीवन आहे आणि त्यांना त्यांच्या परीनं संसार करायचा अधिकार आहे, असं कोणी मानत नाही. अशा वातावरणात एका समलिंगी व्यक्तीला 'मला लग्न करायचं नाही', हे सांगणं खूप अवघड होतं. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला लैंगिक आकर्षण, जिव्हाळा, आपुलकी नाही अशा व्यक्तीबरोबर आयुष्य कसं काढायचं? ही कल्पनाच अंगावर काटा आणते. मग लग्न टाळण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात. 'आता नको, नोकरीचं काही निश्चित नाही', 'मला एकही मुलगी पसंत पडली नाही.' अशी सगळी कारणं सांगून जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं जातं. ही युक्ती दोन-चार वर्ष चालते. हळूहळू घरचे वैतागायला लागतात. 'आम्ही आता थकलो', 'आम्ही गेल्यावर तुझं कोण बघणार!', अशी वाक्यं ऐकू येतात. इंद्रधनु ८० मुलींना लग्नाचा प्रतिकार करणं जास्त मुश्किल होतं. 'वेडी-बिडी आहेस का? आजकाल दिवस आहेत का, बाईमाणसाने एकटं राहण्याचे? काही टेन्शन घेऊ नकोस, लग्न झालं की सगळं ठीक होईल. उलट आम्हाला विसरून जाशील.' अशा प्रतिक्रिया येतात. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून तिला कमी शिक्षण दिलं जातं. नोकरी करायचं उत्तेजन, त्यांची लग्नबाजारात किंमत वाढावी एवढ्यापुरतंच दिलं जातं, पण त्याचबरोबर फार पगाराची नोकरी नसलेली बरी, कारण नवरा मिळायला त्रास होतो, म्हणून तिने कमी जिद्द, हुशारी, आकांक्षा दाखवावी ही अपेक्षा असते. या सगळ्यामुळे तिला स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा मिळणं आणखीनच कठीण असतं. या दडपणांव्यतिरिक्त, लग्न करण्यास इतरही कारणं असू शकतात. काही पुरुष भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषावर प्रेम करतात आणि त्याच्या नजरेत आपण चांगलं असावं म्हणून त्याच्या आयुष्याचं अनुकरण करून स्त्रीशी लग्न करतात. काही पुरुषांची समलिंगी नाती असतात. त्या नात्यांतल्या एकानं स्त्रीशी लग्न केलं तर तो आपल्या समलिंगी जोडीदाराला स्त्रीशी लग्न करण्यासाठी गळ घालू शकतो. काही जण विचार करतात की, आपण कर्तव्य म्हणून आपल्या आई-वडिलांसाठी लग्न करायचं. स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवायचा. अर्थात ही स्वतःची फसवणूक असते आणि जोडीदाराचीही. समलिंगी मुला / मुलींना मनात जाणीव असते की, लग्न करून आपण आपल्या जोडीदाराची जाणूनबुजून फसवणूक करीत आहोत. हे जाणून सुद्धा समाजाला भिऊन लग्न करतात आणि आगीतून फुफाट्यात पडतात. "मला लग्न केलंच पाहिजे. इच्छा नसली तरी. पण मला माझ्यापेक्षा तिची (माझ्या गर्लफ्रेंडची) काळजी वाटते. तिला याचा खूप त्रास होतोय. मी लग्न करणं म्हणजे तिला मी नाकारलं असा अर्थ तिनं लावून घेतला आहे. ती स्वतःचं काही बरंवाईट करेल याची मला भीती वाटते.... मी माझ्याबद्दल विचारच करत नाही. मी स्वतःला बधिर करून घेतलं आहे.” घरच्यांना जरी समलिंगी व्यक्तीनी आपल्या लैंगिकतेबद्दल सांगितलं तरी काही जणांच्या घरची मंडळी म्हणतात की, 'तुझं काहीही असू देत. • लग्न केलंच पाहिजे. लग्न झालं की सर्व ठीक-ठाक होईल. एक मूल झालं की, सगळंच स्थिरावतं.' घरच्यांना आपला मुलगा किंवा मुलगी समलिंगी आहे या गोष्टीला सामोरं जाण्याची अजिबात तयारी नसते. (मी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी घेतलेल्या शिबिरांमध्ये 'समलिंगी लोकांनी भिन्नलिंगाच्या व्यक्तीशी लग्न करावं का?' असा प्रश्न विचारतो, तेव्हा अनेक इंद्रधनु... ८१. पुरुष 'हो' म्हणतात व काही पुरुष, समलिंगी मुलींशी लग्न करून त्यांना 'सुधारण्याचा' विडा उचलायची तयारी दाखवतात. अशा पुरुषांनी स्वतःच्या पुरुषार्थाशिवाय इतर कुठल्याही भावनेला, हक्कांना महत्त्व दिलेलं दिसत नाही. समाज या विषयाकडे कसा बघतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांना विचारलं की, तुमच्या बहिणीचं लग्न एका समलिंगी पुरुषाशी लावाल का ? तर त्याला मात्र सगळयांचं उत्तर 'नाही' असतं.) बहुतेक पालकांची समलैंगिकतेकडे बघण्याची दृष्टी नकारात्मक असते. नातेवाईक, शेजार व इतरांना जर ही गोष्ट कळली तर, आयुष्यभर ते नावं ठेवतील ही भीती असते; 'अजून बहिणींचं लग्न व्हायचंय, इतरांना कळलं तर त्या अविवाहित राहतील' ही काळजी असते. या सगळ्यामुळे आई-वडिलांवर प्रचंड दबाव असतो. ते आपल्या मुलाची/मुलीची बाजू समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. आपल्या मुला/मुलीचं लग्न झाल्यावर त्याचे/तिचे काय हाल होतील, दुसऱ्याच्या मुला/मुलीची आपण जाणूनबुजून फसवणूक करत आहोत या गोष्टीकडे ते कानाडोळा करतात. "मी एकुलता एक मुलगा. तीन वर्षापूर्वी वडील वारले. माझ्या शिवाय आईला कुणाचाही आधार नाही. तिला मी सांगू शकत नाही. माझं लग्न झालं. त्यामुळे ----ला (माझ्या बॉयफ्रेन्डला) नैराश्य आलं. त्याने माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगितलं की, आमचं पाच वर्ष एकमेकांवर प्रेम होतं. आई तेव्हा काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी बायको कामावर गेल्यावर म्हणाली- 'जे झालं ते झालं. आता मागे वळून बघायचं नाही. हा विषय परत निघता कामा नये.' " 'सुखी' संसार- काही समलिंगी पुरुषांना स्त्रीबरोबर संभोग करता येतो. बायकोशी कर्तव्य म्हणून (आणि तिला संशय येऊ नये म्हणून) अधूनमधून तिच्याशी संभोग करतात. त्यांना मुलं होतात. बायकोला आपला नवरा समलिंगी आहे हे आयुष्यभर कळत नाही. समाजासाठी हे एक सुखी भिन्नलिंगी कुटुंब असतं. काही पुरूष लग्न झाल्यावर समलिंगी जोडीदार मिळाला तर त्याच्याबरोबर नातं प्रस्थापित करतात. कोणाला कळणार नाही असं. घरचं सगळं सांभाळून, घरच्यांना संशय येणार नाही या बेतानं दोन आयुष्यं जगतात. असं जगणं कठीण असतं. प्रत्येक वाक्य जपून बोलावं लागतं. प्रत्येक गोष्ट जपून करावी लागते. या गोष्टीचा सतत ताण असतो. या दुफळी जगण्यात खूप शक्ती खर्च होते. काही पुरुष आपल्या बायकोबरोबर संभोग करायचा टाळतात. अशी काही जोडपी आहेत, ज्यांच्यात पुरुषांनी लग्न झाल्यापासून बायकोबरोबर संभोग केलेला नाही, किंवा प्रयत्न केला तरी जमला नाही. असं झालं की, बायकोची हळूहळू चिडचिड व्हायला लागते. आपली फसवणूक झाली आहे हे तिला जाणवायला लागतं. कधीकधी इंद्रधनु ८२ 474 आपणच स्त्री म्हणून कमी पडलो असं वाटून अपराधी वाटत राहतं. पण कुणाला बोलून दाखवायचं? कुणाजवळही बोललं तरी गावभर चर्चा होणार. काहीजणी नवऱ्याला आग्रह धरतात की, 'तू मला फक्त एक मूल दे, नंतर मी काहीही मागणार नाही.' ज्यांना हे शक्य असतं त्यातले अनेक जण तेच करतात. एक मूल झाल्यावर परत बायकोला हात लावत नाहीत. काहींना ते शक्य नसतं. डॉक्टरकडे जा, औषधं घ्या या गोष्टी चालू असतात. पण आपल्या लैंगिकतेबद्दल बायकोपाशी बोलू शकत नाहीत. नवऱ्याला शरम वाटायला लागते. आपण पुरुष म्हणून कमी पडलो म्हणून तो बांयकोला टाळायला लागतो. स्वतःला कामात गुंतवून घेणं, जास्त वेळ घराबाहेर राहणं, दारू पिणं इ. गोष्टी वाढतात. घरच्यांबद्दल, मित्रमंडळींबद्दल तिरस्कार वाढत असतो. “लग्न होऊन सहा महिने झालेत. मी अजून तिच्याबरोबर संबंध केलेला नाही. तिला मिठी मारतो, किस करतो पण त्याची सुद्धा किळस येते. मी उत्तेजित होत नाही. त्यासाठी मी बाहेरगावची नोकरी घेतली. घरात राहणं नको.... मी पुरुषांना मनात आणून उत्तेजित होऊन तिच्याबरोबर सेक्स करायला बघतो. पण तिचा स्पर्श जरी झाला तरी नको वाटतं. सुरुवातीला ती समजून घ्यायची. आता तिची चिडचिड वाढते आहे. तिचा दोष नाही. मी स्वत:ला दोषी धरतो पण मग मनात विचार येतो की समाजानी मला स्वीकारलं असतं तर मला आणि तिला हा त्रास सोसावा लागला नसता. मग मी फक्त स्वतःला का दोष लावून घेऊ?” नवरा भिन्नलिंगी लैंगिक कलाचा असला आणि बायको लेस्बियन असली तर नवरा कितीही चांगला असला तरी संसार करणं अवघड होतं. आपल्या जोडीदाराची लैंगिकता कोणती आहे हे अनेक पुरुषांना आयुष्यभर माहीत नसतं. अशा वेळेस स्त्री फक्त कर्तव्यापुरता संबंध ठेवते. ते करतानासुद्धा तिला किळस वाटते. त्यातून तिची भावनिक, लैंगिक गरज पुरी होत नाही. आपली बायको समलिंगी आहे हे जर नव-याला कळलं तर पुरुषाला आपण कुठं तरी कमी पडलो हा न्यूनगंड येतो. आपण स्त्रीला मानसिक, शारीरिक सुख देऊ शकत नाही हे मनात सलत राहतं. काही वेळा बायकोला तिच्या नवऱ्याच्या लैंगिकतेबद्दल कळतं. घरात भांडणं होतात. बायको म्हणते ‘एक वेळ एखादी बाई मी खपवून घेतली असती पण एक पुरुष ?' बायको घटस्फोट घेते किंवा घरातल्या घरात वेगळं रहायला लागते. सगळ्यांवर प्रचंड ताण येतो, नैराश्य येतं. जोडीदाराची लैंगिकता कळली तरी काही कुटुंबात दोघांचीही घटस्फोटाची तयारी नसते. घटस्फोट घेतला तर समाज नावं ठेवेल ही भीती मनात असते. मग दोघंजण नावापुरतं एकत्र राहतात व संसार करायचं नाटक करतात. इंद्रधनु... ८३ जर पुरुष समलिंगी असला व त्याच्या बायकोला ते कळलं, तर कधी कधी बायकोला घटस्फोट हवा असूनसुद्धा नवऱ्याची तो द्यायची तयारी नसते. नवऱ्याला समाजात भिन्नलिंगी जोडप्याची मान्यता हवी असते आणि हा स्वार्थ साधून तो बायकोला घटस्फोट देऊ इच्छित नाही. काही वेळा त्या समलिंगी पुरुषाला घटस्फोट घ्यायचा असतो पण त्याच्या बायकोची घटस्फोट द्यायची तयारी नसते. याला वेगवेगळी कारणं आहेत- आपण कमी पडलो असा न्यूनगंड; आपण परत माहेरी गेलो तर घरच्यांवर आपला भार पडेल ही काळजी; आपलं परत लग्न होईल की नाही ही शंका; एका कुटुंबाचं संरक्षण, आधार सोडून देण्यात वाटणारी अस्थिरता; स्त्रीनं एकटीने राहण्याची कल्पना सहन न होणं इत्यादी. मुलं नसली तर काही प्रमाणात घटस्फोट मिळण्यात अडचणी कमी येतात. जर मुलं असली तर त्यांची काय व्यवस्था करणार? आपण समलिंगी आहोत हे कळलं तर कोर्ट आपल्याला मुलांची कस्टडी देईल का? व्हिजिटिंग राईटस् तरी देईल का ? मुलांच्या भवितव्याचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपल्याला सहभागी होता येईल का ? याचा विचार करावा लागतो. अर्थार्जनाचे प्रश्न नोकरी बहुतेक वेळा नोकरी मिळवायला व नोकरी टिकवायला आपण समलिंगी आहोत हे सांगणं परवडत नाही. आपण समलिंगी आहोत असं सांगितलं तर त्या नोकरीसाठी आपण सर्वात योग्य असूनही आपल्याला निवडलं जाणार नाही ही जाणीव असते. मुलाखत घेणाऱ्याच्या मनात समलिंगी लोकांबद्दल अनेक गैरसमज असू शकतात. अशा व्यक्तीला मी निवडलं तर लोक माझ्या बाबतीत काही गैरसमज करून घेतील का ?, हा माणूस ऑफिसमध्ये कसा वागेल ?, यानी कुणाशी असभ्य वर्तन केलं तर ?, हा कुणाला नादी लावेल का ?, इतर सहकार्यांना असा माणूस ऑफिसमध्ये चालेल का? आपली लैंगिकता लपवावी लागणं हा आपल्यावर होणारा मोठा अन्याय आहे हे जाणूनही काही करता येत नाही. कोणीच नोकरी दिली नाही तर काय खायचं? कसं जगायचं? म्हणून बहुतेकजण आपली लैंगिकता जाहीर करत नाहीत. पूर्वी एका नोकरीत, मी एका व्यक्तीला कामासाठी निवडलं होतं. तो कामासाठी अत्यंत योग्य होता. तो थोडा बायकी होता. त्याची लैंगिकता मला माहीत नव्हती. अंतिम मुलाखतीच्या वेळी जेव्हा मी, माझा मॅनेजर व तो बसलो तेव्हा माझ्या मॅनेजरनी त्याला पाच मिनिटात कटवलं. तो गेल्यावर कुचकटपणे मला म्हणाला, 'हे बायकी इंद्रधनु ८४ ..... पात्र नको.' मला मनात खूप राग आला. त्याची बाजू घेतली तर मॅनेजरला माझ्याबद्दल शंका येईल या भीतीने गप्प बसलो. त्याची बाजू घेऊन मी बोललो नाही. मला माझ्या वर्तनाची आजही खूप लाज वाटते. जर तिशीपर्यंत लग्न झालं नसेल तर एच. आर. (Human Resources ) ची लोकं व इतरही सहकारी विचारतात, 'तुम्ही अजून लग्न का केलं नाही?', 'कधी करणार?', 'स्थळ मिळावायला मदत करू का?" अशा वेळी खोटं बोलावं लागतं, उत्तर टाळावं लागतं किंवा आपली लैंगिकता सांगावी लागते. 113 नोकरी लागल्यावर आपली लैंगिकता जाहीर केली (किंवा इतर लोकांकडून कंपनीच्या कानावर गेली) तर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण कुठे नोकरी करतो आहोत यालाही महत्त्व आहे. जर कारखान्यात शॉप फ्लोअरवर एखादा कामगार समलिंगी आहे हे कळलं तर त्याला कदाचित त्याचे सहकारी त्रास देऊ शकतात. थट्टा, शिविगाळ कदाचित मारहाणसुद्धा... काही वेळा अशा त्रासाला कंटाळून समलिंगी व्यक्ती हातची चांगली नोकरी सोडून देते. "मी मध्ये काम करतो. मॅनेजमेंट अगदी उदारमतवादी आहे. त्यांना मी गे आहे हे माहीत आहे. पण माझे सहकारी मला त्रास देतात. माझी थट्टा करणं, माझ्या वस्तू लपवून ठेवणं अशा अनेक प्रकारे हैराण करतात. शेवटी मी वैतागून तक्रार केली. मॅनेजमेंटनी सगळ्यांना सांगितलं की असं जर परत झालं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट अॅक्शन घेतली जाईल. तेव्हापासून हा त्रास थांबला. पण आता मला सगळ्यांनी पूर्णपणे वाळीत टाकलंय. मी माणूस नाही का? माझा लैंगिक कल सोडला तर माझ्यात आणि इतरांच्यात काय फरक आहे ?” सगळयानांच आपली लैंगिकता सांगून त्रास होतोच असं नाही. डॉ. राज राव म्हणाले, “मला हा प्रॉब्लेम नाही आला कारण भी लोकांच्या मनात समलैंगिकतेबद्दल जे गैरसमज आहेत, भ्रम आहेत ते दूर करीत असतो. लोकांना जे वाटतं की समलिंगी व्यक्ती ही फक्त सेक्ससाठी भुकेली असते, ती व्यक्ती जबाबदार वर्तणूक करू शकत नाही. हे सगळं मी खोडून काढलं. भी पुणे विद्यापीठात 'क्विअर स्टडीज सर्कल' (Queer Studies Circle) चालवतो. सगळ्यांना माहीत आहे की हा गट सिनेमातल्या, चित्रकलेतल्या, साहित्यातल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पैलूंचा लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. हा ग्रुप काही डेटिंगसाठी जमत नाही. आपण अनेक वेळा शिक्षकांनी, अध्यापकांनी स्त्रियांची छेडछाड केलेली ऐकतो. माझ्या बाबतीत असं कधीही घडणार नाही. माझी समलैंगिकता हा खूप गंभीर विषय आहे असं मी मानतो व म्हणूनच माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे. याच्यामुळेच माझ्या वाट्याला द्वेष आला नाही. फक्त प्रेम आणि आदर मिळाला. " इंद्रधनु काही आय.टी. (Information Technology) कंपन्यांचं धोरण उदारमतवादी असतं. एक HR मॅनेजर म्हणाले, “आम्हाला तुमच्या लैंगिकतेशी काहीही कर्तव्य नाही. तुझं काम व्यवस्थित असल्याशी आम्हाला मतलब." " . जागतिकीकरणामुळे आज अनेक पाश्चात्त्य लोक कामानिमित्त आपल्या देशात येऊ लागले आहेत. आपल्या देशातल्या अनेक जणांना परदेशी लोकांबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे काही कंपन्या आपल्या कामगारांसाठी लैंगिकतेबद्दल संवेदनशीलतेच्या कार्यशाळा भरवतात. हे बदल स्वागतार्ह आहेत. पण काही कंपन्यांचं म्हणणं आहे की जोवर आयपीसी ३७७ बदलत नाही तोवर आम्हाला समलिंगी व्यक्तींसाठी काही करता येत नाही. [61] काही वेळा उघडपणे अन्याय होत नाही पण सूक्ष्म स्तरावर होऊ शकतो. किती जबाबदारीचं काम अशा व्यक्तीला द्यायचं? बढती द्यायची का? कधी? पगारवाढ किती द्यायची? याच्या/हिच्या हाताखाली कोणी काम करायचं? हा/ही कुणाला रिपोर्ट करणार? हे निर्णय घेण्यात सूक्ष्म स्वरूपात त्या व्यक्तीच्या लैंगिकतेचा विचार होऊ शकतो. जमीर कांबळे म्हणाले, "सगळे माझ्याशी चांगले वागतात. काहीच प्रॉब्लेम नाही. पण मागच्या वर्षी मी व माझे काही सहकारी बाहेरगावी गेलो होतो. तेव्हा प्रत्येक बेडरूममध्ये दोघं जण अशी बेडरूम शेअर केली. माझ्या बेडरूममध्ये कोणीच यायला तयार नव्हतं. मला स्वतंत्र खोली मिळाली. एक प्रकारे चांगलं झालं पण त्याचबरोबर आपल्याला वेगळं केल्याचं मनाला लागलं.” या अशा उघड आणि सूक्ष्म स्वरूपाच्या भेदभावामुळे उघडपणे समलिंगी असलेल्या व्यक्तींना आपण कितीही हुषार असलो, मनापासून काम करणारे असलो तरी आपल्या कामाची किंमत कमी राहणार असं वाटू लागतं व याचा महत्त्वाकांक्षेवर वाईट परिणाम होतो. व्यवसाय व्यवसायात आपली लैंगिकता सांगायची नेहमी गरज नसली तरी आपली लैंगिकता कळली तर काही विशिष्ट व्यवसाय बंद करायची वेळ येऊ शकते. एखादा समलिंगी पुरुष ब्युटीपार्लर चालवत असेल व तो समलिंगी आहे हे सगळ्यांना माहीत असेल तरी त्याच्या व्यवसायावर काही विपरीत परिणाम होणार नाही, पण काही व्यवसाय असे असतात की जिथे लैंगिकता लपवणं गरजेचं होऊ शकतं. "मी भटजी आहे. सत्यनारायणाची पूजा सांगतो, लग्न, मुंज लावतो. मी समलिंगी आहे हे उघडपणे सांगितलं तर वाट लागेल माझ्या व्यवसायाची." इंद्रधनु. ज्या व्यवसायात आपण भिन्नलिंगी पुरुष आहोत हे दाखवण्यावर खूप पैसा असतो, अशा ठिकाणी आपण समलिंगी आहोत हे उघडपणे सांगणं आर्थिकदृष्टया परवडणारं नसतं. उदा. सिनेमा नट. इथे हिरो 'ही मॅन' आहे हे सदैव प्रेक्षकांपुढे मिरवावं लागतं. जर घरचा मोठा व्यवसाय असेल, किंवा घरची खूप श्रीमंती असलेल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती समलिंगी असेल तर त्याच्या/तिच्या मनात हा विचार येऊ शकतो की, जर आपण समलिंगी आहोत हे घरच्यांना कळलं व त्यांनी आपल्याला घराबाहेर काढलं, तर ? एवढ्या श्रीमंतीत वाढल्यावर आता नव्याने आपण आपल्या पायावर उभं राहू शकणार का? हे सगळं ऐश्वर्य लाथाडायची आपली तयारी आहे का ? का लग्न करून, मालमत्तेवर अधिकार दाखवून बाहेर आपले समलिंगी संबंध चालू ठेवायचे? अशा बहुतेकांना घरच्यांना सांगायची जोखीम घ्यायची तयारी नसते, याला फार थोडे अपवाद आहेत. मानवेंद्र गोहील हा बरोड्याजवळच्या राजपीपला घराण्याचा राजपुत्र. २००६ साली त्यानी एका वर्तमानपत्राला जाहीरपणे सांगितलं को तो समलिंगी आहे. त्याच्या घरच्यांनी जाहीर नोटीस दिली की, आतापासून त्याचा आणि राजपीपला घराण्याचा काहीही संबंध नाही. [62] त्यावर तो म्हणाला, “मी समलिंगी आहे. मला आता क्लोजेटमध्ये राहाणं शक्य नाही.” काही महिन्यांनंतर त्याच्या घरच्यांनी त्याला परत स्वीकारलं, व २००७ च्या उत्तरार्धात त्याला 'ऑप्रा विनफ्री' शोवर बोलावण्यात आलं. इंद्रधनु... ८७ लैंगिकतेचा स्वीकार जी व्यक्ती स्वतःच्या समलैंगिकतेला स्वीकारते, आणि हळूहळू आजूबाजूच्या लोकांना सांगायला लागते, या प्रक्रियेला 'कमिंग आउट' असं म्हणतात. आपण जसजसं आपल्याला स्वीकारायला लागतो तसतसं आपण कोण आहोत हे लपवून ठेवणं दुटप्पीपणाचं वाटायला लागतं. हे दुटप्पी धोरण स्वीकारून आपण आपल्यावर अन्याय करतो आहोत असं वाटायला लागतं. आपलं आपल्यावर प्रेम आहे ना? आपण आपल्याला स्वीकारलं आहे ना? मग आपण कोण आहोत ते जगाला का सांगू नये? आपली लैंगिकता इतरांना सांगितल्यावर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतील याची जाणीव असून सुद्धा आपली लैंगिकता इतरांना सांगणं हे त्या समलिंगी व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं बनतं. कोणाला सांगू? कधी सांगू? कसं सांगू? याचा विचार सुरू होतो. प्रत्येकाचा 'कमिंग आउट'चा रस्ता वेगळा असतो; कोणाला सांगायचं ही निवड वेगळी असते; कधी सांगायचं ती वेळही वेगळी असते. कुणालाही आपली लैंगिकता सांगायच्या अगोदर त्या निर्णयाचा सर्व बाजूनी विचार करावा लागतो. काहीजणांना 'सरव्हायवल स्किलस्' खूप कमी असतात. कोणापाशी बोलायचं, कधी बोलायचं याचा विचार ते अजिबात करत नाहीत. स्वतःची लैंगिकता स्वीकारायच्या अगोदरच आपण 'आउट' झालो तर कोणते परिणाम होऊ शकतात याचा अजिबात विचार न करता, भावनाविवश होऊन कुणासमोरही 'आउट' होतात आणि पस्तावतात. "मी त्याला सांगितलं की मी समलिंगी आहे तर त्यानी तडक माझ्या घरी जाऊन आई-वडिलांना सांगितलं की, तुमचा मुलगा काय म्हणतोय बघा. आता घरच्या सगळ्यांना कळलंय की मी कोण आहे आणि ते मला सारखी नावं ठेवत असतात. " 'आऊट' व्हायच्या अगोदर खालील मुद्यांचा विचार व्हावा ‘आउट’ होणं हे आयुष्यभर टप्या टप्प्यानी चालू असतं. आज एकाला सांगितलं पुढच्या महिन्यात दुसऱ्याला सांगितलं अशा तऱ्हेने 'आउट' होणं चालू असतं. प्रत्येक व्यक्तीला सांगताना ती व्यक्ती कोण आहे, ती वेळ योग्य आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण 'आउट' व्हायला लागतो तेव्हा, ती व्यक्ती आपली इच्छा नसताना सगळ्या जगासमोर आताच आपल्याला 'आउट' करणार नाही ना याचा आधी अंदाज घ्यावा. इंद्रधनु... ८८ एकदा 'आउट' झालं की आपले सगळे प्रश्न संपतील हा गैरसमज मनात बाळगू नये. तुमचे आताचे प्रश्न कदाचित संपतील पण नवे प्रश्न उभे राहतील. कुणाच्याही दबावाखाली 'आउट' होऊ नये. 'आउट' होण्याची इच्छा मनातून यावी. याला अपवाद- काहीजणांना सांगायची पाळी येत नाही, काहीतरी कारणानी घरच्यांना कळतं किंवा संशय येतो. मग घरचेच लोक अगदी नाइलाजानी हा विषय काढतात. "मागच्या माहिन्यात माझ्या आईनं माझ्या खोलीत एक होमो पोर्नोग्राफिक मासिक पाहिलं आणि भांडं फुटलं.” 'आउट' होण्याचा भावनिक ताण खूप असतो. मनाची पूर्ण तयारी झाल्यावरच बोललेलं चांगलं. आज 'आउट' झालो आणि उद्या त्याचा ताण सहन न होऊन परत 'क्लोजेट'मध्ये जायचं अशी द्विधा मनःस्थिती नसावी. मन खंबीर करावं. आपल्या जवळचे लोक नक्कीच भावनिकदृष्टया आपल्याला ब्लॅकमेल करू शकतात. अभ्यास, पूर्वतयारी केल्याशिवाय, सगळ्या गोष्टींचा नीट विचार केल्याशिवाय 'आउट' होऊ नये. पूर्वतयारी आपल्या लैंगिकतेबद्दल आपलं काय मत आहे? आपण आपली लैंगिकता पूर्णपणे स्वीकारणं महत्त्वाचं आहे, तसं नसेल तर आपल्या विषयाची जास्तीत जास्त माहिती गोळा करावी, समजून घ्यावी; आऊट असलेल्या समलिंगी लोकांशी बोलावं; समलिंगी आधार गटात हा विषय मांडावा; एखाद्या संवेदनशील काऊन्सेलरबरोबर बोलावं. आपल्याला काय शंका आहेत, भीती आहे व गैरसमज आहेत त्याचं निरसन करून घ्यावं. या विषयावरची पुस्तकं वाचावीत. (काही पुस्तकांची यादी परिशिष्ट क मध्ये दिली आहे.) विवेक आनंद (हमसफर ट्रस्टचे सीइओ) म्हणाले, "स्वतःच्या लैंगिकतेबद्दल जर नकारात्मक भावना असतील तर त्या प्रथम गेल्या पाहिजेत. माझं नेहमी सांगणं असतं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाही तोवर तुम्ही 'आउट' होऊ नका.” कुणाला सांगावं? कुणाला पहिल्यांदा सांगायचं? एखाद्या ओळखीच्या समलिंगी व्यक्तीला ? का एखाद्या जवळच्या मित्राला ? भावाला? बहिणीला? आई-वडिलांना? ऑफिसमधल्या एखाद्या सहकाऱ्याला? यातला कोण आपल्याला स्वीकारायची जास्तीत जास्त शक्यता आहे? अशा व्यक्तीची निवडप्रक्रिया हळूहळू सुरू होते. ही निवड करताना त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? ती व्यक्ती लगेच ही गोष्ट गावभर तर करणार नाही ना ? ती व्यक्ती इंद्रधनु... ८९ लैंगिक विषयांबद्दल किती संवेदनशील आहे? ती व्यक्ती किती समजुतदार आहे? तिची या विषयावरील मतं काय आहेत? या सगळ्यांचा अंदाज लावला जातो. मित्र / सहकाऱ्यांना सांगणं मित्र/सहकारी यांना सांगण्याअगोदर त्यांची प्रतिक्रिया काय येईल याचा अगोदर अंदाज घ्यावा लागतो. सुरुवातीला बोलता बोलता हळूच या विषयाबद्दल अलिप्त वक्तव्य केलं जातं. उदा. काल 'माय ब्रदर निखिल' पाहिला. यावर काय प्रतिसाद. मिळतो हे ताडलं जातं. ऐकणाऱ्याला काहीच वाटलं नाही, समलिंगीद्वेष्टी भावना व्यक्त झाली नाही तर अधूनमधून या विषयावरची व्यक्तव्यं वाढविली जातात. मित्र / सहकाऱ्यानी समलिंगीद्वेष्टं विधान केलं तर पाऊल मागं घेतलं जातं. हे पाऊल टाकणं सोपं नसतं. एखाद्याला जर विश्वासात घेऊन सांगितलं तर आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला स्वीकारावं, आधार द्यावा. पण त्यानी त्याचा अर्थ असा काढला 'तू मला का सांगतोयस? तुला काय वाटतं मी तुझ्या सारखा आहे?' तर त्याच्या असुरक्षिततेमुळे त्याची प्रतिकिया खूप वाईट असू शकते. तो त्या समलिंगी व्यक्तीला झिडकारण्याची शक्यता असते. काही वेळा समलिंगी व्यक्ती आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला सांगतो (की, त्याच्यावर प्रेम आहे). जर त्या मित्राने झिडकारलं तर हा मानसिक धक्का असह्य होऊ शकतो. त्यामुळे कुणालाही सांगताना त्याची वाईट प्रतिक्रिया काय असू शकेल याचा विचार व्हावा आणि मनाची तशी तयारी ठेवावी. तुम्ही किती ठामपणे तुमची लैंगिकता सांगता याला महत्त्व आहे. जर तुमच्या सांगण्यात अनिश्चितता असेल तर ती त्यांच्यापर्यंत पोहचते व ते तुमच्याकडे त्याच अनिश्चित नजरेने बघतात. तुम्हाला तुमच्या लैंगिकतेवर काही उपाय करायला सांगतात. मित्रांना आपली लैंगिकता कळल्यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. काही मित्र दूर जातात, तर काहींना भीती वाटते की, तो समलिंगी मित्र त्यांच्याकडे लैंगिकदृष्ट्या बघेल. काही मित्रांशी संगत टिकते पण आपली लैंगिकता सदैव त्यांच्या आणि आपल्यामधली दरी बनते. काही मित्र/मैत्रिणी त्यांच्या समलिंगी मित्राला / मैत्रिणीला पूर्णपणे स्वीकारतात; ज्याची त्याची लैंगिकता ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे असा विचार करतात. आई-वडिलांना सांगणं आई-वडिलांना सांगायचं असेल तर त्यातल्या त्यात कोण समजून घेईल? अनेक जणांना वाटतं की आई समजून घेईल पण प्रत्येकाने स्वतःचा अंदाज घ्यावा. " मी पहिल्यांदा आईला सांगितलं. तिला धक्का बसला तरी ती लगेच सावरेल हा अंदाज होता. वडील कधीच स्वीकारणार नाहीत याची कल्पना होती. माझा अंदाज इंद्रधनु... ९० बरोबर ठरला. वडिलांना अजूनही याचा त्रास होतो पण आई आता एकदम OK आहे.” "माझ्या अपेक्षेपेक्षा दोघांनी खूप त्रास करून घेतला. सदैव रडत बसायचे. मला वाटत होतं की त्यांना धक्का बसेल पण इतका जोराचा बसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी जन्माला आल्याबरोबर मेलो का नाही हेच वाक्य सारखं मला ऐकवायचे. सुदैवाने माझ्या बॉयफ्रेंडने मला खूप साथ दिली. त्याच्या आईने त्याला स्वीकारल्यामुळे, त्याच्या आईचा मला खूप आधार मिळाला. " कधी सांगायचं हे तुमच्या घरचं वातावरण कसं आहे यावर अवलंबून असतं. काहीजण स्वतःची लैंगिकता स्वीकारली की, लगेच टप्प्याटप्प्याने 'आऊट' होतात. काहीजण जोवर लग्नाची वेळ येत नाही तोवर काहीच बोलत नाहीत. काहीजण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर सांगतात. जर घरच्यांनी घराबाहेर काढलं तर स्वत:च्या पायावर उभं राहता येईल हा विचार यामागे असतो. "मला माझे सगळे मित्र सांगायचे की आता सांगू नकोस. शिक्षण होऊ दे, स्वतःच्या पायावर उभा रहा नि मग सांग. मग वाईटात वाईट तुला घरच्यांनी घराबाहेर काढलं तरी तुझं काही अडणार नाही. पण मी माझ्या घरच्यांना ओळखत होतो. त्यांना त्याचा त्रास होईल असं मला वाटलं नाही आणि तसंच झालं. मी कॉलेजमध्ये असतानाच सांगितलं. आता टीव्ही वर 'विल अॅण्ड ग्रेस' लागलं की मला ते आवर्जून सांगतात.” काहीजण पालकांसमोर बसून हा विषय काढतात. एका वेळी शक्यतो एकाच व्यक्तीला सांगतात. आई आणि वडील दोघांना एकाच वेळी सांगत नाहीत. कारण दोघंजण एक होऊन आपल्यावर तुटून पडतील व त्यांचा रोष आपल्याला झेलता येणार नाही ही भीती असते. काहीजण पत्र लिहून ही माहिती कळवतात. काळजी ही घ्यावी लागते की ते पत्र फक्त ज्याला द्यायचं त्या व्यक्तीकडेच पोहोचेल. काहीजण आपल्या भावाला / बहिणीला सांगतात आणि त्यांनाच आपल्या आईशी किंवा वडिलांशी बोलायचा आग्रह धरतात. विषयाला कशी सुरुवात करायची? काहीजण एवढंच सांगतात की 'मला लग्न करायचं नाही'. घरचे लोक कारण विचारतात तेव्हा आढेवेढे घेतात आणि मग 'मला मुली आवडत नाहीत' असं सांगतात. याच्यापुढे जाऊन 'मी समलिंगी आहे' असं सांगतात. एक जण म्हणाला, "मी असं सांगितलं, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, विश्वास आहे. याचा एक महत्त्वाचा भाग आहे की मी स्वत:शी, तुमच्याशी प्रामाणिक राहणं. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या लहान-मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी आपण एकमेकांपाशी बोलत आलो आहोत. तेवढ्याच प्रांजळपणे मला आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी 'गे' आहे. " इंद्रधनु... ९१ प्रतिक्रिया जसं समलिंगी मुलं / मुली स्वतःची लैंगिकता कळायला लागल्यावर कुबलर रॉसनी नमुद केलेले टप्पे अनुभवतात तसंच आपला मुलगा/मुलगी समलिंगी आहे हे कळल्यावर पालकसुद्धा असे टप्पे अनुभवतात. अनेकांना खूप दुःख होतं व त्यातून सावरायला वेळ लागतो. फार थोडे पालक आपल्या मुलाची लैंगिकता लगेच स्वीकारतात. काहीजण तर आयुष्यभर स्वीकारत नाहीत. काहीजण आशा ठेवतात की हे तात्पुरतं आकर्षण आहे व काही दिवसांनी ते आपोआप कमी होईल. काहीजण आपल्या मुला/ मुलीवर राग काढतात. या रागाच्या मागे बाहेर कुणाला कळलं तर घरच्यांचं नाव खराब होईल ही भीती असते. वडिलांना लोक आपल्या पुरुषार्थाबद्दल शंका घेतील ही काळजी असते. आईला नवरा व इतर लोक (विशेषतः नवरा) आपल्याला दोष देतील ही काळजी असते. रागाबरोबर अनेक वेळा समलैंगिकतेबद्दल तिरस्कारही असतो. आपल्याच वाट्याला असं मूल का आलं? आपण कोणतं पाप केलं? याला वाढवण्यात आमची काय चूक झाली? याचं पुढे कसं होणार! अशा विचारांनी नैराश्य येतं. शेवटी नाइलाजाने काही पालक आपल्या मुला/मुलीला स्वीकारतात. पूर्णपणे स्वीकारणारे पालक फार थोडे असतात. प्रत्येकाचे पालक कोणत्या संस्कृतीत वाढले आहेत, किती संवेदनशील, समजुतदार आहेत, यावर त्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते. काही पालकांना ही कल्पना अजिबात सहन होत नाही. ते टोकाची भूमिका घेतात. मुलाला घराबाहेर काढतात. "माझ्या आई-वडिलांनी माझं एक प्रेमपत्र वाचलं. त्यांनी मला घराबाहेर काढलं. तू आम्हाला आणि आम्ही तुला मेलो आहोत असं म्हणाले.” अशा मुलांना घरच्या लोकांबद्दल खूप द्वेष असतो, की आपल्याला त्यांनी एका क्षणात दूर केलं. पण त्याच बरोबर त्यांनी स्वीकारावं म्हणून मन झुरतही असतं. सुरुवातीला मधूनमधून मन भरून येणं, चिडचिड होणं व नैराश्य येणं होतं. हळूहळू सवय होते. तरीपण बहुतेक जणांना घराची ओढ असते. मी आहे तसा मला स्वीकारावं असं वाटत असतं. काही पालक हा विषय परत काढत नाहीत. एका पातळीवर हे चांगलं असतं कारण मग लग्न करायची अपेक्षा बंद होते. पण दुसऱ्या पातळीवर इथे संवादही बंद होतो. इतरांनी बोलायचं पण आपण मात्र आपल्याबद्दल काही बोलायचं नाही यामुळे कोंडमारा होतो. हाही एक प्रकारचा अस्वीकारच आसतो. काहीजणांच्या घरच्यांची प्रतिक्रिया सौम्य असते. "माझ्या घरच्यांना काहीच वाटलं नाही. म्हणजे आईला थोडं वाईट वाटलं. 'तुझं कसं होणार ! म्हातारपणी तुझ्या इंद्रधनु ९२

      • संगतीला कोण!' असं म्हणाली. बाकी काही नाही. अर्थात याला कारण माझ्या आई-

बाबांना अनेक 'गे' मित्र आहेत. त्यामुळे मी 'गे' आहे हे सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया वाईट नव्हती." " अनेकजणांच्या पालकांकडून पहिली प्रतिक्रिया वाईट येते पण हळूहळू या धक्क्यातून आई-वडील सावरतात. आपल्या मुलाची लैंगिकता आपल्याला मान्य नसली तरी आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे या जाणिवेने या विषयावर विचार करू लागतात. आपला मुलगा समलिंगी आहे या सत्याला सामोरं जातात. मुलानी आपली लैंगिकता कुणाला सांगायची, कोणापासून लपवून ठेवायची, त्यानी त्यांच्या घरी राहायचं का वेगळ्या ठिकाणी राहायचं अशा अनेक गोष्टींवर मुलाबरोबर चर्चा करू लागतात. मुला / पालकांमध्ये कोणत्या तडजोडी करता येतील याची बोलणी होतात. हे एक-दोन महिन्यात होत नाही. याला काही वर्षं जावी लागतात. पण हळूहळू त्यांच्यात बदल होतो. “सुरुवातीला घरच्यांना खूप धक्का बसला. आज चार वर्षांनंतर आई म्हणाली की, एक जोडीदार शोध ( पुरुष जोडीदार) आणि रहा त्याच्याबरोबर. एकटा किती दिवस राहणार आहेस?" O इंद्रधनु... ९३ समलिंगी नाती प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की, आपला प्रेमाचा एक जोडीदार असावा. आयुष्याची सुखदुःखं जोडीने उपभोगावी. समलिंगी व्यक्तीही याला अपवाद नाही. अत्यंत प्रतिकूल वातावणात समलिंगी व्यक्ती जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात, नातं जोपासायचा प्रयत्न करतात. अनेकांना आयुष्यभर जोडीदार मिळत नाही, पण त्यांचा शोध संपत नाही. ज्यांच्या वाट्याला चांगला जोडीदार येतो त्याच्या बरोबर संसार करण्यासाठी काबाडकष्ट घेतात. त्यांची अत्यंत माफक अपेक्षा असते की, समाजाने त्यांना सुखाने जगू द्यावं. त्यांचा कोणाला त्रास देण्याचा हेतू नसतो, कोणाच्या वाट्याला जायचा हेतू नसतो. समाजाला भिऊन संसाराचा गाडा सुखाने ओढायचा ते प्रयत्न करतात. काही जणांच्या जोड्या अजिबात टिकत नाहीत, काहीजण काहीकाळ एकत्र राहिल्यानंतर वेगळे होतात, काहीजण अनेक वर्षं एकत्र राहतात. जशी समजुतदार नाती असतात तशीच जाच करणारी, जोडीदाराची पिळवणूक करणारी नातीही असतात. थोडक्यात भिन्नलिंगी जोडप्यांत जे जे रंग दिसतात ते ते रंग समलिंगी जोडप्यांमध्येही दिसतात. जोडीदाराचा शोध आपल्या समाजात समलिंगी जोडीदार शोधणं अवघड असतं. समलिंगी व्यक्ती बघून ओळखता येत नाहीत. जोवर समोरची व्यक्ती आपली लैंगिकता जाहीर करत तोवर ती व्यक्ती जोडीदार बनू शकेल असा अंदाज लावता येत नाही. जोडीदार शोधायचा असल्यास, (आपल्या लिंगाच्या) समलिंगी असलेल्या व्यक्तीची ओळख होणं आवश्यक असतं. एखाद्या आवडत्या व्यक्तीला स्पष्टपणे त्याची लैंगिकता विचारता येत नाही. त्यामुळे विविध तरल क्लृप्त्यांचा मार्ग वापरून हा अंदाज घ्यावा लागतो. हा सापशिडीचा खेळ अवघड असतो व जोखमीचाही असतो. मिळणा-या प्रतिसादाचा बरोबर अर्थ लावणं महत्त्वाचं असतं. कधी कधी उतावीळपणामुळे, मिळणाऱ्या संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. समलिंगी व्यक्तीचा उद्देश व्यवस्थितपणे त्या व्यक्तीपर्यंत पोहचला तरी, ती व्यक्ती जर भिन्नलिंगी लैंगिक कलाची असेल तर ती व्यक्ती चिडू शकते. जोडीदाराच्या शोधात काही समलिंगी व्यक्ती कधी कधी अतिरेक करतात. आपल्याकडे दुर्लक्ष केलं तरी एखाद्या भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या व्यक्तीचा पिच्छा पुरवतात (जशी काही मुलं, मुलींचा पिच्छा पुरवतात). यामुळे त्या व्यक्तीच्या मनात समलिंगी लोकांविषयी चीड निर्माण होते. इंद्रधनु ९४ काही जण एखादा समलिंगी मित्र मिळवतात व त्याच्या समलिंगी मित्रांची ओळख करून घेतात. त्या प्रत्येकाकडून त्याच्या मित्रांची ओळख करून घेतात व अशा रीतीने आपला समलिंगी मित्रपरिवार वाढवतात. हे सगळं करताना मनात जोडीदाराचा शोध कायम चालू असतो. ज्यांना कॉम्प्युटर वापरता येतो ते ई-मेल लिस्ट, चॅट रूमचा आधार घेऊन जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात.

जोडीदार मिळाला तरी समलिंगी व्यक्तींना एकांतात भेटण्याची ठिकाणं फार थोडी असतात. जोडीदाराला घरी घेऊन जाता येत नाही. अशा वेळी काही जण सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. "मला त्या पोलिसांनी समज दिली- 'तुम्ही चांगल्या घरचे दिसता, इथे काय करताय? जा इथून तुम्ही.' पण अशी चांगल्या शब्दात समज देणारे पोलिस कमी असतात. बहुतेक पोलिस अशांना चौकीवर नेतात व मारतात. चुकून एखाद्या वेळी भलतीच व्यक्ती पोलिसांच्या हाताला लागू शकते. माझ्या एका मित्राचं उदाहरण- “रात्री १० वाजण्याचा सुमार असेल. हवा खूप थंड होती. येताना लघवीला लागली. मी मुतारीत गेलो. बाहेर आलो व गाडी सुरू करणार तेवढ्यात एकानी माझ्या गाडीची किल्ली घ्यायचा प्रयत्न केला. म्हणाला 'इथे तू काय धंदे करायला आलास?' मी म्हटलं 'मी लघवीला आलो होतो. मी या वाटेनी चाललो होतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही.' त्यानी मला जबरदस्तीनं ठाण्यात नेलं. त्याच्या साहेबाने मला सोडून दिलं पण म्हणाला की, 'काय आहे की आपल्या देशात डेमॉक्रसी आहे ना, सगळे माजलेत. पुढच्या वेळी हा तिथं दिसला तर त्याला फोडून काढा". पोलिसांनी त्याला अशी वागणूक देणं चुकीचं होतं. एखादी व्यक्ती भेटली, आवडली, तिच्याशी नातं प्रस्थापित केलं तरी ते नातं या सनातनी समाजात टिकवणं, जोपासणं अवघड असतं. हे नातं जोपासायला कोणाचाही आधार नसतो. दोन्ही जोडीदारांना एकमेकांबद्दल खूप तळमळ असून सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं नातं जोपासण्याचा प्रयत्न करून बाकी सगळं नशीबावर सोडून द्यावं लागतं. खूप प्रयत्नांनी एखादी व्यक्ती मिळाली की, कुठलाही विचार न करता त्या व्यक्तीशी नातं जमवलं जातं. जर आपल्याला दीर्घ काळासाठी नातं हवं असेल तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो जो केला जात नाही. नातं टिकणं/न टिकणं हे सर्वस्वी आपल्या हाती नसलं तरी नातं जमवायच्या वेळी काही किमान गोष्टींचा विचार केला तर नंतर त्रास कमी होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांचं एकमेकांबद्दल भावनिक / शारीरिक आकर्षण असलं पाहिजे. एकतर्फी प्रेम असेल तर त्याला यश येऊ शकत नाही. उदा. दोघातला एक जण समलिंगी लैंगिक कलाचा आहे पण दुसरा भिन्नलिंगी लैंगिक कलाचा आहे. तो समलिंगी पुरुष त्या भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषावर जीव लावून प्रेम करतो. इंद्रधनु... ९५ तो आपल्यापाशी रहावा म्हणून त्याच्यासाठी वाट्टेल ते करतो. भिन्नलिंगी लैंगिक कलाचा पुरुष आपल्याला इतकं महत्त्व मिळतंय याचा पुरेपूर फायदा उठवतो. गरज लागली की जवळ येतो आणि गरज संपली की पाठ फिरवतो. "मला तो खूप आवडतो. त्याच्याशिवाय मला काहीही सुचत नाही. पण तो साला म्हणतो की मी काय तुझ्यासारखा गांडू आहे का? मला शिव्या देतो, वाट्टेल ते बोलतो. गरज लागली की मग दोन-चार दिवस खूप गोड बोलतो. परत माझ्या आशा उंचावतात. मग माझ्याकडे पैसे मागतो. त्याला माहीत आहे की मी नाही म्हणू शकत नाही. एकदा पैसे मिळाले की परत शिव्या देणं सुरू. या सगळ्या त्रासामुळे मला दारूचं व्यसन लागलं.” जसे काही समलिंगी पुरुष भिन्नलिंगी लैंगिक कल असलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडतात आणि आज ना उद्या तो आपल्याला स्वीकारेल या आशेवर राहतात, तसंच काही वेळा काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या स्त्रिया समलिंगी पुरुषांच्या प्रेमात पडतात. त्या पुरुषानी जरी सांगितलं की 'मी समलिंगी आहे. मला तुझ्याबद्दल व इतर स्त्रियांबद्दल आकर्षण वाटत नाही', तरी अशा स्त्रिया हे मनावर घेत नाहीत. आज ना उद्या तो बदलेल या आशेवर त्या राहतात. काही स्त्रिया एखादा समलिंगी पुरुष आपल्यावर भाळत नाही हा स्वतःचा अपमान समजतात. आपण दिसायला सुंदर आहोत, कोणत्याही पुरुषाला आपण वश करू शकतो अशी त्यांची समजूत असते. अशा स्त्रियांसाठी समलिंगी पुरुष एक आव्हान ठरतं आणि त्या स्वतःचं हसं करून घेतात. जोडीदार भेटल्यावर, सुरुवातीला जरी खरी माहिती दिली नसली तरी हे नातं दीर्घ काळ जोपासायची इच्छा होईल तेव्हा जोडीदारांनी एकमेकांना संपूर्ण व खरी माहिती द्यावी. त्याचबरोबर दोघांची नीतिमूल्यं समान पातळीवरची आहेत का? हे जाणून घ्यावं. नीतिमूल्यं समान नसतील तर खूप ताण-तणाव निर्माण होऊ शकतो. अशी नाती जोपासण्यात ताकद पणाला लावायची [? याचा नीट विचार व्हावा. जर दोघंही वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे असतील तर धार्मिक, सांस्कृतिक पैलू वेगळे असल्यामुळे दोघंजण एकमेकांना ज्याचेत्याचे रीतीरिवाज पाळण्यास मुभा देणार का? आपल्या रीतीरिवाजात जोडीदारांनी सहभागी व्हावं असा हट्ट असणार का ? जोडीदाराची सहभागी व्हायची तयारी नसेल तर त्या नात्यात हा विषय किती वादास्पद होईल याचा विचार व्हावा. “माझा एक मुस्लिम जोडीदार होता. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. काही काळानंतर तो म्हणाला की, मी त्याची बायको आहे तर मी धर्मांतर केलं पाहिजे. मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं आणि नातं तोडून टाकलं. जो माणूस मला माझ्या धर्मासकट स्वीकारू शकत नाही अशा माणसाशी कसं नातं ठेवायचं?" इंद्रधनु... ९६ ज्या जोडप्यांना धर्म, अध्यात्माबद्दल फारशी ओढ नसते किंवा एकाच धर्माचे असतात तिथे या विषयात टोकाचे मतभेद असण्याची शक्यता कमी असते. “आम्ही दोघंही जोडीने पूजा-पाठ करतो. दोघांनाही त्यामुळे प्रसन्न वाटतं. पूर्वी आम्ही धार्मिक उत्सवात भाग घ्यायचो नाही पण हळूहळू कळत-नकळत हे बदललं. उत्सवात आमचे नातेवाईक येतात. आम्हालाही ते बोलावतात आणि वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी आम्हाला त्यांच्या सांस्कृतिक उपक्रमात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हीही आनंदाने या प्रयत्नात सहभागी झालो आहोत.दोघंही एकाच धर्माचे असल्याने आमच्यात मतभेद होत नाहीत. पण काही विनोदी गोष्टी घडतात. तो शैव आहे. मी वैष्णव आहे. त्यामुळे माझी आई घरी आली व पूजेच्या वेळी शंकराचे श्लोक जरा जास्त वाटले तर ती लगेच विष्णूस्तोत्र म्हणून भरपाई करते.” आपली लैंगिकता दोघाही जोडीदारांनी स्वीकारली आहे का? दोघांनी आपली लैंगिकता स्वीकारलेली असणं महत्त्वाचं आहे. एकीकडे नातं जोपासायचं आणि दुसरीकडे त्याच नात्याबद्दल जर मनात लाज असेल तर असं नातं टिकू शकत नाही. उदा. काही जणांवर धर्माचा खूप मोठा पगडा असतो आणि समलिंगी नात्यात विशेषतः संभोगाच्या बाबतीत काही जणांना खूप अपराधी वाटतं. याचा नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. "काही महिने मी त्याच्याबरोबर होतो पण सेक्सबद्दल त्याच्या कल्पना खूप वेगळ्या होत्या. सेक्स करायची त्याला इच्छा असायची पण त्याला ते पाप वाटायचं. सेक्स झाला की तो लगेच प्रार्थना करायचा आणि परमेश्वराला 'मला माफ कर' असं म्हणायचा. याच्यात कुठेतरी मला माझा, माझ्या प्रेमाचा अपमान वाटायचा. मला वाटलं कालांतरानी त्याचा दृष्टिकोन बदलेल. पण नाही. काडीमात्र फरक पडला नाही. शेवटी मला ते असह्य झालं आणि मी त्याला सोडलं." इन्सर्टिव्ह जोडीदार आपल्या रिसेप्टिव्ह जोडीदाराला आपल्या समान मानतो का? का रिसेप्टिव्ह जोडीदार कमी दर्जाचा आहे अशी इन्सर्टिव्ह जोडीदाराची धारणा आहे? रिसेप्टिव्ह जोडीदार इन्सर्टिव्ह जोडीदाराला समान मानतो का? का तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशी रिसेप्टिव्ह जोडीदाराची धारणा आहे? एकमेकांबद्दल समान धारणा नसेल तर हे नातं त्रासदायक ठरू शकतं. काही जोडप्यांमध्ये जो जास्त समजून घेणारा आहे, ज्याला नातं टिकवायची जास्ती जरूर आहे, अशाला वाईट वागणूक मिळते. सगळया तडजोडी त्यानं करणं अपेक्षित असतं. या अशा नात्यात बहुतेक वेळा जो रिसेप्टिव्ह जोडीदार आहे त्याला खालच्या दर्जाचं समजलं जातं. अनेक भिन्नलिंगी जोडप्यात जी 'हायरारकी' (उच्चनीच श्रेणीरचना) असते- पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ, तसंच नातं काही समलिंगी जोडप्यांमध्ये इंद्रधनु ... दिसतं. “मी खूप रडायचो. त्यानी माझ्याबरोबर रहावं म्हणून विनवण्या करायचो. तो उसने पैसे मागायचा, ते मी आनंदाने द्यायचो. ते पैसे मी परत सुद्धा कधी मागितले नाहीत. उलट हक्कानी तो माझ्याकडे पैसे मागतो याचा आनंद वाटायचा. वर्षापूर्वी त्याला रिक्षा घ्यायला मी माझ्या बँकेतील सगळे पैसे काढून दिले. तेव्हापासून त्याचं माझ्याकडे येणं कमी व्हायला लागलं. मग मी आजारी पडलो. त्याला निरोपावर निरोप धाडले. हा एकदाही फिरकला नाही. कळलं की तो एका दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरतोय.” काही जोडप्यांमध्ये छळ, मारहाण होताना दिसते. यातले अनेकजण झालेला अन्याय चूपचाप सहन करतात. 'त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो अधिकार दाखवतोय. त्यात चुकीचं काय?' असं विचारतात. त्याच बरोबर मनात एक भीती असते की, हा मिळायला एवढी वर्ष लागली, जर हा मला सोडून गेला तर मला परत कोण मिळणार? आणि मिळाला तरी कशावरून तो चांगला असेल? काही नाती ही पैशाकडे डोळा ठेवून जोपासली जातात. एखादी सामान्य आर्थिक परिस्थितीची व्यक्ती, दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीबरोबर पैशासाठी राहू शकते. श्रीमंत वृद्ध पुरुष एका तरुण पुरुषाला ठेवतो. तो तरुण पुरुष पैशासाठी हे नातं स्वीकारतो. जर त्या तरुणानी लैंगिक सुखासाठी इतर जोडीदार शोधला तर तो वृद्ध पुरुष मत्सराने ग्रासून जातो. त्या तरुणाला या ना त्या मार्गाने मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या तरुणाची गरज संपली किंवा त्याला या नात्यानी गुदमरायला झालं, की तो या नात्याला राम राम ठोकतो. एकनिष्ठ राहणं जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हा आपल्या नात्याचा पाया आहे का? काही जण हे गृहीत धरतात की दोघांनी लैंगिकदृष्टया एकनिष्ठ असलं पाहिजे. आपल्यामधील विश्वासाचा आणि प्रेमाचा हा एक मोठा पाया आहे. "आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्हाला हे नातं टिकवायचं आहे. आपला संयम सुटला तर इतर कोणतंही कुंपण हे नातं सुरक्षित ठेवायला उपलब्ध नाहीये. इतर कुणाच्या प्रेमात पडणं, त्याच्याबद्दल लैंगिक भावना निर्माण होणं हे गुण प्रत्येक माणसात आढळतात. पण त्याच्यासाठी आमचं नातं संकटात यावं असं आम्हाला वाटत नाही. आम्ही 'गे' पार्टीजना सुध्दा जायचं टाळतो. हे नातं मिळवायला आणि जोपासायला आम्ही खूप कष्ट घेतले आहेत. जे मिळवलं ते मोलाचं आहे आणि ते काही केल्या आम्हाला गमवायचं नाही.' " विवेक आनंद म्हणाले, "वैयक्तिकदृष्ट्या माझा नात्यावर विश्वास नाही. मला वाटतं सुरवातीचा प्रेमाचा कालावधी ओसरला की, ते कंटाळवाणं, रटाळ होतं. पण जर नातं ठेवायची इच्छा झाली तर एकाशीच ठेवीन. मग ते कितीही कंटाळवाणं झालं तरी चालेल. माझा ओपन रिलेशनशिपवर विश्वास नाही.” इंद्रधनु. ९८

      • नात्याचा अजून एक प्रकार आहे. त्याला ओपन नाती (Open Relationships)

म्हणतात. या नात्यात दोघंजण एकत्र राहतात. एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवतात. पण प्रत्येकाला इतर व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवायची मुभा असते. बाहेर कुणाबरोबर लैंगिक संबंध केले म्हणजे आपल्यातील प्रेम कमी होत नाही अशी त्यांची धारणा असते. “आमची ओपन रिलेशनशिप आहे. आम्ही दोघंही स्वतंत्रपणे इतरांबरोबर सेक्स करतो. यात आम्हाला काहीही विशेष वाटत नाही. खरं तर हा मुद्दा आपल्या नात्यात महत्त्वाचा नाही हे ठरविल्यानंतर डोक्यावरचा मोठा ताण कमी होतो. यामध्ये दोन काळज्या घ्याव्या लागतात. एक नेहमी आणि व्यवस्थितपणे कंडोम वापरायचा. दुसरी गोष्ट कधी कधी आपण एखाद्याच्या प्रेमात पडून वाहवत जाऊ शकतो. असं वाटत असेल तर लगेच माघार घ्यायची. आपल्या बॉयफ्रेंडबरोबर जे नातं आहे त्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं. आम्ही अनेक वर्ष एकत्र राहत आहोत आणि आतापर्यंत ही व्यवस्था उत्तम चालली आहे. " " जोडीदार आऊट आहेत का? जोडीपैकी दोघंही जण 'आउट' नसतील तर पुढे हे नातं कसं टिकणार यावर आधीच विचार व्हायला हवा. काहीजण आम्ही दोघंही (भिन्नलिंगी) लग्न करणार आणि तरीही हे नातं चालू ठेवणार असं ठरवतात. “त्यानी लग्न केलं, त्याला मुलं झाली. मला त्यानी सांगितलं की, तू घाबरू नकोस. लग्न कर. सर्व ठीक होईल. मीही लग्न केलं. मलाही मुलंबाळं आहेत. अधूनमधून अजूनही मला त्याचा सहवास लाभतो.” “मी लग्न केलं, त्यानी नाही केलं. अधूनमधून आम्ही भेटतो. पण आता पूर्वीसारखं नाही राहिलं. संसाराचा गाडा ओढताना मला त्याला वेळ देता येत नाही. घरच्यांकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. सुखदुःखाच्या वेळी तो जवळ असावा असं वाटतं. पण नसतो. याचा काही वेळेला खूप त्रास होतो. पण काय करणार?" काहीजणांना, आपल्या जोडीदाराने भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करून, आपल्याबरोबर लपूनछपून नातं चालू ठेवावं ही कल्पना पटत नाही. त्यांना ते चुकीचं वाटतं, कमीपणाचं वाटतं. “तो म्हणाला की, 'मी लग्न करून सुद्धा तुझ्याशी नातं ठेवीन.' मला खूप वाईट वाटलं. त्याला सरळ सांगितलं की, 'तुझं लग्न झालं की परत तुझं तोंड बघणार नाही.' त्याचं लग्न झालं. याला बरीच वर्षं झाली. अजूनही अधूनमधून तो माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो. मी भीक घालत नाही, घालणार नाही.” जर जोडीतला एकच जण 'आऊट' असेल तर जो 'आउट' आहे त्यालाच सारखी तडतोड करावी लागते. त्याचाच जास्त कोंडमारा होतो. आज ना उद्या जोडीदार 'आउट' होईल या आशेवर तो असतो. जर असं जाणवायला लागलं की त्या अर्धवट इंद्रधनु... ९९ स्थितीतच जोडीदाराला सदैव राहायचं आहे, 'आउट' व्हायचं पाऊल उचलायला तो तयार नाही, तर अशा वेळी भांडणं, मानसिक त्रास होणं स्वाभाविक असतं. हे वाद विकोपाला जाऊन नातं तुटू शकतं. “मी 'आउट' आहे पण माझा बॉयफ्रेंड 'आउट' नाही. आम्ही अनेक वर्षं एकत्र राहत आहोत. त्याच्या घरच्यांना वाटतं की आम्ही रूममेटस् आहोत. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होईल हे माहीत नाही. पण त्यांना काहीही वाटलं तरी आमचं नातं तुटणार नाही.' "मला तिच्या बरोबर रहायचंय पण ती धाडसच करत नाही. मी तिला किती वेळा म्हटलं की घरच्यांना सांग, जे होईल ते बघून घेऊ. आमची यावरून अनेक वेळा भांडणं झाली आहेत. काही दिवस मग आम्ही एकमेकींशी बोलत सुद्धा नाही. मग परत जवळ येतो. डोक्याला किती त्रास होतो! जास्तीत जास्त काय होईल, घरचे लोक बाहेर काढतील. काढू देत. आम्ही दोघीही नोकरी करतो. स्वतःच्या पायावर उभ्या आहोत मग असं अधांतरी किती दिवस रहायचं?” दोघातला एकच जण 'आऊट' आहे अशा नात्यात सामाजिक अडचणी खूप येतात. दोघांना जोडीने फिरता येत नाही. फिरलं तर कुणाला संशय तर येणार नाही ना, ही सदैव काळजी असते. मित्रमंडळी, नातेवाईकांकडच्या समारंभात सगळेजण आपापले जोडीदार घेऊन येतात. तिथे सदैव एकट्याने जावं लागतं किंवा जाणं टाळावं लागतं. अनेक भिन्नलिंगी लोकांनी आजवर या गोष्टी गृहीत धरल्या आहेत, त्यांना या गोष्टी खूप किरकोळ वाटतात. प्रत्यक्षात छोट्या छोट्या गोष्टींमुळेही नात्यावर ताण पडू शकतो. जर दोघं 'आउट' असतील तर जुने प्रश्न सुटतात पण नवीन समस्या उभ्या रहातात. पालकांना, आपला मुलगा घर सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार करणार याचा त्रास होऊ शकतो. ते दोघं त्याच शहरात संसार थाटणार असतील तर जास्त त्रास होतो. काही वेळा जर आपला एकुलता एकच मुलगा असेल तर त्यानी घर सोडून जाऊ नये, आपल्यापाशीच राहावं ही आई-वडिलांची इच्छा असते. जर दोन-तीन मुलं असतील तर जो समलिंगी आहे (ज्यानी लग्न केलं नाही) त्यानी आईवडिलांना सांभाळावं ही अपेक्षा असते. याच अपेक्षेबरोबर त्याच्या जोडीदाराने त्या घरात राहू नये हीही अपेक्षा असते. "बाकीच्या दोन भावांची लग्नं झाली आहेत. ते वेगवेगळे राहतात. माझं लग्न झालं नाही. म्हणून सगळ्यांनी हे गृहीत धरलंय की आई-वडिलांना मीच सांभाळायचं. आपल्याला स्वीकारल्याची किंमत मोजावी लागते. मला प्रायव्हसी मिळत नाही. घरी जोडीदाराला आणता येत नाही." इंद्रधनु १००

      • घरच्यांना समलिंगी नातं मंजूर नसेल तर घरात खूप भांडणं होऊ शकतात.

घरच्यांनी नाइलाजाने हे नातं स्वीकारलं तरी मनात राग सलत राहतो व तो कुठल्या रूपाने व्यक्त होईल हे सांगता येत नाही. जर ती समलिंगी व्यक्ती आजारी पडली तर तिच्या घरचे त्याच्या जोडीदाराला त्याला भेटण्याची परवानगी देणार का ? का, दोघांची ताटातूट करणार? जर ती आजारी व्यक्ती दगावली तर शेवटचे विधी त्याच्या जोडीदाराला करायला देणार का ? का, जोडीदाराला दूर सारून त्यावर सूड उगवणार? दोन पुरुषांनी ( किंवा दोन स्त्रियांनी) आपलं घर सोडून एकत्र राहणं हा मोठा निर्णय असतो. छोट्या गावात एकत्र राहणं खूप अवघड असतं. लोकांचा प्रखर विरोध असतो. अशा व्यक्तींना वेगळं करून डांबून ठेवणं, एकमेकांना भेटू न देणं, त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीने भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करायला भाग पाडणं असे प्रकार होतात. अशा वेळी काहीजण घर सोडून पळून जातात किंवा या जगात हे नातं कोणीही मान्य करणार नाही हे जाणून आत्महत्या करतात. [63] समलिंगी जोडप्यांना मोठ्या शहरात त्यांची जीवनशैली जगायचा वाव असतो. ज्यांना शक्य आहे ते स्वतःची जागा घेऊन राहतात. बाकीचे भाड्याची जागा घेऊन राहतात. मी माझ्या कार्यशाळेत एक प्रश्न विचारतो, “तुम्हाला एक जागा भाड्याने द्यायची आहे. कोणीही गिन्हाईक मिळत नाही. दोन पुरुष तुमच्याकडे आले आणि म्हणाले की, तुमचं डिपॉझिट आणि भाडं द्यायची आमची तयारी आहे. आम्ही एक समलिंगी जोडपं आहोत. तर तुम्ही या जोडप्याला तुमचं घर भाड्याने देणार का?" जवळपास सगळेजण ‘नाही' म्हणतात. कुणीही त्यांच्याबद्दल इतर माहिती विचारत नाही. कोणाकडून आलात? कुठे नोकरी करताय? काहीही नाही. ते एक समलिंगी जोडपं आहे एवढंच कारण त्यांना जागा न देण्यास पुरेसं होतं. कारण विचारलं तर 'शेजारचे आम्हाला नावं ठेवतील' असं सांगतात. म्हणून काही समलिंगी जोडपी रूममेट्स आहोत असं सांगून भाड्याच्या घरात राहतात. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपलं घरटं बनवण्याचा प्रयत्न करतात. लोकमत मधली एक बातमी [64] - सर्व बंधने झुगारत 'त्या' विवाहबंधनात अडकल्या! कोरपुट (ओरिसा), दि. ६ : युरोप आणि अमेरिकेतील समलिंगी विवाहाचं लोण ओरिसातील कोरपुटसारख्या जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावातही आता पोहोचलं आहे. आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा कोणताही गंध नसलेल्या घुमूर या खेड्यातील दोन मुलींनी समाजाची सर्व बंधनं झुगारत केलेला विवाह सध्या या भागात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय बनला आहे. O इंद्रधनु... १०१ लैंगिक आरोग्य समलिंगी जोडीदारांनी संभोगाच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्यात शरीराची स्वच्छता व जबाबदार लैंगिक वर्तन. शरीराची स्वच्छता शरीरस्वच्छतेच्या दृष्टीने दररोज सर्वांगाला साबण लावून अंघोळ करावी. पुरुषांच्या शिश्नमुंडावरचं जे कातडं असतं (fore-skin) त्याच्या आतल्या भागात एक स्त्राव येतो. तो वाळल्यावर त्यांची एक पांढरी पूड होते (स्मेगमा). ही पूड जास्त जमा झाली तर त्यानी दुर्गंधी येते म्हणून अंघोळीच्या वेळी शिश्नमुंडावरचं कातडं मागे करून साबणाने व पाण्याने शिश्नमुंड दररोज धुवावं. काही पुरुषांचं शिश्नमुंडावरचं कातडं खूप टाईट असतं. अशी व्यक्ती जर इनसर्टिव्ह भूमिका घेऊन गुदमैथुन करणार असेल, तर हे कातडं मागे सरकण्यास त्रास होतो, दुखतं व संभोगास अडचण येते. याला फायमॉसिस म्हणतात. शिश्न उत्तेजित झाल्यावर आपल्या शिश्नमुंडावरचं कातडं सहज शिश्नमुंडावरून मागे येतं का हे पहावं. जर मागे सरकत नसेल, त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जर फायमॉसिस असेल तर डॉक्टरांना एक छोटी शस्त्रक्रिया करून शिश्नमुंडावरचं कातडं काढून टाकता येतं. याला सुंता म्हणतात. जबाबदार लैंगिक वर्तन गुप्तरोग गुप्तरोगबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केल्याने गुप्तरोगाची लागण त्याच्या लैंगिक जोडदाराला होऊ शकते. गुप्तरोगांची लक्षणं पुरुष / स्त्रियांसाठी- जननेंद्रियांवर (योनी, लिंग, वृषण, संडासाच्या जागी, जांघेत) फोड येणं. हे फोड विविध प्रकारचे असू शकतात (दुखणारे, न दुखणारे; कोरडे, पाण्याने भरलेले; एक किंवा अनेक; छोटे किंवा मोठे); जननेंद्रियांवर जखमा होणं; योनी/लिंगाद्वारे दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणं; संडासाद्वारे रक्त जाणं; लघवी करताना जळजळ होणं. फक्त स्त्रियांसाठी- ओटीपोटात दुखणं. जर मागच्या दोन महिन्यात असुरक्षित संभोग झाला असेल व यातली काही लक्षणं दिसली तर ती गुप्तरोगाची लक्षणं असू शकतील. यातील अनेक लक्षणं इतर इंद्रधनु... १०२ गोष्टींमुळेही असू शकतात उदा. संडासाच्या जागी मूळव्याधीचे फोड येऊ शकतात, जननेंद्रियांवर उष्णतेने फोड येऊ शकतात, लघवीला जळजळ अनेक कारणांनी होऊ शकते. म्हणून अशी लक्षणं दिसली की तो गुप्तरोग आहे असा आपणच तर्क लावू नये. ही लक्षणं दिसली की, लगेच डॉक्टरांना भेटावं. आजार अंगावर काढू नये. जाणकार गुप्तरोगतज्ज्ञ किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घ्यावेत.

  • असुरक्षित संभोगाबद्दल खरी व संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी. (कोणत्या

प्रकारचा असुरक्षित संभोग झाला होता- योनीमैथुन / मुखमैथुन / गुदमैथुन; असुरक्षित संभोग करून किती दिवस झाले इ.) चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली तर डॉक्टरांकडून चुकीचं निदान होऊ शकतं. डॉक्टरांनीही संवेदनशीलता दाखवावी. अपमानास्पद वागणूक देऊ नये. इतर रुग्णांना ज्या दर्जाची सेवा दिली जाते त्याच दर्जाची सेवा याही रुग्णांना द्यावी.

  • औषधांचा कोर्स पूर्ण करावा. अर्धवट सोडू नये.
  • ज्या व्यक्तीला गुप्तरोग झाला आहे त्याचे जे जोडीदार आहेत (स्त्री किंवा पुरुष )

त्यांना गुप्तरोगाची लागण झाली आहे की नाही हे डॉक्टरांकडून तपासावं. जोडीदाराला जर गुप्तरोगाची लागण झाली असेल तर जोडीदारानीही औषध घेणं जरुरीचं आहे. नाहीतर बाधित व्यक्तीचा आजार बरा झाल्यानंतर जर त्यानी परत त्याच्या बाधित जोडीदाराबरोबर असुरक्षित संभोग केला तर गुप्तरोगाची लागण परत होऊ शकते.

  • कंडोमशिवाय संभोग करू नये.

एचआयव्ही/एड्स एचआयव्हीबाधित पुरुषाबरोबर दुसऱ्या पुरुषाने असुरक्षित गुदमैथुन किंवा मुखमैथुन केला तर एचआयव्ही विषाणु एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या रक्तातून किंवा वीर्यातून जोडीदाराच्या शरीरात प्रवेश करू शकतो. (जोडीदारांमध्ये दोघंही एचआयव्हीबाधित नसतील तर एकमेकांशी असुरक्षित संभोग करून एकमेकांपासून एचआयव्हीची लागण होवू शकत नाही. एचआयव्हीची लागण होण्यासाठी जोडीदारातल्या एकाला एचआयव्हीची लागण असणं अवश्यक आहे.) लागणीची शक्यता किती आहे हे कोणत्या प्रकारचा असुरक्षित संभोग झाला आहे यावर अवलंबून असतं. जर एका गुप्तरोगबाधित व्यक्तीने एका एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केला तर, एचआयव्हीबाधित व्यक्तीकडून एचआयव्हीचा विषाणू सहजपणे गुप्तरोगाच्या जखमांतून गुप्तरोगबाधित व्यक्तीच्या आत शिरू शकतो व त्यामुळे गुप्तरोगबाधित व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता खूप वाढते. इंद्रधनु... १०३ संभोगाचा प्रकार एचआयव्हीबाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग करून एचआयव्हीची जोडीदाराला लागण होण्याची शक्यता पुरुषांचा समलिंगी संभोग गुदमैथुन सगळ्यात जास्त शक्यता (या संभोगात रिसेप्टिव्ह जोडीदाराला इनसर्टिव्ह जोडीदारापेक्षा लागण होण्याचा जास्त धोका असतो.) काही प्रमाणात शक्यता मुखमैथुन स्वत:चा हस्तमैथुन शून्य शक्यता दोघांमधला हस्तमैथुन शून्य शक्यता मांडीत लिंग घालून केलेला संभोग शून्य शक्यता शरीर एकमेकावर घासून केलेला संभोग (बॉडी सेक्स) शून्य शक्यता चुंबन शून्य शक्यता कृत्रिम लिंग वापरून शून्य शक्यता (इतर कोणाचे स्त्राव त्यावर नसतील तर) स्त्रियांचा समलिंगी संभोग मुखमैथुन काही प्रमाणात शक्यता स्वत:चा हस्तमैथुन शून्य शक्यता दोघींमधला हस्तमैथुन शून्य शक्यता शरीर एकमेकावर घासून केलेला संभोग (बॉडी सेक्स) शून्य शक्यता चुंबन शून्य शक्यता कृत्रिम लिंग वापरून शून्य शक्यता ( इतर कोणाचे स्त्राव त्यावर नसतील तर) एचआयव्हीची लागण झाल्याची लगेच लक्षात येण्याजोगी कोणतीही दृश्य लक्षणं नाहीत. त्यामुळे एचआयव्हीबाधित व्यक्तीला अनेक वर्ष आपल्या शरीरात इंद्रधनु... १०४ एचआयव्हीचा विषाणु आहे हे कळत नाही. शरीरयष्टीकडे बघून जोडीदार एचआयव्हीबाधित आहे का नाही हे कळू शकत नाही. हळूहळू एचआयव्ही प्रमाण जस जसं शरीरात वाढायला लागतं तस तसं एचआयव्ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती नष्ट करतो. सी. डी. 4 ( रोग प्रतिकार करणाऱ्या पेशींचा एक प्रकार) पेशी नष्ट व्हायला लागतात आणि मग एक स्थिती अशी येते की शरीर कोणत्याच रोगाचा प्रतिकार करू शकत नाही. अशा वेळी कुठलाही आजार त्या व्यक्तीला होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. या शेवटच्या अवस्थेला एड्स म्हणतात. एचआयव्हीची लागण झाल्यापासू ते एड्सच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा सरासरी सात ने नऊ वर्षांचा कालावधी असतो. [65] एचआयव्हीची लागण झाल्यापासून ती व्यक्ती ज्या कोणाबरोबर ( स्त्री वा पुरुष ) असुरक्षित संभोग (गुदमैथुन / मुखमैथुन / योनीमैथुन) करते त्यांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता असते. एचआयव्हीची लागण झाली आहे की नाही हे फक्त रक्ताच्या चाचणीवरून कळू शकतं. ती चाचणी करण्याअगोदर गवाक्ष काळाचा (विंडो पीरिअड) चा विचार करणं गरजेचं असतं. असुरक्षित संभोग झाल्यास त्याच्या नंतर तीन महिन्यांनी (गवाक्ष काळ तीन महिन्याचा आहे) एचआयव्हीची रक्ताची चाचणी करून घ्यावी. तीन महिने पूर्ण होण्याच्या आत एचआयव्हीची चाचणी केली तर रिपोर्ट बरोबर येईल याची खात्री देता येत नाही. जर सरकारी एचआयव्ही काउन्सेलिंग व चाचणी केंद्रात गेलात तर एचआयव्ही काउन्सेलर्स कडून या विषयाची सगळी आवश्यक माहिती मिळू शकते. जर चाचणीसाठी परस्पर वैद्यकीय प्रयोगशाळेत गेलात तर ते ही माहिती पुरवत नाहीत. पूर्वी एचआयव्हीवर औषधं नव्हती. आता एचआयव्हीचा विषाणु काबूत ठेवणारी एआरटी औषधं उपलब्ध आहेत. ही औषधं एचआयव्हीचा विषाणु पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. पण एचआयव्हीच्या वाढीचा वेग खूप प्रमाणात कमी करतात. जेव्हा एचआयव्हीबाधित व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी होते त्यावेळी एआरटी औषधं सुरू करून ती आयुष्यभर नियमित घेण्यानी एचआयव्हीबाधित व्यक्ती दीर्घ काळ जगू शकते. एचआयव्हीबाधित व्यक्तींबद्दल अजूनही समाजात गैरसमज आहेत, भीती आहे. एचआयव्हीबद्दल माहिती देण्याच्या नावाखाली अर्धवट माहिती देणं; लोकांच्या मनात भीती निर्माण करणं; नीतिमत्ता शिकवणं घडत आलं आहे. याच्यातून एचआयव्हीबाधित लोकांबद्दल भीती निर्माण झाली आहे. पूर्वी हाडं, कवट्या दाखवून लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करण्यात येत होती. आता हाडं, कवट्या दिसत नसल्या तरी या विषयाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. इंद्रधनु... १०५ ज्या समाजात समलिंगी व्यक्तीचा स्वीकार होत नाही तिथे जी समलिंगी व्यक्ती एचआयव्हीबाधित आहे तिला किती त्रास होत असेल याची कल्पना करा. यातील कोणतीच गोष्ट कुणापाशी बोलायची सोय नाही. त्यात परत 'तुम्हा लोकांची हीच (एचआयव्ही/ एड्सची लागण होऊन मरायची) लायकी' असा अमानुष दृष्टिकोन आढळून येतो. एमएसएम पीएलएचए आधार गट (MSM PLHA Support Groups) काही संस्था समलिंगी एचआयव्हीबाधित लोकांसाठी आधारगट व ड्रॉप-इन- सेंटर्स चालवतात. अनिल कदम (सेफ सेलर्स क्लब, हमसफर ट्रस्ट, मुंबई) म्हणाले, "एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर हा रिपोर्ट कुणाला दाखवायचा हा समलिंगी आणि एमएसएम लोकांना मोठा प्रश्न पडतो. आपल्या जोडीदाराला किंवा घरच्यांना सांगितलं तर ते आपल्याला सोडून देतील, घरच्यांना आपल्या लैंगिकतेचा संशय येईल का? ही भीती असते. त्यामुळे अनेक वेळा आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं जात नाही आणि म्हणून मानसिक आधार मिळत नाही. त्यात परत एमएसएम आहे हे माहीत असलं आणि एचआयव्हीबाधित आहे हे कळलं तर लोकांची अशांकडे बघण्याची आणि वागायची दृष्टी अजूनच बदलते. काही पीएलएचए गट सरळ सांगतात 'तुम्ही इथे का आलात? तिकडे सेफ सेलर्स क्लबमध्ये जा ना, ते तुम्हाला सोयीस्कर पडेल.' याला कारण अनेक पीएलएचए समलिंगीद्वेष्टे आहेत. त्यांना समलिंगी लोक, बायकी लोक त्यांच्या गटात आलेले आवडत नाहीत. एचआयव्हीच्या प्रगत अवस्थेत शरीरयष्टी जेव्हा खालावते तेव्हा काही लोकांना संशय येतो. एमएसएम आहे हे माहीत असेल तर काही जण सरळ 'तुला एड्स झालाय का?' असं विचारतात. या सगळ्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं. नैराश्य येतं. घरच्यांना आपल्यामुळे त्रास उद्भवू नये, बहिणीच्या लग्नासाठी आपला अडथळा येऊ नये, म्हणून काही जण घर सोडून दुसरीकडे राहायला जायचा विचार करतात. पण जाणार कुठे? आपल्या गावी ? तिथे औषधोपचार मिळणार का? बरं दुसरीकडे राहायला जावं तर आर्थिकदृष्ट्या अनेकांना ते परवडणारं नसतं. हे सगळे प्रश्न समोर असतात, उत्तरं तर काही सापडत नाहीत आणि मग आत्महत्येचे विचार मनात यायला लागतात.” या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्यास अशा आधार गटांची फार मोठी गरज आहे. हे गट काऊन्सेलिंगची सुविधा, औषधं, पोषक आहार पुरवतात. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळण्याची मोलाची कामगिरी बजावतात. इंद्रधनु... १०६ सुरक्षित संभोग शिश्नावर कंडोम चढवून गुदमैथुन / मुखमैथुन / योनीमैथुन केला तर जोडीदारांचे स्त्राव (रक्त, वीर्य, योनीचं पाणी) एकमेकांच्या शरीरात शिरत नाहीत व म्हणून जर त्या दोघांपैकी कोणाला गुप्तरोग किंवा एचआयव्हीची लागण असेल तर त्या पासून जोडीदाराला संरक्षण मिळतं. म्हणून दर संभोगाच्या वेळी व्यवस्थितपणे कंडोमचा वापर करणं महत्त्वाचं आहे. अनेकजण संभोगाच्या वेळी कंडोम वापरत नाहीत. 'कंडोमने पुरेशी मजा येत नाही', 'नैसर्गिक वाटत नाही' अशा सबबी सांगतात. काहीजणांना जोखमीच्या वर्तनातून आपल्याला एखाद्या लैंगिक आजाराची लागण होईल असं वाटत नाही. ही माहिती सैद्धांतिक वाटते, कल्पित वाटते. अनेकजणांचा 'असे रोग मला नाही होणार' असा फोल आत्मविश्वास असतो. हा आत्मविश्वास कोणत्याही शास्त्रीय माहितीवर आधारित नसतो आणि तो एक दिवस महागात पडतो. 'जोडीदार दिसायला चिकणा व तब्येतीने चांगला असल्याशिवाय त्याच्या बरोबर भी जातच नाही' किंवा 'माझ्याशिवाय तो कुठे जात नाही. त्यामुळे त्याला कुठलीही लागण नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे' असल्या भाबड्या विश्वासावर अनेक जण एचआयव्हीबाधित झाले आहेत. सुंता केलेल्या इनसर्टिव्ह पुरुषांना एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता कमी असते असं संशोधनातून दिसून येत असल्यामुळे सुंता झालेल्या काही समलिंगी इनसर्टिव्ह जोडीदारांनी सोयीचा समज करून घेतला आहे की कमी शक्यता म्हणजे शून्य शक्यता. असा चुकीचा अर्थ लावू नये. काहीजणांना सुरक्षित संभोगाची माहिती नसते. ते समजतात की, एचआयव्हीची लागण एचआयव्हीबाधित स्त्रीपासून होते, बाधित पुरुषापासून होत नाही. टीव्हीवर किंवा इतर माध्यमांमार्फत एचआयव्ही, कंडोमच्या ज्या जहिराती दाखवल्या जातात त्यात एका बाधित पुरुषापासून दुसऱ्या पुरुषाला असुरक्षित संभोगाद्वारे एचआयव्ही किंवा गुप्तरोगाची लागण होऊ शकते ही माहिती पुरवली जात नाही. समलिंगी संभोगाला समाजमान्यता नसल्यामुळे या विषयावरची माहिती विचारायला, मिळवायला लोकांना भीती, संकोच वाटतो. कायद्याने समलिंगी संभोग करणं गुन्हा असल्यामुळे, लैंगिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना समलिंगी संभोग करणाऱ्यांपर्यंत पोहोचणं अवघड जातं. या सर्व कारणांमुळे कंडोमचा वापर खूप कमी आहे. “ 'नॅशनल सेंटीनेल सर्व्हेलन्स' २००५ ची आकडेवारी दाखवतं की, एमएसएम समूहातील ८% पेक्षा जास्त व्यक्ती एचआयव्हीबाधित आहेत पण इतर लोकांमध्ये एचआयव्हीबाधित व्यक्तींच प्रमाण १% पेक्षा कमी आहे, असा अंदाज आहे.... 'नॅशनल बेसलाईन बिहेवियर सर्व्हेलन्स' २००२ ची आकडेवारी दाखवते की ६८.६% एमएसएम इंद्रधनु... १०७ समूहाला सुरक्षित संभोगाचे मार्ग माहीत आहेत पण त्यातले फक्त ३६% च कंडोमचा वापर करतात. " [34] कंडोम वापरायची योग्य पद्धत १) कंडोमच्या वेष्टनावरची कालबाह्य तारीख (Expiry Date) तपासावी. जर कंडोम कालबाह्य झाला असेल तर तो शक्यतो वापरू नये. दुसरा कालबाह्य न झालेला कंडोम वापरावा. दुसरा कंडोम उपलब्ध नसेल तरच कालबाह्य झालेला कंडोम वापरावा. २) जर कालबाह्य तारीख (Expiry Date) वाचता येत नसेल, किंवा पाकिटावर छापली नसेल तर कंडोम पाकिटात सरकवायचा प्रयत्न करावा. तो सहज सरकत असेल तर कंडोम वापरण्यास हरकत नाही असं समजावं. जर कंडोम सहजपणे सरकत नसेल तर पाकिटातील वंगण वाळल्यामुळे कंडोम खराब झाल्याची शक्यता असते. इतर कोणता कंडोम उपलब्ध नसेल तरच हा (जुना) कंडोम वापरावा. ३) कंडोमचं पाकीट फाडायच्या अगोदर पाकिटातील कंडोम एका बाजूला सरकवावा व दुसऱ्या बाजूनं (ज्या बाजूला कंडोम नाही) पाकीट फाडावं. म्हणजे पाकीट फाडताना तुमचं नख लागून कंडोम फाटणार नाही. ४) कंडोम पाकिटातून काढल्यावर त्याच्यावर फुंकर मारून तो कोणत्या दिशेने उलगडायचा हे बघून घ्यावं. ५) कंडोमच्या टोकात हवा साठलेली असू शकते. तशीच हवा ठेवून जर कंडोम शिश्नावर चढवला तर संभोग करताना त्या हवेवर दाब येऊन कंडोम फाटू शकतो. कंडोम फाटण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. असं होऊ नये म्हणून कंडोमचं टोक चिमटीत पकड़ावं म्हणजे त्यातली हवा बाहेर पडेल व टोक चिमटीत तसंच पकडून कंडोम शिश्नावर चढवावा. इंद्रधनु... १०८ PR ६) शिश्न पूर्ण ताठ झाल्याशिवाय कंडोम चढवू नये. अन्यथा तो शिश्नावर नीट बसत नाही. ७) कंडोम पूर्णपणे चढवावा. कंडोम अर्धवट चढवला तर संभोग करतेवेळी तो निसटून येऊ शकतो. ८) संभोग करताना कंडोम फाटला अशी शंका आली तर लगेच थांबावं व शिश्न बाहेर काढावं. नवीन कंडोम चढवावा व मगच परत संभोग सुरू करावा. ९) वीर्यपतन झाल्यावर शिश्न ताठ असतानाच कंडोमची कड पकडून शिश्न व कंडोम बाहेर काढावा. १०) शिश्नावरून कंडोम काढताना शिश्न पहिल्यांदा गुदा (किंवा योनी) पासून बाजूला घ्यावं म्हणजे कंडोम काढताना गुदावर (किंवा योनीवर) वीर्य सांडणार नाही. ११) कंडोम काढल्यावर कंडोमला गाठ मारावी. १२) कागदात गुंडाळून कंडोम कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्यावा. संडासात टाकू नये. संडास तुंबू शकतो. काहीजण सुरक्षिततेसाठी डबल कंडोम वापरतात. डबल कंडोम वापरायचे का नाही याबद्दल दुमत आहे. डबल कंडोम वापरले तर एकावर एक घासून कंडोम फाटायची शक्यता असते; वरचा कंडोम सटकून गुदात किंवा योनीत राहून जायची शक्यता असते. डबल कंडोम वापरल्याने संवेदनशीलताही कमी होते. तर काहीजण सांगतात की, डबल कंडोम वापरल्यावर जोडीदारांना मानसिकदृष्ट्या जास्त सुरक्षित वाटतं; डबल कंडोम वापरले व त्यातला एक फाटला तरी दुसन्यामुळे संरक्षण मिळतं. कंडोमचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मुखमैथुनासाठी फ्लेवर्ड कंडोम (वेगवेगळ्या चवीचे कंडोम - उदा. बनाना, चॉकलेट, स्ट्रॉबेरी इ.) मिळतात. या कंडोमच्या वंगणात फ्लेवर मिसळलेला असतो. याच्याव्यतिरिक्त इतर प्रकारचेही कंडोम्स उपलब्ध आहेत. रात्री चकाकणारे (Fluorescent), सुगंधयुक्त (Scented), रेघा (Ribbed), ठिपके (Dotted) असलेले कंडोम्स इ. वंगण (Lubricants ) गुदमैथुनात (किंवा योनीमैथुनात) घर्षणाने कंडोम फाटू म्हणून कंडोमला वंगण लावलेलं असतं. हे वंगण पाणी आणि ग्लिसरिन यांच्या मिश्रणाने बनविलेलं असतं. वंगणामुळे घर्षण कमी होतं, रिसेप्टिव्ह पार्टनरला त्रास कमी होतो व कंडोम फाटायची शक्यता कमी होते. इंद्रधनु... १०९ ज्या वंगणानी घर्षण कमी होईल, शरीराला अपाय होणार नाही आणि ज्याच्यामुळे कंडोम फाटणार नाही असं वंगण वापरावं. गुदमैथुनासाठी कंडोमवर असलेलं वंगण पुरेसं नसतं. गुदमैथुनात घर्षण कमी व्हावं म्हणून काही पुरुष तेलयुक्त बंगणाचा वापर करतात. तेलयुक्त वंगणामुळे कंडोमची क्षमता कमी होते आणि कंडोम फाटण्याची शक्यता खूप वाढते. म्हणून तेलयुक्त वंगण वापरू नये. तेल ( उदाहरणार्थ खोबऱ्याचं तेल), क्रीम (उदा. व्हॅसलिन इ.), तूप, साखरेचा पाक, आईसक्रीम, जॅम, ग्रीस व तेल / तूप वापरून केलेला कोणताही पदार्थ वंगण म्हणून वापरू नये. जे वंगण पाण्यानी बनविलेलं असतं (पाणीयुक्त, ज्यात तेल/तुपाचा वापर नाही) असं वंगण वापरावं. अशा वंगणामुळे कंडोमची क्षमता कमी होत नाही. फार्मसीच्या दुकानात केवाय् जेली (KY Jelly) म्हणून पाणीयुक्त वंगण विकत मिळतं. हे वंगण गुदमैथुनासाठी वापरावं. समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या काही संस्था या वंगणाची लहान पाकिटं स्वस्तात विकतात. बहुतांशी लोकांना केवाय् जेली ची किंमत परवडत नाही. त्याच बरोबर समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांची स्वस्तातल्या केवाय् जेलीची पाकिटं बहुतांशी लोकांना उपलब्ध होत नाहीत. जर केवाय् जेली उपलब्ध नसेल तर याला पर्याय म्हणून गुदमैथुन करताना थुंकी किंवा मध वंगण म्हणून वापरता येतं. जोडीदाराशी संवाद जर जोडीदारांमध्ये समानतेचं नातं असेल तर कंडोम वापराबद्दल बोललं जातं. नाहीतर जोडीदार सोडून जाईल, आपला त्याच्यावर विश्वास नाही अशी तो समजूत करून घेईल व रागवेल (कदाचित मारहाण करेल) या भीतीने अनेक जण जोडीदाराबरोबर कंडोम वापराबद्दल बोलत नाहीत. आपल्या सुरक्षिततेबद्दलचा संवाद जोडीदाराबरोबर होणं अत्यंत आवश्यक आहे. जोडीदाराला कंडोम वापरायचं महत्त्व समजून सांगावं. जर आपल्या पाकिटात कंडोम नसतील, किंवा कंडोम मिळवता आले नाहीत किंवा जोडीदार कंडोम वापरण्यास तयार नसेल तर हस्तमैथुन किंवा बॉडी सेक्स करून गरज भागवावी. काही झालं तरी असुरक्षित गुदमैथुन करू नये. जोडीदार नाराज होऊन निघून गेला तरी चालेल ही मनाची तयारी ठेवावी. लैंगिक सुखासाठी कितीही आतुर असलात तरी असुरक्षित संभोगाची जोखीम घेऊ नये. आपल्या पाकिटात एक तरी कंडोम सदैव बाळगावा. 'कंडोम नाही तर संभोग नाही' हे धोरण कायम राबवावं. O इंद्रधनु ११० P* समलिंगी व्यक्तींसाठी आधारसंस्था समलिंगी व्यक्तींचे वैयक्तिक व सामाजिक प्रश्न बघता त्यांना आधार देणाऱ्या संस्थांची गरज असते. गेल्या दहा वर्षात समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या संस्था सुरू झाल्या आहेत. या संस्था मुख्यतः मोठ्या शहरातच आहेत. समलिंगी लोकांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणं, आधारगट चालवणं, काउन्सेलिंगची सुविधा पुरविणं अशा तऱ्हेची विविध कार्य अशा संस्था करतात. देणग्यांतून, आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थाचे उपक्रम राबवून या संस्था चालवल्या जातात. संस्थेची प्रसिध्दी ही सगळ्यात मोठी अडचण असते. काही सनातनी लोकांचा अशा संस्थांना विरोध असल्यामुळे संस्थांना प्रकाशझोतापासून दूर राहावं लागतं. याचा परिणाम असा होतो की ज्या लोकांपर्यंत संस्थेला पोहोचायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहचता येत नाही. अनेकांना आपण शोधत असलेली संस्था पलीकडच्या गल्लीत आहे, हे माहीत होत नाही. बहुतेक वेळा अशा संस्था 'वर्ड ऑफ माऊथ' प्रसिध्दीवर चालतात. आता इंटरनेटमुळे समलिंगी मुला/मुलींपर्यंत काही प्रमाणात पोहोचता येतं. हा प्रसिद्धीचा प्रश्न मोठ्या शहरात तर आहेच पण छोट्या शहरात, गावात तर खूप बिकट आहे. त्यामुळे असंख्य पुरुष/स्त्रियांना या संस्थांची गरज असूनसुद्धा त्यांच्यापर्यंत या संस्था पोहोचू शकलेल्या नाहीत. संस्थेचं नाव जरी कळलं, इ-मेल आयडी मिळाला, हेल्पलाईन फोन नंबर मिळाला तरी अशा संस्थेशी संपर्क करायला लोकांचं धाडस होत नाही. संस्थेत यायला लोक घाबरतात. "तुम्ही राग मानू नका पण मी तुम्हाला आतापर्यंत तीन वेळा फोन केला आहे, आणि तुम्ही फोन उचलला की मी लगेच रिसीव्हर ठेवून द्यायचो. तुमच्याशी बोलायचं धाडसंच व्हायचं नाही.” “मी महिन्यापूर्वी तुमच्या दारापर्यंत आलो होतो. आत यायच्या वेळी पाय कापायला लागले. तिथून परत फिरलो." कोणी तरी आपल्याला त्या संस्थेत जाताना बघेल, कोणी तरी आपल्याला ओळखेल. तिथले कर्मचारी आपलं नाव विचारतील अशा नाना शंका मनात येतात. (या संस्थेत गेल्यावर कोणीतरी आपल्यावर जबरदस्ती करेल अशी भीती काहींच्या मनात असते.) काहीजण फोन करून किंवा ई-मेलवर विचारतात की, "आपण बाहेर भेटू यात का? एखाद्या रेस्टॉरंटमध्ये? एखाद्या बागेत ?” सुरुवातीला चार लोकांत, दिवसाढवळ्या भेटणं ही त्यांच्यासाठी सुरक्षित जागा असते. कारण त्यांचा संस्थेवर विश्वास नसतो. काही जण बराच काळ विचार करून मग भीत भीत संस्थेवर येतात. इंद्रधनु सुरक्षित जागा/ ड्रॉप इन सेंटर (Safe Space / Drop in Centre) समलिंगी लोकांना घरी, कामाच्या ठिकाणी भिन्नलिंगी मुखवटा घालून वावरावं लागतं. आपण कोण आहोत हे इतरांना कळलं तर ते आपल्याला त्रास देतील, वाळीत टाकतील ही भीती त्यांच्या मनात कायम असते. ही कुठलीच ठिकाणं त्यांच्यासाठी सुरक्षित जागा होऊ शकत नाहीत. त्यामुळे समलिंगी लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गरज एका सुरक्षित जागेची असते. एक अशी जागा जिथे समलिंगी व्यक्तीला भिन्नलिंगी असण्याचा मुखवटा घालून वावरायची आवश्यकता भासणार नाही. जिथे मोकळेपणानं ती व्यक्ती कोणतंही दडपण, संकोच न बाळगता वावरू शकेल. इतरांशी बिनधास्त गप्पा मारू शकेल, इतरांचे अनुभव ऐकू शकेल, अशी जागा समलिंगी व्यक्तीला मिळणं त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असतं. एखादा तास जरी, अधूनमधून या जागेत घालवायला मिळाला मन् दडपण कमी होऊ शकतं. प्रतिभा घीवाला म्हणतात, "आपला रंग जसा जन्माआधी ठरलेला असतो तसंच लैंगिक प्रवृत्तीचं आहे. रंगासारखीच लैंगिकता बदलता येत नाही. ती स्वीकारावी लागते; पण हे करत असताना वैयक्तिक, कौटुंबिक; तसंच सामाजिक पातळीवर अनेक अडचणी येतात. खूप अडथळे पार करावे लागतात. प्रवाहाविरुद्ध पोहणं कधीच सोपं नसतं. पण काही लोकांनी धीटपणे याचा स्वीकार केला आहे. अशा लोकांशी जरूर संपर्क साधावा. त्यांचा अनुभव आपणास उपयोगी पडेल. आपणास आधार मिळेल; तसंच जीवनास सामोरं जाण्यास सामर्थ्य लाभेल." [66] हा आधार संस्थेत मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त अशा संस्था इतरही सुविधा पुरवू शकतात- ग्रंथालय, सिनेमे दाखवण्याची व्यवस्था, काउन्सेलिंग / वैद्यकीय सुविधा, वकिलांचं मार्गदर्शन इत्यादी. समलिंगी विषयावरची माहिती, साहित्य फार ठिकाणी उपलब्ध नसतं. एखादं पुस्तक हाती लागलं तरी ते चटकन विकत घेता येत नाही. अनेक वेळा ते पुस्तक चाळायला घेणं सुध्दा अवघड असतं. पुस्तक जरी विकत घेतलं किंवा मिळवलं तरी ते लपवायचं कुठं? ते इतरांच्या हाती लागलं तर! “मी तुमचं 'पार्टनर' (समलैंगिकतेवर आधारित पुस्तक) विकत घेतलं. लपूनछपून ते वाचून काढलं. पण आता मला ते घरी ठेवणं रिस्की वाटतं. कुणाच्या हाती लागलं तर? त्यापेक्षा ते कचऱ्यात टाकून द्यावं, नाहीतर तुम्हाला ते परत करावं असा विचार केला. म्हणून ते तुम्हाला परत द्यायला आलो.” आला "मी तुमचं 'पार्टनर' पुस्तक प्रदर्शनात पाहिलं. वरच्या चित्रावरून मला अंदाज आणि हाती घेतलं. माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मी ते विकत घेऊन घरी इंद्रधनु ११२

      • न्यायचा प्रश्नच नव्हता. मी ते प्रदर्शनात दोन तास बाजूला उभं राहून वाचून काढलं.”

जर संस्थेत समलिंगी विषयावरचं साहित्य असेल तर ते संस्थेतच निवांतपणे वाचता येतं. समलिंगी मुला/मुलींना मान्यतादर्शक प्रतिमा बघायला मिळणं मानसिक आरोग्यासाठी गरजेचं असतं. आपले प्रश्न, भावना समजूतदार, संवेदनशीलपणे मांडणारे सिनेमे, नाटकं बघायला मिळणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. हे सिनेमे अशा संस्था दाखवू शकतात, त्याच्यावर चर्चा घडवून आणू शकतात. लैंगिकतेच्या विषयाशी निगडित समस्या जाणकार, संवेदनशील काउन्सेलर समोर मांडता येतात. त्या प्रश्नावर काउन्सेलर तटस्थ वृत्तीने संवाद साधू शकतो. त्या प्रश्नाचे विविध पैलू क्लायंटच्या समोर मांडू शकतो. जर समलिंगी व्यक्तीला नैराश्य असेल, खूप मानसिक तणाव असेल तर काउन्सेलर त्याला संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवू शकतो. या संस्था गुप्तरोग, एचआयव्ही/ एड्स संदर्भात काऊन्सेलिंग, चाचणी, उपचारांच्या सुविधा पुरवू शकतात. समलैंगिकतेबद्दल संवेदनशील दृष्टिकोन बाळगणारे वकील जर संस्थेत असतील/ संस्थेशी निगडित असतील तर हे वकील गरज पडेल तेव्हा समलिंगी क्लाएंटस्ना कायद्याची मदत देऊ शकतात. संस्थांचे काही प्रश्न लैंगिकतेचे विविध पैलू आहेत. उदा. ट्रान्सजेंडर्स, ट्रान्ससेक्शुअल्स, इंटरसेक्स इ. जर लैंगिकतेच्या सर्व पैलूंवर संस्था चालवायची असेल तर नुसती समलिंगी लोकांसाठी ती चालवता येत नाही. फक्त समलिंगी लोकांनी संस्थेत यायचं, पण इतरांनी नाही असा नियम संस्थेला करता येत नाही. प्रत्येक गटाची एक वेगळी संस्कृती असते आणि या गटांमध्ये भेदभाव असतात. त्या सर्वांना एकाच सेफ स्पेसमध्ये / ड्रॉप सेंटरमध्ये सामावून घेणं अवघड होतं. इन समलिंगी लोक अनेक जातीतून, धर्मातून, आर्थिक परिस्थितीतून येतात. वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेल्या व्यक्तींना एकमेकांशी जमवून घेणं अवघड होतं. त्यात गटबाजी होण्याची शक्यता असते. इंग्रजीत बोलणाऱ्यांचा गट, मराठी लोकांचा गट, अमहाराष्ट्रीय लोकांचा गट, पुरुषी व्यक्तींचा गट, बायकी पुरुषांचा गट इ. असं दिसून येतं की हळूहळू ज्या गटाचे लोक जास्त प्रमाणात येतात तो गट सोडून बाकीच्या गटातले लोक नंतर येईनासे होतात. इतरांना त्या संस्थेत परकं वाटायला लागतं. इंद्रधनु ११३ अशा संस्थांना आर्थिक मदत मिळणं खूप अवघड असतं. या समाजाचे प्रश्न समजून घेणारे खूप कमी असतात. अशा कार्याला हातभार लावणारे कमी असतात. देणग्या मिळण्याची वाण असते. समलिंगी समाजातसुद्धा या कार्याचं महत्त्व कळत नसल्यामुळे समलिंगी लोकांचा आधार मिळणंही खूप कठीण होतं. विदेशी आर्थिक साहाय्य जास्त करून एचआयव्ही/ एड्सच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांना मिळतं. मानसिक आरोग्यासाठी, अँडव्होकसीसाठी पुरेशी मदत मिळत नाही. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे ही जाण अजूनही या देशात आढळत नाही. समलिंगी समाजाच्या बरोबर काम करणाऱ्या फार थोड्या संस्था दर्जेदार सुविधा पुरवतात. अनेक संस्थांच्या विश्वस्तांना, कार्यकर्त्यांना समलिंगी समाजाच्या प्रश्नांबद्दल काहीही तळमळ नसते. यातील काही संस्था समलिंगी लोकांनीच चालवल्या आहेत. समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी लढण्याच्या नावाखाली कोणतीही नीतिमत्ता न पाळता केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी हे लोक हपापलेले आहेत. हे समलिंगी समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सज्जनपणे काम करणाऱ्या चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवणाऱ्या संस्थांची प्रत्येक शहरात, गावात गरज आहे. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी काही तुरळक संस्थांचा अपवाद सोडता बहुतेक शहरांत, गावांत अशा संस्था नाहीत. अनेक जण परगावाहून अनेक तास प्रवास करून एक-दोन तास एखाद्या जाणकार समलिंगी व्यक्तीशी या विषयावर मोकळेपणानं समोरा-समोर बसून बोलता यावं यासाठी येतात. (पण 'पिकतं तिथं विकत नाही' या म्हणीप्रमाणे जिथे अशा संस्था आहेत तिथे स्थानिक लोकांचा वावर कमी आहे.) विवेक आनंद म्हणाले, "उद्या 'हमसफर' ट्रस्टची कोणाला जरूर पडली नाही तर मला ट्रस्ट बंद करायला खूप आनंद वाटेल. कारण याचा अर्थ लैंगिक अल्पसंख्याकांना जगात मोकळेपणाने वावरणं सुरक्षित झालं आहे असा होईल, आणि म्हणून त्यांना या ट्रस्टची जरूर भासणार नाही. पण अजून तरी तो दिवस आलेला नाही." + ११४ इंद्रधनु ... समलिंगी लोकांचे अधिकार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही पाश्चात्त्य देशात समलिंगी चळवळीला वेग आला. समलिंगी कार्यकर्त्यांनी कायदा, वैद्यकीय व सामाजिक दृष्टिकोन बदलण्यास अनेक वर्ष झुंज दिली. अथक परिश्रमानंतर त्यांना हळूहळू यश येऊ लागलं. प्रत्येक देशातल्या समलिंगी अधिकारांच्या चळवळीने वेगवेगळे यशाचे टप्पे गाठले. काही देशांनी प्रौढांमध्ये संमतीनं केलेल्या समलिंगी संभोगाला गुन्ह्याच्या यादीतून काढून टाकलं. उदा. चीन, जपान, अमेरिका, रशिया इ. काही देशांनी समलिंगी जोडप्यांच्या लग्नाला कायद्याने मान्यता दिली. उदा. फ्रान्स, कॅनडा इ. काही देशांनी याच्यापुढे जाऊन समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक देण्यासाठी मान्यता दिली. उदा. स्विडन, बेल्जियम, काही देशात समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती होता येतं. उदा. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. व्यक्ती भिन्नलिंगी असोत वा समलिंगी असोत एक समान पातळीची समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी ही चळवळ अनेक देशात चालू आहे. भारतातील वाटचाल १९८० च्या दशकापर्यंत समलैंगिकता हा बोलण्याचा विषय नव्हता. समलैंगिकता पाश्चात्त्य देशातील विकृत संस्कृतीचं रूप आहे, ही धारणा होती. समलिंगी लोकांचे प्रश्न कोणी मांडत नव्हतं. या पार्श्वभूमीवर १९८६ साली अशोक राव कवींनी 'सॅवी’ मासिकात मुलाखत देऊन त्यांची समलैंगिकता जाहीर केली. या मुलाखतीने खळबळ उडाली. कोणी तरी खुलेआम अभिमानाने सांगत आहे की, ती व्यक्ती समलिंगी आहे ही गोष्ट अनेकांना धक्कादायक होती. अशोक राव कवी : भारतातले पहिले समलिंगी कार्यकर्ते (Gay Activist ) (Photo Source http//wikipedia.org/wiki/Ashok_Row_Kavi) इंद्रधनु... ११५ या सुमारास एचआयव्हीबाधित व्यक्ती भारतात आढळल्या. लैंगिक शिक्षणाचा अभाव, एचआयव्ही/एड्सबद्दल गैरसमज या सगळ्यामुळे एचआयव्हीचा प्रसार वाढत होता. शरीरविक्री करणाऱ्या व्यक्ती, इंजेक्शनद्वारा नशा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये एचआयव्हीचा प्रसार होताना दिसला. समलिंगी संभोग करणान्या समाजात एचआयव्हीचा प्रसार झपाट्याने होत होता. पण त्याचबरोबर 'समलिंगी लोक भारतात कुठे आहेत?' असं विचारणारेही होते. १९८९ साली अशोक राव कवींनी मॉन्ट्रि आलमध्ये पाचव्या आंतरराष्ट्रीय एड्स कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. तिथे त्यांना दिसलं की एचआयव्ही हा फक्त समलिंगी लोकांचा रोग आहे असं मानून एचआयव्हीच्या संशोधनासाठी, माहिती पुरवण्याच्या उपक्रमांसाठी अमेरिकन सरकार (समलिंगीव्देष्ट्या धोरणांमुळे) पुरेसा पैसा देत नव्हतं. अनेक समलिंगी लोक एचआयव्हीबाधित होत होते आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावाने दगावत होते. हे बघून त्यांच्या मनात विचार आला की, जर अमेरिकेत ही स्थिती आहे तर भारतात काय होईल? या विचारानी ते सुत्र झाले आणि १९९० साली त्यांनी पत्रकारितेच्या नोकरीतून निवृत्ती घेतली. समलिंगी लोकांना सुरक्षित संभोगाचं ज्ञान देणं, त्यांना कंडोम पुरवणं हे महत्त्वाचं आहे असं जाणून त्यासाठी ते काम करू लागले. मुंबईत सेक्स साइटस्वर कंडोम्सचा पुरवठा करणं, वर्तमानपत्रातून समलैंगिकतेबद्दल लेख लिहिणं, मुलाखती देणं, एमएसएम लोकांसाठी सुरक्षित संभोगाची माहिती देण्याचे (HIV Prevention Projects) उपक्रम सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९९४ साली त्यांनी मुंबईमध्ये 'हमसफर ट्रस्ट' संस्था सुरू केली. १९९५ साली 'हमसफर ट्रस्ट' व 'नाज फांऊडेशन इंटरनॅशनल' यांनी मुंबईमध्ये समलिंगी लोकांसाठी संमेलन भरवलं. मागच्या दशकात इतरही संस्था या विषयात कार्यरत झाल्या. बंगालमध्ये 'साथी', 'मानूष बांगला', 'स्वीकृति'; चेन्नईमध्ये 'स्वॅम', 'सहोदरन'; बंगलोरमध्ये ‘संगमा’; बरोड्यामध्ये 'लक्ष्य'; पुण्यामध्ये 'समपथिक’ इत्यादी. २००१ साली 'नाज फाउंडेशन, इंडिया' (नवी दिल्ली) नी लॉयर्स कलेक्टिव्हच्या आधारे दिल्ली हाय कोर्टात आयपीसी ३७७ कायदा बदलण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. मे २००१ मध्ये 'इलगा' आशिया (International Lesbian and Gay Association-Asia) ची मुंबईमध्ये परिषद झाली. २००६ मध्ये 'इन्फोसेम' (Indian Network For Sexual Minorities) ची स्थापना झाली. भारतातल्या समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांचं हे सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. इंद्रधनु... १९६ समलिंगी अधिकारांसाठी चळवळ समलिंगी अधिकारांची चळवळ सुरू व्हायच्या वेळी समलिंगी समाजात दोन प्रवाह बनले. एका प्रवाहाचं मत पडलं की " हा गे, तो स्ट्रेट ( भिन्नलिंगी) अशी कोणतीच लेबल्स आम्हाला मान्य नाहीत. आपण सगळे माणूस म्हणून एकमेकांना स्वीकारलं म्हणजे झालं. लेबल्स लावण्यापलीकडे आपण गेलं पाहिजे." तर दुसरा प्रवाह म्हणत होता की, “आपले अधिकार मिळवण्यासाठी आपलं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. त्याशिवाय अधिकारांसाठी झटता येणार नाही." अशोक राव कवी म्हणाले, “आपला समाज, सगळेजण भिन्नलिंगी आहेत किंवा असले पाहिजेत या विचारसरणीवरच आधारित आहे. भिन्नलिंगी लोकांना जे अधिकार आहेत ते समलिंगी लोकांना आहेत का ? समलिंगी जोडप्यांना लग्न करता येतं का ? मूल दत्तक घेता येतं का? भिन्नलिंगी जीवनशैली समोर ठेवूनच समाज व्यवस्था तयार केली गेली आहे. या चौकटीत न बसणाऱ्यांनी काय करायचं? इतके दिवस सहन केलं. पुढेही तेच करायचं का ? मागच्या दशकात समलिंगी लोक एचआयव्हीची लागण होऊन माहिती / सुविधांअभावी मरत होते. त्यावेळी लेबल्स न मानणाऱ्या लोकांनी यांच्यासाठी काय काम केलं ? काहीही नाही. हा वाद पांढरपेशी लोकांचा आहे. सगळ्या गोष्टी इंटलेक्च्युअलाइज करायच्या आणि आमच्या कामातून जो फायदा मिळतो तो चुपचाप पदरात पाडून घ्यायचा. आज पंधरा वर्षं मी हेच बघतोय.” समलिंगी समाज हा भिन्नलिंगी समाजाइतकाच तुल्यबळ घटक आहे. कोणत्याही प्रकारे हा समाज खालच्या दर्जाचा आहे असं दर्शवणारी/ भासविणारी व्यवस्था समाजात असू नये यासाठी ही चळवळ. ही अपेक्षा मानव अधिकाराच्या चौकटीत बसणारी आहे. यात मुख्य अधिकाराची संक्षिप्त मांडणी खाली दिली आहे.

  • प्रौढांमध्ये परस्पर संमतीने आणि खाजगीत केलेला समलिंगी संभोग गुन्हा

किंवा आजार मानला जाऊ नये.

  • समलिंगी जोडप्यांना भिन्नलिंगी विवाहव्यवस्थेशी समांतर कायदेशीर विवाह

व्यवस्था मिळावी. भित्रलिंगी लग्नव्यवस्थेचे सगळे पैलू समलिंगी लग्नव्यवस्थेला लागू व्हावेत. (अवलंबून असलेली व्यक्ती (डिपेंडंट), वारसा हक्क इ.)

  • समलिंगी लोकांवर, समलिंगी कुटुंबावर कोणत्याही क्षेत्रात त्यांची लैंगिकता

विचारात घेऊन भेदभाव/अन्याय होऊ नये (शिक्षण, कायदा, वैद्यकीय क्षेत्र इ.). असा भेदभाव/अन्यायाला आळा घालण्यासाठी कायदे असावेत.

  • समलिंगी व्यक्तींना कोणतीही नोकरी, व्यवसाय करण्यास मज्जाव नसावा.

इंद्रधनु... ११७

  • समलिंगी व्यक्तीला / समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार

मिळावा. हे अधिकार मिळवण्यासाठी अनेक वर्षं समलिंगी समाजाला आणि भिन्नलिंगी समाजातील उदारमतवादी व्यक्तींना झटावं लागणार आहे. यासाठी प्रत्येक समलिंगी व्यक्तीनी 'आऊट' होणं गरजेचं आहे. आपलं माणूसपण जोवर लोकांच्या समोर येत नाही तोवर ते आपल्याला माणूस म्हणून स्वीकारणार नाहीत. आपल्या आयुष्यात जरी आपल्या वाट्याला हे अधिकार मिळाले नाहीत तरी आपल्या कामाचा भावी पिढीला नक्कीच फायदा होईल. आपल्या वाट्याला जे अन्याय आले ते त्यांच्या वाट्याला येणार नाहीत (किंवा त्या अन्यायांचं प्रमाण कमी होईल) आणि ते आपल्यापेक्षा जास्त सुखाचं, समृद्धीचं, परिपूर्ण आयुष्य जगू शकतील. म्हणून आता आपण त्यांच्यासाठी काबाडकष्ट केले पाहिजेत. आपण हे पुढच्या पिढीचं देणं लागतो. 4 0 इंद्रधनु... . ११८ परिशिष्ट अ संदर्भ - नारद पुराण. पान क्र. २०५. प्र. न. जोशी. प्रसाद प्रकाशन. कौटिलीय अर्थशास्त्र. र. पं. कंगले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ. The Complete Kama Sutra. (Vatsyayana). Translated to English by Alain Danielou. Park Street Press. Rochester, Vermont. 1994. Manu Smriti (The Laws of Manu). Translated to English by Wendy Doniger with Brian K. Smith. Penguin Classics. सार्थ सुश्रुतसंहिता. वैद्यराज दत्तो बल्लाळ बोरकर. प्रकाशन यज्ञेश्वर गोपाळ दीक्षित. चरकसंहिता पंडित काशिनाथ शास्त्री. चौखाम्बा संस्कृत माला दप्तर, वाराणसी. विनय पिटके, विपश्यना विशोधन विज्ञास, इगतपुरी. १९९८; Buddhism, Sexuality and Gender. Edited by Jose' Ignacio Cabezon. V. Buddhism and Homosexuality. 9. Homosexuality as seen in Indian Buddhist Texts. By Leonard Zwilling. 'The five types of pandakas are- Napumsakapandaka, usuyapandaka, pakkhapandaka, assittapandaka, opakkamikapandaka.' [8] Jaina Sutras. Translated to English by Herrman Jacobi. अमरकोष (अमरसिंह). व्दितीयकांडे (३९). [9] Commentary by Acharya Krishnamitra. Edited by Dr. Satyadeva Mishra. Dept. of Indian Studies. Univ. of Malaya, Kuala Lumpur, Malaysia. 1972. [10] Baburnama. Translated to English from the original Turki Text of Zahiruddin Muhammad Babur Padshah Ghazi by Annette Susannah Beveridge. Collection of Oriental Works. Published by the Asiatic Society of Bengal. [11] Dargah Kuli Khan. Portrait of a City. Commentary and translation by Saleem Kidwai. Same Sex Love in India. Edited by Ruth Vanita and Saleem Kidwai. Macmillan India Ltd. [12] Akbarnama by Abu-L-Fazi. Vol 2. Ch6. Page 121. Translated to English by H. Beveridge. Rare Books. 1972. इंद्रधनु... ११९ [ 1 ] [2] [3] [4] [5] [6] [7] [13] Same Sex Love in India. Part III. Edited by Ruth Vanita and Saleem Kidwai. Macmillan India Ltd. [14] The Complete Kama Sutra. Introduction. Section: Puritanism in Modern India. Translated to English by Alain Danielou. Park Street Press. Rochester, Vermont. 1994. [15] अनंगरंग (कल्याणमल्ल). प्रकाशक गजानन रघुनाथ मुळे. अनंगरंगाची H. Case no. 544/P/1937. King Emperor v/s. G. R. Moole, Karjat. Charged under section 292 (a) I.P.C. [16] समाजस्वास्थ्य मासिक. र. धों. कर्वे. 'अनैसर्गिक नव्हे, निसर्गपूरक'. Issues-July, August, October, November 1953. [17] The Narad Smriti. Vol. II. Ch. 12. Relations between Men and Women. Versees 11-18. Translated to English by R. W. Lariviere. Dept. of South Asian Regional Studies. Univ.of Pennsylvania, Philadelphia. 1989. [18] What Buddhists Believe. K Sri Dhammananda. 1987. [19] Meeting the Dalai Lama. By Tinku Ishtiaq. Trikone Magazine. October 1997. [20] CBC News. World Sikh group against gay marriage bill. Website- http://www.cbc.ca/canada/story/2005/03/28/sikhguy- 050328.html [21] The Holy Bible. Cambridge University Press. [22] The Koran. Translated in English by N. J. Dawood. Penguin Books. 1997. [23] Online Hadiths. Website- http://cwis.usc.edu/dept/MSA/ reference/searchhadith.html [24] प्रमुख फौजदारी कायदे. रा. म. खंदारे विशाल बुक्स सेंटर, नाशिक. [25] Sarkar's Commentary on the IPC, 1860. Section IPC 377. Kundunkara Govindan. 1969 CrLJ:818. [26] [27] Brother John Antony. 1992 CrLJ: 1352. [28] Report of the committee on Homosexual Offences and Prostitution. (Wolfenden Report). 1957. [29] Law, Liberty and Morality by H. L. A. Hart. Stanford Univ. Press. 1963. [30] Wolfenden Report. Claude J. Summers. Website- http://www.glbtq.com/social-sciences/ wolfenden_report.html इंद्रधनु... १२० [31] [32] [33] [34] [35] [36] [37] [38] Queer: Despised Sexuality. Ch 4. Section- Constitutional Challenges to sec. 377 of the IPC. Arvind Narrain. Published by Books for Change. 2004. ABVA v/s Union of India. CWP 1984 of 1994 in the High Court of Delhi. (a) Naz Foundation India Trust v. Government of NCT of Delhi & Ors (CWP 7455 of 2001) High Court of Delhi at New Delhi. (b) Reply (to the Naz Foundation India, Trust PIL) by Govt. of India Civil Writ Petition No. 7455 of 2001. Aman Lekhi. Central Government Standing Counsel, 159, Lawyers Chamber Delhi High Court. New Delhi 110003. Reply Affidavit on Behalf of Respondents 4 and 5. Deponant M. L. Soni. Under Secretary to the Government of India, National AIDS Control Organisation, Ministry of Health and Family Welfare, New Delhi-110001. July 17, 2006. to the CWP 7455 of 2001, High Court of Delhi, New Delhi. Letter by Brinda Karat to Arun Jaitley. All India Democratic Women's Association (AIDWA). 2003. Queer: Despised Sexuality. Ch 3. Section: Cases registered under sec. 377 before and after Independence (Chart). Arvind Narrain. Published by Books for Change. 2004. Sakshi V/s Union of India A.I.R. 2004. S.C.3566. 172nd Report of the Law Commission of India. 6. After detailed discussions with these organisations, the Commission has recommended changes for widening the scope of the offence in section 375 and to make it gender neutral. Various other changes have been recommended in sections 376, 376A to 376D. We have also recommended insertion of a new section 376F dealing with unlawful sexual contact, deletion of section 377 of the IPC and enhancement of punishment in section 509 of the IPC. In order to plug the loopholes in procedural provisions, we have also recommended various changes in the Code of Criminal Procedure, 1973 and in the Evidence Act, 1872. (B.P. Jeevan Reddy). Chapter 3. Changes recommended in the IPC, 1860. 3.6. Deletion of section 377: In the light of the change effected by us in section 375, we are of the opinion that section 377 इंद्रधनु... १२१ deserves to be deleted. After the changes effected by us in the preceding provisions (sections 375 to 376E), the only content left in section 377 is having voluntary carnal intercourse with any animal. We may leave such persons to their just deserts. [39] Website http://www.lawcommissionofindia.nic.in/rapelaws.htm Biological Exuberance (Animal Homosexuality and Natural Diversity) by Bruce Bagemihl. Published by St. Martin's Press. New York. 1999. [40] Love that dare not squeak its name. By Dinitia Smith. The New York Times. 7-Feb-2004. Website-http://query.nytimes.com/gst/ [41] [42] fullpage.html?res=9506efd9113bf934a35751c0a9629c8b63 Monkey Business by Simon LeVay. Trikone Magazine. April 99. Less Than Gay. Chapter 4. Homosexuality and the Law. Section- Homosexuality in the Indian Armed Forces. Published by ABVA (AIDS Bhedbhav Virodhi Aandolan). Dec 1991. [43] Services gay ban lifted. Wednesday, 12 January, 2000, 19:55 GMT. Website- http://news.bbc.co.uk/1/hi/uk_politics/599810.stm [44] The Payment of Gratuity Act, 1972. Act Title: Act No. 39 of 1972. Enactment Date: 21/08/1972. India Code Legi. Dept. Website- http://indiacode.nic.in/ qryACTshtitle1.asp?txtact-gratuity [45] [46] The Provident Funds Act, 1925. Act Title: Act No. 19 of 1925. Enactment Date: 27/08/1925. India Code Legi. Dept. Website- http://indiacode.nic.in/qryACTshtitle1.asp?txtact-provident India Refuses Diplomatic Status for Homosexual Partners of Canadian Gay Diplomats. By Hilary White. 14/05/2007. Website- http://www.lifesite.net/ldn/2007/may/07051410.html Guidelines For Adoption From India-2006. Central Adoption Resource Authority. Chapter IV. Section 4.1. .... Same sex couples are not eligible to adopt.' [47] [48] Paige, R. U. (2005). Proceedings of the American Psychological Association, Incorporated, for the legislative year 2004. Minutes of the meeting of the Council of Representatives July 28 & 30, 2004, Honolulu, HI. Website- http://www.apa.org/pi/lgbc/policy/parents.html इंद्रधनु... १२२ i [49] [50] [51] [52] [53] [54] -Sex Survey. Debonair. October 1991; -Report on a survey of sexual behavior patterns and attitudes amongst men and women in Maharashtra. by Dr. Mira Savara and C. R. Sridhar. SHAKTI. December 1994; -Behavioral Surveillance Survey in Maharashtra. Conducted by ORG Center for Social Research with technical assistance from FHI. Funded by USAID. Year 2001. -Baseline study of knowledge, Attitude, Behavior and practices. Humsafar Trust Survey. (Funded by FHI Evaluation of the project funded by MDACS). Year 2001/2002; -Survey of MSM in Pune/Pimpri-Chinchwad for Pathfinder International. Survey conducted by Humsafar Trust (Mumbai) and Samapathik Trust (Pune). Year 2005; -HIV/AIDS in India: Fact Sheets on Baseline Behavioral Surveillance Survey-India (National AIDS Control Organization); -Stigma, Stress, Social Support Network and Coping Among Lesbian and Gay Individuals. A Qualitative Study. By Ketki Ranade. Dept. of Psychiatric social Work. NIMHANS. Bangalore. Year 2003; -The nature of violence faced by lesbian women in India. Bina Fernandez and Gomathy N.B. Tata Institute of Social Sciences, Mumbai. Year 2003. Shorter Oxford Textbook of Psychiatry. Michael Gelder, Richard Mayou, Philip Cowen. 4th Edition. Ch. 19. Psychopathia Sexualis by Dr. Richard Von Krafft-Ebing. Paperback Library Edition. 1966. Studies in the psychology of sex. Volume 2 (Sexual Inversion). By Havelock Ellis. Softcopy available at Website http://www.gutenberg.org Queer Science. Use and Abuse of Research into Homosexuality. Ch 11. Simon Le Vay. MIT Press. 1996. Conger, J.J. (1975). Proceedings of the American Psychological Association, Incorporated, for the year 1974: Minutes of the annual meeting of the Council of Representatives. American Psychologist, 30, 620-651. Website- http://www.apa.org/pi/lgbc/policy/discrimination.html इंद्रधनु... १२३ ICD10 Codes. F66 Psychological and behavioural disorders associated with sexual development and orientation. Note: Sexual orientation by itself is not to be regarded as a disorder. F66.1 Egodystonic sexual orientation The gender identity or sexual preference (heterosexual, homosexual, bisexual, or prepubertal) is not in doubt, but the individual wishes it were different because of associated psychological and behavioral disorders, and may seek treatment in order to change it. Website- http://www.who.int/classifications/apps/icd/ icd10online/ [56] [57] [58] लैंगिकता. डॉ. भूषण शुक्ल यांची मुलाखत. साथीदार मासिक वर्ष २००३. इटस् अ वे ऑफ लाइफ. डॉ. संज्योत देशपांडे. लोकमत. २५/६/०४. Humjinsi: A Resource book of Lesbian, Gay and Bisexual Rights in India. Ch. Civil Laws Affecting Gay men and Lesbians by Mihir Desai. Compiled and Edited by Bina Fernandez. India Centre for Human Rights and Law. 1999. [59] Violence Continues At Indian Movie Theaters. 4 December 1998 (StudioBriefing). [60] Website- http://www.imdb.com/news/sb/1998-12-04#film3 What the urdu press is saying (on the film Girlfriend). Compiled by Mohammed Wajihuddin. Indian Express. 18/06/2004. [61] [62] Pink and Prejudice. Vikram Doctor. Economic Times. 25/05/2007. Out of closet, Rajpipla royals cut out gay prince. Georgina Maddox and Syed Khalique Ahmed. Indian Express. 26/06/2006. Suicide attempt over 'no' to lesbian marriage. Asian Age 12.1.06 Driven To Death!. News item in Mathrubhumi. [63] Bombay Dost. Vol 4. No. 1. 1995. [64] सर्व बंधने झुगारत त्या विवाहबंधनात अडकल्या. लोकमत. ७/११/०६. [65] Research Issues in Human Behavior and Sexually Transmitted Diseases in the AIDS Era. Ch. Intro. to the Biology and Natural History of STD's. Editors Judith N. Wasserheit, Sevgi O. Aral, King K. Holmes. Associate Editor Penelope J. Hitchcock. American Society for Microbiology, Washington, D.C. [66] आगळे विश्व माझे, प्रतिभा घीवाला (समन्वय). सकाळ. ०८/०७/०६. O इंद्रधनु... १२४ [55] परिशिष्ट ब समलिंगी समाजाबरोबर काम करणाऱ्या काही संस्था INFOSEM (Indian Network For Sexual Minorities) Website- http://www.infosem.org Maharashtra Humsafar Trust Humjinsi For Lesbians Only. Ph: (22) 23435700 (Tuesday, Thursday 3pm to 6pm) Email: humjinsi @ichrl.org Old BMC Bldg, 1st & 2nd Floor, Nehru Road, Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055 Ph: (22) 26673800, 26650547, 55760357 LABIA / Stree Sangam Email: humsafar@vsnl.com P.O. Box 16613 Website- http:// Mumbai 400 019. www.humsafar.org Ph: 9833278171 Gay Bombay Website- http:// www.gaybombay.org Mondays, Wednesdays and Saturdays (5pm - 8pm only) Email: labialist@yahoo.com OR stree.sangam@gmail.com Samapathik Trust Gujarat 1004, Budhwar Peth, Off No. 9, Lakshya Building Rameshwar Market, Near Vijay Maruti Chowk, Pune 411 002 105, Raj Mandir appts, 62 Alkapuri society. Alkapuri. Vadodara, Gujarat HelpLine Phone: 9890744677( Mondays only. 7pm-8 pm) Email: Ph: (0265) 331340/9825311997 Email: samapathik@hotmail.com lakshya121@rediifmail.com Website- http:// www.geocities.com/ samapathik_pune इंद्रधनु... १२५ New Delhi Karnataka Sangama Naz Foundation, (India) Trust A-86 East of Kailash, New Delhi, 110 065 Ph: (11) 2691 0499 Email: Number 9, ABABIL Patil Cheluvappa Street, JC Nagar (MR Palya), Bangalore - 06 Ph: 23438840/43 nazindia@airtelbroadband.in OR Email: sangama@sangama.org naz@nazindia.org Website- http:// www.sangama.org Website- http:// www.nazindia.org San Francisco, CA, USA West Bengal Trikone Saathii Website- http://www.trikone.org CD 335, Sector 1, Salt Lake, Calcutta 700 064 Ph: (33) 2334 7329 Email: saathii@yahoo.com Website- http://www.saathii.org Tamilnadu SIAAP No. 8/11, Jeevanathan Street, Lakshmipuram, Thiruvanmiyur, Chennai 600 041 Ph: (44) 55398050 Email: siaap@eth.net Website- http:// www.siaapindia.org इंद्रधनु... १२६ परिशिष्ट क मराठी नाव

  • पार्टनर
  • तृष्णा
  • कोबाल्ट ब्लू
  • हे दुःख कुण्या जन्माचे

English Name

  • Less than Gay
  • Same sex love in India
  • Queer-Despised Sexuality
  • Sakhiyani- Lesbian Desire in

Ancient and Modern India

  • A Lotus of Another Colour
  • Facing the Mirror

Queering India

  • Homosexuals
  • Loving Someone Gay

Positively Gay

  • Reclaiming your life
  • Virtually Normal
  • Use and Abuse of Research

into Homosexuality

  • Biological Exuberance:

Animal Homosexuality and Natural Diversity

  • Sexually Speaking:

Collected Sex Writings

  • The City and the Pillar
  • And the band played on
  • The tragedy of today's Gays

Comprehensive Textbook of Psychiatry (7th Edition)

वाचन लेखक बिंदुमाधव खरे सुमेध वडावाला - रिसबुड सचिन कुंडलकर मंगला आठलेकर Author AIDS Bhedbhav Virodhi Aandolan Ruth Vanita and Saleem Kidwai Arvind Narrain Geeti Thadani Rakesh Ratti Edited by Ashwini Sukthankar. Edited by Ruth Vanita Shakuntala Devi Don Clarke Edited by Betty Berzon Rick Issesee Andrew Sullivan Simon Le Vay Bruce Bagemihl Gore Vidal Gore Vidal Randy Shilts Larry Kramer Kaplan and Sadock O O इंद्रधनु... १२७ ABVA AIDWA अकबरनामा अमरकोष अशोक राव कवी एव्हलीन हूकर ब्लॅकमेल भिन्नलिंगी कल बायबल बाबुरनामा चरकसंहिता चित्रपट दत्तक मूल इगो डिस्टोनिक इगो सिंटोनिक फ्रँक कामेनी फ्रॉइड गुप्तरोग हॅवलॉक एलिस एचआयव्ही ICD 10 INFOSEM जैनसूत्र कामसूत्र कार्ल हेन्रीच उलरीच कौटिल्याचे अर्थशास्त्र किनसे प्रमाणपट्टी इंद्रधनु. १२८ ३९ ४० २२ २० ३१,११५ ६१ ३५ ५१ २९ २२ २० ६९-७२ ४९,५० ५८,६२ ५८,६२ ६० ६० १०२,१०३ १०३-१०८ ६२ ११६ २० २०,२२ ५९ १९ ५५,५६ क्रॉस इंडेक्स कुराण लग्न ( भिन्नलिंगी) लैंगिक कल लष्कर लॉयर्स कलेक्टिव्ह लॉ कमिशन मॅग्नस हर्चफेल्ड मनुस्मृती एमएसएम प्रवर्ग NACO नोकरी नारद पुराण नाटकं प्राण्यातील समलैंगिकता पुस्तकं रिचर्ड एबिंग र. धों. कर्वे साक्षी याचिका समलिंगी कल समलिंगी विवाह स्टोनवॉल सुश्रुतसंहिता उभयलिंगी कल विनयपिटक वुल्फेंडेन २९ ८०-८४ ५१,५२ ४६ ३९,४० ५९ २०,२७ ५३-५५ ४०,१०७ ८४-८६ १९ ६८ ४४,४५ ६७ ५९ २३ ४२ ५१,५३ ४७,४८ ६१ २० ५१,७४ २० ३७,३८ बिंदुमाधव खिरे हे पेशानी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दहा वर्षं या क्षेत्रात काम केल्यावर २००० साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. २००२ साली त्यांनी समपथिक ट्रस्ट (पुणे) ची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे पुरूष लैंगिक आरोग्य केंद्र चालवलं जातं. समलिंगी, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स व्यक्तींच्या मानसिक शारीरिक आरोग्याच्या विषयावर काम केलं जातं. बिंदुमाधव खिरे यांची 'पार्टनर' आणि 'एचआयव्ही / एड्स, लैंगिक शिक्षण व लैंगिकता हेल्पलाईन मार्गदर्शिका' ही दोन पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. ते स्वतः समलिंगी आहेत. हे पुस्तक त्यांच्या अनुभवातून व अभ्यासातून साकारलं आहे. लैंगिकतेबद्दल फारसं खुलेपणानं बोलण्याची पध्दत आपल्याकडे नाही. त्यामुळे चोरून-लपून वाचलेली मिळतील ती पुस्तकं व अलिकडच्या काळातील इंटरनेट यातून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही या विषयाबाबत प्रचंड गैरसमज व अंधश्रध्दा आढळून येतात. लैंगिकतेबद्दलंच इतकं अज्ञान तर समलैंगिकतेबद्दल तर बोलायलाच नको. या संदर्भात एक कुतुहल - उत्सुकता तर असतेच पण खूप प्रश्नंही असतात. लैंगिक कल म्हणजे नेमकं काय ? समलैंगिकता नैसर्गिक का अनैसर्गिक ? समलैंगिकतेबद्दल वैद्यकीय दृष्टिकोन काय आहे ? समलिंगी समागम करणं गुन्हा आहे का ?

  • गे, लेस्बियन, होमोफोबिया, एमएसएम म्हणजे काय ?
  • समलिंगी व्यक्तीला मूल दत्तक घेता येतं का ?

समलिंगी समाजाला कोणते अधिकार हवे आहेत ?

  • हे पाश्चात्यांकडून आलेलं फॅड आहे का ?

अनेक शंका, मनातले गोंधळ दूर करणारी शास्त्रशुध्द माहिती या पुस्तकात दिली आहे. अनुभवाधारित या माहितीमुळे समलिंगी व्यक्तींची होणारी कोंडी-कुचंबणा बऱ्याच प्रमाणात दूर होईल. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळून एक खुलेपणा प्राप्त होईल.