Jump to content

आरती करू तुज गजानना

विकिस्रोत कडून

आरती करू तुज गजानना,

देवा माझा नमस्कार घ्यावा रे || ध्रु ||

शंभू नंदना जयसुद सदना,

रिद्धी सिद्धी पती रमणा रे,

ब्रम्हा विष्णू ध्यानी निरंतर,

आवड करुनी तव चरणा रे || १ ||

मुकुट-कुंडले हार विराजीत

छत्र चामरे झळकळती रे,

सुंदर वरूनी सोंडची बरवी

दुर्वांकुर बहू प्रीती रे || २ ||

अग्रपूजेचा तू अधिकारी

गौरीहराच्या तनया रे,

पार्वतीचे स्तनपान कराया

उदरी विष्णू आला रे || ३ ||

भाव लोचना भव भय हरणा,

सुहास्य मूषक वाहन रे,

वरदहस्त तू कृपा जयाचा,

राज गजानन घ्यावा रे || ४ ||