अगा वैकुंठीच्या राया
Jump to navigation
Jump to search
संत-कवयित्री कान्होपात्रा ह्यांनी १५ व्या शतकात लिहिलेला हा अभंग. १९३१ च्या संगीत नाटक संत कान्होपात्रा मध्ये मास्टर कृष्णराव ह्यांनी ह्याला पुन्हा संगीतबद्ध करून प्रसिद्ध केले.
अभंग[संपादन]
अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥