Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या आयुष्यात सगळे काही आपल्या मर्जीनुसार होईल आणि सगळे आपल्या हातात आहे असे नाही. आपण कश्यानी, कोणत्या परिवारात जन्माला आला , आपले आई वडील कोण आणि कसे आहेत? आपण कोणत्या देशात जन्माला आलो या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. परंतू आपण ज्या लोकांसोबत आहोत, जेथे आहोत ज्या परिसरात आहोत त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करायचा हे आपण ठरवू शकतो. तुम्ही कधी पत्ते खेळलात? खेळला नसेल तर खेळताना पाहिले असेलच. या खेळात सर्वाना पत्ते वाटले जाते, कोणाला कोणते पत्ते येणार हे माहीत नसते. पण प्रत्येक जण आपल्याला मिळालेल्या पत्त्यामधून उत्तमातला उत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात. आपण ही आपल्या जीवनात आपल्याला मिळालेल्या पत्यांचा चांगला वापर करुया, प्राप्त परिस्थितीत विकास करुन घेण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करुया. यालाच जीवन म्हणतात.