पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या वयात शारिरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदल घडतात. इतके सगळे बदल कधी कधी खुद्द त्या मुला मुलींना समजुन घेताना जड जाते, ते घाबरुन जातात, अस्वस्थ होतात. काय तुम्हाला ही असंच वाटतं? जर तसं असेल तर आपल्याला बोललं पाहिजे, शोध घेतला पाहिजे आणि तसे वाटत नसले तरी ही बोलणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपल्या मित्र मैत्रिणिंना समजून घ्यायला मदत होईल. आणि हो, तुम्ही स्वतःला समजून घेणे शक्य होईल. जे खास बदल होतात त्याला म्हणतात तारुण्यात पदार्पण किंवा इंग्रजीत या परिवर्तनाला म्हणतात प्युबरटी(puberty). यौवनारंभ/तारूण्यात पदार्पण १. शारिरिक बदल ११,१२,१३ या वयोगटात आपल्या शरिरात अनेक बदल घडू लागतात.आता पर्यंत अंगकाठी कोमल आणि लहान होती. पण आता म ज ब त आणि आकारामध्ये वाढ होतेय. २-३ फुटांची लहान मुले ५-६ फुटाची बनुन जातात. काही मुलं मुली तर आपल्या आई बाबांन पेक्षा मोठी