Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेव्हा भावा बहिणींनो, जरा ऐका तुम्हाला नकारात्मक विचार पद्धती सोडून द्यायची आहे. तेव्हा जी काय तुमची समस्या आहे,त्याचे विश्लेषण स्वत: करा. आणि समजून घ्या. तुमच्या वरती संस्कार कसे झालेत? सावकाश, नकारात्मक संस्कार झाले असतील तर हळुवारपणे, धैर्याने ते बाहेर काढून टाका. खाली पडणे तुमच्या हातात नव्हते, पण पडल्यावर प्रयत्नपूर्वक उठून उभे रहाणे तुमच्या हाती आहे. 7 गिरनी तुम्हारे हाथों में नहीं था उठना तुम्हारे हाशों में हैं। मैत्रीणींनो, जनावरात आणि माणसात हाच तर फरक आहे. आपण निवड करु शकतो, आम्ही काही गोष्टी ठरवू शकतो. कसा विचार करावा, कसा व्यवहार करावा हे आपण ठरवू शकतो. तुम्ही हवी तर चोरी करु शकता किंवा चोरी न करण्याचा निर्णय घेवू शकता. नाराज व्हायचे नाही, इर्षा करायची नाही. पण हे सगळे निर्णय आणि निवड तुम्हाला करता येतील,जर तुमच्या विचारावर आणि भावनांवर तुमचे नियंत्रण असेल तर,