पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जेव्हा तुम्ही आपल्या मनाचे व बुद्धीचे मालक बनता तेव्हा येणा-या जाणा-या विचारांकडे त्रयस्थपणे पाहू शकता, विचलीत होत नाही, परेशान होत नाही तेव्हा क्रिया करत सुटतात तुम्ही कोठेतरी आरामात बसाल, १० वर्षे जुनी गोष्ट तुम्हाला आठवते आणि तुम्ही उदास होताय, आहे नाही गुलामी ? या गुलामीपासून आझादी । मिळाली पाहिजे. म्हणून स्वत:कडे त्रयस्थपणे पाहयला शिका बुध्द, पतंजली, सिध्दलोक असे म्हणतात आपण आपली दु:ख निर्माण करतो म्हणून काही लोक थोडक्या गोष्टीत आनंदी असतात तर काहींच्या इच्छा संपत नाही, ते आनंदी आणि सुखी झालेले दिसत नाहीत. जर आपण आपले दु:ख स्वत: निर्माण करतो तर ती संपविता आली पाहिजेत. कसे ? दृष्टे बना. साक्षीदार बना, भावनांचे आणि सवयींचे नीट विश्लेषण करा, त्यांना बदलून टाका आणि त्यांचे मालक बना. खूप ज्ञानी लोक म्हणाले आहेत, आनंद, सुख ,हर्ष काही नाव द्या ते सगळे तुमच्या आत आहे. आनंद तुमचा स्वभाव आहे. तुमची ती असलीयत आहे. हे धन तुमच्या आत आहे.पण नकारात्मक विचारांमुळे, प्रवृत्तीमुळे, सवयींमुळे धुळीत झाकोळल्या सारखे होते. त्यावर राग, ईर्शा, लोभाची पुटं चढली आहे. ही पुटं जाणीवपूर्वक दूर / ////// | 48