पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जेव्हा तुम्ही आपल्या लैंगिक अवयवांना हात लावता, । कुरवाळता तेव्हा तुम्हाला आनंद, सुख प्राप्त होते. यालाच हस्तमैथुन किंवा स्वतःला सुख देणे म्हणतात. ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. या मध्ये इतर कोणाबरोबर लैंगिक संबध न करता संभोगामध्ये मिळणारी उत्तेजन आणि आनंद याचा अनुभव घेता येतो. मुलगे आणि मुली दोघेही सर्व सामान्यपणे कधी ना कधी ही गोष्ट अजमावतात. हस्तमैथुनाशी जोडलेले अनेक गैरसमज हे सामाजीक दबावामुळे किंवा मुलामुलींच्या मध्ये भिती निर्माण करण्यासाठी आहेत. याबाबत गैरसमज दूर करा, अपराधी भाव असता कामा नये. लैंगिक इच्छापुर्ण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्यामुळे आरोग्यास कोणताही वाईट परिणाम होत नाही, मर्दानगी कमी होत नाही आणि मोठे झाल्यावर आपल्या लैंगिक जोडीदारा सोबत मुले जन्माला घालण्यात कोणतीच अडचण येत नाही. 139