पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ अपने शरीर का मो वरील आकडेवारी सिध्द करते की, मोठ्या संख्येने याच वयात मुले लैंगिक संबंध करतात. लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील. समलिंगी मुला-मुलींमध्ये लैंगिक संबंध असतात. याचाच अर्थ युवक मोठया प्रमाणावर लैंगिकते विषयी सक्रीय आहेत. परंतु त्यांच्यापैकी कोणालाच आपले शरीर, लींग आणि लैंगिकता याबाबत शास्त्रशुद्ध माहिती नाही. पुर्ण माहीती आणि समज नसल्यामुळे लाखो युवा, खास करुन मुली अडचणीत येत असतात. वेगवेगळ्या अभ्यासांने हे सिध्द केले आहे की जेव्हा लहान वयात अनेक मुलींना गर्भधारणा झाली हे समजु शकत नाही.१४ते२० आठवड्यानंतरचा गर्भपात जोखमीचा असतो. इतके दिवस उलटुन गेल्यामुळे डॉक्टरही गर्भपातासाठी तयार होत नाहीत. म्हणुन असुरक्षीत पध्दतीने भोंदूबाबाकडे जावुन मुली अघोरी प्रयत्न करतात.त्यात तब्बेत खराब होते. कित्येक जणी मृत्युमुखी पडतात, लैंगिकतेविषयी माहीती घेतली, विचार विनियम करुन मग पावले उचलली तर मग अश्या अडचणी पासुन मुली वाचु शकतात. मुलींच्य व स्त्रियांच्या लैंगिकतेवर या भितीचा, लैंगिकतेशी संबधीत लाजेचा गंभीर परिणाम होतो. लज्जा आणि भय या कारणामुळे त्यांची लैंगिक इच्छा पायदळी तुडवली जाते. कित्येक मुली या भयामुळे आणि लज्जेमुळे आयुष्यात उभ्या राहु शकत नाहीत. _ 129