पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलींना/स्त्रीयांना आपल्या इच्छा माराव्या लागल्या तरी चालतात. त्यांना बंधनामध्ये ठेवण्याचा हा आणखिन एक प्रकार आहे.त्यांच्या साठी लग्नापुर्वी आणि विवाहबाहय संबध म्हणजे सर्वात मोठे पाप मानले जाते. मुले /पुरुषांच्या बाबतीत हा नियम लागु नाही. मुलीवर बलात्कार झाला तर ही मुलीसाठीच लाजीरवाणी गोष्ट मानली जाते. जणुकाही ती स्वतःच बलात्काराला जबाबदार आहे. मुली लैंगिक इच्छा व्यक्त करण्यास एक किंवा अनेक कारणांसाठी घाबरतात. तीने लैंगिक संबंधाला होकार दिला तर तीला चालु, बदफैली, चारित्रहिन ठरविले जाईल. म्हणुन ती 'हो' म्हणू इच्छित असली तरी ती 'हो' म्हणु शकत नाही. कसला विरोधाभास आहे. मुलींना 'नाही' म्हणण्याचा अधिकार तेव्हाच असु शकतो जेव्हा त्यांना हो म्हण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार असु शकेल. । ... तर मित्रांनो, जसे आपण पाहीले की लैंगिकते बाबत वेगवेगळे विचार, वेगवेगळी आवड निवड आणि विविधता असु शकते. म्हणुन तर या बाबत संपुर्ण माहीती घेणे, चर्चा करणे आणि आपली समज वाढिवणे गरजेचे आहे. संपुर्ण माहिती घेतल्यावर व समज वाढल्यावर तुम्ही निर्णय घेवु शकता,की तुमची आवड काय आहे? तुमचा विचार काय आहे? तुम्ही कधी, कोणाबरोबर कोठे लैंगिक नाते निर्माण करु इच्छिता की आताच अश्या नात्यांची तुम्हाला गरज वाटत नाही .तुम्हाला आपला विचार , नाते आणि वर्तणुक याची जबाबदारी स्वतःच उचलायची आहे. _ 127