पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शारीरीक ओळख ठोस आणि अचल नाही, ती प्रवाही आहे. म्हणून तर काही पुरुष काही वेळा बायकुळे वाटतात काही मुली पुरुषी वाटतात. थोडक्यात काय तर विविधता आहे. ही विविधता नाकारली किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर दु:खच पदरात येईल. ३. मानवी शरीर हे केवळ नैसर्गिक गोष्ट नाही तर त्यावर समाज,संस्कार आणि आपल्या मनाचा खुप प्रभाव आहे माणूस आपली शीट क्षमता आणि गटना बदलू शकतो उदाहरणार्थ, डोंगर चढायला शिकू शकता, आपल्या मास पेशी वाढवू शकतो. कठीणातल्या कठीण योग मुद्रा, नृत्य मुद्रा करु शकतो. ब्रम्हचर्य पाळून लैंगिक जीवन न जगण्याचा निर्णय करु शकतो. म्हणजेच माणूस आपल्या शरीराचा गुलाम नाही. आपलं शरीर, बुद्धी आणि भावना यांचा संबंध आहे, जे एकमेकांवर प्रभाव टाकतात. जसे आपण दुखी असतो । तेव्हा आपले शरीर कमजोर ,