Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत: निवृत्तिनाथ. [६३८ सांडुनी दिठीव जालासे राजीवं । सर्वत्र अवेव ब्रह्म येणें ॥ निवृत्ति घडला सर्वत्र बिंबला । दर्पण विसरला आत्मबोधी । ३९. उन्मन्यवस्थेत सर्व हरिमय होऊन जाते. उन्मनी अवस्था लागली निशाणी । तन्मयता ध्यानी मुनिजनां ॥ मन तेथे नाहीं पहासीरे कांहीं । सर्वहरिडोही बुडी दे कां ॥ मनाची कल्पना देहाची भावना । शून्य ते वासना हरीमाजी ॥ निवृत्ति म्हणे सर्व हरिपिक पिकले । ज्ञानासी लाधले गुरुकृपा ॥ ४०. मन शून्यांत, ध्यान उन्मनींत, चित्त नारायणांत लागून __गेले आहे. अनंत ब्रह्मांडे अनंत रचना । शून्य हे वासना तेथे जाली ॥ मन गेले शून्यीं ध्यान ते उन्मनीं । चित्त नारायणी दृढ माझे ॥ जेथे नाही ठायो वेदासि आश्रयो । लोपले चंद्रसूर्यो नाही सृष्टि ॥ निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठी। नेतसे वैकुंठा गुरु माझा ॥ ४१. आम्हांस सर्वत्र गोसावी दिसतो. दिहाची दिवटी अखंड पैं सतेज । चंद्रसूर्य भोज नाही तेथें ॥ नाही तेथे रवि नाही तेथे चंद्र । अवघाचि महेद्र एकतत्वे ॥ दीपकेंचि दीपक विस्तार अनेक । अवघाचि त्रैलोक्य एकतत्त्वे ।। निवृत्ति संपन्न एकतत्त्व सेवी । सर्वत्र गोसावी दिसे आम्हां ॥ ४२. निवृत्तिनाथ आत्मालिंगाच्या चरणरजांवर लोळण घेतात. हरिदाससंगै हरिरूप खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती॥ संत मुनिदेव सनकादिक सर्व । तीही मनोभाव अर्पियेला ॥ १ दृष्टि. २ सुंदर, ३ घडलेला घट ४ निशाण, नौबत. ५ प्राप्त. ६ दिवस. ७ कौतुक.