________________
६३८] साक्षात्कार. .. आम्ही कळा तूं चंद्रमा । तूं अमृत आम्ही गरिमा ॥ आम्ही निधि तूं निधान । आम्ही ध्येय तूं साधन ॥ निवृत्ति उपरति वाहे । हृदयीं कृष्णनाथ ध्याये ॥ ३६. आम्हांस काळवेळ नसून, अखंड ज्योतिरूप हरि दिसत आहे. त्रैलोक्य पावन जनी जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ नाहीं आम्हां काळ नाही आम्हां वेळ । अखंड सोज्वळ हरि दिसे ॥ ब्रह्म सनातन ब्रह्मींचे अंकुर । भक्तिपुरःसर भूतदया ॥ निवृत्ति म्हणे दीन दुर्बळ मी एक । मनोमय चोख आम्हां गोड ॥. ३६. आत्मोदयांत ताराग्रहमेदिनीचा लोप. गोविलो चरणी टाकिली सांडणी । विषयपोखणी दुरी ठेली ॥. पाहांट पाहाली ब्रह्मे उगवली । दिननिशीं जाली एकरूप ।। नाहीं तारा ग्रह नाही हे मेदिनी । सर्व जनार्दनीं बिंबलेसे ॥ निवृत्ति निकट ब्रह्म सर्व घोट । अवघा निघोट राम आम्हां ॥ ३७. हरच्यिा तेजामुळे चंद्र, सूर्य, तारा दिसत नाहीत.. हरीविण न दिसे जनवन आम्हां । नित्य हे पौर्णिमा सोळाकळी। चंद्रसूर्यरश्मि न देखों तारांगणे । अवघा हरि होणे हेचि घेवों ॥ न देखों हे पृथ्वी आकाश पोकळी।भरलासे गोपाळी दुमदुमित॥. निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनी हे धाम गुरुगम्य ॥. ३८. आत्मबोधामध्ये निवृत्तिनाथ दर्पण विसरतात. गगनीं वोळंले येते ते देखिले । दर्पणी बिंबले आपण ॥ ते रूप रूपस रूपाचा विलास । नामरूपी. वेष कृष्ण ऐसे ॥ . १ गुंतली. २ ओंवाळून टाकलेला पदार्थ. ३ पोसणे, पुष्टी. ४ सकट, सर्व.. ५ वळणे, प्राप्त होणे. टाराम पण पितरताव..