________________
२१४ संतवचनामृत : एकनाथ. [६१३३ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एकाजनार्दनीं पडली मिठी ॥ १३४. घर सोडून परदेशास गेलो असतां कड्याकपाटांवर _ श्रीहरि दिसून माझा एकांत नाहीसा झाला. घर सोडोनि जावे परदेशा । मजसवें देव सरिसा ॥ कडेकपाटेंसी वरी। जिकडे पाहे तिकडे हरी ॥ आतां कोणीकडे जावे। जिकडे पाहे तिकडे देव ।।. एका बैसला निरंजनी । न जाइजे जनीं वनीं ।। - १३५, अंतरी बाहेरी एकमय होऊन गेले. जिकडे जावे तिकडे देवचि सांगाते । ऐसे केले नाथे पंढरीच्या॥ शब्द तेथे जाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनि॥ अंतरी बाहेरी एकमय जाहले । अवघे कोदाटले परब्रह्म ॥ एकाजनार्दनीं ऐसी जाहली वृत्ति । वृत्तीची निवृत्ति चिदानंदी ॥ . १३६, मन रामांत रंगून रामरूपच होऊन गेले. मन रामी रंगले अवघे मनचि राम झालें। सबाह्य अभ्यंतरी अवघे रामरूप कोंदले ॥ध्रु॥ चित्तचि हारपले अवघे चैतन्याच झाले । देखतां देखतां अवघे विश्व मावळले। पहातां पहातां अवधै सर्वस्व ठकले ॥१॥ १ गुहा. २ देव. ३ व्यर्थ. ४ भरलें.