________________
६ १३३] साक्षात्कार. २१३ १३०, विठ्ठलावांचून रिता ठाव आता उरला नाही. मागे पुढे विठ्ठल भरला । रिता ठाव नाही उरला ॥ जिकडे पहावे तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥ एकाजनार्दनीं सर्वदेशी । विठ्ठल व्यापक निश्चयेशीं ॥ १३१. देवाचा कसा नवलावो पहा की जिकडे पाहीन तिकडे देवच दिसतो. पहा कैसा देवाचा नवलावो । पाहे तिकडे अवघा देवो । पहाणे परतले देवे नवल केले । सर्वही व्यापिले काय पाहो ॥ पहाणियाचा ठाव समूळ फिटला । अवघा देही दाटला देव माझ्या ॥ एकाजनार्दनी कैसे नवल जाहले । दिशादुम दाटले देहें सहजीं ॥ १३२. जेथे तेथे देव उघडाच दिसत असल्याने निलाजरासा वाटतो. देवासी कांही नेसणे नसे । जेथे तेथे देव उघडाचि दिसे ॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुम्हीं॥ न लाजे जेथें नाहीं गांव । पांढरा डुकर झाला देव ॥ एकाजनार्दनीं एकल्या काज । भाक्ति तेणेचि नेली लाज ॥ १३३. देवास नेऊन बाहेर धातले तरी तो परतून घरांमध्ये येतो. वैष्णवा घरी देव सुखावला । बाहेरी नवजे दवंडोनि घातिला ॥ देव म्हणे माझे पुरतसे कोड । संगती गोड या वैष्णवांची ॥ १ रिकामा. २ वृक्ष. ३ गच्च भरणे. ४ जात नाही. ५ हांकलणे.