________________
- - - - - - ६१०८] देव आणि भक्त. तयाचे पूजेचे महिमान । एक शिव जाणे ॥ येरां न कळेचि कांहीं । वाउगे पडती प्रवाही। उद्धवा तूं पुशिले पाहीं । म्हणोनि तुज सांगतो॥ माझे जे आराध्यदैवत । ते कोण म्हणसी सत्य । भक्त माझे जीवींचे हेत । जाणती ते ॥ तयांविण मज आवड । नाहीं कोणता पोवार्ड । माझा भक्त मज वरपड । काया वाचा मनेसी॥ माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सुखनिधान ।। कायावाचामन । मी विकिलो तयांसी ॥ ते हे भक्त परियेसी । उद्धवा सांगे हृषिकेशी। एकाजनार्दनी सर्वीसी। तेचि वदतसे ॥ १०७. माझा शरणागत केविलवाणा दिसेल तर ती लाज कोणास ? माझा शरणागत दिसे केविलवाणाही तो लाज जाणा माझीमज ॥ एकविध भावे आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे॥ समर्थाचेमुला काय खावयाची चिंतातैसें मी त्या तत्वतांन विसंबे॥ एकाजनार्दनी हा माझा नेम । आणिक नाहीं वर्म भावेविण ॥ ____१०८. तुमचे बोल वायां गेले तर माझें जीवित घेऊन काय करावयाचे ? तुमचे अप्रमाण होतां बोल। मग फोल जीवित्व माझे॥ कासया वागवू सुदर्शन । नाहीं कारण गदेचें ॥ तुमचा बोल व्हावा निको । हेचि देखा मज प्रिय ॥ . . मज या उणेपण.। तुमचे थोरपण प्रकाशू द्या ॥ एकाजनार्दनी देव । स्वयमेव बोलती॥ १ कार्य. २ स्वाधीन. ३ दीन. ४ व्यर्थ. ५ खरा.