Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ संतवचनामृत : एकनाथ. । १०३ १०३. मी तुमचा नोकर आहे असें देव भक्तांस म्हणतो. देव म्हणे भक्तांसी आवडीं। मी झालो तुमचा गडी ॥ सांगाल ते करीन काम । मजवर ठेवा तुमचे प्रेम ॥ भाव मज द्यावा । आणिक मज नाहीं हेवा ॥ आवडीने देव बोले । भक्तांमाजि स्वये खेळे ॥ खेळतां गोपाळी । एकाजनार्दनीं गोकुळीं ॥ १०४. भक्तांचे घरीं देव स्वयमेव उभा असतो. भाग्याचे भाग्य धन्य ते संसारीं । सांठविती हरी हृदयामाजी ॥ धन्य त्यांचे कुळ धन्य त्यांचे कर्म । धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखी संकटीं सुखांत नाम सदा गाय । न विसंबे देवराय एक क्षण ॥ एकाजनार्दनीं धन्य त्यांचे दैव । उभा स्वयमेव देव घरी॥ १०५. मी देह, व भक्त माझा आत्मा, असें देव म्हणतो. बहु बोलाचे नाही कारण । मी देह, भक्त आत्मा जाण ॥ माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥ नांदे सहज भक्त आंत । मी देह, भक्त देहातीत ॥ एकाजनार्दनीं भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥ १०६. भक्त हेच माझें आराध्यदैवत होत. ऐके उद्धवा प्रेमळा । सांगतो जीवाचा जिव्हाळा । तूं भक्तराज निर्मळा | सुचिते ऐके ॥ मी बैसोनि आसनीं । पूजा करितो निशिदिनीं। ते पूज्य मूर्ति तुजलागुनि । नाहीं ठाउकी उद्धवा ॥ जयाचेनि माते थोरपण । वैकुंठादि हे भूषण । . १ लक्ष लाऊन.