Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ संतवचनामृत : जनार्दनस्वामी. [६१० अन्न परब्रह्म वेदांती विचार । साधी हाचि निर्धार प्रेमतत्त्वे ॥ म्हणे जनार्दन यापरते आणिक । नाहीं दुजें देख एकनाथा ॥ ११. जडभारी पडतां संतच तुला सहाकारी होतील. संकल्प विकल्प यावरी घाली शून्य । मन करी निमग्न हरिपायीं। उपासना दृढ संतांचे चरणी । तेचि पैं निर्वाणी तारक तुज ॥ पडतां जडभारी संत साहांकारी । सर्वभावें हरि तेचि होती ॥ म्हणे जनार्दन एकनाथा न विसंबें । सोपा मार्ग ऐके सर्वभावें ॥ १२. मन शुद्ध झाल्यास भाविकांस देव बसल्याठायींच दिसतो. तीर्थपर्यटन कासया करणें । मन शुद्ध होणे आधी बापा ॥ तीर्था जाऊनि कायमन शुद्ध नाहीं । निवांतचि पाही ठायीं बैसे ॥ मन शुद्ध जालिया गृहींच देव असे । भाविकांसी दिसे बैसल्या ठायीं॥ म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा । याहूनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं॥ १३. मोत्यांची चौकडी, मण्याची ज्योत, अगर तेलावांचून दीप्तीचा प्रकाश. उदयेचे तीन द्वितीयेचे तीन । अविनाश देखणे संध्याकाळी ॥ संध्याकाळी भावना टाकुनियां द्यावी । तेणेचि हो ध्यावी समाधि - सुखें ॥ एक एक चक्रे आकाशाएवढी । त्यामध्ये चौकडी मोतियांची ॥ मणियाची ज्योति संध्याकाळी वाती। तेलाविण दीप्तिपाजाळल्या॥ जनार्दन म्हणे एकनाथा घेई । समाधि हे पायीं सद्गुरूच्या ॥ १ संकट. २ सहाय ३ विसरणे. ४ सकाळ. ५ दोन प्रहर.