________________
dhamala - ६१.] जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. १६५ ____२ जनार्दनस्वामींचा एकनाथास उपदेश. ७. तूं पंढरीचा सोपा मार्ग पतकर असें जनार्दन एकनाथास सांगतात. नको गुंतूं लटिक्या प्रपंचासी बापा । मार्ग आहे सोपा पंढरीचा। न लगे पुसावे आटाआटी कांहीं । आणिके प्रवाही गुंतूं नको ॥ भांबावल्यापरि जन झाले मूढ । विसरले दृढ विठोबासी ॥ म्हणे जनार्दन एकनाथा निके। साधी तूं कौतुके हेचि वर्म ॥ ८. विठ्ठलाचा मंत्र जपण्याविषयी जनार्दनांची एकनाथास आज्ञा. आणिक या सृष्टी साधन पैं नाहीं ।घेई पां लवलाही नाम वाचे ॥ उभा दिगंबर कटी ठेवुनी कर । शोभतसे तीर चंद्रभागा ॥ पुंडलिके निज साधिले साधन । ते तूं हृदयीं जाण धरी भावे ॥ म्हणे जनार्दन एकनाथा हृदयीं । विठ्ठल मंत्र ध्यायी सर्वकाळ ॥ ९. संतांस नमन कर, व आलेल्यांस अन्न दे. सर्वांभूती भाव ठेवू नको दुजा । तेणें गरुडध्वजा समाधान ॥ संतांसी नमन आलिया अन्नदान । यापरते कारण आणिक नाहीं॥ सर्वभावे वारी पंढरीची करी । आणिक व्यापारी गुंतूं नको ॥ म्हणे जनार्दन घेई हाचि बोध । सांडोनि सर्वथा द्वेषभेद ॥ ___१०. अन्न परब्रह्म असल्याने जातीचा विचार करूं नको. आलिया अतिर्थी द्यावे अन्नदान । याहुनी साधन आणिक नाहीं ॥ ज्ञातीसी कारण नाहीं पैं तत्त्वतां । असो मैं भलता अन्न द्यावे ॥ १ श्रम. २ चांगलें. ३ आपलें, निकट, ४ दुसरा. ५ याचक. ६ जात. - HTTTTTTTT