________________
६१२१ ] संतमहिमा. हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां । शोक मोह दुःखा निरसं तेणे॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसंधान तुटों नेदूं ॥ - घेऊं सर्वभावे रामनामदीक्षा । विश्वासें सकळिकां हेचि सांगों ॥ नामा म्हणे शरण रिधी पंढरिनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥ __ ११९. साधु हे तीर्थाचे तीर्थ होत. जयांचेनि तीर्था आले तीर्थपण । केली सांठवण हृदयीं ती॥ नवल महिमा हरिदासां जीवीं । तीर्थे उपजवी त्यांचे कुसीं ॥ वाराणसी प्राणी मरे अंती कोणी । तया चक्रपाणी नामें तारी॥ नामा म्हणे तीथै तया येती भेटी । वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥ १२०. धिक् तो ग्राम की जेथे संतसंगति नाही ! धिग् धिग तो ग्राम धिग् धिग तोआश्रम।संतसमागम नाही जेथे॥ धिर धिग् ते संपत्ति धिग् धिग् ते संतति । भजन सर्वांभूती नाही जेथे ॥ धिग तो आचार घिग् तो विचार । वाचे सर्वेश्वर नाही जेथें ॥ धिर तो वक्ता धिर तो श्रोता। पांडुरंग कथा नाही जेथें ॥ धिग् ते गाणे धिग् ते पठणे । विठ्ठल नामबाण नाहीं जेथे ॥ नामा म्हणे धिर धिर त्यांचे जिणे । एका नारायणेवांचूनियां ॥ - १२१. तूं संतांवर विश्वास टाकशील, तर तुला देव आपोआप भेटेल. संतपायीं माया धरितां सद्भावें । तेणे भेटें देव आपआप ॥ म्हणवूनि संतां अखंड भजावें । तेणे भेटे देव आआप ॥ . १ दूर करणे... २ काशीक्षेत्र.