________________
११८ संतवचनामृत : नामदेव. [६११५ ११५. बोधसाबणाने संतरूपी परीट पापाचे डाग उडवितात. आह्मीं परीट चोखट । शुद्ध केले खटनट ॥ बोधसाबण लावुनी ठायीं । डाग उडविला पाहीं । शांतिशिळेवरी धुतलें । शानगंगे निर्मळ झाले ॥ परब्रह्म होउनि ठेलों । नामा म्हणे सुखरूप झालो । ११६. कृपा करून अशा जीवास, केशवा, तूं सोडीव. आतां आहे नाही पहातां क्षण एक । संपत्तीचे सुख विषय हा॥ हित ते आचरा हित ते विचारा। नामी भाव धरा जाणतेनो॥ संपत्तीच्या बळे एक झाले आंधळे । वेदिले कळिकाळे स्मरण नाहीं एक विद्यावंत जातीच्या अभिमाने। नेले तमोगुणे रसातळा ॥ मिथ्या माया मोह करोनि हव्यास । चिले आयुष्य वायांविण ॥ नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा। सोडवी केशवा मायबापा ॥ की ११७. हरिदासांना आकल्प आयुष्य व्हावें. आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळां।माझिया सकळां हरिच्या दासांग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो॥ अहंकाराचा वारान लागोराजस। माझ्या विष्णुदासांभाविकांसी॥ नामा म्हणे तयां असावे कल्याण ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥ ११८. एकमेकांस सावध करून नामाचे अनुसंधान आम्ही तुटूं .. देणार नाही. ' दुर्लभ नरदेह झाला तुम्हां आम्हां । येणे साधूं प्रमा राघोबाचा अवघे हातोहातीं तरों भवसिंधू । आवडी गोविंदु गाऊंगीतीं। . १ सुकुमार.