________________
१०२ संतवचनामृत: नामदेव. [६७३ ७३. जपतपध्यानापेक्षां भक्ति श्रेष्ठ आहे. भक्तिप्रतापे पावलो मी सुपंथ । सफळ निश्चित परमार्थ ॥ देव सर्वांभूती असतां प्रगट । निर्वाणी चोखट भक्ति जाण ॥ धरूनियां मनी जपसील नाम । तेणे निजधाम पावसील ॥ जप तप ध्यान नलगे साधन । भक्ति ते कारण नामा म्हणे ॥ ७४, प्रेमाच्या जिव्हाळ्याने काया पालटून कैवल्य मिळेल, अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ॥ प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं। तंव कैसा श्रीहरि करील कृपा। हित ते आचरा हित ते विचारा । नामी भाव धरा जाणतेनो॥ अनंत हा मूर्ति पाहिल्या लोचनी।त्यांतील कोण ध्यानीं प्रतिबिंबली। स्वमींचिया परी देखसी आभास । न धरीच विश्वास चित्त तुझे। दृष्टीचे देखणे श्रवणींचे ऐकणे । मनाचे बैसणे एक होय ॥ नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे । कायाच पालटे कैवल्य होय॥ ७५. प्रेमावांचून कीर्तनाचा काय उपयोग? चंद्रसूर्यादि बिवे लिहिताती सांग । परि प्रकाशाचे अंग लिहितां न ये॥ संन्याशाची सोगे आणिताती सांग। परि वैराग्याचे अंग आणितां र नये ॥ नामा म्हणे कीर्तन करिताती सांग। प्रेमाचे ते अंग आणितां न ये॥ १ ओलावा.