________________
६७२] नाम आणि भक्ति. यज्ञ करिसी तरि याक्षिकचि होसी । परि वैष्णव न होसी अरे जना॥ तीर्थ करिसी तरी कोपडीच होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ नामा म्हणे नाम केशवाचे घेसी । तरीच वैष्णव होसी अरे जना ।। ७१. तूं केशवाचें ध्यान करशील तर तूं केशवच होशील. पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसी अरे मना॥ आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसी अरे मना । वायु ध्यासी तरी वायुचि होसी । परि केशव न होसी अरे मना॥ आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी । परि केशव न होसी __अरे मना॥ नामा म्हणे जरी केशवासीध्यासी ।तरी केशवचि होसी अरे मना॥ ७२. नारायणास मनी दृढ धरण्याबद्दल मी लहानथोरांची प्रार्थना करीत आहे. ब्राह्मणां न कळे आपुले ते वर्म । गंवसे परब्रह्म नामे एका ॥ ... लहान थोरांसी करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ॥ सर्वोप्रति माझी हेचि पैं विनंति । आठवा श्रीपति आपुले मनीं ॥ केशव नारायण करावे आचमन । तेचि संध्यास्नान कर्म तया ।। नामा म्हणे हेचि करा नित्य भजन । ब्रह्मार्पण साधन याचे पायीं॥ - १ यात्रकरु. २ पाणी, जल. ३ सांपडणे.