Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६] चांगदेवास उपदेश. २. मुक्ताबाईचा चांगदेवास उपदेश. ___७. मायेच्या पुराचे वर्णन उलट उलट माघारा प्राण्या फिर गोते खाशी। भरला पुर मायेचा लोंढा वाहुनियां जाशी ॥ भवनदीचे पाणी सखया मोठे ओढितें। भल्याभल्यां पोहणारा उचलुन खाली पाडीते ॥ क्षणभंगुर संसार याचा भरंवसा नाहीं। दुर्लभ नरतनु गेल्या मग तूं पडशिल पस्ताई ॥ म्हणे मुक्ताबाई चांग्या अंतरिंची खूण । धरि सद्गुरुचे पाय तुजला नेतिल उद्धरून ॥ ८. अहंकाररूप घोंगडें सांडून वटेश्वराचे ध्यान कर. अहंकार अविद्या हैचि पै घोंगडी । पांघुरतां गोडी नाहीं मज ॥ घोंगडे नेले नारायणा । अछिप होतो बोल कोणा ॥ आशा तृष्णा दोघी बहिणी । लोळती धरणी घोंगडीया ॥ हिंसा निंदा चिंता या तिघीजणी । घोंगडीया आटणी होतसे ॥ घोंगडे माझे फाडले पोरीं। कामक्रोध दोघी सहोदरीं ॥ मुक्ताई म्हणे घोंगडे सांडी। वटेश्वरी मांडी ठाणं आतां ॥ १ धक्का. २ पश्चाताप. ३ दाटणी. ४ ठिकाण.