________________
संतवचनामृत : मुक्ताबाई. [६३ निजानंद दावी उघड 4 वैकुंठ। नामेची प्रगट आम्हांलागी॥ मुक्ताई जीवन मुक्त हा संसार । हरि पारावार केला आम्हीं ॥ ४. मुंगी आकाशात उडून तिने सूर्यास गिळिलें. मुंगी उडाली आकाशी। तिणे गिळिले सूर्यासीं ॥ थोर नवलाव जाला । वांझे पुत्र प्रसवला ॥ . विंचू पाताळासी जाय । शेष माथां वंदी पाय ॥ माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हांसली ॥ ५. दिवसां चांदणे व रा ना उष्ण तेज तुम्ही पाहिले आहे काय ? देउळाच्या कळशी नांदे एक ऋषी। तया घातली पुशी योगेश्वरी॥ दिवसां चांदिणे रात्रीं पडे उष्ण । कैसेनि कठिण तत्त्व जाले ॥ ऋषि म्हणे चांपे कळिकाळ पैंकापे । प्रकाश पिप निघोन जाय ॥ ठायींच्या ठायीं असे पाहतां न दिसे । मनाच्या धारसे एक होय॥ एकट एकले वायांचि पैं गुंफले । मुक्त पैं वरिले सहज असे ॥ वैकुंठ अविट असोनि प्रकट । वायांचि अडवाट मुक्ताई म्हणे ॥ ६. चंदनाने वनस्पतीस वास लागतो त्याप्रमाणे हरिपाठाने तुम्ही हरिरूपच व्हाल. सहस्त्रदळी हरि आत्माहाकुसरी। नांदे देहाभातरी अलिप्त सदा॥ रविबिंबबिंबे घटमठी सदा । ते नातळे पैं कदा तैसा आम्हां ॥ अलिप्तश्रीहरी सेवी कां झडकरी सेवितां झंडकरी हरिच होआल॥ चंदनाच्या हेती वेधल्या वनस्पती। तैसी आहे संगती या हरिपाठे॥ मुक्ताई चिंतित चिंतामणि चित्तीं। इच्छिले पावती भक्त सदा ॥ - १ प्रश्न. २ प्रवाह. ३ चातुर्याने. ४ सुवास. -