पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकाशकाचा खुलासा

श्रीयुत नारायण हरि आपटे यांची 'पहांटेपूर्वीचा काळोख' ही कादंबरी साहित्याचें चवथें पुस्तक म्हणून प्रसिद्ध करतां येईल अशी आमची अपेक्षा होती, व म्हणून त्याप्रमाणें वाचकांस आम्ही तसें आश्वासन दिलें होतें. परंतु कादंबरी पूर्ण होऊन वाचकांच्या हातीं देण्यास अजून कांहीं अवधि लागेल असे वाटल्यावरून प्रो० फडके यांचें हें पुस्तक वाच - कांस आम्ही सादर करीत आहोंत. या पुस्तकाचा विषय आज प्रत्येकास अगत्याचा वाटत आहे, व प्रो० फडके यांनी त्याचे प्रतिपादन अतिशय आकर्षक शैलीनें केलें आहे. आमच्या सर्व वाचकांस हें पुस्तक संग्राह्य वाटेल अशी - आमची खात्री आहे.
 'विजय साहित्या'च्या पुस्तकांबद्दल जनतेची वाढती सहानुभूति व व्यक्त होत असलेला आदर पाहून आम्हांस अधिक उत्साह वाटत आहे व त्याबद्दल आम्ही वाचकांचे सदैव ऋणी आहोत.

व्यवस्थापक