पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेपनिरसन

३७

दृष्ट्या भ्रष्टाकार कसा होणार? उलट, स्त्री-पुरुषांस सुप्रजाजनाचें अगत्य पटून संततिनियमनास त्यांनी प्रत्यक्ष आचरणानें प्रारंभ केला तर त्यांत खऱ्या धर्मदृष्टीच्या आणि नीतिदृष्टीच्या लोकांना आनंदच वाटावयास पाहिजे.
 सारांश, संततिनियमन ही कोणत्याही दृष्टीनें गर्हणीय ठरण्या- सारखी गोष्ट नाहीं. प्राचीन काळच्या परिस्थितींत व आजच्या परिस्थितींत जमीन अस्मानाचें अंतर पडल्यामुळे त्या काळी बहुप्रस विता जशी इष्ट होती तशी आज नाहीं. शिवाय, लोकसंख्येची वाढ कमी करणें हा कांहीं संततिनियमनाचा उद्देश नाहीं. संतति- नियमनाचे आचरण स्त्री-पुरुषांनी केल्यास त्या देशांत जन्मप्रमाण खालीं जातें हें खरें, पण त्या देशांतील लोकसंख्येची वाढ खुंटते असें नाहीं. या प्रकरणाच्या आरंभीं दिलेल्या इंग्लंड बॅगैरे देशांच्या उदाहरणांवरून वाचकांस ही गोष्ट पटलीच असेल. पण महत्त्वाचा भेद हा, की बहुप्रसवितेमुळे जी लोकसंख्या वाढते ती कुप्रजा असते, आणि मार्गे आम्हीं सांगितल्याप्रमाणें तेवढ्या वाढीसाठी समाजाच्या केवढ्या तरी शारीरिक व सांपत्तिक सामर्थ्याचा सारखा अपव्यय होत असतो; व उलट संततिनियमनामुळे हा अपव्यय टळतो, लोकसंख्येची जी वाढ होते ती सुप्रजा असते, आणि हॉलंडप्रमाणे त्या देशांतील आरोग्य आणि तेज हीं देखील झपाट्याने वाढत असतात. संततिनियमनाचा पुरस्कार ज्या ज्या देशांत झालेला आहे त्या त्या देशांत त्याचे सुपरिणामच दिसून येत आहेत, इतकेंच नव्हे तर ज्या देशांत त्याचा अधिक प्रमाणावर व उघडपणें पुरस्कार झालेला आहे तेथें त्या सुपरिणामाचेंही प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतक्या सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या लख्ख दिसल्यावरही संतति- नियमनाचें धोरण आपण स्वीकारलें पाहिजे याविषयीं कोणती शंका उरण्यासारखी आहे ?