पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
संतति-नियमन

आणि श्रीमंतांना अपत्यप्राप्तीसाठीं नवससायास करावे लागतात ही वास्तविक दैवाधीन गोष्ट नाहीं. तर हा निसर्गाचा एक नियम आहे. प्रजोत्पत्तीस अनुकूल अशी जी एक नैसर्गिक परिस्थिति असते तिचें स्थूल स्वरूप कशा प्रकारचें असतें तें शास्त्रज्ञांनीं निश्चितही केलेले आहे; व त्यांनीं असें दाखविलें आहे कीं ही परिस्थिति दरिद्यांच्या संसारांत साहजिकपणेंच उत्पन्न होत असते. या निसर्गनियमाविषयींचा सविस्तर उहापोह आपण पुढील प्रकरणांत करूं. पण तोंपर्यंत आपणांस असें म्हणावयास हरकत नाहीं कीं अपत्यलाभाची गोष्ट वाटते तशी दैवाधीन नाहीं. ती निसर्गनियमानुसार होणारी गोष्ट आहे. आरोग्यहीन वातावरणांत रोग उद्भवणें हा जसा एक निसर्गाचा नियम आहे तसाच प्रजोत्पादनाचाही आहे; आणि निसर्गनियम कळल्या - नंतर योग्य रीतीनें वागून रोगाचा प्रतिबंध करणें जसें शक्य आहे त्याचप्रमाणें जरूर ती सावधगिरी ठेवल्यास संततीचे नियमन करणें शक्य आहे असे म्हटल्यास तें योग्यच होईल.
 शिवाय संतति ही सर्वस्वी पराधीन गोष्ट आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी संततिनियमनाचा यत्न करणें हास्यास्पद ठरत नाहीं. तसें म्हटलें तर आपल्या आयुष्यांतील कोणती गोष्ट दैवाधीन नाहीं ? आपले आरोग्य चांगलें राहणें, आपल्याला अनुरूप पत्नी मिळणें, आपल्याला आपल्या मनाजोगती व मोठ्या पगाराची नोकरी मिळणें- या व अशा सर्वच गोष्टी परमेश्वरी सूत्रावर अवलंबून असतात. दैव- वाद एकदां मान्यच केला म्हणजे तो मानवी आयुष्यांतील सर्व लहान मोठ्या गोष्टींना सारखाच लागू होतो. पण दैववाद मान्य करूनही प्रयत्नाला जागा उरतेच. आपले आरोग्य ईश्वरी संकेतावर अवलंबून आहे आणि मरण ओढून आणावयाचें म्हटलें तरी शक्य नाहीं, व आलेलें टाळावयाचें म्हटलें तरी शक्य नाहीं, अशा प्रकारची ज्याची खात्री आहे तो मनुष्यदेखील पर्वताच्या एखाद्या कड्यावर