पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
संतति-नियमन

कीं जननसंख्येच्या बाबतींत ज्या देशाचा नंबर पहिला आहे, आणि त्यामुळें वास्तविक लोकसंख्येच्या वाढींतही ज्या देशाचा नंबर पहिला असावयास पाहिजे त्याचा नंबर विसावा कां असावा ? या प्रकाराचें कारण काय ?
 हें कारण शोधण्याच्या हेतूनें या विषयावरील अधिकारी लोकांचे ग्रंथ आपण वाचूं लागलों तर केवळ जन्मसंख्येचें अजस्त्र प्रमाण म्हणजे देशाची भरभराट असें समीकरण मांडणे चुकीचें होय, असेंच त्या सर्वांचें मत असल्याचें आपणांस आढळून येतें. लोकसंख्येची वाढ ही केवळ जन्मसंख्येवर अवलंबून नसून जन्मसंख्येतून मृत्युसंख्या वजा केली तरी जी बाकी उरते तिच्या प्रमाणावर अवलंबून आहे. हिंदुस्थानांतील जन्मसंख्येचें प्रमाण जसें विलक्षण तसेंच मृत्युसंख्येचें ही प्रमाण विलक्षण आहे. त्यामुळे वजाबाकीच्या वेळीं या दोन्ही मोठ्या प्रमाणांची काटाकाट होऊन आवशेष रहाणारी लोकसंख्या फारच थोडी असते. यावरून असें म्हणावयास हरकत नाहीं, कीं हिंदु- स्थानाची लोकसंख्या वाढावी ही गोष्ट जरी इष्ट समजली तरी त्या कार्यासाठी बहुप्रसविता हें साधन उपयोगी नाहीं. कारण प्रमाणाबाहेर बहुप्रसविता वाढली, की मृत्यूचे प्रमाणही तसेंच वाढतें आणि लोक- संख्येच्या वाढीचा हेतू साध्य होण्याऐवजीं असाध्यप्राय होऊन बसतो. मग, वास्तविक लोकसंख्या वाढणे इष्ट नसतांना बहुप्रसवतेचा मार्ग किती तरी पटींनी त्याज्य नाहीं काय ? शिवाय, एक गोष्ट नेहमी लक्षांत ठेविली पाहिजे ती ही, कीं बहुप्रसविता आणि प्रजानाश- बाहुल्य यांची काटाकाट होऊन लोकसंख्येची वाढ मंदगतीनें होणें हा प्रकार अतिशय घातक आणि समाजाच्या सामर्थ्याचा शोष करणारा आहे. कारण या प्रकारांत प्रजोत्पत्तीच्या कामी समाजांतील स्त्री-पुरुषांच्या सामर्थ्याचा व्यय व्हावयाचा तो हो असतो, आणि तो होऊन सशक्त, बुद्धिमान आणि दीर्घायुषी अशा