पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संतति-नियमन

एक देणें आहे. तें दिल्यावांचून कोणालाही सुटका नाहीं. 'मरणं प्रकृतिः शरीरिणाम् !' या वचनाची सत्यता पटवून द्यावयास कधींची गरज नाहीं. परंतु शोक वाटतो तो केवळ हिंदुस्थानची प्रजा मरते याबद्दल नव्हे तर वार्धक्यानंतर मृत्यु यावयाचा हा क्रम पार नामशेष होऊन, लहान तान्हीं मुलें, तरणेताठे पुरुष आणि तारुण्यांत नुकत्या प्रवेश करणाऱ्या पोरसवदा स्त्रिया यांच्या गळ्यांभोवतींच मृत्यूचे निर्दय पाश पडतात हें पाहून शोक अनावर होतो.
 आमच्या राष्ट्राच्या अवनत आरोग्याची कल्पना यावयाम मुत्यु- संख्येचे आंकडेच पहावयास पाहिजेत, किंवा अर्भकांच्या व तरुण स्त्री-पुरुषांच्या हृदयभेदक प्रेतयात्राच दृष्टीस पडल्या पाहिजेत असें नाहीं. मरणाऱ्या लोकांची गोष्ट सोडून दिली, तरी जे जगतात त्यांची स्थिति काय मोठी आल्हाददायक आहे ? आपल्या राष्ट्राची शारीरिक संपत्ति दर पिढीगणिक कशी नाहींशी होत चालली आहे हें येथें नव्यानें सांगावयास नको. पुराणकालांतील स्त्री-पुरुषांच्या विशाल व सुंदर देहांची वर्णनें तर बाजूलाच राहू द्या; परंतु नुकते तीनशें वर्षांपूर्वीच होऊन गेलेले ऐतिहासिक पुरुषदेखील आमच्या आजच्या शरीरसामर्थ्याच्या कल्पनेच्या मापाने आम्हांला कल्पित कथें- तील राक्षस वाटू लागतात. आगरकर, चिपळूणकर, टिळक या माजी पिढीचें बौद्धिक तेज व शारीरिक बल आजच्या पिढीतल्या कर्त्या माणसांना सहज दिपवू शकते. आणि आज शाळा कॉलेजांतून तयार होत असलेली उदयोन्मुख पिढी पहावी तों ती या मंडळीहूनही कमी प्रतीची निपजणारशी भीति वाटल्यावांचून रहात नाहीं. शरीरसंपत्तीच्या दृष्टीनें प्रत्येक पिढी माजी पिढीला बरी म्हणवीत आहे, आणि आज सुमारें शंभर वर्षे चाललेली ही उतरती भांजणी अशीच पुढे चालू राहिली तर आणखी दोन पिढ्यां- नंतर येणाऱ्या हिंदी स्त्री-पुरुषांची देहसंपत्ति कोणत्या प्रतीची असेल