पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८२]

[माझा जन्मभरचा


पाठवून आपल्या सांपत्तिक दुर्दशेचें वर्णन केलें, व कसेहि करून परवानगी द्या अशी भीड घातली. तेव्हा मलाहि ती द्यावीशी वाटली व मी ती नाअिलाजाने दिली. पहिला जाहीर प्रयोग किर्लोस्कर नाटकगृहांत झाला. प्रयोग साधारण बरा झाला. पण नाटक नीट न बसल्याने रंग भरावा तसा भरला नाही. लगेच तीन दिवसांनी दुसरा प्रयोग झाला. पण तीन दिवसांत सुधारणा ती काय होणार ! अशा रीतीने मला नाखूष करून भारत नाटक मंडळी पुण्याहून सोलापुराला गेली. बरें, नाटक घाअीघाअीने बसविलें तरी त्याची खरी योग्यता त्यांना माहिती नव्हती असें नाही. आणि त्यांना जर नाटकाची परवानगी पाहिजे होती, तर त्याच्या मोबदल्यासंबंधी कांही करार वगैरे करण्याबद्दल त्यांनी आपण होअून मला विचारावयास पाहिजे होतें. पण पुण्याहून जातांना तेंहि केलें नाही. तेव्हा मलाहि थोडा राग आला. आणि मी त्यांना पत्र लिहून कळविलें की, कराराचें बोलणें करण्यास या. तेव्हा त्यांना यावें लागलें. परंतु आल्यावर बोलणें काढलें त्यांत ' मोनॉपली 'च्या हक्काकरिता फक्त २०० रुपये देअूं असें सांगितलें ! मला ते मेहेरबानीखातर नाटक फुकट मागते, व माझ्या हौसेप्रमाणें तें बसवून त्याचे प्रयोग करते, तर मी कदाचित् कांही न घेतांहि त्यांच्यापुरता तरी प्रयोगाचा हक्क दिला असता. परंतु त्यांची अेकंदर वागण्याची पद्धतीच अशी चढेलपणाची दिसली की, मी कांहीच न बोलतां त्यांना निरोप दिला.
 (६९) कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी पुण्यास 'चित्ताकर्षक' नांवाची नाटक मंडळी आली होती. तिचे प्रयोग दुसऱ्या अेका थिअटरांत सुरू होते. तिच्यांतील मंडळींनी भारत नाटक मंडळीचा प्रयोग पाहिला, तेव्हा नाटकाबद्दल त्यांचें मत फार चांगलें झालें. आणि माझा व भारत नाटक मंडळीचा बेबनाव झाला असें समजतांच, त्यांनी येअून आपल्यास परवानगी मिळण्याविषयी फारच गळ घातली. नंतर या मंडळीचा मी अेक दुसऱ्या नाटकाचा प्रयोग मुद्दाम जाअून पाहिला. त्यावरून त्यांच्या नाट्यनैपुण्याविषयीं माझा ग्रह चांगला झाला, व त्यांची हौस व लीनता पाहून त्यांना हें नाटक देण्याचें मी ठरविलें. आणि दोन दिवसांनी सोलापुरास भारत नाटक मंडळी प्रयोग करणार तोंच त्यांना मी तारेने मनाअी केली व " तुम्हाला हक्क