लिमये यांच्याकडे सतारीच्या वारंवार मैफली होत. जीवनजी महाराज हे गुजरातेतून मुंबईस येऊन राहिले होते व तेथे त्यांनी अनेक सतारिये शिष्य तयार केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत यांचे नाव महशूर होते. विश्वनाथबुवा काळे हे जीवनजी महाराजांच्या जवळच सतार शिकले. तबलावादन, सतारवादन यावर यांनी पुस्तके लिहिली आहेत. अनेक राजेरजवाड्यांच्या दरबारात यांच्या व अण्णा घारपुरे यांच्या सतारीच्या मैफली झालेल्या आहेत. अण्णा घारपुरे यांनीही तबला व सतार यांवर पुस्तके लिहिली आहेत.
सारंगी हे सतारीइतकेच महत्त्वाचे वाद्य आहे. रमजानी, देवीदास हे पेशवेकाळी प्रसिद्ध सारंगीवादक होते. गोविंद राम हे सारंगीवादक गेल्या शतकात होऊन गेले. ते मुंबईस असत. गोव्यामध्ये विनायक बांदोडकर, पांडुमामा मंगेशकर, राम नागेशकर, मोतीराम कवळेकर इ. अनेक सारंगीवादक होऊन गेले. त्यांत दत्तारामजी पर्वतकर हे अग्रगण्य होत. हे दीर्घकाळ मुंबईस होते आणि ऑल इंडिया रेडिओ, हिज मास्टर्स व्हॉईस, इंपीरियल फिल्म कंपनी या संस्थांमध्ये त्यांनी नोकरी केली. नामांकित गवयांना त्यांची साथ फार मोलाची वाटे. मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर यांना साथ करण्याचेही भाग्य त्यांना लाभले होते. अनंतराव केरकर हे केसरबाईंचेच आप्त. सारंगीवादन ही कला त्यांच्या घराण्यातच होती. अनेक गवयांना व गायिकांना साथ करून त्यांनी नाव मिळविले आहे. बाबूराव कुमठेकर, यशवंतराव आमोणकर यांची नावे अशीच उत्कृष्ट साथीदार म्हणून प्रसिद्ध आहेत.
पेटी किंवा हार्मोनियम व तबला ही साथीची वाद्ये म्हणूनच प्रसिद्ध आहेत. पेटी वाजविण्यात गोविंदराव टेंबे यांचे नाव सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांच्या तोडीचा हार्मोनियमपटू दुसरा कोणी झाला नाही, असे जाणकार म्हणतात. नाटक, चित्रपट यांतही त्यांनी उत्तम नट म्हणून कीर्ती मिळविली होती. म्हैसूर दरबारात यांनी काही दिवस नोकरी केली होती. विठ्ठलराव कोरगावकर व डॉ. पाबळकर यांची नावेही पेटीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. गोव्याचे रत्नकांत रामनाथकर हे जसे गायक तसेच पेटीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकवीस वर्षे ऑल इंडिया रेडिओमध्ये पेटीची साथ करून त्यांनी उदंड कीर्ती मिळविली. यांच्या जोडीला पंढरीनाथ काळे यांचे नाव हार्मोनियमपटू म्हणून असेच प्रसिद्ध आहे. मुंबई, कलकत्ता येथील संगीत परिषदांमध्ये यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात येत असे. याशिवाय मधुकर पेडणेकर, शांताराम मांजरेकर, वसंत शेजवाडकर, मुरलीधर नागेशकर हेही पेटीवादनात कुशल म्हणून प्रसिद्ध आहेत. मधुकर पेडणेकर यांनी अनेक वर्षे हिज मास्टर्स व्हॉईस- सारख्या कंपन्यांत व काही चित्रपटांत संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. १९२३ साली सवाई गंधर्वांच्या गायनाच्या वेळी डॉ. कुर्तकोटी यांनी त्यांना सुवर्णपदक दिले होते.
सनई हे महाराष्ट्राचे सर्वपरिचित असे वाद्य असून त्यात गायकवाड, विशेषतः
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७९८