मिळवावयाची, असे ठरविले आणि तशी दोनदा लढाई केलीही. घोडपच्या युद्धात त्याचा पराभव झाला, तेव्हा माधवरावाने त्याला पकडून शनिवार- वाड्यातच कैदेत ठेविले. तेथूनही त्याचे फितुरीचे चाळे चालूच होते. पुढे काही समझोता होऊन त्याची कैद कमी झाली तरी त्याचे फितुरीचे व दुहीचे प्रयत्न चालूच होते. आणि माधवरावाच्या मृत्यूनंतर तर त्याने नारायणरावाचा खूनच केला. या प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक घडामोडीत, त्याला अनेक सरदारांचे साह्य होते. त्यावाचून त्याला यातले काही साधलेच नसते. दादाची कृत्ये राष्ट्रद्रोही आहेत, असे सर्व मराठ्यांना वाटत असते, तर त्याला एक पाऊलही टाकता आले नसते. पण त्याचे उपद्व्याप शेवटपर्यंत चालू राहिले. माधवराव पेशवा अत्यंत कर्तबगार होता. पण त्याचे नऊदशांश रक्त दादाच्या प्रकरणांची विल्हेवाट लावण्यात आटून गेले. मराठ्यांत एकजूट असती, दादा प्रारंभापासूनच एकटा पडला असता, तर हे झाले नसते. अशा या सतत दुभंगलेल्या, फितुरीने ग्रासलेल्या, स्थिर निष्ठा कोठेच निर्माण न करू शकणाऱ्या मराठा समाजाला अखिल भारतात साम्राज्यसत्ता स्थापिता आणि रक्षिता येणे कालत्रयी शक्य नव्हते. मराठ्यांच्या अंगी शौर्य धैर्य होते, वीरश्री होती, पराक्रम होता. म्हणूनच त्यांना शंभर वर्षे मोठे विजय मिळत गेले. पण इतकेच. विजयी फौजा त्या-त्या मुलखात असतील तोपर्यंत मराठ्यांची सत्ता तेथे असायची. आणि ती सत्ता चौथाई किंवा खंडण्या वसूल करण्यापुरतीच ! प्रदेशाचे, लोकांच्या जीवितवित्ताचे रक्षण, शांतता व सुव्यवस्था यांचा अम्मल, असले काही मराठ्यांच्या साम्राज्यात नव्हते. ते करण्याइतके कसलेच कर्तृत्व त्यांच्या ठायी नव्हते. १७६९ साली उत्तरेत माधवरावाने फौजा धाडल्या आणि इतिहासकारांनी म्हटल्याप्रमाणे, पानपतच्या कर्तव्याची पूर्तता केली. पूर्तता केली हे खरे आहे. पण या उत्तरहिंद प्रकरणी निराळे काही घडले, असे मात्र नाही. मराठा साम्राज्यसत्तेच्या स्वरूपात त्यामुळे कसलाही फरक पडला नाही किंवा मराठ्यांच्या काही निराळ्या राष्ट्रपोषक, ध्येयवादी वृत्तींचा परिपोष झाला होता, असेही दिसून आले नाही.
उत्तर विजय !
पानिपतच्या धक्क्यातून मराठे दोनतीन महिन्यांत सावरले आणि आपल्या राज्याची घडी पूर्वीप्रमाणे बसविण्याचा उद्योगही त्यांनी आरंभिला. एकदोन वर्षे नारो शंकर, अंताजी माणकेश्वर, यशवंतराव पवार, शिंदे, होळकर यांची पथके उत्तरेत वावरत होती, म्हणून त्या प्रयत्नाला यशही येऊ लागले. पण दक्षिणेत चुलत्या-पुतण्यांचे द्वैत माजले, तेव्हा मराठी फौजा परत गेल्या आणि फौजा परत जाताच सुजा उद्दौला, जाट व रोहिले यांनी उचल केली व मराठ्यांची सत्ता निखळून टाकली. अंतर्वेदीत इराव्यापासून प्रयागपर्यंत सुजा उद्दौल्याने आपली ठाणी बसविली, सुरजमल जाटानेही बराच प्रदेश आक्रमिला. इराव्यापासून हरद्वारपर्यंत रोहिल्यांनी आपला अंमल बस-
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६५
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब