Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१५
अर्थमूलो हि धर्मः ।
 

म्हणूनच त्यांना असाध्य ते साध्य करता आले. या अर्थव्यवस्थेचे फल काय मिळाले?
 शिवभारतकार कवींद्र परमानंद म्हणतो-

महाराष्ट्रो जनपदः तदानीं तत्समाश्रयात् ।
अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वितः ॥ १०-३२

शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्राची जनता समृद्ध होऊन महाराष्ट्र नावाला सार्थत्वः प्राप्त झाले.