पान:महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुल्यांशी जोडणारा सयाजीराव हा दुवा अलक्षित राहतो. यातून ‘इतिहास कसा घडला’ हे समजून घेण्यावर मर्यादा येते.
बडोदा आणि कोल्हापूर : 'अनोखे ' ऋणानुबंध
 शाहू महाराजांचे पणजोबा शिवाजी तिसरे ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या पत्नी अहिल्याबाई या बडोद्याचे महाराज गणपतराव गायकवाड यांच्या कन्या होत्या. गणपतराव गायकवाड हे सयाजीरावांचे दत्तक चुलते होते. तर १८९१ मध्ये बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाईशी शाहू महाराजांचा विवाह झाला. सयाजीराव महाराजांची नात इंदुमतीदेवी आणि शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचा १ एप्रिल १९१८ रोजी झालेला विवाह हा या संस्थानांमधील तिसरा नातेसंबंध होता. तर पुढे ४ जानेवारी १९२९ रोजी कोल्हापूर संस्थानातील हसुरचे सरदार मानसिंगराव सुब्बाराव हसुरकर यांची कन्या शांतादेवी यांचा विवाह सयाजीराव महाराजांचे नातू प्रतापसिंह महाराजांशी झाला.
इंदुमतीदेवी आणि राजाराम महाराज विवाह
 कोल्हापूर आणि बडोदा राजघराण्यातील जुना नातेसंबंध पुढेही चालू राहावा अशी सयाजीराव महाराजांची इच्छा होती. सयाजीरावांचे पुत्र फत्तेसिंहाशी नऊ वर्षांनी मोठे असणाऱ्या राजर्षी शाहूंची घनिष्ठ मैत्री होती. फत्तेसिंहांची कन्या इंदुमती यांच्या विवाहाचा विचार सुरू झाल्यानंतर सयाजीरावांनी २२ जानेवारी १९१० रोजीच्या पत्राद्वारे शाहू महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी

महाराजा सयाजीराव आणि राजर्षी शाहू / ४४