पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात. हा भाग आजूबाजूला दाट वस्तीचा असल्याने तेथे ही बाग बनविण्यात आली होती.
 ज्युबिली पार्कमध्ये संध्याकाळी खूप गर्दी असते. या बागेतच गौतम बुध्दाचा ध्यानस्थ अवस्थेतील पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याच्या कोणशिलेवर बौध्द धर्माची मूलतत्वे कोरण्यात आली आहेत. ३१ डिसेंबर १९१० मध्ये या बुध्दाच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी महाराजांनी केलेले भाषण खूप सुधारणावादी असून, आजच्या काळातही खूप उपयुक्त ठरणारे आहे. यावेळी महाराज म्हणतात, “हिदुस्थानास जर ऊर्जिताकाळ यावयाचा असेल, तर तो एकी व विद्या यावाचून कधीही यावयाचा नाही. मी आपल्या राज्यात सक्तीचे शिक्षण सुरु केले आहे. त्याबद्दल लोकांस अडचणी येतात, असे लोकांचे म्हणणे

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४५