पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तयार ठेवण्यात येऊ लागले. बडोद्यात कोठी कचेरीही एक मेव्ह स्कॉटिश शैलीत बांधलेली इमारत आहे. ही कोठी इ.स. १९२२ मध्ये बांधली गेली या इमारतीचे काम आर्किटेक कोयल यांनी पहिले ही इमारत ८०,००० चौरस फूटांवर पसरलेली आहे. ही इमारत स्कॉटलंड च्या “बाल्मारेल" किल्याची आठवण करून देते महाराज सयाजीराव आणि बरोद्याचे दिवाण यांनी या इमारतीतूनच राज्यकारभार केला. येथे एक सभागृह व शाही कक्षां बरोबर इतर सरकारी कामांसाठी चाळीस खोल्या आहे. ही इमारत १९४८ पर्यंत बरोडा दरबारचे सचिवालय होते आजही बरोडा जिल्याचे हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे.
 आजच्या काळात आपल्याला महाराजांच्या या अफलातून व्यवस्थापनाला 'मॅनेजमेंट गुरु' ( management guru) असे म्हणावे लागेल. चिमणबाग खानगी कचेरी आणि जयसिंहराव लायब्ररी यांच्या आजूबाजूच्या उघड्या मैदानात अशीच एखादी कचेरी बांधण्यासाठी मोकळे मैदान राखून ठेवण्यात आले होते.
१६. ज्युबिली गार्डन (१९०६)
 प्रचंड सौंदर्यदृष्टी असलेल्या महाराजांनी शहराचे सुशोभिकरण करताना ठिकठिकाणी हॉस्पिटल, कॉलेज, हायस्कूल, सरकारी इमारतींभोवती बागबगिचे करवून घेतले. यामुळे शहराला एक विशिष्ट शोभा आली होती. महाराजांचा रौप्य महोत्सव १९०६ साली साजरा करण्यात आला होता. त्याच्या स्मरणार्थ शहराच्या मुख्य भागी एक बाग करण्यात आली. त्यास ज्युबिली गार्डन

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ४४