पान:छन्दोरचना.djvu/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Ro लगक्रमहि निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त' म्हणावें. मराठींत वृत्तरचना प्रथम केल्याचा मान महानुभाव कवींचा दिसतो. भास्कर कृत ' अीशस्तुती' मधील पुढील श्लोकावरून त्यावेळच्या रचनेची चाङ्गली कल्पना येअील.

  • तें कें देखौन डोळां परतर सुफळा सृष्टि हे जीवितेसी

कैश्या जङ्घा सुरेषा झुपर घणतरी जन्मभूमी अनङ्गा सेला मध्ये प्रदेशों मिरवतु सजनी मालगण्टों पवेशा वटीला योगिराजें करवितु सहजें पारणें लोचनांसी ” भास्कृर' म्हणजे कवीश्वर व्यास याने शके बाराशें पूर्वीच श्लोकरचना करण्यास आरम्भा केला; पण याचे श्लोक निर्यमक आहेत. या वेळेपासून महानु १ निरञ्जन-माधव अाधार देत नाही पण वृत्ताच्या ठिकाणीं ‘व्यत्ति? ही संज्ञा देतो. ‘व्यक्ति या समपादांतें पूर्वाचार्यों निरूपिलें; जातिव्यक्तिद्वयामध्ये छन्दःशास्त्र विरूढलें”. (निमास २०-२१) २ पहा वि. ल. भावे यांचा लेख वि. विस्तार ५५॥५. वि.ल.भावे पुढे म्हणतात कीं “सुन्दर, मनोहर, मन्द्र, तरङ्गिणी, चित्रकला, सुरती, सम्भोगा, सुरमा, सुमुखी, विमला, सानन्द, रामा, रमण, पादाकुल, मुतवली, चन्दनक, गन्धानक, फणीन्द्र, हीं त्यांतील वृतें अपरिचित अशींच आहेत. ” या वृत्तांचें ज्ञान व्हावें म्हणून मी रुक्मिणी स्वयंवराच्या प्रतीसाठी शोध केला. यवतमाळचे श्री. वामनराव नारायण देशपाण्डे यांच्या कृपेने या ग्रन्थाची जी ओक अपूर्ण सदोष प्रत मला पहायला मिळाली तिचा झुपयोग जो होॠ शकला तो मी करून घेतला आहे. परन्तु कित्येकदा प्राचीन वृत्तांसच नवीन नावें दिल्याचा संशय येतो. शार्दूलविक्रीडित, दोधक, चामर आणि यूथिका यांस अनुकमें अिन्द्रकल्हार, चन्दनबळी, तुनी आणि वनीमाळा हीं नावें अपभ्रंश आढळले !