पान:छन्दोरचना.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RQ काही छन्दोविषयक प्रश्न हीं पदें बहुतेक सन्तकवींनी, थोडीं अितर कवींनी लिहिलीं आहेत. हीं धार्मिक स्वरूपाचीं असल्यामुळे भाबड्या भाविक समाजाने त्यांचें स्मरण ठेविलें आणि आणि रघुनाथ पण्डित यांनी आपल्या विविध वृत्तांत लिहिलेल्या आख्यानांतून मधून मधून हीं गेय पर्दे विखुरलीं आहेत. मध्वमुनीश्वर, केशवस्वामी, नरहर शिष्य वणीकर, देवनाथ, दयाळनाथ अित्यादकांची जातिरचना विपुल आहे. अमृतराय, रामजोशी (कविराय), होनाजी बाळ, सगनभाऊंभू, प्रभाकर अित्यादि कवींनी कटाव, पोवाडा, लावणी अित्यादि जी गोन्धळी रचना केली ती सारी जातिरूपच आहे आणि ती बहुतेक शिथिल आहे. परन्तु रामजोशाची संस्कृत जातिरचना रेखीव नि शुद्ध दिसते. त्याचें 'तरुणि तवेदं कुचतटयतिगुरु कुरु मम हृदि सादरम्' हें केशवकरणी जातींतील पद्य या विधानाची यथार्थता पटवील. अण्णा किर्लोस्कर यांनी गीतांच्या चालींना कीर्तनांतून नि तमाशांतून सुशिक्षित रड्गभूमीवर आणिलें; आणि त्यांची गोडी नवसुशिक्षित समाजासड्गेच झुदयोन्मुख कवींना पटवून दिली. गोविन्द बल्लाळ देवल यांचीं बहुतेक पद्ये अितकीं सुरस, सुसंस्कृत, विविध आणि निर्दीष आहेत की आधुनिक मराठी कवितेंतील शैथिल्य नाहीसें करण्याचें श्रेय त्यांच्या लोकप्रिय झुदाहरणाला दिलें पाहिजे. जातिरचनेवर लिहूं अिच्छिणा-याला देवलांच्या टकर, नाराथण वामन टिळक, दत्तात्रय कोण्डो घाटे, माधवानुज, विनायक जनार्दन करन्दीकर अित्यादि आधुनिक मराठी कवींनी जातिरचनेस सुसंस्कृत वाचनीय कवितेच्या क्षेत्रांत रूढ करण्याचें श्रेय सम्पादिलें. आधुनिक मराठी कविता ही बहुतांशी जातिरूपच आहे. मराठी सङ्गीत नाटकांत रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी जी गायकी थाटाची क्रुिष्टरचना आणिली ती काव्यरचनेस अनुकूल नसल्याने मराठी कवितेच्या बाह्यस्वरूपावर तिचा काहीच परिणाम घडला नाही. (३) वृत्त-छन्द आणि जाति यांव्यतिरित वृत्त हा ओक प्राचीन काळा व्याकरणमहाभाष्यांतील कारिकाहि काही वृत्तरूप आहेत ही गोष्ट विचारणीय आहे. वृत्तांत अक्षरांच्या सङ्ख्येचे बन्धन असतें अितकेंच नव्हे तर त्यांचा