पान:छन्दोरचना.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना १६ (२) *टला ट रीला री-ग जन म्हणे काव्य करणारी ! आकाशाचीं घरें ग्रहमालांच्या वर अडसरी-ग जन म्हणे काव्य करणारी!” (फुओ ११) १४ लय म्हणजे काय ? पद्याला कोणतीहि चाल लाविली तरी चालते. चालीने विशिष्ट स्वरक्रमाचाच बोध होतो. गळ्यावर पद्यच काय गद्यहि म्हणतां येतें. तेव्हा पद्य म्हणजे लयबद्ध पद्यरचना होय. आता लय म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. पुढील कविता म्हणून पहा:-

  • । कशासाठी । पोटासाठी

| खण्डाळ्याच्या | घाटासाठी । चला खेळू । आगगाडी । झोका अन्च । कोण काढी ? । बाळू, नीट । कडी धर । झोका चाले । खालीवर । औका, कूकुक्। शीट झाली । बोगद्यांत । गाडी आली । खडखड । भकभक । अन्धारांत। लखलख” (स्वर १०६) ही कविता म्हटलेली औकत असतांना स्वाभाविकपणेंच आपण मधून मधून टाळी वाजवत रहातो; आणि कविता सम्पली तरी ओकदोनदा टाळी पुढे वाजवितींच. कारण, कविता अमुक ओक ठिकाणीं सम्पणार आहे हैं म्हणणा-याला ठाक्षूक असलें तरी औकणा-याला ठाङ्भूक नसतें. तो आपल्या तन्द्रींत, लागलेल्या लयांत टाळी देतच राहतो. गायनाचे वेळीं तबला वाजविष्णा-याची हीच स्थिति होते म्हणून, काही गवऔी गाणें सम्पत आलें की तब्ल्यावर हात ठेथून तबल्जीला योग्य वेळीं थाम्बवितात.