पान:छन्दोरचना.djvu/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RCV9 जाति-जूम्भण यात्रेत भुजङ्गें गिळितां प्राणेश्वरा, धावोनि बळे सोडविलें त्या अवसरा, अहिदेहांतुनि श्रुद्धरिलें विद्याधरा, आठवू किती झुपकारा नाही मितीसद्रदित विलापे माय यशोदा सती.” १(राघव-पस ३/२१०)

  • चोखयाच्या महारीची विनन्ति' (पोबा २७), 'नव्या युगाचा काव? (पारा १), 'रोहिणी' (पारा १०), *हिड्रणी' (पारा ४६), ' वाटसरू? (पारा ६४), 'दूर कोठे तरी? (पारा ७१), 'बालकवि' (पारा ९१), * तिथे? (पारा ९६), ' माझ्या खेडेगांवीं' (पारा १०७), ' मञ्जुळा ? (कास्फू ४६), ' सन्ध्याकाळीं? (कास्फू ६३), 'खेड्यांतील देखावा ? (कास्फू ११०) अित्यादि कविता या लीलारतिजातींत आहेत. मञ्जरी हें एका वृत्ताचें नाव असल्याने या जातीला मज्ञरी म्हणून जें नाव पूर्वी देण्यांत आलें होतें त्याचा त्याग करणें अपरिहार्य झालें आहे.

भूपतिजातीप्रमाणेच या जातीच्याहि द्विपदीमालेंत केव्हा केव्हा विषमचरण खण्डित असतात. (२) * तो भासच सगळा, जरी स्वम तें तरी हुरहूर जाणवे मनांत कां ही परी? मावळली मोहक निशा, धवळल्या दिशा, या अजून नयनों खुपति तारका कशा ?” (केगी ५०) ही कविता या प्रकारची आहे. *जपानी भाषेत 'टांका? म्हणून ओक काव्यप्रकार आहे. यांत पांच चरण असून पहिले दोन निःशेवटले दोन सयमक असतात. ओक भावना, कल्पना अथवा ओक विचार या पश्चपदींत ग्रथित केलेला असतो. मात्र काव्यार्थ रूपकात्मक भाषेनें बहुशः सुचविला जातो. कविवर्य रवीन्द्रनाथ यांनी अशा प्रकारची पुष्कळ रचना केली आहे.” अशी प्रस्तावना करणारे रा. गोपीनाथ तळवळकर यांनी 'कणिका' हा प्रकार मराठींत आणून त्याच्यासाठीं या लीलारतिजातीची योजना केली आहे. ते म्हणतात,