पान:छन्दोरचना.djvu/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3R । मरती, झुठती, । फिरुनी मरती, मी । कटिवर या । बसणार. ” (यध १४९) अन्त्य चरण जर * । मी कटिवर बस- णार ' असा असता तर छन्दोभङ्ग टळला असत. (२) * मजशी । नकळे मी ॥ अथवा हे जन । चकले, धु० । प्रपञ्च मोठा । आप्पलपोटा । परमाथांचा । पथ वा खोटा पड- लें मज गूढ़, न । अकले.” (विक ८२) तथापि युवतिभूषण आणि नववधू या दोन जातींत छन्दीभड्ग होत असूनहि त्या रूढ झाल्या आहेत. शास्त्रादूढिर्बलीयसी असें म्हणण्याची पाळी येते ती १२ चरणमध्यावर स्वाभाविकपणें यति येतो. ज्या ठिकाणीं शब्दसमासि वा पदसमाति न झाल्यास रचना कर्णकटु लागते तेथे यति आहे असें समजावें. जेथे जेथे ओक वा अनेक मात्रांचा विराम असतो तेथे तेथे यति हा अपरिहार्यपणें असतीच असें समजावें. पण जेथे औका मात्रेचाहि विराम नसतो पण म्हणतांना स्वाभाविकपणेंच खटका पडतो अथवा जेथे कवीने सहेतुकपणें खटका ठेविलेला असतो तेथेहि यति मानायला पाहिजे. चरण दीर्घ असल्यास चरणमध्यावर म्हणजे बहुशः दुस-या आवर्तनाच्या अन्तीं खटका पडतो तेथे यति मानायला हवा. हा यति अद्यापि कोणी साङ्गितलेला नाही त्यामुळे तो निरपवादपणें पाळला जातोच असें नाही. “ झुन्मदमदनमनोरथपथिकव-। अलिकुलसङ्कुलकुसुमसमूहनि-। राकुलबकुलकलापे' (गीगो ३/२) असे यतिभङ्ग जरी केव्हा केव्हा जयदेवाच्या कृतींत आढळले तरी दुस-या आवर्तनान्तीं यति तो बहुशः स्वाभाविकपणें पाळतोच. ‘ ललितलवङ्गलता परिशीलन- । कोमलमलयसमीरे मधुकरनिकरकरम्बितकोकिल- । कूजितकुञ्जकुटीरे (गीगो ३/१)