पान:छन्दोरचना.djvu/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ՅՅՅ |-+] या मात्रावलीचा आहे. हीच मात्रावली आवर्तनाच्या तिस-या मात्रेनन्तर खण्डित केली की पुढील प्रमाणे रचना होते.

  • जरेि । वास नसे तिळ । यांस तरी तुम् । म्हांस अर्पिलीं । सुमनें

मधु। जरी नसे तिळ- । भरी अन्तरी। तरी करी ही। धरणें ” (तासक १). शास्त्रीय दृष्ट्या दोन्ही पद्ये ओकाच जातीचीं मानलीं पाहिजेत. ओकाच पद्याच्या निरनिराळ्या चरणांत खण्डन निरनिराळ्या रीतीने केलें असण्याचाहि सम्भव असतो; मध्येच ओखाद्या चरणांत खण्डन नसूहि शकते. चरणनिर्णयाच्या दृष्टीने पदलालित्याला महत्त्व देतां कामा नये. प्रभाकराच्या पुढील पद्याची रचना शिथिल असली तरी त्यांतील खण्डन, पदलालित्य हृदयङ्गम आहे. “ गुल्जार नार शृङ्गार करुन खुप नटली चाले छमक छमक, दाावै धमक पाहुन मति खुटली. धु० टवटवित शरिर लवथवित, घवघवित मुखडा, गोरे गाल, अधर दोन्ही लाल, माल माशुकडा. भरपूर, नौतिमधे चूर, अर बुन्दकडा जग भुले डुले जेव्हा हाले नथेचा आकडा. दिसे कसा बसा, पहा जसा जरीचा तुकडा. अिश्काच्या हसुन खुप कसून मारी पकडा. दोहों दर्णिड भळभळित भव्य मजेच्या वांकी, गळिं चन्द्रहार तेजस्वि दाखवुन झाकी, घूत्कार धुन्द फुन्दांत मिजार्शित टाकी, जरिकाठ कञ्चुकी ताठ, राठ गटगटली; खुलि पाठ दिसे तसु आठ, गांठ तटतटली.”(प्रक २३८) ७ चरण चरण हा पद्याचा आवृत्त होणारा सोअीस्कर विभाग असल्या कारणाने आणि त्याच्या अन्तीं बहुशः विराम असल्याने कोणत्या भागाला चरण म्हणावें हैं ठरवायला सहसा अडचण पडत नाही. परन्तु चरणान्तीं, केवळ खटका आणि यति नव्हे, तर विरामच असला पाहिजे असा आग्रह धरिल्यास पादा