पान:छन्दोरचना.djvu/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅՅՅ जाति-जीवन या पद्याची जाति ओकच ठरून दोन्ही पद्यांची गणना, ज्या जातींत कडवें हैं[- । प। ० +] या मात्रावलीचे दोन वा अधिक चरण आणि[- । प। प। प ॥ ७ +] या मात्रावलीचा ओक चरण मिळून होतें त्या जातींत होअील. ६ खण्डन चरणांत सारख्या अन्तराने खटके घेअधून खटक्याखटक्यांनी यमकं साधणें हा पदलालित्याचाच ओक प्रकार आहे. यालाच येथे खण्डन म्हटलें आहे. या खटक्याखटक्यांनी साधिलेल्या यमकांच्या अनुरोधाने चरणनिर्णय करणें निर्जनों घोर या वनों कोण तू साङ्गें गन्धर्वसुता, वनदेवि, मनुज वा कां गे ?” (तासक ६९) याप्रमाणे पद्य छापण्याची जरी पद्धत अलीकडे प्रचलित झालेली असली तरी वस्तुतः हीं ‘ निर्जनों घोर या वनों कोण तू साङ्गें, गन्धर्वसुता, वनदेवि, मनुज वा कां गे ?” (तासक ६९) अशी [-। प। प। -+] या मात्रावलीची द्विपदी आहे आणि ती तशीच मुद्रित करायला पाहिजे. पद्य लिहिण्याच्या प्राचीन पद्धतींत चरण हे जसे झुभ्या रेघेने अलग अलग दाखवीत असत तसे हे खटक्याखटक्यांनी पडलेले तुकडे अलग अलग केले जात नसत. प्रस्तुत पद्यांत हे खटके आवर्तनाच्या तिस-या मात्रेनन्तर पडले आहेत. परन्तु, ' अशि । मण्डित तनु केलि। खण्डित पति कुठ। धुण्डित बसला । रूसून् ” या रामजोशीच्या चरणांत खटके आवर्तनांच्या चौथ्या मात्रेनन्तर आहेत, तर ‘ मिरिग्र। लागला छान् गेलं। भिजून रान् देव -। किर्पर्च सुटल । वारं पघा।चार्डकुरी कसा। ओटी पुरी काढा। राजा सुभान्याला। म्होर” (यध १२२) या कुणबाञ्भू बोलींतील शिथिल पद्यांत खटके आवर्तनाच्या सहाव्या मात्रेनन्तर आहेत. या पद्याचें कडवें ओकचरणी असून तो चरण [-। प । प । प