पान:छन्दोरचना.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने RoR वृत्तविचार चुकी भुमगली नाही हेंच कारण असावें. असले मतभेद पुढे वृत्तांवरील टीपांत वृत्तनामाचा प्रश्न फारच घोटाळ्याचा आणि बिकट झाला आहे. छन्दस् आणि वृत्त हे शब्द नपुंसकलिङ्गी असले तरी त्यांची नावें बहुतेक स्त्रीलिङ्गी आहेत. प्रायः हीं नावें त्या वृत्ताच्या रचनेंत गोवितां येतील अशींच असतात. *चन्द्रावर्ता” सारखे त्या वृत्ताच्या रचनेंत न बसण्याजोगें नाव क्रचितच आढळतें. णराच, मालती अित्यादि प्राकृत नावें वृत्तांत बसलीं तरी त्यांची संस्कृत रूपें त्या वृत्तांत बसत नाहीत; आणि स्वयम्भूच्छन्द, कविदर्पण आणि प्राकृत पेंड्ङ्गल हे तीन ग्रन्थ वगळल्यास वृत्तांचीं नावें संस्कृत रूपांतच देण्याचा आम्नाय आहे. तेव्हा संस्कृत नाव जर वृत्तांत बसत नसलें तर त्यांत थोडा फार फेरफार करणें अवश्य होतें. प्रमाणी, समानी, श्येनी आणि हंसी यांची अनुक्रमें प्रमाणिका, समानिका, श्येनिका आणि हंसिका अशी रूपें करण्यांत येतात, याच कारणासाठी झुदाहरणांत 'यवमती’च्या ठिकाणी 'यवान्विता’ म्हणून 'छन्दीवशाच यवान्वितामित्युतम् असें समर्थन हेमचन्द्र (हे ३८) करिती. याच कारणासाठी चन्द्रावर्ता आणि माला या वृत्तांत न बसणा-या नावांच्या ठिकाणीं शशिकला आणि स्रकू हीं नावें देण्यांत आलीं असावीत. पुष्कळ नावें म्हणजे कान्तेचें वर्णन करणारीं विशेषणें आहेत. काही पशुपक्ष्यांच्या स्वरावरून, गतीवरून वा क्रीडितावरून पडलीं आहेत. काही सामासिक नामांच्या शेवटीं-आवली,-माला अशीं पर्दे आहेत. हीं नावें अस्तित्वांत कशों आलों ? जो ओखादा श्लोक सुपरिचित असेल त्यांतीलच ओखाद्या संस्मरणीय ललित शब्दाने (बहुशः आद्य वा अन्त्य शब्दाने ) तो वृत्तप्रकार निर्देशिला जावा आणि सूचित व्हावा हें स्वाभाविक आहे. ओकाच वृत्ताला कित्येकदा अनेक नावें आढळतात याचें ओक कारण, त्या वृत्ताचे भिन्न भिन्न सुपरिचित ‘ कुटजानि वीक्ष्य शिखिभिः शिखरीन्द्र समयावनौ घनमदभ्रमराणि गगनंच गीतनिनदस्य गिरोच्चैः समया वर्नौघनमदभ्रमराणि ” (शिशु ६/७३)